Surah Ad-Dhuha - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
وَٱلضُّحَىٰ
१. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची
Surah Ad-Dhuha, Verse 1
وَٱلَّيۡلِ إِذَا سَجَىٰ
२. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते
Surah Ad-Dhuha, Verse 2
مَا وَدَّعَكَ رَبُّكَ وَمَا قَلَىٰ
३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे
Surah Ad-Dhuha, Verse 3
وَلَلۡأٓخِرَةُ خَيۡرٞ لَّكَ مِنَ ٱلۡأُولَىٰ
४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे
Surah Ad-Dhuha, Verse 4
وَلَسَوۡفَ يُعۡطِيكَ رَبُّكَ فَتَرۡضَىٰٓ
५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल
Surah Ad-Dhuha, Verse 5
أَلَمۡ يَجِدۡكَ يَتِيمٗا فَـَٔاوَىٰ
६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही
Surah Ad-Dhuha, Verse 6
وَوَجَدَكَ ضَآلّٗا فَهَدَىٰ
७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही
Surah Ad-Dhuha, Verse 7
وَوَجَدَكَ عَآئِلٗا فَأَغۡنَىٰ
८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही
Surah Ad-Dhuha, Verse 8
فَأَمَّا ٱلۡيَتِيمَ فَلَا تَقۡهَرۡ
९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका
Surah Ad-Dhuha, Verse 9
وَأَمَّا ٱلسَّآئِلَ فَلَا تَنۡهَرۡ
१०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका
Surah Ad-Dhuha, Verse 10
وَأَمَّا بِنِعۡمَةِ رَبِّكَ فَحَدِّثۡ
११. आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपा-देणग्यांचे वर्णन करीत राहा
Surah Ad-Dhuha, Verse 11