Surah Al-Baqara Verse 258 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Baqaraأَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِي حَآجَّ إِبۡرَٰهِـۧمَ فِي رَبِّهِۦٓ أَنۡ ءَاتَىٰهُ ٱللَّهُ ٱلۡمُلۡكَ إِذۡ قَالَ إِبۡرَٰهِـۧمُ رَبِّيَ ٱلَّذِي يُحۡيِۦ وَيُمِيتُ قَالَ أَنَا۠ أُحۡيِۦ وَأُمِيتُۖ قَالَ إِبۡرَٰهِـۧمُ فَإِنَّ ٱللَّهَ يَأۡتِي بِٱلشَّمۡسِ مِنَ ٱلۡمَشۡرِقِ فَأۡتِ بِهَا مِنَ ٱلۡمَغۡرِبِ فَبُهِتَ ٱلَّذِي كَفَرَۗ وَٱللَّهُ لَا يَهۡدِي ٱلۡقَوۡمَ ٱلظَّـٰلِمِينَ
२५८. काय तुम्ही त्याला नाही पाहिले, ज्याने राज्य-सत्ता प्राप्त करून इब्राहीमशी, त्याच्या पालनकर्त्याबाबत भांडण केले. जेव्हा इब्राहीम म्हणाले की, माझा रब (पालनकर्ता) तर तो आहे जो जिवंत करतो आणि मारतो. तो म्हणू लागला, मीदेखील जिवंत करतो आणि मारतो. इब्राहीम म्हणाले, अल्लाह तर सूर्याला पूर्व दिशेकडून उगवतो तू त्याला पश्चिमेकडून उगव. आता मात्र तो काफिर निरुत्तर आणि थक्क झाला आणि अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवित नाही