Surah At-Tin - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
وَٱلتِّينِ وَٱلزَّيۡتُونِ
१. शपथ आहे अंजीरची आणि जैतूनची
Surah At-Tin, Verse 1
وَطُورِ سِينِينَ
२. आणि सनायीच्या तूर (पर्वता) ची
Surah At-Tin, Verse 2
وَهَٰذَا ٱلۡبَلَدِ ٱلۡأَمِينِ
३. आणि या शांतीपूर्ण शहराची
Surah At-Tin, Verse 3
لَقَدۡ خَلَقۡنَا ٱلۡإِنسَٰنَ فِيٓ أَحۡسَنِ تَقۡوِيمٖ
४. निःसंशय, आम्ही मनावाला अति उत्तम स्वरूपात निर्माण केले
Surah At-Tin, Verse 4
ثُمَّ رَدَدۡنَٰهُ أَسۡفَلَ سَٰفِلِينَ
५. मग त्याला खालच्या स्तरांपेक्षा खालच्या स्तराचा करून टाकले
Surah At-Tin, Verse 5
إِلَّا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ فَلَهُمۡ أَجۡرٌ غَيۡرُ مَمۡنُونٖ
६. परंतु ज्या लोकांनी ईमान राखले आणि मग सत्कर्म करीत राहिले तर त्यांच्यासाठी असा चांगला मोबदला आहे जोकधी संपणार नाही
Surah At-Tin, Verse 6
فَمَا يُكَذِّبُكَ بَعۡدُ بِٱلدِّينِ
७. मग तुम्हाला आता, मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते
Surah At-Tin, Verse 7
أَلَيۡسَ ٱللَّهُ بِأَحۡكَمِ ٱلۡحَٰكِمِينَ
८. काय सर्वश्रेष्ठ अल्लाह (सर्व) शासकांचा शासक नाही
Surah At-Tin, Verse 8