Surah Al-Hujraat Verse 14 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Hujraat۞قَالَتِ ٱلۡأَعۡرَابُ ءَامَنَّاۖ قُل لَّمۡ تُؤۡمِنُواْ وَلَٰكِن قُولُوٓاْ أَسۡلَمۡنَا وَلَمَّا يَدۡخُلِ ٱلۡإِيمَٰنُ فِي قُلُوبِكُمۡۖ وَإِن تُطِيعُواْ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ لَا يَلِتۡكُم مِّنۡ أَعۡمَٰلِكُمۡ شَيۡـًٔاۚ إِنَّ ٱللَّهَ غَفُورٞ رَّحِيمٌ
१४. ग्रामीण लोक म्हणतात की आम्ही ईमान राखले. (तुम्ही) सांगा की, तुम्ही ईमान राखले नाही, परंतु तुम्ही असे म्हणा की आम्ही इस्लामचा स्वीकार केला (विरोध सोडून आज्ञाधारक झालोत) वास्तविक अजूनपर्यंत ईमान तुमच्या हृदयात दाखल झालेच नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञापालन करू लागाल तर अल्लाह तुमच्या कर्मांमधून काहीच घटविणार नाही. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे