Surah Fatir Verse 14 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Fatirإِن تَدۡعُوهُمۡ لَا يَسۡمَعُواْ دُعَآءَكُمۡ وَلَوۡ سَمِعُواْ مَا ٱسۡتَجَابُواْ لَكُمۡۖ وَيَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ يَكۡفُرُونَ بِشِرۡكِكُمۡۚ وَلَا يُنَبِّئُكَ مِثۡلُ خَبِيرٖ
१४. जर तुम्ही त्यांना पुकाराल तर ते तुमची पुकार ऐकणारच नाहीत. आणि जर (समजा) ऐकूनही घेतील तर कबूल करणार नाहीत. किंबहुना कयामतच्या दिवशी तुमच्या शिर्क (अनेकईश्वरउपासना ) चा साफ इन्कार करतील१ आणि तुम्हाला कोणीही अल्लाहसारखा जाणकार (वास्तवपूर्ण) खबरी देणार नाही