Surah Al-Kahf - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ ٱلَّذِيٓ أَنزَلَ عَلَىٰ عَبۡدِهِ ٱلۡكِتَٰبَ وَلَمۡ يَجۡعَل لَّهُۥ عِوَجَاۜ
१. सर्व स्तुती-प्रशंसा त्या अल्लाहकरिताच आहे, ज्याने आपल्या दासावर हा कुरआन अवतरित केला आणि त्यात कसलीही उणीव बाकी राहू दिली नाही
Surah Al-Kahf, Verse 1
قَيِّمٗا لِّيُنذِرَ بَأۡسٗا شَدِيدٗا مِّن لَّدُنۡهُ وَيُبَشِّرَ ٱلۡمُؤۡمِنِينَ ٱلَّذِينَ يَعۡمَلُونَ ٱلصَّـٰلِحَٰتِ أَنَّ لَهُمۡ أَجۡرًا حَسَنٗا
२. किंबहुना सर्व काही यथायोग्य राखले यासाठी की आपल्याजवळच्या सक्त शिक्षेपासून सचेत करावे आणि ईमान राखणाऱ्यांना आणि सत्कर्म करणाऱ्यांना खूशखबरी ऐकवावी की त्यांच्याकरिता उत्तम मोबदला आहे
Surah Al-Kahf, Verse 2
مَّـٰكِثِينَ فِيهِ أَبَدٗا
३. ज्यात ते नेहमी नेहमी राहतील
Surah Al-Kahf, Verse 3
وَيُنذِرَ ٱلَّذِينَ قَالُواْ ٱتَّخَذَ ٱللَّهُ وَلَدٗا
४. आणि त्या लोकांनाही भय दाखवावे जे म्हणतात की अल्लाह संतती बाळगतो
Surah Al-Kahf, Verse 4
مَّا لَهُم بِهِۦ مِنۡ عِلۡمٖ وَلَا لِأٓبَآئِهِمۡۚ كَبُرَتۡ كَلِمَةٗ تَخۡرُجُ مِنۡ أَفۡوَٰهِهِمۡۚ إِن يَقُولُونَ إِلَّا كَذِبٗا
५. वास्तविकत ना त्यांना स्वतःला याचे ज्ञान आहे, ना त्यांच्या थोर बुजूर्ग लोकांना. हा आरोप मोठा वाईट आहे, जो त्यांच्या तोंडून निघत आहे, ते केवळ खोटे बोलत आहेत
Surah Al-Kahf, Verse 5
فَلَعَلَّكَ بَٰخِعٞ نَّفۡسَكَ عَلَىٰٓ ءَاثَٰرِهِمۡ إِن لَّمۡ يُؤۡمِنُواْ بِهَٰذَا ٱلۡحَدِيثِ أَسَفًا
६. मग जर या लोकांनी या गोष्टीवर ईमान राखले नाही तर काय तुम्ही त्यांच्या मागे याच दुःखात आपल्या जीवाचा नाश करून घ्याल
Surah Al-Kahf, Verse 6
إِنَّا جَعَلۡنَا مَا عَلَى ٱلۡأَرۡضِ زِينَةٗ لَّهَا لِنَبۡلُوَهُمۡ أَيُّهُمۡ أَحۡسَنُ عَمَلٗا
७. धरतीवर जे काही आहे, ते आम्ही धरतीच्या शोभा-सजावटीसाठी बनविले आहे की आम्ही त्यांची कसोटी घ्यावी की त्यांच्यापैकी कोण सत्कर्म करणारा आहे
Surah Al-Kahf, Verse 7
وَإِنَّا لَجَٰعِلُونَ مَا عَلَيۡهَا صَعِيدٗا جُرُزًا
८. आणि या धरतीवर जे काही आहे, आम्ही त्याला एक सपाट मैदान करून टाकणार आहोत
Surah Al-Kahf, Verse 8
أَمۡ حَسِبۡتَ أَنَّ أَصۡحَٰبَ ٱلۡكَهۡفِ وَٱلرَّقِيمِ كَانُواْ مِنۡ ءَايَٰتِنَا عَجَبًا
९. काय तुम्ही आपल्या मते गुफा आणि शिलालेखवाल्यांना आमच्या निशाण्यांपैकी एखादी मोठी नवलपूर्ण निशाणी समजत आहात
Surah Al-Kahf, Verse 9
إِذۡ أَوَى ٱلۡفِتۡيَةُ إِلَى ٱلۡكَهۡفِ فَقَالُواْ رَبَّنَآ ءَاتِنَا مِن لَّدُنكَ رَحۡمَةٗ وَهَيِّئۡ لَنَا مِنۡ أَمۡرِنَا رَشَدٗا
१०. त्या तरुणांनी जेव्हा गुफेत आश्रय घेतला तेव्हा दुआ-प्रार्थना केली की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला आपल्या जवळून दया- कृपा प्रदान कर आणि आमच्या कार्यात आमच्यासाठी मार्ग सोपा कर
Surah Al-Kahf, Verse 10
فَضَرَبۡنَا عَلَىٰٓ ءَاذَانِهِمۡ فِي ٱلۡكَهۡفِ سِنِينَ عَدَدٗا
११. मग आम्ही त्यांच्या कानांवर अनेक वर्षांपर्यंत त्याच गुफेत पडदे टाकले
Surah Al-Kahf, Verse 11
ثُمَّ بَعَثۡنَٰهُمۡ لِنَعۡلَمَ أَيُّ ٱلۡحِزۡبَيۡنِ أَحۡصَىٰ لِمَا لَبِثُوٓاْ أَمَدٗا
१२. मग आम्ही त्यांना उठवून उभे केले की आम्ही हे जाणून घ्यावे की दोन्ही गटांपैकी या मोठ्या मुदतीला, जी त्यांनी पार पाडली, कोणी जास्त स्मरणात राखले
Surah Al-Kahf, Verse 12
نَّحۡنُ نَقُصُّ عَلَيۡكَ نَبَأَهُم بِٱلۡحَقِّۚ إِنَّهُمۡ فِتۡيَةٌ ءَامَنُواْ بِرَبِّهِمۡ وَزِدۡنَٰهُمۡ هُدٗى
१३. आम्ही त्यांची खरी कहाणी तुमच्यासमोर वर्णन करीत आहोत, या काही तरुणांनी१ आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात प्रगती प्रदान केली
Surah Al-Kahf, Verse 13
وَرَبَطۡنَا عَلَىٰ قُلُوبِهِمۡ إِذۡ قَامُواْ فَقَالُواْ رَبُّنَا رَبُّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ لَن نَّدۡعُوَاْ مِن دُونِهِۦٓ إِلَٰهٗاۖ لَّقَدۡ قُلۡنَآ إِذٗا شَطَطًا
१४. आणि आम्ही त्यांची मने मजबूत केली होती जेव्हा ते उठून उभे राहिले आणि म्हणू लागले की आमचा पालनकर्ता तोच आहे, जो आकाशांचा आणि धरतीचा पालनकर्ता आहे, हे असंभव आहे की आम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या उपास्याला पुकारावे जर असे केले तर आम्ही मोठी अनुचित गोष्ट बोललो
Surah Al-Kahf, Verse 14
هَـٰٓؤُلَآءِ قَوۡمُنَا ٱتَّخَذُواْ مِن دُونِهِۦٓ ءَالِهَةٗۖ لَّوۡلَا يَأۡتُونَ عَلَيۡهِم بِسُلۡطَٰنِۭ بَيِّنٖۖ فَمَنۡ أَظۡلَمُ مِمَّنِ ٱفۡتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ كَذِبٗا
१५. हा आहे आमचा जनसमूह, ज्याने अल्लाहखेरीज दुसरी उपास्ये बनवून ठेवली आहेत त्यांच्या वर्चस्वाचा एखादा स्पष्ट पुरावा का नाही सादर करत? अल्लाहशी खोट्या गोष्टीचा संबंध जोडणाऱ्यापेक्षा अधिक अत्याचारी कोण आहे
Surah Al-Kahf, Verse 15
وَإِذِ ٱعۡتَزَلۡتُمُوهُمۡ وَمَا يَعۡبُدُونَ إِلَّا ٱللَّهَ فَأۡوُۥٓاْ إِلَى ٱلۡكَهۡفِ يَنشُرۡ لَكُمۡ رَبُّكُم مِّن رَّحۡمَتِهِۦ وَيُهَيِّئۡ لَكُم مِّنۡ أَمۡرِكُم مِّرۡفَقٗا
१६. आणि ज्याअर्थी तुम्ही त्यांच्यापासून आणि अल्लाहखेरीज त्यांच्या इतर उपास्यांपासून वेगळे झाला आहात तर आता एखाद्या गुफेत जाऊन बसा, तुमचा पालनकर्ता (अल्लाह) तुमच्यावर आपली दया-कृपा करेल आणि तुमच्या कार्यात सहज सुलभता निर्माण करील
Surah Al-Kahf, Verse 16
۞وَتَرَى ٱلشَّمۡسَ إِذَا طَلَعَت تَّزَٰوَرُ عَن كَهۡفِهِمۡ ذَاتَ ٱلۡيَمِينِ وَإِذَا غَرَبَت تَّقۡرِضُهُمۡ ذَاتَ ٱلشِّمَالِ وَهُمۡ فِي فَجۡوَةٖ مِّنۡهُۚ ذَٰلِكَ مِنۡ ءَايَٰتِ ٱللَّهِۗ مَن يَهۡدِ ٱللَّهُ فَهُوَ ٱلۡمُهۡتَدِۖ وَمَن يُضۡلِلۡ فَلَن تَجِدَ لَهُۥ وَلِيّٗا مُّرۡشِدٗا
१७. आणि तुम्ही पाहाल की सूर्योदय होताना सूर्य त्यांच्या गुफेच्या उजव्या बाजूला झुकतो आणि अस्तास जाताना त्यांच्या डाव्या बाजूला गुफेचा भाग सोडून मावळतो आणि ते त्या गुफेच्या प्रशस्त स्थानात आहेत. हे अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहे, अल्लाह ज्याला मार्गदर्शन करील, तो सत्य मार्गावर आहे आणि ज्याला पथभ्रष्ट करील तर अशक्य आहे की तुम्हाला त्याचा कोणी मित्र आणि मार्ग दाखविणारा दिसून यावा
Surah Al-Kahf, Verse 17
وَتَحۡسَبُهُمۡ أَيۡقَاظٗا وَهُمۡ رُقُودٞۚ وَنُقَلِّبُهُمۡ ذَاتَ ٱلۡيَمِينِ وَذَاتَ ٱلشِّمَالِۖ وَكَلۡبُهُم بَٰسِطٞ ذِرَاعَيۡهِ بِٱلۡوَصِيدِۚ لَوِ ٱطَّلَعۡتَ عَلَيۡهِمۡ لَوَلَّيۡتَ مِنۡهُمۡ فِرَارٗا وَلَمُلِئۡتَ مِنۡهُمۡ رُعۡبٗا
१८. आणि तुम्ही विचार कराल की ते जागत आहेत वस्तुतः ते झोपत होते, आणि आम्ही स्वतः त्याची उजवी डावी कुशी बदलत राहिलो. त्यांचा कुत्रादेखील गुफेच्या तोंडाशी हात पसरलेल्या अवस्थेत होता. जर तुम्ही आत डोकावून पाहू इच्छिले असते तर नक्कीच उलट पावलांनी पळ काढला असता आणि त्यांच्या भय-दहशतीने तुम्ही भारुन गेले असते
Surah Al-Kahf, Verse 18
وَكَذَٰلِكَ بَعَثۡنَٰهُمۡ لِيَتَسَآءَلُواْ بَيۡنَهُمۡۚ قَالَ قَآئِلٞ مِّنۡهُمۡ كَمۡ لَبِثۡتُمۡۖ قَالُواْ لَبِثۡنَا يَوۡمًا أَوۡ بَعۡضَ يَوۡمٖۚ قَالُواْ رَبُّكُمۡ أَعۡلَمُ بِمَا لَبِثۡتُمۡ فَٱبۡعَثُوٓاْ أَحَدَكُم بِوَرِقِكُمۡ هَٰذِهِۦٓ إِلَى ٱلۡمَدِينَةِ فَلۡيَنظُرۡ أَيُّهَآ أَزۡكَىٰ طَعَامٗا فَلۡيَأۡتِكُم بِرِزۡقٖ مِّنۡهُ وَلۡيَتَلَطَّفۡ وَلَا يُشۡعِرَنَّ بِكُمۡ أَحَدًا
१९. आणि त्याच प्रकारे आम्ही त्यांना जागे करून उठविले की आपसात विचारपूस करावी. त्यांच्यापैकी एका बोलणाऱ्याने विचारले की तुम्ही (इथे) किती काळ राहातील त्यांनी उत्तर दिले, एक दिवस किंवा एका दिवसापेक्षाही कमी. म्हणू लागले, की तुमच्या वास्तव्याचे पूर्ण ज्ञान अल्लाहलाच आहे. आता तुम्ही आपल्यापैकी एखाद्यालाही चांदीची (नाणी) देऊन शहरात पाठवा. त्याने चांगल्याप्रकारे पाहून घ्यावे की शहरात कोणते भोजन स्वच्छ शुद्ध आहे, मग त्यातूनच तुमच्या भोजनासाठी आणावे आणि त्याने खूप सावधगिरी आणि नरमीने वागावे आणि कोणालाही तुमची खबर होऊ देऊ नये
Surah Al-Kahf, Verse 19
إِنَّهُمۡ إِن يَظۡهَرُواْ عَلَيۡكُمۡ يَرۡجُمُوكُمۡ أَوۡ يُعِيدُوكُمۡ فِي مِلَّتِهِمۡ وَلَن تُفۡلِحُوٓاْ إِذًا أَبَدٗا
२०. जर हे (काफिर) तुमच्यावर वर्चस्व प्राप्त करून घेतील तर तुम्हाला दगडांनी मारून टाकतील किंवा पुन्हा तुम्हाला आपल्या धर्मात परत घेतील, तर मग तुम्ही कधीही सफल होऊ शकणार नाहीत
Surah Al-Kahf, Verse 20
وَكَذَٰلِكَ أَعۡثَرۡنَا عَلَيۡهِمۡ لِيَعۡلَمُوٓاْ أَنَّ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٞ وَأَنَّ ٱلسَّاعَةَ لَا رَيۡبَ فِيهَآ إِذۡ يَتَنَٰزَعُونَ بَيۡنَهُمۡ أَمۡرَهُمۡۖ فَقَالُواْ ٱبۡنُواْ عَلَيۡهِم بُنۡيَٰنٗاۖ رَّبُّهُمۡ أَعۡلَمُ بِهِمۡۚ قَالَ ٱلَّذِينَ غَلَبُواْ عَلَىٰٓ أَمۡرِهِمۡ لَنَتَّخِذَنَّ عَلَيۡهِم مَّسۡجِدٗا
२१. आणि आम्ही अशा प्रकारे लोकांना त्यांच्या अवस्थेशी अवगत केले की त्यांनी हे जाणून घ्यावे की अल्लाहचा वायदा पूर्णतः सच्चा आहे. आणि कयामत येण्याबाबत काहीच शंका नाही जेव्हा ते आपल्या बोलण्यात आपसात मतभेद करीत होते, म्हणू लागले की गुफेवर एक इमारत बनवून घ्या. त्यांचा पालनकर्ताच त्यांच्या अवस्थेला अधिक जाणणारा आहे, ज्या लोकांनी त्यांच्या बाबतीत वर्चस्व प्राप्त केले, ते म्हणू लागले की आम्ही तर यांच्याजवळ पास मस्जिद बनवू
Surah Al-Kahf, Verse 21
سَيَقُولُونَ ثَلَٰثَةٞ رَّابِعُهُمۡ كَلۡبُهُمۡ وَيَقُولُونَ خَمۡسَةٞ سَادِسُهُمۡ كَلۡبُهُمۡ رَجۡمَۢا بِٱلۡغَيۡبِۖ وَيَقُولُونَ سَبۡعَةٞ وَثَامِنُهُمۡ كَلۡبُهُمۡۚ قُل رَّبِّيٓ أَعۡلَمُ بِعِدَّتِهِم مَّا يَعۡلَمُهُمۡ إِلَّا قَلِيلٞۗ فَلَا تُمَارِ فِيهِمۡ إِلَّا مِرَآءٗ ظَٰهِرٗا وَلَا تَسۡتَفۡتِ فِيهِم مِّنۡهُمۡ أَحَدٗا
२२. काही लोक म्हणतील की गुफेत तीन जण होते आणि चौथा त्यांचा कुत्रा होता, काही म्हणतील की ते पाच होते, सहावा त्यांचा कुत्रा होता. अपरोक्ष (ग़ैब) विषयी (चिन्ह पाहिल्याविना) अनुमानाने दगड मारणे. काही म्हणतील की ते सात आहेत आठवा त्यांचा कुत्रा आहे. (तुम्ही) सांगा की माझा पालनकर्ता, त्यांची संख्या चांगल्या प्रकारे जाणणारा आहे. त्यांना फार थोडेच लोक जाणतात, मग तुम्हीही त्या लोकांविषयी केवळ संक्षिप्त बोलत जा, आणि त्यांच्यापैकी कोणाशी त्यांच्याविषयी विचारपूसही करू नका
Surah Al-Kahf, Verse 22
وَلَا تَقُولَنَّ لِشَاْيۡءٍ إِنِّي فَاعِلٞ ذَٰلِكَ غَدًا
२३. आणि कधीही एखाद्या कामाबद्दल असे बोलू नका की मी हे काम उद्या करेन
Surah Al-Kahf, Verse 23
إِلَّآ أَن يَشَآءَ ٱللَّهُۚ وَٱذۡكُر رَّبَّكَ إِذَا نَسِيتَ وَقُلۡ عَسَىٰٓ أَن يَهۡدِيَنِ رَبِّي لِأَقۡرَبَ مِنۡ هَٰذَا رَشَدٗا
२४. परंतु त्यासोबतच ‘इन्शा अल्लाह’ (अल्लाहने इच्छिले तर) जरूर म्हणा आणि जेव्हा देखील विसर पडेल आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) चे स्मरण करत जा आणि हे म्हणत राहा की मला पूर्ण आशा आहे की माझा पालनकर्ता याहून जास्त मार्गदर्शनाच्या जवळच्या गोष्टीचे मार्गदर्शन करेल
Surah Al-Kahf, Verse 24
وَلَبِثُواْ فِي كَهۡفِهِمۡ ثَلَٰثَ مِاْئَةٖ سِنِينَ وَٱزۡدَادُواْ تِسۡعٗا
२५. आणि ते लोक आपल्या गुफेत तीनशे वर्षापर्यंत राहिले, आणि नऊ वर्षे त्यांनी अधिक काढली
Surah Al-Kahf, Verse 25
قُلِ ٱللَّهُ أَعۡلَمُ بِمَا لَبِثُواْۖ لَهُۥ غَيۡبُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۖ أَبۡصِرۡ بِهِۦ وَأَسۡمِعۡۚ مَا لَهُم مِّن دُونِهِۦ مِن وَلِيّٖ وَلَا يُشۡرِكُ فِي حُكۡمِهِۦٓ أَحَدٗا
२६. तुम्ही सांगा, अल्लाहलाच त्यांच्या वास्तव्यकाळाचे चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. आकाशांचे आणि धरतीचे परोक्ष ज्ञान केवळ त्यालाच आहे. तो किती चांगला पाहणारा ऐकणारा आहे! अल्लाहखेरीज कोणीही त्यांची मदत करणारा नाही आणि अल्लाह आपला आदेश लागू करण्यात कोणालाही सहभागी बनवित नाही
Surah Al-Kahf, Verse 26
وَٱتۡلُ مَآ أُوحِيَ إِلَيۡكَ مِن كِتَابِ رَبِّكَۖ لَا مُبَدِّلَ لِكَلِمَٰتِهِۦ وَلَن تَجِدَ مِن دُونِهِۦ مُلۡتَحَدٗا
२७. आणि तुमच्याकडे, तुमच्या पालनकर्त्यातर्फे जो ग्रंथ अवतरित केला गेला आहे, त्याचे पठण करीत राहा. त्याचे फर्मान कोणीही बदलू शकत नाही. तुम्हाला त्याच्याखेरीज कदापि एखादे आश्रयस्थान लाभणार नाही
Surah Al-Kahf, Verse 27
وَٱصۡبِرۡ نَفۡسَكَ مَعَ ٱلَّذِينَ يَدۡعُونَ رَبَّهُم بِٱلۡغَدَوٰةِ وَٱلۡعَشِيِّ يُرِيدُونَ وَجۡهَهُۥۖ وَلَا تَعۡدُ عَيۡنَاكَ عَنۡهُمۡ تُرِيدُ زِينَةَ ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَاۖ وَلَا تُطِعۡ مَنۡ أَغۡفَلۡنَا قَلۡبَهُۥ عَن ذِكۡرِنَا وَٱتَّبَعَ هَوَىٰهُ وَكَانَ أَمۡرُهُۥ فُرُطٗا
२८. आणि स्वतःला अशाच लोकांच्या सोबत राखत जा, जे आपल्या पालनकर्त्याला सकाळ संध्याकाळ पुकारतात आणि त्याच्याच मुखा (अनुग्रहा) ची अभिलाषा करतात. खबरदार! तुमची दृष्टी त्यांच्यावरून हटता कामा नये की ऐहिक जीवनाच्या शोभा-सजावटीच्या प्रयत्नात मग्न व्हावे (पाहा) त्याचे म्हणणे मान्य करू नका, ज्याच्या हृदयाला आम्ही आपल्या आठवणीपासून गाफील ठेवले आहे आणि जो इच्छा-आकांक्षांच्या मागे धावत आहे आणि ज्याच्या कर्माने मर्यादा पार केली आहे
Surah Al-Kahf, Verse 28
وَقُلِ ٱلۡحَقُّ مِن رَّبِّكُمۡۖ فَمَن شَآءَ فَلۡيُؤۡمِن وَمَن شَآءَ فَلۡيَكۡفُرۡۚ إِنَّآ أَعۡتَدۡنَا لِلظَّـٰلِمِينَ نَارًا أَحَاطَ بِهِمۡ سُرَادِقُهَاۚ وَإِن يَسۡتَغِيثُواْ يُغَاثُواْ بِمَآءٖ كَٱلۡمُهۡلِ يَشۡوِي ٱلۡوُجُوهَۚ بِئۡسَ ٱلشَّرَابُ وَسَآءَتۡ مُرۡتَفَقًا
२९. आणि ऐलान करा की हे परिपूर्ण सत्य (कुरआन) तुमच्या पालनकर्त्यातर्फे आहे. आता ज्याची इच्छा होईल त्याने ईमान राखावे आणि ज्याची इच्छा होईल त्याने इन्कार करावा. अत्याचारी लोकांकरिता आम्ही ती आग तयार करून ठेवली आहे, जिच्या (आगीच्या) कनाती त्यांना घेरून टाकतील. जर ते गाऱ्हाणे मांडतील तर त्यांची मदत त्या पाण्याने केली जाईल, जे तेलाच्या गाळासारखे असेल, जे चेहरा भाजून टाकील मोठे वाईट पाणी आहे आणि मोठे वाईट विश्रांतीस्थान (जहन्नम) आहे
Surah Al-Kahf, Verse 29
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ إِنَّا لَا نُضِيعُ أَجۡرَ مَنۡ أَحۡسَنَ عَمَلًا
३०. निःसंशय ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले तर आम्ही एखाद्या सर्त्म करणाऱ्याचा मोबदला वाया जाऊ देत नाही
Surah Al-Kahf, Verse 30
أُوْلَـٰٓئِكَ لَهُمۡ جَنَّـٰتُ عَدۡنٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهِمُ ٱلۡأَنۡهَٰرُ يُحَلَّوۡنَ فِيهَا مِنۡ أَسَاوِرَ مِن ذَهَبٖ وَيَلۡبَسُونَ ثِيَابًا خُضۡرٗا مِّن سُندُسٖ وَإِسۡتَبۡرَقٖ مُّتَّكِـِٔينَ فِيهَا عَلَى ٱلۡأَرَآئِكِۚ نِعۡمَ ٱلثَّوَابُ وَحَسُنَتۡ مُرۡتَفَقٗا
३१. त्यांच्यासाठी नेहमी नेहमी असणारी जन्नत आहे. तिच्याखाली नद्या वाहत असतील. तिथे यांना सुवर्ण कांकण घातले जाईल. आणि हिरव्या रंगाचे तलम व जाड रेशमाचे कपडे घालतील त्या ठिकाणी सिंहासनावर तक्के लावून बसतील. किती चांगला मोबदला आहे आणि किती चांगले आराम करण्याचे घर आहे
Surah Al-Kahf, Verse 31
۞وَٱضۡرِبۡ لَهُم مَّثَلٗا رَّجُلَيۡنِ جَعَلۡنَا لِأَحَدِهِمَا جَنَّتَيۡنِ مِنۡ أَعۡنَٰبٖ وَحَفَفۡنَٰهُمَا بِنَخۡلٖ وَجَعَلۡنَا بَيۡنَهُمَا زَرۡعٗا
३२. आणि त्यांना त्या दोन माणसांचे उदाहरणही ऐकवा ज्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षांच्या दोन बागा देऊन ठेवल्या होत्या, ज्यांना खजुरीच्या वृक्षांनी आम्ही घेरून ठेवले होते आणि दोघांच्या दरम्यान शेती निर्माण केली होती
Surah Al-Kahf, Verse 32
كِلۡتَا ٱلۡجَنَّتَيۡنِ ءَاتَتۡ أُكُلَهَا وَلَمۡ تَظۡلِم مِّنۡهُ شَيۡـٔٗاۚ وَفَجَّرۡنَا خِلَٰلَهُمَا نَهَرٗا
३३. दोन्ही बागांनी आपली फळे भरपूर दिलीत आणि त्या काहीच कमतरता केली नाही आणि आम्ही त्या बागांच्या दरम्यान प्रवाह जारी केला होता
Surah Al-Kahf, Verse 33
وَكَانَ لَهُۥ ثَمَرٞ فَقَالَ لِصَٰحِبِهِۦ وَهُوَ يُحَاوِرُهُۥٓ أَنَا۠ أَكۡثَرُ مِنكَ مَالٗا وَأَعَزُّ نَفَرٗا
३४. आणि (अशा प्रकारे) त्याच्याजवळ फळे होती. एक दिवस बोलता बोलता तो आपल्या साथीदाराला म्हणाला की मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे आणि जत्थ्यातही अधिक प्रतिष्ठीत आहे
Surah Al-Kahf, Verse 34
وَدَخَلَ جَنَّتَهُۥ وَهُوَ ظَالِمٞ لِّنَفۡسِهِۦ قَالَ مَآ أَظُنُّ أَن تَبِيدَ هَٰذِهِۦٓ أَبَدٗا
३५. आणि तो आपल्या बागेत गेला आणि आपल्या जीवावर जुलूम करणारा होता, म्हणाला, मला नाही वाटत ही बाग कधी बरबाद होऊ शकेल
Surah Al-Kahf, Verse 35
وَمَآ أَظُنُّ ٱلسَّاعَةَ قَآئِمَةٗ وَلَئِن رُّدِدتُّ إِلَىٰ رَبِّي لَأَجِدَنَّ خَيۡرٗا مِّنۡهَا مُنقَلَبٗا
३६. आणि ना मी कयामतचे प्रस्थापित होण्यास मानतो आणि जर हे मानूनही घेतली की मी आपल्या पालनकर्त्याकडे परतविलो गेलो तर खात्रीने (ते परतीचे ठिकाण) मला याहून जास्त चांगले आढळेल
Surah Al-Kahf, Verse 36
قَالَ لَهُۥ صَاحِبُهُۥ وَهُوَ يُحَاوِرُهُۥٓ أَكَفَرۡتَ بِٱلَّذِي خَلَقَكَ مِن تُرَابٖ ثُمَّ مِن نُّطۡفَةٖ ثُمَّ سَوَّىٰكَ رَجُلٗا
३७. त्याचा साथीदार त्याच्याशी बोलताना म्हणाला, काय तू त्या (अल्लाह) ला नाही मानत, ज्याने तुला मातीपासून निर्माण केले, नंतर वीर्यापासून, मग तुला पूर्ण मानव (पुरुष) घडविले
Surah Al-Kahf, Verse 37
لَّـٰكِنَّا۠ هُوَ ٱللَّهُ رَبِّي وَلَآ أُشۡرِكُ بِرَبِّيٓ أَحَدٗا
३८. परंतु मी (तर पूर्ण श्रद्धा राखतो की) तोच अल्लाह माझा स्वामी व पालनकर्ता आहे, मी आपल्या पालनकर्त्यासोबत कोणालाही सहभागी ठरविणार नाही
Surah Al-Kahf, Verse 38
وَلَوۡلَآ إِذۡ دَخَلۡتَ جَنَّتَكَ قُلۡتَ مَا شَآءَ ٱللَّهُ لَا قُوَّةَ إِلَّا بِٱللَّهِۚ إِن تَرَنِ أَنَا۠ أَقَلَّ مِنكَ مَالٗا وَوَلَدٗا
३९. आणि तू आपल्या बागेत जाण्याच्या वेळी असे का नाही म्हणाला की अल्लाहने जे इच्छिले ते होईल. कोणतेही शक्ती-सामर्थ्य नाही परंतु अल्लाहच्या मदतीने, जरी तू मला धन आणि संततीत कमतरता असलेला पाहात आहेस
Surah Al-Kahf, Verse 39
فَعَسَىٰ رَبِّيٓ أَن يُؤۡتِيَنِ خَيۡرٗا مِّن جَنَّتِكَ وَيُرۡسِلَ عَلَيۡهَا حُسۡبَانٗا مِّنَ ٱلسَّمَآءِ فَتُصۡبِحَ صَعِيدٗا زَلَقًا
४०. परंतु फार शक्य आहे की माझा पालनकर्ता मला तुझ्या या बागेपेक्षा उत्तम प्रदान करील आणि या (तुझ्या बागे) वर आसमानी संकट पाठविल तर ही सपाट आणि निसटणारे मैदान बनेल
Surah Al-Kahf, Verse 40
أَوۡ يُصۡبِحَ مَآؤُهَا غَوۡرٗا فَلَن تَسۡتَطِيعَ لَهُۥ طَلَبٗا
४१. किंवाच हिचे पाणी खाली उतरले आणि तुझ्या आवाक्यात न राहावे की तू ते शोधून आणावे
Surah Al-Kahf, Verse 41
وَأُحِيطَ بِثَمَرِهِۦ فَأَصۡبَحَ يُقَلِّبُ كَفَّيۡهِ عَلَىٰ مَآ أَنفَقَ فِيهَا وَهِيَ خَاوِيَةٌ عَلَىٰ عُرُوشِهَا وَيَقُولُ يَٰلَيۡتَنِي لَمۡ أُشۡرِكۡ بِرَبِّيٓ أَحَدٗا
४२. आणि त्याची (सर्व) फळे घेरली गेलीत मग तो आपल्या या खर्चाबद्दल, जो त्याने बागेवर केला होता, आपले हात मळू लागला, आणि ती बाग छप्परासमेत तोंडघशी पडली होती आणि (तो मनुष्य) म्हणत होता की अरेरे! मी आपल्या पालनकर्त्यासोबत दुसऱ्या कुणाला भागीदार बनविले नसते
Surah Al-Kahf, Verse 42
وَلَمۡ تَكُن لَّهُۥ فِئَةٞ يَنصُرُونَهُۥ مِن دُونِ ٱللَّهِ وَمَا كَانَ مُنتَصِرًا
४३. त्याच्या हक्कात कोणताही समूह उठून उभा राहिला नाही की अल्लाहपासून त्याचा काही बचाव करू शकला असता आणि ना तो स्वतःही सूड घेणारा बनू शकला
Surah Al-Kahf, Verse 43
هُنَالِكَ ٱلۡوَلَٰيَةُ لِلَّهِ ٱلۡحَقِّۚ هُوَ خَيۡرٞ ثَوَابٗا وَخَيۡرٌ عُقۡبٗا
४४. इथूनच (सिद्ध होते) की समस्त अधिकार त्याच अल्लाहकरिता आहेत. तो मोबदला प्रदान करण्याच्या व परिणामाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे
Surah Al-Kahf, Verse 44
وَٱضۡرِبۡ لَهُم مَّثَلَ ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَا كَمَآءٍ أَنزَلۡنَٰهُ مِنَ ٱلسَّمَآءِ فَٱخۡتَلَطَ بِهِۦ نَبَاتُ ٱلۡأَرۡضِ فَأَصۡبَحَ هَشِيمٗا تَذۡرُوهُ ٱلرِّيَٰحُۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ مُّقۡتَدِرًا
४५. आणि त्यांना या जगाच्या जीवनाचे उदाहरणही सांगा, जणू पाणी जे आम्ही आकाशातून अवतरित करतो त्याद्वआरे जमिनीची पैदावार मिळतीजुळती असते, मग शेवटी ती चूरेचूर होते, जिला वारे उडवित नेत फिरतात आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो
Surah Al-Kahf, Verse 45
ٱلۡمَالُ وَٱلۡبَنُونَ زِينَةُ ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَاۖ وَٱلۡبَٰقِيَٰتُ ٱلصَّـٰلِحَٰتُ خَيۡرٌ عِندَ رَبِّكَ ثَوَابٗا وَخَيۡرٌ أَمَلٗا
४६. धन-संपत्ती आणि संतती तर या जगाच्या जीवनाची शोभा आहे परंतु सदैव टिकून राहणारे सत्कर्म (नेकी) तुमच्या पालनकर्त्याजवळ मोबदल्याच्या दृष्टीने आणि (भविष्याच्या) चांगल्या आशेसाठी फार उत्तम आहे
Surah Al-Kahf, Verse 46
وَيَوۡمَ نُسَيِّرُ ٱلۡجِبَالَ وَتَرَى ٱلۡأَرۡضَ بَارِزَةٗ وَحَشَرۡنَٰهُمۡ فَلَمۡ نُغَادِرۡ مِنۡهُمۡ أَحَدٗا
४७. आणि ज्या दिवशी आम्ही पर्वतांना चालवू आणि जमिनीला तुम्ही आवरण नसलेल्या स्थितीत पाहाल, आणि समस्त लोकांना आम्ही एकत्र करू तेव्हा त्यांच्यापैकी कोणालाही बाकी सोडणार नाही
Surah Al-Kahf, Verse 47
وَعُرِضُواْ عَلَىٰ رَبِّكَ صَفّٗا لَّقَدۡ جِئۡتُمُونَا كَمَا خَلَقۡنَٰكُمۡ أَوَّلَ مَرَّةِۭۚ بَلۡ زَعَمۡتُمۡ أَلَّن نَّجۡعَلَ لَكُم مَّوۡعِدٗا
४८. आणि सर्वच्या सर्व तुमच्या पालनकर्त्यासमोर रांगारांगांनी हजर केले जातील. निःसंशय तुम्ही आमच्यासमोर त्याच प्रकारे आले, ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्या खेपेस निर्माण केले होते. परंतु तुम्ही मात्र आशा भ्रमात राहिले की आम्ही कधी तुमच्यासाठी एखादा वायद्याचा दिवस निश्चित करणार नाही
Surah Al-Kahf, Verse 48
وَوُضِعَ ٱلۡكِتَٰبُ فَتَرَى ٱلۡمُجۡرِمِينَ مُشۡفِقِينَ مِمَّا فِيهِ وَيَقُولُونَ يَٰوَيۡلَتَنَا مَالِ هَٰذَا ٱلۡكِتَٰبِ لَا يُغَادِرُ صَغِيرَةٗ وَلَا كَبِيرَةً إِلَّآ أَحۡصَىٰهَاۚ وَوَجَدُواْ مَا عَمِلُواْ حَاضِرٗاۗ وَلَا يَظۡلِمُ رَبُّكَ أَحَدٗا
४९. आणि कर्म-लेख समोर ठेवले जातील, मग तुम्ही पाहाल की अपराधी त्यांच्या कर्मलेखापासून भयभीत होतील आणि म्हणतही असतील की अरेरे! आमचा विनाश! हा कसा लेख आहे, ज्याने कोणताही लहान-मोठा (गुन्हा) घेरल्याविना सोडले नाही, आणि त्यांनी जे कर्म केले होते, ते सर्व काही त्यांना दिसून येईल आणि तुमचा पालनकर्ता कोणावरही अत्याचार व अन्याय करणार नाही
Surah Al-Kahf, Verse 49
وَإِذۡ قُلۡنَا لِلۡمَلَـٰٓئِكَةِ ٱسۡجُدُواْ لِأٓدَمَ فَسَجَدُوٓاْ إِلَّآ إِبۡلِيسَ كَانَ مِنَ ٱلۡجِنِّ فَفَسَقَ عَنۡ أَمۡرِ رَبِّهِۦٓۗ أَفَتَتَّخِذُونَهُۥ وَذُرِّيَّتَهُۥٓ أَوۡلِيَآءَ مِن دُونِي وَهُمۡ لَكُمۡ عَدُوُّۢۚ بِئۡسَ لِلظَّـٰلِمِينَ بَدَلٗا
५०. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना आदेश दिला की आदमच्या पुढे सजदा करा, तेव्हा इब्लिस (सैताना) खेरीज सर्वांनी सजदा केला तो जिन्नांपैकी होता. त्याने आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची अवज्ञा केली. काय तरीही तुम्ही त्याला आणि त्याच्या संततीला, मला सोडून आपला मित्र बनवित आहात? वास्तविक तो तुम्हा सर्वांचा शत्रू आहे. अशा जुलमी लोकांचा किती वाईट मोबदला आहे
Surah Al-Kahf, Verse 50
۞مَّآ أَشۡهَدتُّهُمۡ خَلۡقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَلَا خَلۡقَ أَنفُسِهِمۡ وَمَا كُنتُ مُتَّخِذَ ٱلۡمُضِلِّينَ عَضُدٗا
५१. मी त्यांना आकाशांच्या आणि जमिनीच्या निर्मितीप्रसंगी हजर ठेवले नव्हते आणि ना स्वतः त्याच्या निर्मितीत आणि मी मार्गभ्रष्ट करणाऱ्यांना आपला सहाय्यक बनविणाराही नाही
Surah Al-Kahf, Verse 51
وَيَوۡمَ يَقُولُ نَادُواْ شُرَكَآءِيَ ٱلَّذِينَ زَعَمۡتُمۡ فَدَعَوۡهُمۡ فَلَمۡ يَسۡتَجِيبُواْ لَهُمۡ وَجَعَلۡنَا بَيۡنَهُم مَّوۡبِقٗا
५२. आणि ज्या दिवशी तो म्हणेल की तुमच्या मते माझे जे साथीदार होते त्यांना हाक मारा, हे हाक मारतील, परंतु त्यांच्यापैकी कोणीही उत्तर देणार नाही आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचे साधन निर्माण करू
Surah Al-Kahf, Verse 52
وَرَءَا ٱلۡمُجۡرِمُونَ ٱلنَّارَ فَظَنُّوٓاْ أَنَّهُم مُّوَاقِعُوهَا وَلَمۡ يَجِدُواْ عَنۡهَا مَصۡرِفٗا
५३. आणि अपराधी लोक जहन्नमला पाहून समजून घेतील की ते यातच जाणार आहेत, परंतु तिच्यापासून बचावाचे स्थान त्यांना कोठेही आढळणार नाही
Surah Al-Kahf, Verse 53
وَلَقَدۡ صَرَّفۡنَا فِي هَٰذَا ٱلۡقُرۡءَانِ لِلنَّاسِ مِن كُلِّ مَثَلٖۚ وَكَانَ ٱلۡإِنسَٰنُ أَكۡثَرَ شَيۡءٖ جَدَلٗا
५४. आणि आम्ही या कुरआनात प्रत्येक प्रकारची सर्व उदाहरणे लोकांसाठी सांगितली आहेत, परंतु समस्त वस्तूंपेक्षा जास्त भांडखोर मनुष्य आहे
Surah Al-Kahf, Verse 54
وَمَا مَنَعَ ٱلنَّاسَ أَن يُؤۡمِنُوٓاْ إِذۡ جَآءَهُمُ ٱلۡهُدَىٰ وَيَسۡتَغۡفِرُواْ رَبَّهُمۡ إِلَّآ أَن تَأۡتِيَهُمۡ سُنَّةُ ٱلۡأَوَّلِينَ أَوۡ يَأۡتِيَهُمُ ٱلۡعَذَابُ قُبُلٗا
५५. आणि लोकांजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर, त्यांना ईमान राखण्यापासून आणि आपल्या पालनकर्त्याजवळ क्षमा-याचना करण्यापासून केवळ याच गोष्टीने रोखले की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांसारखा व्यवहार त्यांच्याशीही केला जावा किंवा त्यांच्यासमोर शिक्षा –यातना (अज़ाब) उघड स्वरूपात यावी
Surah Al-Kahf, Verse 55
وَمَا نُرۡسِلُ ٱلۡمُرۡسَلِينَ إِلَّا مُبَشِّرِينَ وَمُنذِرِينَۚ وَيُجَٰدِلُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ بِٱلۡبَٰطِلِ لِيُدۡحِضُواْ بِهِ ٱلۡحَقَّۖ وَٱتَّخَذُوٓاْ ءَايَٰتِي وَمَآ أُنذِرُواْ هُزُوٗا
५६. आणि आम्ही तर आपल्या पैगंबरांना केवळ अशासाठी पाठवितो की त्यांनी शुभ-समाचार द्यावा आणि लोकांना सचेत करावे. इन्कारी लोक असत्याला पुरावा बनवून विवाद घालू इच्छितात की याद्वारे सत्य डळमळीत करावे. ते माझ्या आयतींची आणि ज्या गोष्टीचे भय दाखविले जावे तिची थट्टा उडवितात
Surah Al-Kahf, Verse 56
وَمَنۡ أَظۡلَمُ مِمَّن ذُكِّرَ بِـَٔايَٰتِ رَبِّهِۦ فَأَعۡرَضَ عَنۡهَا وَنَسِيَ مَا قَدَّمَتۡ يَدَاهُۚ إِنَّا جَعَلۡنَا عَلَىٰ قُلُوبِهِمۡ أَكِنَّةً أَن يَفۡقَهُوهُ وَفِيٓ ءَاذَانِهِمۡ وَقۡرٗاۖ وَإِن تَدۡعُهُمۡ إِلَى ٱلۡهُدَىٰ فَلَن يَهۡتَدُوٓاْ إِذًا أَبَدٗا
५७. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण आहे, ज्याला त्याच्या पालनकर्त्याच्या आयतींद्वारे उपदेश केला जावा तरीही त्याने तोंड फिरवून राहावे आणि जे काही त्याच्या हातांनी पुढे पाठविले आहे, ते विसरून जावे. निःसंशय, आम्ही त्यांच्या हृदयांवर ते समजण्यापासून पडदे टाकून ठेवले आहेत, आणि त्यांच्या कानात बधीरता. तुम्ही त्यांना मार्गदर्शनाकडे कितीही बोलवा, परंतु मार्गदर्शन त्यांना कधीही लाभणार नाही
Surah Al-Kahf, Verse 57
وَرَبُّكَ ٱلۡغَفُورُ ذُو ٱلرَّحۡمَةِۖ لَوۡ يُؤَاخِذُهُم بِمَا كَسَبُواْ لَعَجَّلَ لَهُمُ ٱلۡعَذَابَۚ بَل لَّهُم مَّوۡعِدٞ لَّن يَجِدُواْ مِن دُونِهِۦ مَوۡئِلٗا
५८. आणि तुमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे. तो जर त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा देण्यासाठी धरू इच्छिल तर निश्चितच त्यांना त्वरित शिक्षा देईल, परंतु त्यांच्यासाठी एक वायद्याची वेळ निर्धारीत आहे, ज्यापासून पळ काढण्याचे स्थान त्यांना कधीही लाभणार नाही
Surah Al-Kahf, Verse 58
وَتِلۡكَ ٱلۡقُرَىٰٓ أَهۡلَكۡنَٰهُمۡ لَمَّا ظَلَمُواْ وَجَعَلۡنَا لِمَهۡلِكِهِم مَّوۡعِدٗا
५९. आणि या त्या वस्त्या आहेत, ज्यांना आम्ही त्यांच्या अत्याचारापायी नष्ट करून टाकले आणि त्यांच्या विनाशाची एक वेळ आम्ही निश्चित करून ठेवली होती
Surah Al-Kahf, Verse 59
وَإِذۡ قَالَ مُوسَىٰ لِفَتَىٰهُ لَآ أَبۡرَحُ حَتَّىٰٓ أَبۡلُغَ مَجۡمَعَ ٱلۡبَحۡرَيۡنِ أَوۡ أَمۡضِيَ حُقُبٗا
६०. आणि जेव्हा मूसा आपल्या तरुणाला म्हणाले की मी तर चालतच राहीन येथेपर्यंत की दोन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पोहोचेन, मग त्यासाठी मला वर्षानुवर्षे का चालावे लागेना
Surah Al-Kahf, Verse 60
فَلَمَّا بَلَغَا مَجۡمَعَ بَيۡنِهِمَا نَسِيَا حُوتَهُمَا فَٱتَّخَذَ سَبِيلَهُۥ فِي ٱلۡبَحۡرِ سَرَبٗا
६१. जेव्हा ते दोघे त्या ठिकाणी पोहोचले, जे दोन नद्यांचे संगमस्थान होते, तिथे आपली मासळी विसरले, जिने नदीत भुयारासारखा आपला मार्ग बनवून घेतला
Surah Al-Kahf, Verse 61
فَلَمَّا جَاوَزَا قَالَ لِفَتَىٰهُ ءَاتِنَا غَدَآءَنَا لَقَدۡ لَقِينَا مِن سَفَرِنَا هَٰذَا نَصَبٗا
६२. जेव्हा ते दोघे तिथून निघून पुढे गेले तेव्हा मूसा आपल्या तरुणाला म्हणाले, आणा आमचा नाश्ता द्या. आम्हाला तर या प्रवासात खूपच त्रास घ्यावा लागला
Surah Al-Kahf, Verse 62
قَالَ أَرَءَيۡتَ إِذۡ أَوَيۡنَآ إِلَى ٱلصَّخۡرَةِ فَإِنِّي نَسِيتُ ٱلۡحُوتَ وَمَآ أَنسَىٰنِيهُ إِلَّا ٱلشَّيۡطَٰنُ أَنۡ أَذۡكُرَهُۥۚ وَٱتَّخَذَ سَبِيلَهُۥ فِي ٱلۡبَحۡرِ عَجَبٗا
६३. (त्याने) उत्तर दिले की, काय तुम्ही पाहिले नाही? जेव्हा आम्ही दगडाला टेका लावून आराम करीत होतो, तिथेच मी ती मासळी विसरलो, वस्तुतः सैतानाने मला विसर पाडला की तुमच्याजवळ या गोष्टीची चर्चा करावी. त्या मासळीने मोठ्या चमत्कारिकरित्या नदीत आपला मार्ग बनवून घेतला
Surah Al-Kahf, Verse 63
قَالَ ذَٰلِكَ مَا كُنَّا نَبۡغِۚ فَٱرۡتَدَّا عَلَىٰٓ ءَاثَارِهِمَا قَصَصٗا
६४. (मूसा) म्हणाले, हेच ते ठिकाण होते, ज्याच्या शोधात आम्ही होतो तेव्हा ते तिथूनच आपल्या पद-चिन्हांना शोधत परत फिरले
Surah Al-Kahf, Verse 64
فَوَجَدَا عَبۡدٗا مِّنۡ عِبَادِنَآ ءَاتَيۡنَٰهُ رَحۡمَةٗ مِّنۡ عِندِنَا وَعَلَّمۡنَٰهُ مِن لَّدُنَّا عِلۡمٗا
६५. मग त्यांना आमच्या दासांपैकी एक दास भेटला, ज्याला आम्ही आपल्या जवळून विशेष दया-कृपा प्रदान केली होती आणि त्याला आपल्या जवळून खास ज्ञानही शिकविले होते
Surah Al-Kahf, Verse 65
قَالَ لَهُۥ مُوسَىٰ هَلۡ أَتَّبِعُكَ عَلَىٰٓ أَن تُعَلِّمَنِ مِمَّا عُلِّمۡتَ رُشۡدٗا
६६. मूसा त्याला म्हणाले, आपण मला आज्ञा पाळेल की आपण मला ते सत्य ज्ञान शिकवावे, जे आपणास शिकविले गेले आहे
Surah Al-Kahf, Verse 66
قَالَ إِنَّكَ لَن تَسۡتَطِيعَ مَعِيَ صَبۡرٗا
६७. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत धीर-संयम राखू शकत नाही
Surah Al-Kahf, Verse 67
وَكَيۡفَ تَصۡبِرُ عَلَىٰ مَا لَمۡ تُحِطۡ بِهِۦ خُبۡرٗا
६८. आणि ज्या गोष्टीला तुम्ही आपल्या ज्ञानकक्षेत घेतले नसेल त्यावर धीर-संयम कसे राखू शकता
Surah Al-Kahf, Verse 68
قَالَ سَتَجِدُنِيٓ إِن شَآءَ ٱللَّهُ صَابِرٗا وَلَآ أَعۡصِي لَكَ أَمۡرٗا
६९. मूसाने उत्तर दिले की अल्लाहने इच्छिल्यास मी तुम्हाला धीर-संयम राखणाऱ्यांपैकी आढळून येईल आणि कोणत्याही बाबतीत तुमची अवज्ञा करणार नाही
Surah Al-Kahf, Verse 69
قَالَ فَإِنِ ٱتَّبَعۡتَنِي فَلَا تَسۡـَٔلۡنِي عَن شَيۡءٍ حَتَّىٰٓ أُحۡدِثَ لَكَ مِنۡهُ ذِكۡرٗا
७०. (तो) म्हणाला, जर तुम्ही माझ्यासोबतच चालण्याचा आग्रह धरता तर लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीबाबत मला काही विचारु नका जोपर्यंत मी स्वतः त्याबाबत न सांगावे
Surah Al-Kahf, Verse 70
فَٱنطَلَقَا حَتَّىٰٓ إِذَا رَكِبَا فِي ٱلسَّفِينَةِ خَرَقَهَاۖ قَالَ أَخَرَقۡتَهَا لِتُغۡرِقَ أَهۡلَهَا لَقَدۡ جِئۡتَ شَيۡـًٔا إِمۡرٗا
७१. मग ते दोघे तेथून निघाले, येथेपर्यंत की एका नौकेत बसले (खिज्रने) नौकेच्या फळ्या तोडल्या. (मूसा) म्हणाले, काय तुम्ही नौका तोडत आहात की नौकेत बसलेल्यांना बुडवून टाकावे? तुम्ही तर हे मोठे अनुचित काम केले
Surah Al-Kahf, Verse 71
قَالَ أَلَمۡ أَقُلۡ إِنَّكَ لَن تَسۡتَطِيعَ مَعِيَ صَبۡرٗا
७२. (ख्रिजने) उत्तर दिले की मी आधीच तुम्हाला बोललो होतो की तुम्ही माझ्यासोबत राहून धीर-संयम राखू शकणार नाही
Surah Al-Kahf, Verse 72
قَالَ لَا تُؤَاخِذۡنِي بِمَا نَسِيتُ وَلَا تُرۡهِقۡنِي مِنۡ أَمۡرِي عُسۡرٗا
७३. (मूसा) म्हणाले की माझ्या या चुकीबद्दल मला धरू नका आणि माझ्या बाबतीत सक्तीने वागू नका
Surah Al-Kahf, Verse 73
فَٱنطَلَقَا حَتَّىٰٓ إِذَا لَقِيَا غُلَٰمٗا فَقَتَلَهُۥ قَالَ أَقَتَلۡتَ نَفۡسٗا زَكِيَّةَۢ بِغَيۡرِ نَفۡسٖ لَّقَدۡ جِئۡتَ شَيۡـٔٗا نُّكۡرٗا
७४. मग दोघे निघाले, येथेपर्यंत की त्यांना एक बालक दिसले, (खिज्रने) त्या बालकाला मारून टाकले. (मूसा) म्हणाले की, तुम्ही तर एका निरपराधाचा जीव घेतला. वास्तविक त्याने कोणाची हत्या केली नव्हती. निःसंशय, तुम्ही हे मोठे वाईट कृत्य केले
Surah Al-Kahf, Verse 74
۞قَالَ أَلَمۡ أَقُل لَّكَ إِنَّكَ لَن تَسۡتَطِيعَ مَعِيَ صَبۡرٗا
७५. ते म्हणाले, काय मी तुम्हाला सांगितले नव्हते की तुम्ही माझ्यासोबत राहून कधीही धीर-संयम राखू शकत नाही
Surah Al-Kahf, Verse 75
قَالَ إِن سَأَلۡتُكَ عَن شَيۡءِۭ بَعۡدَهَا فَلَا تُصَٰحِبۡنِيۖ قَدۡ بَلَغۡتَ مِن لَّدُنِّي عُذۡرٗا
७६. (मूसा यांनी) उत्तर दिले, आता जर यानंतर मी तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत काही विचारले तर बेलाशक तुम्ही मला आपल्यासोबत ठेवू नका, निःसंशय, माझ्यातर्फे तुम्ही सबबीस पोहचला आहात
Surah Al-Kahf, Verse 76
فَٱنطَلَقَا حَتَّىٰٓ إِذَآ أَتَيَآ أَهۡلَ قَرۡيَةٍ ٱسۡتَطۡعَمَآ أَهۡلَهَا فَأَبَوۡاْ أَن يُضَيِّفُوهُمَا فَوَجَدَا فِيهَا جِدَارٗا يُرِيدُ أَن يَنقَضَّ فَأَقَامَهُۥۖ قَالَ لَوۡ شِئۡتَ لَتَّخَذۡتَ عَلَيۡهِ أَجۡرٗا
७७. पुन्हा दोघे निघाले, एका गावाच्या लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याजवळ जेवण मागितले. त्यांनी त्यांचा पाहुणचार करण्यास नकार दिला. दोघांना त्या ठिकाणी एक भिंत आढळली, जी कोसळण्याच्या बेतात होती, त्याने तिला सरळ केले (मूसा) म्हणाले, जर तुम्ही इच्छिले असते तर या (कामा) बद्दल मजुरी घेतली असती
Surah Al-Kahf, Verse 77
قَالَ هَٰذَا فِرَاقُ بَيۡنِي وَبَيۡنِكَۚ سَأُنَبِّئُكَ بِتَأۡوِيلِ مَا لَمۡ تَسۡتَطِع عَّلَيۡهِ صَبۡرًا
७८. तो म्हणाला, आता मात्र माझ्या आणि तुझ्या दरम्यान वेगळे होण्याची वेळ आली आहे, तेव्हा मी तुला त्या गोष्टींची हकीकत सांगतो, ज्यावर तुम्ही धीर-संयम राखू शकले नाही
Surah Al-Kahf, Verse 78
أَمَّا ٱلسَّفِينَةُ فَكَانَتۡ لِمَسَٰكِينَ يَعۡمَلُونَ فِي ٱلۡبَحۡرِ فَأَرَدتُّ أَنۡ أَعِيبَهَا وَكَانَ وَرَآءَهُم مَّلِكٞ يَأۡخُذُ كُلَّ سَفِينَةٍ غَصۡبٗا
७९. ती नौका काही काही गरीब लोकांची होती, जे नदीत काम करीत असत. मी तिच्यात काही तोडफोड करण्याचे ठरविले कारण पुढच्या इलाक्यात एक राजा होता, जो प्रत्येक चांगली नौका जबरदस्तीने (आपल्या ताब्यात) घेत असे
Surah Al-Kahf, Verse 79
وَأَمَّا ٱلۡغُلَٰمُ فَكَانَ أَبَوَاهُ مُؤۡمِنَيۡنِ فَخَشِينَآ أَن يُرۡهِقَهُمَا طُغۡيَٰنٗا وَكُفۡرٗا
८०. आणि त्या तरुणाचे आई-बाप ईमान राखणारे होते. आम्हाला ही भीती वाटली की कदाचित हा त्यांना आपल्या बंडखोरी आणि अधार्मिकतेने लाचार व व्याकूळ न करून टाको
Surah Al-Kahf, Verse 80
فَأَرَدۡنَآ أَن يُبۡدِلَهُمَا رَبُّهُمَا خَيۡرٗا مِّنۡهُ زَكَوٰةٗ وَأَقۡرَبَ رُحۡمٗا
८१. म्हणून आम्ही इच्छिले की त्यांना त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) त्याच्याऐवजी त्याहून उत्तम पवित्र आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रिय आणि आवडता पुत्र प्रदान करो
Surah Al-Kahf, Verse 81
وَأَمَّا ٱلۡجِدَارُ فَكَانَ لِغُلَٰمَيۡنِ يَتِيمَيۡنِ فِي ٱلۡمَدِينَةِ وَكَانَ تَحۡتَهُۥ كَنزٞ لَّهُمَا وَكَانَ أَبُوهُمَا صَٰلِحٗا فَأَرَادَ رَبُّكَ أَن يَبۡلُغَآ أَشُدَّهُمَا وَيَسۡتَخۡرِجَا كَنزَهُمَا رَحۡمَةٗ مِّن رَّبِّكَۚ وَمَا فَعَلۡتُهُۥ عَنۡ أَمۡرِيۚ ذَٰلِكَ تَأۡوِيلُ مَا لَمۡ تَسۡطِع عَّلَيۡهِ صَبۡرٗا
८२. आणि भिंतीचा किस्सा असा की त्या शहरात दोन अनाथ मुले आहेत, ज्यांचा खजिना (धन) त्यांच्या त्या भिंतीखाली गाडलेला आहे. त्यांचे पिता मोठे नेक सदाचारी होते. तेव्हा तुमचा पालनकर्ता इच्छित होता की या दोन्ही अनाथ मुलांनी आपल्या तरुण वयास पोहोचून आपला हा खजिना, तुमच्या पालनकर्त्याच्या दया-कृपेने आणि मेहरबानीने काढून घ्यावा. मी स्वतःच्या इराद्याने (आणि इच्छेने) कोणतेही काम केले नाही. ही हकीकत होती त्या घटनांची ज्यांच्याबाबत तुम्ही धीर-संयम राखू शकले नाहीत
Surah Al-Kahf, Verse 82
وَيَسۡـَٔلُونَكَ عَن ذِي ٱلۡقَرۡنَيۡنِۖ قُلۡ سَأَتۡلُواْ عَلَيۡكُم مِّنۡهُ ذِكۡرًا
८३. आणि तुम्हाला जुल्करनैनच्या घटनेविषयी हे लोक विचारतात, (तुम्ही) सांगा की मी त्यांचा थोडासा वृत्तांत तुम्हाला वाचून ऐकवितो
Surah Al-Kahf, Verse 83
إِنَّا مَكَّنَّا لَهُۥ فِي ٱلۡأَرۡضِ وَءَاتَيۡنَٰهُ مِن كُلِّ شَيۡءٖ سَبَبٗا
८४. आम्ही धरतीवर त्याला शक्ती-सामर्थ्य प्रदान केले होते, आणि त्याला प्रत्येक गोष्टीची साधनेही प्रदान केली होती
Surah Al-Kahf, Verse 84
فَأَتۡبَعَ سَبَبًا
८५. तो एका मार्गामागे लागला
Surah Al-Kahf, Verse 85
حَتَّىٰٓ إِذَا بَلَغَ مَغۡرِبَ ٱلشَّمۡسِ وَجَدَهَا تَغۡرُبُ فِي عَيۡنٍ حَمِئَةٖ وَوَجَدَ عِندَهَا قَوۡمٗاۖ قُلۡنَا يَٰذَا ٱلۡقَرۡنَيۡنِ إِمَّآ أَن تُعَذِّبَ وَإِمَّآ أَن تَتَّخِذَ فِيهِمۡ حُسۡنٗا
८६. येथेपर्यंत की सूर्यास्ताच्या ठिकाणापर्यंत पोहोचला आणि त्याला (सूर्याला) एका दलदलीच्या प्रवाहात बुडताना पाहिले आणि त्या प्रवाहाच्या ठिकाणावर एक जनसमूहही आढळला. आम्ही सांगितले, हे जुल्करनैन! तू त्यांना शिक्षा दे किंवा त्यांच्या बाबतीत एखादा चांगला मार्ग काढ
Surah Al-Kahf, Verse 86
قَالَ أَمَّا مَن ظَلَمَ فَسَوۡفَ نُعَذِّبُهُۥ ثُمَّ يُرَدُّ إِلَىٰ رَبِّهِۦ فَيُعَذِّبُهُۥ عَذَابٗا نُّكۡرٗا
८७. तो म्हणाला, जो अत्याचार करेल, त्याला तर आम्हीही आता शिक्षा देऊ. मग तो आपल्या पालनकर्त्याकडे परतविला जाईल आणि तो त्याला सक्त सजा-यातना देईल
Surah Al-Kahf, Verse 87
وَأَمَّا مَنۡ ءَامَنَ وَعَمِلَ صَٰلِحٗا فَلَهُۥ جَزَآءً ٱلۡحُسۡنَىٰۖ وَسَنَقُولُ لَهُۥ مِنۡ أَمۡرِنَا يُسۡرٗا
८८. परंतु जो ईमान राखेल आणि सत्कर्म करेल तर त्याच्याकरिता मोबदल्यात भलाई आहे आणि त्याला आपल्या कामातही सोपेपणाचा आदेश देऊ
Surah Al-Kahf, Verse 88
ثُمَّ أَتۡبَعَ سَبَبًا
८९. मग तो दुसऱ्या एका मार्गास लागला
Surah Al-Kahf, Verse 89
حَتَّىٰٓ إِذَا بَلَغَ مَطۡلِعَ ٱلشَّمۡسِ وَجَدَهَا تَطۡلُعُ عَلَىٰ قَوۡمٖ لَّمۡ نَجۡعَل لَّهُم مِّن دُونِهَا سِتۡرٗا
९०. येथेपर्यंत की जेव्हा तो सूर्योदयाच्या ठिकाणापर्यंत पोहोचला तेव्हा सूर्याला एका अशा जनसमूहावर उगवताना पाहिले की त्यांच्याकरिता आम्ही त्यापासून कोणताही आडपडदा राखला नाही
Surah Al-Kahf, Verse 90
كَذَٰلِكَۖ وَقَدۡ أَحَطۡنَا بِمَا لَدَيۡهِ خُبۡرٗا
९१. घटना अशीच आहे, आम्ही त्याच्या जवळपासच्या समस्त खबरी घेरून ठेवल्या आहेत.१
Surah Al-Kahf, Verse 91
ثُمَّ أَتۡبَعَ سَبَبًا
९२. मग तो दुसऱ्या एका मार्गाकडे निघाला
Surah Al-Kahf, Verse 92
حَتَّىٰٓ إِذَا بَلَغَ بَيۡنَ ٱلسَّدَّيۡنِ وَجَدَ مِن دُونِهِمَا قَوۡمٗا لَّا يَكَادُونَ يَفۡقَهُونَ قَوۡلٗا
९३. येथेपर्यंत की जेव्हा दोन भिंतींच्या दरम्यान पोहोचला, त्या दोघींच्या पलीकडे अशी जमात आढळली, जी गोष्ट समजून घेण्याच्या जवळही नव्हती
Surah Al-Kahf, Verse 93
قَالُواْ يَٰذَا ٱلۡقَرۡنَيۡنِ إِنَّ يَأۡجُوجَ وَمَأۡجُوجَ مُفۡسِدُونَ فِي ٱلۡأَرۡضِ فَهَلۡ نَجۡعَلُ لَكَ خَرۡجًا عَلَىٰٓ أَن تَجۡعَلَ بَيۡنَنَا وَبَيۡنَهُمۡ سَدّٗا
९४. (त्यांनी) सांगितले हे जुल्करनैन! याजूज आणि माजूज या देशात मोठा उपद्रव व उत्पात पसरवित आहे. तर काय आम्ही तुमच्याकरिता काही धन जमा करून द्यावे (या अटीवर की) तुम्ही आमच्या आणि त्यांच्या दरम्यान एखादी भिंत बनवावी
Surah Al-Kahf, Verse 94
قَالَ مَا مَكَّنِّي فِيهِ رَبِّي خَيۡرٞ فَأَعِينُونِي بِقُوَّةٍ أَجۡعَلۡ بَيۡنَكُمۡ وَبَيۡنَهُمۡ رَدۡمًا
९५. त्याने उत्तर दिले की माझ्याजवळ, माझ्या पालनकर्त्याने जे प्रदान केले आहे, तेच उत्तम आहे. तुम्ही फक्त आपली शक्ती आणि सामर्थ्याने माझी मदत करा. तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान मी भक्कम भिंत बनवून देतो
Surah Al-Kahf, Verse 95
ءَاتُونِي زُبَرَ ٱلۡحَدِيدِۖ حَتَّىٰٓ إِذَا سَاوَىٰ بَيۡنَ ٱلصَّدَفَيۡنِ قَالَ ٱنفُخُواْۖ حَتَّىٰٓ إِذَا جَعَلَهُۥ نَارٗا قَالَ ءَاتُونِيٓ أُفۡرِغۡ عَلَيۡهِ قِطۡرٗا
९६. मला लोखंडाची चादर आणून द्या, येथेपर्यंत की जेव्हा त्या दोन पर्वतांच्या दरम्यान भिंत उभारून दिली तेव्हा आदेश दिला की फूंक मारा (अर्थात प्रखर आग प्रज्वलित करा) त्या वेळेपर्यंत की लोखंडाच्या या चादरींना अगदी आग करून टाकले, तेव्हा सांगितले, माझ्याजवळ आणा, याच्यावर वितळलेले तांबे टाकतो
Surah Al-Kahf, Verse 96
فَمَا ٱسۡطَٰعُوٓاْ أَن يَظۡهَرُوهُ وَمَا ٱسۡتَطَٰعُواْ لَهُۥ نَقۡبٗا
९७. मग ना तर त्यांच्यात त्या भिंतीवर चढण्यचाची शक्ती होती आणि ना तिच्यात एखादे छिद्र करू शकत होते
Surah Al-Kahf, Verse 97
قَالَ هَٰذَا رَحۡمَةٞ مِّن رَّبِّيۖ فَإِذَا جَآءَ وَعۡدُ رَبِّي جَعَلَهُۥ دَكَّآءَۖ وَكَانَ وَعۡدُ رَبِّي حَقّٗا
९८. सांगितले की ही केवळ माझ्या पालनकर्त्याची दया-कृपा आहे, परंतु जेव्हा माझ्या पालनकर्त्याचा वायदा (आदेश) येईल तेव्हा त्याचे तुकडे तुकडे करून टाकेल. निःसंशय, माझ्या पालनकर्त्याचा वायदा सच्चा आहे
Surah Al-Kahf, Verse 98
۞وَتَرَكۡنَا بَعۡضَهُمۡ يَوۡمَئِذٖ يَمُوجُ فِي بَعۡضٖۖ وَنُفِخَ فِي ٱلصُّورِ فَجَمَعۡنَٰهُمۡ جَمۡعٗا
९९. आणि त्या दिवशी आम्ही त्यांना आपसात एकमेकांशी मिसळत असताना सोडून देऊ आणि सूर (शंख) फूंकला जाईल, मग सर्वांना आम्ही एकाच वेळी जमा करू
Surah Al-Kahf, Verse 99
وَعَرَضۡنَا جَهَنَّمَ يَوۡمَئِذٖ لِّلۡكَٰفِرِينَ عَرۡضًا
१००. आणि त्या दिवशी आम्ही जहन्नमला (देखील) काफिरांच्या समोर आणून उभी करू
Surah Al-Kahf, Verse 100
ٱلَّذِينَ كَانَتۡ أَعۡيُنُهُمۡ فِي غِطَآءٍ عَن ذِكۡرِي وَكَانُواْ لَا يَسۡتَطِيعُونَ سَمۡعًا
१०१. ज्यांचे डोळे माझ्या स्मरणापासून पडद्यात होते आणि (सत्य) ऐकूही शकत नव्हते
Surah Al-Kahf, Verse 101
أَفَحَسِبَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ أَن يَتَّخِذُواْ عِبَادِي مِن دُونِيٓ أَوۡلِيَآءَۚ إِنَّآ أَعۡتَدۡنَا جَهَنَّمَ لِلۡكَٰفِرِينَ نُزُلٗا
१०२. काय काफिर हा विचार करून बसले आहेत की माझ्याशिवाय ते माझ्या दासांना आपला समर्थक बनवून घेतील? (ऐका) आम्ही तर त्या काफिरांच्या पाहुणचारासाठी जहन्नम तयार करून ठेवली आहे
Surah Al-Kahf, Verse 102
قُلۡ هَلۡ نُنَبِّئُكُم بِٱلۡأَخۡسَرِينَ أَعۡمَٰلًا
१०३. सांगा की (तुम्ही सांगत असाल) तर मी सांगतो की आपल्या कर्मांमुळे सर्वांत जास्त नुकसान उचलणारा कोण आहे
Surah Al-Kahf, Verse 103
ٱلَّذِينَ ضَلَّ سَعۡيُهُمۡ فِي ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَا وَهُمۡ يَحۡسَبُونَ أَنَّهُمۡ يُحۡسِنُونَ صُنۡعًا
१०४. ते लोक आहेत, ज्यांचे ऐहिक जीवनाचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले, आणि ते याच भ्रमात राहिले की ते फार चांगले काम करीत आहेत
Surah Al-Kahf, Verse 104
أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ بِـَٔايَٰتِ رَبِّهِمۡ وَلِقَآئِهِۦ فَحَبِطَتۡ أَعۡمَٰلُهُمۡ فَلَا نُقِيمُ لَهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ وَزۡنٗا
१०५. हेच ते लोक होते, ज्यांनी आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या आयतींशी आणि त्याच्याशी भेट होण्याचा इन्कार केला, यास्तव त्यांची सर्व कर्मे वाया गेलीत. मग कयामतच्या दिवशी आम्ही त्यांचा कसलाही भार निश्चित करणार नाही
Surah Al-Kahf, Verse 105
ذَٰلِكَ جَزَآؤُهُمۡ جَهَنَّمُ بِمَا كَفَرُواْ وَٱتَّخَذُوٓاْ ءَايَٰتِي وَرُسُلِي هُزُوًا
१०६. वस्तुतः त्यांचा मोबदला जहन्नम आहे, कारण त्यांनी इन्कार केला आणि माझ्या आयतींची आणि माझ्या पैगंबरांची थट्टा उडविली
Surah Al-Kahf, Verse 106
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ كَانَتۡ لَهُمۡ جَنَّـٰتُ ٱلۡفِرۡدَوۡسِ نُزُلًا
१०७. ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, निश्चितच त्यांच्यासाठी फिर्दोस१ (जन्नतमधील सर्वोच्च स्थान) च्या बागांमध्ये स्वागत आहे
Surah Al-Kahf, Verse 107
خَٰلِدِينَ فِيهَا لَا يَبۡغُونَ عَنۡهَا حِوَلٗا
१०८. जिथे ते नेहमी राहतील, जे स्थान बदलण्याचा कधीही त्यांचा इरादा होणार नाही
Surah Al-Kahf, Verse 108
قُل لَّوۡ كَانَ ٱلۡبَحۡرُ مِدَادٗا لِّكَلِمَٰتِ رَبِّي لَنَفِدَ ٱلۡبَحۡرُ قَبۡلَ أَن تَنفَدَ كَلِمَٰتُ رَبِّي وَلَوۡ جِئۡنَا بِمِثۡلِهِۦ مَدَدٗا
१०९. सांगा की जर माझ्या पालनकर्त्याच्या गोष्टी (प्रशंसा व गुणगान) लिहिण्याकरिता समुद्र शाई बनला तर तोही माझ्या पालनकर्त्याच्या गोष्टी संपण्यापूर्वीच संपून जाईल, मग वाटल्यास आम्ही त्यासारखाच दुसरा (समुद्र) त्याच्या मदतीकरिता घेऊन यावे
Surah Al-Kahf, Verse 109
قُلۡ إِنَّمَآ أَنَا۠ بَشَرٞ مِّثۡلُكُمۡ يُوحَىٰٓ إِلَيَّ أَنَّمَآ إِلَٰهُكُمۡ إِلَٰهٞ وَٰحِدٞۖ فَمَن كَانَ يَرۡجُواْ لِقَآءَ رَبِّهِۦ فَلۡيَعۡمَلۡ عَمَلٗا صَٰلِحٗا وَلَا يُشۡرِكۡ بِعِبَادَةِ رَبِّهِۦٓ أَحَدَۢا
११०. तुम्ही सांगा की मी तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे (होय)माझ्याकडे वह्यी(प्रकाशना)केली जाते की सर्वांचा उपास्य केवळ एकच उपास्य आहे, तर ज्याला देखील आपल्या पालनकर्त्याशी भेटण्याची आशा असेल, त्याने सत्कर्म करीत राहिले पाहिजे, आणि आपल्या पालनकर्त्याच्या भक्ती-उपासनेत१ दुसऱ्या कोणालाही सहभागी करू नये
Surah Al-Kahf, Verse 110