Surah An-Nahl - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
أَتَىٰٓ أَمۡرُ ٱللَّهِ فَلَا تَسۡتَعۡجِلُوهُۚ سُبۡحَٰنَهُۥ وَتَعَٰلَىٰ عَمَّا يُشۡرِكُونَ
१. सर्वश्रेष्ठ अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला, आता याची घाई माजवू नका समस्त पवित्रता त्याच्यासाठी आहे, तो सर्वांत महान आहे, त्या सर्वांपेक्षा ज्यांना हे अल्लाहच्या जवळ भागीदार असल्याचे सांगतात
Surah An-Nahl, Verse 1
يُنَزِّلُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةَ بِٱلرُّوحِ مِنۡ أَمۡرِهِۦ عَلَىٰ مَن يَشَآءُ مِنۡ عِبَادِهِۦٓ أَنۡ أَنذِرُوٓاْ أَنَّهُۥ لَآ إِلَٰهَ إِلَّآ أَنَا۠ فَٱتَّقُونِ
२. तोच फरिश्त्यांना आपली वहयी (प्रकाशना) देऊन आपल्या आदेशाद्वारे आपल्या दासांपैकी, ज्याच्यावर इच्छितो उतरवितो, यासाठी की, तुम्ही, लोकांना सचेत करावे की माझ्याशिवाय दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही, यास्तव तुम्ही माझे भय राखा
Surah An-Nahl, Verse 2
خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ بِٱلۡحَقِّۚ تَعَٰلَىٰ عَمَّا يُشۡرِكُونَ
३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह निर्माण केले. तो तर त्याहून उच्चतम आहे जे अनेकेश्वरवादी करतात
Surah An-Nahl, Verse 3
خَلَقَ ٱلۡإِنسَٰنَ مِن نُّطۡفَةٖ فَإِذَا هُوَ خَصِيمٞ مُّبِينٞ
४. त्याने मानवांना वीर्यापासून निर्माण केले, मग तो उघड भांडखोर बनला
Surah An-Nahl, Verse 4
وَٱلۡأَنۡعَٰمَ خَلَقَهَاۖ لَكُمۡ فِيهَا دِفۡءٞ وَمَنَٰفِعُ وَمِنۡهَا تَأۡكُلُونَ
५. त्यानेच जनावरे निर्माण केलीत, ज्यात तुमच्यासाठी उष्णता देणारे कपडे आहेत. इतरही अनेक फायदे आहेत आणि काही तुमच्या खाण्यासाठी उपयोगी पडतात
Surah An-Nahl, Verse 5
وَلَكُمۡ فِيهَا جَمَالٌ حِينَ تُرِيحُونَ وَحِينَ تَسۡرَحُونَ
६. आणि त्यांच्यात तुमच्यासाठी शोभाही आहे जेव्हा त्यांना चारून आणाल तेव्हाही आणि जेव्हा चारण्यासाठी न्याल तेव्हाही
Surah An-Nahl, Verse 6
وَتَحۡمِلُ أَثۡقَالَكُمۡ إِلَىٰ بَلَدٖ لَّمۡ تَكُونُواْ بَٰلِغِيهِ إِلَّا بِشِقِّ ٱلۡأَنفُسِۚ إِنَّ رَبَّكُمۡ لَرَءُوفٞ رَّحِيمٞ
७. आणि ते तुमचे ओझे त्या शहरांपर्यंत उचलून नेतात, जिथे तुम्ही जीव अर्धा केल्याविना पोहचू शकत नव्हते. निःसंशय, तुमचा पालनकर्ता अतिशय स्नेहशील आणि खूप खूप दया करणारा आहे
Surah An-Nahl, Verse 7
وَٱلۡخَيۡلَ وَٱلۡبِغَالَ وَٱلۡحَمِيرَ لِتَرۡكَبُوهَا وَزِينَةٗۚ وَيَخۡلُقُ مَا لَا تَعۡلَمُونَ
८. आणि घोड्यांना, खच्चरांना, गाढवांना (त्यानेच निर्माण केले) यासाठी की तुम्ही त्यांना वाहनाच्या स्वरूपात वापरात आणावे आणि ते शोभा सजावटीचे साधनही आहेत. इतरही तो अशा वस्तू निर्माण करतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत
Surah An-Nahl, Verse 8
وَعَلَى ٱللَّهِ قَصۡدُ ٱلسَّبِيلِ وَمِنۡهَا جَآئِرٞۚ وَلَوۡ شَآءَ لَهَدَىٰكُمۡ أَجۡمَعِينَ
९. आणि अल्लाहपर्यंत पोहचण्याचा मार्ग सरळ मार्ग आहे आणि काही वाकडे मार्गही आहेत आणि त्याने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना सरळ मार्गास लावले असते
Surah An-Nahl, Verse 9
هُوَ ٱلَّذِيٓ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗۖ لَّكُم مِّنۡهُ شَرَابٞ وَمِنۡهُ شَجَرٞ فِيهِ تُسِيمُونَ
१०. तोच तुमच्या फायद्याकरिता आकाशातून पर्जन्य वृष्टी करतो जे तुम्ही पीता ही आणि त्याद्वारे उगवलेल्या झाडांना तुम्ही आपल्या जनावरांनना चारतात
Surah An-Nahl, Verse 10
يُنۢبِتُ لَكُم بِهِ ٱلزَّرۡعَ وَٱلزَّيۡتُونَ وَٱلنَّخِيلَ وَٱلۡأَعۡنَٰبَ وَمِن كُلِّ ٱلثَّمَرَٰتِۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّقَوۡمٖ يَتَفَكَّرُونَ
११. याच्याचद्वारे तो तुमच्यासाठी शेती आणि जैतून आणि खजूर आणि द्राक्ष व सर्व प्रकारची फळे उगवितो. निःसंशय, चिंतन करणाऱ्या लोकांसाठी यात मोठ्या निशाण्या आहेत
Surah An-Nahl, Verse 11
وَسَخَّرَ لَكُمُ ٱلَّيۡلَ وَٱلنَّهَارَ وَٱلشَّمۡسَ وَٱلۡقَمَرَۖ وَٱلنُّجُومُ مُسَخَّرَٰتُۢ بِأَمۡرِهِۦٓۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّقَوۡمٖ يَعۡقِلُونَ
१२. आणि त्यानेच रात्र आणि दिवसाला आणि सूर्य व चंद्राला तुमच्या सेवेत लावले आहे आणि तारे देखील त्याच्याच हुकुमाच्या अधीन आहेत. निःसंशय, यात बुद्धिमानांकरिता अनेक प्रकारच्या निशाण्या आहेत
Surah An-Nahl, Verse 12
وَمَا ذَرَأَ لَكُمۡ فِي ٱلۡأَرۡضِ مُخۡتَلِفًا أَلۡوَٰنُهُۥٓۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّقَوۡمٖ يَذَّكَّرُونَ
१३. आणि इतरही (विविध प्रकारच्या) अनेक रंग रूप असलेल्या वस्तू त्याने तुमच्यासाठी धरतीत पसरवून ठेवल्या आहेत. निःसंशय, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता यात मोठ्या जबरदस्त निशाण्या आहेत
Surah An-Nahl, Verse 13
وَهُوَ ٱلَّذِي سَخَّرَ ٱلۡبَحۡرَ لِتَأۡكُلُواْ مِنۡهُ لَحۡمٗا طَرِيّٗا وَتَسۡتَخۡرِجُواْ مِنۡهُ حِلۡيَةٗ تَلۡبَسُونَهَاۖ وَتَرَى ٱلۡفُلۡكَ مَوَاخِرَ فِيهِ وَلِتَبۡتَغُواْ مِن فَضۡلِهِۦ وَلَعَلَّكُمۡ تَشۡكُرُونَ
१४. आणि समुद्रांनाही तुमच्या अधीन करून ठेवले आहे की तुम्ही यातून निघालेले ताजे मांस खावे आणि यातून आपल्या अंगावर घालण्याकरिता दागिने काढू शकावे, आणि तुम्ही पाहाल की नावा यात पाण्याला चिरत चालतात आणि यासाठीही की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि संभवतः तुम्ही कृतज्ञताही व्यक्त करावी
Surah An-Nahl, Verse 14
وَأَلۡقَىٰ فِي ٱلۡأَرۡضِ رَوَٰسِيَ أَن تَمِيدَ بِكُمۡ وَأَنۡهَٰرٗا وَسُبُلٗا لَّعَلَّكُمۡ تَهۡتَدُونَ
१५. आणि त्याने धरतीवर पर्वत गाडले आहेत, यासाठी की तिने तुमच्यासह हलू नये आणि नद्या व मार्ग बनविले, यासाठी की तुम्ही उद्दिष्टाप्रत पोहचावे
Surah An-Nahl, Verse 15
وَعَلَٰمَٰتٖۚ وَبِٱلنَّجۡمِ هُمۡ يَهۡتَدُونَ
१६. दुसऱ्याही अनेक निशाण्या (निर्धारीत केल्या) आणि ताऱ्यांद्वारेही लोक मार्ग प्राप्त करून घेतात
Surah An-Nahl, Verse 16
أَفَمَن يَخۡلُقُ كَمَن لَّا يَخۡلُقُۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ
१७. तर काय तो, जो निर्माण करतो, त्याच्या समान आहे, जो निर्माण करू शकत नाही? काय तुम्ही कधीच विचार करीत नाही
Surah An-Nahl, Verse 17
وَإِن تَعُدُّواْ نِعۡمَةَ ٱللَّهِ لَا تُحۡصُوهَآۗ إِنَّ ٱللَّهَ لَغَفُورٞ رَّحِيمٞ
१८. आणि जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांचा हिशोब (गणना) करू पाहाल तर तुम्ही तो कधीच करू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोफा माफ करणारा दया करणारा आहे
Surah An-Nahl, Verse 18
وَٱللَّهُ يَعۡلَمُ مَا تُسِرُّونَ وَمَا تُعۡلِنُونَ
१९. आणि जे काही तुम्ही लपवाल किंवा उघड कराल, अल्लाह सर्व काही जाणतो
Surah An-Nahl, Verse 19
وَٱلَّذِينَ يَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَا يَخۡلُقُونَ شَيۡـٔٗا وَهُمۡ يُخۡلَقُونَ
२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीज ज्यांना हे लोक पुकारतात ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, उलट हे स्वतः निर्माण केले गेले आहेत
Surah An-Nahl, Verse 20
أَمۡوَٰتٌ غَيۡرُ أَحۡيَآءٖۖ وَمَا يَشۡعُرُونَ أَيَّانَ يُبۡعَثُونَ
२१. मेलेले आहेत, जिवंत नाहीत. त्यांना तर हेही माहीत नाही की केव्हा (जिवंत करून) उठवले जातील
Surah An-Nahl, Verse 21
إِلَٰهُكُمۡ إِلَٰهٞ وَٰحِدٞۚ فَٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ قُلُوبُهُم مُّنكِرَةٞ وَهُم مُّسۡتَكۡبِرُونَ
२२. तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाह एकटा आहे, आणि आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांची मने भ्रष्ट आहेत. आणि ते स्वतः गर्विष्ठ आहेत
Surah An-Nahl, Verse 22
لَا جَرَمَ أَنَّ ٱللَّهَ يَعۡلَمُ مَا يُسِرُّونَ وَمَا يُعۡلِنُونَۚ إِنَّهُۥ لَا يُحِبُّ ٱلۡمُسۡتَكۡبِرِينَ
२३. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह, त्या प्रत्येक गोष्टीला, जिला ते लपवितात आणि जिला जाहीर करतात, चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह घमेंडी लोकांना पसंत करीत नाही
Surah An-Nahl, Verse 23
وَإِذَا قِيلَ لَهُم مَّاذَآ أَنزَلَ رَبُّكُمۡ قَالُوٓاْ أَسَٰطِيرُ ٱلۡأَوَّلِينَ
२४. आणि त्यांना जेव्हा विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरीत केले आहे, तेव्हा उत्तर देतात की पूर्वीच्या लोकांच्या कथा कहाण्या आहेत
Surah An-Nahl, Verse 24
لِيَحۡمِلُوٓاْ أَوۡزَارَهُمۡ كَامِلَةٗ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ وَمِنۡ أَوۡزَارِ ٱلَّذِينَ يُضِلُّونَهُم بِغَيۡرِ عِلۡمٍۗ أَلَا سَآءَ مَا يَزِرُونَ
२५. (याचाच परिणाम असेल) की कयामतच्या दिवशी हे लोक आपल्या पूर्ण ओझ्यासह, त्यांच्या ओझ्याचेही भागीदार ठरतील, ज्यांना ज्ञानाविना पथभ्रष्ट करीत राहिले, पाहा तर किती वाीट ओझे उचलत आहेत
Surah An-Nahl, Verse 25
قَدۡ مَكَرَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ فَأَتَى ٱللَّهُ بُنۡيَٰنَهُم مِّنَ ٱلۡقَوَاعِدِ فَخَرَّ عَلَيۡهِمُ ٱلسَّقۡفُ مِن فَوۡقِهِمۡ وَأَتَىٰهُمُ ٱلۡعَذَابُ مِنۡ حَيۡثُ لَا يَشۡعُرُونَ
२६. त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कावेबाजपणा केला. (शेवटी) अल्लाहने त्यांच्या (कट-कारस्थानाच्या) घरांना मुळा (पाया) पासून उखडून टाकले आणि त्यांच्या (डोक्यांवर) छत वरून कोसळले आणि त्यांच्याजव अज़ाब (शिक्षा-यातना) अशा ठिकाणाहून आला, जे ठिकाण त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते
Surah An-Nahl, Verse 26
ثُمَّ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ يُخۡزِيهِمۡ وَيَقُولُ أَيۡنَ شُرَكَآءِيَ ٱلَّذِينَ كُنتُمۡ تُشَـٰٓقُّونَ فِيهِمۡۚ قَالَ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡعِلۡمَ إِنَّ ٱلۡخِزۡيَ ٱلۡيَوۡمَ وَٱلسُّوٓءَ عَلَى ٱلۡكَٰفِرِينَ
२७. मग कयामतच्या दिवशीही सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांना अपमानित करील आणि फर्माविल की माझे ते भागीदार कोठे आहेत, ज्यांच्याविषयी तुम्ही लढत झगडत होते. ज्यांना ज्ञान दिले गेले होते, ते उत्तर देतील की आज तर इन्कार करणाऱ्यांना अपमान आणि वाईटपणाने चांगली मिठी मारली
Surah An-Nahl, Verse 27
ٱلَّذِينَ تَتَوَفَّىٰهُمُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ ظَالِمِيٓ أَنفُسِهِمۡۖ فَأَلۡقَوُاْ ٱلسَّلَمَ مَا كُنَّا نَعۡمَلُ مِن سُوٓءِۭۚ بَلَىٰٓۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمُۢ بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ
२८. ते लोक, जे आपल्या प्राणांवर जुलूम अत्याचार करतात, फरिश्ते जेव्हा त्यांचा प्राण काढू लागतात तेव्हा त्या वेळी ते झुकतात की आम्ही वाईट आचरण करीत नव्हतो, का नाही? अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही तुम्ही करीत होते
Surah An-Nahl, Verse 28
فَٱدۡخُلُوٓاْ أَبۡوَٰبَ جَهَنَّمَ خَٰلِدِينَ فِيهَاۖ فَلَبِئۡسَ مَثۡوَى ٱلۡمُتَكَبِّرِينَ
२९. तेव्हा आता तुम्ही नेहमी करीत जहन्नमच्या दरवाजातून (जहन्नममध्ये) प्रवेश करा. तर किती वाईट ठिकाण आहे घमेंड करणाऱ्यांचे
Surah An-Nahl, Verse 29
۞وَقِيلَ لِلَّذِينَ ٱتَّقَوۡاْ مَاذَآ أَنزَلَ رَبُّكُمۡۚ قَالُواْ خَيۡرٗاۗ لِّلَّذِينَ أَحۡسَنُواْ فِي هَٰذِهِ ٱلدُّنۡيَا حَسَنَةٞۚ وَلَدَارُ ٱلۡأٓخِرَةِ خَيۡرٞۚ وَلَنِعۡمَ دَارُ ٱلۡمُتَّقِينَ
३०. आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांना विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरित केले आहे, तेव्हा ते उत्तर देतात की उत्तमात उत्तम. ज्या लोकांनी सत्कर्मे केलीत, त्यांच्यासाठी या जगात भलाई आहे, आणि निःसंशय आखिरतचे घर तर फार उत्तम आहे. आणि किती चांगले घर आहे, अल्लाहचे भय राखणाऱ्यांचे
Surah An-Nahl, Verse 30
جَنَّـٰتُ عَدۡنٖ يَدۡخُلُونَهَا تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُۖ لَهُمۡ فِيهَا مَا يَشَآءُونَۚ كَذَٰلِكَ يَجۡزِي ٱللَّهُ ٱلۡمُتَّقِينَ
३१. सदैव काळ राहणाऱ्या बागांमध्ये जातील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. ते जे मागतील ते तिथे त्यांच्यासाठी हजर असेल. अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणाऱ्यांना अल्लाह असाच मोबदला प्रदान करतो
Surah An-Nahl, Verse 31
ٱلَّذِينَ تَتَوَفَّىٰهُمُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ طَيِّبِينَ يَقُولُونَ سَلَٰمٌ عَلَيۡكُمُ ٱدۡخُلُواْ ٱلۡجَنَّةَ بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ
३२. ते लोक, ज्याचा प्राण फरिश्ते अशा अवस्थेत काढतात की ते स्वच्छ पवित्र असावेत, म्हणतात की तुमच्यासाठी सलामतीच सलामती आहे. आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जन्नतमध्ये जा, जे तुम्ही करीत होते
Surah An-Nahl, Verse 32
هَلۡ يَنظُرُونَ إِلَّآ أَن تَأۡتِيَهُمُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ أَوۡ يَأۡتِيَ أَمۡرُ رَبِّكَۚ كَذَٰلِكَ فَعَلَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡۚ وَمَا ظَلَمَهُمُ ٱللَّهُ وَلَٰكِن كَانُوٓاْ أَنفُسَهُمۡ يَظۡلِمُونَ
३३. काय हे याच गोष्टीची वाट पाहात आहेत की त्यांच्याजवळ फरिश्ते यावेत किंवा तुमच्या पालनकर्त्याचा आदेश यावा? त्या लोकांनीही असेच केले, जे यांच्यापूर्वी होऊन गेलेत. अल्लाहने त्यांच्यावर कोणताही अत्याचार केला नाही, उलट ते स्वतःच आपल्या प्राणांवर अत्याचार करीत राहिले
Surah An-Nahl, Verse 33
فَأَصَابَهُمۡ سَيِّـَٔاتُ مَا عَمِلُواْ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ
३४. तेव्हा त्यांच्या दुष्कर्मांचा मोबदला त्यांना मिळाला आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित होते, तिने त्यांना येऊन घेरले
Surah An-Nahl, Verse 34
وَقَالَ ٱلَّذِينَ أَشۡرَكُواْ لَوۡ شَآءَ ٱللَّهُ مَا عَبَدۡنَا مِن دُونِهِۦ مِن شَيۡءٖ نَّحۡنُ وَلَآ ءَابَآؤُنَا وَلَا حَرَّمۡنَا مِن دُونِهِۦ مِن شَيۡءٖۚ كَذَٰلِكَ فَعَلَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡۚ فَهَلۡ عَلَى ٱلرُّسُلِ إِلَّا ٱلۡبَلَٰغُ ٱلۡمُبِينُ
३५. आणि अनेकेश्वरवादी म्हणाले, जर अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही आणि आमचे वाडवडील त्याच्याखेरीज दुसऱ्याचे उपासक झाले नसते, ना त्याच्या हुकुमाविना एखाद्या वस्तूला हराम (अवैध) ठरविले असते. हेच आचरण त्यांच्या पूर्वीच्या लोकांचेही राहिले, तेव्हा पैगंबरांची जबाबदारी केवळ स्पष्ट संदेश पोहचविण्याची आहे
Surah An-Nahl, Verse 35
وَلَقَدۡ بَعَثۡنَا فِي كُلِّ أُمَّةٖ رَّسُولًا أَنِ ٱعۡبُدُواْ ٱللَّهَ وَٱجۡتَنِبُواْ ٱلطَّـٰغُوتَۖ فَمِنۡهُم مَّنۡ هَدَى ٱللَّهُ وَمِنۡهُم مَّنۡ حَقَّتۡ عَلَيۡهِ ٱلضَّلَٰلَةُۚ فَسِيرُواْ فِي ٱلۡأَرۡضِ فَٱنظُرُواْ كَيۡفَ كَانَ عَٰقِبَةُ ٱلۡمُكَذِّبِينَ
३६. आणि आम्ही प्रत्येक जनसमूहात पैगंबर पाठविले की (लोक हो!) केवळ अल्लाहची उपासना करा आणि तागूत (अल्लाहखेरीजची सर्व असत्य उपास्ये) पासून दूर राहा, तर काही लोकांना अल्लाहने मार्गदर्शन प्रदान केले आणि काहींवर मार्गभ्रष्टता सिद्ध झाली. आता तुम्ही स्वतः धरतीवर हिंडून फिरून पाहा की खोटे ठरविणाऱ्यांचा शेवट कसा झाला
Surah An-Nahl, Verse 36
إِن تَحۡرِصۡ عَلَىٰ هُدَىٰهُمۡ فَإِنَّ ٱللَّهَ لَا يَهۡدِي مَن يُضِلُّۖ وَمَا لَهُم مِّن نَّـٰصِرِينَ
३७. तरीही तुम्ही त्यांना मार्गदर्शन लाभावे अशी इच्छा बाळगत राहिले परंतु अल्लाह ज्याला मार्गभ्रष्ट करतो, त्याला सन्मार्ग दाखवित नाही, आणि ना त्यांचा कोणी मदतकर्ता असतो
Surah An-Nahl, Verse 37
وَأَقۡسَمُواْ بِٱللَّهِ جَهۡدَ أَيۡمَٰنِهِمۡ لَا يَبۡعَثُ ٱللَّهُ مَن يَمُوتُۚ بَلَىٰ وَعۡدًا عَلَيۡهِ حَقّٗا وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعۡلَمُونَ
३८. आणि ते लोक मोठमोठ्या शपथा घेऊन सांगतात की मेलेल्या लोकांना अल्लाह जिवंत करणार नाही. का नाही, (अवश्य जिवंत करेल) हा तर त्याचा अगदी सच्चा आणि पक्का वायदा आहे, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत
Surah An-Nahl, Verse 38
لِيُبَيِّنَ لَهُمُ ٱلَّذِي يَخۡتَلِفُونَ فِيهِ وَلِيَعۡلَمَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ أَنَّهُمۡ كَانُواْ كَٰذِبِينَ
३९. अशासाठीही की, हे लोक ज्या गोष्टीत मतभेद करीत होते, तिला अल्लाहने स्पष्ट करून सांगावे आणि यासाठीही इन्कार करणाऱ्यांनी स्वतः आपण खोटे असल्याचे जाणून घ्यावे
Surah An-Nahl, Verse 39
إِنَّمَا قَوۡلُنَا لِشَيۡءٍ إِذَآ أَرَدۡنَٰهُ أَن نَّقُولَ لَهُۥ كُن فَيَكُونُ
४०. आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा इरादा करतो, तेव्हा आम्हाला केवळ इतकेच सांगावे लागते की घडून ये आणि ती गोष्ट घडून येते
Surah An-Nahl, Verse 40
وَٱلَّذِينَ هَاجَرُواْ فِي ٱللَّهِ مِنۢ بَعۡدِ مَا ظُلِمُواْ لَنُبَوِّئَنَّهُمۡ فِي ٱلدُّنۡيَا حَسَنَةٗۖ وَلَأَجۡرُ ٱلۡأٓخِرَةِ أَكۡبَرُۚ لَوۡ كَانُواْ يَعۡلَمُونَ
४१. आणि ज्या लोकांनी अत्याचार सहन केल्यानंतर, अल्लाहच्या मार्गात देशत्याग केला, आम्ही त्यांना सर्वांत उत्तम जागा या जगात प्रदान करू आणि आखिरतचा मोबदला तर अतिशय मोठा आहे. लोकांनी हे जाणून घेतले असते तर किती बरे झाले असते
Surah An-Nahl, Verse 41
ٱلَّذِينَ صَبَرُواْ وَعَلَىٰ رَبِّهِمۡ يَتَوَكَّلُونَ
४२. ज्या लोकांनी धीर संयम राखला, आणि आपल्या पालनकर्त्यावर भरोसा करीत राहिले
Surah An-Nahl, Verse 42
وَمَآ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ إِلَّا رِجَالٗا نُّوحِيٓ إِلَيۡهِمۡۖ فَسۡـَٔلُوٓاْ أَهۡلَ ٱلذِّكۡرِ إِن كُنتُمۡ لَا تَعۡلَمُونَ
४३. आणि तुमच्या पूर्वीही आम्ही पुरुषांनाच (पैगंबर म्हणून) पाठवित राहिलो, ज्यांच्याकडे वहयी (प्रकाशना) अवतरित करीत होतो. जर तुम्ही जाणत नसाल तर ज्ञानी लोकांना विचारा.१
Surah An-Nahl, Verse 43
بِٱلۡبَيِّنَٰتِ وَٱلزُّبُرِۗ وَأَنزَلۡنَآ إِلَيۡكَ ٱلذِّكۡرَ لِتُبَيِّنَ لِلنَّاسِ مَا نُزِّلَ إِلَيۡهِمۡ وَلَعَلَّهُمۡ يَتَفَكَّرُونَ
४४. निशाण्या आणि ग्रंथांसह. हे स्मरण (ग्रंथ) आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे की लोकांकडे जे उतरविले गेले आहे, तुम्ही त्यांना ते स्पष्टपणे सांगावे, कदाचित त्यांनी विचारा चिंतन करावे
Surah An-Nahl, Verse 44
أَفَأَمِنَ ٱلَّذِينَ مَكَرُواْ ٱلسَّيِّـَٔاتِ أَن يَخۡسِفَ ٱللَّهُ بِهِمُ ٱلۡأَرۡضَ أَوۡ يَأۡتِيَهُمُ ٱلۡعَذَابُ مِنۡ حَيۡثُ لَا يَشۡعُرُونَ
४५. वाईट कावेबाज करणारे, काय या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की अल्लाह त्यांना जमिनीत धसवून टाकील किंवा त्यांच्याजवळ अशा ठिकाणाहून अज़ाब (शिक्षा-यातना) यावी, ज्या ठिकाणाची त्यांना शंका आणि कल्पनाही नसावी
Surah An-Nahl, Verse 45
أَوۡ يَأۡخُذَهُمۡ فِي تَقَلُّبِهِمۡ فَمَا هُم بِمُعۡجِزِينَ
४६. किंवा त्यांना चालता फिरता धरून घ्यावे, हे कोणत्याही प्रकारे अल्लाहला विवश (लाचार) करू शकत नाही
Surah An-Nahl, Verse 46
أَوۡ يَأۡخُذَهُمۡ عَلَىٰ تَخَوُّفٖ فَإِنَّ رَبَّكُمۡ لَرَءُوفٞ رَّحِيمٌ
४७. किंवा त्यांना भय दाखवून पकडीत घ्यावे, निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा करुणाशील आणि मोठा दयाशील आहे
Surah An-Nahl, Verse 47
أَوَلَمۡ يَرَوۡاْ إِلَىٰ مَا خَلَقَ ٱللَّهُ مِن شَيۡءٖ يَتَفَيَّؤُاْ ظِلَٰلُهُۥ عَنِ ٱلۡيَمِينِ وَٱلشَّمَآئِلِ سُجَّدٗا لِّلَّهِ وَهُمۡ دَٰخِرُونَ
४८. काय त्यांनी अल्लाहच्या निर्मितीपैकी कोणालाही पाहिले नाही की त्याची सावली उजव्या-डाव्या बाजूकडे झुकून अल्लाहसमोर सजदा करते, आणि आपली लाचारी व्यक्त करते
Surah An-Nahl, Verse 48
وَلِلَّهِۤ يَسۡجُدُۤ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِ مِن دَآبَّةٖ وَٱلۡمَلَـٰٓئِكَةُ وَهُمۡ لَا يَسۡتَكۡبِرُونَ
४९. आणि निःसंशय, आकाशांमधील आणि धरतीचे समस्त सजीव आणि फरिश्ते, सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर सजदा करतात आणि किंचितही घमेंड करीत नाही
Surah An-Nahl, Verse 49
يَخَافُونَ رَبَّهُم مِّن فَوۡقِهِمۡ وَيَفۡعَلُونَ مَا يُؤۡمَرُونَ۩
५०. आणि आपल्या पालनकर्त्याशी, जो त्यांच्यावरती आहे, थरथर कापत राहतात आणि जो आदेश मिळेल, त्याचे पालन करण्यात मग्न राहतात
Surah An-Nahl, Verse 50
۞وَقَالَ ٱللَّهُ لَا تَتَّخِذُوٓاْ إِلَٰهَيۡنِ ٱثۡنَيۡنِۖ إِنَّمَا هُوَ إِلَٰهٞ وَٰحِدٞ فَإِيَّـٰيَ فَٱرۡهَبُونِ
५१. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने सांगून टाकले आहे की दोन माबूद (उपास्ये) बनवू नका. माबूद तर तोच फक्त एकटा आहे, तेव्हा तुम्ही सर्व केवळ माझेच भय राखा
Surah An-Nahl, Verse 51
وَلَهُۥ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَلَهُ ٱلدِّينُ وَاصِبًاۚ أَفَغَيۡرَ ٱللَّهِ تَتَّقُونَ
५२. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, सर्व त्याचेच आहे, आणि त्याचीच उपासना नेहमी अनिवार्य आहे. काय तरीही तुम्ही त्याच्याखेरीज दुसऱ्यांचे भय बाळगता
Surah An-Nahl, Verse 52
وَمَا بِكُم مِّن نِّعۡمَةٖ فَمِنَ ٱللَّهِۖ ثُمَّ إِذَا مَسَّكُمُ ٱلضُّرُّ فَإِلَيۡهِ تَجۡـَٔرُونَ
५३. आणि तुमच्याजवळ जेवढ्या देखील अल्लाहच्या कृपा देणग्या आहेत सर्व त्यानेच प्रदान केलेल्या आहेत. आता जेव्हा देखील तुम्हाला एखादी कष्ट-यातना आल्यास त्याच्याचकडे दुआ-प्रार्थना करता
Surah An-Nahl, Verse 53
ثُمَّ إِذَا كَشَفَ ٱلضُّرَّ عَنكُمۡ إِذَا فَرِيقٞ مِّنكُم بِرَبِّهِمۡ يُشۡرِكُونَ
५४. आणि जेव्हा मात्र त्याने ती कष्ट-यातना तुमच्यापासून दूर केली तेव्हा तुमच्यापैकी काही लोक आपल्या पालनकर्त्यासोबत भागीदार बनवू लागतात
Surah An-Nahl, Verse 54
لِيَكۡفُرُواْ بِمَآ ءَاتَيۡنَٰهُمۡۚ فَتَمَتَّعُواْ فَسَوۡفَ تَعۡلَمُونَ
५५. यासाठी की आम्ही प्रदान केलेल्या देणग्यांशी कृतघ्नता दाखवावी (ठीक आहे) थोडा लाभ प्राप्त करून घ्या. शेवटी तुम्हाला माहीतच पडेल
Surah An-Nahl, Verse 55
وَيَجۡعَلُونَ لِمَا لَا يَعۡلَمُونَ نَصِيبٗا مِّمَّا رَزَقۡنَٰهُمۡۗ تَٱللَّهِ لَتُسۡـَٔلُنَّ عَمَّا كُنتُمۡ تَفۡتَرُونَ
५६. आणि ज्याला ते जाणतही नाही, त्याचा हिस्सा आम्ही दिलेल्या वस्तूंमध्ये निश्चित करतात, अल्लाहची शपथ! तुमच्या या आरोपाबद्दल तुम्हाला अवश्य विचारणा होईल
Surah An-Nahl, Verse 56
وَيَجۡعَلُونَ لِلَّهِ ٱلۡبَنَٰتِ سُبۡحَٰنَهُۥ وَلَهُم مَّا يَشۡتَهُونَ
५७. आणि ते पवित्र अल्लाहकरीता मुली निर्धारीत करतात, आणि स्वतःसाठी ते, जे त्यांच्या इच्छेनुसार असेल
Surah An-Nahl, Verse 57
وَإِذَا بُشِّرَ أَحَدُهُم بِٱلۡأُنثَىٰ ظَلَّ وَجۡهُهُۥ مُسۡوَدّٗا وَهُوَ كَظِيمٞ
५८. आणि त्यांच्यापैकी जेव्हा एखाद्याला मुलगी झाल्याची खबर दिली जाते तेव्हा त्याचे तोंड काळवंडते आणि तो मनातल्या मनात कुढू लागतो
Surah An-Nahl, Verse 58
يَتَوَٰرَىٰ مِنَ ٱلۡقَوۡمِ مِن سُوٓءِ مَا بُشِّرَ بِهِۦٓۚ أَيُمۡسِكُهُۥ عَلَىٰ هُونٍ أَمۡ يَدُسُّهُۥ فِي ٱلتُّرَابِۗ أَلَا سَآءَ مَا يَحۡكُمُونَ
५९. या वाईट बातमीमुळे, लोकांपासून तोंड लपवित फिरतो विचार करतो काय या अपमानाला सोबतच राहू द्यावी की हिला मातीत गाडून टाकावे किती वाईट निर्णय घेतात हे
Surah An-Nahl, Verse 59
لِلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ مَثَلُ ٱلسَّوۡءِۖ وَلِلَّهِ ٱلۡمَثَلُ ٱلۡأَعۡلَىٰۚ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ
६०. आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांचेच वाईट उदाहरण आहे. अल्लाहकरिता तर अतिशय उच्च उदाहरण आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे
Surah An-Nahl, Verse 60
وَلَوۡ يُؤَاخِذُ ٱللَّهُ ٱلنَّاسَ بِظُلۡمِهِم مَّا تَرَكَ عَلَيۡهَا مِن دَآبَّةٖ وَلَٰكِن يُؤَخِّرُهُمۡ إِلَىٰٓ أَجَلٖ مُّسَمّٗىۖ فَإِذَا جَآءَ أَجَلُهُمۡ لَا يَسۡتَـٔۡخِرُونَ سَاعَةٗ وَلَا يَسۡتَقۡدِمُونَ
६१. आणि जर लोकांच्या दुराचाराबद्दल अल्लाहने त्यांना पकडीत घेणे सुरू केले असते तर धरतीवर एक देखील जीव वाचला नसता, परंतु तो तर त्यांना एका निर्धारीत अवधीपर्यंत ढील (सवड) देतो, मग जेव्हा त्यांची ती वेळ येते तेव्हा ते एक क्षण ना मागे राहू शकतात आणि ना पुढे जाऊ शकतात
Surah An-Nahl, Verse 61
وَيَجۡعَلُونَ لِلَّهِ مَا يَكۡرَهُونَۚ وَتَصِفُ أَلۡسِنَتُهُمُ ٱلۡكَذِبَ أَنَّ لَهُمُ ٱلۡحُسۡنَىٰۚ لَا جَرَمَ أَنَّ لَهُمُ ٱلنَّارَ وَأَنَّهُم مُّفۡرَطُونَ
६२. आणि ते स्वतःसाठी जे अप्रिय समजतात, ते अल्लाहसाठी सिद्ध करतात आणि त्यांच्या जीभा खोट्या गोष्टींचे वर्णन करतात की त्यांच्यासाठी भलाई आहे?(मुळीच नाही), वास्तविक त्यांच्यासाठी आग आहे आणि हे लोक, जहन्नमी लोकांच्या पुढे पुढे जाणारे आहेत
Surah An-Nahl, Verse 62
تَٱللَّهِ لَقَدۡ أَرۡسَلۡنَآ إِلَىٰٓ أُمَمٖ مِّن قَبۡلِكَ فَزَيَّنَ لَهُمُ ٱلشَّيۡطَٰنُ أَعۡمَٰلَهُمۡ فَهُوَ وَلِيُّهُمُ ٱلۡيَوۡمَ وَلَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٞ
६३. अल्लाहची शपथ! आम्ही तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांकडेही आपले पैगंबर पाठविले, परंतु सैतानाने त्यांच्या दुष्कर्मांना त्यांच्या नजरेत चांगले ठरविले. तो सैतान आज देखील त्यांचा दोस्त बनलेला आहे आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे
Surah An-Nahl, Verse 63
وَمَآ أَنزَلۡنَا عَلَيۡكَ ٱلۡكِتَٰبَ إِلَّا لِتُبَيِّنَ لَهُمُ ٱلَّذِي ٱخۡتَلَفُواْ فِيهِ وَهُدٗى وَرَحۡمَةٗ لِّقَوۡمٖ يُؤۡمِنُونَ
६४. आणि हा ग्रंथ आम्ही तुमच्यावर अशासाठी अवतरित केला आहे की तुम्ही ती प्रत्येक गोष्ट उघड करावी, ज्याबाबत ते मतभेद करीत आहेत आणि हा ग्रंथ ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि दया आहे
Surah An-Nahl, Verse 64
وَٱللَّهُ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ فَأَحۡيَا بِهِ ٱلۡأَرۡضَ بَعۡدَ مَوۡتِهَآۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّقَوۡمٖ يَسۡمَعُونَ
६५. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह आकाशातून पर्जन्य वृष्टी करून, त्याद्वआरे धरतीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करतो. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ऐकतील
Surah An-Nahl, Verse 65
وَإِنَّ لَكُمۡ فِي ٱلۡأَنۡعَٰمِ لَعِبۡرَةٗۖ نُّسۡقِيكُم مِّمَّا فِي بُطُونِهِۦ مِنۢ بَيۡنِ فَرۡثٖ وَدَمٖ لَّبَنًا خَالِصٗا سَآئِغٗا لِّلشَّـٰرِبِينَ
६६. आणि तुमच्यासाठी तर जनावरांमध्येही मोठा बोध आहे की आम्ही तुम्हाला त्याच्या पोटात जे काही आहे, त्याच्यातूनच शेण आणि रक्ताच्या मधून शुद्ध निर्भेळ दूध पाजतो, जे पिणाऱ्यांसाठी सहजपणे पचवले जाते
Surah An-Nahl, Verse 66
وَمِن ثَمَرَٰتِ ٱلنَّخِيلِ وَٱلۡأَعۡنَٰبِ تَتَّخِذُونَ مِنۡهُ سَكَرٗا وَرِزۡقًا حَسَنًاۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّقَوۡمٖ يَعۡقِلُونَ
६७. आणि खजुरीच्या व द्राक्षांच्या वृक्षांच्या फळांपासून तुम्ही मद्य तयार करता आणि उत्तम अन्न-सामुग्रीही. निःसंशय अक्कल राखणाऱ्या लोकांकरिता यातही फार मोठी निशाणी आहे
Surah An-Nahl, Verse 67
وَأَوۡحَىٰ رَبُّكَ إِلَى ٱلنَّحۡلِ أَنِ ٱتَّخِذِي مِنَ ٱلۡجِبَالِ بُيُوتٗا وَمِنَ ٱلشَّجَرِ وَمِمَّا يَعۡرِشُونَ
६८. आणि तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीलाही प्रेरणा दिली की पर्वतांवर, झाडांवर आणि लोकांनी बनविलेल्या उंच उंच इमारतींवर आपले घर (पोळे) बनव
Surah An-Nahl, Verse 68
ثُمَّ كُلِي مِن كُلِّ ٱلثَّمَرَٰتِ فَٱسۡلُكِي سُبُلَ رَبِّكِ ذُلُلٗاۚ يَخۡرُجُ مِنۢ بُطُونِهَا شَرَابٞ مُّخۡتَلِفٌ أَلۡوَٰنُهُۥ فِيهِ شِفَآءٞ لِّلنَّاسِۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَةٗ لِّقَوۡمٖ يَتَفَكَّرُونَ
६९. आणि प्रत्येक प्रकारचे फळ खा आणि आपल्या (पालनकर्त्याच्या) सहज सुलभ मार्गांवर चालत फिरत राहा. त्यांच्या पोटातून पेयद्रव बाहेर पडतो, ज्याचे अनेक रंग आहेत, आणि ज्यात लोकांसाठी स्वास्थ्य आहे. विचार-चिंतन करणाऱ्यांसाठी यातही फार मोठी निशाणी आहे
Surah An-Nahl, Verse 69
وَٱللَّهُ خَلَقَكُمۡ ثُمَّ يَتَوَفَّىٰكُمۡۚ وَمِنكُم مَّن يُرَدُّ إِلَىٰٓ أَرۡذَلِ ٱلۡعُمُرِ لِكَيۡ لَا يَعۡلَمَ بَعۡدَ عِلۡمٖ شَيۡـًٔاۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمٞ قَدِيرٞ
७०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेच तुम्हा सर्वांना निर्माण केले आहे. तोच नंतर तुम्हाला मृत्यु देईल, आणि तुमच्यात काही असेही आहेत जे अतिशय वाईट वया (खूप म्हातारवया) कडे परतविले जातात, की खूप काही जाणून घेतल्यानंतरही न जाणावे. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा आणि सामर्थ्य राखणारा आहे
Surah An-Nahl, Verse 70
وَٱللَّهُ فَضَّلَ بَعۡضَكُمۡ عَلَىٰ بَعۡضٖ فِي ٱلرِّزۡقِۚ فَمَا ٱلَّذِينَ فُضِّلُواْ بِرَآدِّي رِزۡقِهِمۡ عَلَىٰ مَا مَلَكَتۡ أَيۡمَٰنُهُمۡ فَهُمۡ فِيهِ سَوَآءٌۚ أَفَبِنِعۡمَةِ ٱللَّهِ يَجۡحَدُونَ
७१. आणि अल्लाहनेच तुमच्यापैकी एकाला दुसऱ्यावर रोजी (अन्न सामुग्री) मध्ये वृद्धी प्रदान केली आहे, तथापि त्यांना जास्त प्रदान केले गेले आहे ते आपली आजिविका, आपल्या अधीन असलेल्या दासां (नोकरा) ना देत नाहीत की ते आणि हे त्यात सम समान होतील. काय हे लोक अल्लाहच्या उपकारांचा इन्कार करीत आहेत
Surah An-Nahl, Verse 71
وَٱللَّهُ جَعَلَ لَكُم مِّنۡ أَنفُسِكُمۡ أَزۡوَٰجٗا وَجَعَلَ لَكُم مِّنۡ أَزۡوَٰجِكُم بَنِينَ وَحَفَدَةٗ وَرَزَقَكُم مِّنَ ٱلطَّيِّبَٰتِۚ أَفَبِٱلۡبَٰطِلِ يُؤۡمِنُونَ وَبِنِعۡمَتِ ٱللَّهِ هُمۡ يَكۡفُرُونَ
७२. आणि अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्यामधूनच तुमच्या पत्न्या निर्माण केल्या आणि तुमच्या पत्न्यांपासून तुमचे पुत्र आणि नातू निर्माण केले आणि तुम्हाला उत्तमोत्तम वस्तू खायला दिल्या, तर काय, असे असतानाही लोक असत्यावर ईमान राखतील? आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या कृपा देणग्यांशी कृतघ्नता दाखवतील
Surah An-Nahl, Verse 72
وَيَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَمۡلِكُ لَهُمۡ رِزۡقٗا مِّنَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ شَيۡـٔٗا وَلَا يَسۡتَطِيعُونَ
७३. आणि ते अल्लाहशिवाय त्यांची उपासना करतात, जे आकाशांमधून आणि जमिनीतून त्यांना किंचितही रोजी देऊ शकत नाही आणि कसलेही सामर्थ्य बाळगत नाही
Surah An-Nahl, Verse 73
فَلَا تَضۡرِبُواْ لِلَّهِ ٱلۡأَمۡثَالَۚ إِنَّ ٱللَّهَ يَعۡلَمُ وَأَنتُمۡ لَا تَعۡلَمُونَ
७४. तेव्हा, सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता उदाहरण बनवू नका, अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो आणि तुम्ही नाही जाणत
Surah An-Nahl, Verse 74
۞ضَرَبَ ٱللَّهُ مَثَلًا عَبۡدٗا مَّمۡلُوكٗا لَّا يَقۡدِرُ عَلَىٰ شَيۡءٖ وَمَن رَّزَقۡنَٰهُ مِنَّا رِزۡقًا حَسَنٗا فَهُوَ يُنفِقُ مِنۡهُ سِرّٗا وَجَهۡرًاۖ هَلۡ يَسۡتَوُۥنَۚ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِۚ بَلۡ أَكۡثَرُهُمۡ لَا يَعۡلَمُونَ
७५. अल्लाह एक उदाहरण सांगत आहे की एक गुलाम आहे दुसऱ्याच्या मालकीचा, जो कसलाही अधिकार राखत नाही आणि एक दुसरा मनुष्य आहे, ज्याला आम्ही आपल्या जवळून फार उत्तम धन देऊन ठेवले आहे. ज्यातून तो लपवून आणि उघडपणे खर्च करतो, काय हे दोन्ही जण समान ठरू शकतात? अल्लाहकरिताच समस्त स्तुती- प्रशंसा आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जाणत नाहीत
Surah An-Nahl, Verse 75
وَضَرَبَ ٱللَّهُ مَثَلٗا رَّجُلَيۡنِ أَحَدُهُمَآ أَبۡكَمُ لَا يَقۡدِرُ عَلَىٰ شَيۡءٖ وَهُوَ كَلٌّ عَلَىٰ مَوۡلَىٰهُ أَيۡنَمَا يُوَجِّههُّ لَا يَأۡتِ بِخَيۡرٍ هَلۡ يَسۡتَوِي هُوَ وَمَن يَأۡمُرُ بِٱلۡعَدۡلِ وَهُوَ عَلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ
७६. आणि अल्लाह एक दुसरे उदाहरण सांगतो दोन माणसांचे, ज्यांच्यापैकी एक मुका आहे आणि कोणत्याही गोष्टीचा अधिकार बाळगत नाही, किंबहुना तो आपल्या मालकावर ओझे आहे, मालक त्याला कोठेही पाठविल पण तो कसलाही भलेपणा आणत नाही. काय हा आणि तो, जो न्यायाचा आदेश देतो आणि सरळ मार्गावरही चालतो, समान असू शकतात
Surah An-Nahl, Verse 76
وَلِلَّهِ غَيۡبُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَمَآ أَمۡرُ ٱلسَّاعَةِ إِلَّا كَلَمۡحِ ٱلۡبَصَرِ أَوۡ هُوَ أَقۡرَبُۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٞ
७७. आणि आकाशांच्या व धरतीच्या (सर्व) लपलेल्या वस्तूंचे ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे, आणि कयामतची बाब देखील अशीच आहे, जणू पापणीचे झपकणे, किंबहुना याहूनही अधिक जवळ. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य राखतो
Surah An-Nahl, Verse 77
وَٱللَّهُ أَخۡرَجَكُم مِّنۢ بُطُونِ أُمَّهَٰتِكُمۡ لَا تَعۡلَمُونَ شَيۡـٔٗا وَجَعَلَ لَكُمُ ٱلسَّمۡعَ وَٱلۡأَبۡصَٰرَ وَٱلۡأَفۡـِٔدَةَ لَعَلَّكُمۡ تَشۡكُرُونَ
७८. आणि अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरातून बाहेर काढले की त्या वेळी तुम्ही काहीच जाणत नव्हते. त्यानेच तुमचे कान आणि डोळे आणि हृदय बनविले, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकावे
Surah An-Nahl, Verse 78
أَلَمۡ يَرَوۡاْ إِلَى ٱلطَّيۡرِ مُسَخَّرَٰتٖ فِي جَوِّ ٱلسَّمَآءِ مَا يُمۡسِكُهُنَّ إِلَّا ٱللَّهُۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّقَوۡمٖ يُؤۡمِنُونَ
७९. काय त्या लोकांनी पक्ष्यांना नाही पाहिले, जे आदेशआनुसार आकाशात नियंत्रित आहेत, ज्यांना अल्लाहखेरीज दुसऱ्या कुणी धरून ठेवले नाही. निःसंशय, यात ईमान राखणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत
Surah An-Nahl, Verse 79
وَٱللَّهُ جَعَلَ لَكُم مِّنۢ بُيُوتِكُمۡ سَكَنٗا وَجَعَلَ لَكُم مِّن جُلُودِ ٱلۡأَنۡعَٰمِ بُيُوتٗا تَسۡتَخِفُّونَهَا يَوۡمَ ظَعۡنِكُمۡ وَيَوۡمَ إِقَامَتِكُمۡ وَمِنۡ أَصۡوَافِهَا وَأَوۡبَارِهَا وَأَشۡعَارِهَآ أَثَٰثٗا وَمَتَٰعًا إِلَىٰ حِينٖ
८०. आणि अल्लाहने तुमच्यासाठी तुमच्या घरांमध्ये निवासाचे स्थान बनविले आहे आणि त्यानेच तुमच्यासाठी जनावरांच्या कातडीची घरे (तंबू) बनविले, जी तुम्हाला हलकी दिसून येतात, आपल्या प्रस्थानाच्या दिवशी आणि आपल्या पडाव टाकण्याच्या दिवशीही आणि त्यांची लोकर, लव (रोये) आणि केसांपासूनही त्याने अनेकविध वस्तू आणि एका निर्धारीत वेळेपर्यंत लाभदायक वस्तू आणि बनविल्या
Surah An-Nahl, Verse 80
وَٱللَّهُ جَعَلَ لَكُم مِّمَّا خَلَقَ ظِلَٰلٗا وَجَعَلَ لَكُم مِّنَ ٱلۡجِبَالِ أَكۡنَٰنٗا وَجَعَلَ لَكُمۡ سَرَٰبِيلَ تَقِيكُمُ ٱلۡحَرَّ وَسَرَٰبِيلَ تَقِيكُم بَأۡسَكُمۡۚ كَذَٰلِكَ يُتِمُّ نِعۡمَتَهُۥ عَلَيۡكُمۡ لَعَلَّكُمۡ تُسۡلِمُونَ
८१. आणि अल्लाहनेच तुमच्यासाठी आपल्या निर्माण केलेल्या वस्तूंमधून सावली बनविली आहे, आणि त्यानेच तुमच्यासाठी पर्वतांमध्ये गुहा बनविली आणि त्यानेच तुमच्यासाठी कपडे बनविले आहेत, जे तुम्हाला उष्णतेपासून सुरक्षित राखतील आणि अशी चिलखते देखील जी तुम्हाला युद्ध-प्रसंगी उपयोगी पडतील. तो अशा प्रकारे आपली कृपा देणगी पुरेपूर प्रदान करीत आहे, यासाठी की तुम्ही त्याचे आज्ञधारक व्हावे
Surah An-Nahl, Verse 81
فَإِن تَوَلَّوۡاْ فَإِنَّمَا عَلَيۡكَ ٱلۡبَلَٰغُ ٱلۡمُبِينُ
८२. तरीही जर हे तोंड फिरवूनच राहतील तर तुमची जबाबदारी केवळ साफ आणि स्पष्टपणे पोहचवून देणे एवढीच आहे
Surah An-Nahl, Verse 82
يَعۡرِفُونَ نِعۡمَتَ ٱللَّهِ ثُمَّ يُنكِرُونَهَا وَأَكۡثَرُهُمُ ٱلۡكَٰفِرُونَ
८३. अल्लाहच्या कृपा देणगींना हे जाणत व ओळखत असतानाही त्यांच्या इन्कार करीत आहेत, किंबहुना त्यांच्यातले बहुतेक जण तर कृतघ्न आहेत
Surah An-Nahl, Verse 83
وَيَوۡمَ نَبۡعَثُ مِن كُلِّ أُمَّةٖ شَهِيدٗا ثُمَّ لَا يُؤۡذَنُ لِلَّذِينَ كَفَرُواْ وَلَا هُمۡ يُسۡتَعۡتَبُونَ
८४. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहातून साक्षी उभा करू, मग इन्कारी लोकांना ना अनुमती दिली जाईल आणि ना त्यांना क्षमा-याचना करण्यास सांगितले जाईल
Surah An-Nahl, Verse 84
وَإِذَا رَءَا ٱلَّذِينَ ظَلَمُواْ ٱلۡعَذَابَ فَلَا يُخَفَّفُ عَنۡهُمۡ وَلَا هُمۡ يُنظَرُونَ
८५. आणि जेव्हा हे अत्याचारी लोक अज़ाब (शिक्षा-यातना) पाहून घेतील, मग ना तो त्याच्यावरून सौम्य केला जाईल आणि ना त्यांना ढील (सवड) दिली जाईल
Surah An-Nahl, Verse 85
وَإِذَا رَءَا ٱلَّذِينَ أَشۡرَكُواْ شُرَكَآءَهُمۡ قَالُواْ رَبَّنَا هَـٰٓؤُلَآءِ شُرَكَآؤُنَا ٱلَّذِينَ كُنَّا نَدۡعُواْ مِن دُونِكَۖ فَأَلۡقَوۡاْ إِلَيۡهِمُ ٱلۡقَوۡلَ إِنَّكُمۡ لَكَٰذِبُونَ
८६. आणि जेव्हा अल्लाहचा सहभागी ठरविणारे आपल्या सहभागींना पाहतील तेव्हा म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! हेच ते आमचे सहभागी, ज्यांना आम्ही तुला सोडून पुकारत असू, मग ते त्यांना उत्तर देतील की तुम्ही पूर्णतः खोटारडे आहात
Surah An-Nahl, Verse 86
وَأَلۡقَوۡاْ إِلَى ٱللَّهِ يَوۡمَئِذٍ ٱلسَّلَمَۖ وَضَلَّ عَنۡهُم مَّا كَانُواْ يَفۡتَرُونَ
८७. आणि त्या दिवशी ते सर्व (लाचार होऊन) अल्लाहसमोर आज्ञाधारक होणे मान्य करतील आणि यापूर्वी, ज्या खोट्या गोष्टी ते रचत होते, त्या सर्व त्यांच्यापासून हरवतील
Surah An-Nahl, Verse 87
ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَصَدُّواْ عَن سَبِيلِ ٱللَّهِ زِدۡنَٰهُمۡ عَذَابٗا فَوۡقَ ٱلۡعَذَابِ بِمَا كَانُواْ يُفۡسِدُونَ
८८. ज्या लोकांनी इन्कार केला आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखले, आम्ही त्यांना अज़ाबवर अज़ाब वाढवित जाऊ. हा मोबदला असेल त्यांच्या उपद्रवकारितेचा
Surah An-Nahl, Verse 88
وَيَوۡمَ نَبۡعَثُ فِي كُلِّ أُمَّةٖ شَهِيدًا عَلَيۡهِم مِّنۡ أَنفُسِهِمۡۖ وَجِئۡنَا بِكَ شَهِيدًا عَلَىٰ هَـٰٓؤُلَآءِۚ وَنَزَّلۡنَا عَلَيۡكَ ٱلۡكِتَٰبَ تِبۡيَٰنٗا لِّكُلِّ شَيۡءٖ وَهُدٗى وَرَحۡمَةٗ وَبُشۡرَىٰ لِلۡمُسۡلِمِينَ
८९. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहात त्यांच्यातूनच त्यांच्यावर साक्ष देणारा बनवून आणू आणि आम्ही तुमच्यावर हा ग्रंथ अवतरित केला आहे ज्यात प्रत्येक गोष्टीचे स्पष्ट वर्णन आहे आणि मुसलमानांकरिता मार्गदर्शन, दया आणि खूशखबर आहे
Surah An-Nahl, Verse 89
۞إِنَّ ٱللَّهَ يَأۡمُرُ بِٱلۡعَدۡلِ وَٱلۡإِحۡسَٰنِ وَإِيتَآيِٕ ذِي ٱلۡقُرۡبَىٰ وَيَنۡهَىٰ عَنِ ٱلۡفَحۡشَآءِ وَٱلۡمُنكَرِ وَٱلۡبَغۡيِۚ يَعِظُكُمۡ لَعَلَّكُمۡ تَذَكَّرُونَ
९०. निःसंशय, अल्लाह न्यायाचा, भलेपणाचा आणि जवळच्या नातेवाईकांशी चांगले वर्तन करण्याचा आदेश देतो, आणि निर्लज्जतेच्या कामांपासून आणि वाईट गोष्टींपासून आणि अत्याचारापासून रोखतो. तो स्वतः तुम्हाला उपदेश करीत आहे, यासाठी की तुम्ही बोध प्राप्त करावा
Surah An-Nahl, Verse 90
وَأَوۡفُواْ بِعَهۡدِ ٱللَّهِ إِذَا عَٰهَدتُّمۡ وَلَا تَنقُضُواْ ٱلۡأَيۡمَٰنَ بَعۡدَ تَوۡكِيدِهَا وَقَدۡ جَعَلۡتُمُ ٱللَّهَ عَلَيۡكُمۡ كَفِيلًاۚ إِنَّ ٱللَّهَ يَعۡلَمُ مَا تَفۡعَلُونَ
९१. आणि अल्लाहशी केलेला वायदा पूर्ण करा, जेव्हा तुम्ही आपसात वायदे आणि वचन-करार कराल आणि शपथांना, त्यांच्या मजबूतीनंतर तोडू नका, ज्याअर्थी तुम्ही अल्लाहला आपला जामीन ठरवून घेतले आहे. निःसंशय, तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
Surah An-Nahl, Verse 91
وَلَا تَكُونُواْ كَٱلَّتِي نَقَضَتۡ غَزۡلَهَا مِنۢ بَعۡدِ قُوَّةٍ أَنكَٰثٗا تَتَّخِذُونَ أَيۡمَٰنَكُمۡ دَخَلَۢا بَيۡنَكُمۡ أَن تَكُونَ أُمَّةٌ هِيَ أَرۡبَىٰ مِنۡ أُمَّةٍۚ إِنَّمَا يَبۡلُوكُمُ ٱللَّهُ بِهِۦۚ وَلَيُبَيِّنَنَّ لَكُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ مَا كُنتُمۡ فِيهِ تَخۡتَلِفُونَ
९२. आणि त्या (स्त्री) सारखे होऊ नका, जिने आपले सूत मजबूत कातल्यानंतर तुकडे तुकडे करून टाकले की तुम्ही आपल्या शपथांना आपसात छळ-कपटाचे निमित्त बनवावे, यासाठी की एक गट दुसऱ्या गटापेक्षा उच्च ठरावा. खरी गोष्ट हीच की या वायद्याद्वारे अल्लाह तुमची परीक्षा घेत आहे. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्यासाठी कयामतच्या दिवशी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला स्पष्ट करून सांगेल, जिच्याबाबत तुम्ही मतभेद करीत होते
Surah An-Nahl, Verse 92
وَلَوۡ شَآءَ ٱللَّهُ لَجَعَلَكُمۡ أُمَّةٗ وَٰحِدَةٗ وَلَٰكِن يُضِلُّ مَن يَشَآءُ وَيَهۡدِي مَن يَشَآءُۚ وَلَتُسۡـَٔلُنَّ عَمَّا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ
९३. आणि अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकाच मताचे बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो, आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. निःसंशय, तुम्ही जे काही करीत आहात, त्याबाबत विचारणा केली जाणार आहे
Surah An-Nahl, Verse 93
وَلَا تَتَّخِذُوٓاْ أَيۡمَٰنَكُمۡ دَخَلَۢا بَيۡنَكُمۡ فَتَزِلَّ قَدَمُۢ بَعۡدَ ثُبُوتِهَا وَتَذُوقُواْ ٱلسُّوٓءَ بِمَا صَدَدتُّمۡ عَن سَبِيلِ ٱللَّهِ وَلَكُمۡ عَذَابٌ عَظِيمٞ
९४. आणि तुम्ही आपल्या शपथांना आपसातील वैर-द्वेषाचे साधन बनवू नका, अन्यथा तुमची पावले आपल्या मजबुती (स्थिरते) नंतर डळमळू लागतील आणि तुम्हाला सक्त शिक्षा-यातना चाखावी लागेल, कारण की तुम्ही अल्लाहच्या मार्गापासून रोखले आणि तुम्हाला जास्त कठोर शिक्षा-यातना होईल
Surah An-Nahl, Verse 94
وَلَا تَشۡتَرُواْ بِعَهۡدِ ٱللَّهِ ثَمَنٗا قَلِيلًاۚ إِنَّمَا عِندَ ٱللَّهِ هُوَ خَيۡرٞ لَّكُمۡ إِن كُنتُمۡ تَعۡلَمُونَ
९५. आणि तुम्ही अल्लाहच्या वायद्यास थोड्याशा किंमतीवर विकत जाऊ नका. लक्षात ठेवा, अल्लाहच्या जवळची वस्तूच तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल
Surah An-Nahl, Verse 95
مَا عِندَكُمۡ يَنفَدُ وَمَا عِندَ ٱللَّهِ بَاقٖۗ وَلَنَجۡزِيَنَّ ٱلَّذِينَ صَبَرُوٓاْ أَجۡرَهُم بِأَحۡسَنِ مَا كَانُواْ يَعۡمَلُونَ
९६. तुमच्याजवळ जे काही आहे, ते सर्व नाश पावणारे आहे आणि अल्लाहजवळ जे काही आहे नेहमी राहणारे आहे आणि सबुरी राखणाऱ्यांना आम्ही चांगल्या कर्माचा चांगला मोबदला अवश्य प्रदान करू
Surah An-Nahl, Verse 96
مَنۡ عَمِلَ صَٰلِحٗا مِّن ذَكَرٍ أَوۡ أُنثَىٰ وَهُوَ مُؤۡمِنٞ فَلَنُحۡيِيَنَّهُۥ حَيَوٰةٗ طَيِّبَةٗۖ وَلَنَجۡزِيَنَّهُمۡ أَجۡرَهُم بِأَحۡسَنِ مَا كَانُواْ يَعۡمَلُونَ
९७. जो मनुष्य सत्कर्म करील, पुरुष असो किंवा स्त्री, आणि ईमान राखणाराही असेल, तर आम्ही त्याला निःसंशय उत्तम जीवन प्रदान करू आणि त्यांच्या नेकीच्या कर्मांचा उत्तम मोबदलाही त्यांना अवश्य प्रदान करू
Surah An-Nahl, Verse 97
فَإِذَا قَرَأۡتَ ٱلۡقُرۡءَانَ فَٱسۡتَعِذۡ بِٱللَّهِ مِنَ ٱلشَّيۡطَٰنِ ٱلرَّجِيمِ
९८. कुरआन पठण करताना, धिःक्कारलेल्या सैतानापासून अल्लाहचे शरण मागत जा
Surah An-Nahl, Verse 98
إِنَّهُۥ لَيۡسَ لَهُۥ سُلۡطَٰنٌ عَلَى ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَلَىٰ رَبِّهِمۡ يَتَوَكَّلُونَ
९९. (निश्चितच) त्याचा जोर अशा लोकांवर कधीही चालत नाही, जे ईमान राखतात, आणि आपल्या पालनकर्त्यावर भरोसा ठेवतात
Surah An-Nahl, Verse 99
إِنَّمَا سُلۡطَٰنُهُۥ عَلَى ٱلَّذِينَ يَتَوَلَّوۡنَهُۥ وَٱلَّذِينَ هُم بِهِۦ مُشۡرِكُونَ
१००. मात्र, अशा लोकांवर त्याचा प्रभाव जरूर आहे, जे त्याच्याशी मैत्री ठेवतात आणि त्याला अल्लाहचा भागीदार बनवितात
Surah An-Nahl, Verse 100
وَإِذَا بَدَّلۡنَآ ءَايَةٗ مَّكَانَ ءَايَةٖ وَٱللَّهُ أَعۡلَمُ بِمَا يُنَزِّلُ قَالُوٓاْ إِنَّمَآ أَنتَ مُفۡتَرِۭۚ بَلۡ أَكۡثَرُهُمۡ لَا يَعۡلَمُونَ
१०१. आणि जेव्हा आम्ही एखाद्या आयतीच्या जागी दुसरी आयत बदलतो आणि जे काही अल्लाह अवतरित करतो, ते तो चांगल्या प्रकारे जाणतो तेव्हा ते म्हणतात की तुम्ही तर हे स्वतः रचून आणता, वास्तविक त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणतच नाहीत
Surah An-Nahl, Verse 101
قُلۡ نَزَّلَهُۥ رُوحُ ٱلۡقُدُسِ مِن رَّبِّكَ بِٱلۡحَقِّ لِيُثَبِّتَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَهُدٗى وَبُشۡرَىٰ لِلۡمُسۡلِمِينَ
१०२. तुम्ही सांगा की त्यास तुमच्या पालनकर्त्यातर्फे जिब्रील सत्यासह घेऊन आले आहेत, यासाठी की ईमान राखणाऱ्यांना अल्लाहने स्थैर्य प्रदान करावे आणि मुसलमानांकरिता मार्गदर्शन आणि खूशखबर ठरावी
Surah An-Nahl, Verse 102
وَلَقَدۡ نَعۡلَمُ أَنَّهُمۡ يَقُولُونَ إِنَّمَا يُعَلِّمُهُۥ بَشَرٞۗ لِّسَانُ ٱلَّذِي يُلۡحِدُونَ إِلَيۡهِ أَعۡجَمِيّٞ وَهَٰذَا لِسَانٌ عَرَبِيّٞ مُّبِينٌ
१०३. आणि आम्हाला चांगले माहीत आहे, जे इन्कारी म्हणतात की त्यांना तर एक माणूस शिकवितो ज्या माणसाकडे यांचा इशारा आहे तो तर ग़ैरअरबी (अजमी) आहे आणि हा कुरआन तर स्पष्ट अरबी भाषेत आहे
Surah An-Nahl, Verse 103
إِنَّ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِـَٔايَٰتِ ٱللَّهِ لَا يَهۡدِيهِمُ ٱللَّهُ وَلَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٌ
१०४. जे लोक अल्लाहच्या आयतींवर ईमान राखत नाही, त्यांना अल्लाहतर्फेही मार्गदर्शन लाभत नाही आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब आहे
Surah An-Nahl, Verse 104
إِنَّمَا يَفۡتَرِي ٱلۡكَذِبَ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِـَٔايَٰتِ ٱللَّهِۖ وَأُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلۡكَٰذِبُونَ
१०५. खोटा आरोप तर तेच ठेवतात, ज्यांचे अल्लाहच्या आयतींवर ईमान नसते आणि हेच लोक खोटे आहेत
Surah An-Nahl, Verse 105
مَن كَفَرَ بِٱللَّهِ مِنۢ بَعۡدِ إِيمَٰنِهِۦٓ إِلَّا مَنۡ أُكۡرِهَ وَقَلۡبُهُۥ مُطۡمَئِنُّۢ بِٱلۡإِيمَٰنِ وَلَٰكِن مَّن شَرَحَ بِٱلۡكُفۡرِ صَدۡرٗا فَعَلَيۡهِمۡ غَضَبٞ مِّنَ ٱللَّهِ وَلَهُمۡ عَذَابٌ عَظِيمٞ
१०६. जो मनुष्य आपल्या ईमानानंतर अल्लाहशी इन्कार करील, त्याच्याखेरीज, ज्याला तसे करण्यास भाग पाडले जावे आणि त्याचे मन मात्र ईमानावर कायम असावे, परंतु जे लोक अगदी मोकळ्या मनाने कुप्र (इन्कार) करतील तर अशा लोकांवर अल्लाहचा प्रकोप आहे आणि अशाच लोकांसाठी भयंकर शिक्षा यातना आहे
Surah An-Nahl, Verse 106
ذَٰلِكَ بِأَنَّهُمُ ٱسۡتَحَبُّواْ ٱلۡحَيَوٰةَ ٱلدُّنۡيَا عَلَى ٱلۡأٓخِرَةِ وَأَنَّ ٱللَّهَ لَا يَهۡدِي ٱلۡقَوۡمَ ٱلۡكَٰفِرِينَ
१०७. हे अशासाठी की त्यांनी ऐहिक जीवनाला मरणोत्तर जीवनापेक्षा अधिक चांगले समजून घेतले. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह इन्कार करणाऱ्या लोकांना मार्ग दाखवित नाही
Surah An-Nahl, Verse 107
أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ طَبَعَ ٱللَّهُ عَلَىٰ قُلُوبِهِمۡ وَسَمۡعِهِمۡ وَأَبۡصَٰرِهِمۡۖ وَأُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلۡغَٰفِلُونَ
१०८. हे असे लोक होते, ज्यांच्या हृदयांवर आणि ज्यांच्या कानांवर आणि डोळ्यांवर अल्लाहने मोहर लावली आहे आणि हेच लोक गाफील आहेत
Surah An-Nahl, Verse 108
لَا جَرَمَ أَنَّهُمۡ فِي ٱلۡأٓخِرَةِ هُمُ ٱلۡخَٰسِرُونَ
१०९. निःसंशय, हेच लोक आखिरत (मरणोत्तर जीवना) मध्ये फार मोठे नुकसान उचलणार आहेत
Surah An-Nahl, Verse 109
ثُمَّ إِنَّ رَبَّكَ لِلَّذِينَ هَاجَرُواْ مِنۢ بَعۡدِ مَا فُتِنُواْ ثُمَّ جَٰهَدُواْ وَصَبَرُوٓاْ إِنَّ رَبَّكَ مِنۢ بَعۡدِهَا لَغَفُورٞ رَّحِيمٞ
११०. मग ज्या लोकांनी कसोटीत टाकले गेल्यानंतर (धार्मिक कारणांनी) देशत्याग केला, मग जिहाद केला आणि धीर-संयम दाखविला, निःसंशय, तुमचा पालनकर्ता, या गोष्टीनंतर त्यांना माफ करणारा आणि दया करणारा आहे
Surah An-Nahl, Verse 110
۞يَوۡمَ تَأۡتِي كُلُّ نَفۡسٖ تُجَٰدِلُ عَن نَّفۡسِهَا وَتُوَفَّىٰ كُلُّ نَفۡسٖ مَّا عَمِلَتۡ وَهُمۡ لَا يُظۡلَمُونَ
१११. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्य स्वतःसाठी वादविवाद घालत येईल आणि प्रत्येकाला त्याच्या कृत कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जाईल आणि लोकांवर किंचितही अत्याचार केला जाणार नाही
Surah An-Nahl, Verse 111
وَضَرَبَ ٱللَّهُ مَثَلٗا قَرۡيَةٗ كَانَتۡ ءَامِنَةٗ مُّطۡمَئِنَّةٗ يَأۡتِيهَا رِزۡقُهَا رَغَدٗا مِّن كُلِّ مَكَانٖ فَكَفَرَتۡ بِأَنۡعُمِ ٱللَّهِ فَأَذَٰقَهَا ٱللَّهُ لِبَاسَ ٱلۡجُوعِ وَٱلۡخَوۡفِ بِمَا كَانُواْ يَصۡنَعُونَ
११२. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या वस्तीचे उदाहरण सादर करतो, जी सुख-शांतीपूर्वक होती. तिची रोजी (आजिविवका) तिच्याजवळ सुसंपन्नतेसह सर्व मार्गांनी चालून येत होती, मग त्या वस्तीने अल्लाहच्या कृपा देणग्यांचा इन्कार केला, तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने तिला भूक आणि भयाचा स्वाद चाखविला. हा मोबदला होता त्यांच्या वाईट कर्मांचा
Surah An-Nahl, Verse 112
وَلَقَدۡ جَآءَهُمۡ رَسُولٞ مِّنۡهُمۡ فَكَذَّبُوهُ فَأَخَذَهُمُ ٱلۡعَذَابُ وَهُمۡ ظَٰلِمُونَ
११३. आणि त्यांच्याजवळ, त्यांच्यामधूनच पैगंबर येऊन पोहोचला, तरीही त्यांनी त्याला खोटे ठरविले, तेव्हा अज़ाब (शिक्षा-यातना) ने त्यांना येऊन धरले आणि ते होतेच अत्याचारी
Surah An-Nahl, Verse 113
فَكُلُواْ مِمَّا رَزَقَكُمُ ٱللَّهُ حَلَٰلٗا طَيِّبٗا وَٱشۡكُرُواْ نِعۡمَتَ ٱللَّهِ إِن كُنتُمۡ إِيَّاهُ تَعۡبُدُونَ
११४. आणि जी काही हलाल (उचित) आणि पाक रोजी (आजिविका) अल्लाहने तुम्हाला देऊन ठेवली आहे, ती खा आणि अल्लाहच्या देणगी (नेमत) बद्दल कृतज्ञता व्यक्त करा, जर तुम्ही त्याचीच उपासना करत असाल
Surah An-Nahl, Verse 114
إِنَّمَا حَرَّمَ عَلَيۡكُمُ ٱلۡمَيۡتَةَ وَٱلدَّمَ وَلَحۡمَ ٱلۡخِنزِيرِ وَمَآ أُهِلَّ لِغَيۡرِ ٱللَّهِ بِهِۦۖ فَمَنِ ٱضۡطُرَّ غَيۡرَ بَاغٖ وَلَا عَادٖ فَإِنَّ ٱللَّهَ غَفُورٞ رَّحِيمٞ
११५. तुमच्याकरिता केवळ मेलेले आणि रक्त आणि डुकराचे मांस आणि ज्या वस्तूवर अल्लाहशिवाय दुसऱ्याचे नाव घेतले जाईल, हराम आहे. तरीही जर एखादा मनुष्य लाचार केला जावा आणि तो अत्याचारी नसावा आणि ना मर्यादेचे उल्लंघन करणारा असावा तर निःसंशय अल्लाह माफ करणारा आणि खूप दया करणारा आहे
Surah An-Nahl, Verse 115
وَلَا تَقُولُواْ لِمَا تَصِفُ أَلۡسِنَتُكُمُ ٱلۡكَذِبَ هَٰذَا حَلَٰلٞ وَهَٰذَا حَرَامٞ لِّتَفۡتَرُواْ عَلَى ٱللَّهِ ٱلۡكَذِبَۚ إِنَّ ٱلَّذِينَ يَفۡتَرُونَ عَلَى ٱللَّهِ ٱلۡكَذِبَ لَا يُفۡلِحُونَ
११६. आणि एखाद्या वस्तूला आपल्या तोंडाने खोटेच सांगत जाऊ नका की ही हलाल आहे आणि ही हराम आहे की (अशाने) अल्लाहवर खोटा आरोप लावाल. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहवर खोटा आरोप रचणारे सफलतेपासून वंचितच राहतात
Surah An-Nahl, Verse 116
مَتَٰعٞ قَلِيلٞ وَلَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٞ
११७. त्यांना फार कमी लाभ प्राप्त होतो आणि त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्ष-यातना) आहे
Surah An-Nahl, Verse 117
وَعَلَى ٱلَّذِينَ هَادُواْ حَرَّمۡنَا مَا قَصَصۡنَا عَلَيۡكَ مِن قَبۡلُۖ وَمَا ظَلَمۡنَٰهُمۡ وَلَٰكِن كَانُوٓاْ أَنفُسَهُمۡ يَظۡلِمُونَ
११८. आणि यहूदी लोकांवर आम्ही जे काही हराम केले होते, ते आम्ही यापूर्वीच तुम्हाला ऐकविले आहे. आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही किंबहुना ते स्वतःच आपल्या प्राणांवर जुलूम करीत राहिले
Surah An-Nahl, Verse 118
ثُمَّ إِنَّ رَبَّكَ لِلَّذِينَ عَمِلُواْ ٱلسُّوٓءَ بِجَهَٰلَةٖ ثُمَّ تَابُواْ مِنۢ بَعۡدِ ذَٰلِكَ وَأَصۡلَحُوٓاْ إِنَّ رَبَّكَ مِنۢ بَعۡدِهَا لَغَفُورٞ رَّحِيمٌ
११९. की जो कोणी अज्ञानाने वाईट कर्म करील, मग त्यानंतर तौबा (क्षमा-याचना) करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणाही करून घेईल तर मग तुमचा पालनकर्ता निश्चितच मोठा माफ करणारा आणि अतिशय दया करणारा आहे
Surah An-Nahl, Verse 119
إِنَّ إِبۡرَٰهِيمَ كَانَ أُمَّةٗ قَانِتٗا لِّلَّهِ حَنِيفٗا وَلَمۡ يَكُ مِنَ ٱلۡمُشۡرِكِينَ
१२०. निःसंशय, इब्राहीम (मुस्लिम जनसमूहाचे) प्रमुख आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे मोठे आज्ञाधारक, सगळीकडून अलग होऊन फक्त एक अल्लाहचे झाले होते आणि अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते
Surah An-Nahl, Verse 120
شَاكِرٗا لِّأَنۡعُمِهِۚ ٱجۡتَبَىٰهُ وَهَدَىٰهُ إِلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ
१२१. सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रदान केलेल्या कृपा देणग्यांबद्दल कृतज्ञशील होते. अल्लाहने त्यांना निवडून घेतले होते आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला होता
Surah An-Nahl, Verse 121
وَءَاتَيۡنَٰهُ فِي ٱلدُّنۡيَا حَسَنَةٗۖ وَإِنَّهُۥ فِي ٱلۡأٓخِرَةِ لَمِنَ ٱلصَّـٰلِحِينَ
१२२. आणि आम्ही त्यांना या जगातही भलाई प्रदान केली आणि निःसंशय आखिरतमध्येही ते नेक सदाचारी लोकांपैकी आहेत
Surah An-Nahl, Verse 122
ثُمَّ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ أَنِ ٱتَّبِعۡ مِلَّةَ إِبۡرَٰهِيمَ حَنِيفٗاۖ وَمَا كَانَ مِنَ ٱلۡمُشۡرِكِينَ
१२३. मग आम्ही तुमच्याकडे वहयी (प्रकाशना) पाठविली की तुम्ही इब्राहीमच्याच मार्गाचे अनुसरण करा, जे सर्वांपासून अलग होऊन एक अल्लाहचे झाले होते आणि ते अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांपैकी नव्हते
Surah An-Nahl, Verse 123
إِنَّمَا جُعِلَ ٱلسَّبۡتُ عَلَى ٱلَّذِينَ ٱخۡتَلَفُواْ فِيهِۚ وَإِنَّ رَبَّكَ لَيَحۡكُمُ بَيۡنَهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ فِيمَا كَانُواْ فِيهِ يَخۡتَلِفُونَ
१२४. शनिवारच्या दिवसाचे महत्त्व तर फक्त त्या लोकांकरिता अत्यावश्य ठरविले गेले होते, ज्यांनी त्यात मतभेद केला होता. वास्तविक तुमचा पालनकर्ता स्वतःच त्यांच्यात त्यांच्या मतभेदाचा फैसला कयामतच्या दिवशी करेल
Surah An-Nahl, Verse 124
ٱدۡعُ إِلَىٰ سَبِيلِ رَبِّكَ بِٱلۡحِكۡمَةِ وَٱلۡمَوۡعِظَةِ ٱلۡحَسَنَةِۖ وَجَٰدِلۡهُم بِٱلَّتِي هِيَ أَحۡسَنُۚ إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعۡلَمُ بِمَن ضَلَّ عَن سَبِيلِهِۦ وَهُوَ أَعۡلَمُ بِٱلۡمُهۡتَدِينَ
१२५. आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना हिकमतीने आणि उत्तम अशा शिकवणीसह बोलवा आणि त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोला. निःसंशय तुमचा पालनकर्ता, आपल्या मार्गापासून भटकलेल्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सन्मार्गावर चालणाऱ्यांनाही तो पूर्णतः जाणून आहे
Surah An-Nahl, Verse 125
وَإِنۡ عَاقَبۡتُمۡ فَعَاقِبُواْ بِمِثۡلِ مَا عُوقِبۡتُم بِهِۦۖ وَلَئِن صَبَرۡتُمۡ لَهُوَ خَيۡرٞ لِّلصَّـٰبِرِينَ
१२६. आणि (एखाद्याशी) सूड घ्यायचाच असेल तर अगदी तेवढाच घ्या जेवढे दुःख तुम्हाला पोहचविले गेले असेल आणि जर सबुरी राखाला तर निःसंशय सबुरी राखणाऱ्यांसाठी हेच उत्तम आहे
Surah An-Nahl, Verse 126
وَٱصۡبِرۡ وَمَا صَبۡرُكَ إِلَّا بِٱللَّهِۚ وَلَا تَحۡزَنۡ عَلَيۡهِمۡ وَلَا تَكُ فِي ضَيۡقٖ مِّمَّا يَمۡكُرُونَ
१२७. तुम्ही धीर-संयम राखा. अल्लाहच्या दयेविना तुम्ही धीर-संयम राखूच शकत नाही आणि त्यांच्या अवस्थेने दुःखी कष्टी होऊ नका आणि जो कावेबाजपणा हे करतात, त्यामुळे मन संकुचित करू नका
Surah An-Nahl, Verse 127
إِنَّ ٱللَّهَ مَعَ ٱلَّذِينَ ٱتَّقَواْ وَّٱلَّذِينَ هُم مُّحۡسِنُونَ
१२८. निःसंशय, जे लोक अल्लाहचे भय राखून, दुराचारापासून दूर राहतात आणि सत्कर्म करीत राहतात, अल्लाह त्यांच्या पाठीशी आहे
Surah An-Nahl, Verse 128