Surah Al-Baqara Verse 275 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Baqaraٱلَّذِينَ يَأۡكُلُونَ ٱلرِّبَوٰاْ لَا يَقُومُونَ إِلَّا كَمَا يَقُومُ ٱلَّذِي يَتَخَبَّطُهُ ٱلشَّيۡطَٰنُ مِنَ ٱلۡمَسِّۚ ذَٰلِكَ بِأَنَّهُمۡ قَالُوٓاْ إِنَّمَا ٱلۡبَيۡعُ مِثۡلُ ٱلرِّبَوٰاْۗ وَأَحَلَّ ٱللَّهُ ٱلۡبَيۡعَ وَحَرَّمَ ٱلرِّبَوٰاْۚ فَمَن جَآءَهُۥ مَوۡعِظَةٞ مِّن رَّبِّهِۦ فَٱنتَهَىٰ فَلَهُۥ مَا سَلَفَ وَأَمۡرُهُۥٓ إِلَى ٱللَّهِۖ وَمَنۡ عَادَ فَأُوْلَـٰٓئِكَ أَصۡحَٰبُ ٱلنَّارِۖ هُمۡ فِيهَا خَٰلِدُونَ
२७५. व्याज खाणारे लोक उभे राहणार नाहीत. परंतु तसेच जसा तो मनुष्य उभा राहतो ज्याला सैतान बिलगून वेडसर बनवितो. हे अशासाठी की हे म्हणत असत की व्यापारदेखील व्याजाप्रमाणेच आहे. वास्तविक अल्लाहने व्यापार हलाल (वैध) केला आणि व्याजाला हराम. आणि जो मनुष्य आपल्याजवळ आलेला अल्लाहचा उपदेश ऐकून (व्याज घेण्यापासून) थांबला तर त्याच्यासाठी ते आहे जे होऊन गेले आणि त्याचा मामला अल्लाहच्या सुपूर्द आहे आणि तरीही जो (हरामकडे) परतला, तो जहन्नमी आहे आणि असे लोक नेहमी त्यातच पडून राहतील