UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Ar-Rad - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


الٓمٓرۚ تِلۡكَ ءَايَٰتُ ٱلۡكِتَٰبِۗ وَٱلَّذِيٓ أُنزِلَ إِلَيۡكَ مِن رَّبِّكَ ٱلۡحَقُّ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يُؤۡمِنُونَ

१. आलिफ.लाम.मीम.रॉ. या कुरआनाच्या आयती आहेत आणि तुमच्या पालनकर्त्यातर्फे जे काही तुमच्याकडे उतरविले गेले आहेत ते सर्व सत्य आहे, परंतु अधिकांश लोक ईमान राखत नाहीत (विश्वास बाळगत नाही)
Surah Ar-Rad, Verse 1


ٱللَّهُ ٱلَّذِي رَفَعَ ٱلسَّمَٰوَٰتِ بِغَيۡرِ عَمَدٖ تَرَوۡنَهَاۖ ثُمَّ ٱسۡتَوَىٰ عَلَى ٱلۡعَرۡشِۖ وَسَخَّرَ ٱلشَّمۡسَ وَٱلۡقَمَرَۖ كُلّٞ يَجۡرِي لِأَجَلٖ مُّسَمّٗىۚ يُدَبِّرُ ٱلۡأَمۡرَ يُفَصِّلُ ٱلۡأٓيَٰتِ لَعَلَّكُم بِلِقَآءِ رَبِّكُمۡ تُوقِنُونَ

२. अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना खांबांविना उंच राखले आहे की तुम्ही पाहत आहात, मग तो अर्श (ईशसिंहासना) वर स्थिर आहे, त्यानेच सूर्य आणि चंद्राला अधीन करून ठेवले आहे. प्रत्येक निर्धारीत वेळेवर चालत आहे. तोच सर्व कामाची व्यवस्था राखतो. तो आपल्या निशाण्यांचे स्पष्टपणे निवेदन करीत आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर विश्वास करावा
Surah Ar-Rad, Verse 2


وَهُوَ ٱلَّذِي مَدَّ ٱلۡأَرۡضَ وَجَعَلَ فِيهَا رَوَٰسِيَ وَأَنۡهَٰرٗاۖ وَمِن كُلِّ ٱلثَّمَرَٰتِ جَعَلَ فِيهَا زَوۡجَيۡنِ ٱثۡنَيۡنِۖ يُغۡشِي ٱلَّيۡلَ ٱلنَّهَارَۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّقَوۡمٖ يَتَفَكَّرُونَ

३. आणि त्यानेच जमिनीला पसरवून दिले आहे आणि तिच्यात पर्वत आणि नद्या निर्माण केल्या आहेत आणि त्यात प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या दुहेरी निर्माण केल्या आहेत. तो रात्रीने दिवसाला लपवितो, निश्चितच विचार चिंतन करणाऱ्यांसाठी यात अनेक निशाण्या (बोधचिन्हे) आहेत
Surah Ar-Rad, Verse 3


وَفِي ٱلۡأَرۡضِ قِطَعٞ مُّتَجَٰوِرَٰتٞ وَجَنَّـٰتٞ مِّنۡ أَعۡنَٰبٖ وَزَرۡعٞ وَنَخِيلٞ صِنۡوَانٞ وَغَيۡرُ صِنۡوَانٖ يُسۡقَىٰ بِمَآءٖ وَٰحِدٖ وَنُفَضِّلُ بَعۡضَهَا عَلَىٰ بَعۡضٖ فِي ٱلۡأُكُلِۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّقَوۡمٖ يَعۡقِلُونَ

४. आणि जमिनीत अनेक प्रकारचे तुकडे एकमेकांशी मिळते जुळते आहेत, आणि द्राक्षांच्या बागा आहेत आणि शेते आहेत आणि फांद्या असलेली खजुरीची झाडे आहेत आणि काही असे आहेत ज्यांना फांद्या नाहीत. सर्वांना एकाच प्रकारचे पाणी दिले जाते, तरीही आम्ही एकावर एकाला फळांमध्ये श्रेष्ठता प्रदान करतो. यात बुद्धिमान लोकांकरिता अनेक निशाण्या आहेत
Surah Ar-Rad, Verse 4


۞وَإِن تَعۡجَبۡ فَعَجَبٞ قَوۡلُهُمۡ أَءِذَا كُنَّا تُرَٰبًا أَءِنَّا لَفِي خَلۡقٖ جَدِيدٍۗ أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ بِرَبِّهِمۡۖ وَأُوْلَـٰٓئِكَ ٱلۡأَغۡلَٰلُ فِيٓ أَعۡنَاقِهِمۡۖ وَأُوْلَـٰٓئِكَ أَصۡحَٰبُ ٱلنَّارِۖ هُمۡ فِيهَا خَٰلِدُونَ

५. आणि जर तुम्हाला नवल वाटत असेल तर खरोखर त्यांचे हे म्हणणे आश्चर्यकारक आहे की काय जेव्हा आम्ही (मेल्यानंतर) माती होऊन जाऊ तेव्हा काय आम्ही नव्याने जन्म घेऊ? हेच ते लोक होत, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला आणि हेच ते लोक होत, ज्यांच्या गळ्यात जोखड (फंदे) असतील आणि हेच होत जे जहन्नममध्ये राहणारे आहेत, जे सदैव त्यात राहतील
Surah Ar-Rad, Verse 5


وَيَسۡتَعۡجِلُونَكَ بِٱلسَّيِّئَةِ قَبۡلَ ٱلۡحَسَنَةِ وَقَدۡ خَلَتۡ مِن قَبۡلِهِمُ ٱلۡمَثُلَٰتُۗ وَإِنَّ رَبَّكَ لَذُو مَغۡفِرَةٖ لِّلنَّاسِ عَلَىٰ ظُلۡمِهِمۡۖ وَإِنَّ رَبَّكَ لَشَدِيدُ ٱلۡعِقَابِ

६. आणि जे सुख-संपन्न अवस्थेपूर्वीच तुमच्याजवळ शिक्षेची याचना करण्यात घाई करीत आहेत, निःसंशय, त्यांच्यापूर्वी (उदाहरणादाखल) शिक्षा-यातना आलेल्या आहेत, आणि निःसंशय तुमचा पालनकर्ता माफ करणारा आहे, लोकांच्या अनुचित अत्याचारानंतरही आणि निश्चितच तुमचा पालनकर्ता कठोर दंड देणाराही आहे
Surah Ar-Rad, Verse 6


وَيَقُولُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَوۡلَآ أُنزِلَ عَلَيۡهِ ءَايَةٞ مِّن رَّبِّهِۦٓۗ إِنَّمَآ أَنتَ مُنذِرٞۖ وَلِكُلِّ قَوۡمٍ هَادٍ

७. आणि काफिर (कृतघ्न लोक) म्हणतात की त्याच्यावर त्याच्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी (चमत्कार) का नाही अवतरित केला गेला? खरी गोष्ट अशी की तुम्ही तर केवळ सचेत करणारे आहात आणि प्रत्येक जनसमूहासाठी मार्गदर्शन करणारा आहे.१
Surah Ar-Rad, Verse 7


ٱللَّهُ يَعۡلَمُ مَا تَحۡمِلُ كُلُّ أُنثَىٰ وَمَا تَغِيضُ ٱلۡأَرۡحَامُ وَمَا تَزۡدَادُۚ وَكُلُّ شَيۡءٍ عِندَهُۥ بِمِقۡدَارٍ

८. मादा आपल्या पोटात (गर्भात) जे काही राखते ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो १ आणि पोटा (गर्भाशया) चे घटणे-वाढणेही जाणतो. प्रत्येक गोष्ट त्याच्याजवळ अनुमानानुसार आहे
Surah Ar-Rad, Verse 8


عَٰلِمُ ٱلۡغَيۡبِ وَٱلشَّهَٰدَةِ ٱلۡكَبِيرُ ٱلۡمُتَعَالِ

९. लपलेल्या आणि उघड अशा सर्व गोष्टींचे तो ज्ञान राखणारा आहे. सर्वांत महान सर्वांत उच्च आणि सर्वांत उत्तम आहे
Surah Ar-Rad, Verse 9


سَوَآءٞ مِّنكُم مَّنۡ أَسَرَّ ٱلۡقَوۡلَ وَمَن جَهَرَ بِهِۦ وَمَنۡ هُوَ مُسۡتَخۡفِۭ بِٱلَّيۡلِ وَسَارِبُۢ بِٱلنَّهَارِ

१०. तुमच्यापैकी एखाद्याचे आपली गोष्ट लपवून सांगणे किंवा ती मोठ्या आवाजात सांगणे आणि जो रात्री लपलेला असेल आणि जो दिवसा चालत असेल, सर्व अल्लाहकरिता सारखेच आहे
Surah Ar-Rad, Verse 10


لَهُۥ مُعَقِّبَٰتٞ مِّنۢ بَيۡنِ يَدَيۡهِ وَمِنۡ خَلۡفِهِۦ يَحۡفَظُونَهُۥ مِنۡ أَمۡرِ ٱللَّهِۗ إِنَّ ٱللَّهَ لَا يُغَيِّرُ مَا بِقَوۡمٍ حَتَّىٰ يُغَيِّرُواْ مَا بِأَنفُسِهِمۡۗ وَإِذَآ أَرَادَ ٱللَّهُ بِقَوۡمٖ سُوٓءٗا فَلَا مَرَدَّ لَهُۥۚ وَمَا لَهُم مِّن دُونِهِۦ مِن وَالٍ

११. त्याचे संरक्षक मानवाच्या पुढे मागे तैनात आहेत, जे अल्लाहच्या आदेशाने त्याचे रक्षण करतात. एखाद्या जनसमूहाची अवस्था सर्वश्रेष्ठ अल्लाह तोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत तो स्वतः बदलत नाही, जे त्यांच्या मनात आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहाला सजा देण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो निर्णय बदलत नाही आणि त्याच्याखेरीज कोणीही त्यांचा मदतकर्ता नाही
Surah Ar-Rad, Verse 11


هُوَ ٱلَّذِي يُرِيكُمُ ٱلۡبَرۡقَ خَوۡفٗا وَطَمَعٗا وَيُنشِئُ ٱلسَّحَابَ ٱلثِّقَالَ

१२. तो अल्लाहच होय, जो तुम्हाला विजेची चमक दाखवितो यासाठी की तुम्ही भयभीत व्हावे आणि उमेद बाळगावी आणि अवजड ढगांनाही तोच निर्माण करतो
Surah Ar-Rad, Verse 12


وَيُسَبِّحُ ٱلرَّعۡدُ بِحَمۡدِهِۦ وَٱلۡمَلَـٰٓئِكَةُ مِنۡ خِيفَتِهِۦ وَيُرۡسِلُ ٱلصَّوَٰعِقَ فَيُصِيبُ بِهَا مَن يَشَآءُ وَهُمۡ يُجَٰدِلُونَ فِي ٱللَّهِ وَهُوَ شَدِيدُ ٱلۡمِحَالِ

१३. आणि मेघ-गर्जना त्याची स्तुती-प्रशंसा आणि गुणगान करते आणि फरिश्तेदेखील त्याच्या भयाने, तोच आकाशातून वीज पाडतो. आणि ज्याच्यावर इच्छितो, त्याच्यावर पाडतो. काफिर लोक अल्लाहविषयी वाद-विवाद घालत आहेत आणि अल्लाह जबरदस्त शक्तिशाली आहे
Surah Ar-Rad, Verse 13


لَهُۥ دَعۡوَةُ ٱلۡحَقِّۚ وَٱلَّذِينَ يَدۡعُونَ مِن دُونِهِۦ لَا يَسۡتَجِيبُونَ لَهُم بِشَيۡءٍ إِلَّا كَبَٰسِطِ كَفَّيۡهِ إِلَى ٱلۡمَآءِ لِيَبۡلُغَ فَاهُ وَمَا هُوَ بِبَٰلِغِهِۦۚ وَمَا دُعَآءُ ٱلۡكَٰفِرِينَ إِلَّا فِي ضَلَٰلٖ

१४. त्यालाच पुकारणे खरे आहे. जे लोक त्याच्याखेरीज दुसऱ्यांना पुकारतात, ते त्यांच्या कोणत्याही हाकेला उत्तर देत नाहीत जणू एखाद्या माणसाने आपले हात पाण्याकडे पसरविले असावेत की पाणी त्यांच्या तोंडात येऊन पडावे, वास्तविक ते पाणी त्यांच्या तोंडात जाणार नाही.१ त्या काफिर लोकांचे जेवढे पुकारणे आहे सर्व पथभ्रष्ट आहे
Surah Ar-Rad, Verse 14


وَلِلَّهِۤ يَسۡجُدُۤ مَن فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ طَوۡعٗا وَكَرۡهٗا وَظِلَٰلُهُم بِٱلۡغُدُوِّ وَٱلۡأٓصَالِ۩

१५. आणि आकाशांमध्ये व जमिनीवर असलेले समस्त जीव राजी-खुशीने व ना खुशीने अल्लाहलाच सजदा करतात आणि त्यांच्या सावल्यासुद्धा सकाळ-संध्याकाळ अल्लाहला सजदा करतात
Surah Ar-Rad, Verse 15


قُلۡ مَن رَّبُّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ قُلِ ٱللَّهُۚ قُلۡ أَفَٱتَّخَذۡتُم مِّن دُونِهِۦٓ أَوۡلِيَآءَ لَا يَمۡلِكُونَ لِأَنفُسِهِمۡ نَفۡعٗا وَلَا ضَرّٗاۚ قُلۡ هَلۡ يَسۡتَوِي ٱلۡأَعۡمَىٰ وَٱلۡبَصِيرُ أَمۡ هَلۡ تَسۡتَوِي ٱلظُّلُمَٰتُ وَٱلنُّورُۗ أَمۡ جَعَلُواْ لِلَّهِ شُرَكَآءَ خَلَقُواْ كَخَلۡقِهِۦ فَتَشَٰبَهَ ٱلۡخَلۡقُ عَلَيۡهِمۡۚ قُلِ ٱللَّهُ خَٰلِقُ كُلِّ شَيۡءٖ وَهُوَ ٱلۡوَٰحِدُ ٱلۡقَهَّـٰرُ

१६. (तुम्ही) विचारा, आकाशांचा आणि जमिनीचा पालनकर्ता कोण आहे? सांगा अल्लाह! त्यांना सांगा, काय तरीही तुम्ही याच्याखेरीज दुसऱ्यांना मदत करणारे बनवित आहात, जे स्वतः आपल्या जीवाच्या लाभ-हानीचा अधिकार बाळगत नाही. सांगा, काय आंधळा आणि डोळस दोन्ही समान असू शकतात? किंवा अंधार आणि प्रकाश समान असू शकतो? काय, ज्यांना हे अल्लाहचा सहभागी बनवित आहेत, त्यांनीही अल्लाहप्रमाणे काही निर्माण केले आहे की त्यांच्या पाहण्यात निर्मितीच संदिग्ध ठरली? तुम्ही सांगा, केवळ अल्लाहच सर्व वस्तूंना निर्माण करणारा आहे. तो एकटा आहे आणि मोठा जबरदस्त वर्चस्वशाली आहे
Surah Ar-Rad, Verse 16


أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ فَسَالَتۡ أَوۡدِيَةُۢ بِقَدَرِهَا فَٱحۡتَمَلَ ٱلسَّيۡلُ زَبَدٗا رَّابِيٗاۖ وَمِمَّا يُوقِدُونَ عَلَيۡهِ فِي ٱلنَّارِ ٱبۡتِغَآءَ حِلۡيَةٍ أَوۡ مَتَٰعٖ زَبَدٞ مِّثۡلُهُۥۚ كَذَٰلِكَ يَضۡرِبُ ٱللَّهُ ٱلۡحَقَّ وَٱلۡبَٰطِلَۚ فَأَمَّا ٱلزَّبَدُ فَيَذۡهَبُ جُفَآءٗۖ وَأَمَّا مَا يَنفَعُ ٱلنَّاسَ فَيَمۡكُثُ فِي ٱلۡأَرۡضِۚ كَذَٰلِكَ يَضۡرِبُ ٱللَّهُ ٱلۡأَمۡثَالَ

१७. त्यानेच आकाशातून पर्जन्य वृष्टी केली, मग आपापल्या सामर्थ्यानुसार नाले वाहू लागले, मग पाण्याच्या प्रवाहाने वर चढून फेस उचलला आणि त्या वस्तूतही जिला आगीत टाकून तापवितात दागिने किंवा सामानाकरिता, त्याच प्रकारचा फेस आहे. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह सत्य आणि असत्याला स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देतो. आता तो फेस निकामी होऊन निघून जातो, परंतु ज्या गोष्टी लोकांना लाभ पोहचविणाऱ्या आहेत, त्या धरतीत टिकून राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा प्रकारे उदाहरण देत असतो
Surah Ar-Rad, Verse 17


لِلَّذِينَ ٱسۡتَجَابُواْ لِرَبِّهِمُ ٱلۡحُسۡنَىٰۚ وَٱلَّذِينَ لَمۡ يَسۡتَجِيبُواْ لَهُۥ لَوۡ أَنَّ لَهُم مَّا فِي ٱلۡأَرۡضِ جَمِيعٗا وَمِثۡلَهُۥ مَعَهُۥ لَٱفۡتَدَوۡاْ بِهِۦٓۚ أُوْلَـٰٓئِكَ لَهُمۡ سُوٓءُ ٱلۡحِسَابِ وَمَأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُۖ وَبِئۡسَ ٱلۡمِهَادُ

१८. ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले, त्यांच्याकरिता भलाई आहे आणि ज्या लोकांनी त्याच्या आदेशाचे अनुसरण केले नाही, तर धरतीवर जे काही आहे ते सर्व त्याच्याजवळ असेल आणि त्यासोबत तेवढेच आणखी जास्त असेल मग ते सर्व काही आपल्या बदली (बचावासाठी) देऊन टाकील. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठा वाईट हिशोब आहे आणि त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, जे फार वाईट ठिकाण आहे
Surah Ar-Rad, Verse 18


۞أَفَمَن يَعۡلَمُ أَنَّمَآ أُنزِلَ إِلَيۡكَ مِن رَّبِّكَ ٱلۡحَقُّ كَمَنۡ هُوَ أَعۡمَىٰٓۚ إِنَّمَا يَتَذَكَّرُ أُوْلُواْ ٱلۡأَلۡبَٰبِ

१९. काय तो मनुष्य, ज्याला हे माहीत असावे की जे तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्यातर्फे उतरविले गेले आहे ते सत्य आहे, काय त्या माणसासारखा असू शकतो जो आंधळा असावा. बोध-उपदेश तर तेच स्वीकारतात जे बुद्धिमान असावेत
Surah Ar-Rad, Verse 19


ٱلَّذِينَ يُوفُونَ بِعَهۡدِ ٱللَّهِ وَلَا يَنقُضُونَ ٱلۡمِيثَٰقَ

२०. जे लोक अल्लाहला दिलेले वचन पूर्ण करतात आणि वचन भंग करीत नाही
Surah Ar-Rad, Verse 20


وَٱلَّذِينَ يَصِلُونَ مَآ أَمَرَ ٱللَّهُ بِهِۦٓ أَن يُوصَلَ وَيَخۡشَوۡنَ رَبَّهُمۡ وَيَخَافُونَ سُوٓءَ ٱلۡحِسَابِ

२१. आणि अल्लाहने ज्या गोष्टींना जोडण्याचा आदेश दिला आहे, ते त्यांना जोडतात आणि ते आपल्या पालनकर्त्याचे भय राखतात आणि हिशोबाच्या कठोरतेचेही भय राखतात
Surah Ar-Rad, Verse 21


وَٱلَّذِينَ صَبَرُواْ ٱبۡتِغَآءَ وَجۡهِ رَبِّهِمۡ وَأَقَامُواْ ٱلصَّلَوٰةَ وَأَنفَقُواْ مِمَّا رَزَقۡنَٰهُمۡ سِرّٗا وَعَلَانِيَةٗ وَيَدۡرَءُونَ بِٱلۡحَسَنَةِ ٱلسَّيِّئَةَ أُوْلَـٰٓئِكَ لَهُمۡ عُقۡبَى ٱلدَّارِ

२२. आणि ते आपल्या पालनकर्त्याच्या प्रसन्नतेखातीर धीर-संयम राखतात आणि नमाजांना सातत्याने कायम राखतात आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे ते (धन) उघड आणि छुप्या रीतीने खर्च करतात आणि वाईट व्यवहाराला भलेपणाने टाळतात. अशाच लोकांकरिता आखिरतचे घर आहे
Surah Ar-Rad, Verse 22


جَنَّـٰتُ عَدۡنٖ يَدۡخُلُونَهَا وَمَن صَلَحَ مِنۡ ءَابَآئِهِمۡ وَأَزۡوَٰجِهِمۡ وَذُرِّيَّـٰتِهِمۡۖ وَٱلۡمَلَـٰٓئِكَةُ يَدۡخُلُونَ عَلَيۡهِم مِّن كُلِّ بَابٖ

२३. आणि नेहमी राहणाऱ्या बागा, जिथे हे स्वतः जातील आणि त्यांचे वाडवडील, आणि पत्न्या, आणि संतानापैकी जे नेक काम करणारे असतील, त्यांच्याजवळ फरिश्ते प्रत्येक दारातून येतील
Surah Ar-Rad, Verse 23


سَلَٰمٌ عَلَيۡكُم بِمَا صَبَرۡتُمۡۚ فَنِعۡمَ عُقۡبَى ٱلدَّارِ

२४. (म्हणतील की) तुमच्यावर शांती-सलामती असो धीर-संयमाच्या मोबदल्यात किती उत्तम मोबदला आहे या आखिरतच्या घराचा
Surah Ar-Rad, Verse 24


وَٱلَّذِينَ يَنقُضُونَ عَهۡدَ ٱللَّهِ مِنۢ بَعۡدِ مِيثَٰقِهِۦ وَيَقۡطَعُونَ مَآ أَمَرَ ٱللَّهُ بِهِۦٓ أَن يُوصَلَ وَيُفۡسِدُونَ فِي ٱلۡأَرۡضِ أُوْلَـٰٓئِكَ لَهُمُ ٱللَّعۡنَةُ وَلَهُمۡ سُوٓءُ ٱلدَّارِ

२५. आणि जे लोक अल्लाहला दिलेले वचन, ते दृढ-मजबूत केल्यानंतर तोडून टाकतात आणि ज्या गोष्टींना अल्लाहने जोडण्याचा आदेश दिला आहे त्यांना तोडून टाकतात आणि धरतीत उपद्रव (फसाद) पसरवितात त्यांच्यावर धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी वाईट घर आहे
Surah Ar-Rad, Verse 25


ٱللَّهُ يَبۡسُطُ ٱلرِّزۡقَ لِمَن يَشَآءُ وَيَقۡدِرُۚ وَفَرِحُواْ بِٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَا وَمَا ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَا فِي ٱلۡأٓخِرَةِ إِلَّا مَتَٰعٞ

२६. सर्वश्रेष्ठ अल्लाह ज्याची रोजी (आजिविका) इच्छितो वाढवितो आणि ज्याची इच्छितो घटवितो. हे लोक तर ऐहिक जीवनातच मग्न झालेत.१ वास्तविक हे जग, आखिरतच्या तुलनेत अगदी तुच्छ सामुग्री आहे.२
Surah Ar-Rad, Verse 26


وَيَقُولُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَوۡلَآ أُنزِلَ عَلَيۡهِ ءَايَةٞ مِّن رَّبِّهِۦۚ قُلۡ إِنَّ ٱللَّهَ يُضِلُّ مَن يَشَآءُ وَيَهۡدِيٓ إِلَيۡهِ مَنۡ أَنَابَ

२७. काफिर (ईमान न राखणारे) म्हणतात की त्याच्यावर त्याच्या पालनकर्त्यातर्फे एखादी निशाणी (चमत्कार) का नाही उतरविला गेला? उत्तर द्या, ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करू इच्छितो, त्याला पथभ्रष्ट करतो आणि जो त्याच्याकडे झुकतो त्याला मार्ग दाखवितो
Surah Ar-Rad, Verse 27


ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَتَطۡمَئِنُّ قُلُوبُهُم بِذِكۡرِ ٱللَّهِۗ أَلَا بِذِكۡرِ ٱللَّهِ تَطۡمَئِنُّ ٱلۡقُلُوبُ

२८. ज्या लोकांनी ईमान राखले, त्यांची मने, अल्लाहच्या स्मरणाने शांती प्राप्त करतात. लक्षात ठेवा की अल्लाहच्या स्मरणानेच हृदयाला शांती समाधान लाभते
Surah Ar-Rad, Verse 28


ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ طُوبَىٰ لَهُمۡ وَحُسۡنُ مَـَٔابٖ

२९. ज्या लोकांनी ईमान राखले आणि ज्यांनी सत्कर्मेदेखील केलीत त्यांच्याकरिता सुख-संपन्न अवस्था आहे आणि सर्वांत उत्तम स्थान आहे
Surah Ar-Rad, Verse 29


كَذَٰلِكَ أَرۡسَلۡنَٰكَ فِيٓ أُمَّةٖ قَدۡ خَلَتۡ مِن قَبۡلِهَآ أُمَمٞ لِّتَتۡلُوَاْ عَلَيۡهِمُ ٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ وَهُمۡ يَكۡفُرُونَ بِٱلرَّحۡمَٰنِۚ قُلۡ هُوَ رَبِّي لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَ عَلَيۡهِ تَوَكَّلۡتُ وَإِلَيۡهِ مَتَابِ

३०. त्याच प्रकारे आम्ही तुम्हाला त्या जनसमूहात पाठविले, ज्यात यापूर्वी अनेक जनसमूह होऊन गेलेत, यासाठी की तुम्ही त्यांना, आमच्यातर्फे जी वहयी (प्रकाशना) तुमच्यावर अवतरित केली आहे, वाचून ऐकवा. हे लोक परम दयाळू (रहमान) अल्लाहचा इन्कार करणारे आहेत. तुम्ही सांगा, माझा स्वामी व पालनकर्ता तर तोच आहे, निःसंशय, त्याच्याखेरीज कोणीही उपासनेस पात्र नाही. त्याच्यावरच माझा भरोसा आहे आणि त्याच्याचकडे मला परत जायचे आहे
Surah Ar-Rad, Verse 30


وَلَوۡ أَنَّ قُرۡءَانٗا سُيِّرَتۡ بِهِ ٱلۡجِبَالُ أَوۡ قُطِّعَتۡ بِهِ ٱلۡأَرۡضُ أَوۡ كُلِّمَ بِهِ ٱلۡمَوۡتَىٰۗ بَل لِّلَّهِ ٱلۡأَمۡرُ جَمِيعًاۗ أَفَلَمۡ يَاْيۡـَٔسِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ أَن لَّوۡ يَشَآءُ ٱللَّهُ لَهَدَى ٱلنَّاسَ جَمِيعٗاۗ وَلَا يَزَالُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ تُصِيبُهُم بِمَا صَنَعُواْ قَارِعَةٌ أَوۡ تَحُلُّ قَرِيبٗا مِّن دَارِهِمۡ حَتَّىٰ يَأۡتِيَ وَعۡدُ ٱللَّهِۚ إِنَّ ٱللَّهَ لَا يُخۡلِفُ ٱلۡمِيعَادَ

३१. आणि जर (गृहीत धरले की) कुरआनद्वारे पर्वत चालविले गेले असते किंवा जमिनीचे तुकडे तुकडे केले गेले असते किंवा मेलेल्या लोकांशी संभाषण करविले गेले असते (तरीही त्यांनी ईमान राखले नसते). खरी गोष्ट अशी की समस्त कार्ये अल्लाहच्याच हाती आहेत, तेव्हा काय ईमान राखणाऱ्यांचे मन या गोष्टीवर संतुष्ट होत नाही की जर अल्लाहने इच्छिले तर समस्त लोकांना सरळ मार्गावर आणील. ईमान न राखणाऱ्याला तर त्यांच्या इन्कारापायी नेहमी कोणती न कोणती सक्त सजा मिळतच राहील, किंवा त्यांच्या घरांच्या जवळपास उतरत राहील. येथेपर्यंत की अल्लाहचा वायदा येऊन पोहोचेल. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह वायद्याविरूद्ध जात नाही
Surah Ar-Rad, Verse 31


وَلَقَدِ ٱسۡتُهۡزِئَ بِرُسُلٖ مِّن قَبۡلِكَ فَأَمۡلَيۡتُ لِلَّذِينَ كَفَرُواْ ثُمَّ أَخَذۡتُهُمۡۖ فَكَيۡفَ كَانَ عِقَابِ

३२. आणि निःसंशय, तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांशी थट्टा-मस्करी केली गेली होती, आणि मीदेखील त्या काफिरांना थोडे सैल सोडले, नंतर मात्र त्यांना पकडीत घेतले, तर कशी राहिली माझी शिक्षा (अज़ाब)
Surah Ar-Rad, Verse 32


أَفَمَنۡ هُوَ قَآئِمٌ عَلَىٰ كُلِّ نَفۡسِۭ بِمَا كَسَبَتۡۗ وَجَعَلُواْ لِلَّهِ شُرَكَآءَ قُلۡ سَمُّوهُمۡۚ أَمۡ تُنَبِّـُٔونَهُۥ بِمَا لَا يَعۡلَمُ فِي ٱلۡأَرۡضِ أَم بِظَٰهِرٖ مِّنَ ٱلۡقَوۡلِۗ بَلۡ زُيِّنَ لِلَّذِينَ كَفَرُواْ مَكۡرُهُمۡ وَصُدُّواْ عَنِ ٱلسَّبِيلِۗ وَمَن يُضۡلِلِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِنۡ هَادٖ

३३. तर काय तो अल्लाह जो समाचार घेणारा आहे प्रत्येक माणसाचा त्याने केलेल्या कर्माबद्दल, आणि त्या लोकांनी अल्लाहचे भागीदार ठरविले आहेत. सांगा, जरा त्यांची नावे तर सांगा, किंवा अल्लाहला तुम्ही त्या गोष्टी सांगत आहात, ज्या तो धरतीवर जाणतच नाही, किंवा केवळ वरवरच्या गोष्टी बनवित आहात.१ खरी गोष्ट अशी की कुप्र (इन्कार) करणाऱ्यांकरिता, त्यांची कपट-कारस्थाने भलेही चांगली दाखविली गेली असोत आणि त्यांना सत्य मार्गापासून रोखले गेले आहे आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही
Surah Ar-Rad, Verse 33


لَّهُمۡ عَذَابٞ فِي ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَاۖ وَلَعَذَابُ ٱلۡأٓخِرَةِ أَشَقُّۖ وَمَا لَهُم مِّنَ ٱللَّهِ مِن وَاقٖ

३४. त्यांच्यासाठी या जगाच्या जीवनातही दुःख आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवना) चा अज़ाब तर फार सक्त आहे आणि त्यांना अल्लाहच्या प्रकोपापासून वाचविणारा कोणीही नाही
Surah Ar-Rad, Verse 34


۞مَّثَلُ ٱلۡجَنَّةِ ٱلَّتِي وُعِدَ ٱلۡمُتَّقُونَۖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُۖ أُكُلُهَا دَآئِمٞ وَظِلُّهَاۚ تِلۡكَ عُقۡبَى ٱلَّذِينَ ٱتَّقَواْۚ وَّعُقۡبَى ٱلۡكَٰفِرِينَ ٱلنَّارُ

३५. त्या जन्नतचे उदाहरण, ज्याचा वायदा अल्लाहचे भय राखणाऱ्यांशी केला गेला आहे, असे आहे की तिच्याखाली प्रवाह वाहत असतील, तिची फळे नेहमी राहणारी आहेत आणि तिची सावलीदेखील. हा आहे मोबदला अल्लाहचे भय राखणाऱ्यांचा आणि काफिर लोकांचा शेवट जहन्नम आहे
Surah Ar-Rad, Verse 35


وَٱلَّذِينَ ءَاتَيۡنَٰهُمُ ٱلۡكِتَٰبَ يَفۡرَحُونَ بِمَآ أُنزِلَ إِلَيۡكَۖ وَمِنَ ٱلۡأَحۡزَابِ مَن يُنكِرُ بَعۡضَهُۥۚ قُلۡ إِنَّمَآ أُمِرۡتُ أَنۡ أَعۡبُدَ ٱللَّهَ وَلَآ أُشۡرِكَ بِهِۦٓۚ إِلَيۡهِ أَدۡعُواْ وَإِلَيۡهِ مَـَٔابِ

३६. आणि ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आहे, ते तर त्याद्वारे खूप आनंदित होतात, जे काही तुमच्यावर अवतरित केले जाते आणि इतर संप्रदाय, त्यातल्या काही गोष्टींना मान्य करीत नाही. तुम्ही त्यांना सांगून टाका की मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी अल्लाहची उपासना करावी आणि त्याच्यासोबत कोणाला भागीदार न बनवावे, मी त्याच्याचकडे बोलवित आहे आणि त्याच्याचकडे मला परतून जायचे आहे
Surah Ar-Rad, Verse 36


وَكَذَٰلِكَ أَنزَلۡنَٰهُ حُكۡمًا عَرَبِيّٗاۚ وَلَئِنِ ٱتَّبَعۡتَ أَهۡوَآءَهُم بَعۡدَ مَا جَآءَكَ مِنَ ٱلۡعِلۡمِ مَا لَكَ مِنَ ٱللَّهِ مِن وَلِيّٖ وَلَا وَاقٖ

३७. आणि अशा प्रकारे आम्ही हा कुरआन, अरबी भाषेतील फर्मान अवतरित केले आहे, आणि जर तुम्ही यांच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण केले, याच्यानंतरही की तुमच्याजवळ ज्ञान येऊन पोहोचले आहे, तर अल्लाहच्या विरोधात तुम्हाला ना कोणी समर्थन देणारा भेटेल आणि ना रक्षण करणारा
Surah Ar-Rad, Verse 37


وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا رُسُلٗا مِّن قَبۡلِكَ وَجَعَلۡنَا لَهُمۡ أَزۡوَٰجٗا وَذُرِّيَّةٗۚ وَمَا كَانَ لِرَسُولٍ أَن يَأۡتِيَ بِـَٔايَةٍ إِلَّا بِإِذۡنِ ٱللَّهِۗ لِكُلِّ أَجَلٖ كِتَابٞ

३८. आणि आम्ही तुमच्या पूर्वीही अनेक रसूल (पैगंबर) पाठविले आहेत, आणि आम्ही त्या सर्वांना पत्नी आणि संतान राखणारा बनविले होते. अल्लाहच्या हुकुमाविना एखादी निशाणी आणून दाखविणे कोणत्याही पैगंबराच्या अखत्यारातील (अवाख्यातील) गोष्ट नाही. प्रत्येक निर्धारीत वायद्याचा एक ग्रंथ आहे
Surah Ar-Rad, Verse 38


يَمۡحُواْ ٱللَّهُ مَا يَشَآءُ وَيُثۡبِتُۖ وَعِندَهُۥٓ أُمُّ ٱلۡكِتَٰبِ

३९. अल्लाह जे इच्छिल मिटवून टाकील आणि जे इच्छिल सुरक्षित ठेवील. सुरक्षित ग्रंथ (लौहे महफूज) त्याच्याचजवळ आहे
Surah Ar-Rad, Verse 39


وَإِن مَّا نُرِيَنَّكَ بَعۡضَ ٱلَّذِي نَعِدُهُمۡ أَوۡ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِنَّمَا عَلَيۡكَ ٱلۡبَلَٰغُ وَعَلَيۡنَا ٱلۡحِسَابُ

४०. आणि त्यांच्याशी केलेल्या वायद्यांपैकी जर एखादा आम्ही तुम्हाला दाखवून द्यावा किंवा तुम्हाला आम्ही मृत्यु द्यावा तर तुमच्यावर केवळ पोहचविण्याचीच जबाबदारी आहे, हिशोब घ्यायचे काम तर आमचे आहे
Surah Ar-Rad, Verse 40


أَوَلَمۡ يَرَوۡاْ أَنَّا نَأۡتِي ٱلۡأَرۡضَ نَنقُصُهَا مِنۡ أَطۡرَافِهَاۚ وَٱللَّهُ يَحۡكُمُ لَا مُعَقِّبَ لِحُكۡمِهِۦۚ وَهُوَ سَرِيعُ ٱلۡحِسَابِ

४१. काय ते नाही पाहत की आम्ही धरतीला तिच्या किनाऱ्यांकडून घटवित आलो आहोत. अल्लाह आदेश देतो आणि कोणीही त्याच्या आदेशाला पाठीमागे टाकणारा नाही. तो लवकरच हिशोब घेणार आहे
Surah Ar-Rad, Verse 41


وَقَدۡ مَكَرَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ فَلِلَّهِ ٱلۡمَكۡرُ جَمِيعٗاۖ يَعۡلَمُ مَا تَكۡسِبُ كُلُّ نَفۡسٖۗ وَسَيَعۡلَمُ ٱلۡكُفَّـٰرُ لِمَنۡ عُقۡبَى ٱلدَّارِ

४२. आणि त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कपट-कारस्थान करण्यात काही कसर सोडली नव्हती, परंतु समस्त उपाययोजना अल्लाहचीच आहे. मनुष्य जे काही करीत आहे, अल्लाह ते जाणतो. ईमान न राखणाऱ्यांना लवकरच माहीत पडेल की आखिरतचा मोबदला कोणासाठी आहे
Surah Ar-Rad, Verse 42


وَيَقُولُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَسۡتَ مُرۡسَلٗاۚ قُلۡ كَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدَۢا بَيۡنِي وَبَيۡنَكُمۡ وَمَنۡ عِندَهُۥ عِلۡمُ ٱلۡكِتَٰبِ

४३. आणि हे इन्कारी लोक असे म्हणतात की तुम्ही अल्लाहचे पैगंबर नाहीत. (तुम्ही) उत्तर द्या की माझ्या आणि तुमच्या दरम्यान साक्ष देण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे, आणि तो, ज्याच्याजवळ ग्रंथाचे ज्ञान आहे
Surah Ar-Rad, Verse 43


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 12
>> Surah 14

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai