UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Al-Isra - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


سُبۡحَٰنَ ٱلَّذِيٓ أَسۡرَىٰ بِعَبۡدِهِۦ لَيۡلٗا مِّنَ ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ إِلَى ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡأَقۡصَا ٱلَّذِي بَٰرَكۡنَا حَوۡلَهُۥ لِنُرِيَهُۥ مِنۡ ءَايَٰتِنَآۚ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ

१. पवित्र आहे तो (अल्लाह), जो आपल्या दासाला एका रात्रीतून आदरणीय मस्जिदीपासून, अक्सा मस्जिदपर्यंत घेऊन गेला, जिच्या भोवती आम्ही बरकती प्रदान करून ठेवल्या आहेत. यासाठी की आम्ही त्याला आपल्या सामर्थ्याच्या काही मोठ्या निशाण्या दाखवून द्याव्यात. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाहच चांगल्या प्रकारे ऐकणारा, पाहणारा आहे
Surah Al-Isra, Verse 1


وَءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡكِتَٰبَ وَجَعَلۡنَٰهُ هُدٗى لِّبَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ أَلَّا تَتَّخِذُواْ مِن دُونِي وَكِيلٗا

२. आणि आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता मार्गदर्शक बनविले की तुम्ही माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही काम बनविणारा बनवू नका
Surah Al-Isra, Verse 2


ذُرِّيَّةَ مَنۡ حَمَلۡنَا مَعَ نُوحٍۚ إِنَّهُۥ كَانَ عَبۡدٗا شَكُورٗا

३. हे त्या लोकांपासून जन्मास आलेल्यांनो! ज्यांना आम्ही नूहच्या सोबत नौकेत चढविले होते. तो आमचा मोठा कृतज्ञशील दास होता
Surah Al-Isra, Verse 3


وَقَضَيۡنَآ إِلَىٰ بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ فِي ٱلۡكِتَٰبِ لَتُفۡسِدُنَّ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَّتَيۡنِ وَلَتَعۡلُنَّ عُلُوّٗا كَبِيرٗا

४. आणि आम्ही इस्राईलच्या संततीकरिता त्यांच्या ग्रंथात स्पष्टतः निर्णय दिला होता की तुम्ही धरतीवर दोन वेळा उपद्रव निर्माण कराल, आणि तुम्ही फार जास्त अत्याचार कराल
Surah Al-Isra, Verse 4


فَإِذَا جَآءَ وَعۡدُ أُولَىٰهُمَا بَعَثۡنَا عَلَيۡكُمۡ عِبَادٗا لَّنَآ أُوْلِي بَأۡسٖ شَدِيدٖ فَجَاسُواْ خِلَٰلَ ٱلدِّيَارِۚ وَكَانَ وَعۡدٗا مَّفۡعُولٗا

५. या दोन्ही वायद्यांपैकी पहिल्या वायद्याची वेळ येताच आम्ही तुमच्यासमोर आपल्या त्या दासांना उठवून उभे केले जे मोठे लढवय्ये होते, मग ते तुमच्या घरांमध्ये अगदी आतापर्यंत पसरले आणि अल्लाहचा वायदा पूर्ण होणारच होता
Surah Al-Isra, Verse 5


ثُمَّ رَدَدۡنَا لَكُمُ ٱلۡكَرَّةَ عَلَيۡهِمۡ وَأَمۡدَدۡنَٰكُم بِأَمۡوَٰلٖ وَبَنِينَ وَجَعَلۡنَٰكُمۡ أَكۡثَرَ نَفِيرًا

६. मग आम्ही तुम्हाला त्यांच्यावर वर्चस्व देऊन (तुमचे दिवस) पालटले आणि विपुल धन संपत्ती आणि संततीने तुमची मदत केली आणि तुमचे समूह बळ वाढविले
Surah Al-Isra, Verse 6


إِنۡ أَحۡسَنتُمۡ أَحۡسَنتُمۡ لِأَنفُسِكُمۡۖ وَإِنۡ أَسَأۡتُمۡ فَلَهَاۚ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ ٱلۡأٓخِرَةِ لِيَسُـُٔواْ وُجُوهَكُمۡ وَلِيَدۡخُلُواْ ٱلۡمَسۡجِدَ كَمَا دَخَلُوهُ أَوَّلَ مَرَّةٖ وَلِيُتَبِّرُواْ مَا عَلَوۡاْ تَتۡبِيرًا

७. जर तुम्ही सत्कर्म कराल तर स्वतः आपल्या फायद्याकरिता कराल आणि जर तुम्ही वाईट कर्मे कराल तर ते देखील स्वतःसाठीच. मग जेव्हा दुसऱ्या वायद्याची वेळ आली, तेव्हा (आम्ही दुसऱ्या दासांना पाठविले) यासाठी की त्यांनी तुमचा चेहरा बिघडवून टाकावा आणि पहिल्या खेपेप्रमाणे पुन्हा त्याच मस्जिदीत घुसावे आणि जी काही वस्तू ताब्यात येईल, तोडफोड करून मुळासकट उपटून टाकावी
Surah Al-Isra, Verse 7


عَسَىٰ رَبُّكُمۡ أَن يَرۡحَمَكُمۡۚ وَإِنۡ عُدتُّمۡ عُدۡنَاۚ وَجَعَلۡنَا جَهَنَّمَ لِلۡكَٰفِرِينَ حَصِيرًا

८. आशा आहे की तुमचा पालनकर्ता तुमच्यावर दया करील. परंतु जर तुम्ही पुन्हा तेच करू लागाल तर आम्ही देखील पुन्हा तसेच करू, आणि आम्ही इन्कार करणाऱ्यांसाठी जहन्नमला कैदखाना बनवून ठेवले आहे
Surah Al-Isra, Verse 8


إِنَّ هَٰذَا ٱلۡقُرۡءَانَ يَهۡدِي لِلَّتِي هِيَ أَقۡوَمُ وَيُبَشِّرُ ٱلۡمُؤۡمِنِينَ ٱلَّذِينَ يَعۡمَلُونَ ٱلصَّـٰلِحَٰتِ أَنَّ لَهُمۡ أَجۡرٗا كَبِيرٗا

९. निःसंशय, हा कुरआन तो मार्ग दाखवितो, जो सर्वांत सरळ आहे, आणि सत्कर्म करणाऱ्या ईमानधारकांना ही खूशखबर देतो की त्यांच्यासाठी अतिशय चांगला मोबदला (प्रतिफळ) आहे
Surah Al-Isra, Verse 9


وَأَنَّ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ أَعۡتَدۡنَا لَهُمۡ عَذَابًا أَلِيمٗا

१०. आणि ते लोक, जे आखिरतवर विश्वास राखत नाही, त्यांच्यासाठी आम्ही दुःखदायक अज़ाब तयार करून ठेवला आहे
Surah Al-Isra, Verse 10


وَيَدۡعُ ٱلۡإِنسَٰنُ بِٱلشَّرِّ دُعَآءَهُۥ بِٱلۡخَيۡرِۖ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ عَجُولٗا

११. आणि मनुष्य वाईट गोष्टींची दुआ प्रार्थना करू लागतो, अगदी त्याच्या स्वतःच्या भलाईच्या दुआ- प्रार्थनेसारखी, मनुष्य मोठा उतावळा आहे
Surah Al-Isra, Verse 11


وَجَعَلۡنَا ٱلَّيۡلَ وَٱلنَّهَارَ ءَايَتَيۡنِۖ فَمَحَوۡنَآ ءَايَةَ ٱلَّيۡلِ وَجَعَلۡنَآ ءَايَةَ ٱلنَّهَارِ مُبۡصِرَةٗ لِّتَبۡتَغُواْ فَضۡلٗا مِّن رَّبِّكُمۡ وَلِتَعۡلَمُواْ عَدَدَ ٱلسِّنِينَ وَٱلۡحِسَابَۚ وَكُلَّ شَيۡءٖ فَصَّلۡنَٰهُ تَفۡصِيلٗا

१२. आणि आम्ही रात्र आणि दिवसाला (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले आहे. रात्रीच्या निशाणीला आम्ही प्रकाशहीन (निस्तेज) केले आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान दाखविणारी बनविले आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेचा शोध घेऊ शकावे. आणि यासाठीही की वर्षाची गणना आणि हिशोब जाणू शकावे. आणि प्रत्येक विषयाचे आम्ही सविस्तर निवेदन केले आहे
Surah Al-Isra, Verse 12


وَكُلَّ إِنسَٰنٍ أَلۡزَمۡنَٰهُ طَـٰٓئِرَهُۥ فِي عُنُقِهِۦۖ وَنُخۡرِجُ لَهُۥ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ كِتَٰبٗا يَلۡقَىٰهُ مَنشُورًا

१३. आणि आम्ही माणसाचे चांगले-वाईट त्याच्या गळ्यात टाकले आहे, आणि कयामतच्या दिवशी आम्ही त्याचा कर्म-लेख बाहेर काढू, जो त्याला आपल्यावर खुला असलेला आढळेल
Surah Al-Isra, Verse 13


ٱقۡرَأۡ كِتَٰبَكَ كَفَىٰ بِنَفۡسِكَ ٱلۡيَوۡمَ عَلَيۡكَ حَسِيبٗا

१४. आता स्वतःच आपले कर्मपत्र वाचून घ्या. आज तर तू स्वतःच आपला फैसला करण्यास पुरेसा आहे
Surah Al-Isra, Verse 14


مَّنِ ٱهۡتَدَىٰ فَإِنَّمَا يَهۡتَدِي لِنَفۡسِهِۦۖ وَمَن ضَلَّ فَإِنَّمَا يَضِلُّ عَلَيۡهَاۚ وَلَا تَزِرُ وَازِرَةٞ وِزۡرَ أُخۡرَىٰۗ وَمَا كُنَّا مُعَذِّبِينَ حَتَّىٰ نَبۡعَثَ رَسُولٗا

१५. जो मनुष्य मार्गदर्शन प्राप्त करतो, तो स्वतः आपल्या भल्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करतो आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याचे ओझे त्याच्यावरच आहे. कोणीही ओझे बाळगणारा दुसऱ्या कुणाचे ओझे आपल्यावर लादून घेणार नाही आणि आमचा हा नियम नाही की पैगंबर पाठविण्यापूर्वीच अज़ाब (शिक्षा-यातना) पाठवावा
Surah Al-Isra, Verse 15


وَإِذَآ أَرَدۡنَآ أَن نُّهۡلِكَ قَرۡيَةً أَمَرۡنَا مُتۡرَفِيهَا فَفَسَقُواْ فِيهَا فَحَقَّ عَلَيۡهَا ٱلۡقَوۡلُ فَدَمَّرۡنَٰهَا تَدۡمِيرٗا

१६. आणि जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीचा सर्वनाश करण्याचा इरादा करून घेतो तेव्हा तिथल्या सुखवस्तू (सुसंपन्न) लोकांना काही आदेश देतो आणि ते त्या वस्तीत उघडपणे अवज्ञा करू लागतात, तेव्हा त्यांच्यावर (शिक्षा-यातनेचा) फैसला लागू होतो आणि मग आम्ही त्या वस्तीची उलथापालथ करून टाकतो
Surah Al-Isra, Verse 16


وَكَمۡ أَهۡلَكۡنَا مِنَ ٱلۡقُرُونِ مِنۢ بَعۡدِ نُوحٖۗ وَكَفَىٰ بِرَبِّكَ بِذُنُوبِ عِبَادِهِۦ خَبِيرَۢا بَصِيرٗا

१७. आणि आम्ही नूहनंतरही अनेक समुदाय नष्ट करून टाकले आणि तुमचा पालनकर्ता आपल्या दासांच्या अपराधांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे
Surah Al-Isra, Verse 17


مَّن كَانَ يُرِيدُ ٱلۡعَاجِلَةَ عَجَّلۡنَا لَهُۥ فِيهَا مَا نَشَآءُ لِمَن نُّرِيدُ ثُمَّ جَعَلۡنَا لَهُۥ جَهَنَّمَ يَصۡلَىٰهَا مَذۡمُومٗا مَّدۡحُورٗا

१८. ज्याची इच्छा फक्त या शीघ्रतापूर्ण जगापुरतीच असेल तर त्याला आम्ही इथे, जेवढे देऊ इच्छितो लवकर प्रदान करतो. शेवटी मात्र त्याच्यासाठी आम्ही जहन्नम निश्चित करतो, जिथे तो मोठ्या वाईट अवस्थेत, धिःक्कारला गेलेला दाखल होईल
Surah Al-Isra, Verse 18


وَمَنۡ أَرَادَ ٱلۡأٓخِرَةَ وَسَعَىٰ لَهَا سَعۡيَهَا وَهُوَ مُؤۡمِنٞ فَأُوْلَـٰٓئِكَ كَانَ سَعۡيُهُم مَّشۡكُورٗا

१९. आणि जो आखिरतची इच्छा बाळगेल, आणि त्यासाठी जसा प्रयत्न करायला हवा, तसा तो करतही असेल आणि तो ईमान राखणाराही असेल तर मग हेच ते लोक होत, ज्याच्या प्रयत्नाला अल्लाहच्या ठायी पुरेपूर सन्मान दिला जाईल
Surah Al-Isra, Verse 19


كُلّٗا نُّمِدُّ هَـٰٓؤُلَآءِ وَهَـٰٓؤُلَآءِ مِنۡ عَطَآءِ رَبِّكَۚ وَمَا كَانَ عَطَآءُ رَبِّكَ مَحۡظُورًا

२०. प्रत्येकाला आम्ही प्रदान करीत असतो यांनाही आणि त्यांनाही, तुमच्या पालनकर्त्याच्या देणग्यांमधून, आणि तुमच्या पालनकर्त्याचा अनुग्रह थांबलेला नाही
Surah Al-Isra, Verse 20


ٱنظُرۡ كَيۡفَ فَضَّلۡنَا بَعۡضَهُمۡ عَلَىٰ بَعۡضٖۚ وَلَلۡأٓخِرَةُ أَكۡبَرُ دَرَجَٰتٖ وَأَكۡبَرُ تَفۡضِيلٗا

२१. पाहा, त्यांच्यात एकाला एकावर कशा प्रकारे श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) तर दर्जाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आणि श्रेष्ठतेच्या दृष्टीनेही फारच उत्तम आहे
Surah Al-Isra, Verse 21


لَّا تَجۡعَلۡ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَ فَتَقۡعُدَ مَذۡمُومٗا مَّخۡذُولٗا

२२. अल्लाहसोबत दुसऱ्या कुणाला उपास्य बनवू नका की शेवटी तुम्ही अपमानित, असहाय्य होऊन बसाल
Surah Al-Isra, Verse 22


۞وَقَضَىٰ رَبُّكَ أَلَّا تَعۡبُدُوٓاْ إِلَّآ إِيَّاهُ وَبِٱلۡوَٰلِدَيۡنِ إِحۡسَٰنًاۚ إِمَّا يَبۡلُغَنَّ عِندَكَ ٱلۡكِبَرَ أَحَدُهُمَآ أَوۡ كِلَاهُمَا فَلَا تَقُل لَّهُمَآ أُفّٖ وَلَا تَنۡهَرۡهُمَا وَقُل لَّهُمَا قَوۡلٗا كَرِيمٗا

२३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नका आणि माता-पित्याशी सद्‌व्यवहार करा, जर तुमच्या उपस्थितीत (हयातीत) यांच्यापैकी एक किंवा हे दोघे वृद्धावस्थेस पोहोचतील तर त्यांना ‘अरे’ सुद्धा बोलू नका, त्यांना दाटवू नका, उलट त्यांच्याशी आदर-सन्मानाने बोलत जा
Surah Al-Isra, Verse 23


وَٱخۡفِضۡ لَهُمَا جَنَاحَ ٱلذُّلِّ مِنَ ٱلرَّحۡمَةِ وَقُل رَّبِّ ٱرۡحَمۡهُمَا كَمَا رَبَّيَانِي صَغِيرٗا

२४. आणि नरमी व प्रेमासह त्यांच्यासमोर विनम्रतापूर्वक हात पसरवून ठेवा१ आणि दुआ-प्रार्थना करीत राहा, हे माझ्या पालनकर्त्या! यांच्यावर अशीच दया कर जशी यांनी माझ्या बालपणात माझे पालनपोषण करण्यात केली आहे
Surah Al-Isra, Verse 24


رَّبُّكُمۡ أَعۡلَمُ بِمَا فِي نُفُوسِكُمۡۚ إِن تَكُونُواْ صَٰلِحِينَ فَإِنَّهُۥ كَانَ لِلۡأَوَّـٰبِينَ غَفُورٗا

२५. जे काही तुमच्या हृदयात आहे ते तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो. जर तुम्ही नेक सदाचारी असाल तर तो क्षमा-याचना करणाऱ्यांना माफ करणारा आहे
Surah Al-Isra, Verse 25


وَءَاتِ ذَا ٱلۡقُرۡبَىٰ حَقَّهُۥ وَٱلۡمِسۡكِينَ وَٱبۡنَ ٱلسَّبِيلِ وَلَا تُبَذِّرۡ تَبۡذِيرًا

२६. आणि नातेवाईकांचा, आणि दीन-दुबळ्यांचा आणि प्रवाशांचा हक्क अदा करीत राहा, आणि अपव्यय करण्यापासून दूर राहा
Surah Al-Isra, Verse 26


إِنَّ ٱلۡمُبَذِّرِينَ كَانُوٓاْ إِخۡوَٰنَ ٱلشَّيَٰطِينِۖ وَكَانَ ٱلشَّيۡطَٰنُ لِرَبِّهِۦ كَفُورٗا

२७. निश्चितच, अपव्यय (उधळपट्टी) करणारे सैतानाचे बांधव आहेत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे
Surah Al-Isra, Verse 27


وَإِمَّا تُعۡرِضَنَّ عَنۡهُمُ ٱبۡتِغَآءَ رَحۡمَةٖ مِّن رَّبِّكَ تَرۡجُوهَا فَقُل لَّهُمۡ قَوۡلٗا مَّيۡسُورٗا

२८. आणि आपल्या पालनकर्त्याच्या त्या दया-कृपेचा शोध घेण्यात, जिची तू आशा बाळगतो, जर तुला त्यांच्यापासून तोंड फिरवावे लागेल तर अशाही स्थितीत तू त्यांना चांगल्या प्रकारे आणि नरमीने समजाविले पाहिजे
Surah Al-Isra, Verse 28


وَلَا تَجۡعَلۡ يَدَكَ مَغۡلُولَةً إِلَىٰ عُنُقِكَ وَلَا تَبۡسُطۡهَا كُلَّ ٱلۡبَسۡطِ فَتَقۡعُدَ مَلُومٗا مَّحۡسُورًا

२९. आणि आपला हात आपल्या गळ्याशी बांधून ठेवू नका आणि ना तो पूर्णपणे मोकळा सोडा, मग धिःक्कारलेला आणि पश्चात्तापित होऊन बसावे
Surah Al-Isra, Verse 29


إِنَّ رَبَّكَ يَبۡسُطُ ٱلرِّزۡقَ لِمَن يَشَآءُ وَيَقۡدِرُۚ إِنَّهُۥ كَانَ بِعِبَادِهِۦ خَبِيرَۢا بَصِيرٗا

३०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता, ज्याला इच्छितो रोजी (आजिविका) विस्तृत करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो संकुचित (तंग) करतो. निःसंशय, तो आपल्या दासांची पुरेपूर खबर राखतो आणि खूप चांगल्या प्रकारे पाहणारा आहे
Surah Al-Isra, Verse 30


وَلَا تَقۡتُلُوٓاْ أَوۡلَٰدَكُمۡ خَشۡيَةَ إِمۡلَٰقٖۖ نَّحۡنُ نَرۡزُقُهُمۡ وَإِيَّاكُمۡۚ إِنَّ قَتۡلَهُمۡ كَانَ خِطۡـٔٗا كَبِيرٗا

३१. आणि दारिद्य्राच्या भयाने आपल्या संततीला मारून टाकू नका. त्यांना आणि तुम्हाला आम्हीच रोजी (आजिविका) प्रदान करतो. निःसंशय, त्यांची हत्या करणे फार मोठा अपराध आहे
Surah Al-Isra, Verse 31


وَلَا تَقۡرَبُواْ ٱلزِّنَىٰٓۖ إِنَّهُۥ كَانَ فَٰحِشَةٗ وَسَآءَ سَبِيلٗا

३२. आणि खबरदार! व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका, कारण ती मोठी निर्लज्जता आहे, आणि अतिशय वाईट मार्ग आहे
Surah Al-Isra, Verse 32


وَلَا تَقۡتُلُواْ ٱلنَّفۡسَ ٱلَّتِي حَرَّمَ ٱللَّهُ إِلَّا بِٱلۡحَقِّۗ وَمَن قُتِلَ مَظۡلُومٗا فَقَدۡ جَعَلۡنَا لِوَلِيِّهِۦ سُلۡطَٰنٗا فَلَا يُسۡرِف فِّي ٱلۡقَتۡلِۖ إِنَّهُۥ كَانَ مَنصُورٗا

३३. आणि एखाद्या जीवाला, ज्याला मारणे अल्लाहने हराम केले आहे, कधीही अवैधरित्या मारू नका (त्याची हत्या करू नका) आणि जो मनुष्य निरपराध अवस्थेत ठार मारला जाईल तर आम्ही त्याच्या वारसाला हक्क देऊन ठेवला आहे. परंतु त्याने (प्रतिशोध म्हणून) ठार मारण्यात घाई करू नये. निःसंशय त्याची मदत केली गेली आहे
Surah Al-Isra, Verse 33


وَلَا تَقۡرَبُواْ مَالَ ٱلۡيَتِيمِ إِلَّا بِٱلَّتِي هِيَ أَحۡسَنُ حَتَّىٰ يَبۡلُغَ أَشُدَّهُۥۚ وَأَوۡفُواْ بِٱلۡعَهۡدِۖ إِنَّ ٱلۡعَهۡدَ كَانَ مَسۡـُٔولٗا

३४. आणि अनाथाच्या धन-संपत्तीच्या जवळही जाऊ नका, त्या पद्धतीशिवाय, जी अधिक चांगली असे, येथपर्यंत की ते आपल्या सज्ञान होण्याच्या वयास पोहचावेत आणि वायदा पूर्ण करीत जा कारण की वायद्याविषयी विचारणा होईल
Surah Al-Isra, Verse 34


وَأَوۡفُواْ ٱلۡكَيۡلَ إِذَا كِلۡتُمۡ وَزِنُواْ بِٱلۡقِسۡطَاسِ ٱلۡمُسۡتَقِيمِۚ ذَٰلِكَ خَيۡرٞ وَأَحۡسَنُ تَأۡوِيلٗا

३५. आणि जेव्हा मापून द्याल तेव्हा पूर्ण माप भरून द्या आणि सरळ तराजूने तोलून द्या. हेच चांगले आहे आणि याचा परिणामही फार चांगला आहे
Surah Al-Isra, Verse 35


وَلَا تَقۡفُ مَا لَيۡسَ لَكَ بِهِۦ عِلۡمٌۚ إِنَّ ٱلسَّمۡعَ وَٱلۡبَصَرَ وَٱلۡفُؤَادَ كُلُّ أُوْلَـٰٓئِكَ كَانَ عَنۡهُ مَسۡـُٔولٗا

३६. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला खबरही नसेल, अशा गोष्टीच्या मागे लागू नका, कारण कान आणि डोळे आणि हृदय यांच्यापैकी प्रत्येकाला विचारणा केली जाणार आहे
Surah Al-Isra, Verse 36


وَلَا تَمۡشِ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَحًاۖ إِنَّكَ لَن تَخۡرِقَ ٱلۡأَرۡضَ وَلَن تَبۡلُغَ ٱلۡجِبَالَ طُولٗا

३७. आणि जमिनीवर मोठ्या दिमाखाने व गर्वाने चालू नका, कारण (अशाने) ना तुम्ही जमिनीला फाडू शकता आणि ना पर्वतांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकता
Surah Al-Isra, Verse 37


كُلُّ ذَٰلِكَ كَانَ سَيِّئُهُۥ عِندَ رَبِّكَ مَكۡرُوهٗا

३८. या सर्व कामांचा वाईटपणा तुमच्या पालनकर्त्याजवळ अतिशय अप्रिय आहे
Surah Al-Isra, Verse 38


ذَٰلِكَ مِمَّآ أَوۡحَىٰٓ إِلَيۡكَ رَبُّكَ مِنَ ٱلۡحِكۡمَةِۗ وَلَا تَجۡعَلۡ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَ فَتُلۡقَىٰ فِي جَهَنَّمَ مَلُومٗا مَّدۡحُورًا

३९. हे देखील त्या वहयी (प्रकाशना) पैकी आहे, जिला तुमच्या पालनकर्त्याने तुमच्याकडे हिकमतीने उतरविले आहे, यास्तव अल्लाहसोबत दुसऱ्या कोणत्याही उपास्य बनवू नका अन्यथा धिःक्कार करून आणि अपमानित करून जहन्नममध्ये टाकले जाल
Surah Al-Isra, Verse 39


أَفَأَصۡفَىٰكُمۡ رَبُّكُم بِٱلۡبَنِينَ وَٱتَّخَذَ مِنَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةِ إِنَٰثًاۚ إِنَّكُمۡ لَتَقُولُونَ قَوۡلًا عَظِيمٗا

४०. काय पुत्रांकरिता अल्लाहने तुम्हाला निवडून घेतले आहे आणि स्वतः आपल्याकरिता फरिश्त्यांना मुली बनवून घेतले? खात्रीने तुम्ही फार मोठे बोल बोलत आहात
Surah Al-Isra, Verse 40


وَلَقَدۡ صَرَّفۡنَا فِي هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ لِيَذَّكَّرُواْ وَمَا يَزِيدُهُمۡ إِلَّا نُفُورٗا

४१. आणि आम्ही तर या कुरआनात सर्व प्रकारे सांगितले आहे की लोकांच्या ध्यानी यावे, परंतु यावरही त्यांचा तिरस्कारच वाढतो
Surah Al-Isra, Verse 41


قُل لَّوۡ كَانَ مَعَهُۥٓ ءَالِهَةٞ كَمَا يَقُولُونَ إِذٗا لَّٱبۡتَغَوۡاْ إِلَىٰ ذِي ٱلۡعَرۡشِ سَبِيلٗا

४२. तुम्ही सांगा, जर अल्लाहसोबत आणखी दुसरे उपास्य असते, जसे की हे लोक सांगतात, तर अवश्य त्यांनी आतापर्यंत अर्शच्या स्वामीकडे मार्ग शोधला असता
Surah Al-Isra, Verse 42


سُبۡحَٰنَهُۥ وَتَعَٰلَىٰ عَمَّا يَقُولُونَ عُلُوّٗا كَبِيرٗا

४३. जे काही हे सांगतात, त्याहून तो पवित्र आणि महान, अतिशय दूर, आणि अतिशय उच्चतम आहे
Surah Al-Isra, Verse 43


تُسَبِّحُ لَهُ ٱلسَّمَٰوَٰتُ ٱلسَّبۡعُ وَٱلۡأَرۡضُ وَمَن فِيهِنَّۚ وَإِن مِّن شَيۡءٍ إِلَّا يُسَبِّحُ بِحَمۡدِهِۦ وَلَٰكِن لَّا تَفۡقَهُونَ تَسۡبِيحَهُمۡۚ إِنَّهُۥ كَانَ حَلِيمًا غَفُورٗا

४४. सप्त आकाश आणि धरती, आणि जे काही त्यांच्यात आहे, सर्व त्याचेच स्तुति-गान करतात. अशी एकही वस्तू नाही, जी पवित्रता आणि महानतेसह त्याचे स्मरण करीत नसेल. मात्र हे खरे आहे की तुम्ही तिचे महिमागान समजू शकत नाही. निःसंशय अल्लाह मोठा सहनशील आणि माफ करणारा आहे
Surah Al-Isra, Verse 44


وَإِذَا قَرَأۡتَ ٱلۡقُرۡءَانَ جَعَلۡنَا بَيۡنَكَ وَبَيۡنَ ٱلَّذِينَ لَا يُؤۡمِنُونَ بِٱلۡأٓخِرَةِ حِجَابٗا مَّسۡتُورٗا

४५. आणि जेव्हा तुम्ही कुरआन पठण करता, तेव्हा आम्ही तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान, जे आखिरतवर विश्वास ठेवत नाही, एक गुप्त पडदा टाकतो
Surah Al-Isra, Verse 45


وَجَعَلۡنَا عَلَىٰ قُلُوبِهِمۡ أَكِنَّةً أَن يَفۡقَهُوهُ وَفِيٓ ءَاذَانِهِمۡ وَقۡرٗاۚ وَإِذَا ذَكَرۡتَ رَبَّكَ فِي ٱلۡقُرۡءَانِ وَحۡدَهُۥ وَلَّوۡاْ عَلَىٰٓ أَدۡبَٰرِهِمۡ نُفُورٗا

४६. आणि त्यांच्या हृदयांवर पडदे टाकले आहेत की त्यांनी त्याला समजावे आणि त्यांच्या कानात बधीरता आणि जेव्हा तुम्ही केवळ अल्लाहचेच वर्णन त्याच्या एकमेवतेसह या कुरआनात करता तेव्हा ते तोंड फिरवून पळ काढतात
Surah Al-Isra, Verse 46


نَّحۡنُ أَعۡلَمُ بِمَا يَسۡتَمِعُونَ بِهِۦٓ إِذۡ يَسۡتَمِعُونَ إِلَيۡكَ وَإِذۡ هُمۡ نَجۡوَىٰٓ إِذۡ يَقُولُ ٱلظَّـٰلِمُونَ إِن تَتَّبِعُونَ إِلَّا رَجُلٗا مَّسۡحُورًا

४७. ज्या हेतुने ते कुरआन ऐकतात, त्यांचे इरादे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जेव्हा हे तुमच्याकडे कान लावून असतात. तेव्हा देखील, आणि जेव्हा हे सल्लामसलत करतात तेव्हाही वास्तविक हे अत्याचारी लोक म्हणतात की तुम्ही अशा व्यक्तीचे अनुसरण करण्यात मग्न आहात, ज्याच्यावर जादूटोणा केला गेला आहे
Surah Al-Isra, Verse 47


ٱنظُرۡ كَيۡفَ ضَرَبُواْ لَكَ ٱلۡأَمۡثَالَ فَضَلُّواْ فَلَا يَسۡتَطِيعُونَ سَبِيلٗا

४८. जरा पहा तरी तुमच्या साठी ते कस कशी उदाहरणे देतात यास्तव ते चुकीच्या मार्गाकडे जात आहेत आता तर सरळ मार्ग प्राप्त करणे त्यांना शक्य नाही
Surah Al-Isra, Verse 48


وَقَالُوٓاْ أَءِذَا كُنَّا عِظَٰمٗا وَرُفَٰتًا أَءِنَّا لَمَبۡعُوثُونَ خَلۡقٗا جَدِيدٗا

४९. ते म्हणाले, काय जेव्हा आम्ही हाडे आणि धूळ माती होऊन जाऊ तर काय आम्ही नव्याने जन्मास येऊन दुसऱ्यांदा उठवून उभे केले जाऊ
Surah Al-Isra, Verse 49


۞قُلۡ كُونُواْ حِجَارَةً أَوۡ حَدِيدًا

५०. उत्तर द्या की तुम्ही दगड बना किंवा लोखंड
Surah Al-Isra, Verse 50


أَوۡ خَلۡقٗا مِّمَّا يَكۡبُرُ فِي صُدُورِكُمۡۚ فَسَيَقُولُونَ مَن يُعِيدُنَاۖ قُلِ ٱلَّذِي فَطَرَكُمۡ أَوَّلَ مَرَّةٖۚ فَسَيُنۡغِضُونَ إِلَيۡكَ رُءُوسَهُمۡ وَيَقُولُونَ مَتَىٰ هُوَۖ قُلۡ عَسَىٰٓ أَن يَكُونَ قَرِيبٗا

५१. किंवा एखादी अशी वस्तू, जी तुमच्या मनात अतिशय महान वाटत असेल. मग त्यांनी विचारावे की असा कोण आहे, जो दुसऱ्यांदा आमचे जीवन परत करेल? तुम्ही उत्तर द्या की तोच (अल्लाह) ज्याने तुम्हाला पहिल्या खेपेस निर्माण केले. यावर ते आपले डोके हलवून तुम्हाला विचारतील की, बरे हे केव्हा घडून येईल? तर तुम्ही उत्तर द्या की नवल नव्हे की ते लवकरच घडून येईल
Surah Al-Isra, Verse 51


يَوۡمَ يَدۡعُوكُمۡ فَتَسۡتَجِيبُونَ بِحَمۡدِهِۦ وَتَظُنُّونَ إِن لَّبِثۡتُمۡ إِلَّا قَلِيلٗا

५२. ज्या दिवशी तो तुम्हाला बोलावील, तुम्ही त्याची प्रशंसा करत आज्ञापालन कराल आणि अनुमान लावाल की तुम्ही फार कमी काळ राहिलात
Surah Al-Isra, Verse 52


وَقُل لِّعِبَادِي يَقُولُواْ ٱلَّتِي هِيَ أَحۡسَنُۚ إِنَّ ٱلشَّيۡطَٰنَ يَنزَغُ بَيۡنَهُمۡۚ إِنَّ ٱلشَّيۡطَٰنَ كَانَ لِلۡإِنسَٰنِ عَدُوّٗا مُّبِينٗا

५३. आणि माझ्या दासांना सांगा की त्यांनी फार उत्तम गोष्ट आपल्या मुखातून काढत जावी, कारण सैतान आपसात फूट पाडतो. निश्चितच सैतान माणसाचा उघड शत्रू आहे
Surah Al-Isra, Verse 53


رَّبُّكُمۡ أَعۡلَمُ بِكُمۡۖ إِن يَشَأۡ يَرۡحَمۡكُمۡ أَوۡ إِن يَشَأۡ يُعَذِّبۡكُمۡۚ وَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ عَلَيۡهِمۡ وَكِيلٗا

५४. तुमचा पालनकर्ता तुमची अवस्था तुमच्यापेक्षा अधिक जाणणारा आहे. तो जर इच्छिल तर तुमच्यावर दया करेल, इच्छिल तर तुम्हाला शिक्षा देईल. आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही
Surah Al-Isra, Verse 54


وَرَبُّكَ أَعۡلَمُ بِمَن فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۗ وَلَقَدۡ فَضَّلۡنَا بَعۡضَ ٱلنَّبِيِّـۧنَ عَلَىٰ بَعۡضٖۖ وَءَاتَيۡنَا دَاوُۥدَ زَبُورٗا

५५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, ते सर्व तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो, आम्ही काही पैगंबरांना काहींवर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि दाऊदला जबूर आम्हीच प्रदान केले
Surah Al-Isra, Verse 55


قُلِ ٱدۡعُواْ ٱلَّذِينَ زَعَمۡتُم مِّن دُونِهِۦ فَلَا يَمۡلِكُونَ كَشۡفَ ٱلضُّرِّ عَنكُمۡ وَلَا تَحۡوِيلًا

५६. तुम्ही सांगा, (अल्लाह) शिवाय ज्यांना तुम्ही (उपास्य) समजत आहात, त्यांना दुआ-प्रार्थना करा, परंतु ते ना तुमचे एखादे दुःख दूर करू शकतात आणि ना बदलू शकतात.१
Surah Al-Isra, Verse 56


أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ يَدۡعُونَ يَبۡتَغُونَ إِلَىٰ رَبِّهِمُ ٱلۡوَسِيلَةَ أَيُّهُمۡ أَقۡرَبُ وَيَرۡجُونَ رَحۡمَتَهُۥ وَيَخَافُونَ عَذَابَهُۥٓۚ إِنَّ عَذَابَ رَبِّكَ كَانَ مَحۡذُورٗا

५७. ज्यांना हे लोक दुआ प्रार्थना करतात, ते स्वतः आपल्या पालनकर्त्याची निकटता शोधत असतात की त्यांच्यापैकी कोण अधिक निकट होईल, ते तर स्वतः त्याच्या दया-कृपेची आशा बाळगतात आणि त्याच्या शिक्षा-यातनेपासून भयभीत राहतात. निःसंशय तुमच्या पालनकर्त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) भय राखण्याची गोष्ट आहे
Surah Al-Isra, Verse 57


وَإِن مِّن قَرۡيَةٍ إِلَّا نَحۡنُ مُهۡلِكُوهَا قَبۡلَ يَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ أَوۡ مُعَذِّبُوهَا عَذَابٗا شَدِيدٗاۚ كَانَ ذَٰلِكَ فِي ٱلۡكِتَٰبِ مَسۡطُورٗا

५८. आणि जेवढ्या देखील वस्त्या आहेत, आम्ही त्यांना कयामतचा दिवस येण्यापूर्वी एकतर उद्‌ध्वस्त करून टाकू किंवा अतिशय सक्त शिक्षा देऊ. हे तर ग्रंथात लिहिले गेले आहे
Surah Al-Isra, Verse 58


وَمَا مَنَعَنَآ أَن نُّرۡسِلَ بِٱلۡأٓيَٰتِ إِلَّآ أَن كَذَّبَ بِهَا ٱلۡأَوَّلُونَۚ وَءَاتَيۡنَا ثَمُودَ ٱلنَّاقَةَ مُبۡصِرَةٗ فَظَلَمُواْ بِهَاۚ وَمَا نُرۡسِلُ بِٱلۡأٓيَٰتِ إِلَّا تَخۡوِيفٗا

५९. आणि आम्हाला निशाण्या (चमत्कार) उतरविण्यापासून अडसर केवळ याच गोष्टीचा आहे की पूर्वीच्या लोकांनी या निशाण्यांना खोटे ठरविले आहे. आम्ही समूदला चमत्काराच्या स्वरूपात सांडणी दिली परंतु त्यांनी तिच्यावर अत्याचार केला आम्ही तर लोकांना केवळ धाक दाखविण्याकरिता निशाण्या पाठवितो
Surah Al-Isra, Verse 59


وَإِذۡ قُلۡنَا لَكَ إِنَّ رَبَّكَ أَحَاطَ بِٱلنَّاسِۚ وَمَا جَعَلۡنَا ٱلرُّءۡيَا ٱلَّتِيٓ أَرَيۡنَٰكَ إِلَّا فِتۡنَةٗ لِّلنَّاسِ وَٱلشَّجَرَةَ ٱلۡمَلۡعُونَةَ فِي ٱلۡقُرۡءَانِۚ وَنُخَوِّفُهُمۡ فَمَا يَزِيدُهُمۡ إِلَّا طُغۡيَٰنٗا كَبِيرٗا

६०. आणि स्मरण करा, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले की तुमच्या पालनकर्त्याने लोकांना घेरले आहे. आम्ही जे तुम्हाला दाखविले होते, ती लोकांकरिता स्पष्ट परीक्षाच होती आणि त्याचप्रमाणे ते झाड देखील ज्याविषयी कुरआनात तिरस्कार व्यक्त केला गेला आहे. आम्ही त्यांना सचेत करीत आहोत, परंतु अशाने त्यांचे वैर आणखी जास्त वाढत जात आहे
Surah Al-Isra, Verse 60


وَإِذۡ قُلۡنَا لِلۡمَلَـٰٓئِكَةِ ٱسۡجُدُواْ لِأٓدَمَ فَسَجَدُوٓاْ إِلَّآ إِبۡلِيسَ قَالَ ءَأَسۡجُدُ لِمَنۡ خَلَقۡتَ طِينٗا

६१. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमला सजदा करा, तेव्हा इब्लिसखेरीज सर्वांनी सजदा केला. तो म्हणाला, काय मी त्याला सजदा करू, ज्याला तू मातीपासून बनविले आहे
Surah Al-Isra, Verse 61


قَالَ أَرَءَيۡتَكَ هَٰذَا ٱلَّذِي كَرَّمۡتَ عَلَيَّ لَئِنۡ أَخَّرۡتَنِ إِلَىٰ يَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ لَأَحۡتَنِكَنَّ ذُرِّيَّتَهُۥٓ إِلَّا قَلِيلٗا

६२. ठीक आहे, पण पाहा तू त्याला माझ्यावर श्रेष्ठता तर प्रदान केली आहे, परंतु जर तू मला कयामतपर्यंत संधी देशील तर मी याच्या संततीला, फार कमी लोकांशिवाय आपल्या काबूत करेन
Surah Al-Isra, Verse 62


قَالَ ٱذۡهَبۡ فَمَن تَبِعَكَ مِنۡهُمۡ فَإِنَّ جَهَنَّمَ جَزَآؤُكُمۡ جَزَآءٗ مَّوۡفُورٗا

६३. (अल्लाहने) आदेश दिला, जा, त्यांच्यापैकी जो कोणी तुझा अनुयायी होईल तर तुम्हा सर्वांची शिक्षा जहन्नम आहे, जो पुरेपूर मोबदला आहे
Surah Al-Isra, Verse 63


وَٱسۡتَفۡزِزۡ مَنِ ٱسۡتَطَعۡتَ مِنۡهُم بِصَوۡتِكَ وَأَجۡلِبۡ عَلَيۡهِم بِخَيۡلِكَ وَرَجِلِكَ وَشَارِكۡهُمۡ فِي ٱلۡأَمۡوَٰلِ وَٱلۡأَوۡلَٰدِ وَعِدۡهُمۡۚ وَمَا يَعِدُهُمُ ٱلشَّيۡطَٰنُ إِلَّا غُرُورًا

६४. त्यांच्यापैकी तू ज्याला देखील आपल्या बोलण्याने बहकवू शकशील बहकव आणि त्यांच्यावर आपले स्वार आणि प्यादे चढवून आण, आणि त्यांच्या धन आणि संततीमधून आपलाही हिस्सा लाव, आणि त्यांना (खोटे) वचन दे. त्यांच्याशी जेवढी देखील वचने (वायदे) सैतानाचे असतात, सर्वच्या सर्व पूर्ण दगाबाजी आहे
Surah Al-Isra, Verse 64


إِنَّ عِبَادِي لَيۡسَ لَكَ عَلَيۡهِمۡ سُلۡطَٰنٞۚ وَكَفَىٰ بِرَبِّكَ وَكِيلٗا

६५. माझ्या सच्चा दासांवर तुझा कोणताही प्रभाव आणि काबू नाही आणि तुमचा पालनकर्ता मोठा काम बनविणारा पुरेसा आहे
Surah Al-Isra, Verse 65


رَّبُّكُمُ ٱلَّذِي يُزۡجِي لَكُمُ ٱلۡفُلۡكَ فِي ٱلۡبَحۡرِ لِتَبۡتَغُواْ مِن فَضۡلِهِۦٓۚ إِنَّهُۥ كَانَ بِكُمۡ رَحِيمٗا

६६. तुमचा पालनकर्ता तो आहे, जो तुमच्यासाठी नदीत नावा चालवितो, यासाठी की तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा. निःसंशय तो तुमच्यावर मोठा दया करणारा आहे
Surah Al-Isra, Verse 66


وَإِذَا مَسَّكُمُ ٱلضُّرُّ فِي ٱلۡبَحۡرِ ضَلَّ مَن تَدۡعُونَ إِلَّآ إِيَّاهُۖ فَلَمَّا نَجَّىٰكُمۡ إِلَى ٱلۡبَرِّ أَعۡرَضۡتُمۡۚ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ كَفُورًا

६७. आणि समुद्रात संकट कोसळताच, ज्यांना तुम्ही दुआ-प्रार्थना करीत होते, ते सर्व विसरतात, केवळ तोच (अल्लाह) बाकी राहतो, मग जेव्हा तो तुम्हाला खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा तुम्ही तोंड फिरवून घेता. मनुष्य मोठा कृतघ्न आहे
Surah Al-Isra, Verse 67


أَفَأَمِنتُمۡ أَن يَخۡسِفَ بِكُمۡ جَانِبَ ٱلۡبَرِّ أَوۡ يُرۡسِلَ عَلَيۡكُمۡ حَاصِبٗا ثُمَّ لَا تَجِدُواْ لَكُمۡ وَكِيلًا

६८. तर काय तुम्ही या गोष्टीपासून निर्धास्त झालात की तुम्हाला खुश्कीच्या एखाद्या भूभागात (नेऊन जमिनीत) धसवून टाकावे किंवा तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे भयंकर वादळ पाठवावे, मग स्वतःसाठी तुम्हाला कोणी मित्र व सहाय्यकर्ता आढळणार नाही
Surah Al-Isra, Verse 68


أَمۡ أَمِنتُمۡ أَن يُعِيدَكُمۡ فِيهِ تَارَةً أُخۡرَىٰ فَيُرۡسِلَ عَلَيۡكُمۡ قَاصِفٗا مِّنَ ٱلرِّيحِ فَيُغۡرِقَكُم بِمَا كَفَرۡتُمۡ ثُمَّ لَا تَجِدُواْ لَكُمۡ عَلَيۡنَا بِهِۦ تَبِيعٗا

६९. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की (अल्लाहने) दुसऱ्यांदा तुम्हाला नदीच्या प्रवासात आणावे आणि तुमच्यावर वेगवान वादळवारे पाठवावेत आणि तुमच्या इन्कारापायी तुम्हाला बुडवावे, मग तुम्हाला स्वतःकरिता, आमच्यावर त्याचा दावा (पाठलाग) करणारा कोणीही आढळणार नाही
Surah Al-Isra, Verse 69


۞وَلَقَدۡ كَرَّمۡنَا بَنِيٓ ءَادَمَ وَحَمَلۡنَٰهُمۡ فِي ٱلۡبَرِّ وَٱلۡبَحۡرِ وَرَزَقۡنَٰهُم مِّنَ ٱلطَّيِّبَٰتِ وَفَضَّلۡنَٰهُمۡ عَلَىٰ كَثِيرٖ مِّمَّنۡ خَلَقۡنَا تَفۡضِيلٗا

७०. आणि निःसंशय, आम्ही आदमच्या संततीला मोठी प्रतिष्ठा दिली आणि त्यांना खुश्की आणि पाण्यावर चालणारी वाहने दिली आणि त्यांना पाक साफ वस्तूंपासून आजिविका (अन्न-सामुग्री) प्रदान केली आणि आपल्या बहुतेक निर्मितीवर त्यांना श्रेष्ठता प्रदान केली
Surah Al-Isra, Verse 70


يَوۡمَ نَدۡعُواْ كُلَّ أُنَاسِۭ بِإِمَٰمِهِمۡۖ فَمَنۡ أُوتِيَ كِتَٰبَهُۥ بِيَمِينِهِۦ فَأُوْلَـٰٓئِكَ يَقۡرَءُونَ كِتَٰبَهُمۡ وَلَا يُظۡلَمُونَ فَتِيلٗا

७१. ज्या दिवशी आम्ही प्रत्येक उम्मत (समुदाया) ला त्याच्या पेशव्यांसह बोलावू, मग ज्यांना त्यांचा कर्मलेख उजव्या हातात दिला जाईल ते मोठ्या आनंदाने आपला कर्मलेख वाचू लागतील आणि धाग्याइतका (तीळमात्र) ही अत्याचार त्यांच्यावर केला जाणार नाही
Surah Al-Isra, Verse 71


وَمَن كَانَ فِي هَٰذِهِۦٓ أَعۡمَىٰ فَهُوَ فِي ٱلۡأٓخِرَةِ أَعۡمَىٰ وَأَضَلُّ سَبِيلٗا

७२. आणि जो कोणी या जगात आंधळा राहिला तो आखिरतमध्येही आंधळा आणि सरळ मार्गापासून दूर भटकलेला राहील
Surah Al-Isra, Verse 72


وَإِن كَادُواْ لَيَفۡتِنُونَكَ عَنِ ٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ لِتَفۡتَرِيَ عَلَيۡنَا غَيۡرَهُۥۖ وَإِذٗا لَّٱتَّخَذُوكَ خَلِيلٗا

७३. आणि हे लोक तुम्हाला त्या वहयी (प्रकाशना) पासून, जी आम्ही तुमच्यावर अवतरित केली आहे, हटवू इच्छित होते की तुम्ही तिच्याखेरीज काही इतर गोष्टी आमच्या नावाने रचून घ्याव्यात, मग तर यांनी तुम्हाला आपला दोस्त बनविले असते
Surah Al-Isra, Verse 73


وَلَوۡلَآ أَن ثَبَّتۡنَٰكَ لَقَدۡ كِدتَّ تَرۡكَنُ إِلَيۡهِمۡ شَيۡـٔٗا قَلِيلًا

७४. आणि जर आम्ही तुम्हाला अटळ राखले नसते तर फार शक्य होते की तुम्ही त्यांच्याकडे काही न काही (प्रमाणात) झुकलेच असते
Surah Al-Isra, Verse 74


إِذٗا لَّأَذَقۡنَٰكَ ضِعۡفَ ٱلۡحَيَوٰةِ وَضِعۡفَ ٱلۡمَمَاتِ ثُمَّ لَا تَجِدُ لَكَ عَلَيۡنَا نَصِيرٗا

७५. मग तर आम्हीही तुम्हाला या जगात दुहेरी सजा दिली असती. आणि दुहेरी मृत्युचीही, या स्थितीत तुम्हाला स्वतःसाठी आमच्या विरोधात कोणताही मदत करणारा आढळला नसता
Surah Al-Isra, Verse 75


وَإِن كَادُواْ لَيَسۡتَفِزُّونَكَ مِنَ ٱلۡأَرۡضِ لِيُخۡرِجُوكَ مِنۡهَاۖ وَإِذٗا لَّا يَلۡبَثُونَ خِلَٰفَكَ إِلَّا قَلِيلٗا

७६. आणि हे तर तुमचे पाय या भूमीतून डगमगविण्याच्या तयारीला लागलेच होते की तुम्हाला देशाबाहेर घालवावे, मग हे सुद्धा तुमच्यानंतर फार कमी काळ राहू शकले असते
Surah Al-Isra, Verse 76


سُنَّةَ مَن قَدۡ أَرۡسَلۡنَا قَبۡلَكَ مِن رُّسُلِنَاۖ وَلَا تَجِدُ لِسُنَّتِنَا تَحۡوِيلًا

७७. असाच नियम त्यांचा होता, जे तुमच्यापूर्वी पैगंबर आम्ही पाठविले, आणि तुम्हाला आमच्या नियमांमध्ये कधीही बदल दिसून येणार नाही
Surah Al-Isra, Verse 77


أَقِمِ ٱلصَّلَوٰةَ لِدُلُوكِ ٱلشَّمۡسِ إِلَىٰ غَسَقِ ٱلَّيۡلِ وَقُرۡءَانَ ٱلۡفَجۡرِۖ إِنَّ قُرۡءَانَ ٱلۡفَجۡرِ كَانَ مَشۡهُودٗا

७८. सूर्यास्तापासून रात्रीचा अंधार होईपर्यंत नमाज कायम राखा आणि प्रातःकाळी (फज्रच्या वेळी) कुरआनचे पठणही, निःसंशय प्रातःकाळी कुरआन पठण करणे हजर केले गेले आहे
Surah Al-Isra, Verse 78


وَمِنَ ٱلَّيۡلِ فَتَهَجَّدۡ بِهِۦ نَافِلَةٗ لَّكَ عَسَىٰٓ أَن يَبۡعَثَكَ رَبُّكَ مَقَامٗا مَّحۡمُودٗا

७९. आणि रात्रीच्या काही भागात तहज्जूद (च्या नमाजमध्ये कुरआन) पढत जात. ही अधिकता तुमच्यासाठी आहे. लवकरच तुमचा पालनकर्ता तुम्हाला महमूद नावाच्या (प्रशंसापूर्ण) स्थानावर उभा करेल
Surah Al-Isra, Verse 79


وَقُل رَّبِّ أَدۡخِلۡنِي مُدۡخَلَ صِدۡقٖ وَأَخۡرِجۡنِي مُخۡرَجَ صِدۡقٖ وَٱجۡعَل لِّي مِن لَّدُنكَ سُلۡطَٰنٗا نَّصِيرٗا

८०. आणि दुआ-प्रार्थना करीत राहा की हे माझ्या पालनकर्त्या! मला जिथेही न्यायचे असेल, चांगल्या प्रकारे ने आणि जिथूनही बाहेर काढायचे असेल चांगल्या प्रकारे काढआणि माझ्यासाठी आपल्या जवळून वर्चस्व आणि मदत निश्चित कर
Surah Al-Isra, Verse 80


وَقُلۡ جَآءَ ٱلۡحَقُّ وَزَهَقَ ٱلۡبَٰطِلُۚ إِنَّ ٱلۡبَٰطِلَ كَانَ زَهُوقٗا

८१. आणि या गोष्टीचे ऐलान करा की, सत्य येऊन पोहोचले आणि असत्य मिटले. निःसंशय असत्य मिटण्याच्याच योग्य होते
Surah Al-Isra, Verse 81


وَنُنَزِّلُ مِنَ ٱلۡقُرۡءَانِ مَا هُوَ شِفَآءٞ وَرَحۡمَةٞ لِّلۡمُؤۡمِنِينَ وَلَا يَزِيدُ ٱلظَّـٰلِمِينَ إِلَّا خَسَارٗا

८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान राखणाऱ्यांसाठी रोगमुक्ती, स्वास्थ्य आणि दया-कृपा आहे, परंतु अत्याचारींसाठी नुकसानाशिवाय कसलीही वाढ होत नाही
Surah Al-Isra, Verse 82


وَإِذَآ أَنۡعَمۡنَا عَلَى ٱلۡإِنسَٰنِ أَعۡرَضَ وَنَـَٔا بِجَانِبِهِۦ وَإِذَا مَسَّهُ ٱلشَّرُّ كَانَ يَـُٔوسٗا

८३. आणि जेव्हा देखील माणसाला आम्ही आपली कृपा-देणगी प्रदान करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि कुशी बदलतो आणि जेव्हा देखील त्याला दुःख पोहोचते तेव्हा तो निराश होतो
Surah Al-Isra, Verse 83


قُلۡ كُلّٞ يَعۡمَلُ عَلَىٰ شَاكِلَتِهِۦ فَرَبُّكُمۡ أَعۡلَمُ بِمَنۡ هُوَ أَهۡدَىٰ سَبِيلٗا

८४. सांगा की प्रत्येक मनुष्य आपल्या पद्धतीनुसार कार्य करतो. जे पूर्णतः मार्गदर्शनावर आहेत, त्यांना तुमचा पालनकर्ताच चांगल्या प्रकारे जाणतो
Surah Al-Isra, Verse 84


وَيَسۡـَٔلُونَكَ عَنِ ٱلرُّوحِۖ قُلِ ٱلرُّوحُ مِنۡ أَمۡرِ رَبِّي وَمَآ أُوتِيتُم مِّنَ ٱلۡعِلۡمِ إِلَّا قَلِيلٗا

८५. आणि हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात. (तुम्ही त्यांना) उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या हुकूमाने आहे. आणि तुम्हाला जे ज्ञान दिले गेले आहे ते फारच कमी आहे.१
Surah Al-Isra, Verse 85


وَلَئِن شِئۡنَا لَنَذۡهَبَنَّ بِٱلَّذِيٓ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ ثُمَّ لَا تَجِدُ لَكَ بِهِۦ عَلَيۡنَا وَكِيلًا

८६. आणि जर आम्ही इच्छिले तर जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे आम्ही अवतरित केली आहे, सर्व परत घेऊ, मग तुम्हाला त्याच्यासाठी आमच्यासमोर कोणीही हिमायत करणारा लाभू शकणार नाही
Surah Al-Isra, Verse 86


إِلَّا رَحۡمَةٗ مِّن رَّبِّكَۚ إِنَّ فَضۡلَهُۥ كَانَ عَلَيۡكَ كَبِيرٗا

८७. तुमच्या पालनकर्त्याच्या दयेखेरीज. निःसंशय तुमच्यावर त्याची मोठी कृपा आहे
Surah Al-Isra, Verse 87


قُل لَّئِنِ ٱجۡتَمَعَتِ ٱلۡإِنسُ وَٱلۡجِنُّ عَلَىٰٓ أَن يَأۡتُواْ بِمِثۡلِ هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ لَا يَأۡتُونَ بِمِثۡلِهِۦ وَلَوۡ كَانَ بَعۡضُهُمۡ لِبَعۡضٖ ظَهِيرٗا

८८. सांगा की जर समस्त मानव आणि जिन्न मिळून या कुरआनासारखा (ग्रंथ) आणू इच्छितील तर त्या सर्वांच्याकडून याचे उदाहरण आणणे अशक्य आहे, मग ते आपसात एकमेकांचे सहाय्यक बनले तरीही
Surah Al-Isra, Verse 88


وَلَقَدۡ صَرَّفۡنَا لِلنَّاسِ فِي هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ مِن كُلِّ مَثَلٖ فَأَبَىٰٓ أَكۡثَرُ ٱلنَّاسِ إِلَّا كُفُورٗا

८९. आणि आम्ही तर या कुरआनात लोकांच्या समजण्याकरिता अशा प्रकारे सर्व उदाहरणे सांगितली आहेत, परंतु बहुतेक लोक कृतघ्नपणा दाखविणे थांबवत नाहीत
Surah Al-Isra, Verse 89


وَقَالُواْ لَن نُّؤۡمِنَ لَكَ حَتَّىٰ تَفۡجُرَ لَنَا مِنَ ٱلۡأَرۡضِ يَنۢبُوعًا

९०. आणि ते म्हणाले, आम्ही तुमच्यावर कधीही ईमान राखणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जमिनीतून पाण्याचा झरा काढून दाखवत नाही
Surah Al-Isra, Verse 90


أَوۡ تَكُونَ لَكَ جَنَّةٞ مِّن نَّخِيلٖ وَعِنَبٖ فَتُفَجِّرَ ٱلۡأَنۡهَٰرَ خِلَٰلَهَا تَفۡجِيرًا

९१. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादा बाग असावा खजुरांचा आणि द्राक्षांचा आणि त्यांच्या दरम्यान तुम्ही अनेक वाहते जलप्रवाह काढून दाखवावेत
Surah Al-Isra, Verse 91


أَوۡ تُسۡقِطَ ٱلسَّمَآءَ كَمَا زَعَمۡتَ عَلَيۡنَا كِسَفًا أَوۡ تَأۡتِيَ بِٱللَّهِ وَٱلۡمَلَـٰٓئِكَةِ قَبِيلًا

९२. किंवा तुम्ही आकाशाला आमच्यावर तुकडे तुकडे करून पाडावे, जसा तुमचा विचार आहे अथवा तुम्ही स्वतः अल्लाहला आणि फरिश्त्यांना आमच्यासमोर आणून उभे करावे
Surah Al-Isra, Verse 92


أَوۡ يَكُونَ لَكَ بَيۡتٞ مِّن زُخۡرُفٍ أَوۡ تَرۡقَىٰ فِي ٱلسَّمَآءِ وَلَن نُّؤۡمِنَ لِرُقِيِّكَ حَتَّىٰ تُنَزِّلَ عَلَيۡنَا كِتَٰبٗا نَّقۡرَؤُهُۥۗ قُلۡ سُبۡحَانَ رَبِّي هَلۡ كُنتُ إِلَّا بَشَرٗا رَّسُولٗا

९३. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादे सोन्याचे घर असावे किंवा तुम्ही आकाशात चढून जावे आणि आम्ही तर तुमच्या चढून जाण्याचाही तोपर्यंत विश्वास करणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यावर एखादा ग्रंथ अवतरित करत नाही, जो आम्ही स्वतः वाचून घ्यावा. तुम्ही उत्तर द्या की माझा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. मी तर एक मानव आहे, जो रसूल (पैगंबर) बनवून पाठविला गेलो आहे
Surah Al-Isra, Verse 93


وَمَا مَنَعَ ٱلنَّاسَ أَن يُؤۡمِنُوٓاْ إِذۡ جَآءَهُمُ ٱلۡهُدَىٰٓ إِلَّآ أَن قَالُوٓاْ أَبَعَثَ ٱللَّهُ بَشَرٗا رَّسُولٗا

९४. आणि लोकांजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर ईमान राखण्यापासून रोखणारी केवळ हीच गोष्ट राहिली की ते म्हणाले, काय अल्लाहने एका माणसालाच रसूल (पैगंबर) बनवून पाठविले
Surah Al-Isra, Verse 94


قُل لَّوۡ كَانَ فِي ٱلۡأَرۡضِ مَلَـٰٓئِكَةٞ يَمۡشُونَ مُطۡمَئِنِّينَ لَنَزَّلۡنَا عَلَيۡهِم مِّنَ ٱلسَّمَآءِ مَلَكٗا رَّسُولٗا

९५. (तुम्ही) सांगा, जर धरतीवर फरिश्ते चालत फिरत असते आणि इथे वास्तव्य करणारे राहिले असते तर मग आम्हीही त्यांच्याजवळ एखाद्या आस्मानी फरिश्त्यालाच रसूल बनवून पाठविले असते
Surah Al-Isra, Verse 95


قُلۡ كَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدَۢا بَيۡنِي وَبَيۡنَكُمۡۚ إِنَّهُۥ كَانَ بِعِبَادِهِۦ خَبِيرَۢا بَصِيرٗا

९६. सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहचे साक्षी असणे पुरेसे आहे तो आपल्या दासांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे
Surah Al-Isra, Verse 96


وَمَن يَهۡدِ ٱللَّهُ فَهُوَ ٱلۡمُهۡتَدِۖ وَمَن يُضۡلِلۡ فَلَن تَجِدَ لَهُمۡ أَوۡلِيَآءَ مِن دُونِهِۦۖ وَنَحۡشُرُهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ عَلَىٰ وُجُوهِهِمۡ عُمۡيٗا وَبُكۡمٗا وَصُمّٗاۖ مَّأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُۖ كُلَّمَا خَبَتۡ زِدۡنَٰهُمۡ سَعِيرٗا

९७. आणि अल्लाह ज्याला मार्ग दाखविल, तो मार्गदर्शन लाभलेला आहे आणि ज्याला तो पथभ्रष्ट करील तर असंभव आहे की तुम्हाला त्याचा मित्र, त्याच्याखेरीज दुसरा कोणी आढळेल, अशा लोकांना आम्ही कयामतच्या दिवशी तोंडघशी पाडून अशा अवस्थेत जमा करू की ते आंधळे, मुके आणि बहिरे असतील. त्यांचे ठिकाण जहन्नम असेल, जेव्हा ती (आग) थोडी सुद्धा मंद पडू लागेल तर तिला आम्ही त्यांच्यासाठी आणखी भडकावून देऊ
Surah Al-Isra, Verse 97


ذَٰلِكَ جَزَآؤُهُم بِأَنَّهُمۡ كَفَرُواْ بِـَٔايَٰتِنَا وَقَالُوٓاْ أَءِذَا كُنَّا عِظَٰمٗا وَرُفَٰتًا أَءِنَّا لَمَبۡعُوثُونَ خَلۡقٗا جَدِيدًا

९८. हा सर्व आमच्या निशाण्यांचा इन्कार करण्याचा आणि हे सांगण्याचा परिणाम आहे की काय जेव्हा आम्ही राख आणि कण कण होऊन जाऊ, मग आम्हाला नव्याने निर्माण करून उठवून उभे केले जाईल
Surah Al-Isra, Verse 98


۞أَوَلَمۡ يَرَوۡاْ أَنَّ ٱللَّهَ ٱلَّذِي خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ قَادِرٌ عَلَىٰٓ أَن يَخۡلُقَ مِثۡلَهُمۡ وَجَعَلَ لَهُمۡ أَجَلٗا لَّا رَيۡبَ فِيهِ فَأَبَى ٱلظَّـٰلِمُونَ إِلَّا كُفُورٗا

९९. काय त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की ज्या अल्लाहने आकाश आणि धरतीला निर्माण केले, तो त्यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे पूर्ण सामर्थ्य बाळगतो, त्यानेच त्यांच्यासाठी एक अशी वेळ निश्चित केली आहे, जिच्याबाबत काही शंका नाही, परंतु अत्याचारी लोक कृतघ्न बनल्याविना राहत नाही
Surah Al-Isra, Verse 99


قُل لَّوۡ أَنتُمۡ تَمۡلِكُونَ خَزَآئِنَ رَحۡمَةِ رَبِّيٓ إِذٗا لَّأَمۡسَكۡتُمۡ خَشۡيَةَ ٱلۡإِنفَاقِۚ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ قَتُورٗا

१००. त्यांना सांगा की (जर समजा) जर तुम्ही माझ्या पालनकर्त्याच्या दया कृपेच्या खजिन्याचे मालक बनले असते तर तुम्ही त्या वेळीही तो खर्च होईल या भीतीने त्यात कंजूसपणा केला असता आणि मनुष्य आहेच मोठा कोत्या मनाचा
Surah Al-Isra, Verse 100


وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا مُوسَىٰ تِسۡعَ ءَايَٰتِۭ بَيِّنَٰتٖۖ فَسۡـَٔلۡ بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ إِذۡ جَآءَهُمۡ فَقَالَ لَهُۥ فِرۡعَوۡنُ إِنِّي لَأَظُنُّكَ يَٰمُوسَىٰ مَسۡحُورٗا

१०१. आणि आम्ही मूसाला नऊ मोजिजे (अल्लाहप्रदत्त चमत्कार) अगदी साफ साफ प्रदान केले, तू स्वतः इस्राईलच्या संततीला विचार, जेव्हा ते त्यांच्याजवळ तेव्हा पोहोचले फिरऔन म्हणाला, हे मूसा! माझ्या मते तुझ्यावर जादूटोणा केला गेला आहे
Surah Al-Isra, Verse 101


قَالَ لَقَدۡ عَلِمۡتَ مَآ أَنزَلَ هَـٰٓؤُلَآءِ إِلَّا رَبُّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ بَصَآئِرَ وَإِنِّي لَأَظُنُّكَ يَٰفِرۡعَوۡنُ مَثۡبُورٗا

१०२. (मूसाने) उत्तर दिले, हे मला माहीत झाले आहे की आकाशांच्या आणि धरतीच्या पालनकर्त्यानेच हे चमत्कार दाखविण्यासाठी व समजाविण्यासाठी अवतरित केले आहेत, हे फिरऔन! मला तर वाटते की तू नक्कीच नष्ट केला गेला आहे
Surah Al-Isra, Verse 102


فَأَرَادَ أَن يَسۡتَفِزَّهُم مِّنَ ٱلۡأَرۡضِ فَأَغۡرَقۡنَٰهُ وَمَن مَّعَهُۥ جَمِيعٗا

१०३. शेवटी फिरऔनने पक्का इरादा केला की त्यांना भूमीतूनच काढून फेकावे, तेव्हा आम्ही स्वतः त्याला आणि त्याच्या सर्व साथीदारांना बुडवून टाकले
Surah Al-Isra, Verse 103


وَقُلۡنَا مِنۢ بَعۡدِهِۦ لِبَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ ٱسۡكُنُواْ ٱلۡأَرۡضَ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ ٱلۡأٓخِرَةِ جِئۡنَا بِكُمۡ لَفِيفٗا

१०४. आणि त्यानंतर आम्ही इस्राईलच्या पुत्रांना फर्माविले की त्या भूमीवर वास्तव्य करा, मात्र जेव्हा आखिरतचा वायदा येईल तेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना एकत्रित करून नेऊ
Surah Al-Isra, Verse 104


وَبِٱلۡحَقِّ أَنزَلۡنَٰهُ وَبِٱلۡحَقِّ نَزَلَۗ وَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ إِلَّا مُبَشِّرٗا وَنَذِيرٗا

१०५. आणि आम्ही या (कुरआना) ला सत्यासह अवतरित केले आणि हा देखील सत्यासह अवतरित झाला आणि आम्ही तुम्हाला केवळ खूशखबर देणारा आणि सचेत करणारा बनवून पाठविले आहे
Surah Al-Isra, Verse 105


وَقُرۡءَانٗا فَرَقۡنَٰهُ لِتَقۡرَأَهُۥ عَلَى ٱلنَّاسِ عَلَىٰ مُكۡثٖ وَنَزَّلۡنَٰهُ تَنزِيلٗا

१०६. आणि कुरआनाला आम्ही थोडे थोडे करून अशासाठी उतरविले आहे की तुम्ही वेळ मिळेल त्यानुसार लोकांना ऐकवावे आणि आम्ही स्वतःदेखील याला थोडे थोडे करून उतरविले
Surah Al-Isra, Verse 106


قُلۡ ءَامِنُواْ بِهِۦٓ أَوۡ لَا تُؤۡمِنُوٓاْۚ إِنَّ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡعِلۡمَ مِن قَبۡلِهِۦٓ إِذَا يُتۡلَىٰ عَلَيۡهِمۡ يَخِرُّونَۤ لِلۡأَذۡقَانِۤ سُجَّدٗاۤ

१०७. तुम्ही सांगा, तुम्ही यावर ईमान राखा किंवा न राखा, ज्यांना याच्यापूर्वी ज्ञान दिले गेले आहे, त्यांच्याजवळ जेव्हा देखील याचे पठण केले जाते, तेव्हा ते माथा टेकून सजदा करू लागतात
Surah Al-Isra, Verse 107


وَيَقُولُونَ سُبۡحَٰنَ رَبِّنَآ إِن كَانَ وَعۡدُ رَبِّنَا لَمَفۡعُولٗا

१०८. आणि म्हणतात की आमचा पालनकर्ता पवित्र आहे, आमच्या पालनकर्त्याचा वायदा निश्चितच पूर्ण होणार आहे
Surah Al-Isra, Verse 108


وَيَخِرُّونَ لِلۡأَذۡقَانِ يَبۡكُونَ وَيَزِيدُهُمۡ خُشُوعٗا۩

१०९. आणि ते माथा टेकून रडत रडत सजद्याच्या अवस्थेत खाली पडतात आणि हा कुरआन त्यांची नरमी आणि नम्रता आणखी जास्त वाढवितो
Surah Al-Isra, Verse 109


قُلِ ٱدۡعُواْ ٱللَّهَ أَوِ ٱدۡعُواْ ٱلرَّحۡمَٰنَۖ أَيّٗا مَّا تَدۡعُواْ فَلَهُ ٱلۡأَسۡمَآءُ ٱلۡحُسۡنَىٰۚ وَلَا تَجۡهَرۡ بِصَلَاتِكَ وَلَا تُخَافِتۡ بِهَا وَٱبۡتَغِ بَيۡنَ ذَٰلِكَ سَبِيلٗا

११०. तुम्ही सांगा की अल्लाहला अल्लाह म्हणून पुकारा आणि रहमान म्हणून, ज्या नावाने देखील पुकारा सर्व शुभ नामे त्याचीच आहेत. ना तुम्ही आपली नमाज फार उंच स्वरात पढत जा आणि ना अगदी हळू स्वरात किंबहुना यांच्या मधला मार्ग शोधा
Surah Al-Isra, Verse 110


وَقُلِ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ ٱلَّذِي لَمۡ يَتَّخِذۡ وَلَدٗا وَلَمۡ يَكُن لَّهُۥ شَرِيكٞ فِي ٱلۡمُلۡكِ وَلَمۡ يَكُن لَّهُۥ وَلِيّٞ مِّنَ ٱلذُّلِّۖ وَكَبِّرۡهُ تَكۡبِيرَۢا

१११. आणि सांगा, समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो ना संतती बाळगतो आणि ना आपल्या राज्यसत्तेत दुसऱ्या कोणाला भागीदार ठेवतो, ना तो असा कमजोर आहे की त्याचा कोणी सहाय्यक असावा आणि तुम्ही त्याची परिपूर्ण महिमा वर्णन करण्यात मग्न राहा
Surah Al-Isra, Verse 111


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 16
>> Surah 18

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai