UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Ya-Seen - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


يسٓ

१. यासीन
Surah Ya-Seen, Verse 1


وَٱلۡقُرۡءَانِ ٱلۡحَكِيمِ

२. शपथ आहे बुद्धी-कौशल्ययुक्त (आणि मजबूत) कुरआनाची
Surah Ya-Seen, Verse 2


إِنَّكَ لَمِنَ ٱلۡمُرۡسَلِينَ

३. की निश्चितच तुम्ही पैगंबरांपैकी आहात
Surah Ya-Seen, Verse 3


عَلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ

४. सरळ मार्गावर आहात
Surah Ya-Seen, Verse 4


تَنزِيلَ ٱلۡعَزِيزِ ٱلرَّحِيمِ

५. (हा कुरआन, अल्लाह) जबरदस्त, मोठ्या दया करणाऱ्यातर्फे अवतरित केला गेला आहे
Surah Ya-Seen, Verse 5


لِتُنذِرَ قَوۡمٗا مَّآ أُنذِرَ ءَابَآؤُهُمۡ فَهُمۡ غَٰفِلُونَ

६. यासाठी की तुम्ही अशा लोकांना खबरदार करावे, ज्यांच्या वाडवडिलांना खबरदार केले गेले नव्हते. यास्तव ते गफलतीत पडले आहेत
Surah Ya-Seen, Verse 6


لَقَدۡ حَقَّ ٱلۡقَوۡلُ عَلَىٰٓ أَكۡثَرِهِمۡ فَهُمۡ لَا يُؤۡمِنُونَ

७. त्यांच्यापैकी अधिकांश लोकांबाबत ही गोष्ट साबित झाली आहे. यास्तव हे लोक ईमान राखणार नाहीत
Surah Ya-Seen, Verse 7


إِنَّا جَعَلۡنَا فِيٓ أَعۡنَٰقِهِمۡ أَغۡلَٰلٗا فَهِيَ إِلَى ٱلۡأَذۡقَانِ فَهُم مُّقۡمَحُونَ

८. आम्ही त्यांच्या मानांवर तौक (जोखंड) टाकले आहे, जे त्यांच्या हनुवटीपर्यंत आहे, ज्यामुळे त्यांची डोकी वर उठलेल्या स्थितीत आहेत
Surah Ya-Seen, Verse 8


وَجَعَلۡنَا مِنۢ بَيۡنِ أَيۡدِيهِمۡ سَدّٗا وَمِنۡ خَلۡفِهِمۡ سَدّٗا فَأَغۡشَيۡنَٰهُمۡ فَهُمۡ لَا يُبۡصِرُونَ

९. आणि आम्ही एक आड त्यांच्यासमोर उभा केला आणि एक आड त्यांच्या मागे उभा केला, ज्याद्वारे आम्ही त्यांना झाकून टाकले, तेव्हा ते पाहू शकत नाही
Surah Ya-Seen, Verse 9


وَسَوَآءٌ عَلَيۡهِمۡ ءَأَنذَرۡتَهُمۡ أَمۡ لَمۡ تُنذِرۡهُمۡ لَا يُؤۡمِنُونَ

१०. आणि त्यांच्या संदर्भात तुमचे भय दाखविणे किंवा न दाखविणे दोन्ही सारखेच आहे. हे ईमान बाळगणार नाहीत
Surah Ya-Seen, Verse 10


إِنَّمَا تُنذِرُ مَنِ ٱتَّبَعَ ٱلذِّكۡرَ وَخَشِيَ ٱلرَّحۡمَٰنَ بِٱلۡغَيۡبِۖ فَبَشِّرۡهُ بِمَغۡفِرَةٖ وَأَجۡرٖ كَرِيمٍ

११. तुम्ही केवळ अशाच माणसाला भय दाखवू शकता, जो उपदेशाचे अनुसरण करील आणि रहमान (अल्लाह) चे न पाहता भय बाळगेल, तेव्हा तुम्ही अशा माणसाला क्षमा आणि उत्तम मोबदला दिला जाण्याची खूशखबर ऐकवा
Surah Ya-Seen, Verse 11


إِنَّا نَحۡنُ نُحۡيِ ٱلۡمَوۡتَىٰ وَنَكۡتُبُ مَا قَدَّمُواْ وَءَاثَٰرَهُمۡۚ وَكُلَّ شَيۡءٍ أَحۡصَيۡنَٰهُ فِيٓ إِمَامٖ مُّبِينٖ

१२. निःसंशय, आम्ही मृतांना जिवंत करू आणि आम्ही लिहित असतो जे कर्म देखील लोक पुढे पाठवितात आणि त्यांची ती कर्मेही, जी ते मागे सोडून जातात आणि प्रत्येक गोष्टीस आम्ही एका स्पष्ट ग्रंथात संकलित करून ठेवले आहे
Surah Ya-Seen, Verse 12


وَٱضۡرِبۡ لَهُم مَّثَلًا أَصۡحَٰبَ ٱلۡقَرۡيَةِ إِذۡ جَآءَهَا ٱلۡمُرۡسَلُونَ

१३. आणि तुम्ही त्यांच्यासमोर एक उदाहरण (अर्थात एका) वस्तीवाल्यांचा किस्सा (त्या काळचा) सादर करा, जेव्हा त्या वस्तीत अनेक रसूल आले
Surah Ya-Seen, Verse 13


إِذۡ أَرۡسَلۡنَآ إِلَيۡهِمُ ٱثۡنَيۡنِ فَكَذَّبُوهُمَا فَعَزَّزۡنَا بِثَالِثٖ فَقَالُوٓاْ إِنَّآ إِلَيۡكُم مُّرۡسَلُونَ

१४. जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ दोन रसूल पाठविलेत, तेव्हा त्या लोकांनी (प्रथम) त्या दोघांना समर्थन दिले, तेव्हा ते तिघे म्हणाले, आम्ही तुमच्याकडे (पैगंबर बनवून) पाठविलो गेलो आहोत
Surah Ya-Seen, Verse 14


قَالُواْ مَآ أَنتُمۡ إِلَّا بَشَرٞ مِّثۡلُنَا وَمَآ أَنزَلَ ٱلرَّحۡمَٰنُ مِن شَيۡءٍ إِنۡ أَنتُمۡ إِلَّا تَكۡذِبُونَ

१५. ते लोक म्हणाले, तुम्ही तर आमच्यासारखेच साधारण मनुष्य आहात आणि रहमान (दयावान) ने कोणतीही गोष्ट अवतरित केली नाही. तुम्ही केवळ खोटे बोलता
Surah Ya-Seen, Verse 15


قَالُواْ رَبُّنَا يَعۡلَمُ إِنَّآ إِلَيۡكُمۡ لَمُرۡسَلُونَ

१६. ते रसूल म्हणाले, आमचा पालनकर्ता जाणतो की आम्हाला तुमच्याकडे रसूल बनवून पाठविले गेले आहे
Surah Ya-Seen, Verse 16


وَمَا عَلَيۡنَآ إِلَّا ٱلۡبَلَٰغُ ٱلۡمُبِينُ

१७. आणि आमचे कर्तव्य तर केवळ स्पष्टपणे पोहचविणे एवढेच आहे
Surah Ya-Seen, Verse 17


قَالُوٓاْ إِنَّا تَطَيَّرۡنَا بِكُمۡۖ لَئِن لَّمۡ تَنتَهُواْ لَنَرۡجُمَنَّكُمۡ وَلَيَمَسَّنَّكُم مِّنَّا عَذَابٌ أَلِيمٞ

१८. ते म्हणाले की आम्ही तर तुम्हाला अभद्र समजतो आणि जर तुम्ही हे थांबविले नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी ठेचून तुमचे कामच तमाम करून टाकू आणि तुम्हाला आमच्यातर्फे सक्त शिक्षा मिळेल
Surah Ya-Seen, Verse 18


قَالُواْ طَـٰٓئِرُكُم مَّعَكُمۡ أَئِن ذُكِّرۡتُمۚ بَلۡ أَنتُمۡ قَوۡمٞ مُّسۡرِفُونَ

१९. ते पैगंबर म्हणाले की तुमची अभद्रता तर तुमच्या सोबतीला आहे, काय तिला (अशुभ समजता) की तुम्हाला शिकवण दिली जावी, किंबहुना तुम्ही तर मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात
Surah Ya-Seen, Verse 19


وَجَآءَ مِنۡ أَقۡصَا ٱلۡمَدِينَةِ رَجُلٞ يَسۡعَىٰ قَالَ يَٰقَوۡمِ ٱتَّبِعُواْ ٱلۡمُرۡسَلِينَ

२०. आणि एक मुष्य त्या शहराच्या शेवटच्या किनाऱ्याकडून धावत आला, तो म्हणाला, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या पैगंबरांच्या मार्गाचे अनुसरण करा
Surah Ya-Seen, Verse 20


ٱتَّبِعُواْ مَن لَّا يَسۡـَٔلُكُمۡ أَجۡرٗا وَهُم مُّهۡتَدُونَ

२१. अशा लोकांच्या मार्गाचे अनुसरण करा, जे तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाहीत आणि ते सत्य - मार्गावर आहेत
Surah Ya-Seen, Verse 21


وَمَالِيَ لَآ أَعۡبُدُ ٱلَّذِي فَطَرَنِي وَإِلَيۡهِ تُرۡجَعُونَ

२२. आणि मला काय झाले आहे की मी त्याची उपासना न करावी, ज्याने मला निर्माण केले आणि तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल
Surah Ya-Seen, Verse 22


ءَأَتَّخِذُ مِن دُونِهِۦٓ ءَالِهَةً إِن يُرِدۡنِ ٱلرَّحۡمَٰنُ بِضُرّٖ لَّا تُغۡنِ عَنِّي شَفَٰعَتُهُمۡ شَيۡـٔٗا وَلَا يُنقِذُونِ

२३. काय मी त्याला सोडून अशांना उपास्य बनवू की जर (अल्लाह) दयावान (रहमान) मला एखादे नुकसान पोहचवू इच्छिल तर त्यांची शिफारस मला काहीच फायदा पोहचवू शकणार नाही आणि ना ते मला वाचवू शकतील
Surah Ya-Seen, Verse 23


إِنِّيٓ إِذٗا لَّفِي ضَلَٰلٖ مُّبِينٍ

२४. मग तर मी निश्चितच उघड मार्गभ्रष्टतेत आहे
Surah Ya-Seen, Verse 24


إِنِّيٓ ءَامَنتُ بِرَبِّكُمۡ فَٱسۡمَعُونِ

२५. माझे म्हणणे ऐका! मी तर (साफ मनाने) तुम्हा सर्वांच्या पालनकर्त्यावर ईमान राखले आहे
Surah Ya-Seen, Verse 25


قِيلَ ٱدۡخُلِ ٱلۡجَنَّةَۖ قَالَ يَٰلَيۡتَ قَوۡمِي يَعۡلَمُونَ

२६. (त्याला) सांगितले गेले की जन्नतमध्ये दाखल हो. तो म्हणाला, माझ्या जनसमूहानेही जाणून घेतले असते तर बरे झाले असते
Surah Ya-Seen, Verse 26


بِمَا غَفَرَ لِي رَبِّي وَجَعَلَنِي مِنَ ٱلۡمُكۡرَمِينَ

२७. की मला माझ्या पालनकर्त्याने माफ केले आणि मला प्रतिष्ठित लोकांमध्ये सामील केले.१
Surah Ya-Seen, Verse 27


۞وَمَآ أَنزَلۡنَا عَلَىٰ قَوۡمِهِۦ مِنۢ بَعۡدِهِۦ مِن جُندٖ مِّنَ ٱلسَّمَآءِ وَمَا كُنَّا مُنزِلِينَ

२८. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या जनसमूहावर आकाशातून एखादे सैन्य अवतरित केले नाही आणि ना अशा प्रकारे आम्ही अवतरित करतो
Surah Ya-Seen, Verse 28


إِن كَانَتۡ إِلَّا صَيۡحَةٗ وَٰحِدَةٗ فَإِذَا هُمۡ خَٰمِدُونَ

२९. तो तर केवळ एक भयंकर चित्कार होता, ज्यामुळे ते सर्वच्या सर्व विझून गेले
Surah Ya-Seen, Verse 29


يَٰحَسۡرَةً عَلَى ٱلۡعِبَادِۚ مَا يَأۡتِيهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ

३०. (अशा) दासांबद्दल खेद! कधीही असा कोणताही रसूल (पैगंबर) त्यांच्याजवळ आला नाही, ज्याची त्यांनी थट्टा उडविली नसेल
Surah Ya-Seen, Verse 30


أَلَمۡ يَرَوۡاْ كَمۡ أَهۡلَكۡنَا قَبۡلَهُم مِّنَ ٱلۡقُرُونِ أَنَّهُمۡ إِلَيۡهِمۡ لَا يَرۡجِعُونَ

३१. काय त्यांनी नाही पाहिले की त्यांच्यापूर्वी कित्येक जनसमूहांना आम्ही नष्ट करून टाकले की ते यांच्याकडे परतणार नाहीत
Surah Ya-Seen, Verse 31


وَإِن كُلّٞ لَّمَّا جَمِيعٞ لَّدَيۡنَا مُحۡضَرُونَ

३२. प्रत्येक जनसमूह एकत्रित होऊन आमच्या समोर हजर केला जाईल
Surah Ya-Seen, Verse 32


وَءَايَةٞ لَّهُمُ ٱلۡأَرۡضُ ٱلۡمَيۡتَةُ أَحۡيَيۡنَٰهَا وَأَخۡرَجۡنَا مِنۡهَا حَبّٗا فَمِنۡهُ يَأۡكُلُونَ

३३. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी मृत (कोरडी) जमीन आहे जिला आम्ही जिवंत केले आणि तिच्यातून अन्न (धान्य) काढले ज्यातून ते खातात
Surah Ya-Seen, Verse 33


وَجَعَلۡنَا فِيهَا جَنَّـٰتٖ مِّن نَّخِيلٖ وَأَعۡنَٰبٖ وَفَجَّرۡنَا فِيهَا مِنَ ٱلۡعُيُونِ

३४. आणि आम्ही तिच्यात खजुरीच्या आणि द्राक्षांच्या बागा निर्माण केल्या आणि ज्यांच्यात झरे देखील प्रवाहित केले
Surah Ya-Seen, Verse 34


لِيَأۡكُلُواْ مِن ثَمَرِهِۦ وَمَا عَمِلَتۡهُ أَيۡدِيهِمۡۚ أَفَلَا يَشۡكُرُونَ

३५. यासाठी की (लोकांनी) तिची फळे खावीत आणि त्यांच्या हातांनी ते बनविले नाही, मग ते कृतज्ञता का नाही व्यक्त करीत
Surah Ya-Seen, Verse 35


سُبۡحَٰنَ ٱلَّذِي خَلَقَ ٱلۡأَزۡوَٰجَ كُلَّهَا مِمَّا تُنۢبِتُ ٱلۡأَرۡضُ وَمِنۡ أَنفُسِهِمۡ وَمِمَّا لَا يَعۡلَمُونَ

३६. तो (अल्लाह) मोठा पवित्र आहे, ज्याने प्रत्येक वस्तूच्या जोड्या निर्माण केल्या, मग त्या जमिनीतून उगविलेल्या वस्तू असोत, किंवा यांचे स्वतःचे (अस्तित्व) असो, मग त्या (वस्तू) असोत, ज्यांना हे जाणतही नाहीत
Surah Ya-Seen, Verse 36


وَءَايَةٞ لَّهُمُ ٱلَّيۡلُ نَسۡلَخُ مِنۡهُ ٱلنَّهَارَ فَإِذَا هُم مُّظۡلِمُونَ

३७. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी रात्र आहे, जिच्यातून आम्ही दिवसाला ओढून घेतो, तेव्हा ते अचानक अंधारात राहतात
Surah Ya-Seen, Verse 37


وَٱلشَّمۡسُ تَجۡرِي لِمُسۡتَقَرّٖ لَّهَاۚ ذَٰلِكَ تَقۡدِيرُ ٱلۡعَزِيزِ ٱلۡعَلِيمِ

३८. आणि सूर्याकरिता जे निर्धारित मार्ग आहेत, तो त्यावरच चालत राहतो.१ हे आहे निर्धारित केलेले जबरदस्त ज्ञानी (अल्लाह) चे
Surah Ya-Seen, Verse 38


وَٱلۡقَمَرَ قَدَّرۡنَٰهُ مَنَازِلَ حَتَّىٰ عَادَ كَٱلۡعُرۡجُونِ ٱلۡقَدِيمِ

३९. आणि चंद्राच्या आम्ही मजली निर्धारित केलेल्या आहेत. येथेपर्यंत की तो पुनश्च जुन्या फांदीसारखा होतो
Surah Ya-Seen, Verse 39


لَا ٱلشَّمۡسُ يَنۢبَغِي لَهَآ أَن تُدۡرِكَ ٱلۡقَمَرَ وَلَا ٱلَّيۡلُ سَابِقُ ٱلنَّهَارِۚ وَكُلّٞ فِي فَلَكٖ يَسۡبَحُونَ

४०. ना सूर्याच्या आवाक्यात आहे की चंद्राला जाऊन धरावे आणि ना रात्र, दिवसाच्या पुढे जाणारी आहे आणि सर्वच्या सर्व आकाशात तरंगत फिरतात
Surah Ya-Seen, Verse 40


وَءَايَةٞ لَّهُمۡ أَنَّا حَمَلۡنَا ذُرِّيَّتَهُمۡ فِي ٱلۡفُلۡكِ ٱلۡمَشۡحُونِ

४१. आणि त्यांच्यासाठी एक निशाणी (ही देखील) आहे की आम्ही त्यांच्या संततीला भरलेल्या नौकेत स्वार केले
Surah Ya-Seen, Verse 41


وَخَلَقۡنَا لَهُم مِّن مِّثۡلِهِۦ مَا يَرۡكَبُونَ

४२. आणि यांच्यासाठी त्यासारख्याच इतर वस्तू निर्माण केल्या, ज्यांच्यावर ते स्वार होतात
Surah Ya-Seen, Verse 42


وَإِن نَّشَأۡ نُغۡرِقۡهُمۡ فَلَا صَرِيخَ لَهُمۡ وَلَا هُمۡ يُنقَذُونَ

४३. आणि जर आम्ही इच्छिले असते तर त्यांना बुडवून टाकले असते, मग ना कोणी त्यांची मदत करणारा असता आणि ना ते वाचवले गेले असते
Surah Ya-Seen, Verse 43


إِلَّا رَحۡمَةٗ مِّنَّا وَمَتَٰعًا إِلَىٰ حِينٖ

४४. परंतु आम्ही आपल्यातर्फे दया - कृपा करतो आणि एका ठराविक मुदतीपर्यंत त्यांना लाभ देत आहोत
Surah Ya-Seen, Verse 44


وَإِذَا قِيلَ لَهُمُ ٱتَّقُواْ مَا بَيۡنَ أَيۡدِيكُمۡ وَمَا خَلۡفَكُمۡ لَعَلَّكُمۡ تُرۡحَمُونَ

४५. आणि त्यांना जेव्हा (कधी) सांगितले जाते की पुढच्या - मागच्या (दुष्कर्मां) पासून अलिप्त राहा, यासाठी की तुमच्यावर दया केली जावी
Surah Ya-Seen, Verse 45


وَمَا تَأۡتِيهِم مِّنۡ ءَايَةٖ مِّنۡ ءَايَٰتِ رَبِّهِمۡ إِلَّا كَانُواْ عَنۡهَا مُعۡرِضِينَ

४६. आणि त्यांच्याजवळ त्यांच्या पालनकर्त्याकडून अशी एखादी निशाणी येत नाही जिच्यापासून हे तोंड फिरवित नसावेत
Surah Ya-Seen, Verse 46


وَإِذَا قِيلَ لَهُمۡ أَنفِقُواْ مِمَّا رَزَقَكُمُ ٱللَّهُ قَالَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لِلَّذِينَ ءَامَنُوٓاْ أَنُطۡعِمُ مَن لَّوۡ يَشَآءُ ٱللَّهُ أَطۡعَمَهُۥٓ إِنۡ أَنتُمۡ إِلَّا فِي ضَلَٰلٖ مُّبِينٖ

४७. आणि त्यांना जेव्हा सांगितले जाते की अल्लाहने जे दिले आहे, त्यातून काही खर्च करा, तेव्हा हे काफिर, ईमान राखणाऱ्यांना उत्तर देतात की आम्ही त्यांना का खाऊ घालावे, ज्यांना अल्लाहने इच्छिले असते तर स्वतःच खाऊ - पिऊ घातले असते? तुम्ही तर आहातच उघड मार्गभ्रष्टतेत
Surah Ya-Seen, Verse 47


وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا ٱلۡوَعۡدُ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ

४८. आणि ते म्हणतात, हा वायदा (कयामतची धमकी) केव्हा पूर्ण होईल, सच्चे असाल तर सांगा
Surah Ya-Seen, Verse 48


مَا يَنظُرُونَ إِلَّا صَيۡحَةٗ وَٰحِدَةٗ تَأۡخُذُهُمۡ وَهُمۡ يَخِصِّمُونَ

४९. त्यांना केवळ एका भयंकर चित्काराची प्रतीक्षा आहे, जो त्यांना येऊन धरेल आणि हे आपसात लढत - भांडतच असतील
Surah Ya-Seen, Verse 49


فَلَا يَسۡتَطِيعُونَ تَوۡصِيَةٗ وَلَآ إِلَىٰٓ أَهۡلِهِمۡ يَرۡجِعُونَ

५०. त्यावेळी हे ना वसीयत (मृत्युपत्र) करू शकतील आणि ना - आपल्या कुटुंबाकडे परतू शकतील
Surah Ya-Seen, Verse 50


وَنُفِخَ فِي ٱلصُّورِ فَإِذَا هُم مِّنَ ٱلۡأَجۡدَاثِ إِلَىٰ رَبِّهِمۡ يَنسِلُونَ

५१. आणि सूर (शंख) फुंकला जाताच सर्वच्या सर्व आपल्या कबरीमधून आपल्या पालनकर्त्याकडे (जलद गतीने) चालू लागतील
Surah Ya-Seen, Verse 51


قَالُواْ يَٰوَيۡلَنَا مَنۢ بَعَثَنَا مِن مَّرۡقَدِنَاۜۗ هَٰذَا مَا وَعَدَ ٱلرَّحۡمَٰنُ وَصَدَقَ ٱلۡمُرۡسَلُونَ

५२. म्हणतील, अरेरे! आम्हाला आमच्या आरामच्या जागेतून कोणी उठविले? हेच आहे ते, ज्याचा वायदा रहमान (दयावान) ने केला होता, आणि पैगंबरांनी खरे खरे सांगितले होते
Surah Ya-Seen, Verse 52


إِن كَانَتۡ إِلَّا صَيۡحَةٗ وَٰحِدَةٗ فَإِذَا هُمۡ جَمِيعٞ لَّدَيۡنَا مُحۡضَرُونَ

५३. असे नव्हे, परंतु एक भयंकर गर्जना की अचानक सर्वच्या सर्व जमा होऊन आमच्या समोर हजर केले जातील
Surah Ya-Seen, Verse 53


فَٱلۡيَوۡمَ لَا تُظۡلَمُ نَفۡسٞ شَيۡـٔٗا وَلَا تُجۡزَوۡنَ إِلَّا مَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ

५४. तेव्हा आज कोणत्याही माणसावर किंचितही अत्याचार केला जाणार नाही आणि तुम्हाला त्याच कर्मांचा मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत होते
Surah Ya-Seen, Verse 54


إِنَّ أَصۡحَٰبَ ٱلۡجَنَّةِ ٱلۡيَوۡمَ فِي شُغُلٖ فَٰكِهُونَ

५५. निःसंशय, जन्नतवाले लोक आजच्या दिवशी आपल्या (मनोरंजन) कार्यात व्यस्त आणि आनंदित आहेत
Surah Ya-Seen, Verse 55


هُمۡ وَأَزۡوَٰجُهُمۡ فِي ظِلَٰلٍ عَلَى ٱلۡأَرَآئِكِ مُتَّكِـُٔونَ

५६. ते आणि त्यांच्या पत्न्या सावलीत आसनांवर तक्के लावून बसले असतील
Surah Ya-Seen, Verse 56


لَهُمۡ فِيهَا فَٰكِهَةٞ وَلَهُم مَّا يَدَّعُونَ

५७. त्यांच्याकरिता जन्नतमध्ये प्रत्येक प्रकारचे मेवे असतील, आणि इतरही, जे काही ते मागतील
Surah Ya-Seen, Verse 57


سَلَٰمٞ قَوۡلٗا مِّن رَّبّٖ رَّحِيمٖ

५८. दया करणाऱ्या पालनकर्त्यातर्फे त्यांना ‘सलाम’ म्हटले जाईल
Surah Ya-Seen, Verse 58


وَٱمۡتَٰزُواْ ٱلۡيَوۡمَ أَيُّهَا ٱلۡمُجۡرِمُونَ

५९. आणि हे अपराध्यांनो! आज तुम्ही वेगळे व्हा
Surah Ya-Seen, Verse 59


۞أَلَمۡ أَعۡهَدۡ إِلَيۡكُمۡ يَٰبَنِيٓ ءَادَمَ أَن لَّا تَعۡبُدُواْ ٱلشَّيۡطَٰنَۖ إِنَّهُۥ لَكُمۡ عَدُوّٞ مُّبِينٞ

६०. हे आदमची संतती! काय मी तुमच्याकडून वचन नव्हते घेतले की तुम्ही सैतानाची उपासना न करावी. तो तर तुमचा उघड शत्रू आहे
Surah Ya-Seen, Verse 60


وَأَنِ ٱعۡبُدُونِيۚ هَٰذَا صِرَٰطٞ مُّسۡتَقِيمٞ

६१. आणि फक्त माझीच उपासना करावी. हाच सरळ मार्ग आहे
Surah Ya-Seen, Verse 61


وَلَقَدۡ أَضَلَّ مِنكُمۡ جِبِلّٗا كَثِيرًاۖ أَفَلَمۡ تَكُونُواْ تَعۡقِلُونَ

६२. आणि सैतानाने तर तुमच्यापैकी अधिकांश समूहांना मार्गभ्रष्ट केले आहे. काय तुम्ही अक्कल नाही बाळगत?१
Surah Ya-Seen, Verse 62


هَٰذِهِۦ جَهَنَّمُ ٱلَّتِي كُنتُمۡ تُوعَدُونَ

६३. हीच ती जहन्नम आहे, जिचा वायदा तुम्हाला दिला जात होता
Surah Ya-Seen, Verse 63


ٱصۡلَوۡهَا ٱلۡيَوۡمَ بِمَا كُنتُمۡ تَكۡفُرُونَ

६४. आपल्या कुप्र (इन्कारा) चा मोबदला प्राप्त करण्याकरिता आज तिच्यात दाखल व्हा
Surah Ya-Seen, Verse 64


ٱلۡيَوۡمَ نَخۡتِمُ عَلَىٰٓ أَفۡوَٰهِهِمۡ وَتُكَلِّمُنَآ أَيۡدِيهِمۡ وَتَشۡهَدُ أَرۡجُلُهُم بِمَا كَانُواْ يَكۡسِبُونَ

६५. आम्ही आज त्यांच्या तोंडावर मोहर लावून देऊ आणि त्यांचे हात आमच्याशी बोलतील आणि त्यांचे पाय साक्ष देतील, त्यांच्या त्या कर्मांची, जे ते करीत होते
Surah Ya-Seen, Verse 65


وَلَوۡ نَشَآءُ لَطَمَسۡنَا عَلَىٰٓ أَعۡيُنِهِمۡ فَٱسۡتَبَقُواْ ٱلصِّرَٰطَ فَأَنَّىٰ يُبۡصِرُونَ

६६. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांचे डोळे आंधळे करून टाकले असते, मग हे मार्गाकडे धावत गेले असते, मग त्यांना कशा प्रकारे दिसून आले असते
Surah Ya-Seen, Verse 66


وَلَوۡ نَشَآءُ لَمَسَخۡنَٰهُمۡ عَلَىٰ مَكَانَتِهِمۡ فَمَا ٱسۡتَطَٰعُواْ مُضِيّٗا وَلَا يَرۡجِعُونَ

६७. आणि आम्ही इच्छिले असते तर त्यांच्या जागेवरच त्यांचे चेहरे बिघडवून (विकृत करून) टाकले असते. मग ना ते हिंडू फिरू शकले असते आणि ना परतू शकले असते
Surah Ya-Seen, Verse 67


وَمَن نُّعَمِّرۡهُ نُنَكِّسۡهُ فِي ٱلۡخَلۡقِۚ أَفَلَا يَعۡقِلُونَ

६८. आणि आम्ही ज्याला वृद्ध करतो, त्याला जन्माच्या वेळेच्या अवस्थेकडे दुसऱ्यांदा परतवितो, मग काय हे तरीही समजून घेत नाही
Surah Ya-Seen, Verse 68


وَمَا عَلَّمۡنَٰهُ ٱلشِّعۡرَ وَمَا يَنۢبَغِي لَهُۥٓۚ إِنۡ هُوَ إِلَّا ذِكۡرٞ وَقُرۡءَانٞ مُّبِينٞ

६९. आणि ना तर आम्ही या पैगंबरास काव्य (कविता) शिकविले, आणि ना हा त्यास योग्य आहे. हा तर केवळ बोध उपदेश आणि स्पष्ट कुरआन आहे
Surah Ya-Seen, Verse 69


لِّيُنذِرَ مَن كَانَ حَيّٗا وَيَحِقَّ ٱلۡقَوۡلُ عَلَى ٱلۡكَٰفِرِينَ

७०. यासाठी की त्याने प्रत्येक माणसाला सावध करावे, जो जिवंत आहे आणि सत्य (प्रमाण) प्रस्थापित व्हावे
Surah Ya-Seen, Verse 70


أَوَلَمۡ يَرَوۡاْ أَنَّا خَلَقۡنَا لَهُم مِّمَّا عَمِلَتۡ أَيۡدِينَآ أَنۡعَٰمٗا فَهُمۡ لَهَا مَٰلِكُونَ

७१. काय ते नाही पाहात की आम्ही आपल्या हातांनी बनविलेल्या वस्तूंपैकी, त्याच्यासाठी चतुष्पाद (गुरे-ढोरे) ही निर्माण केले ज्यांचे हे मालक बनले आहेत
Surah Ya-Seen, Verse 71


وَذَلَّلۡنَٰهَا لَهُمۡ فَمِنۡهَا رَكُوبُهُمۡ وَمِنۡهَا يَأۡكُلُونَ

७२. आणि त्यां (पशूं) ना आम्ही त्यांच्या अधीन केले आहे, ज्यांच्यापैकी काही तर त्यांची वाहने आहेत आणि काहीं (चे मांस) खातात
Surah Ya-Seen, Verse 72


وَلَهُمۡ فِيهَا مَنَٰفِعُ وَمَشَارِبُۚ أَفَلَا يَشۡكُرُونَ

७३. आणि त्यांना त्यांच्यापासून इतरही अनेक फायदे आहेत, आणि पिण्याच्या वस्तू काय तरीही हे कृतज्ञता दर्शवित नाही
Surah Ya-Seen, Verse 73


وَٱتَّخَذُواْ مِن دُونِ ٱللَّهِ ءَالِهَةٗ لَّعَلَّهُمۡ يُنصَرُونَ

७४. आणि ते अल्लाहखेरीज दुसऱ्यांनाही उपास्य बनवितात (या आशेने) की त्यांची मदत केली जावी
Surah Ya-Seen, Verse 74


لَا يَسۡتَطِيعُونَ نَصۡرَهُمۡ وَهُمۡ لَهُمۡ جُندٞ مُّحۡضَرُونَ

७५. (वास्तविक) त्यांना मदत करण्याचे ते सामर्थ्य बाळगत नाहीत, तथापि हे (अनेकेश्वरवादी) त्यांचे सैन्य या नात्याने हजर आहेत
Surah Ya-Seen, Verse 75


فَلَا يَحۡزُنكَ قَوۡلُهُمۡۘ إِنَّا نَعۡلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعۡلِنُونَ

७६. यास्तव त्यांच्या गोष्टी (बोलण्या) ने दुःखी कष्टी न व्हावे आम्ही त्यांच्या लपलेल्या व उघड सर्वच गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो
Surah Ya-Seen, Verse 76


أَوَلَمۡ يَرَ ٱلۡإِنسَٰنُ أَنَّا خَلَقۡنَٰهُ مِن نُّطۡفَةٖ فَإِذَا هُوَ خَصِيمٞ مُّبِينٞ

७७. काय माणसाला एवढेही माहीत नाही की आम्ही त्याला विर्यापासून निर्माण केले आहे, तरीही तो उघड भांडखोर बनून बसला
Surah Ya-Seen, Verse 77


وَضَرَبَ لَنَا مَثَلٗا وَنَسِيَ خَلۡقَهُۥۖ قَالَ مَن يُحۡيِ ٱلۡعِظَٰمَ وَهِيَ رَمِيمٞ

७८. आणि त्याने आमच्यासाठी उदाहरणे सांगितली आणि आपल्या (मूळ) उत्पत्तीला विसरला, म्हणाला की या सडल्या कुजल्या हाडांना कोण (पुन्हा) जिवंत करू शकतो
Surah Ya-Seen, Verse 78


قُلۡ يُحۡيِيهَا ٱلَّذِيٓ أَنشَأَهَآ أَوَّلَ مَرَّةٖۖ وَهُوَ بِكُلِّ خَلۡقٍ عَلِيمٌ

७९. सांगा की त्यांना तो जिवंत करील, ज्याने त्यांना पहिल्यांदा निर्माण केले, जो सर्व प्रकारची उत्पत्ती चांगल्या प्रकारे जाणणारा आहे
Surah Ya-Seen, Verse 79


ٱلَّذِي جَعَلَ لَكُم مِّنَ ٱلشَّجَرِ ٱلۡأَخۡضَرِ نَارٗا فَإِذَآ أَنتُم مِّنۡهُ تُوقِدُونَ

८०. तोच होय, ज्याने तुमच्यासाठी हिरव्या वृक्षापासून आग निर्माण केली, ज्याद्वारे तुम्ही आग प्रज्वलित करता
Surah Ya-Seen, Verse 80


أَوَلَيۡسَ ٱلَّذِي خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ بِقَٰدِرٍ عَلَىٰٓ أَن يَخۡلُقَ مِثۡلَهُمۚ بَلَىٰ وَهُوَ ٱلۡخَلَّـٰقُ ٱلۡعَلِيمُ

८१. ज्याने आकाशांना आणि धरतीला निर्माण केले आहे, काय तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्यास समर्थ नाही? निश्चितच समर्थ आहे आणि तोच निर्माण करणारा, जाणणारा आहे
Surah Ya-Seen, Verse 81


إِنَّمَآ أَمۡرُهُۥٓ إِذَآ أَرَادَ شَيۡـًٔا أَن يَقُولَ لَهُۥ كُن فَيَكُونُ

८२. जेव्हा तो एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा त्याचे एवढे म्हणणे (पुरेसे) आहे की घडून ये, ती गोष्ट तत्काळ घडून येते
Surah Ya-Seen, Verse 82


فَسُبۡحَٰنَ ٱلَّذِي بِيَدِهِۦ مَلَكُوتُ كُلِّ شَيۡءٖ وَإِلَيۡهِ تُرۡجَعُونَ

८३. मोठा पवित्र आहे तो अल्लाह, ज्याच्या हाती प्रत्येक गोष्टीचा सत्ताधिकार आहे आणि ज्याच्याकडे तुम्ही सर्व परतविले जाल
Surah Ya-Seen, Verse 83


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 35
>> Surah 37

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai