Surah Al-Muddathir Verse 31 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah Al-Muddathirوَمَا جَعَلۡنَآ أَصۡحَٰبَ ٱلنَّارِ إِلَّا مَلَـٰٓئِكَةٗۖ وَمَا جَعَلۡنَا عِدَّتَهُمۡ إِلَّا فِتۡنَةٗ لِّلَّذِينَ كَفَرُواْ لِيَسۡتَيۡقِنَ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡكِتَٰبَ وَيَزۡدَادَ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ إِيمَٰنٗا وَلَا يَرۡتَابَ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡكِتَٰبَ وَٱلۡمُؤۡمِنُونَ وَلِيَقُولَ ٱلَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٞ وَٱلۡكَٰفِرُونَ مَاذَآ أَرَادَ ٱللَّهُ بِهَٰذَا مَثَلٗاۚ كَذَٰلِكَ يُضِلُّ ٱللَّهُ مَن يَشَآءُ وَيَهۡدِي مَن يَشَآءُۚ وَمَا يَعۡلَمُ جُنُودَ رَبِّكَ إِلَّا هُوَۚ وَمَا هِيَ إِلَّا ذِكۡرَىٰ لِلۡبَشَرِ
३१. आणि आम्ही जहन्नमचे रक्षक केवळ फरिश्ते ठेवले आहेत आणि आम्ही त्यांची संख्या केवळ काफिरांच्या कसोटीकरिता निर्धारित केली आहे. यासाठी की ग्रंथधारकांनी विश्वास करावा आणि ईमान राखणाऱ्यांच्या ईमानात वृद्धी व्हावी आणि ग्रंथधारक व मुस्लिमांनी संशय करू नये, आणि ज्यांच्या मनात रोग आहे त्यांनी व काफिरांनी म्हणावे की या अशा उदाहरणाने अल्लाहला काय अभिप्रेत आहे? अशा प्रकारे अल्लाह, ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या लष्करांना त्याच्याखेरीज कोणीही जाणत नाही. हा समस्त मानवांकरिता (परिपूर्ण) बोध (आणि भलाई) आहे