Surah At-Taubah Verse 112 - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
Surah At-Taubahٱلتَّـٰٓئِبُونَ ٱلۡعَٰبِدُونَ ٱلۡحَٰمِدُونَ ٱلسَّـٰٓئِحُونَ ٱلرَّـٰكِعُونَ ٱلسَّـٰجِدُونَ ٱلۡأٓمِرُونَ بِٱلۡمَعۡرُوفِ وَٱلنَّاهُونَ عَنِ ٱلۡمُنكَرِ وَٱلۡحَٰفِظُونَ لِحُدُودِ ٱللَّهِۗ وَبَشِّرِ ٱلۡمُؤۡمِنِينَ
११२. हे असे लोक होते, जे तौबा (क्षमा-याचना) करणारे, अल्लाहची उपासना करणारे, त्याची स्तुती-प्रशंसा करणारे, रोजा (उपवास-व्रत) राखणारे (किंवा सत्य मार्गावर चालणारे) रुकूअ (झुकणारे) सजदा करणारे (माथा टेकणारे), चांगल्या गोष्टींचा उपदेश करणारे, आणि वाईट गोष्टींपासून रोखणारे आणि अल्लाहच्या नियमांना ध्यानात राखणारे आहेत आणि अशा ईमान राखणाऱ्यांना शुभ समाचार द्या