Surah Hud - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
الٓرۚ كِتَٰبٌ أُحۡكِمَتۡ ءَايَٰتُهُۥ ثُمَّ فُصِّلَتۡ مِن لَّدُنۡ حَكِيمٍ خَبِيرٍ
१. अलिफ. लाम. रॉ . हा एक असा ग्रंथ आहे की याच्या आयती मजबूत केल्या गेल्या आहेत, मग सविस्तर सांगितल्या गेल्या आहेत एका हिकमतशाली, पूर्ण ज्ञान राखणाऱ्यातर्फे
Surah Hud, Verse 1
أَلَّا تَعۡبُدُوٓاْ إِلَّا ٱللَّهَۚ إِنَّنِي لَكُم مِّنۡهُ نَذِيرٞ وَبَشِيرٞ
२. हे की अल्लाहशिवाय कोणाचीही उपासना करू नका. मी तुम्हाला अल्लाहतर्फे भय दाखविणारा आणि खूशखबर देणारा आहे
Surah Hud, Verse 2
وَأَنِ ٱسۡتَغۡفِرُواْ رَبَّكُمۡ ثُمَّ تُوبُوٓاْ إِلَيۡهِ يُمَتِّعۡكُم مَّتَٰعًا حَسَنًا إِلَىٰٓ أَجَلٖ مُّسَمّٗى وَيُؤۡتِ كُلَّ ذِي فَضۡلٖ فَضۡلَهُۥۖ وَإِن تَوَلَّوۡاْ فَإِنِّيٓ أَخَافُ عَلَيۡكُمۡ عَذَابَ يَوۡمٖ كَبِيرٍ
३. आणि हे की तुम्ही आपल्या अपराधांना आपल्या पालनकर्त्याकडून माफ करवून घ्या, मग त्याच्याचकडे एकचित्त व्हा. तो तुम्हाला एका निर्धारीत वेळेपर्यंत (जीवन) सामुग्री देईल आणि प्रत्येक चांगले काम करणाऱ्यावर अधिक कृपा करील आणि जर तुम्ही लोक तोंड फिरवित राहिलात तर मला तुमच्याबाबत एका मोठ्या दिवसाच्या शिक्षेची चिंता वाटते
Surah Hud, Verse 3
إِلَى ٱللَّهِ مَرۡجِعُكُمۡۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٌ
४. तुम्हाला अल्लाहच्याच जवळ जायचे आहे आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो
Surah Hud, Verse 4
أَلَآ إِنَّهُمۡ يَثۡنُونَ صُدُورَهُمۡ لِيَسۡتَخۡفُواْ مِنۡهُۚ أَلَا حِينَ يَسۡتَغۡشُونَ ثِيَابَهُمۡ يَعۡلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعۡلِنُونَۚ إِنَّهُۥ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ
५. लक्षात ठेवा ते लोक आपल्या छातींना दुहेरी करून घेतात, यासाठी की आपल्या गोष्टी (बोलणे) अल्लाहपासून लपवू शकावे. लक्षात ठेवा की ते लोक ज्या वेळी आपले कपडे गुंडाळतात, त्या वेळीही तो सर्व काही जाणतो जे काही लपवितात (कानगोष्टी करतात) आणि जे काही साफ- स्पष्ट बोलतात. निःसंशय तो मनातल्या गोष्टीही जाणतो
Surah Hud, Verse 5
۞وَمَا مِن دَآبَّةٖ فِي ٱلۡأَرۡضِ إِلَّا عَلَى ٱللَّهِ رِزۡقُهَا وَيَعۡلَمُ مُسۡتَقَرَّهَا وَمُسۡتَوۡدَعَهَاۚ كُلّٞ فِي كِتَٰبٖ مُّبِينٖ
६. आणि जमिनीवर चालण्या-फिरणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या अन्नसामुग्रीची जबाबदारी अल्लाहवर आहे. तोच त्यांच्या निवासाचे ठिकाणही जाणतो आणि त्यांना सोपविले जाण्याचे ठिकाणही. सर्व काही स्पष्ट ग्रंथात आहे
Surah Hud, Verse 6
وَهُوَ ٱلَّذِي خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ فِي سِتَّةِ أَيَّامٖ وَكَانَ عَرۡشُهُۥ عَلَى ٱلۡمَآءِ لِيَبۡلُوَكُمۡ أَيُّكُمۡ أَحۡسَنُ عَمَلٗاۗ وَلَئِن قُلۡتَ إِنَّكُم مَّبۡعُوثُونَ مِنۢ بَعۡدِ ٱلۡمَوۡتِ لَيَقُولَنَّ ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ إِنۡ هَٰذَآ إِلَّا سِحۡرٞ مُّبِينٞ
७. आणि तो (अल्लाहच) होय, ज्याने सहा दिवसांत आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आणि त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते१ यासाठी की त्याने तुमची कसोटी घ्यावी की तुमच्यात सदाचारी कोण आहे? जर तुम्ही त्यांना सांगाल की तुम्हाला मेल्यानंतर पुन्हा जिवंत केले जाईल, तर इन्कारी लोक उत्तर देतील की ही केवळ उघड जादू आहे
Surah Hud, Verse 7
وَلَئِنۡ أَخَّرۡنَا عَنۡهُمُ ٱلۡعَذَابَ إِلَىٰٓ أُمَّةٖ مَّعۡدُودَةٖ لَّيَقُولُنَّ مَا يَحۡبِسُهُۥٓۗ أَلَا يَوۡمَ يَأۡتِيهِمۡ لَيۡسَ مَصۡرُوفًا عَنۡهُمۡ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ
८. आणि जर आम्ही काही मुदतीपर्यंत त्यांच्यावरील शिक्षा- यातना स्थगित केली तर हे निश्चित उद्गारतील की अज़ाबला कोणत्या गोष्टीने रोखले आहे, ऐका! ज्या दिवशी अज़ाब त्यांच्या जवळ येऊन पोहोचेल, मग तो त्यांच्यावरून टळणार नाही, मग तर ज्याची ते थट्टा उडवित होते, तोच त्यांच्यावर उलटून पडेल
Surah Hud, Verse 8
وَلَئِنۡ أَذَقۡنَا ٱلۡإِنسَٰنَ مِنَّا رَحۡمَةٗ ثُمَّ نَزَعۡنَٰهَا مِنۡهُ إِنَّهُۥ لَيَـُٔوسٞ كَفُورٞ
९. आणि जर आम्ही माणसाला एखाद्या सुखाची गोडी चाखवून, मग ते त्याच्याकडून हिरावून घेतो, तेव्हा तो फार उदास आणि मोठा कृतघ्न बनतो
Surah Hud, Verse 9
وَلَئِنۡ أَذَقۡنَٰهُ نَعۡمَآءَ بَعۡدَ ضَرَّآءَ مَسَّتۡهُ لَيَقُولَنَّ ذَهَبَ ٱلسَّيِّـَٔاتُ عَنِّيٓۚ إِنَّهُۥ لَفَرِحٞ فَخُورٌ
१०. आणि जर आम्ही त्याला एखादे सुख पोहचवितो, त्या दुःखानंतर जे त्याला पोहोचले होते, तेव्हा तो म्हणू लागतो की आता माझ्या कष्ट-यातना दूर झाल्या १ निश्चितच तो खूप आनंदित होऊन घमेंड करू लागतो
Surah Hud, Verse 10
إِلَّا ٱلَّذِينَ صَبَرُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ أُوْلَـٰٓئِكَ لَهُم مَّغۡفِرَةٞ وَأَجۡرٞ كَبِيرٞ
११. त्यांच्याखेरीज, जे धीर-संयम राखतात आणि सत्कर्म करीत राहतात अशाच लोकांसाठी क्षमाही आहे आणि फार मोठा मोबदलाही
Surah Hud, Verse 11
فَلَعَلَّكَ تَارِكُۢ بَعۡضَ مَا يُوحَىٰٓ إِلَيۡكَ وَضَآئِقُۢ بِهِۦ صَدۡرُكَ أَن يَقُولُواْ لَوۡلَآ أُنزِلَ عَلَيۡهِ كَنزٌ أَوۡ جَآءَ مَعَهُۥ مَلَكٌۚ إِنَّمَآ أَنتَ نَذِيرٞۚ وَٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ وَكِيلٌ
१२. तर कदाचित तुम्ही त्या वहयी (ईश-संदेशा) चा एखादा भाग सोडून देणार आहात, जो तुमच्याकडे अवतरीत केला जातो आणि त्यामुळे तुमच्या मनात संकोच आहे केवळ त्यांच्या या बोलण्यावर की याच्यावर एखादा खजिना का नाही उतरविला गेला? किंवा याच्यासोबत एखादा फरिश्ता तरी आला असता. ऐका! तुम्ही तर केवळ भय दाखविणारेच आहात आणि प्रत्येक चीजवस्तूची देखरेख करणारा केवळ अल्लाह आहे
Surah Hud, Verse 12
أَمۡ يَقُولُونَ ٱفۡتَرَىٰهُۖ قُلۡ فَأۡتُواْ بِعَشۡرِ سُوَرٖ مِّثۡلِهِۦ مُفۡتَرَيَٰتٖ وَٱدۡعُواْ مَنِ ٱسۡتَطَعۡتُم مِّن دُونِ ٱللَّهِ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ
१३. काय ते असे म्हणतात की या कुरआनाला त्याने आपल्या मनाने रचले आहे. तुम्ही उत्तर द्या की तुम्हीदेखील अशा दहा सूरह (अध्याय) मनाने रचून आणा आणि अल्लाहखेरीज वाटेल त्याला आपल्यासोबत सामील करून घ्या, जर तुम्ही सच्चे असाल
Surah Hud, Verse 13
فَإِلَّمۡ يَسۡتَجِيبُواْ لَكُمۡ فَٱعۡلَمُوٓاْ أَنَّمَآ أُنزِلَ بِعِلۡمِ ٱللَّهِ وَأَن لَّآ إِلَٰهَ إِلَّا هُوَۖ فَهَلۡ أَنتُم مُّسۡلِمُونَ
१४. मग जर ते तुमचे हे म्हणणे मान्य न करतील तर तुम्ही खात्रीपूर्वक जाणून घ्या की हा ग्रंथ (कुरआन) अल्लाहच्या ज्ञानासह अवतरित केला गेला आहे आणि हे की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही. तर काय तुम्ही मुस्लिम होता
Surah Hud, Verse 14
مَن كَانَ يُرِيدُ ٱلۡحَيَوٰةَ ٱلدُّنۡيَا وَزِينَتَهَا نُوَفِّ إِلَيۡهِمۡ أَعۡمَٰلَهُمۡ فِيهَا وَهُمۡ فِيهَا لَا يُبۡخَسُونَ
१५. जो मनुष्य ऐहिक जीवन आणि शोभा- सजावटीवर आसक्त असेल तर अशांना आम्ही सर्व कर्मांचा (मोबदला) इथेच पूर्णतः देऊन टाकतो आणि इथे त्यांना कसलीही कमतरता ठेवली जात नाही
Surah Hud, Verse 15
أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ لَيۡسَ لَهُمۡ فِي ٱلۡأٓخِرَةِ إِلَّا ٱلنَّارُۖ وَحَبِطَ مَا صَنَعُواْ فِيهَا وَبَٰطِلٞ مَّا كَانُواْ يَعۡمَلُونَ
१६. मात्र हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी आखिरतमध्ये आगीशिवाय दुसरे काहीही नाही आणि जे काही त्यांनी इथे केले असेल ते तिथे सर्व व्यर्थ आहे आणि जी काही त्यांची कर्मे होती, ती सर्व नाश पावणारी आहेत
Surah Hud, Verse 16
أَفَمَن كَانَ عَلَىٰ بَيِّنَةٖ مِّن رَّبِّهِۦ وَيَتۡلُوهُ شَاهِدٞ مِّنۡهُ وَمِن قَبۡلِهِۦ كِتَٰبُ مُوسَىٰٓ إِمَامٗا وَرَحۡمَةًۚ أُوْلَـٰٓئِكَ يُؤۡمِنُونَ بِهِۦۚ وَمَن يَكۡفُرۡ بِهِۦ مِنَ ٱلۡأَحۡزَابِ فَٱلنَّارُ مَوۡعِدُهُۥۚ فَلَا تَكُ فِي مِرۡيَةٖ مِّنۡهُۚ إِنَّهُ ٱلۡحَقُّ مِن رَّبِّكَ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يُؤۡمِنُونَ
१७. तो, जो आपल्या पालनकर्त्यातर्फे एका प्रमाणावर कायम असेल, आणि त्याच्यासोबत अल्लाहतर्फे साक्षी असेल, आणि त्याच्यापूर्वी मूसाचा ग्रंथ (साक्षी) असेल जो मार्गदर्शक आणि दया- कृपा आहे. (दुसऱ्यांप्रमाणे असू शकतो?) हेच लोक आहेत, जे त्यावर ईमान राखतात आणि सर्व समूहांपैकी, जोदेखील याचा इन्कारी असेल त्याच्या अंतिम वायद्याचे ठिकाण जहन्नम आहे.१ तेव्हा तुम्ही त्याबाबत कसल्याही संशयात पडू नका. निःसंशय हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे पूर्णतः सत्य आहे. परंतु अधिकांश लोक ईमान बाळगणारे नसतात
Surah Hud, Verse 17
وَمَنۡ أَظۡلَمُ مِمَّنِ ٱفۡتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبًاۚ أُوْلَـٰٓئِكَ يُعۡرَضُونَ عَلَىٰ رَبِّهِمۡ وَيَقُولُ ٱلۡأَشۡهَٰدُ هَـٰٓؤُلَآءِ ٱلَّذِينَ كَذَبُواْ عَلَىٰ رَبِّهِمۡۚ أَلَا لَعۡنَةُ ٱللَّهِ عَلَى ٱلظَّـٰلِمِينَ
१८. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबाबत खोटे रचेल. हे लोक आपल्या पालनकर्त्यासमोर सादर केले जातील आणि साक्ष देणारे सर्व म्हणतील की हे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या पालनकर्त्याविषयी असत्य रचले. खबरदार! अल्लाहतर्फे धिक्काराचा मारा आहे अशा अत्याचारी लोकांवर.१
Surah Hud, Verse 18
ٱلَّذِينَ يَصُدُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ وَيَبۡغُونَهَا عِوَجٗا وَهُم بِٱلۡأٓخِرَةِ هُمۡ كَٰفِرُونَ
१९. जे अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि त्यात चुका शोधण्यामागे लागतात. हेच ते लोक होते, जे आखिरतचा इन्कार करतात
Surah Hud, Verse 19
أُوْلَـٰٓئِكَ لَمۡ يَكُونُواْ مُعۡجِزِينَ فِي ٱلۡأَرۡضِ وَمَا كَانَ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِنۡ أَوۡلِيَآءَۘ يُضَٰعَفُ لَهُمُ ٱلۡعَذَابُۚ مَا كَانُواْ يَسۡتَطِيعُونَ ٱلسَّمۡعَ وَمَا كَانُواْ يُبۡصِرُونَ
२०. असे लोक ना या जगात अल्लाहला हरवू शकले, आणि ना त्यांचा कोणी मदतकर्ता अल्लाहखेरीज झाला. त्यांच्यासाठी शिक्षा दुप्पट केली जाईल ना ते ऐकण्याचे सामर्थ्य बाळगत होते आणि पाहातही नव्हते
Surah Hud, Verse 20
أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ خَسِرُوٓاْ أَنفُسَهُمۡ وَضَلَّ عَنۡهُم مَّا كَانُواْ يَفۡتَرُونَ
२१. हेच ते लोक होते ज्यांनी स्वतःच आपले नुकसान करून घेतले आणि त्यांच्याकडून त्यांनी रचलेले असत्य हरवले
Surah Hud, Verse 21
لَا جَرَمَ أَنَّهُمۡ فِي ٱلۡأٓخِرَةِ هُمُ ٱلۡأَخۡسَرُونَ
२२. निःसंशय हे लोक आखिरत (मरणोत्तर जीवना) मध्ये तोट्यात असतील
Surah Hud, Verse 22
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ وَأَخۡبَتُوٓاْ إِلَىٰ رَبِّهِمۡ أُوْلَـٰٓئِكَ أَصۡحَٰبُ ٱلۡجَنَّةِۖ هُمۡ فِيهَا خَٰلِدُونَ
२३. निःसंशय, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि आपल्या पालनकर्त्याकडे झुकतही राहिले, तेच लोक जन्नतमध्ये जाणार आहेत जिथे ते नेहमी नेहमी राहतील
Surah Hud, Verse 23
۞مَثَلُ ٱلۡفَرِيقَيۡنِ كَٱلۡأَعۡمَىٰ وَٱلۡأَصَمِّ وَٱلۡبَصِيرِ وَٱلسَّمِيعِۚ هَلۡ يَسۡتَوِيَانِ مَثَلًاۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ
२४. दोन्ही गटांचे उदाहरण असे आहे जणू एक आंधळा आणि बहिरा तर दुसरा डोळस आणि ऐकणारा. उदाहरणात काय हे दोन्ही समान आहेत? काय तरीही तुम्ही बोध प्राप्त करीत नाहीत
Surah Hud, Verse 24
وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا نُوحًا إِلَىٰ قَوۡمِهِۦٓ إِنِّي لَكُمۡ نَذِيرٞ مُّبِينٌ
२५. आणि निःसंशय आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविले की मी तुम्हाला स्पष्टपणे सचेत करणारा आहे
Surah Hud, Verse 25
أَن لَّا تَعۡبُدُوٓاْ إِلَّا ٱللَّهَۖ إِنِّيٓ أَخَافُ عَلَيۡكُمۡ عَذَابَ يَوۡمٍ أَلِيمٖ
२६. की तुम्ही फक्त अल्लाहचीच उपासना करा, मला तर तुमच्याविषयी दुःखदायक दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते
Surah Hud, Verse 26
فَقَالَ ٱلۡمَلَأُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ مِن قَوۡمِهِۦ مَا نَرَىٰكَ إِلَّا بَشَرٗا مِّثۡلَنَا وَمَا نَرَىٰكَ ٱتَّبَعَكَ إِلَّا ٱلَّذِينَ هُمۡ أَرَاذِلُنَا بَادِيَ ٱلرَّأۡيِ وَمَا نَرَىٰ لَكُمۡ عَلَيۡنَا مِن فَضۡلِۭ بَلۡ نَظُنُّكُمۡ كَٰذِبِينَ
२७. त्यांच्या जनसमूहाच्या काफिर सरदारांनी उत्तर दिले की आम्ही तर तुम्हाला आपल्याचसारखे मनुष्य असल्याचे पाहतो आणि तुमच्या अनुयायींनाही पाहतो की स्पष्टतः खालच्या पातळीच्या लोकांखेरीज दुसरा कोणी नाही. (जे तुमचे अनुसरण करीत आहेत) आम्हाला तर तुम्ही कोणत्याही प्रकारे आमच्यापेक्षा श्रेष्ठ दिसत नाही, उलट आम्ही तर तुम्हाला खोटे समजतो
Surah Hud, Verse 27
قَالَ يَٰقَوۡمِ أَرَءَيۡتُمۡ إِن كُنتُ عَلَىٰ بَيِّنَةٖ مِّن رَّبِّي وَءَاتَىٰنِي رَحۡمَةٗ مِّنۡ عِندِهِۦ فَعُمِّيَتۡ عَلَيۡكُمۡ أَنُلۡزِمُكُمُوهَا وَأَنتُمۡ لَهَا كَٰرِهُونَ
२८. (नूह) म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! मला हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट निशाणीवर कामय असलेला आणि मला त्याने आपल्याकडून (एखादी चांगली) दया- कृपा प्रदान केली असेल, मग ती तुमच्या डोळ्यांत सामावली नाही तर काय जबरदस्तीने तिला तुमच्या गळ्यात टाकू, वास्तविक तुम्ही तिला इच्छित नाही
Surah Hud, Verse 28
وَيَٰقَوۡمِ لَآ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَيۡهِ مَالًاۖ إِنۡ أَجۡرِيَ إِلَّا عَلَى ٱللَّهِۚ وَمَآ أَنَا۠ بِطَارِدِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْۚ إِنَّهُم مُّلَٰقُواْ رَبِّهِمۡ وَلَٰكِنِّيٓ أَرَىٰكُمۡ قَوۡمٗا تَجۡهَلُونَ
२९. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी याच्या मोबदल्यात तुमच्याकडून कसलेही धन मागत नाही. माझा मोबदला तर केवळ सर्वश्रेष्ठ अल्लाहजवळ आहे, ना मी ईमानधारकांना आपल्या जवळून दूर करू शकतो, त्यांना आपल्या पालनकर्त्याशी भेटायचे आहे. परंतु मी असे पाहतो की तुम्ही लोक मूर्खपणा करीत आहात
Surah Hud, Verse 29
وَيَٰقَوۡمِ مَن يَنصُرُنِي مِنَ ٱللَّهِ إِن طَرَدتُّهُمۡۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ
३०. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! जर मी ईमानधारकांना आपल्यापासून दूर करेन, तर अल्लाहच्या विरोधात कोण माझी मदत करू शकतो, काय तुम्ही थोडादेखील विचार करीत नाहीत
Surah Hud, Verse 30
وَلَآ أَقُولُ لَكُمۡ عِندِي خَزَآئِنُ ٱللَّهِ وَلَآ أَعۡلَمُ ٱلۡغَيۡبَ وَلَآ أَقُولُ إِنِّي مَلَكٞ وَلَآ أَقُولُ لِلَّذِينَ تَزۡدَرِيٓ أَعۡيُنُكُمۡ لَن يُؤۡتِيَهُمُ ٱللَّهُ خَيۡرًاۖ ٱللَّهُ أَعۡلَمُ بِمَا فِيٓ أَنفُسِهِمۡ إِنِّيٓ إِذٗا لَّمِنَ ٱلظَّـٰلِمِينَ
३१. आणि मी तुम्हाला हे नाही सांगत की माझ्याजवळ अल्लाहचे खजिने आहेत. (ऐका!) मी अपरोक्षाचेही ज्ञान बाळगत नाही, ना मी हे सांगतो की मी फरिश्ता आहे. ना माझे असे म्हणणे आहे की ज्यांच्यावर तुमची नजर अपमानाने पडत आहे त्यांना अल्लाह एखादी भलाई देणारच नाही. त्यांच्या मनात जे काही आहे अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. जर मी असे म्हणेन तर निश्चितच माझीही गणना अत्याचारी लोकांत होईल
Surah Hud, Verse 31
قَالُواْ يَٰنُوحُ قَدۡ جَٰدَلۡتَنَا فَأَكۡثَرۡتَ جِدَٰلَنَا فَأۡتِنَا بِمَا تَعِدُنَآ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ
३२. (जनसमूहाचे लोक) म्हणाले, हे नूह! तू आमच्याशी खूप खूप वाद घातला आहेस. आता तर ज्या गोष्टीचे भय तू आम्हाला दाखवित आहेस तीच आमच्याजवळ आणून दाखव जर तू सच्चा आहेस
Surah Hud, Verse 32
قَالَ إِنَّمَا يَأۡتِيكُم بِهِ ٱللَّهُ إِن شَآءَ وَمَآ أَنتُم بِمُعۡجِزِينَ
३३. उत्तर दिले, तीदेखील अल्लाहच आणील जर तो इच्छिल, आणि होय! तुम्ही अल्लाहला विवश करू शकत नाही
Surah Hud, Verse 33
وَلَا يَنفَعُكُمۡ نُصۡحِيٓ إِنۡ أَرَدتُّ أَنۡ أَنصَحَ لَكُمۡ إِن كَانَ ٱللَّهُ يُرِيدُ أَن يُغۡوِيَكُمۡۚ هُوَ رَبُّكُمۡ وَإِلَيۡهِ تُرۡجَعُونَ
३४. आणि तुम्हाला माझा उपदेश काहीच लाभ पोहचवू शकत नाही, मग मी कितीही तुमचे भले इच्छिले तरीही. जर अल्लाहची मर्जी तुम्हाला भटकत ठेवण्याची असेल. तोच तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही परतून जाल
Surah Hud, Verse 34
أَمۡ يَقُولُونَ ٱفۡتَرَىٰهُۖ قُلۡ إِنِ ٱفۡتَرَيۡتُهُۥ فَعَلَيَّ إِجۡرَامِي وَأَنَا۠ بَرِيٓءٞ مِّمَّا تُجۡرِمُونَ
३५. काय हे म्हणतात की हा ग्रंथ पैगंबराने स्वतः मनाने रचलेला आहे? तर तुम्ही उत्तर द्या की जर तो मी मनाने रचलेला असेल तर माझा गुन्हा माझ्यावर आहे आणि मी त्या अपराधांपासून वेगळा आहे, जे तुम्ही करीत आहात
Surah Hud, Verse 35
وَأُوحِيَ إِلَىٰ نُوحٍ أَنَّهُۥ لَن يُؤۡمِنَ مِن قَوۡمِكَ إِلَّا مَن قَدۡ ءَامَنَ فَلَا تَبۡتَئِسۡ بِمَا كَانُواْ يَفۡعَلُونَ
३६. आणि नूहकडे वहयी (ईशसंदेश) पाठविली गेली की तुमच्या जनसमूहामध्ये ज्यांनीदेखील ईमान राखले आहे, त्यांच्याखेरीज आता कोणीही ईमान राखणार नाही. तेव्हा त्यांच्या कर्मांबद्दल दुःखी होऊ नका
Surah Hud, Verse 36
وَٱصۡنَعِ ٱلۡفُلۡكَ بِأَعۡيُنِنَا وَوَحۡيِنَا وَلَا تُخَٰطِبۡنِي فِي ٱلَّذِينَ ظَلَمُوٓاْ إِنَّهُم مُّغۡرَقُونَ
३७. आणि एक नौका आमच्या डोळ्यांदेखत आणि आमच्या वहयीनुसार तयार करा आणि अत्याचारी लोकांविषयी आम्हाला काहीही बोलू नका, त्यांना पाण्यात बुडविले जाणार आहे
Surah Hud, Verse 37
وَيَصۡنَعُ ٱلۡفُلۡكَ وَكُلَّمَا مَرَّ عَلَيۡهِ مَلَأٞ مِّن قَوۡمِهِۦ سَخِرُواْ مِنۡهُۚ قَالَ إِن تَسۡخَرُواْ مِنَّا فَإِنَّا نَسۡخَرُ مِنكُمۡ كَمَا تَسۡخَرُونَ
३८. ते (नूह) नाव बनवू लागले, त्यांच्या जनसमूहाचे ज्या ज्या गटाचे लोक त्यांच्या जवळून जात, त्यांची थट्टा उटवित. ते (नूह) म्हणत, जर तुम्ही आमची थट्टा उडवित असाल तर आम्हीदेखील एक दिवस तुमच्यावर हसणार जशी तुम्ही थट्टा करीत आहात
Surah Hud, Verse 38
فَسَوۡفَ تَعۡلَمُونَ مَن يَأۡتِيهِ عَذَابٞ يُخۡزِيهِ وَيَحِلُّ عَلَيۡهِ عَذَابٞ مُّقِيمٌ
३९. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की कोणावर शिक्षा-यातना येणार आहे जी त्याला अपमानित करील आणि त्याच्यावर निरंतर अज़ाब उतरेल
Surah Hud, Verse 39
حَتَّىٰٓ إِذَا جَآءَ أَمۡرُنَا وَفَارَ ٱلتَّنُّورُ قُلۡنَا ٱحۡمِلۡ فِيهَا مِن كُلّٖ زَوۡجَيۡنِ ٱثۡنَيۡنِ وَأَهۡلَكَ إِلَّا مَن سَبَقَ عَلَيۡهِ ٱلۡقَوۡلُ وَمَنۡ ءَامَنَۚ وَمَآ ءَامَنَ مَعَهُۥٓ إِلَّا قَلِيلٞ
४०. येथेपर्यंत की जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला आणि तंदूरमधून पाणी उचंबळू लागले, आम्ही सांगितले की या नौकेत प्रत्येक प्रकारच्या (नर व मादा अशा) जोड्या स्वार करून घ्या आणि आपल्या कुटुंबियांनाही, मात्र त्यांच्याखेरीज ज्यांच्याबद्दल आधीच फैसला झालेला आहे आणि सर्व ईमान राखणाऱ्यांनाही. थ्यांच्यासोबत ईमान राखणारे फारच कमी होते
Surah Hud, Verse 40
۞وَقَالَ ٱرۡكَبُواْ فِيهَا بِسۡمِ ٱللَّهِ مَجۡرٜىٰهَا وَمُرۡسَىٰهَآۚ إِنَّ رَبِّي لَغَفُورٞ رَّحِيمٞ
४१. आणि नूह म्हणाले की या नौकेत स्वार व्हा अल्लाहच्याच नावाने हिचे चालणे आणि थांबणे आहे. निःसंशय, माझा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे
Surah Hud, Verse 41
وَهِيَ تَجۡرِي بِهِمۡ فِي مَوۡجٖ كَٱلۡجِبَالِ وَنَادَىٰ نُوحٌ ٱبۡنَهُۥ وَكَانَ فِي مَعۡزِلٖ يَٰبُنَيَّ ٱرۡكَب مَّعَنَا وَلَا تَكُن مَّعَ ٱلۡكَٰفِرِينَ
४२. आणि तो नौका त्यांना पर्वतासमान लाटांमधून नेत होती आणि नूहने आपल्या पुत्राला, जो एका किनाऱ्यावर होता, हाक मारून म्हटले, हे माझ्या प्रिय पुत्रा! आमच्यासोबत स्वार हो आणि इन्कारी लोकांत सामील राहू नकोस
Surah Hud, Verse 42
قَالَ سَـَٔاوِيٓ إِلَىٰ جَبَلٖ يَعۡصِمُنِي مِنَ ٱلۡمَآءِۚ قَالَ لَا عَاصِمَ ٱلۡيَوۡمَ مِنۡ أَمۡرِ ٱللَّهِ إِلَّا مَن رَّحِمَۚ وَحَالَ بَيۡنَهُمَا ٱلۡمَوۡجُ فَكَانَ مِنَ ٱلۡمُغۡرَقِينَ
४३. त्याने उत्तर दिले की मी एखाद्या उंच पर्वताच्या आश्रयाला जाईन, जो मला पाण्यापासून वाचवील. नूह म्हणाले, आज अल्लाहच्या हुकुमाने वाचविणारा कोणीही नाही. केवळ तेच वाचतील, ज्यांच्यावर अल्लाहची दया- कृपा होईल, त्याच क्षणी त्यांच्या दरम्यान एक लाट आली आणि तो बुडणाऱ्यांपैकी झाला
Surah Hud, Verse 43
وَقِيلَ يَـٰٓأَرۡضُ ٱبۡلَعِي مَآءَكِ وَيَٰسَمَآءُ أَقۡلِعِي وَغِيضَ ٱلۡمَآءُ وَقُضِيَ ٱلۡأَمۡرُ وَٱسۡتَوَتۡ عَلَى ٱلۡجُودِيِّۖ وَقِيلَ بُعۡدٗا لِّلۡقَوۡمِ ٱلظَّـٰلِمِينَ
४४. आणि फर्माविले गेले की, हे जमीन! आपले पाणी गिळून टाक, आणि हे आकाश! पुरे कर,थांब. त्याच वेळी पाणी सुकवले गेले आणि काम पूर्ण केले गेले आणि नौका जूदी नावाच्या पर्वताशी जाऊन थांबली आणि फर्माविले गेले अन्याय करणाऱ्यांवर धिक्काराचा वर्षाव होवो
Surah Hud, Verse 44
وَنَادَىٰ نُوحٞ رَّبَّهُۥ فَقَالَ رَبِّ إِنَّ ٱبۡنِي مِنۡ أَهۡلِي وَإِنَّ وَعۡدَكَ ٱلۡحَقُّ وَأَنتَ أَحۡكَمُ ٱلۡحَٰكِمِينَ
४५. आणि नूहने आपल्या पालनकर्त्यास पुकारले आणि म्हटले, हे माझ्या पालनकर्त्या! माझा पुत्र तर माझ्या कुटुंबियांपैकी आहे. निश्चितच तुझा वायदा पूर्णतः सच्चा आहे आणि तू समस्त शासकांपेक्षा उत्तम शासक आहे
Surah Hud, Verse 45
قَالَ يَٰنُوحُ إِنَّهُۥ لَيۡسَ مِنۡ أَهۡلِكَۖ إِنَّهُۥ عَمَلٌ غَيۡرُ صَٰلِحٖۖ فَلَا تَسۡـَٔلۡنِ مَا لَيۡسَ لَكَ بِهِۦ عِلۡمٌۖ إِنِّيٓ أَعِظُكَ أَن تَكُونَ مِنَ ٱلۡجَٰهِلِينَ
४६. (अल्लाहने) फर्माविले, हे नूह! खात्रीने तो तुझ्या कुटुंबियांपैकी नाही.१ त्याची कर्मे अगदी नापसंतीची आहेत. तू कधीही अशा गोष्टीची याचना करू नये, जिचे तुला किंचितही ज्ञान नसावे. मी तुला उपदेश करतो की तू अडाणी लोकांमध्ये आपली गणना करण्यापासून थांब
Surah Hud, Verse 46
قَالَ رَبِّ إِنِّيٓ أَعُوذُ بِكَ أَنۡ أَسۡـَٔلَكَ مَا لَيۡسَ لِي بِهِۦ عِلۡمٞۖ وَإِلَّا تَغۡفِرۡ لِي وَتَرۡحَمۡنِيٓ أَكُن مِّنَ ٱلۡخَٰسِرِينَ
४७. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझेच शरण मागतो, या गोष्टीपासून की तुझ्याकडे अशा गोष्टीची याचना करावी, जिचे मला ज्ञानच नसावे जर तू मला माफ केले नाही आणि माझ्यावर दया केली नाही तर मी तोटा उचलणाऱ्यांपैकी होईन
Surah Hud, Verse 47
قِيلَ يَٰنُوحُ ٱهۡبِطۡ بِسَلَٰمٖ مِّنَّا وَبَرَكَٰتٍ عَلَيۡكَ وَعَلَىٰٓ أُمَمٖ مِّمَّن مَّعَكَۚ وَأُمَمٞ سَنُمَتِّعُهُمۡ ثُمَّ يَمَسُّهُم مِّنَّا عَذَابٌ أَلِيمٞ
४८. फर्माविले गेले, हे नूह! आमच्यातर्फे सलामती आणि त्या समृद्धींसह उतर ज्या तुझ्यावर आहेत आणि तुझ्यासोबतच्या अनेक जनसमुदायांवर आणि अनेक समुदाय असे असतील, ज्यांना आम्ही लाभ तर निश्चित पोहोचवू, परंतु नंतर त्यांना आमच्यातर्फे दुःखदायक शिक्षाही पोहोचेल
Surah Hud, Verse 48
تِلۡكَ مِنۡ أَنۢبَآءِ ٱلۡغَيۡبِ نُوحِيهَآ إِلَيۡكَۖ مَا كُنتَ تَعۡلَمُهَآ أَنتَ وَلَا قَوۡمُكَ مِن قَبۡلِ هَٰذَاۖ فَٱصۡبِرۡۖ إِنَّ ٱلۡعَٰقِبَةَ لِلۡمُتَّقِينَ
४९. ही खबर परोक्षाच्या खबरींपैकी आहे, ज्यांची वहयी (अवतरण) आम्ही तुमच्याकडे करतो. यांना यापूर्वी ना तुम्ही जाणत होते, आणि ना तुमचा जनसमूह. यास्तव तुम्ही धीर- संयम राखा. निःसंशय, परिणाम अल्लाहचे भय राखून वागणाऱ्यांकरिताच आहे
Surah Hud, Verse 49
وَإِلَىٰ عَادٍ أَخَاهُمۡ هُودٗاۚ قَالَ يَٰقَوۡمِ ٱعۡبُدُواْ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنۡ إِلَٰهٍ غَيۡرُهُۥٓۖ إِنۡ أَنتُمۡ إِلَّا مُفۡتَرُونَ
५०. आणि आद जनसमूहाकडे त्यांचे भाऊ हूद यांना पाठविले. हूद म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तुम्ही तर केवळ असत्य रचत आहात
Surah Hud, Verse 50
يَٰقَوۡمِ لَآ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَيۡهِ أَجۡرًاۖ إِنۡ أَجۡرِيَ إِلَّا عَلَى ٱلَّذِي فَطَرَنِيٓۚ أَفَلَا تَعۡقِلُونَ
५१. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुमच्याकडून याचा काही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर त्याच्याकडे आहे, ज्याने मला निर्माण केले आहे. तर काय तरीही तुम्ही अकलेचा वापर करीत नाही
Surah Hud, Verse 51
وَيَٰقَوۡمِ ٱسۡتَغۡفِرُواْ رَبَّكُمۡ ثُمَّ تُوبُوٓاْ إِلَيۡهِ يُرۡسِلِ ٱلسَّمَآءَ عَلَيۡكُم مِّدۡرَارٗا وَيَزِدۡكُمۡ قُوَّةً إِلَىٰ قُوَّتِكُمۡ وَلَا تَتَوَلَّوۡاْ مُجۡرِمِينَ
५२. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ आपल्या अपराधांची माफी मागा आणि त्याच्या दरबारात तौबा (क्षमा-याचना) करा. यासाठी की त्याने पाऊस पाडणारे ढग तुमच्यावर पाठवावेत. आणि तुमच्या शक्ती-सामर्थ्यात आणखी वाढ करावी आणि तुम्ही गुन्हेगार बनून तोंड फिरवू नका
Surah Hud, Verse 52
قَالُواْ يَٰهُودُ مَا جِئۡتَنَا بِبَيِّنَةٖ وَمَا نَحۡنُ بِتَارِكِيٓ ءَالِهَتِنَا عَن قَوۡلِكَ وَمَا نَحۡنُ لَكَ بِمُؤۡمِنِينَ
५३. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे हूद! तू आमच्याजवळ एखादे प्रमाण तर आणले नाही, आणि आम्ही केवळ तुझ्या सांगण्यावरून आपल्या दैवतांना सोडणार नाहीत आणि ना आम्ही तुझ्यावर ईमान राखणार आहोत
Surah Hud, Verse 53
إِن نَّقُولُ إِلَّا ٱعۡتَرَىٰكَ بَعۡضُ ءَالِهَتِنَا بِسُوٓءٖۗ قَالَ إِنِّيٓ أُشۡهِدُ ٱللَّهَ وَٱشۡهَدُوٓاْ أَنِّي بَرِيٓءٞ مِّمَّا تُشۡرِكُونَ
५४. किंबहुना आम्ही तर म्हणतो की तुला आमच्या एखाद्या दैवताने झपाटून टाकले आहे. हूद म्हणाले, मी अल्लाहला साक्षी बनवितो आणि तुम्हीदेखील साक्षी राहा की मी तर अल्लाहखेरीज त्या सर्वांपासून वेगळा आहे, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी बनवित आहात
Surah Hud, Verse 54
مِن دُونِهِۦۖ فَكِيدُونِي جَمِيعٗا ثُمَّ لَا تُنظِرُونِ
५५. ठीक, तुम्ही सर्व मिळून माझ्याविरूद्ध वाईट कारवाई करून टाका, आणि मला कधीही सवड देऊ नका
Surah Hud, Verse 55
إِنِّي تَوَكَّلۡتُ عَلَى ٱللَّهِ رَبِّي وَرَبِّكُمۚ مَّا مِن دَآبَّةٍ إِلَّا هُوَ ءَاخِذُۢ بِنَاصِيَتِهَآۚ إِنَّ رَبِّي عَلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ
५६. माझा भरोसा केवळ अल्लाहवरच आहे, जो माझा पालनकर्ता आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे. जेवढेदेखील चालणारे फिरणारे आहेत, त्या सर्वांचे मस्तिष्क (कपाळ) त्यानेच धरून ठेवले आहे. निःसंशय माझा पालनकर्ता अगदी सरळ मार्गावर आहे
Surah Hud, Verse 56
فَإِن تَوَلَّوۡاْ فَقَدۡ أَبۡلَغۡتُكُم مَّآ أُرۡسِلۡتُ بِهِۦٓ إِلَيۡكُمۡۚ وَيَسۡتَخۡلِفُ رَبِّي قَوۡمًا غَيۡرَكُمۡ وَلَا تَضُرُّونَهُۥ شَيۡـًٔاۚ إِنَّ رَبِّي عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ حَفِيظٞ
५७. तरीही तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा. मी तर तुम्हाला तो संदेश पोहचता केला, जो देऊन मला तुमच्याकडे पाठविले गेले होते. माझा पालनकर्ता तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना आणील आणि तुम्ही त्याचे काहीच बिघडवू शकणार नाहीत. निःसंशय माझा पालनकर्ता प्रत्येक चीज वस्तूचा संरक्षक आहे
Surah Hud, Verse 57
وَلَمَّا جَآءَ أَمۡرُنَا نَجَّيۡنَا هُودٗا وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ مَعَهُۥ بِرَحۡمَةٖ مِّنَّا وَنَجَّيۡنَٰهُم مِّنۡ عَذَابٍ غَلِيظٖ
५८. आणि जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, तेव्हा आम्ही हूदला आणि त्याच्या ईमानधारक साथीदारांना आपल्या खास दया-कृपेने सुटका प्रदान केली आणि आम्ही त्या सर्वांना भयंकर (सक्त) शिक्षा-यातनेपासून वाचविले.१
Surah Hud, Verse 58
وَتِلۡكَ عَادٞۖ جَحَدُواْ بِـَٔايَٰتِ رَبِّهِمۡ وَعَصَوۡاْ رُسُلَهُۥ وَٱتَّبَعُوٓاْ أَمۡرَ كُلِّ جَبَّارٍ عَنِيدٖ
५९. हा होता आदचा जनसमूह, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला आणि त्याच्या पैगंबरांची अवज्ञा केली आणि प्रत्येक विद्रोही अवज्ञाकारीच्या आदेशांचे पालन केले
Surah Hud, Verse 59
وَأُتۡبِعُواْ فِي هَٰذِهِ ٱلدُّنۡيَا لَعۡنَةٗ وَيَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِۗ أَلَآ إِنَّ عَادٗا كَفَرُواْ رَبَّهُمۡۗ أَلَا بُعۡدٗا لِّعَادٖ قَوۡمِ هُودٖ
६०. आणि या जगातही त्यांचा धिःक्कार व निर्भत्सना होत राहिली आणि कयामतच्या दिवशीही १ पाहा, आदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला. हूदचा जनसमूह आदचा धिःक्कार असो
Surah Hud, Verse 60
۞وَإِلَىٰ ثَمُودَ أَخَاهُمۡ صَٰلِحٗاۚ قَالَ يَٰقَوۡمِ ٱعۡبُدُواْ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنۡ إِلَٰهٍ غَيۡرُهُۥۖ هُوَ أَنشَأَكُم مِّنَ ٱلۡأَرۡضِ وَٱسۡتَعۡمَرَكُمۡ فِيهَا فَٱسۡتَغۡفِرُوهُ ثُمَّ تُوبُوٓاْ إِلَيۡهِۚ إِنَّ رَبِّي قَرِيبٞ مُّجِيبٞ
६१. आणि समूदच्या जनसमूहाकडे त्यांचे भाऊ सॉलेह यांना पाठविले. सॉलेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहचीच भक्ती उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. त्यानेच तुम्हाला जमिनीपासून निर्माण केले आहे, आणि त्याने या धरतीवर तुम्हाला आबाद केले आहे. यास्तव तुम्ही त्याच्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे तौबा (क्षमा-याचना) करा. निःसंशय माझा पालनकर्ता तौबा कबूल करणारा समीप आहे
Surah Hud, Verse 61
قَالُواْ يَٰصَٰلِحُ قَدۡ كُنتَ فِينَا مَرۡجُوّٗا قَبۡلَ هَٰذَآۖ أَتَنۡهَىٰنَآ أَن نَّعۡبُدَ مَا يَعۡبُدُ ءَابَآؤُنَا وَإِنَّنَا لَفِي شَكّٖ مِّمَّا تَدۡعُونَآ إِلَيۡهِ مُرِيبٖ
६२. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे सॉलेह! याच्या पूर्वी आम्ही तुमच्याकडून अनेक आशा अपेक्षा बाळगून होतो. काय तुम्ही आम्हाला त्यांच्या भक्तीपासून रोखता, ज्यांची भक्ती आराधना आमचे वाडवडील करत आले, आम्हाला तर या धर्माबाबत शंका आहे, ज्याकडे तुम्ही आम्हाला बोलावित आहात
Surah Hud, Verse 62
قَالَ يَٰقَوۡمِ أَرَءَيۡتُمۡ إِن كُنتُ عَلَىٰ بَيِّنَةٖ مِّن رَّبِّي وَءَاتَىٰنِي مِنۡهُ رَحۡمَةٗ فَمَن يَنصُرُنِي مِنَ ٱللَّهِ إِنۡ عَصَيۡتُهُۥۖ فَمَا تَزِيدُونَنِي غَيۡرَ تَخۡسِيرٖ
६३. सालेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! बरे हे सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे एखाद्या खास प्रमाणावर असेल आणि त्याने मला आपल्या जवळून दया-कृपा प्रदान केली असेल, मग मी जर त्याची अवज्ञा केली तर असा कोण आहे, जो त्याच्यासमोर माझी मदत करेल? तुम्ही तर माझ्या नुकसानातच भर टाकत आहात
Surah Hud, Verse 63
وَيَٰقَوۡمِ هَٰذِهِۦ نَاقَةُ ٱللَّهِ لَكُمۡ ءَايَةٗۖ فَذَرُوهَا تَأۡكُلۡ فِيٓ أَرۡضِ ٱللَّهِۖ وَلَا تَمَسُّوهَا بِسُوٓءٖ فَيَأۡخُذَكُمۡ عَذَابٞ قَرِيبٞ
६४. आणि हे माझ्या जातीबांधवांनो! ही अल्लाहने पाठविलेली सांडणी आहे, जी तुमच्याकरिता अल्लाहचा एक चमत्कार आहे. आता तुम्ही तिला अल्लाहच्या धरतीवर चरण्यासाठी मोकळे सोडा आणि तिला कशाही प्रकारचा त्रास पोहचवू नका, अन्यथा लवकरच तुम्हाला अज़ाब येऊन धरेल
Surah Hud, Verse 64
فَعَقَرُوهَا فَقَالَ تَمَتَّعُواْ فِي دَارِكُمۡ ثَلَٰثَةَ أَيَّامٖۖ ذَٰلِكَ وَعۡدٌ غَيۡرُ مَكۡذُوبٖ
६५. तरीही त्या लोकांनी त्या सांडणीचे पाय कापून (मारून टाकले). यावर सॉलेह म्हणाले, ठीक तर तुम्ही आपल्या घरांमध्ये तीन दिवस पर्यंत वास्तव्य करून घ्या, हा वायदा खोटा नाही
Surah Hud, Verse 65
فَلَمَّا جَآءَ أَمۡرُنَا نَجَّيۡنَا صَٰلِحٗا وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ مَعَهُۥ بِرَحۡمَةٖ مِّنَّا وَمِنۡ خِزۡيِ يَوۡمِئِذٍۚ إِنَّ رَبَّكَ هُوَ ٱلۡقَوِيُّ ٱلۡعَزِيزُ
६६. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही सॉलेह आणि त्यांच्यावर ईमान राखणाऱ्यांना आपल्या दया-कृपेने त्या (शिक्षे) पासूनही वाचविले आणि त्या दिवसाच्या अपमानापासूनही. निःसंशय तुमचा पालनकर्ता शक्तिशाली आणि जबरदस्त आहे
Surah Hud, Verse 66
وَأَخَذَ ٱلَّذِينَ ظَلَمُواْ ٱلصَّيۡحَةُ فَأَصۡبَحُواْ فِي دِيَٰرِهِمۡ جَٰثِمِينَ
६७. आणि अत्याचारी लोकांना मोठा भयंकर आवाजाने येऊन धरले, मग ते आपल्या घरांमध्ये तोंडघशी मरून पडलेले राहिले
Surah Hud, Verse 67
كَأَن لَّمۡ يَغۡنَوۡاْ فِيهَآۗ أَلَآ إِنَّ ثَمُودَاْ كَفَرُواْ رَبَّهُمۡۗ أَلَا بُعۡدٗا لِّثَمُودَ
६८. अशा प्रकारे जणू ते त्या ठिकाणी कधी राहिलेच नव्हते. सावधान! समूदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याचा इन्कार केला. ऐका! त्या समूदच्या लोकांवर धिःक्कार आहे
Surah Hud, Verse 68
وَلَقَدۡ جَآءَتۡ رُسُلُنَآ إِبۡرَٰهِيمَ بِٱلۡبُشۡرَىٰ قَالُواْ سَلَٰمٗاۖ قَالَ سَلَٰمٞۖ فَمَا لَبِثَ أَن جَآءَ بِعِجۡلٍ حَنِيذٖ
६९. आणि आम्ही पाठिवलेले दूत इब्राहीमजवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले आणि सलाम म्हणाले. त्यांनीदेखील सलामचे प्रत्युत्तर दिले आणि विनाविलंब भाजलेले वासरु घेऊन आले
Surah Hud, Verse 69
فَلَمَّا رَءَآ أَيۡدِيَهُمۡ لَا تَصِلُ إِلَيۡهِ نَكِرَهُمۡ وَأَوۡجَسَ مِنۡهُمۡ خِيفَةٗۚ قَالُواْ لَا تَخَفۡ إِنَّآ أُرۡسِلۡنَآ إِلَىٰ قَوۡمِ لُوطٖ
७०. आणि जेव्हा पाहिले की त्यांचे हातदेखील त्या (खाद्या) कडे पोहचत नाही, तर त्यांना अनोळखी जाणून मनातल्या मनात भयभीत होऊ लागले. दूत म्हणाले, भिऊ नका. आम्हाला तर लूतच्या जनसमूहाकडे पाठविले गेले आहे
Surah Hud, Verse 70
وَٱمۡرَأَتُهُۥ قَآئِمَةٞ فَضَحِكَتۡ فَبَشَّرۡنَٰهَا بِإِسۡحَٰقَ وَمِن وَرَآءِ إِسۡحَٰقَ يَعۡقُوبَ
७१. आणि त्यांची पत्नी, जी उभी होती, ती हसली, तेव्हा आम्ही तिला इसहाकचा आणि त्याच्यानंतर याकूबचा शुभ समाचार दिला
Surah Hud, Verse 71
قَالَتۡ يَٰوَيۡلَتَىٰٓ ءَأَلِدُ وَأَنَا۠ عَجُوزٞ وَهَٰذَا بَعۡلِي شَيۡخًاۖ إِنَّ هَٰذَا لَشَيۡءٌ عَجِيبٞ
७२. ती म्हणू लागली, हाय रे दुर्दैव! मला मूलबाळ होऊ शकते? मी तर स्वतः म्हातारी आणि माझे पतीही खूप वयस्कर आहेत. निश्चितच ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट होय
Surah Hud, Verse 72
قَالُوٓاْ أَتَعۡجَبِينَ مِنۡ أَمۡرِ ٱللَّهِۖ رَحۡمَتُ ٱللَّهِ وَبَرَكَٰتُهُۥ عَلَيۡكُمۡ أَهۡلَ ٱلۡبَيۡتِۚ إِنَّهُۥ حَمِيدٞ مَّجِيدٞ
७३. (फरिश्ते) म्हणाले, काय तुम्हाला अल्लाहच्या सामर्थ्याविषयी आश्चर्य वाटत आहे. या घराच्या लोकांनो! तुमच्यावर अल्लाहची दया-कृपा आणि त्याच्या बरकती (समृद्धी) अवतरीत होवो! निःसंशय समस्त स्तुती- प्रशंसा आणि शान- वैभव अल्लाहकरिताच आहे
Surah Hud, Verse 73
فَلَمَّا ذَهَبَ عَنۡ إِبۡرَٰهِيمَ ٱلرَّوۡعُ وَجَآءَتۡهُ ٱلۡبُشۡرَىٰ يُجَٰدِلُنَا فِي قَوۡمِ لُوطٍ
७४. जेव्हा इब्राहीम यांची भीती नाहीशी झाली आणि त्यांना शुभ समाचारही कळला तेव्हा लूतच्या जनसमूहाबाबत आमच्याशी वादविवाद करू लागले
Surah Hud, Verse 74
إِنَّ إِبۡرَٰهِيمَ لَحَلِيمٌ أَوَّـٰهٞ مُّنِيبٞ
७५. निःसंशय, इब्राहीम मोठे संयमशील आणि कोमल मनाचे आणि अल्लाहकडे झुकणारे होते
Surah Hud, Verse 75
يَـٰٓإِبۡرَٰهِيمُ أَعۡرِضۡ عَنۡ هَٰذَآۖ إِنَّهُۥ قَدۡ جَآءَ أَمۡرُ رَبِّكَۖ وَإِنَّهُمۡ ءَاتِيهِمۡ عَذَابٌ غَيۡرُ مَرۡدُودٖ
७६. हे इब्राहीम! हा इरादा सोडून द्या. तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला आहे, आणि त्यांच्यावर न परतविल्या जाणाऱ्या शिक्षा- यातना अवश्य येणार आहेत
Surah Hud, Verse 76
وَلَمَّا جَآءَتۡ رُسُلُنَا لُوطٗا سِيٓءَ بِهِمۡ وَضَاقَ بِهِمۡ ذَرۡعٗا وَقَالَ هَٰذَا يَوۡمٌ عَصِيبٞ
७७. आणि जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते लूतजवळ पोहोचले, तेव्हा त्यांच्या कारणाने ते फार दुःखी झाले आणि मनातल्या मनात दुःख करू लागले आणि म्हणू लागले, आजचा दिवस फार दुःखाचा दिवस आहे
Surah Hud, Verse 77
وَجَآءَهُۥ قَوۡمُهُۥ يُهۡرَعُونَ إِلَيۡهِ وَمِن قَبۡلُ كَانُواْ يَعۡمَلُونَ ٱلسَّيِّـَٔاتِۚ قَالَ يَٰقَوۡمِ هَـٰٓؤُلَآءِ بَنَاتِي هُنَّ أَطۡهَرُ لَكُمۡۖ فَٱتَّقُواْ ٱللَّهَ وَلَا تُخۡزُونِ فِي ضَيۡفِيٓۖ أَلَيۡسَ مِنكُمۡ رَجُلٞ رَّشِيدٞ
७८. आणि त्याच्या जनसमूहाचे लोक त्यांच्याकडे धावत आले. ते तर आधीपासूनच वाईट कामात मग्न होते. (लूत) म्हणाले की, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माझ्या या मुली आहेत, ज्या तुमच्यासाठी फार साफसुथऱ्या आहेत. अल्लाहचे भय राखा आणि मला माझ्या पाहुण्यांबाबत अपमानित करू नका. काय तुमच्यात एकही भला माणूस नाही
Surah Hud, Verse 78
قَالُواْ لَقَدۡ عَلِمۡتَ مَا لَنَا فِي بَنَاتِكَ مِنۡ حَقّٖ وَإِنَّكَ لَتَعۡلَمُ مَا نُرِيدُ
७९. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले की तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आम्हाला तुमच्या मुलीवर कसलाही अधिकार नाही आणि तुम्ही आमची खरी इच्छा चांगल्या प्रकारे जाणून आहात
Surah Hud, Verse 79
قَالَ لَوۡ أَنَّ لِي بِكُمۡ قُوَّةً أَوۡ ءَاوِيٓ إِلَىٰ رُكۡنٖ شَدِيدٖ
८०. (लूत) म्हणाले, मला तुमच्याशी लढण्याची शक्ती असती तर फार बरे झाले असते किंवा मी एखाद्या मजबूत आश्रयाला असतो
Surah Hud, Verse 80
قَالُواْ يَٰلُوطُ إِنَّا رُسُلُ رَبِّكَ لَن يَصِلُوٓاْ إِلَيۡكَۖ فَأَسۡرِ بِأَهۡلِكَ بِقِطۡعٖ مِّنَ ٱلَّيۡلِ وَلَا يَلۡتَفِتۡ مِنكُمۡ أَحَدٌ إِلَّا ٱمۡرَأَتَكَۖ إِنَّهُۥ مُصِيبُهَا مَآ أَصَابَهُمۡۚ إِنَّ مَوۡعِدَهُمُ ٱلصُّبۡحُۚ أَلَيۡسَ ٱلصُّبۡحُ بِقَرِيبٖ
८१. आता (फरिश्ते) म्हणाले, हे लूत! आम्ही तुमच्या पालनकर्त्याचे पाठविलेले आहोत. अशक्य आहे की हे तुमच्यापर्यंत पोहचावेत. तेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबियांना घेऊन थोडी रात्र बाकी राहताना निघून जा. तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये. मात्र तुमच्या पत्नीखेरीज, कारण तिलाही तेच पोहचणार आहे, जे सर्वांना पोहोचेल. निश्चितच त्यांच्या वायद्याची वेळ सकाळची आहे, तर काय सकाळ अगदी जवळ नाही
Surah Hud, Verse 81
فَلَمَّا جَآءَ أَمۡرُنَا جَعَلۡنَا عَٰلِيَهَا سَافِلَهَا وَأَمۡطَرۡنَا عَلَيۡهَا حِجَارَةٗ مِّن سِجِّيلٖ مَّنضُودٖ
८२. मग जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, आम्ही त्या वस्तीला उलथे पालथे करून टाकले. वरचा हिस्सा खाली केला आणि त्यांच्यावर खंगर दगडांचा वर्षाव केला जे थरावर थर होते
Surah Hud, Verse 82
مُّسَوَّمَةً عِندَ رَبِّكَۖ وَمَا هِيَ مِنَ ٱلظَّـٰلِمِينَ بِبَعِيدٖ
८३. तुमच्या पालनकर्त्यातर्फे चिन्हांकित (निशाण असलेले) होते आणि ते त्या अत्याचारीपासून किंचितचही दूर नव्हते
Surah Hud, Verse 83
۞وَإِلَىٰ مَدۡيَنَ أَخَاهُمۡ شُعَيۡبٗاۚ قَالَ يَٰقَوۡمِ ٱعۡبُدُواْ ٱللَّهَ مَا لَكُم مِّنۡ إِلَٰهٍ غَيۡرُهُۥۖ وَلَا تَنقُصُواْ ٱلۡمِكۡيَالَ وَٱلۡمِيزَانَۖ إِنِّيٓ أَرَىٰكُم بِخَيۡرٖ وَإِنِّيٓ أَخَافُ عَلَيۡكُمۡ عَذَابَ يَوۡمٖ مُّحِيطٖ
८४. आणि (आम्ही) मदयनच्या लोकांकडे त्यांचे भाऊ शुऐबला पाठविले. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. तुम्ही माप-तोल करण्यात कमी करू नका. मी तुम्हाला सुसंपन्न अवस्थेत पाहात आहे आणि मला तुमच्याबद्दल घेरून टाकणाऱ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा-यातने) चे भयदेखील आहे
Surah Hud, Verse 84
وَيَٰقَوۡمِ أَوۡفُواْ ٱلۡمِكۡيَالَ وَٱلۡمِيزَانَ بِٱلۡقِسۡطِۖ وَلَا تَبۡخَسُواْ ٱلنَّاسَ أَشۡيَآءَهُمۡ وَلَا تَعۡثَوۡاْ فِي ٱلۡأَرۡضِ مُفۡسِدِينَ
८५. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! माप-तोल न्यायपूर्वक करा, लोकांना त्यांच्या वस्तू कमी (करून) देऊ नका आणि धरतीत उत्पात आणि बिघाड माजवू नका
Surah Hud, Verse 85
بَقِيَّتُ ٱللَّهِ خَيۡرٞ لَّكُمۡ إِن كُنتُم مُّؤۡمِنِينَۚ وَمَآ أَنَا۠ عَلَيۡكُم بِحَفِيظٖ
८६. अल्लाहचा हलाल (वैध) केलेला बाकी फायदा तुमच्यासाठी फारच चांगला आहे, जर तुम्ही ईमान राखणारे असाल. मी काही तुमच्यावर देखरेख ठेवणारा नाही
Surah Hud, Verse 86
قَالُواْ يَٰشُعَيۡبُ أَصَلَوٰتُكَ تَأۡمُرُكَ أَن نَّتۡرُكَ مَا يَعۡبُدُ ءَابَآؤُنَآ أَوۡ أَن نَّفۡعَلَ فِيٓ أَمۡوَٰلِنَا مَا نَشَـٰٓؤُاْۖ إِنَّكَ لَأَنتَ ٱلۡحَلِيمُ ٱلرَّشِيدُ
८७. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले, हे शुऐब! काय तुमची उपासना तुम्हाला हाच आदेश देते की आम्ही आपल्या वाडवडिलांच्या आराध्य दैवतांना सोडून द्यावे आणि आम्ही आपल्या धन-संपत्तीत जे काही करू इच्छितो, ते करणेही सोडून द्यावे. तुम्ही तर मोठे समंजस आणि सदाचारी आहात
Surah Hud, Verse 87
قَالَ يَٰقَوۡمِ أَرَءَيۡتُمۡ إِن كُنتُ عَلَىٰ بَيِّنَةٖ مِّن رَّبِّي وَرَزَقَنِي مِنۡهُ رِزۡقًا حَسَنٗاۚ وَمَآ أُرِيدُ أَنۡ أُخَالِفَكُمۡ إِلَىٰ مَآ أَنۡهَىٰكُمۡ عَنۡهُۚ إِنۡ أُرِيدُ إِلَّا ٱلۡإِصۡلَٰحَ مَا ٱسۡتَطَعۡتُۚ وَمَا تَوۡفِيقِيٓ إِلَّا بِٱللَّهِۚ عَلَيۡهِ تَوَكَّلۡتُ وَإِلَيۡهِ أُنِيبُ
८८. शुऐब म्हणाले, हे माझ्या जातीबांधवांनो! पाहा, जर मी आपल्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाणासह आहे आणि त्याने आपल्याकडून चांगली रोजी (अन्नसामुग्री) देऊन ठेवली आहे. माझी कधीही ही इच्छा नाही की तुम्हाला मनाई करून स्वतः त्या गोष्टीकडे झुकावे जिच्यापासून तुम्हाला रोखत आहे. माझा इरादा तर आपल्या कुवतीनुसार सुधारणा करण्याचाच आहे, आणि माझी सुबुद्धी (तौफीक) अल्लाहच्याच मदतीने आहे. त्याच्यावरच माझा भरोसा आहे, आणि त्याच्याकडेच मला परतून जायचे आहे
Surah Hud, Verse 88
وَيَٰقَوۡمِ لَا يَجۡرِمَنَّكُمۡ شِقَاقِيٓ أَن يُصِيبَكُم مِّثۡلُ مَآ أَصَابَ قَوۡمَ نُوحٍ أَوۡ قَوۡمَ هُودٍ أَوۡ قَوۡمَ صَٰلِحٖۚ وَمَا قَوۡمُ لُوطٖ مِّنكُم بِبَعِيدٖ
८९. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! कदाचित असे न व्हावे की तुम्ही माझ्या विरोधात येऊन त्या शिक्षा-यातनांना पात्र ठरावे ज्या नूहच्या जनसमूहावर आणि हूदच्या जनसमूहावर आणि सालेहच्या जनसमूहावर आल्या आणि लूतचा जनसमूह तर तुमच्यापासून किंचितही दूर नाही
Surah Hud, Verse 89
وَٱسۡتَغۡفِرُواْ رَبَّكُمۡ ثُمَّ تُوبُوٓاْ إِلَيۡهِۚ إِنَّ رَبِّي رَحِيمٞ وَدُودٞ
९०. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे झुका. निश्चितच माझा पालनकर्ता अतिशय दयावान आणि खूप प्रेम करणारा आहे
Surah Hud, Verse 90
قَالُواْ يَٰشُعَيۡبُ مَا نَفۡقَهُ كَثِيرٗا مِّمَّا تَقُولُ وَإِنَّا لَنَرَىٰكَ فِينَا ضَعِيفٗاۖ وَلَوۡلَا رَهۡطُكَ لَرَجَمۡنَٰكَۖ وَمَآ أَنتَ عَلَيۡنَا بِعَزِيزٖ
९१. ते (लोक) म्हणाले, हे शुऐब! तुमच्या बहुतेक गोष्टी आम्हाला समजत नाही आणि आम्ही तुम्हाला आपल्या दरम्यान खूप कमकुवत असल्याचे पाहतो. जर तुमच्या कबिल्याविषयी आदर नसता तर आम्ही तुमच्यावर दगडफेक केली असती आणि आम्ही तुम्हाला एखादा प्रतिष्ठित मनुष्य समजत नाही
Surah Hud, Verse 91
قَالَ يَٰقَوۡمِ أَرَهۡطِيٓ أَعَزُّ عَلَيۡكُم مِّنَ ٱللَّهِ وَٱتَّخَذۡتُمُوهُ وَرَآءَكُمۡ ظِهۡرِيًّاۖ إِنَّ رَبِّي بِمَا تَعۡمَلُونَ مُحِيطٞ
९२. शुऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! काय तुमच्या दृष्टीने माझ्या कबिल्याचे लोक अल्लाहपेक्षा जास्त सन्मानित आहेत की (ज्यामुळे) तुम्ही त्याला पाठीमागे टाकले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, माझ्या पालनकर्त्याने ते सर्व घेरलेले आहे
Surah Hud, Verse 92
وَيَٰقَوۡمِ ٱعۡمَلُواْ عَلَىٰ مَكَانَتِكُمۡ إِنِّي عَٰمِلٞۖ سَوۡفَ تَعۡلَمُونَ مَن يَأۡتِيهِ عَذَابٞ يُخۡزِيهِ وَمَنۡ هُوَ كَٰذِبٞۖ وَٱرۡتَقِبُوٓاْ إِنِّي مَعَكُمۡ رَقِيبٞ
९३. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! आता तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा, मीदेखील काम करीत आहे. लवकरच तुम्हाला माहीत पडेल की कोणाकडे तो अज़ाब येतो, जो त्याला अपमानित करून टाकील आणि असा कोण आहे जो खोटा आहे? तुम्ही प्रतिक्षा करा आणि मीदेखील तुमच्यासोबत प्रतिक्षा करीत आहे
Surah Hud, Verse 93
وَلَمَّا جَآءَ أَمۡرُنَا نَجَّيۡنَا شُعَيۡبٗا وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ مَعَهُۥ بِرَحۡمَةٖ مِّنَّا وَأَخَذَتِ ٱلَّذِينَ ظَلَمُواْ ٱلصَّيۡحَةُ فَأَصۡبَحُواْ فِي دِيَٰرِهِمۡ جَٰثِمِينَ
९४. आणि जेव्हा आमचा आदेश (अज़ाब) येऊन पोहोचला, आम्ही शुऐबला आणि त्यांच्यासह समस्त ईमानधारकांना आपल्या खास कृपेने मुक्ती प्रदान केली आणि अत्याचारी लोकांना मोठ्या भयंकर आवाजाच्या अज़ाबाने येऊन धरले१ ज्यामुळे ते आपल्या घरांमध्ये पालथे पडून राहिले
Surah Hud, Verse 94
كَأَن لَّمۡ يَغۡنَوۡاْ فِيهَآۗ أَلَا بُعۡدٗا لِّمَدۡيَنَ كَمَا بَعِدَتۡ ثَمُودُ
९५. जणू काही ते त्या घरांमध्ये कधी राहिलेच नव्हते. सावध राहा! मदयनकरिताही तसाच दुरावा असो, जसा दुरावा समूदसाठी झाला
Surah Hud, Verse 95
وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا مُوسَىٰ بِـَٔايَٰتِنَا وَسُلۡطَٰنٖ مُّبِينٍ
९६. आणि निःसंशय, आम्हीच मूसाला आपल्या आयती आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले होते
Surah Hud, Verse 96
إِلَىٰ فِرۡعَوۡنَ وَمَلَإِيْهِۦ فَٱتَّبَعُوٓاْ أَمۡرَ فِرۡعَوۡنَۖ وَمَآ أَمۡرُ فِرۡعَوۡنَ بِرَشِيدٖ
९७. फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे, तरीही त्या लोकांनी फिरऔनच्या आदेशांचे पालन केले आणि फिरऔनचा कोणताही आदेश उचित आणि रास्त नव्हता
Surah Hud, Verse 97
يَقۡدُمُ قَوۡمَهُۥ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ فَأَوۡرَدَهُمُ ٱلنَّارَۖ وَبِئۡسَ ٱلۡوِرۡدُ ٱلۡمَوۡرُودُ
९८. तो तर कयामतच्या दिवशी आपल्या जनसमूहाचा पुढाकार घेऊन त्या सर्वांना नरकात आणून उभा करील. तो मोठा वाईट घाट आहे जिथे हे लोक जाऊन पोहचतील
Surah Hud, Verse 98
وَأُتۡبِعُواْ فِي هَٰذِهِۦ لَعۡنَةٗ وَيَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِۚ بِئۡسَ ٱلرِّفۡدُ ٱلۡمَرۡفُودُ
९९. आणि त्यांच्यावर या जगातही धिःक्कार (चा मारा) झाला आणि कयामतच्या दिवशीही. किती वाईट इनाम (बक्षीस) आहे, जे त्यांना दिले गेले
Surah Hud, Verse 99
ذَٰلِكَ مِنۡ أَنۢبَآءِ ٱلۡقُرَىٰ نَقُصُّهُۥ عَلَيۡكَۖ مِنۡهَا قَآئِمٞ وَحَصِيدٞ
१००. वस्त्यांचा हा काही समाचार, जो आम्ही तुमच्यासमोर निवेदन करीत आहोत, त्यांच्यापैकी काही अस्तित्वात आहेत आणि काही कापणी केलेल्या पिकांसारख्या झाल्या
Surah Hud, Verse 100
وَمَا ظَلَمۡنَٰهُمۡ وَلَٰكِن ظَلَمُوٓاْ أَنفُسَهُمۡۖ فَمَآ أَغۡنَتۡ عَنۡهُمۡ ءَالِهَتُهُمُ ٱلَّتِي يَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مِن شَيۡءٖ لَّمَّا جَآءَ أَمۡرُ رَبِّكَۖ وَمَا زَادُوهُمۡ غَيۡرَ تَتۡبِيبٖ
१०१. आणि आम्ही त्यांच्यावर कोणताही जुलूम-अत्याचार केला नाही, किंबहुना त्यांनी स्वतःच आपल्यावर अत्याचार केला आणि त्यांना त्यांच्या आराध्य दैवतांनी कसलाही लाभ पोहचविला नाही, ज्यांना ते अल्लाहखेरीज पुकारत होते, वास्तविक तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला, किंबहुना त्यांनी त्यांच्या नुकसानात भरच घातली
Surah Hud, Verse 101
وَكَذَٰلِكَ أَخۡذُ رَبِّكَ إِذَآ أَخَذَ ٱلۡقُرَىٰ وَهِيَ ظَٰلِمَةٌۚ إِنَّ أَخۡذَهُۥٓ أَلِيمٞ شَدِيدٌ
१०२. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या पकडीचा हाच नियम आहे, जेव्हा तो वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अत्याचारी लोकांना तावडीत घेतो. निःसंशय अल्लाहची पकड दुःखदायक आणि अतिशय सक्त आहे
Surah Hud, Verse 102
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّمَنۡ خَافَ عَذَابَ ٱلۡأٓخِرَةِۚ ذَٰلِكَ يَوۡمٞ مَّجۡمُوعٞ لَّهُ ٱلنَّاسُ وَذَٰلِكَ يَوۡمٞ مَّشۡهُودٞ
१०३. निश्चितच यात त्या लोकांसाठी बोध-उपदेश आहे, जे कयामतच्या भयंकर शिक्षा-यातनेचे भय राखतात. तो दिवस, ज्या दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवस की ज्या दिवशी सर्वांना हजर केले जाईल
Surah Hud, Verse 103
وَمَا نُؤَخِّرُهُۥٓ إِلَّا لِأَجَلٖ مَّعۡدُودٖ
१०४. आणि त्याला आम्ही जो विलंब करतो, तो फकत् एका निर्धारीत वेळेपर्यंतच आहे
Surah Hud, Verse 104
يَوۡمَ يَأۡتِ لَا تَكَلَّمُ نَفۡسٌ إِلَّا بِإِذۡنِهِۦۚ فَمِنۡهُمۡ شَقِيّٞ وَسَعِيدٞ
१०५. ज्या दिवशी ती (कयामत) येईल, कोणाला हिंमत होणार नाही की अल्लाहच्या अनुमतीविना काही बोलावे, तेव्हा त्यांच्यापैकी कोणी दुर्दैवी असेल आणि कोणी सुदैवी
Surah Hud, Verse 105
فَأَمَّا ٱلَّذِينَ شَقُواْ فَفِي ٱلنَّارِ لَهُمۡ فِيهَا زَفِيرٞ وَشَهِيقٌ
१०६. तर जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील, तिथे हळू आणि उंच स्वरात ओरडतील
Surah Hud, Verse 106
خَٰلِدِينَ فِيهَا مَا دَامَتِ ٱلسَّمَٰوَٰتُ وَٱلۡأَرۡضُ إِلَّا مَا شَآءَ رَبُّكَۚ إِنَّ رَبَّكَ فَعَّالٞ لِّمَا يُرِيدُ
१०७. ते तिथे सदैवकाळ राहतील, जोपर्यंत आकाश व धरती कायम असतील. मात्र त्या वेळखेरीज, जी तुमच्या पालनकर्त्याची मर्जी असेल. निःसंशय, तुमचा पालनकर्ता जे काही इच्छितो ते करतोच
Surah Hud, Verse 107
۞وَأَمَّا ٱلَّذِينَ سُعِدُواْ فَفِي ٱلۡجَنَّةِ خَٰلِدِينَ فِيهَا مَا دَامَتِ ٱلسَّمَٰوَٰتُ وَٱلۡأَرۡضُ إِلَّا مَا شَآءَ رَبُّكَۖ عَطَآءً غَيۡرَ مَجۡذُوذٖ
१०८. आणि ज्यांना सुदैवी केले गेले ते जन्नत (स्वर्गा) मध्ये असतील जिथे ते नेहमीकरिता राहतील, जोपर्यंत आकाश व धरती बाकी राहील, परंतु जे तुमचा पालनकर्ता इच्छिल ही कधीही न संपणारी देणगी आहे
Surah Hud, Verse 108
فَلَا تَكُ فِي مِرۡيَةٖ مِّمَّا يَعۡبُدُ هَـٰٓؤُلَآءِۚ مَا يَعۡبُدُونَ إِلَّا كَمَا يَعۡبُدُ ءَابَآؤُهُم مِّن قَبۡلُۚ وَإِنَّا لَمُوَفُّوهُمۡ نَصِيبَهُمۡ غَيۡرَ مَنقُوصٖ
१०९. यास्तव तुम्ही त्या वस्तूंविषयी संशयग्रस्त राहू नका, ज्यांची हे लोक पूजा करीत आहेत. त्यांची उपासना तर अशा प्रकारे आहे, ज्या प्रकारे यांच्या पूर्वजांची यापूर्वी होती. आम्ही त्या सर्वांना पुरेपूर हिस्सा कमी न करता देणारच आहोत
Surah Hud, Verse 109
وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡكِتَٰبَ فَٱخۡتُلِفَ فِيهِۚ وَلَوۡلَا كَلِمَةٞ سَبَقَتۡ مِن رَّبِّكَ لَقُضِيَ بَيۡنَهُمۡۚ وَإِنَّهُمۡ لَفِي شَكّٖ مِّنۡهُ مُرِيبٖ
११०. निःसंशय आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला, मग त्यात मतभेद केला गेला जर या आधीच तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान लागू झालेले नसते तर निश्चितच त्यांचा फैसला केला गेला असता. त्यांना तर यात संशय वाटत आहे (हे तर दुविधाग्रस्त आहेत)
Surah Hud, Verse 110
وَإِنَّ كُلّٗا لَّمَّا لَيُوَفِّيَنَّهُمۡ رَبُّكَ أَعۡمَٰلَهُمۡۚ إِنَّهُۥ بِمَا يَعۡمَلُونَ خَبِيرٞ
१११. आणि निःसंशय त्यांच्यापैकी प्रत्येकाला (जेव्हा त्याच्यासमोर जाईल तेव्हा) तुमचा पालनकर्ता त्याला त्याच्या कर्मांचा पुरेपूर मोबदला प्रदान करील. निःसंशय ते जे काही करीत आहेत, अल्लाह ते सर्वकाही जाणून आहे
Surah Hud, Verse 111
فَٱسۡتَقِمۡ كَمَآ أُمِرۡتَ وَمَن تَابَ مَعَكَ وَلَا تَطۡغَوۡاْۚ إِنَّهُۥ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِيرٞ
११२. तेव्हा तुम्ही अगदी अटळ राहा, जसा तुम्हाला आदेश दिला गेला आहे आणि ते लोकदेखील ज्यांनी तुमच्यासह क्षमा-याचना केली आहे. (खबरदार) तुम्ही मर्यादा पार करू नका. अल्लाह तुमच्या समस्त कर्मांना पाहत आहे
Surah Hud, Verse 112
وَلَا تَرۡكَنُوٓاْ إِلَى ٱلَّذِينَ ظَلَمُواْ فَتَمَسَّكُمُ ٱلنَّارُ وَمَا لَكُم مِّن دُونِ ٱللَّهِ مِنۡ أَوۡلِيَآءَ ثُمَّ لَا تُنصَرُونَ
११३. आणि पाहा, अत्याचारी लोकांकडे कधीही झुकू नका. अन्यथा तुम्हालाही आगीचा दाह लागेल आणि अल्लाहखेरीज कोणी तुमच्या मदतीला उभा राहू शकणार नाही, आणि ना तुम्हाला मदत दिली जाईल
Surah Hud, Verse 113
وَأَقِمِ ٱلصَّلَوٰةَ طَرَفَيِ ٱلنَّهَارِ وَزُلَفٗا مِّنَ ٱلَّيۡلِۚ إِنَّ ٱلۡحَسَنَٰتِ يُذۡهِبۡنَ ٱلسَّيِّـَٔاتِۚ ذَٰلِكَ ذِكۡرَىٰ لِلذَّـٰكِرِينَ
११४. आणि दिवसाच्या दोन्ही किनाऱ्यांवर नमाज कायम राखा, आणि रात्रीच्या काही भागातही.१ निःसंशय सत्कर्मे वाईट गोष्टींना दूर करतात.२ हा उपदेश आहे, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता
Surah Hud, Verse 114
وَٱصۡبِرۡ فَإِنَّ ٱللَّهَ لَا يُضِيعُ أَجۡرَ ٱلۡمُحۡسِنِينَ
११५. आणि तुम्ही धीर-संयम राखा. निःसंशय अल्लाह सत्कर्म करणाऱ्यांचा मोबदला वाया जाऊ देत नाही
Surah Hud, Verse 115
فَلَوۡلَا كَانَ مِنَ ٱلۡقُرُونِ مِن قَبۡلِكُمۡ أُوْلُواْ بَقِيَّةٖ يَنۡهَوۡنَ عَنِ ٱلۡفَسَادِ فِي ٱلۡأَرۡضِ إِلَّا قَلِيلٗا مِّمَّنۡ أَنجَيۡنَا مِنۡهُمۡۗ وَٱتَّبَعَ ٱلَّذِينَ ظَلَمُواْ مَآ أُتۡرِفُواْ فِيهِ وَكَانُواْ مُجۡرِمِينَ
११६. जेव्हा तुमच्या पूर्वीच्या काळातील लोकांपैकी असे भलाई करणारे लोक का नाही झालेत, ज्यांनी धरतीवर फसाद (उत्पात) पसरविण्यास प्रतिबंध घातला असता, ज्या थोड्या लोकांखेरीज ज्यांना आम्ही त्यांच्यापैकी सुटका प्रदान केली होती. अत्यारारी लोक तर त्या गोष्टीच्या मागे लागले, ज्यात त्यांना सुसंपन्न केले गेले होते आणि ते दुराचारी होते
Surah Hud, Verse 116
وَمَا كَانَ رَبُّكَ لِيُهۡلِكَ ٱلۡقُرَىٰ بِظُلۡمٖ وَأَهۡلُهَا مُصۡلِحُونَ
११७. तुमचा पालनकर्ता असा नाही की एखाद्या वस्तीला अत्याचारपूर्वक नष्ट करून टाकील, जेव्हा की तिथले लोक अल्लाहचे भय राखणारे असावेत
Surah Hud, Verse 117
وَلَوۡ شَآءَ رَبُّكَ لَجَعَلَ ٱلنَّاسَ أُمَّةٗ وَٰحِدَةٗۖ وَلَا يَزَالُونَ مُخۡتَلِفِينَ
११८. आणि जर तुमच्या पालनकर्त्याने इच्छिले असते तर समस्त लोकांना एका मार्गावर (चालणारा) एक जनसमुदाय बनविला असता. ते तर नेहमी विरोध करणारेच राहतील
Surah Hud, Verse 118
إِلَّا مَن رَّحِمَ رَبُّكَۚ وَلِذَٰلِكَ خَلَقَهُمۡۗ وَتَمَّتۡ كَلِمَةُ رَبِّكَ لَأَمۡلَأَنَّ جَهَنَّمَ مِنَ ٱلۡجِنَّةِ وَٱلنَّاسِ أَجۡمَعِينَ
११९. त्यांच्याखेरीज, ज्यांच्यावर तुमचा पालनकर्ता दया करील, त्यांना तर यासाठी निर्माण केले गेले आहे आणि तुमच्या पालनकर्त्याचे हे फर्मान पूर्ण झाल्याविना राहणार नाही की मी जहन्नमला जिन्न आणि मानव सर्वांनी भरून टाकीन
Surah Hud, Verse 119
وَكُلّٗا نَّقُصُّ عَلَيۡكَ مِنۡ أَنۢبَآءِ ٱلرُّسُلِ مَا نُثَبِّتُ بِهِۦ فُؤَادَكَۚ وَجَآءَكَ فِي هَٰذِهِ ٱلۡحَقُّ وَمَوۡعِظَةٞ وَذِكۡرَىٰ لِلۡمُؤۡمِنِينَ
१२०. आणि पैगंबरांचे सर्व वृत्तांत आम्ही तुमच्यासमोर, तुमच्या मनाला शांती लाभावी यासाठी सांगत आहोत. तुमच्याजवळ या अध्यायातही सत्य पोहचले, जे ईमान राखणाऱ्यांकरिता बोध-उपदेश आहे
Surah Hud, Verse 120
وَقُل لِّلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ ٱعۡمَلُواْ عَلَىٰ مَكَانَتِكُمۡ إِنَّا عَٰمِلُونَ
१२१. आणि ईमान न राखणाऱ्यांना सांगून टाका की तुम्ही आपल्या ठिकाणी काम करीत राहा. आम्हीही कर्मांमध्ये मग्न आहोत
Surah Hud, Verse 121
وَٱنتَظِرُوٓاْ إِنَّا مُنتَظِرُونَ
१२२. आणि तुम्हीही प्रतिक्षा करा, आम्हीही प्रतिक्षा करीत आहोत
Surah Hud, Verse 122
وَلِلَّهِ غَيۡبُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَإِلَيۡهِ يُرۡجَعُ ٱلۡأَمۡرُ كُلُّهُۥ فَٱعۡبُدۡهُ وَتَوَكَّلۡ عَلَيۡهِۚ وَمَا رَبُّكَ بِغَٰفِلٍ عَمَّا تَعۡمَلُونَ
१२३. आणि आकाशांचे व जमिनीचे परोक्ष ज्ञान केवळ अल्लाहला आहे. आणि समस्त कार्यांचे परतनेही त्याच्याचकडे आहे. यास्तव तुम्ही त्याचीच उपासना केली पाहिजे आणि त्याच्यावरच भरोसा राखला पाहिजे आणि तुम्ही जे काही करता, त्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही
Surah Hud, Verse 123