UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Al-Furqan - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


تَبَارَكَ ٱلَّذِي نَزَّلَ ٱلۡفُرۡقَانَ عَلَىٰ عَبۡدِهِۦ لِيَكُونَ لِلۡعَٰلَمِينَ نَذِيرًا

१. मोठा बरकतशाली (समृद्धशाली) आहे तो अल्लाह ज्याने आपल्या दासावर फुरक़ान१ अवतिरत केले. यासाठी की तो समस्त लोकांकरिता खबरदार करणारा ठरावा
Surah Al-Furqan, Verse 1


ٱلَّذِي لَهُۥ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَلَمۡ يَتَّخِذۡ وَلَدٗا وَلَمۡ يَكُن لَّهُۥ شَرِيكٞ فِي ٱلۡمُلۡكِ وَخَلَقَ كُلَّ شَيۡءٖ فَقَدَّرَهُۥ تَقۡدِيرٗا

२. त्याच अल्लाहचे अधिराज्य आहे आकाशांवर आणि धरतीवर आणि तो कोणतीही संतती बाळगत नाही, ना त्याच्या राज्यसत्तेत त्याचा कोणी भागीदार आहे, आणि प्रत्येक वस्तूला निर्माण करून त्याने एक निर्धारित स्वरूप दिले आहे
Surah Al-Furqan, Verse 2


وَٱتَّخَذُواْ مِن دُونِهِۦٓ ءَالِهَةٗ لَّا يَخۡلُقُونَ شَيۡـٔٗا وَهُمۡ يُخۡلَقُونَ وَلَا يَمۡلِكُونَ لِأَنفُسِهِمۡ ضَرّٗا وَلَا نَفۡعٗا وَلَا يَمۡلِكُونَ مَوۡتٗا وَلَا حَيَوٰةٗ وَلَا نُشُورٗا

३. आणि त्या लोकांनी अल्लाहखेरीज ज्यांना आपले आराध्य दैवत बनवून ठेवले आहे, ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, किंबहुना ते स्वतः(एखाद्याकडून) निर्माण केले जातात ते स्वतः आपल्या लाभ-हानिचा अधिकार बाळगत नाहीत आणि ना जीवन-मृत्युचा आणि ना दुसऱ्यांदा जिवंत होऊन उठण्याचे ते मालक आहेत
Surah Al-Furqan, Verse 3


وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ إِنۡ هَٰذَآ إِلَّآ إِفۡكٌ ٱفۡتَرَىٰهُ وَأَعَانَهُۥ عَلَيۡهِ قَوۡمٌ ءَاخَرُونَۖ فَقَدۡ جَآءُو ظُلۡمٗا وَزُورٗا

४. आणि काफिर (इन्कारी) लोक म्हणाले, हे तर केवळ त्याने स्वतः रचलेले असत्य आहे ज्या कामात दुसऱ्या लोकांनीही त्याला मदत केली आहे. वस्तुतः हे काफिर मोठे अत्याचारी आणि निव्वळ असत्य आणणारे बनलेत
Surah Al-Furqan, Verse 4


وَقَالُوٓاْ أَسَٰطِيرُ ٱلۡأَوَّلِينَ ٱكۡتَتَبَهَا فَهِيَ تُمۡلَىٰ عَلَيۡهِ بُكۡرَةٗ وَأَصِيلٗا

५. आणि ते असेही म्हणाले की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत, ज्या त्याने लिहून ठेवल्या आहेत, आणि त्याच सकाळ-संध्याकाळ त्याच्यासमोर वाचल्या जातात
Surah Al-Furqan, Verse 5


قُلۡ أَنزَلَهُ ٱلَّذِي يَعۡلَمُ ٱلسِّرَّ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ إِنَّهُۥ كَانَ غَفُورٗا رَّحِيمٗا

६. सांगा, याला तर त्या अल्लाहने अवतरित केले आहे, जो आकाश व धरतीच्या सर्व लपलेल्या गोष्टी जाणतो. निःसंशय तो मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे
Surah Al-Furqan, Verse 6


وَقَالُواْ مَالِ هَٰذَا ٱلرَّسُولِ يَأۡكُلُ ٱلطَّعَامَ وَيَمۡشِي فِي ٱلۡأَسۡوَاقِ لَوۡلَآ أُنزِلَ إِلَيۡهِ مَلَكٞ فَيَكُونَ مَعَهُۥ نَذِيرًا

७. आणि ते म्हणाले की हा कसा पैगंबर आहे की भोजन करतो आणि बाजारात चालतो फिरतो, त्याच्याजवळ एखादा फरिश्ता का नाही पाठविला जात की तो देखील त्याच्या सोबतीला राहून खबरदार करणारा बनला असता
Surah Al-Furqan, Verse 7


أَوۡ يُلۡقَىٰٓ إِلَيۡهِ كَنزٌ أَوۡ تَكُونُ لَهُۥ جَنَّةٞ يَأۡكُلُ مِنۡهَاۚ وَقَالَ ٱلظَّـٰلِمُونَ إِن تَتَّبِعُونَ إِلَّا رَجُلٗا مَّسۡحُورًا

८. किंवा त्याच्याजवळ एखादा खजिनाच टाकला गेला असता किंवा त्याची एखादी बाग तरी असती, ज्यातून तो खात राहिला असता. आणि त्या अत्याचारी लोकांनी म्हटले की तुम्ही तर अशा माणसाच्या मागे चालू लागलात, ज्याच्यावर जादू-टोणा केला गेला आहे
Surah Al-Furqan, Verse 8


ٱنظُرۡ كَيۡفَ ضَرَبُواْ لَكَ ٱلۡأَمۡثَٰلَ فَضَلُّواْ فَلَا يَسۡتَطِيعُونَ سَبِيلٗا

९. जरा विचार करा, हे लोक तुमच्याविषयी कसकशा गोष्टी बोलत आहेत की ज्यामुळे स्वतःच मार्गभ्रष्ट होत आहेत आणि कशाही प्रकारे मार्गावर येऊ शकत नाही
Surah Al-Furqan, Verse 9


تَبَارَكَ ٱلَّذِيٓ إِن شَآءَ جَعَلَ لَكَ خَيۡرٗا مِّن ذَٰلِكَ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ وَيَجۡعَل لَّكَ قُصُورَۢا

१०. अल्लाह तर असा समृद्धशाली आहे की त्याने इच्छिल्यास तुम्हाला अशा अनेक बागा प्रदान करील, ज्या त्यांनी सांगितलेल्या बागांपेक्षा खूप चांगल्या असतील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असावेत आणि तुम्हाला अनेक पक्के महाल देखील प्रदान करील
Surah Al-Furqan, Verse 10


بَلۡ كَذَّبُواْ بِٱلسَّاعَةِۖ وَأَعۡتَدۡنَا لِمَن كَذَّبَ بِٱلسَّاعَةِ سَعِيرًا

११. खरी गोष्ट अशी की लोक कयामतला खोटे समजतात आणि कयामतला खोटे ठरविणाऱ्यांकरिता आम्ही धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे
Surah Al-Furqan, Verse 11


إِذَا رَأَتۡهُم مِّن مَّكَانِۭ بَعِيدٖ سَمِعُواْ لَهَا تَغَيُّظٗا وَزَفِيرٗا

१२. जेव्हा ती यांना दुरून पाहील तेव्हा हे तिचे क्रोधाने बेकाबू होणे आणि भयंकर गर्जना ऐकतील
Surah Al-Furqan, Verse 12


وَإِذَآ أُلۡقُواْ مِنۡهَا مَكَانٗا ضَيِّقٗا مُّقَرَّنِينَ دَعَوۡاْ هُنَالِكَ ثُبُورٗا

१३. आणि जेव्हा यांना जहन्नमच्या एखाद्या तंग (संकुचित) जागेत बांधून फेकून दिले जाईल तेव्हा तिथे आपल्यासाठी मरणाला पुकारतील
Surah Al-Furqan, Verse 13


لَّا تَدۡعُواْ ٱلۡيَوۡمَ ثُبُورٗا وَٰحِدٗا وَٱدۡعُواْ ثُبُورٗا كَثِيرٗا

१४. (त्यांना सांगितले जाईल) आज एकाच मरणाला पुकारू नका, किंबहुना अनेक मरणांना हाक मारा
Surah Al-Furqan, Verse 14


قُلۡ أَذَٰلِكَ خَيۡرٌ أَمۡ جَنَّةُ ٱلۡخُلۡدِ ٱلَّتِي وُعِدَ ٱلۡمُتَّقُونَۚ كَانَتۡ لَهُمۡ جَزَآءٗ وَمَصِيرٗا

१५. तुम्ही सांगा, काय हे अधिक चांगले आहे१ की ती कायमस्वरूपी जन्नत, जिचा वायदा नेक- सदाचारी लोकांना दिला गेला आहे, जो त्यांचा मोबदला आहे आणि त्यांच्या परतीचे मूळ ठिकाण आहे
Surah Al-Furqan, Verse 15


لَّهُمۡ فِيهَا مَا يَشَآءُونَ خَٰلِدِينَۚ كَانَ عَلَىٰ رَبِّكَ وَعۡدٗا مَّسۡـُٔولٗا

१६. ते जे काही इच्छितील ते त्यांच्यासाठी तिथे हजर असेल, नेहमी राहणारे हा तर तुमच्या पालनकर्त्याचा वायदा आहे, ज्याची मागणी केली गेली पाहिजे
Surah Al-Furqan, Verse 16


وَيَوۡمَ يَحۡشُرُهُمۡ وَمَا يَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ فَيَقُولُ ءَأَنتُمۡ أَضۡلَلۡتُمۡ عِبَادِي هَـٰٓؤُلَآءِ أَمۡ هُمۡ ضَلُّواْ ٱلسَّبِيلَ

१७. आणि ज्या दिवशी अल्लाह त्यांना आणि अल्लाहखेरीज ज्याची हे उपासना करीत राहिले त्या सर्वांना एकत्र करून विचारेल, काय माझ्‌या या दासांना तुम्ही मार्गभ्रष्ट केले की हे स्वतः मार्गापासून विचलित झाले?१
Surah Al-Furqan, Verse 17


قَالُواْ سُبۡحَٰنَكَ مَا كَانَ يَنۢبَغِي لَنَآ أَن نَّتَّخِذَ مِن دُونِكَ مِنۡ أَوۡلِيَآءَ وَلَٰكِن مَّتَّعۡتَهُمۡ وَءَابَآءَهُمۡ حَتَّىٰ نَسُواْ ٱلذِّكۡرَ وَكَانُواْ قَوۡمَۢا بُورٗا

१८. ते उत्तर देतील, पवित्र आहेस तू! स्वतः आमच्यासाठी हे योग्य नव्हते की तुझ्याखेरीज दुसऱ्यांना आपला मित्र- सहाय्यक बनविले असते. खरी गोष्ट अशी की तू यांना आणि यांच्या वाडवडिलांना सुख- संपन्नता प्रदान केली येथेपर्यंत की हे बोध- उपदेश विसरले. हे लोक विनाशास पात्रच होते
Surah Al-Furqan, Verse 18


فَقَدۡ كَذَّبُوكُم بِمَا تَقُولُونَ فَمَا تَسۡتَطِيعُونَ صَرۡفٗا وَلَا نَصۡرٗاۚ وَمَن يَظۡلِم مِّنكُمۡ نُذِقۡهُ عَذَابٗا كَبِيرٗا

१९. तेव्हा त्यांनी तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टींमध्ये खोटे ठरविले. आता ना तर तुमच्यात आपली शिक्षा टाळण्याची ताकद आहे ना मदत करण्याची. तुमच्यापैकी ज्याने देखील अत्याचार केला, आम्ही त्याला सक्त शिक्षा- यातनेची गोडी चाखवू
Surah Al-Furqan, Verse 19


وَمَآ أَرۡسَلۡنَا قَبۡلَكَ مِنَ ٱلۡمُرۡسَلِينَ إِلَّآ إِنَّهُمۡ لَيَأۡكُلُونَ ٱلطَّعَامَ وَيَمۡشُونَ فِي ٱلۡأَسۡوَاقِۗ وَجَعَلۡنَا بَعۡضَكُمۡ لِبَعۡضٖ فِتۡنَةً أَتَصۡبِرُونَۗ وَكَانَ رَبُّكَ بَصِيرٗا

२०. आणि आम्ही तुमच्यापूर्वी जेवढे देखील पैगंबर पाठविले ते सर्व भोजनही करीत असत आणि बाजारातही हिंडत फिरत असत, आणि आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्याच्या कसोटीचे माध्यम बनविले. १ काय तुम्ही धीर- संयम राखाल? आणि तुमचा पालनकर्ता सर्व काही पाहणारा आहे
Surah Al-Furqan, Verse 20


۞وَقَالَ ٱلَّذِينَ لَا يَرۡجُونَ لِقَآءَنَا لَوۡلَآ أُنزِلَ عَلَيۡنَا ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ أَوۡ نَرَىٰ رَبَّنَاۗ لَقَدِ ٱسۡتَكۡبَرُواْ فِيٓ أَنفُسِهِمۡ وَعَتَوۡ عُتُوّٗا كَبِيرٗا

२१. आणि ज्यांना आमच्या भेटीची आशा नाही, ते म्हणाले की आमच्यावर फरिश्ते का नाही अवतरित केले जात? किंवा आम्ही (आपल्या डोळ्यांनी) आपल्या पालनकर्त्यास पाहिले असते? त्या लोकांनी स्वतः आपल्यालाच खूप मोठे समजून घेतले आहे आणि फार अवज्ञा केली आहे
Surah Al-Furqan, Verse 21


يَوۡمَ يَرَوۡنَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةَ لَا بُشۡرَىٰ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُجۡرِمِينَ وَيَقُولُونَ حِجۡرٗا مَّحۡجُورٗا

२२. ज्या दिवशी हे फरिश्त्यांना पाहतील त्या दिवशी या अपराध्यांकरिता कोणताही आनंद नसेल आणि म्हणतील की वंचितच वंचित ठेवले गेलो
Surah Al-Furqan, Verse 22


وَقَدِمۡنَآ إِلَىٰ مَا عَمِلُواْ مِنۡ عَمَلٖ فَجَعَلۡنَٰهُ هَبَآءٗ مَّنثُورًا

२३. आणि त्यांनी जे जे कर्म केले होते आम्ही त्यांच्याकडे पुढे होऊन त्यांना कणांप्रमाणे क्षत-विक्षत करून टाकले
Surah Al-Furqan, Verse 23


أَصۡحَٰبُ ٱلۡجَنَّةِ يَوۡمَئِذٍ خَيۡرٞ مُّسۡتَقَرّٗا وَأَحۡسَنُ مَقِيلٗا

२४. (परंतु) त्या दिवशी जन्नतमध्ये राहणाऱ्यांचे ठिकाण फार चांगले असेल, आणि विश्रामस्थानही सुखदायक असेल
Surah Al-Furqan, Verse 24


وَيَوۡمَ تَشَقَّقُ ٱلسَّمَآءُ بِٱلۡغَمَٰمِ وَنُزِّلَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ تَنزِيلًا

२५. आणि ज्या दिवशी आकाश ढगांसह फाटून जाईल आणि फरिश्ते सतत उतरविले जातील
Surah Al-Furqan, Verse 25


ٱلۡمُلۡكُ يَوۡمَئِذٍ ٱلۡحَقُّ لِلرَّحۡمَٰنِۚ وَكَانَ يَوۡمًا عَلَى ٱلۡكَٰفِرِينَ عَسِيرٗا

२६. त्या दिवशी योग्यरित्या राज्यसत्ता केवळ रहमानचीच(कृपाळु) असेल, आणि हा दिवस काफिरांकरिता मोठा सक्त असेल
Surah Al-Furqan, Verse 26


وَيَوۡمَ يَعَضُّ ٱلظَّالِمُ عَلَىٰ يَدَيۡهِ يَقُولُ يَٰلَيۡتَنِي ٱتَّخَذۡتُ مَعَ ٱلرَّسُولِ سَبِيلٗا

२७. आणि त्या दिवशी अत्याचारी, आपल्या हातांना चावा घेऊन म्हणेल, अरेरे! मी पैगंबराचा मार्ग अंगीकारला असता तर बरे झाले असते
Surah Al-Furqan, Verse 27


يَٰوَيۡلَتَىٰ لَيۡتَنِي لَمۡ أَتَّخِذۡ فُلَانًا خَلِيلٗا

२८. अरेरे! मी अमुक एका इसमाला मित्र बनविले नसते तर बरे झाले असते
Surah Al-Furqan, Verse 28


لَّقَدۡ أَضَلَّنِي عَنِ ٱلذِّكۡرِ بَعۡدَ إِذۡ جَآءَنِيۗ وَكَانَ ٱلشَّيۡطَٰنُ لِلۡإِنسَٰنِ خَذُولٗا

२९. त्याने तर मला त्यानंतर मार्गभ्रष्ट केले, जेव्हा उपदेश माझ्याजवळ येऊन पोहोचला होता आणि सैतान तर मानवाला (वेळेवर) दगा देणारा आहे
Surah Al-Furqan, Verse 29


وَقَالَ ٱلرَّسُولُ يَٰرَبِّ إِنَّ قَوۡمِي ٱتَّخَذُواْ هَٰذَا ٱلۡقُرۡءَانَ مَهۡجُورٗا

३०. आणि पैगंबर म्हणेल की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, माझ्या जनसमूहाने या कुरआनास सोडून दिले होते
Surah Al-Furqan, Verse 30


وَكَذَٰلِكَ جَعَلۡنَا لِكُلِّ نَبِيٍّ عَدُوّٗا مِّنَ ٱلۡمُجۡرِمِينَۗ وَكَفَىٰ بِرَبِّكَ هَادِيٗا وَنَصِيرٗا

३१. आणि अशा प्रकारे आम्ही काही अपराध्यांना प्रत्येक पैगंबरांचे शत्रू बनविले आहे आणि तुमचा पालनकर्ताच मार्गदर्शन करणारा आणि मदत करणारा पुरेसा आहे
Surah Al-Furqan, Verse 31


وَقَالَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَوۡلَا نُزِّلَ عَلَيۡهِ ٱلۡقُرۡءَانُ جُمۡلَةٗ وَٰحِدَةٗۚ كَذَٰلِكَ لِنُثَبِّتَ بِهِۦ فُؤَادَكَۖ وَرَتَّلۡنَٰهُ تَرۡتِيلٗا

३२. आणि काफिर म्हणाले की त्याच्यावर संपूर्ण कुरआन एकाच वेळी का नाही अवतरित केले गेले? अशा प्रकारे (आम्ही थोडे थोडे करून अवतरित केले) यासाठी की याद्वआरे आम्ही तुमच्या हृदयास मजबूती प्रदान करावी. आणि आम्ही त्यास थांबून थांबूनच वाचून ऐकविले आहे
Surah Al-Furqan, Verse 32


وَلَا يَأۡتُونَكَ بِمَثَلٍ إِلَّا جِئۡنَٰكَ بِٱلۡحَقِّ وَأَحۡسَنَ تَفۡسِيرًا

३३. आणि हे तुमच्याजवळ जे काही उदाहरण घेऊन येतील आम्ही त्याचे खरे उत्तर आणि योग्य स्पष्टीकरण सांगू
Surah Al-Furqan, Verse 33


ٱلَّذِينَ يُحۡشَرُونَ عَلَىٰ وُجُوهِهِمۡ إِلَىٰ جَهَنَّمَ أُوْلَـٰٓئِكَ شَرّٞ مَّكَانٗا وَأَضَلُّ سَبِيلٗا

३४. जे लोक तोंडघशी पाडून जहन्नमकडे एकत्र केले जातील, तर तेच मोठ्या वाईट ठिकाणाचे आणि भ्रष्ट मार्गाचे आहेत
Surah Al-Furqan, Verse 34


وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡكِتَٰبَ وَجَعَلۡنَا مَعَهُۥٓ أَخَاهُ هَٰرُونَ وَزِيرٗا

३५. आणि निःसंशय, आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला आणि त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ हारूनला त्यांचा सहाय्यक बनविले
Surah Al-Furqan, Verse 35


فَقُلۡنَا ٱذۡهَبَآ إِلَى ٱلۡقَوۡمِ ٱلَّذِينَ كَذَّبُواْ بِـَٔايَٰتِنَا فَدَمَّرۡنَٰهُمۡ تَدۡمِيرٗا

३६. आणि सांगितले की तुम्ही दोघे त्या लोकांकडे जा, जे आमच्या निशाण्यांना खोटे ठरवित आहेत. मग आम्ही त्यांचा अगदी सर्वनाश केला
Surah Al-Furqan, Verse 36


وَقَوۡمَ نُوحٖ لَّمَّا كَذَّبُواْ ٱلرُّسُلَ أَغۡرَقۡنَٰهُمۡ وَجَعَلۡنَٰهُمۡ لِلنَّاسِ ءَايَةٗۖ وَأَعۡتَدۡنَا لِلظَّـٰلِمِينَ عَذَابًا أَلِيمٗا

३७. आणि नूहच्या जनसमूहानेही जेव्हा पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्यांना बुडवून टाकले आणि लोकांकरिता त्यांना बोधप्राप्तीचे चिन्ह बनविले आणि आम्ही अत्याचारींकरिता मोठी कठोर शिक्षा तयार करून ठेवली आहे
Surah Al-Furqan, Verse 37


وَعَادٗا وَثَمُودَاْ وَأَصۡحَٰبَ ٱلرَّسِّ وَقُرُونَۢا بَيۡنَ ذَٰلِكَ كَثِيرٗا

३८. आणि ‘आद’ जनसमूह आणि ‘समूद’ जनसमूह आणि विहीरवाल्यांना आणि त्यांच्या दरम्यानच्या अनेक संप्रदायांना नष्ट करून टाकले
Surah Al-Furqan, Verse 38


وَكُلّٗا ضَرَبۡنَا لَهُ ٱلۡأَمۡثَٰلَۖ وَكُلّٗا تَبَّرۡنَا تَتۡبِيرٗا

३९. आणि आम्ही प्रत्येकासमोर उदाहरणे प्रस्तुत केली, मग प्रत्येकाला पूर्णतः नष्ट केले
Surah Al-Furqan, Verse 39


وَلَقَدۡ أَتَوۡاْ عَلَى ٱلۡقَرۡيَةِ ٱلَّتِيٓ أُمۡطِرَتۡ مَطَرَ ٱلسَّوۡءِۚ أَفَلَمۡ يَكُونُواْ يَرَوۡنَهَاۚ بَلۡ كَانُواْ لَا يَرۡجُونَ نُشُورٗا

४०. आणि हे लोक त्या वस्तीजवळूनही ये-जा करतात, जिच्यावर मोठा वाईट प्रकारचा पाऊस पाडला गेला.१ काय हे तरीही ते पाहत नाहीत? खरी गोष्ट अशी की त्यांना मेल्यानंतर दुसऱ्यांदा जिवंत होऊन उभे राहण्यावर विश्वासच नाही
Surah Al-Furqan, Verse 40


وَإِذَا رَأَوۡكَ إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَٰذَا ٱلَّذِي بَعَثَ ٱللَّهُ رَسُولًا

४१. आणि तुम्हाला जेव्हा कधी पाहतात, तेव्हा तुमची थट्टा उडवू लागतात, हाच काय तो माणूस ज्याला अल्लाहने रसूल बनवून पाठविला आहे
Surah Al-Furqan, Verse 41


إِن كَادَ لَيُضِلُّنَا عَنۡ ءَالِهَتِنَا لَوۡلَآ أَن صَبَرۡنَا عَلَيۡهَاۚ وَسَوۡفَ يَعۡلَمُونَ حِينَ يَرَوۡنَ ٱلۡعَذَابَ مَنۡ أَضَلُّ سَبِيلًا

४२. (एवढे बरे) की आम्ही अटळ राहिलो, अन्यथा याने तर आम्हाला आमच्या आराध्य दैवतांपासून विचलित करण्यात काहीच कसर सोडली नव्हती. आणि जेव्हा हे (अल्लाहच्या) शिक्षा- यातनांना पाहतील तेव्हा त्यांना स्पष्टतः कळून येईल की पूर्णपणे मार्गापासून भटकलेला कोण होता
Surah Al-Furqan, Verse 42


أَرَءَيۡتَ مَنِ ٱتَّخَذَ إِلَٰهَهُۥ هَوَىٰهُ أَفَأَنتَ تَكُونُ عَلَيۡهِ وَكِيلًا

४३. काय तुम्ही त्यालाही पाहिले ज्याने आपल्या इच्छा-आकांक्षांना देवता (उपास्य) बनवून ठेवले आहे. काय तुम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकता
Surah Al-Furqan, Verse 43


أَمۡ تَحۡسَبُ أَنَّ أَكۡثَرَهُمۡ يَسۡمَعُونَ أَوۡ يَعۡقِلُونَۚ إِنۡ هُمۡ إِلَّا كَٱلۡأَنۡعَٰمِ بَلۡ هُمۡ أَضَلُّ سَبِيلًا

४४. काय तुम्ही याच विचारात आहात की त्यांच्यापैकी बहुतेक जण ऐकतात किंवा समजतात. ते तर अगदी जनावरांसारखे आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक वाट चुकलेले
Surah Al-Furqan, Verse 44


أَلَمۡ تَرَ إِلَىٰ رَبِّكَ كَيۡفَ مَدَّ ٱلظِّلَّ وَلَوۡ شَآءَ لَجَعَلَهُۥ سَاكِنٗا ثُمَّ جَعَلۡنَا ٱلشَّمۡسَ عَلَيۡهِ دَلِيلٗا

४५. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने सावलीला कशा प्रकारे विस्तृत केले आहे. त्याने इच्छिले असते तर तिला स्थिर केले असते, मग सूर्याला आम्ही त्यावर प्रमाण ठरविले
Surah Al-Furqan, Verse 45


ثُمَّ قَبَضۡنَٰهُ إِلَيۡنَا قَبۡضٗا يَسِيرٗا

४६. मग आम्ही त्याला हळू हळू आपल्याकडे ओढून घेतले
Surah Al-Furqan, Verse 46


وَهُوَ ٱلَّذِي جَعَلَ لَكُمُ ٱلَّيۡلَ لِبَاسٗا وَٱلنَّوۡمَ سُبَاتٗا وَجَعَلَ ٱلنَّهَارَ نُشُورٗا

४७. आणि तोच आहे, ज्याने रात्रीला तुमच्यासाठी पोषाख बनविले, आणि झोपेला सुख शांतीमय बनविले आणि दिवसाला उठून उभे राहण्याची वेळ
Surah Al-Furqan, Verse 47


وَهُوَ ٱلَّذِيٓ أَرۡسَلَ ٱلرِّيَٰحَ بُشۡرَۢا بَيۡنَ يَدَيۡ رَحۡمَتِهِۦۚ وَأَنزَلۡنَا مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ طَهُورٗا

४८. आणि तोच आहे जो कृपास्वरूप पावसापूर्वी खूशखबर देणाऱ्या हवेला पाठवितो आणि आम्ही आकाशातून अतिशय स्वच्छ- शुद्ध (पाक) पाणी वर्षवितो
Surah Al-Furqan, Verse 48


لِّنُحۡـِۧيَ بِهِۦ بَلۡدَةٗ مَّيۡتٗا وَنُسۡقِيَهُۥ مِمَّا خَلَقۡنَآ أَنۡعَٰمٗا وَأَنَاسِيَّ كَثِيرٗا

४९. यासाठी की त्याच्याद्वारे मृत झालेल्या शहराला जिवंत करावे आणि ते आम्ही आपल्या निर्मितीपैकी अधिकांश जनावरांना आणि माणसांना पाजतो
Surah Al-Furqan, Verse 49


وَلَقَدۡ صَرَّفۡنَٰهُ بَيۡنَهُمۡ لِيَذَّكَّرُواْ فَأَبَىٰٓ أَكۡثَرُ ٱلنَّاسِ إِلَّا كُفُورٗا

५०. आणि निःसंशय, आम्ही यास त्यांच्या दरम्यान अनेक प्रकारे वर्णन केले यासाठी की त्यांनी बोध प्राप्त करावा, परंतु तरीही अधिकांश लोकांनी कृतघ्नतेखेरीज (आणखी काही) मानले नाही
Surah Al-Furqan, Verse 50


وَلَوۡ شِئۡنَا لَبَعَثۡنَا فِي كُلِّ قَرۡيَةٖ نَّذِيرٗا

५१. आणि आम्ही जर इच्छिले असते तर प्रत्येक वस्तीत एक भय दाखविणारा पाठविला असता
Surah Al-Furqan, Verse 51


فَلَا تُطِعِ ٱلۡكَٰفِرِينَ وَجَٰهِدۡهُم بِهِۦ جِهَادٗا كَبِيرٗا

५२. तेव्हा तुम्ही काफिरांचे म्हणणे मान्य करू नका आणि कुरआनद्वारे पूर्ण शक्तीने त्यांच्याशी महाधर्मयुद्ध (जिहाद) करा
Surah Al-Furqan, Verse 52


۞وَهُوَ ٱلَّذِي مَرَجَ ٱلۡبَحۡرَيۡنِ هَٰذَا عَذۡبٞ فُرَاتٞ وَهَٰذَا مِلۡحٌ أُجَاجٞ وَجَعَلَ بَيۡنَهُمَا بَرۡزَخٗا وَحِجۡرٗا مَّحۡجُورٗا

५३. आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना आपसात मिळवून ठेवले आहे. एक आहे गोड चवदार आणि दुसरा खारा कडू आणि आणि या दोघांच्या दरम्यान एक आड पडदा आणि भक्कम आड उभा केला
Surah Al-Furqan, Verse 53


وَهُوَ ٱلَّذِي خَلَقَ مِنَ ٱلۡمَآءِ بَشَرٗا فَجَعَلَهُۥ نَسَبٗا وَصِهۡرٗاۗ وَكَانَ رَبُّكَ قَدِيرٗا

५४. आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून मानवाला निर्माण केले, मग त्याला वंश बाळगणारा आणि सासरवाडीचे नातेसंबंध राखणारा बनविले. निःसंशय, तुमचा पालनकर्ता प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे
Surah Al-Furqan, Verse 54


وَيَعۡبُدُونَ مِن دُونِ ٱللَّهِ مَا لَا يَنفَعُهُمۡ وَلَا يَضُرُّهُمۡۗ وَكَانَ ٱلۡكَافِرُ عَلَىٰ رَبِّهِۦ ظَهِيرٗا

५५. आणि हे अल्लाहऐवजी अशांची उपासना करतात जे ना त्यांना काही लाभ पोहचवू शकतात आणि ना काही हानि पोहचवू शकतात. काफिर तर आहेच आपल्या पालनकर्त्याविरूद्ध (सैताना) चा सहाय्यक
Surah Al-Furqan, Verse 55


وَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ إِلَّا مُبَشِّرٗا وَنَذِيرٗا

५६. आणि आम्ही तुम्हाला खूशखबर देणारा आणि खबरदार करणारा (पैगंबर) बनवून पाठविले आहे
Surah Al-Furqan, Verse 56


قُلۡ مَآ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَيۡهِ مِنۡ أَجۡرٍ إِلَّا مَن شَآءَ أَن يَتَّخِذَ إِلَىٰ رَبِّهِۦ سَبِيلٗا

५७. सांगा की मी (कुरआन पोहचविल्याबद्दल) तुमच्याकडून कसलेही पारिश्रमिक इच्छित नाही, परंतु हे की जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याचा मार्ग अंगीकारावा
Surah Al-Furqan, Verse 57


وَتَوَكَّلۡ عَلَى ٱلۡحَيِّ ٱلَّذِي لَا يَمُوتُ وَسَبِّحۡ بِحَمۡدِهِۦۚ وَكَفَىٰ بِهِۦ بِذُنُوبِ عِبَادِهِۦ خَبِيرًا

५८. आणि त्या चिरकाल राहणाऱ्या अल्लाहवर पूर्ण विश्वास राखावा, ज्याला कधीही मृत्यु नाही त्याच्या प्रशंसेसह त्याची पवित्रता (तस्बीह) वर्णन करीत राहावे. तो आपल्या दासांचे अपराध चांगल्या प्रकारे जाणतो
Surah Al-Furqan, Verse 58


ٱلَّذِي خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَيۡنَهُمَا فِي سِتَّةِ أَيَّامٖ ثُمَّ ٱسۡتَوَىٰ عَلَى ٱلۡعَرۡشِۖ ٱلرَّحۡمَٰنُ فَسۡـَٔلۡ بِهِۦ خَبِيرٗا

५९. तोच आहे ज्याने आकाशांना आणि जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या समस्त वस्तूंना सहा दिवसांत निर्माण केले, मग तो अर्श (ईश-सिंहासना) वर बुलंद झाला. तो रहमान आहे, तुम्ही त्याच्याविषयी एखाद्या जाणकाराला विचारा
Surah Al-Furqan, Verse 59


وَإِذَا قِيلَ لَهُمُ ٱسۡجُدُواْۤ لِلرَّحۡمَٰنِ قَالُواْ وَمَا ٱلرَّحۡمَٰنُ أَنَسۡجُدُ لِمَا تَأۡمُرُنَا وَزَادَهُمۡ نُفُورٗا۩

६०. आणि त्यांना जेव्हा देखील सांगितले जाते की रहमान (दयावान अल्लाह) ला सजदा करा (त्याच्यापुढे माथा टेका) तेव्हा ते म्हणतात की रहमान काय आहे? काय आम्ही त्याला सजदा करावा, ज्याचा आदेश तुम्ही आम्हाला देत आहात आणि (या आवाहनाने) त्यांच्या तिरस्कारात वाढच होते
Surah Al-Furqan, Verse 60


تَبَارَكَ ٱلَّذِي جَعَلَ فِي ٱلسَّمَآءِ بُرُوجٗا وَجَعَلَ فِيهَا سِرَٰجٗا وَقَمَرٗا مُّنِيرٗا

६१. मोठा शुभ- मंगलप्रद आहे तो ज्याने आकाशात बुरुज बनविले, आणि त्यात सूर्य बनविला आणि प्रकाशमान चंद्र देखील
Surah Al-Furqan, Verse 61


وَهُوَ ٱلَّذِي جَعَلَ ٱلَّيۡلَ وَٱلنَّهَارَ خِلۡفَةٗ لِّمَنۡ أَرَادَ أَن يَذَّكَّرَ أَوۡ أَرَادَ شُكُورٗا

६२. आणि त्यानेच रात्र आणि दिवसाला एका पाठोपाठ ये-जा करणारा बनविले त्या माणसाच्या बोध- उपदेशाकरिता, जो बोध प्राप्त करण्याचा किंवा कृतज्ञशील होण्याचा इरादा राखत असेल
Surah Al-Furqan, Verse 62


وَعِبَادُ ٱلرَّحۡمَٰنِ ٱلَّذِينَ يَمۡشُونَ عَلَى ٱلۡأَرۡضِ هَوۡنٗا وَإِذَا خَاطَبَهُمُ ٱلۡجَٰهِلُونَ قَالُواْ سَلَٰمٗا

६३. आणि रहमान (दयावान अल्लाह) चे सच्चे दास ते आहेत, जे जमिनीवर नरमीने चालतात आणि जेव्हा अज्ञानी लोक त्यांच्याशी बोलू लागतात, तेव्हा ते म्हणतात सलाम आहे.१
Surah Al-Furqan, Verse 63


وَٱلَّذِينَ يَبِيتُونَ لِرَبِّهِمۡ سُجَّدٗا وَقِيَٰمٗا

६४. आणि जे आपल्या पालनकर्त्यासमोर सजदा करतात आणि उभे राहून (नमाजच्या अवस्थेत) रात्र घालवितात
Surah Al-Furqan, Verse 64


وَٱلَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَا ٱصۡرِفۡ عَنَّا عَذَابَ جَهَنَّمَۖ إِنَّ عَذَابَهَا كَانَ غَرَامًا

६५. आणि जे दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! जहन्नमच्या शिक्षा- यातनेला आमच्यापासून दूरच ठेव, कारण तिची शिक्षा अगदी चिकटून राहणारी आहे. १
Surah Al-Furqan, Verse 65


إِنَّهَا سَآءَتۡ مُسۡتَقَرّٗا وَمُقَامٗا

६६. ते कायमस्वरूपी ठिकाण आणि निवासाच्या दृष्टीने मोठी वाईट जागा आहे
Surah Al-Furqan, Verse 66


وَٱلَّذِينَ إِذَآ أَنفَقُواْ لَمۡ يُسۡرِفُواْ وَلَمۡ يَقۡتُرُواْ وَكَانَ بَيۡنَ ذَٰلِكَ قَوَامٗا

६७. आणि जे खर्च करतानाही ना उधळपट्टी करतात, ना कंजूसपणा, किंबहुना या दोघांमधील समतोल मार्ग असतो
Surah Al-Furqan, Verse 67


وَٱلَّذِينَ لَا يَدۡعُونَ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَ وَلَا يَقۡتُلُونَ ٱلنَّفۡسَ ٱلَّتِي حَرَّمَ ٱللَّهُ إِلَّا بِٱلۡحَقِّ وَلَا يَزۡنُونَۚ وَمَن يَفۡعَلۡ ذَٰلِكَ يَلۡقَ أَثَامٗا

६८. आणि जे अल्लाहसोबत दुसऱ्या एखाद्या उपास्याला पुकारत नाही, आणि एखाद्या अशा माणसाला, ज्याची हत्या करणे अल्लाहने हराम (अवैध) केले असावे, त्याची नाहक हत्या करीत नाही, ना ते व्यभिचार करतात१ आणि जो कोणी हे कर्म करील तर तो स्वतःवर कठोर शिक्षा ओढवून घेईल
Surah Al-Furqan, Verse 68


يُضَٰعَفۡ لَهُ ٱلۡعَذَابُ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ وَيَخۡلُدۡ فِيهِۦ مُهَانًا

६९. त्याला कयामतच्या दिवशी दुप्पट अज़ाब (शिक्षा- यातना) दिला जाईल आणि तो अपमान आणि अनादरासह सदैव तेथेच राहील
Surah Al-Furqan, Verse 69


إِلَّا مَن تَابَ وَءَامَنَ وَعَمِلَ عَمَلٗا صَٰلِحٗا فَأُوْلَـٰٓئِكَ يُبَدِّلُ ٱللَّهُ سَيِّـَٔاتِهِمۡ حَسَنَٰتٖۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورٗا رَّحِيمٗا

७०. त्या लोकांखेरीज, जे माफी मागतील आणि ईमान राखतील आणि नेकीचे कर्म करतील तर अशा लोकांचे अपराध, अल्लाह सत्कमर्मात बदलतो. अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे
Surah Al-Furqan, Verse 70


وَمَن تَابَ وَعَمِلَ صَٰلِحٗا فَإِنَّهُۥ يَتُوبُ إِلَى ٱللَّهِ مَتَابٗا

७१. आणि जो मनुष्य माफी मागेल आणि सत्कर्म करत राहील तर तो वास्तविकपणे अल्लाहकडे खरा झुकाव राखतो
Surah Al-Furqan, Verse 71


وَٱلَّذِينَ لَا يَشۡهَدُونَ ٱلزُّورَ وَإِذَا مَرُّواْ بِٱللَّغۡوِ مَرُّواْ كِرَامٗا

७२. आणि जे खोटी साक्ष देत नाहीत, आणि जेव्हा ते एखाद्या निरर्थक आणि व्यर्थ गोष्टीजवळून जातात, तेव्हा प्रतिष्ठापूर्वक जातात
Surah Al-Furqan, Verse 72


وَٱلَّذِينَ إِذَا ذُكِّرُواْ بِـَٔايَٰتِ رَبِّهِمۡ لَمۡ يَخِرُّواْ عَلَيۡهَا صُمّٗا وَعُمۡيَانٗا

७३. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पालनकर्त्या (ची वचने आणि वायद्यांसंबंधी) च्या आयती ऐकविल्या जातात तेव्हा ते त्यावर आंधळे-बहीरे होऊन उडी घेत नाहीत
Surah Al-Furqan, Verse 73


وَٱلَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَا هَبۡ لَنَا مِنۡ أَزۡوَٰجِنَا وَذُرِّيَّـٰتِنَا قُرَّةَ أَعۡيُنٖ وَٱجۡعَلۡنَا لِلۡمُتَّقِينَ إِمَامًا

७४. आणि अशी दुआ (प्रार्थना) करतात की हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला आमच्या पत्न्या आणि संततीद्वारे नेत्रांना शितलता प्रदान कर आणि आम्हाला नेक- सदाचारी लोकांचा नेता बनव
Surah Al-Furqan, Verse 74


أُوْلَـٰٓئِكَ يُجۡزَوۡنَ ٱلۡغُرۡفَةَ بِمَا صَبَرُواْ وَيُلَقَّوۡنَ فِيهَا تَحِيَّةٗ وَسَلَٰمًا

७५. हेच ते लोक होत, ज्यांना त्यांच्या सहनशीलतेच्या मोबदल्यात (जन्नतचे उंच) सज्जे प्रदान केले जातील, तिथे त्यांना आशीर्वाद आणि सलाम पोहचविला जाईल
Surah Al-Furqan, Verse 75


خَٰلِدِينَ فِيهَاۚ حَسُنَتۡ مُسۡتَقَرّٗا وَمُقَامٗا

७६. तिथे ते नेहमी नेहमी राहतील, ती अतिशय चांगली जागा आणि आरामाचे ठिकाण आहे
Surah Al-Furqan, Verse 76


قُلۡ مَا يَعۡبَؤُاْ بِكُمۡ رَبِّي لَوۡلَا دُعَآؤُكُمۡۖ فَقَدۡ كَذَّبۡتُمۡ فَسَوۡفَ يَكُونُ لِزَامَۢا

७७. सांगा, जर तुमची मृदु- कोमल दुआ (प्रार्थना) नसती, तर माझ्या पालनकर्त्याने तुमची कदापि पर्वा केली नसती. तुम्ही तर खोटे ठरविले आहे. आता लवकरच त्याची शिक्षा तुम्हाला येऊन धरेल
Surah Al-Furqan, Verse 77


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 24
>> Surah 26

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai