Surah Al-Baqara Verse 20 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Baqaraيَكَادُ ٱلۡبَرۡقُ يَخۡطَفُ أَبۡصَٰرَهُمۡۖ كُلَّمَآ أَضَآءَ لَهُم مَّشَوۡاْ فِيهِ وَإِذَآ أَظۡلَمَ عَلَيۡهِمۡ قَامُواْۚ وَلَوۡ شَآءَ ٱللَّهُ لَذَهَبَ بِسَمۡعِهِمۡ وَأَبۡصَٰرِهِمۡۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٞ
२०. वाटते की वीज त्यांचे डोळे हिसकून घेईल, जेव्हा ती त्यांच्याकरिता उजेड करते तेव्हा ते चालतात आणि जेव्हा अंधार करते, तेव्हा (जागच्या जागी) उभे राहतात आणि अल्लाहने इच्छिले तर त्यांचे कान आणि डोळे हिरावून घेईल. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखणारा आहे