Surah Al-Qaria - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
ٱلۡقَارِعَةُ
१. खडखडविणारी
Surah Al-Qaria, Verse 1
مَا ٱلۡقَارِعَةُ
२. काय आहे ती खडखडविणारी
Surah Al-Qaria, Verse 2
وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلۡقَارِعَةُ
३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे
Surah Al-Qaria, Verse 3
يَوۡمَ يَكُونُ ٱلنَّاسُ كَٱلۡفَرَاشِ ٱلۡمَبۡثُوثِ
४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील
Surah Al-Qaria, Verse 4
وَتَكُونُ ٱلۡجِبَالُ كَٱلۡعِهۡنِ ٱلۡمَنفُوشِ
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील
Surah Al-Qaria, Verse 5
فَأَمَّا مَن ثَقُلَتۡ مَوَٰزِينُهُۥ
६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल
Surah Al-Qaria, Verse 6
فَهُوَ فِي عِيشَةٖ رَّاضِيَةٖ
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल
Surah Al-Qaria, Verse 7
وَأَمَّا مَنۡ خَفَّتۡ مَوَٰزِينُهُۥ
८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल
Surah Al-Qaria, Verse 8
فَأُمُّهُۥ هَاوِيَةٞ
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे
Surah Al-Qaria, Verse 9
وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا هِيَهۡ
१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे
Surah Al-Qaria, Verse 10
نَارٌ حَامِيَةُۢ
११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे
Surah Al-Qaria, Verse 11