Surah Al-Hajj - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ٱتَّقُواْ رَبَّكُمۡۚ إِنَّ زَلۡزَلَةَ ٱلسَّاعَةِ شَيۡءٌ عَظِيمٞ
१. लोक हो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा, निःसंशय कयामतचा भूकंप फार जबरदस्त गोष्ट आहे
Surah Al-Hajj, Verse 1
يَوۡمَ تَرَوۡنَهَا تَذۡهَلُ كُلُّ مُرۡضِعَةٍ عَمَّآ أَرۡضَعَتۡ وَتَضَعُ كُلُّ ذَاتِ حَمۡلٍ حَمۡلَهَا وَتَرَى ٱلنَّاسَ سُكَٰرَىٰ وَمَا هُم بِسُكَٰرَىٰ وَلَٰكِنَّ عَذَابَ ٱللَّهِ شَدِيدٞ
२. ज्या दिवशी तुम्ही तो पाहाल, प्रत्येक दूध पाजणारी माता आपल्या दूध पिणाऱ्या बाळाला विसरेल आणि सर्व गर्भवती स्त्रियांचा गर्भपात होईल, आणि तुम्ही पाहाल की लोक मदहोश दिसून येतील, वास्तविक मदहोश नसतील, परंतु अल्लाहचा अज़ाब (शिक्षा- यातना) मोठा कठोर आहे
Surah Al-Hajj, Verse 2
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يُجَٰدِلُ فِي ٱللَّهِ بِغَيۡرِ عِلۡمٖ وَيَتَّبِعُ كُلَّ شَيۡطَٰنٖ مَّرِيدٖ
३. आणि काही लोक अल्लाहविषयी अज्ञानपूर्ण गोष्टी बोलतात, आणि प्रत्येक उदंड सैतानाचे अनुसरण करतात
Surah Al-Hajj, Verse 3
كُتِبَ عَلَيۡهِ أَنَّهُۥ مَن تَوَلَّاهُ فَأَنَّهُۥ يُضِلُّهُۥ وَيَهۡدِيهِ إِلَىٰ عَذَابِ ٱلسَّعِيرِ
४. ज्याच्याबद्दल अल्लाहचा फैसला लिहिला गेला आहे की जो कोणी त्याच्याशी दोस्ती करेल, तो त्याला मार्गभ्रष्ट करेल आणि त्याला आगीच्या शिक्षा-यातनेकडे नेईल
Surah Al-Hajj, Verse 4
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ إِن كُنتُمۡ فِي رَيۡبٖ مِّنَ ٱلۡبَعۡثِ فَإِنَّا خَلَقۡنَٰكُم مِّن تُرَابٖ ثُمَّ مِن نُّطۡفَةٖ ثُمَّ مِنۡ عَلَقَةٖ ثُمَّ مِن مُّضۡغَةٖ مُّخَلَّقَةٖ وَغَيۡرِ مُخَلَّقَةٖ لِّنُبَيِّنَ لَكُمۡۚ وَنُقِرُّ فِي ٱلۡأَرۡحَامِ مَا نَشَآءُ إِلَىٰٓ أَجَلٖ مُّسَمّٗى ثُمَّ نُخۡرِجُكُمۡ طِفۡلٗا ثُمَّ لِتَبۡلُغُوٓاْ أَشُدَّكُمۡۖ وَمِنكُم مَّن يُتَوَفَّىٰ وَمِنكُم مَّن يُرَدُّ إِلَىٰٓ أَرۡذَلِ ٱلۡعُمُرِ لِكَيۡلَا يَعۡلَمَ مِنۢ بَعۡدِ عِلۡمٖ شَيۡـٔٗاۚ وَتَرَى ٱلۡأَرۡضَ هَامِدَةٗ فَإِذَآ أَنزَلۡنَا عَلَيۡهَا ٱلۡمَآءَ ٱهۡتَزَّتۡ وَرَبَتۡ وَأَنۢبَتَتۡ مِن كُلِّ زَوۡجِۭ بَهِيجٖ
५. लोकांनो! जर तुम्हाला मेल्यानंतर (पुन्हा) जिवंत होण्याबाबत शंका आहे, तर विचार करा, आम्ही तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग वीर्यापासून, मग जमलेल्या रक्तापासून, आणि मांसाच्या तुकड्यापासून जे रूप दिले गेले होते आणि विनारूपही होते. हे आम्ही तुमच्यावर स्पष्ट करतो आणि आम्ही ज्याला इच्छितो एका निर्धारित अवधीपर्यंत मातेच्या उदरात ठेवतो, मग तुम्हाला बाळाच्या रूपाने या जगात आणतो मग यासाठी की तुम्ही आपल्या पूर्ण तरुणपणास पोहचावे, तुमच्यापैकी काही असे आहेत जे मरण पावतात आणि काही जीर्ण वयाकडे पुन्हा परतविले जातात की ते एका गोष्टीशी परिचित झाल्यानंतर दुसऱ्यांदा अनभिज्ञ व्हावेत. तुम्ही पाहता की जमीन नापीक आणि कोरडी आहे, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पाऊस पाडतो तेव्हा ती चेतनामय होते आणि फुगते आणि प्रत्येक प्रकारची सुंदर वनस्पती उगविते
Surah Al-Hajj, Verse 5
ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡحَقُّ وَأَنَّهُۥ يُحۡيِ ٱلۡمَوۡتَىٰ وَأَنَّهُۥ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٞ
६. हे अशासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि तोच मेलेल्यांना जिवंत करतो आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो
Surah Al-Hajj, Verse 6
وَأَنَّ ٱلسَّاعَةَ ءَاتِيَةٞ لَّا رَيۡبَ فِيهَا وَأَنَّ ٱللَّهَ يَبۡعَثُ مَن فِي ٱلۡقُبُورِ
७. आणि हे की कयामत निश्चितच येणार आहे, ज्याबाबत कसलीही शंका नाही आणि अगदी खात्रीने अल्लाह कबरीत असलेल्यांना दुसऱ्यांदा जिवंत करेल
Surah Al-Hajj, Verse 7
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يُجَٰدِلُ فِي ٱللَّهِ بِغَيۡرِ عِلۡمٖ وَلَا هُدٗى وَلَا كِتَٰبٖ مُّنِيرٖ
८. आणि काही लोक अल्लाहविषयी ज्ञानाविना, आणि मार्गदर्शनाविना आणि कोणत्याही दिव्य ग्रंथाविना वाद घालतात
Surah Al-Hajj, Verse 8
ثَانِيَ عِطۡفِهِۦ لِيُضِلَّ عَن سَبِيلِ ٱللَّهِۖ لَهُۥ فِي ٱلدُّنۡيَا خِزۡيٞۖ وَنُذِيقُهُۥ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ عَذَابَ ٱلۡحَرِيقِ
९. आपला पैलू वळवून घेणारा बनून (ताठरपणे) यासाठी की अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करावे तो या जगातही अपमानित होईल, आणि कयामतच्या दिवशीही आम्ही त्याला जहन्नमच्या आगीत जळण्याची शिक्षा - यातना चाखवू
Surah Al-Hajj, Verse 9
ذَٰلِكَ بِمَا قَدَّمَتۡ يَدَاكَ وَأَنَّ ٱللَّهَ لَيۡسَ بِظَلَّـٰمٖ لِّلۡعَبِيدِ
१०. हे त्या कर्मांपायी, जी तुझ्या हातांनी पुढे पाठविली होती, मात्र विश्वास राखा की अल्लाह आपल्या दासांवर अत्याचार करणारा नाही
Surah Al-Hajj, Verse 10
وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يَعۡبُدُ ٱللَّهَ عَلَىٰ حَرۡفٖۖ فَإِنۡ أَصَابَهُۥ خَيۡرٌ ٱطۡمَأَنَّ بِهِۦۖ وَإِنۡ أَصَابَتۡهُ فِتۡنَةٌ ٱنقَلَبَ عَلَىٰ وَجۡهِهِۦ خَسِرَ ٱلدُّنۡيَا وَٱلۡأٓخِرَةَۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلۡخُسۡرَانُ ٱلۡمُبِينُ
११. आणि काही लोक असेही आहेत, जे एका किनाऱ्याला राहून अल्लाहची उपासना करतात, जर काही लाभ झाला तर समाधानी होतात, आणि जर एखादे दुःख वाट्याला आले तर त्याच क्षणी माघारी फिरतात. त्यांनी इहलोक आणि परलोक दोघांचे नुकसान उचलले. वस्तुतः हेच उघड नुकसान आहे
Surah Al-Hajj, Verse 11
يَدۡعُواْ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَضُرُّهُۥ وَمَا لَا يَنفَعُهُۥۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلضَّلَٰلُ ٱلۡبَعِيدُ
१२. ते अल्लाहखेरीज त्यांना पुकारतात जे ना नुकसान पोहचवू शकतात ना फायदा. हीच ती दूरची मार्गभ्रष्टता आहे
Surah Al-Hajj, Verse 12
يَدۡعُواْ لَمَن ضَرُّهُۥٓ أَقۡرَبُ مِن نَّفۡعِهِۦۚ لَبِئۡسَ ٱلۡمَوۡلَىٰ وَلَبِئۡسَ ٱلۡعَشِيرُ
१३. अशाला पुकारतात ज्यांचे नुकसान, लाभापेक्षा अधिक जवळ आहे निःसंशय मोठे वाईट संरक्षक आहेत आणि वाईट दोस्त
Surah Al-Hajj, Verse 13
إِنَّ ٱللَّهَ يُدۡخِلُ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُۚ إِنَّ ٱللَّهَ يَفۡعَلُ مَا يُرِيدُ
१४. निःसंशय, ईमान (राखून) सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह, अशा जन्नतमध्ये दाखल करील जिच्या खाली प्रवाह वाहत असतील. अल्लाह जे इच्छितो ते निश्चित करतो
Surah Al-Hajj, Verse 14
مَن كَانَ يَظُنُّ أَن لَّن يَنصُرَهُ ٱللَّهُ فِي ٱلدُّنۡيَا وَٱلۡأٓخِرَةِ فَلۡيَمۡدُدۡ بِسَبَبٍ إِلَى ٱلسَّمَآءِ ثُمَّ لۡيَقۡطَعۡ فَلۡيَنظُرۡ هَلۡ يُذۡهِبَنَّ كَيۡدُهُۥ مَا يَغِيظُ
१५. ज्याला हे वाटत असेल की अल्लाह आपल्या पैगंबरांची मदत दोन्ही लोकात (इहलोक आणि परलोक) करणार नाही, तर त्याने उंच जागी एक दोर बांधून (आपल्या गळ्यात फास टाकून घ्यावा) आणि गळा घोटून घ्यावा, मग पाहावे की त्याच्या चतुराईने ती गोष्ट दूर होते जी त्याला कासाविस करीत आहे
Surah Al-Hajj, Verse 15
وَكَذَٰلِكَ أَنزَلۡنَٰهُ ءَايَٰتِۭ بَيِّنَٰتٖ وَأَنَّ ٱللَّهَ يَهۡدِي مَن يُرِيدُ
१६. आणि आम्ही अशआच प्रकारे या कुरआनाला स्पष्ट आयतींमध्ये अवतरित केले आहे आणि अल्लाह ज्याला इच्छितो, मार्गदर्शन करतो
Surah Al-Hajj, Verse 16
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَٱلَّذِينَ هَادُواْ وَٱلصَّـٰبِـِٔينَ وَٱلنَّصَٰرَىٰ وَٱلۡمَجُوسَ وَٱلَّذِينَ أَشۡرَكُوٓاْ إِنَّ ٱللَّهَ يَفۡصِلُ بَيۡنَهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِۚ إِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ شَهِيدٌ
१७. ईमान राखणारे, आणि यहूदी (ज्यू) आणि विधर्मी आणि ख्रिश्चन आणि अग्नीपूजक आणि अनेकेश्वरवादी या सर्वांच्या दरम्यान अल्लाह स्वतः निर्णय करील. अल्लाह प्रत्येक गोष्टीस साक्षी आहे
Surah Al-Hajj, Verse 17
أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ يَسۡجُدُۤ لَهُۥۤ مَن فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَن فِي ٱلۡأَرۡضِ وَٱلشَّمۡسُ وَٱلۡقَمَرُ وَٱلنُّجُومُ وَٱلۡجِبَالُ وَٱلشَّجَرُ وَٱلدَّوَآبُّ وَكَثِيرٞ مِّنَ ٱلنَّاسِۖ وَكَثِيرٌ حَقَّ عَلَيۡهِ ٱلۡعَذَابُۗ وَمَن يُهِنِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِن مُّكۡرِمٍۚ إِنَّ ٱللَّهَ يَفۡعَلُ مَا يَشَآءُ۩
१८. काय तुम्ही नाही पाहात की अल्लाहच्या समोरच सजदा करतात जे आकाशात आहेत आणि जमिनीवर आहेत. त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र, तारे, पर्वत, वृक्ष, पशू आणि सजीव१ आणि अनेक मानव देखील. होय बहुतेक असेही आहेत, ज्यांना (अल्लाहची) शिक्षा- यातना लागू झाली आहे आणि ज्याला अल्लाह अपमानित करेल, त्याला मान-प्रतिष्ठा देणारा कोणी नाही, अल्लाह जे इच्छितो ते करतो
Surah Al-Hajj, Verse 18
۞هَٰذَانِ خَصۡمَانِ ٱخۡتَصَمُواْ فِي رَبِّهِمۡۖ فَٱلَّذِينَ كَفَرُواْ قُطِّعَتۡ لَهُمۡ ثِيَابٞ مِّن نَّارٖ يُصَبُّ مِن فَوۡقِ رُءُوسِهِمُ ٱلۡحَمِيمُ
१९. हे दोन्ही आपल्या पालनकर्त्याविषयी मतभेद राखणारे आहेत, तेव्हा इन्कारी लोकांकरिता आगीचे कपडे, माप घेऊन कापले जातील, आणि त्यांच्या डोक्यांवर उकळत्या पाण्याची धार सोडली जाईल
Surah Al-Hajj, Verse 19
يُصۡهَرُ بِهِۦ مَا فِي بُطُونِهِمۡ وَٱلۡجُلُودُ
२०. ज्याद्वारे त्याच्या पोटातील सर्व वस्तू आणि चामडी वगैरे गळून पडेल
Surah Al-Hajj, Verse 20
وَلَهُم مَّقَٰمِعُ مِنۡ حَدِيدٖ
२१. आणि त्यांना शिक्षा- यातना देण्यासाठी लोखंडी हातोडे आहेत
Surah Al-Hajj, Verse 21
كُلَّمَآ أَرَادُوٓاْ أَن يَخۡرُجُواْ مِنۡهَا مِنۡ غَمٍّ أُعِيدُواْ فِيهَا وَذُوقُواْ عَذَابَ ٱلۡحَرِيقِ
२२. हे जेव्हा जेव्हा तिथल्या दुःख-यातनेपासून पळ काढण्याचा इरादा करतील, तिथे (पुन्हा) परतविले जातील आणि (त्यांना सांगितले जाईल) जळण्याच्या शिक्षेची गोडी चाखा
Surah Al-Hajj, Verse 22
إِنَّ ٱللَّهَ يُدۡخِلُ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ يُحَلَّوۡنَ فِيهَا مِنۡ أَسَاوِرَ مِن ذَهَبٖ وَلُؤۡلُؤٗاۖ وَلِبَاسُهُمۡ فِيهَا حَرِيرٞ
२३. निःसंशय, ईमान राखणाऱ्या आणि सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह अशा जन्नतमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. जिथे त्यांना सोन्याची कांकणे घातली जातील आणि अस्सल मोतीही, त्या ठिकाणी त्यांचे वस्त्र निर्भेळ रेशमाचे असेल
Surah Al-Hajj, Verse 23
وَهُدُوٓاْ إِلَى ٱلطَّيِّبِ مِنَ ٱلۡقَوۡلِ وَهُدُوٓاْ إِلَىٰ صِرَٰطِ ٱلۡحَمِيدِ
२४. आणि त्यांना पवित्र वचनाचा मार्ग दाखविला गेला आणि प्रशंसनीय (अल्लाहचे) मार्गदर्शन दिले गेले
Surah Al-Hajj, Verse 24
إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَيَصُدُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ وَٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ ٱلَّذِي جَعَلۡنَٰهُ لِلنَّاسِ سَوَآءً ٱلۡعَٰكِفُ فِيهِ وَٱلۡبَادِۚ وَمَن يُرِدۡ فِيهِ بِإِلۡحَادِۭ بِظُلۡمٖ نُّذِقۡهُ مِنۡ عَذَابٍ أَلِيمٖ
२५. ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखू लागले आणि त्या आदरणीय मस्जिदीपासूनही, जिला आम्ही समस्त लोकांकरिता एकसमान केले आहे, मग तिथले रहिवाशी असोत किंवा बाहेरून आलेले असोत, जो देखील अत्याचारपूर्वक त्या ठिकाणी मार्गभ्रष्ट होण्याचा विचार करील, आम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची गोडी चाखवू
Surah Al-Hajj, Verse 25
وَإِذۡ بَوَّأۡنَا لِإِبۡرَٰهِيمَ مَكَانَ ٱلۡبَيۡتِ أَن لَّا تُشۡرِكۡ بِي شَيۡـٔٗا وَطَهِّرۡ بَيۡتِيَ لِلطَّآئِفِينَ وَٱلۡقَآئِمِينَ وَٱلرُّكَّعِ ٱلسُّجُودِ
२६. आणि जेव्हा आम्ही इब्राहीमकरिता काबागृहाचे स्थान निश्चित केले (या अटीवर) की माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सामील करू नका आणि माझ्या घराला तवाफ (प्रदक्षिणा) करणाऱ्या, उभे राहणाऱ्या, रुकूअ आणि सजदा करणाऱ्यांकरिता स्वच्छ- शुद्ध राखा
Surah Al-Hajj, Verse 26
وَأَذِّن فِي ٱلنَّاسِ بِٱلۡحَجِّ يَأۡتُوكَ رِجَالٗا وَعَلَىٰ كُلِّ ضَامِرٖ يَأۡتِينَ مِن كُلِّ فَجٍّ عَمِيقٖ
२७. आणि लोकांमध्ये हजचे ऐलान करा, लोक तुमच्याजवळ पायी चालतही येतील आणि दुबळ्या रोडावलेल्या उंटावरही दूरदूरच्या सर्व मार्गांनी येतील
Surah Al-Hajj, Verse 27
لِّيَشۡهَدُواْ مَنَٰفِعَ لَهُمۡ وَيَذۡكُرُواْ ٱسۡمَ ٱللَّهِ فِيٓ أَيَّامٖ مَّعۡلُومَٰتٍ عَلَىٰ مَا رَزَقَهُم مِّنۢ بَهِيمَةِ ٱلۡأَنۡعَٰمِۖ فَكُلُواْ مِنۡهَا وَأَطۡعِمُواْ ٱلۡبَآئِسَ ٱلۡفَقِيرَ
२८. यासाठी की त्यांनी आपला लाभ प्राप्त करून घेण्यासाठी यावे आणि त्या निर्धारीत दिवसामध्ये अल्लाहचे नामःस्मरण करावे त्या चार पायांच्या पाळीव पशूंवर, तेव्हा तुम्ही स्वतः देखील खा आणि उपाशीपोटी असलेल्या गरीबांनाही खाऊ घाला
Surah Al-Hajj, Verse 28
ثُمَّ لۡيَقۡضُواْ تَفَثَهُمۡ وَلۡيُوفُواْ نُذُورَهُمۡ وَلۡيَطَّوَّفُواْ بِٱلۡبَيۡتِ ٱلۡعَتِيقِ
२९. मग त्यांनी आपला मळ- घाण दूर करावी आणि आपला नवस पूर्ण करावा आणि अल्लाहच्या जुन्या घराला प्रदक्षिणा करावी
Surah Al-Hajj, Verse 29
ذَٰلِكَۖ وَمَن يُعَظِّمۡ حُرُمَٰتِ ٱللَّهِ فَهُوَ خَيۡرٞ لَّهُۥ عِندَ رَبِّهِۦۗ وَأُحِلَّتۡ لَكُمُ ٱلۡأَنۡعَٰمُ إِلَّا مَا يُتۡلَىٰ عَلَيۡكُمۡۖ فَٱجۡتَنِبُواْ ٱلرِّجۡسَ مِنَ ٱلۡأَوۡثَٰنِ وَٱجۡتَنِبُواْ قَوۡلَ ٱلزُّورِ
३०. हे आहेत (हजचे धार्मिक विधी) आणि जो, अल्लाहने निर्धारित केलेल्या प्रतिष्ठापूर्ण गोष्टींचा आदर राखेल तर हे त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता उत्तम आहे आणि तुमच्यासाठी गुरे-ढोरे हलाल (वैध) ठरविले गेले आहेत, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांचा आदेश तुम्हाला ऐकविला गेला आहे, यास्तव मूर्तींच्या मलीनतेपासून दूर राहा, आणि खोटे बोलण्यापासूनही अलिप्त राहा
Surah Al-Hajj, Verse 30
حُنَفَآءَ لِلَّهِ غَيۡرَ مُشۡرِكِينَ بِهِۦۚ وَمَن يُشۡرِكۡ بِٱللَّهِ فَكَأَنَّمَا خَرَّ مِنَ ٱلسَّمَآءِ فَتَخۡطَفُهُ ٱلطَّيۡرُ أَوۡ تَهۡوِي بِهِ ٱلرِّيحُ فِي مَكَانٖ سَحِيقٖ
३१. अल्लाहच्या तौहीद (एकेश्वरवादा) ला मान्य करीत, त्याच्यासोबत दुसऱ्या कुणाला सहभागी न ठरवित. (ऐका) अल्लाहचा सहभागी ठरविणारा जणू आकाशातून खाली कोसळला, आता एक तर त्याला पक्षी उचलून नेतील किंवा हवा एखाद्या दूरच्या ठिकाणी फेकून देईल
Surah Al-Hajj, Verse 31
ذَٰلِكَۖ وَمَن يُعَظِّمۡ شَعَـٰٓئِرَ ٱللَّهِ فَإِنَّهَا مِن تَقۡوَى ٱلۡقُلُوبِ
३२. (ही आहे वस्तुस्थिती) तेव्हा जो कोणी अल्लाहच्या निशाण्यांचा (प्रतीकांचा) आदर-सन्मान राखेल, तर त्याच्या मनातील अल्लाहच्या भयाचे हेच कारण आहे
Surah Al-Hajj, Verse 32
لَكُمۡ فِيهَا مَنَٰفِعُ إِلَىٰٓ أَجَلٖ مُّسَمّٗى ثُمَّ مَحِلُّهَآ إِلَى ٱلۡبَيۡتِ ٱلۡعَتِيقِ
३३. त्यांच्यात तुमच्यासाठी एका निर्धारित अवधीपर्यंत लाभ आहे, मग त्यांच्या कुर्बानी (बळी चढविण्या) ची जागा काबागृहात आहे
Surah Al-Hajj, Verse 33
وَلِكُلِّ أُمَّةٖ جَعَلۡنَا مَنسَكٗا لِّيَذۡكُرُواْ ٱسۡمَ ٱللَّهِ عَلَىٰ مَا رَزَقَهُم مِّنۢ بَهِيمَةِ ٱلۡأَنۡعَٰمِۗ فَإِلَٰهُكُمۡ إِلَٰهٞ وَٰحِدٞ فَلَهُۥٓ أَسۡلِمُواْۗ وَبَشِّرِ ٱلۡمُخۡبِتِينَ
३४. आणि प्रत्येक जनसमूहाकरिता आम्ही कुर्बानीची एक पद्धत निश्चित केली आहे, यासाठी की त्यांनी त्या चतुष्पाद पशूंवर अल्लाहचे नाव घ्यावे, जे अल्लाहने त्यांना प्रदान करून ठेवले आहेत. (लक्षात घ्या) तुम्हा सर्वांचा खराखुरा उपास्य (आराध्य दैवत) फक्त एकच आहे, तुम्ही त्याच्या अधीन आणि आज्ञाधारक व्हा, विनम्रता अंगिकारणाऱ्यांना खूशखबरी द्या
Surah Al-Hajj, Verse 34
ٱلَّذِينَ إِذَا ذُكِرَ ٱللَّهُ وَجِلَتۡ قُلُوبُهُمۡ وَٱلصَّـٰبِرِينَ عَلَىٰ مَآ أَصَابَهُمۡ وَٱلۡمُقِيمِي ٱلصَّلَوٰةِ وَمِمَّا رَزَقۡنَٰهُمۡ يُنفِقُونَ
३५. त्यांची अवस्था अशी आहे की जेव्हा त्यांच्या समोर अल्लाहचे नामःस्मरण केले जाते, तेव्हा त्यांच्या हृदयाचा थरकाप होतो, जेव्हा त्याच्यावर संकट येते तेव्हा त्या संकटात धीर- संयम राखतात, ते नमाज कायम करणारे आहेत, आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे त्यातून देत ही राहतात
Surah Al-Hajj, Verse 35
وَٱلۡبُدۡنَ جَعَلۡنَٰهَا لَكُم مِّن شَعَـٰٓئِرِ ٱللَّهِ لَكُمۡ فِيهَا خَيۡرٞۖ فَٱذۡكُرُواْ ٱسۡمَ ٱللَّهِ عَلَيۡهَا صَوَآفَّۖ فَإِذَا وَجَبَتۡ جُنُوبُهَا فَكُلُواْ مِنۡهَا وَأَطۡعِمُواْ ٱلۡقَانِعَ وَٱلۡمُعۡتَرَّۚ كَذَٰلِكَ سَخَّرۡنَٰهَا لَكُمۡ لَعَلَّكُمۡ تَشۡكُرُونَ
३६. कुर्बानीच्या उंटाला आम्ही तुमच्यासाठी अल्लाहच्या निशाण्यांपैकी ठरविले आहे. त्यांच्यात तुमच्यासाठी लाभ आहे, तेव्हा त्यांना उभे करून त्यांच्यावर अल्लाहचे नाव घ्या, मग जेव्हा त्यांचे अंग जमिनीला लागेल तेव्हा ते तुम्हीही खा आणि गोरगरीब व याचकांना आणि जो याचक नसेल त्यालाही खाऊ घाला. अशा प्रकारे आम्ही चतुष्पाद (पाळीव) पशूंना तुमच्या अधीन केले आहे, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी
Surah Al-Hajj, Verse 36
لَن يَنَالَ ٱللَّهَ لُحُومُهَا وَلَا دِمَآؤُهَا وَلَٰكِن يَنَالُهُ ٱلتَّقۡوَىٰ مِنكُمۡۚ كَذَٰلِكَ سَخَّرَهَا لَكُمۡ لِتُكَبِّرُواْ ٱللَّهَ عَلَىٰ مَا هَدَىٰكُمۡۗ وَبَشِّرِ ٱلۡمُحۡسِنِينَ
३७. अल्लाहला कुर्बानीच्या जनावरांचे ना मांस पोहचते ना त्यांचे रक्त किंबहुना त्याला तुमच्या मनात असलेले अल्लाहचे भय पोहोचते, त्याचप्रमाणे अल्लाहने त्या जनावरांना तुमचे आज्ञाधारक (ताबेदार) बनविले आहे, यासाठी की तुम्ही त्याच्या मार्गदर्शना (च्या आभारा) त त्याची महानता वर्णन करावी आणि सत्कर्म करणाऱ्यांना खूशखबरी ऐकवा
Surah Al-Hajj, Verse 37
۞إِنَّ ٱللَّهَ يُدَٰفِعُ عَنِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْۗ إِنَّ ٱللَّهَ لَا يُحِبُّ كُلَّ خَوَّانٖ كَفُورٍ
३८. निःसंशय, सच्चा ईमानधारकांच्या शत्रूंना अल्लाह स्वतः हटवितो, कोणताही विश्वासघातकी कृतघ्न अल्लाहला पसत नाही
Surah Al-Hajj, Verse 38
أُذِنَ لِلَّذِينَ يُقَٰتَلُونَ بِأَنَّهُمۡ ظُلِمُواْۚ وَإِنَّ ٱللَّهَ عَلَىٰ نَصۡرِهِمۡ لَقَدِيرٌ
३९. ज्या (मुसलमानां) शी (काफिर) लढाई करीत आहेत त्यांना देखील लढण्याची अनुमती दिली कारण ते अत्याचारपीडित आहेत. निःसंशय त्यांच्या मदतीकरिता अल्लाह परिपूर्ण सामर्थ्य राखतो
Surah Al-Hajj, Verse 39
ٱلَّذِينَ أُخۡرِجُواْ مِن دِيَٰرِهِم بِغَيۡرِ حَقٍّ إِلَّآ أَن يَقُولُواْ رَبُّنَا ٱللَّهُۗ وَلَوۡلَا دَفۡعُ ٱللَّهِ ٱلنَّاسَ بَعۡضَهُم بِبَعۡضٖ لَّهُدِّمَتۡ صَوَٰمِعُ وَبِيَعٞ وَصَلَوَٰتٞ وَمَسَٰجِدُ يُذۡكَرُ فِيهَا ٱسۡمُ ٱللَّهِ كَثِيرٗاۗ وَلَيَنصُرَنَّ ٱللَّهُ مَن يَنصُرُهُۥٓۚ إِنَّ ٱللَّهَ لَقَوِيٌّ عَزِيزٌ
४०. हे असे लोक आहेत, ज्यांना विनाकारण आपल्या घराबाहेर काढले गेले केवळ त्यांच्या या बोलण्यावर की आमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे. जर अल्लाह लोकांना आपसात एकमेकांद्वारे हटवित राहिला नसता तर उपासनास्थळ आणि चर्च आणि मशीदी, आणि यहूदी लोकांची प्रार्थनास्थळे आणि त्या मशीदी देखील केव्हाच पाडल्या गेल्या असत्या जिथे फार मोठ्या प्रमाणात अल्लाहचे नामःस्मरण केले जाते. जो अल्लाहची मदत करेल अल्लाह देखील त्याची मदत अवश्य करेल. िंनिःसंशय अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे
Surah Al-Hajj, Verse 40
ٱلَّذِينَ إِن مَّكَّنَّـٰهُمۡ فِي ٱلۡأَرۡضِ أَقَامُواْ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتَوُاْ ٱلزَّكَوٰةَ وَأَمَرُواْ بِٱلۡمَعۡرُوفِ وَنَهَوۡاْ عَنِ ٱلۡمُنكَرِۗ وَلِلَّهِ عَٰقِبَةُ ٱلۡأُمُورِ
४१. हे लोक आहेत की जर आम्ही यांचे पाय जमिनीवर मजबूत केले (अर्थात चांगले स्थैर्य प्रदान केले) तर हे नित्यनेमाने नमाज अदा करतील आणि जकात देतील आणि चांगल्या कामांचा आदेश देतील आणि वाईट कामांची मनाई करतील आणि सर्व कामांचा परिणाम अल्लाहच्या अधिकारकक्षेत आहे
Surah Al-Hajj, Verse 41
وَإِن يُكَذِّبُوكَ فَقَدۡ كَذَّبَتۡ قَبۡلَهُمۡ قَوۡمُ نُوحٖ وَعَادٞ وَثَمُودُ
४२. आणि जर हे लोक तुम्हाला खोटे ठरवतील (तर आश्चर्याची बाब नव्हे) तर यांच्यापूर्वी नूहचा जनसमूह आणि आद व समूद
Surah Al-Hajj, Verse 42
وَقَوۡمُ إِبۡرَٰهِيمَ وَقَوۡمُ لُوطٖ
४३. आणि इब्राहीमचा जनसमूह आणि लूतचा जनसमूह
Surah Al-Hajj, Verse 43
وَأَصۡحَٰبُ مَدۡيَنَۖ وَكُذِّبَ مُوسَىٰۖ فَأَمۡلَيۡتُ لِلۡكَٰفِرِينَ ثُمَّ أَخَذۡتُهُمۡۖ فَكَيۡفَ كَانَ نَكِيرِ
४४. आणि मदयनच्या लोकांनीही आपल्या आपल्या पैगंबरांना खोटे ठरविले आहे. मूसा यांनाही खोटे ठरविले गेले आहे, तेव्हा मी इन्कारी लोकांना थोडी संधी दिली, मग त्यांना पकडले. मग पाहा कशी होती माझी शिक्षा- यातना
Surah Al-Hajj, Verse 44
فَكَأَيِّن مِّن قَرۡيَةٍ أَهۡلَكۡنَٰهَا وَهِيَ ظَالِمَةٞ فَهِيَ خَاوِيَةٌ عَلَىٰ عُرُوشِهَا وَبِئۡرٖ مُّعَطَّلَةٖ وَقَصۡرٖ مَّشِيدٍ
४५. अशा अनेक वस्त्या आहेत, ज्यांना आम्ही नष्ट करून टाकले यासाठी की त्या अत्याचारी होत्या, तेव्हा त्या आपल्या छतांसह पालथ्या पडल्या आहेत आणि बहुतेक आबाद विहीरी निकामी पडल्या आहेत आणि कितीतरी पक्के उंच किल्ले ओसाड पडले आहेत
Surah Al-Hajj, Verse 45
أَفَلَمۡ يَسِيرُواْ فِي ٱلۡأَرۡضِ فَتَكُونَ لَهُمۡ قُلُوبٞ يَعۡقِلُونَ بِهَآ أَوۡ ءَاذَانٞ يَسۡمَعُونَ بِهَاۖ فَإِنَّهَا لَا تَعۡمَى ٱلۡأَبۡصَٰرُ وَلَٰكِن تَعۡمَى ٱلۡقُلُوبُ ٱلَّتِي فِي ٱلصُّدُورِ
४६. काय त्यांनी धरतीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्या हृदयांनी या गोष्टी समजून घेतल्या असत्या किंवा कानांनी या (घटना) ऐकल्या असत्या. खरी गोष्ट अशी की केवळ डोळेच आंधळे नसतात किंबहुना ती हृदये (सुद्धा) आंधळी असतात, जी उरात आहेत
Surah Al-Hajj, Verse 46
وَيَسۡتَعۡجِلُونَكَ بِٱلۡعَذَابِ وَلَن يُخۡلِفَ ٱللَّهُ وَعۡدَهُۥۚ وَإِنَّ يَوۡمًا عِندَ رَبِّكَ كَأَلۡفِ سَنَةٖ مِّمَّا تَعُدُّونَ
४७. आणि ते तुमच्याजवळ अल्लाहच्या शिक्षा- यातनेची घाई करीत आहेत. अल्लाह आपले वचन कदापि टाळणार नाही. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याजवळ एक दिवस, तुमच्या (काल) गणनेनुसार एक हजार वर्षांचा आहे
Surah Al-Hajj, Verse 47
وَكَأَيِّن مِّن قَرۡيَةٍ أَمۡلَيۡتُ لَهَا وَهِيَ ظَالِمَةٞ ثُمَّ أَخَذۡتُهَا وَإِلَيَّ ٱلۡمَصِيرُ
४८. आणि कित्येक अत्याचारी वस्तींना आम्ही ढील (सूट) दिली मग शेवटी त्यांना पकडीत घेतले आणि माझ्याचकडे परतून यायचे आहे
Surah Al-Hajj, Verse 48
قُلۡ يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ إِنَّمَآ أَنَا۠ لَكُمۡ نَذِيرٞ مُّبِينٞ
४९. ऐलान करा की, लोक हो! मी तुम्हाला उघडरित्या सावधान करणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 49
فَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ لَهُم مَّغۡفِرَةٞ وَرِزۡقٞ كَرِيمٞ
५०. तेव्हा ज्या लोकांनी ई्मान राखले आहे आणि सत्कर्मे केली आहेत त्यांच्यासाठी मोक्षप्राप्ती आहे आणि मान-सन्मानपूर्ण आजिविका
Surah Al-Hajj, Verse 50
وَٱلَّذِينَ سَعَوۡاْ فِيٓ ءَايَٰتِنَا مُعَٰجِزِينَ أُوْلَـٰٓئِكَ أَصۡحَٰبُ ٱلۡجَحِيمِ
५१. आणि जे लोक आमच्या आयतींचा अवमान करण्यामागे लागेले आहेत, तेच जहन्नमी आहेत
Surah Al-Hajj, Verse 51
وَمَآ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ مِن رَّسُولٖ وَلَا نَبِيٍّ إِلَّآ إِذَا تَمَنَّىٰٓ أَلۡقَى ٱلشَّيۡطَٰنُ فِيٓ أُمۡنِيَّتِهِۦ فَيَنسَخُ ٱللَّهُ مَا يُلۡقِي ٱلشَّيۡطَٰنُ ثُمَّ يُحۡكِمُ ٱللَّهُ ءَايَٰتِهِۦۗ وَٱللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٞ
५२. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जो रसूल आणि नबी पाठविला (त्याच्यासोबत हे हमखास घडले की) जेव्हा तो आपल्या मनात एखादी इच्छा धरू लागला, सैतानाने त्याच्या मनोकामनेत काही मिसळून दिले तेव्हा सैतानाच्या भेसळीला अल्लाह दूर करतो, मग आपल्या वचनांना मजबूत करतो. सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्व काही जाणणारा, किमत बाळगणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 52
لِّيَجۡعَلَ مَا يُلۡقِي ٱلشَّيۡطَٰنُ فِتۡنَةٗ لِّلَّذِينَ فِي قُلُوبِهِم مَّرَضٞ وَٱلۡقَاسِيَةِ قُلُوبُهُمۡۗ وَإِنَّ ٱلظَّـٰلِمِينَ لَفِي شِقَاقِۭ بَعِيدٖ
५३. हे यासाठी की सैतानाच्या भेसळीला अल्लाहने त्या लोकांच्या कसोटीची सामुग्री बनवावे, ज्यांच्या मनात रोग आहे आणि ज्यांची मने कठोर आहेत. निःसंशय अत्याचारी लोक सक्त विरोधात आहेत
Surah Al-Hajj, Verse 53
وَلِيَعۡلَمَ ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡعِلۡمَ أَنَّهُ ٱلۡحَقُّ مِن رَّبِّكَ فَيُؤۡمِنُواْ بِهِۦ فَتُخۡبِتَ لَهُۥ قُلُوبُهُمۡۗ وَإِنَّ ٱللَّهَ لَهَادِ ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ إِلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ
५४. आणि यासाठीही की ज्यांना ज्ञान प्रदान केले गेले आहे, त्यांनी विश्वास करून घ्यावा की हे तुमच्या पालनकर्त्याच्याच तर्फे पूर्ण सत्य आहे, मग त्यांनी त्यावर ईमान राखावे आणि त्यांची हृदये त्याकडे झुकावित. निःसंशय अल्लाह ईमान राखणाऱ्यांना सत्य मार्गाकडे मार्गदर्शन करणारच आहे
Surah Al-Hajj, Verse 54
وَلَا يَزَالُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ فِي مِرۡيَةٖ مِّنۡهُ حَتَّىٰ تَأۡتِيَهُمُ ٱلسَّاعَةُ بَغۡتَةً أَوۡ يَأۡتِيَهُمۡ عَذَابُ يَوۡمٍ عَقِيمٍ
५५. आणि इन्कारी (काफिर) लोक अल्लाहच्या वहयीबाबत नेहमी संशयग्रस्तच राहतील, येथपर्यंत की अचानक त्यांच्या डोक्यावर कयामत येऊन पोहचावी किंवा त्यांच्याजवळ त्या दिवसाची शिक्षा- यातना येऊन पोहचावी, ज्यात किंचितही भलाई नाही
Surah Al-Hajj, Verse 55
ٱلۡمُلۡكُ يَوۡمَئِذٖ لِّلَّهِ يَحۡكُمُ بَيۡنَهُمۡۚ فَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ فِي جَنَّـٰتِ ٱلنَّعِيمِ
५६. त्या दिवशी केवळ अल्लाहचीच राज्यसत्ता असेल, तोच त्यांच्या दरम्यान फैसला करेल. ईमान राखणारे आणि नेक-सदाचारी लोक तर अल्लाहच्या देण्यांनी युक्त अशा जन्नतमध्ये असतील
Surah Al-Hajj, Verse 56
وَٱلَّذِينَ كَفَرُواْ وَكَذَّبُواْ بِـَٔايَٰتِنَا فَأُوْلَـٰٓئِكَ لَهُمۡ عَذَابٞ مُّهِينٞ
५७. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, त्यांच्यासाठी अपमानदायक शिक्षा यातना आहे
Surah Al-Hajj, Verse 57
وَٱلَّذِينَ هَاجَرُواْ فِي سَبِيلِ ٱللَّهِ ثُمَّ قُتِلُوٓاْ أَوۡ مَاتُواْ لَيَرۡزُقَنَّهُمُ ٱللَّهُ رِزۡقًا حَسَنٗاۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَهُوَ خَيۡرُ ٱلرَّـٰزِقِينَ
५८. आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात देशत्याग केला, मग ते शहीद केले गेले किंवा मरण पावले, अल्लाह त्यांना उत्तम रोजी (आजिविका) प्रदान करेल आणि निःसंशय अल्लाह सर्वोत्तम रोजी प्रदान करणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 58
لَيُدۡخِلَنَّهُم مُّدۡخَلٗا يَرۡضَوۡنَهُۥۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَعَلِيمٌ حَلِيمٞ
५९. अल्लाहा त्यांना अशा ठिकाणी पोहचविल की ते त्या ठिकाणाने आनंदित होतील. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा आणि सहनशील आहे
Surah Al-Hajj, Verse 59
۞ذَٰلِكَۖ وَمَنۡ عَاقَبَ بِمِثۡلِ مَا عُوقِبَ بِهِۦ ثُمَّ بُغِيَ عَلَيۡهِ لَيَنصُرَنَّهُ ٱللَّهُۚ إِنَّ ٱللَّهَ لَعَفُوٌّ غَفُورٞ
६०. हा आहे (त्या लोकांचा मोबदला) आणि एखाद्याने त्याच प्रकारे बदला घ्यावा, ज्या प्रकारे त्याच्याशी केले गेले, मात्र जर त्याच्यावर अतिरेक झाला असेल तर निःसंशय अल्लाह स्वतः त्याची मदत करेल. निश्चितच अल्लाह माफ करणारा आणि क्षमाशील आहे
Surah Al-Hajj, Verse 60
ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ يُولِجُ ٱلَّيۡلَ فِي ٱلنَّهَارِ وَيُولِجُ ٱلنَّهَارَ فِي ٱلَّيۡلِ وَأَنَّ ٱللَّهَ سَمِيعُۢ بَصِيرٞ
६१. हे अशासाठी की अल्लाह रात्रीला दिवसात दाखल करतो, आणि दिवसाला रात्रीत नेतो आणि निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 61
ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡحَقُّ وَأَنَّ مَا يَدۡعُونَ مِن دُونِهِۦ هُوَ ٱلۡبَٰطِلُ وَأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡعَلِيُّ ٱلۡكَبِيرُ
६२. हे सर्व यासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि त्याच्याखेरीज ज्याला देखील हे पुकारतात ते असत्य (मिथ्या) आहे आणि निःसंशय, अल्लाह अतिउच्च महानता बाळगणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 62
أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ أَنزَلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ فَتُصۡبِحُ ٱلۡأَرۡضُ مُخۡضَرَّةًۚ إِنَّ ٱللَّهَ لَطِيفٌ خَبِيرٞ
६३. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशातून पाणी वर्षवितो तेव्हा धरती हिरवी टवटवीत होते. निःसंशय अल्लाह मोठा मेहेरबान आणि जाणणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 63
لَّهُۥ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۚ وَإِنَّ ٱللَّهَ لَهُوَ ٱلۡغَنِيُّ ٱلۡحَمِيدُ
६४. आकाशांमध्ये व धरतीत जे काही आहे सर्व त्याचेच आहे आणि निःसंशय अल्लाह अगदी निःस्पृह, गुणवैशिट्यांनी युक्त, आणि प्रशंसनीय आहे
Surah Al-Hajj, Verse 64
أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ سَخَّرَ لَكُم مَّا فِي ٱلۡأَرۡضِ وَٱلۡفُلۡكَ تَجۡرِي فِي ٱلۡبَحۡرِ بِأَمۡرِهِۦ وَيُمۡسِكُ ٱلسَّمَآءَ أَن تَقَعَ عَلَى ٱلۡأَرۡضِ إِلَّا بِإِذۡنِهِۦٓۚ إِنَّ ٱللَّهَ بِٱلنَّاسِ لَرَءُوفٞ رَّحِيمٞ
६५. काही तुम्ही नाही पाहिले की अल्लाहनेच धरतीच्या समस्त वस्तू तुमच्या अधीन केल्या आहेत आणि त्याच्या आदेशाने समुद्रात चालणाऱ्या नौका देखील. त्यानेच आकाशाला सावरून ठेवले आहे की धरतीवर त्याच्या हुकुमाविना कोसळून न पडावे. निःसंशय अल्लाह, लोकांसाठी मोठा स्नेहशील, दया करणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 65
وَهُوَ ٱلَّذِيٓ أَحۡيَاكُمۡ ثُمَّ يُمِيتُكُمۡ ثُمَّ يُحۡيِيكُمۡۗ إِنَّ ٱلۡإِنسَٰنَ لَكَفُورٞ
६६. आणि त्यानेच तुम्हाला जिवंत केले, मग तोच तुम्हाला मृत्यु देईल, मग तोच तुम्हाला (पुन्हा) जिवंत करील. यात शंका नाही की मनुष्य मोठा कृतघ्न आहे
Surah Al-Hajj, Verse 66
لِّكُلِّ أُمَّةٖ جَعَلۡنَا مَنسَكًا هُمۡ نَاسِكُوهُۖ فَلَا يُنَٰزِعُنَّكَ فِي ٱلۡأَمۡرِۚ وَٱدۡعُ إِلَىٰ رَبِّكَۖ إِنَّكَ لَعَلَىٰ هُدٗى مُّسۡتَقِيمٖ
६७. प्रत्येक जनसमूहाकरिता आम्ही उपासनेची एक पद्धत निर्धारित केली आहे, जिचे ते पालन करणारे आहेत, तेव्हा त्यांनी तुमच्याशी या संदर्भात वाद घालू नये. तुम्ही आपल्या पालनकर्त्याकडे लोकांना बोलवा. निःसंशय, तुम्ही सरळ, सत्य मार्गावर आहात
Surah Al-Hajj, Verse 67
وَإِن جَٰدَلُوكَ فَقُلِ ٱللَّهُ أَعۡلَمُ بِمَا تَعۡمَلُونَ
६८. आणि तरीही जर हे लोक तुमच्याशी वाद घालू लागतील तर तुम्ही सांगा की तुमच्या कर्मांना अल्लाह चांगल्या प्रकारे जाणून आहे
Surah Al-Hajj, Verse 68
ٱللَّهُ يَحۡكُمُ بَيۡنَكُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ فِيمَا كُنتُمۡ فِيهِ تَخۡتَلِفُونَ
६९. तुमच्या समस्त मतभेदांचा फैसला कयामतच्या दिवशी अल्लाह स्वतः करेल
Surah Al-Hajj, Verse 69
أَلَمۡ تَعۡلَمۡ أَنَّ ٱللَّهَ يَعۡلَمُ مَا فِي ٱلسَّمَآءِ وَٱلۡأَرۡضِۚ إِنَّ ذَٰلِكَ فِي كِتَٰبٍۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٞ
७०. काय तुम्ही नाही जाणले की आकाश आणि धरतीच्या प्रत्येक वस्तूचे अल्लाहला ज्ञान आहे, हे सर्व एका लिखित ग्रंथात सुरक्षित आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता हे काम फार सोपे आहे
Surah Al-Hajj, Verse 70
وَيَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَمۡ يُنَزِّلۡ بِهِۦ سُلۡطَٰنٗا وَمَا لَيۡسَ لَهُم بِهِۦ عِلۡمٞۗ وَمَا لِلظَّـٰلِمِينَ مِن نَّصِيرٖ
७१. आणि हे अल्लाहखेरीज अशांची उपासना करीत आहेत, ज्यांच्याकरिता अल्लाहने कोणतेही प्रमाण अवतरित केले नाही आणि ना ते स्वतः याचे काही ज्ञान बाळगतात, अत्याचारींचा कोणी सहाय्यक नाही
Surah Al-Hajj, Verse 71
وَإِذَا تُتۡلَىٰ عَلَيۡهِمۡ ءَايَٰتُنَا بَيِّنَٰتٖ تَعۡرِفُ فِي وُجُوهِ ٱلَّذِينَ كَفَرُواْ ٱلۡمُنكَرَۖ يَكَادُونَ يَسۡطُونَ بِٱلَّذِينَ يَتۡلُونَ عَلَيۡهِمۡ ءَايَٰتِنَاۗ قُلۡ أَفَأُنَبِّئُكُم بِشَرّٖ مِّن ذَٰلِكُمُۚ ٱلنَّارُ وَعَدَهَا ٱللَّهُ ٱلَّذِينَ كَفَرُواْۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِيرُ
७२. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या वाणीच्या स्पष्ट आयतींचे पठण केले जाते, तेव्हा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची लक्षणे स्पष्टपणे पाहता. ते तर आमच्या आयती ऐकणाऱ्यांवर हल्ला करण्याच्या बेतात असतात. सांगा, काय मी तुम्हाला याहून वाईट बातमी सांगू. ती आग आहे, जिचा वायदा अल्लाहने इन्कारी लोकांशी करून ठेवला आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे
Surah Al-Hajj, Verse 72
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ضُرِبَ مَثَلٞ فَٱسۡتَمِعُواْ لَهُۥٓۚ إِنَّ ٱلَّذِينَ تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَن يَخۡلُقُواْ ذُبَابٗا وَلَوِ ٱجۡتَمَعُواْ لَهُۥۖ وَإِن يَسۡلُبۡهُمُ ٱلذُّبَابُ شَيۡـٔٗا لَّا يَسۡتَنقِذُوهُ مِنۡهُۚ ضَعُفَ ٱلطَّالِبُ وَٱلۡمَطۡلُوبُ
७३. लोक हो! एक उदाहरण दिले जात आहे, जरा लक्षपूर्वक ऐका. अल्लाहखेरीज तुम्ही ज्यांना ज्यांना (उपास्य समजून) पुकारत राहिला आहात, ते एक माशी देखील निर्माण करू शकत नाही. जर सर्वच्या सर्व एकत्र होतील, किंबहुना जर माशी यांच्याकडून एखादी वस्तू घेऊन पळेल तर हे त्या वस्तूला तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मोठा कमकुवत आहे मागणारा आणि खूप दुबळा आहे तो ज्याच्याकडे मागितले जात आहे
Surah Al-Hajj, Verse 73
مَا قَدَرُواْ ٱللَّهَ حَقَّ قَدۡرِهِۦٓۚ إِنَّ ٱللَّهَ لَقَوِيٌّ عَزِيزٌ
७४. त्यांनी अल्लाहच्या महानतेनुसार त्याचे महत्त्व जाणलेच नाही, निःसंशय अल्लाह मोठा जबरदस्त आणि वर्चस्वशाली आहे
Surah Al-Hajj, Verse 74
ٱللَّهُ يَصۡطَفِي مِنَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةِ رُسُلٗا وَمِنَ ٱلنَّاسِۚ إِنَّ ٱللَّهَ سَمِيعُۢ بَصِيرٞ
७५. फरिश्त्यांमधून आणि मानवांमधून रसूल (संदेशवाहक) अल्लाहच निवडतो. निःसंशय अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे
Surah Al-Hajj, Verse 75
يَعۡلَمُ مَا بَيۡنَ أَيۡدِيهِمۡ وَمَا خَلۡفَهُمۡۚ وَإِلَى ٱللَّهِ تُرۡجَعُ ٱلۡأُمُورُ
७६. तो चांगल्या प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या पुढे आहे आणि जे काही त्यांच्या मागे आहे आणि अल्लाहच्याचकडे सर्व व्यवहार परतविले जातात
Surah Al-Hajj, Verse 76
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ ٱرۡكَعُواْ وَٱسۡجُدُواْۤ وَٱعۡبُدُواْ رَبَّكُمۡ وَٱفۡعَلُواْ ٱلۡخَيۡرَ لَعَلَّكُمۡ تُفۡلِحُونَ۩
७७. हे ईमान राखणाऱ्यांनो! रुकुअ, सजदा करीत राहा आणि आपल्या पालनकर्त्याची उपासना करीत राहा आणि सत्कर्म करीत राहा, यासाठी की तुम्ही सफल व्हावे
Surah Al-Hajj, Verse 77
وَجَٰهِدُواْ فِي ٱللَّهِ حَقَّ جِهَادِهِۦۚ هُوَ ٱجۡتَبَىٰكُمۡ وَمَا جَعَلَ عَلَيۡكُمۡ فِي ٱلدِّينِ مِنۡ حَرَجٖۚ مِّلَّةَ أَبِيكُمۡ إِبۡرَٰهِيمَۚ هُوَ سَمَّىٰكُمُ ٱلۡمُسۡلِمِينَ مِن قَبۡلُ وَفِي هَٰذَا لِيَكُونَ ٱلرَّسُولُ شَهِيدًا عَلَيۡكُمۡ وَتَكُونُواْ شُهَدَآءَ عَلَى ٱلنَّاسِۚ فَأَقِيمُواْ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُواْ ٱلزَّكَوٰةَ وَٱعۡتَصِمُواْ بِٱللَّهِ هُوَ مَوۡلَىٰكُمۡۖ فَنِعۡمَ ٱلۡمَوۡلَىٰ وَنِعۡمَ ٱلنَّصِيرُ
७८. आणि अल्लाहच्या मार्गात तसेच जिहाद (धर्मयुद्ध) करा, जसा जिहादचा हक्क आहे. त्याने तुम्हाला निवडले आहे आणि तुमच्यावर दीन (धर्मा) संदर्भात कसलीही कमतरता राखली नाही. तुमचे पिता इब्राहीमचा दीन (धर्म कायम राखा) त्याच (अल्लाहने) ने तुमचे नाव मुस्लिम ठेवले आहे. या (कुरआना) पूर्वी आणि याच्यातही, यासाठी की पैगंबर तुमच्यावर साक्षी असावा आणि तुम्ही लोकांवर साक्षी व्हावे. तेव्हा तुमचे हे कर्तव्य ठरते की नमाज कायम करा आणि जकात (धर्मदान) अदा करीत राहा आणि अल्लाहला दृढतापूर्वक धरा, तोच तुमचा संरक्षक आणि स्वामी आहे, तेव्हा किती चांगला स्वामी आणि किती चांगला सहाय्य करणारा
Surah Al-Hajj, Verse 78