Surah Al-Fatiha - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
بِسۡمِ ٱللَّهِ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ
१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे
Surah Al-Fatiha, Verse 1
ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ رَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे
Surah Al-Fatiha, Verse 2
ٱلرَّحۡمَٰنِ ٱلرَّحِيمِ
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
Surah Al-Fatiha, Verse 3
مَٰلِكِ يَوۡمِ ٱلدِّينِ
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे
Surah Al-Fatiha, Verse 4
إِيَّاكَ نَعۡبُدُ وَإِيَّاكَ نَسۡتَعِينُ
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
Surah Al-Fatiha, Verse 5
ٱهۡدِنَا ٱلصِّرَٰطَ ٱلۡمُسۡتَقِيمَ
६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
Surah Al-Fatiha, Verse 6
صِرَٰطَ ٱلَّذِينَ أَنۡعَمۡتَ عَلَيۡهِمۡ غَيۡرِ ٱلۡمَغۡضُوبِ عَلَيۡهِمۡ وَلَا ٱلضَّآلِّينَ
७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा
Surah Al-Fatiha, Verse 7