Surah Quraish - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
لِإِيلَٰفِ قُرَيۡشٍ
१. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता
Surah Quraish, Verse 1
إِۦلَٰفِهِمۡ رِحۡلَةَ ٱلشِّتَآءِ وَٱلصَّيۡفِ
२. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता
Surah Quraish, Verse 2
فَلۡيَعۡبُدُواْ رَبَّ هَٰذَا ٱلۡبَيۡتِ
३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे
Surah Quraish, Verse 3
ٱلَّذِيٓ أَطۡعَمَهُم مِّن جُوعٖ وَءَامَنَهُم مِّنۡ خَوۡفِۭ
४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली
Surah Quraish, Verse 4