Surah Al-Hijr - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
الٓرۚ تِلۡكَ ءَايَٰتُ ٱلۡكِتَٰبِ وَقُرۡءَانٖ مُّبِينٖ
१. अलिफ. लाम. रॉ या (अल्लाहच्या) ग्रंथाच्या आयती आहेत आणि स्पष्ट अशा कुरआनाच्या
Surah Al-Hijr, Verse 1
رُّبَمَا يَوَدُّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَوۡ كَانُواْ مُسۡلِمِينَ
२. अशीही वेळ येईल जेव्हा इन्कार करणारे आपल्या ईमानधारक होण्याची इच्छा करतील
Surah Al-Hijr, Verse 2
ذَرۡهُمۡ يَأۡكُلُواْ وَيَتَمَتَّعُواْ وَيُلۡهِهِمُ ٱلۡأَمَلُۖ فَسَوۡفَ يَعۡلَمُونَ
३. तुम्ही त्यांना खाण्यात, लाभ उचलण्यात आणि (खोट्या) अपेक्षा बाळगण्यात मग्न असलेले सोडा. ते स्वतः लवकरच जाणून घेतील
Surah Al-Hijr, Verse 3
وَمَآ أَهۡلَكۡنَا مِن قَرۡيَةٍ إِلَّا وَلَهَا كِتَابٞ مَّعۡلُومٞ
४. आणि कोणत्याही वस्तीला आम्ही नष्ट केले नाही, परंतु हे की तिच्याकरिता निश्चित असे लिखित होते
Surah Al-Hijr, Verse 4
مَّا تَسۡبِقُ مِنۡ أُمَّةٍ أَجَلَهَا وَمَا يَسۡتَـٔۡخِرُونَ
५. कोणताही जनसमूह आपल्या मृत्युपासून ना पुढे जाऊ शकतो, ना मागे राहू शकतो.१
Surah Al-Hijr, Verse 5
وَقَالُواْ يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِي نُزِّلَ عَلَيۡهِ ٱلذِّكۡرُ إِنَّكَ لَمَجۡنُونٞ
६. आणि ते म्हणाले, हे माणसा! ज्यावर कुरआन अवतरित केले गेले आहे निश्चितच तू एखादा वेडा आहे
Surah Al-Hijr, Verse 6
لَّوۡمَا تَأۡتِينَا بِٱلۡمَلَـٰٓئِكَةِ إِن كُنتَ مِنَ ٱلصَّـٰدِقِينَ
७. जर तू अगदी सच्चा आहे तर मग आमच्याजवळ फरिश्त्यांना का नाही आणत
Surah Al-Hijr, Verse 7
مَا نُنَزِّلُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةَ إِلَّا بِٱلۡحَقِّ وَمَا كَانُوٓاْ إِذٗا مُّنظَرِينَ
८. आम्ही फरिश्त्यांना सत्यासहच अवतरित करतो. आणि अशा वेळी त्यांना सवड दिली जात नाही
Surah Al-Hijr, Verse 8
إِنَّا نَحۡنُ نَزَّلۡنَا ٱلذِّكۡرَ وَإِنَّا لَهُۥ لَحَٰفِظُونَ
९. निःसंशय आम्हीच या कुरआनाला अवतरित केले आहे आणि आम्हीच त्याचे संरक्षक आहोत
Surah Al-Hijr, Verse 9
وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ فِي شِيَعِ ٱلۡأَوَّلِينَ
१०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या जनसमूहांमध्येही आपले पैगंबर पाठवित राहिलो
Surah Al-Hijr, Verse 10
وَمَا يَأۡتِيهِم مِّن رَّسُولٍ إِلَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ
११. आणि (तथापि) जो पैगंबरदेखील त्यांच्याजवळ आला, त्याची ते थट्टाच उडवित राहिले
Surah Al-Hijr, Verse 11
كَذَٰلِكَ نَسۡلُكُهُۥ فِي قُلُوبِ ٱلۡمُجۡرِمِينَ
१२. अपराधी लोकांच्या मनात आम्ही अशाच प्रकारे हेच रचत असतो
Surah Al-Hijr, Verse 12
لَا يُؤۡمِنُونَ بِهِۦ وَقَدۡ خَلَتۡ سُنَّةُ ٱلۡأَوَّلِينَ
१३. ते याच्यावर ईमान राखत नाही आणि निःसंशय पूर्वीच्या लोकांची हीच पद्धत राहिली आहे
Surah Al-Hijr, Verse 13
وَلَوۡ فَتَحۡنَا عَلَيۡهِم بَابٗا مِّنَ ٱلسَّمَآءِ فَظَلُّواْ فِيهِ يَعۡرُجُونَ
१४. आणि जर आम्ही त्यांच्यासाठी आकाशात (जाण्याचा) दरवाजाही उघडून दिला आणि ते तिथे चढूही लागले
Surah Al-Hijr, Verse 14
لَقَالُوٓاْ إِنَّمَا سُكِّرَتۡ أَبۡصَٰرُنَا بَلۡ نَحۡنُ قَوۡمٞ مَّسۡحُورُونَ
१५. तरीही हेच म्हणतील की आमची नजरबंदी केली गेली आहे, किंबहुना आमच्यावर जादूटोणा केला गेला आहे
Surah Al-Hijr, Verse 15
وَلَقَدۡ جَعَلۡنَا فِي ٱلسَّمَآءِ بُرُوجٗا وَزَيَّنَّـٰهَا لِلنَّـٰظِرِينَ
१६. आणि निःसंशय, आम्ही आकाशात बुरुज (राशी) बनविले आहेत आणि पाहणाऱ्यांकरिता याला सुशोभित केले आहे
Surah Al-Hijr, Verse 16
وَحَفِظۡنَٰهَا مِن كُلِّ شَيۡطَٰنٖ رَّجِيمٍ
१७. आणि धिःक्कारलेल्या प्रत्येक सैतानापासून याला सुरक्षित ठेवले आहे
Surah Al-Hijr, Verse 17
إِلَّا مَنِ ٱسۡتَرَقَ ٱلسَّمۡعَ فَأَتۡبَعَهُۥ شِهَابٞ مُّبِينٞ
१८. तथापि, जो लपून छपून ऐकण्याचा प्रयत्न करतो, भडकत्या आगीचा निखारा त्याच्या पाठीशी लागतो
Surah Al-Hijr, Verse 18
وَٱلۡأَرۡضَ مَدَدۡنَٰهَا وَأَلۡقَيۡنَا فِيهَا رَوَٰسِيَ وَأَنۢبَتۡنَا فِيهَا مِن كُلِّ شَيۡءٖ مَّوۡزُونٖ
१९. आणि जमिनीला आम्ही पसरवून दिले आहे आणि तिच्यावर पर्वत ठेवले आहेत आणि तिच्यात प्रत्येक वस्तू आम्ही निश्चित प्रमाणात उगविली आहे
Surah Al-Hijr, Verse 19
وَجَعَلۡنَا لَكُمۡ فِيهَا مَعَٰيِشَ وَمَن لَّسۡتُمۡ لَهُۥ بِرَٰزِقِينَ
२०. आणि तिच्यातच आम्ही तुमच्या अन्न सामुग्रीची व्यवस्था केली आहे आणि (त्यांच्यासाठीही) ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाहीत
Surah Al-Hijr, Verse 20
وَإِن مِّن شَيۡءٍ إِلَّا عِندَنَا خَزَآئِنُهُۥ وَمَا نُنَزِّلُهُۥٓ إِلَّا بِقَدَرٖ مَّعۡلُومٖ
२१. आणि जेवढ्या म्हणून चीज-वस्तू आहेत, त्या सर्वांचा खजिना आमच्याजवळ आहे, आणि आम्ही प्रत्येक वस्तू तिच्या निर्धारित प्रमाणात उतरवितो
Surah Al-Hijr, Verse 21
وَأَرۡسَلۡنَا ٱلرِّيَٰحَ لَوَٰقِحَ فَأَنزَلۡنَا مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ فَأَسۡقَيۡنَٰكُمُوهُ وَمَآ أَنتُمۡ لَهُۥ بِخَٰزِنِينَ
२२. आणि आम्ही वजनदार वाऱ्यांना पाठिवतो, मग आकाशातून पर्जन्य वृष्टी करून तुम्हाला तृप्त करतो आणि तुम्ही त्याचा संग्रह करून ठेवणारे नाहीत
Surah Al-Hijr, Verse 22
وَإِنَّا لَنَحۡنُ نُحۡيِۦ وَنُمِيتُ وَنَحۡنُ ٱلۡوَٰرِثُونَ
२३. आणि आम्हीच जीवन देतो आणि मृत्युही देतो आणि (शेवटी) आम्हीच वारस आहोत
Surah Al-Hijr, Verse 23
وَلَقَدۡ عَلِمۡنَا ٱلۡمُسۡتَقۡدِمِينَ مِنكُمۡ وَلَقَدۡ عَلِمۡنَا ٱلۡمُسۡتَـٔۡخِرِينَ
२४. आणि तुमच्यापैकी पुढे जाणाऱ्यांना आणि मागे राहणाऱ्यांनाही आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो
Surah Al-Hijr, Verse 24
وَإِنَّ رَبَّكَ هُوَ يَحۡشُرُهُمۡۚ إِنَّهُۥ حَكِيمٌ عَلِيمٞ
२५. आणि तुमचा पालनकर्ता समस्त लोकांना एकत्रित करेल. निःसंशय तो मोठा तत्त्वदर्शी, मोठा ज्ञानी आहे
Surah Al-Hijr, Verse 25
وَلَقَدۡ خَلَقۡنَا ٱلۡإِنسَٰنَ مِن صَلۡصَٰلٖ مِّنۡ حَمَإٖ مَّسۡنُونٖ
२६. आणि निःसंशय, आम्ही मानवाला खनकणाऱ्या (कोरड्या) मातीपासून, जी सडलेल्या गाऱ्याची होती, निर्माण केले आहे
Surah Al-Hijr, Verse 26
وَٱلۡجَآنَّ خَلَقۡنَٰهُ مِن قَبۡلُ مِن نَّارِ ٱلسَّمُومِ
२७. आणि त्याच्यापूर्वी जिन्नांना आम्ही अग्निशिखेपासून निर्माण केले
Surah Al-Hijr, Verse 27
وَإِذۡ قَالَ رَبُّكَ لِلۡمَلَـٰٓئِكَةِ إِنِّي خَٰلِقُۢ بَشَرٗا مِّن صَلۡصَٰلٖ مِّنۡ حَمَإٖ مَّسۡنُونٖ
२८. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने फरिश्त्यांना फर्माविले की मी एक मानव, काळ्या सडलेल्या, खनकणाऱ्या मातीपासून निर्माण करणार आहे
Surah Al-Hijr, Verse 28
فَإِذَا سَوَّيۡتُهُۥ وَنَفَخۡتُ فِيهِ مِن رُّوحِي فَقَعُواْ لَهُۥ سَٰجِدِينَ
२९. तर जेव्हा मी त्याला पूर्ण बनवून घेईन आणि त्यात आपला आत्मा फुंकेन तेव्हा तुम्ही सर्व त्याला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका)
Surah Al-Hijr, Verse 29
فَسَجَدَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ كُلُّهُمۡ أَجۡمَعُونَ
३०. यास्तव सर्वच्या सर्व फरिश्त्यांनी आपला माथा टेकला
Surah Al-Hijr, Verse 30
إِلَّآ إِبۡلِيسَ أَبَىٰٓ أَن يَكُونَ مَعَ ٱلسَّـٰجِدِينَ
३१. परंतु इब्लिसने सजदा करणाऱ्यांमध्ये सामील होण्यास इन्कार केला
Surah Al-Hijr, Verse 31
قَالَ يَـٰٓإِبۡلِيسُ مَا لَكَ أَلَّا تَكُونَ مَعَ ٱلسَّـٰجِدِينَ
३२. (अल्लाहने) फर्माविले, हे इब्लिस! तुला झाले तरी काय की तू सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही
Surah Al-Hijr, Verse 32
قَالَ لَمۡ أَكُن لِّأَسۡجُدَ لِبَشَرٍ خَلَقۡتَهُۥ مِن صَلۡصَٰلٖ مِّنۡ حَمَإٖ مَّسۡنُونٖ
३३. तो म्हणाला, मी असा नाही की या मानवाला सजदा करावा, ज्याला तू काळ्या आणि सडलेल्या खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले आहे
Surah Al-Hijr, Verse 33
قَالَ فَٱخۡرُجۡ مِنۡهَا فَإِنَّكَ رَجِيمٞ
३४. (अल्लाहने) फर्माविले, आता तू जन्नतमधून चालता हो कारण तू धिःक्कारलेला आहेस
Surah Al-Hijr, Verse 34
وَإِنَّ عَلَيۡكَ ٱللَّعۡنَةَ إِلَىٰ يَوۡمِ ٱلدِّينِ
३५. आणि तुझ्यावर कयामतच्या दिवसापर्यंत माझ्यातर्फे धिःक्कार आहे
Surah Al-Hijr, Verse 35
قَالَ رَبِّ فَأَنظِرۡنِيٓ إِلَىٰ يَوۡمِ يُبۡعَثُونَ
३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल
Surah Al-Hijr, Verse 36
قَالَ فَإِنَّكَ مِنَ ٱلۡمُنظَرِينَ
३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे
Surah Al-Hijr, Verse 37
إِلَىٰ يَوۡمِ ٱلۡوَقۡتِ ٱلۡمَعۡلُومِ
३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची
Surah Al-Hijr, Verse 38
قَالَ رَبِّ بِمَآ أَغۡوَيۡتَنِي لَأُزَيِّنَنَّ لَهُمۡ فِي ٱلۡأَرۡضِ وَلَأُغۡوِيَنَّهُمۡ أَجۡمَعِينَ
३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन
Surah Al-Hijr, Verse 39
إِلَّا عِبَادَكَ مِنۡهُمُ ٱلۡمُخۡلَصِينَ
४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे
Surah Al-Hijr, Verse 40
قَالَ هَٰذَا صِرَٰطٌ عَلَيَّ مُسۡتَقِيمٌ
४१. फर्माविले, हो. हाच माझ्यापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग आहे
Surah Al-Hijr, Verse 41
إِنَّ عِبَادِي لَيۡسَ لَكَ عَلَيۡهِمۡ سُلۡطَٰنٌ إِلَّا مَنِ ٱتَّبَعَكَ مِنَ ٱلۡغَاوِينَ
४२. माझ्या (निवडक) दासांवर तुझा कोणताही प्रभाव पडणार नाही, मात्र जे वाट चुकलेले लोक आहेत, तेच तुझे अनुसरण करतील
Surah Al-Hijr, Verse 42
وَإِنَّ جَهَنَّمَ لَمَوۡعِدُهُمۡ أَجۡمَعِينَ
४३. आणि निःसंशय, त्या सर्वांच्या वायद्याचे स्थान जहन्नम आहे
Surah Al-Hijr, Verse 43
لَهَا سَبۡعَةُ أَبۡوَٰبٖ لِّكُلِّ بَابٖ مِّنۡهُمۡ جُزۡءٞ مَّقۡسُومٌ
४४. ज्याला सात दरवाजे आहेत. प्रत्येक दारासाठी त्यांचा एक हिस्सा विभाजित आहे
Surah Al-Hijr, Verse 44
إِنَّ ٱلۡمُتَّقِينَ فِي جَنَّـٰتٖ وَعُيُونٍ
४५. निःसंशय, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणारे लोक बागांमध्ये आणि झऱ्यां (प्रवाहां) मध्ये असतील
Surah Al-Hijr, Verse 45
ٱدۡخُلُوهَا بِسَلَٰمٍ ءَامِنِينَ
४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा
Surah Al-Hijr, Verse 46
وَنَزَعۡنَا مَا فِي صُدُورِهِم مِّنۡ غِلٍّ إِخۡوَٰنًا عَلَىٰ سُرُرٖ مُّتَقَٰبِلِينَ
४७. आणि त्यांच्या मनात जी काही वैर- द्वेष भावना होती आम्ही ती सर्व दूर करू. ते भाऊ-भाऊ बनून एकमेकांसमोर सिंहासनावर बसलेले असतील
Surah Al-Hijr, Verse 47
لَا يَمَسُّهُمۡ فِيهَا نَصَبٞ وَمَا هُم مِّنۡهَا بِمُخۡرَجِينَ
४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील
Surah Al-Hijr, Verse 48
۞نَبِّئۡ عِبَادِيٓ أَنِّيٓ أَنَا ٱلۡغَفُورُ ٱلرَّحِيمُ
४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे
Surah Al-Hijr, Verse 49
وَأَنَّ عَذَابِي هُوَ ٱلۡعَذَابُ ٱلۡأَلِيمُ
५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे
Surah Al-Hijr, Verse 50
وَنَبِّئۡهُمۡ عَن ضَيۡفِ إِبۡرَٰهِيمَ
५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा
Surah Al-Hijr, Verse 51
إِذۡ دَخَلُواْ عَلَيۡهِ فَقَالُواْ سَلَٰمٗا قَالَ إِنَّا مِنكُمۡ وَجِلُونَ
५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१
Surah Al-Hijr, Verse 52
قَالُواْ لَا تَوۡجَلۡ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَٰمٍ عَلِيمٖ
५३. फरिश्ते म्हणाले, भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी पुत्राची शुभ वार्ता देतो
Surah Al-Hijr, Verse 53
قَالَ أَبَشَّرۡتُمُونِي عَلَىٰٓ أَن مَّسَّنِيَ ٱلۡكِبَرُ فَبِمَ تُبَشِّرُونَ
५४. इब्राहीम म्हणाले, काय या वृद्धावस्थेने स्पर्श केल्यानंतर तुम्ही मला ही शुभ वार्ता देता! ही आनंदाची बातमी तुम्ही कशी काय देत आहात
Surah Al-Hijr, Verse 54
قَالُواْ بَشَّرۡنَٰكَ بِٱلۡحَقِّ فَلَا تَكُن مِّنَ ٱلۡقَٰنِطِينَ
५५. फरिश्ते म्हणाले, आम्ही तुम्हाला अगदी खरी शुभवार्ता ऐकवित आहोत. तुम्ही निराश लोकांमध्ये सामील होऊ नका
Surah Al-Hijr, Verse 55
قَالَ وَمَن يَقۡنَطُ مِن رَّحۡمَةِ رَبِّهِۦٓ إِلَّا ٱلضَّآلُّونَ
५६. म्हणाले, आपल्या पालनकर्त्याच्या दया कृपेपासून केवळ ते (मार्गभ्रष्ट आणि) बहकलेले लोकच निराश होतात
Surah Al-Hijr, Verse 56
قَالَ فَمَا خَطۡبُكُمۡ أَيُّهَا ٱلۡمُرۡسَلُونَ
५७. (इब्राहीम यांनी) विचारले, हे अल्लाहतर्फे पाठविण्यात आलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमचे असे काय खास काम आहे
Surah Al-Hijr, Verse 57
قَالُوٓاْ إِنَّآ أُرۡسِلۡنَآ إِلَىٰ قَوۡمٖ مُّجۡرِمِينَ
५८. फरिश्त्यांनी उत्तर दिले, आम्हाला अपराधी लोकांकडे पाठविले गेले आहे
Surah Al-Hijr, Verse 58
إِلَّآ ءَالَ لُوطٍ إِنَّا لَمُنَجُّوهُمۡ أَجۡمَعِينَ
५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू
Surah Al-Hijr, Verse 59
إِلَّا ٱمۡرَأَتَهُۥ قَدَّرۡنَآ إِنَّهَا لَمِنَ ٱلۡغَٰبِرِينَ
६०. मात्र लूतच्या पत्नीखेरीज की आम्ही तिला थांबणाऱ्या व मागे राहणाऱ्यांमध्ये निश्चित केले आहे
Surah Al-Hijr, Verse 60
فَلَمَّا جَآءَ ءَالَ لُوطٍ ٱلۡمُرۡسَلُونَ
६१. जेव्हा पाठविलेले फरिश्ते लूतच्या कुटुंबाजवळ पोहोचले
Surah Al-Hijr, Verse 61
قَالَ إِنَّكُمۡ قَوۡمٞ مُّنكَرُونَ
६२. तेव्हा लूत म्हणाले, तुम्ही लोक तर काहीसे अनोळखी वाटतात
Surah Al-Hijr, Verse 62
قَالُواْ بَلۡ جِئۡنَٰكَ بِمَا كَانُواْ فِيهِ يَمۡتَرُونَ
६३. ते म्हणाले, (नाही) किंबहुना आम्ही तुमच्याजवळ ती वस्तू घेऊन आलो आहोत, जिच्या बाबतीत हे लोक संशय करीत आहेत
Surah Al-Hijr, Verse 63
وَأَتَيۡنَٰكَ بِٱلۡحَقِّ وَإِنَّا لَصَٰدِقُونَ
६४. आणि आम्ही तर तुझ्याजवळ (उघड) सत्य घेऊन आलो आहोत, आणि आम्ही आहोतही पुरेपुरे सच्चे
Surah Al-Hijr, Verse 64
فَأَسۡرِ بِأَهۡلِكَ بِقِطۡعٖ مِّنَ ٱلَّيۡلِ وَٱتَّبِعۡ أَدۡبَٰرَهُمۡ وَلَا يَلۡتَفِتۡ مِنكُمۡ أَحَدٞ وَٱمۡضُواْ حَيۡثُ تُؤۡمَرُونَ
६५. आता तुम्ही आपल्या कुटुंबासह या रात्रीच्या एखाद्या भागात निघून जा. तुम्ही स्वतः त्यांच्या मागे राहा (आणि सावधान!) तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये आणि ज्या ठिकाणी जायचा तुम्हाला आदेश दिला जात आहे, तिथे चालत जा
Surah Al-Hijr, Verse 65
وَقَضَيۡنَآ إِلَيۡهِ ذَٰلِكَ ٱلۡأَمۡرَ أَنَّ دَابِرَ هَـٰٓؤُلَآءِ مَقۡطُوعٞ مُّصۡبِحِينَ
६६. आणि आम्ही त्याच्याकडे या गोष्टीचा फैसला केला की सकाळ होता होताच त्या सर्वांची मुळे कापली जातील
Surah Al-Hijr, Verse 66
وَجَآءَ أَهۡلُ ٱلۡمَدِينَةِ يَسۡتَبۡشِرُونَ
६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले
Surah Al-Hijr, Verse 67
قَالَ إِنَّ هَـٰٓؤُلَآءِ ضَيۡفِي فَلَا تَفۡضَحُونِ
६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका
Surah Al-Hijr, Verse 68
وَٱتَّقُواْ ٱللَّهَ وَلَا تُخۡزُونِ
६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका
Surah Al-Hijr, Verse 69
قَالُوٓاْ أَوَلَمۡ نَنۡهَكَ عَنِ ٱلۡعَٰلَمِينَ
७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती
Surah Al-Hijr, Verse 70
قَالَ هَـٰٓؤُلَآءِ بَنَاتِيٓ إِن كُنتُمۡ فَٰعِلِينَ
७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१
Surah Al-Hijr, Verse 71
لَعَمۡرُكَ إِنَّهُمۡ لَفِي سَكۡرَتِهِمۡ يَعۡمَهُونَ
७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते
Surah Al-Hijr, Verse 72
فَأَخَذَتۡهُمُ ٱلصَّيۡحَةُ مُشۡرِقِينَ
७३. मग सूर्योदय होता होता त्यांना एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने येऊन धरले
Surah Al-Hijr, Verse 73
فَجَعَلۡنَا عَٰلِيَهَا سَافِلَهَا وَأَمۡطَرۡنَا عَلَيۡهِمۡ حِجَارَةٗ مِّن سِجِّيلٍ
७४. शेवटी आम्ही त्या (शहरा) ला उलथेपालथे करून टाकले आणि त्या लोकांवर कंकर पाषाणांचा वर्षाव केला
Surah Al-Hijr, Verse 74
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّلۡمُتَوَسِّمِينَ
७५. निःसंशय, प्रत्येक बोध प्राप्त करणाऱ्याकरिता यात अनेक निशाण्या आहेत
Surah Al-Hijr, Verse 75
وَإِنَّهَا لَبِسَبِيلٖ مُّقِيمٍ
७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते
Surah Al-Hijr, Verse 76
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّلۡمُؤۡمِنِينَ
७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे
Surah Al-Hijr, Verse 77
وَإِن كَانَ أَصۡحَٰبُ ٱلۡأَيۡكَةِ لَظَٰلِمِينَ
७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते
Surah Al-Hijr, Verse 78
فَٱنتَقَمۡنَا مِنۡهُمۡ وَإِنَّهُمَا لَبِإِمَامٖ مُّبِينٖ
७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत
Surah Al-Hijr, Verse 79
وَلَقَدۡ كَذَّبَ أَصۡحَٰبُ ٱلۡحِجۡرِ ٱلۡمُرۡسَلِينَ
८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले
Surah Al-Hijr, Verse 80
وَءَاتَيۡنَٰهُمۡ ءَايَٰتِنَا فَكَانُواْ عَنۡهَا مُعۡرِضِينَ
८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले
Surah Al-Hijr, Verse 81
وَكَانُواْ يَنۡحِتُونَ مِنَ ٱلۡجِبَالِ بُيُوتًا ءَامِنِينَ
८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता
Surah Al-Hijr, Verse 82
فَأَخَذَتۡهُمُ ٱلصَّيۡحَةُ مُصۡبِحِينَ
८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले
Surah Al-Hijr, Verse 83
فَمَآ أَغۡنَىٰ عَنۡهُم مَّا كَانُواْ يَكۡسِبُونَ
८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही
Surah Al-Hijr, Verse 84
وَمَا خَلَقۡنَا ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَيۡنَهُمَآ إِلَّا بِٱلۡحَقِّۗ وَإِنَّ ٱلسَّاعَةَ لَأٓتِيَةٞۖ فَٱصۡفَحِ ٱلصَّفۡحَ ٱلۡجَمِيلَ
८५. आणि आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना सत्यासहच बनविले आहे आणि कयामत अवश्य येणार आहे, तेव्हा तुम्ही भल्या रीतीने सहन करून घ्या
Surah Al-Hijr, Verse 85
إِنَّ رَبَّكَ هُوَ ٱلۡخَلَّـٰقُ ٱلۡعَلِيمُ
८६. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच निर्माण करणारा आणि जाणणारा आहे
Surah Al-Hijr, Verse 86
وَلَقَدۡ ءَاتَيۡنَٰكَ سَبۡعٗا مِّنَ ٱلۡمَثَانِي وَٱلۡقُرۡءَانَ ٱلۡعَظِيمَ
८७. निःसंशय आम्ही तुम्हाला सात आयती प्रदान केल्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती केली जाते, आणि महान कुरआन देखील प्रदान केला आहे
Surah Al-Hijr, Verse 87
لَا تَمُدَّنَّ عَيۡنَيۡكَ إِلَىٰ مَا مَتَّعۡنَا بِهِۦٓ أَزۡوَٰجٗا مِّنۡهُمۡ وَلَا تَحۡزَنۡ عَلَيۡهِمۡ وَٱخۡفِضۡ جَنَاحَكَ لِلۡمُؤۡمِنِينَ
८८. तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या)
Surah Al-Hijr, Verse 88
وَقُلۡ إِنِّيٓ أَنَا ٱلنَّذِيرُ ٱلۡمُبِينُ
८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे
Surah Al-Hijr, Verse 89
كَمَآ أَنزَلۡنَا عَلَى ٱلۡمُقۡتَسِمِينَ
९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला
Surah Al-Hijr, Verse 90
ٱلَّذِينَ جَعَلُواْ ٱلۡقُرۡءَانَ عِضِينَ
९१. ज्यांनी या कुरआनचे तुकडे तुकडे करून टाकले
Surah Al-Hijr, Verse 91
فَوَرَبِّكَ لَنَسۡـَٔلَنَّهُمۡ أَجۡمَعِينَ
९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू
Surah Al-Hijr, Verse 92
عَمَّا كَانُواْ يَعۡمَلُونَ
९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते
Surah Al-Hijr, Verse 93
فَٱصۡدَعۡ بِمَا تُؤۡمَرُ وَأَعۡرِضۡ عَنِ ٱلۡمُشۡرِكِينَ
९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या
Surah Al-Hijr, Verse 94
إِنَّا كَفَيۡنَٰكَ ٱلۡمُسۡتَهۡزِءِينَ
९५. तुमच्याशी ते लोक थट्टा मस्करी करतात त्यांच्या (शिक्षे) करिता आम्ही पर्याप्त आहोत
Surah Al-Hijr, Verse 95
ٱلَّذِينَ يَجۡعَلُونَ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَۚ فَسَوۡفَ يَعۡلَمُونَ
९६. जे लोक अल्लाहच्या सोबत आणखी इतर उपास्ये बनवितात, त्यांना लवकरच माहीत पडेल
Surah Al-Hijr, Verse 96
وَلَقَدۡ نَعۡلَمُ أَنَّكَ يَضِيقُ صَدۡرُكَ بِمَا يَقُولُونَ
९७. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनाला ठेच पोहचते
Surah Al-Hijr, Verse 97
فَسَبِّحۡ بِحَمۡدِ رَبِّكَ وَكُن مِّنَ ٱلسَّـٰجِدِينَ
९८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याची महानता आणि स्तुती प्रशंसाचे वर्णन करीत राहा आणि नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील व्हा
Surah Al-Hijr, Verse 98
وَٱعۡبُدۡ رَبَّكَ حَتَّىٰ يَأۡتِيَكَ ٱلۡيَقِينُ
९९. आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा, येथेपर्यंत की तुम्हाला मरण यावे
Surah Al-Hijr, Verse 99