UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Luqman - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


الٓمٓ

१. अलिफ. लाम. मीम
Surah Luqman, Verse 1


تِلۡكَ ءَايَٰتُ ٱلۡكِتَٰبِ ٱلۡحَكِيمِ

२. या दिव्य ज्ञानयुक्त ग्रंथाच्या आयती आहेत
Surah Luqman, Verse 2


هُدٗى وَرَحۡمَةٗ لِّلۡمُحۡسِنِينَ

३. जो अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि (सर्वथा) दया-कृपा आहे
Surah Luqman, Verse 3


ٱلَّذِينَ يُقِيمُونَ ٱلصَّلَوٰةَ وَيُؤۡتُونَ ٱلزَّكَوٰةَ وَهُم بِٱلۡأٓخِرَةِ هُمۡ يُوقِنُونَ

४. जे लोक नेहमी वक्तशीरपणे नमाज पढतात आणि जकात (धर्मदान) देतात, आणि आखिरतवर (पूर्ण) विश्वास ठेवतात
Surah Luqman, Verse 4


أُوْلَـٰٓئِكَ عَلَىٰ هُدٗى مِّن رَّبِّهِمۡۖ وَأُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلۡمُفۡلِحُونَ

५. हेच ते लोक होत, जे आपल्या पालनकर्त्यातर्फे मार्गदर्शनावर आहेत आणि हेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत
Surah Luqman, Verse 5


وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يَشۡتَرِي لَهۡوَ ٱلۡحَدِيثِ لِيُضِلَّ عَن سَبِيلِ ٱللَّهِ بِغَيۡرِ عِلۡمٖ وَيَتَّخِذَهَا هُزُوًاۚ أُوْلَـٰٓئِكَ لَهُمۡ عَذَابٞ مُّهِينٞ

६. आणि काही लोक असेही आहेत जे निरर्थक, वाह्यात गोष्टी विकत घेतात की अज्ञानतेसह लोकांना अल्लाहच्या मार्गापासून दूर करावे आणि त्याला थट्टा-मस्करी बनवावे. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
Surah Luqman, Verse 6


وَإِذَا تُتۡلَىٰ عَلَيۡهِ ءَايَٰتُنَا وَلَّىٰ مُسۡتَكۡبِرٗا كَأَن لَّمۡ يَسۡمَعۡهَا كَأَنَّ فِيٓ أُذُنَيۡهِ وَقۡرٗاۖ فَبَشِّرۡهُ بِعَذَابٍ أَلِيمٍ

७. आणि जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा घमेंडीने अशा प्रकारे तोंड फिरवितो की जणू त्याने ऐकलेच नाही, जणू काही त्याच्या दोन्ही कानात बधिरता आहे. तुम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची खबर द्या
Surah Luqman, Verse 7


إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ لَهُمۡ جَنَّـٰتُ ٱلنَّعِيمِ

८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान स्वीकारले व जे सत्कर्म करीत राहिले त्याच्याकरिता सुखांनी युक्त अशी जन्नत आहे
Surah Luqman, Verse 8


خَٰلِدِينَ فِيهَاۖ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٗاۚ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ

९. जिथे ते सदैव काळ राहतील, अल्लाहचा सच्चा वायदा आहे. तो मोठा प्रभुत्वशाली आणि पूर्णतः बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे
Surah Luqman, Verse 9


خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ بِغَيۡرِ عَمَدٖ تَرَوۡنَهَاۖ وَأَلۡقَىٰ فِي ٱلۡأَرۡضِ رَوَٰسِيَ أَن تَمِيدَ بِكُمۡ وَبَثَّ فِيهَا مِن كُلِّ دَآبَّةٖۚ وَأَنزَلۡنَا مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ فَأَنۢبَتۡنَا فِيهَا مِن كُلِّ زَوۡجٖ كَرِيمٍ

१०. त्यानेच आकाशांना खांबांविना बनविले आहे. तुम्ही त्यांना पाहता आणि त्याने जमिनीवर पहाड रोवले, यासाठी की तिने तुम्हाला कंपित करू न शकावे आणि प्रत्येक प्रकारचे सजीव जमिनीत पसरविले आणि त्याने आकाशातून पाऊस पाडून प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या उगविल्या
Surah Luqman, Verse 10


هَٰذَا خَلۡقُ ٱللَّهِ فَأَرُونِي مَاذَا خَلَقَ ٱلَّذِينَ مِن دُونِهِۦۚ بَلِ ٱلظَّـٰلِمُونَ فِي ضَلَٰلٖ مُّبِينٖ

११. ही आहे अल्लाहची सृष्टी (मखलूक), आता तुम्ही मला याच्याखेरीज दुसऱ्या कोणाची सृष्टी तर दाखवा (काही नाही) हे अत्याचारी लोक उघड मार्गभ्रष्टतेत आहेत
Surah Luqman, Verse 11


وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا لُقۡمَٰنَ ٱلۡحِكۡمَةَ أَنِ ٱشۡكُرۡ لِلَّهِۚ وَمَن يَشۡكُرۡ فَإِنَّمَا يَشۡكُرُ لِنَفۡسِهِۦۖ وَمَن كَفَرَ فَإِنَّ ٱللَّهَ غَنِيٌّ حَمِيدٞ

१२. आणि आम्ही निःसंशय लुकमानला बुद्धिकौशल्य प्रदान केले१ की तुम्ही अल्लाहशी कृतज्ञशील राहा. प्रत्येक कृतज्ञशील मनुष्य आपल्याच फायद्याकरिता कृतज्ञता व्यक्त करतो, जो कोणी कृतघ्नता दर्शवील तर त्याने जाणून घ्यावे की अल्लाह निःस्पृह, प्रशंसनीय आहे
Surah Luqman, Verse 12


وَإِذۡ قَالَ لُقۡمَٰنُ لِٱبۡنِهِۦ وَهُوَ يَعِظُهُۥ يَٰبُنَيَّ لَا تُشۡرِكۡ بِٱللَّهِۖ إِنَّ ٱلشِّرۡكَ لَظُلۡمٌ عَظِيمٞ

१३. आणि जेव्हा लुकमान उपदेश करताना आपल्या पुत्रास म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला सहभागी ठरवू नकोस. निःसंशय, अल्ला चा सहभागी ठरविणे फार मोठा अत्याचार आहे
Surah Luqman, Verse 13


وَوَصَّيۡنَا ٱلۡإِنسَٰنَ بِوَٰلِدَيۡهِ حَمَلَتۡهُ أُمُّهُۥ وَهۡنًا عَلَىٰ وَهۡنٖ وَفِصَٰلُهُۥ فِي عَامَيۡنِ أَنِ ٱشۡكُرۡ لِي وَلِوَٰلِدَيۡكَ إِلَيَّ ٱلۡمَصِيرُ

१४. आम्ही माणसाला माता-पित्याविषयी शिकवण दिली आहे. त्याच्या मातेने यातनांवर यातना सहन करून त्याला गर्भात ठेवले आणि त्याचे दूध सोडविण्यात दोन वर्षे लागली. तेव्हा तू माझे आणि आपल्या माता-पित्याचे आभार मान. शेवटी माझ्याचकडे परतून यायचे आहे
Surah Luqman, Verse 14


وَإِن جَٰهَدَاكَ عَلَىٰٓ أَن تُشۡرِكَ بِي مَا لَيۡسَ لَكَ بِهِۦ عِلۡمٞ فَلَا تُطِعۡهُمَاۖ وَصَاحِبۡهُمَا فِي ٱلدُّنۡيَا مَعۡرُوفٗاۖ وَٱتَّبِعۡ سَبِيلَ مَنۡ أَنَابَ إِلَيَّۚ ثُمَّ إِلَيَّ مَرۡجِعُكُمۡ فَأُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ

१५. आणि जर ते दोघे (माता-पिता) तुझ्यावर या गोष्टीचा दबाव टाकतील की तू माझ्यासोबत (दुसऱ्याला) सहभागी ठरव, ज्याचे तुला ज्ञान नसावे, तेव्हा तू त्यांचे आज्ञापालन करू नकोस, परंतु या जगात त्यांच्याशी भलेपणाचा व्यवहार कर आणि त्याच्या मार्गावर चालत राहा, जो माझ्याकडे झुकलेला असेल. तुम्हा सर्वांचे परतणे माझ्याचकडे आहे. तुम्ही जे काही करता त्यासंबंधी मी त्या वेळी तुम्हाला माहीत करेन
Surah Luqman, Verse 15


يَٰبُنَيَّ إِنَّهَآ إِن تَكُ مِثۡقَالَ حَبَّةٖ مِّنۡ خَرۡدَلٖ فَتَكُن فِي صَخۡرَةٍ أَوۡ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ أَوۡ فِي ٱلۡأَرۡضِ يَأۡتِ بِهَا ٱللَّهُۚ إِنَّ ٱللَّهَ لَطِيفٌ خَبِيرٞ

१६. प्रिय पुत्रा! जर एखादी वस्तू राईच्या दाण्याइतकी असेल, मग तोही एखाद्या दगडाखाली असेल किंवा आकाशांमध्ये असेल किंवा जमिनीत असेल, तर तिला अल्लाह अवश्य आणील. अल्लाह अतिशय सूक्ष्मदर्श आणि जाणणारा आहे
Surah Luqman, Verse 16


يَٰبُنَيَّ أَقِمِ ٱلصَّلَوٰةَ وَأۡمُرۡ بِٱلۡمَعۡرُوفِ وَٱنۡهَ عَنِ ٱلۡمُنكَرِ وَٱصۡبِرۡ عَلَىٰ مَآ أَصَابَكَۖ إِنَّ ذَٰلِكَ مِنۡ عَزۡمِ ٱلۡأُمُورِ

१७. हे माझ्या प्रिय पुत्रा! तू नमाज कायम राख, सत्कर्मांचा आदेश दे आणि दुष्कर्मांपासून रोखत जा, आणि जर तुझ्यावर संकट आले तर धीर-संयम राख (विश्वास ठेव) ही सर्व ताकीदी कामांपैकी आहेत
Surah Luqman, Verse 17


وَلَا تُصَعِّرۡ خَدَّكَ لِلنَّاسِ وَلَا تَمۡشِ فِي ٱلۡأَرۡضِ مَرَحًاۖ إِنَّ ٱللَّهَ لَا يُحِبُّ كُلَّ مُخۡتَالٖ فَخُورٖ

१८. आणि लोकांसमोर आपले गाल फुगवू नका आणि जमिनीवर ताठपणाने घमेंड दाखवत चालू नका. कोणत्याही गर्विष्ठ , घमेंडी माणसाला अल्लाह पसंत करीत नाही
Surah Luqman, Verse 18


وَٱقۡصِدۡ فِي مَشۡيِكَ وَٱغۡضُضۡ مِن صَوۡتِكَۚ إِنَّ أَنكَرَ ٱلۡأَصۡوَٰتِ لَصَوۡتُ ٱلۡحَمِيرِ

१९. आणि आपल्या चालण्यात मध्यमता राखा, आणि आपला आवाज (स्वर) सौम्य राख, निःसंशय, गाढवाचा आवाज अतिशय वाईट आवाज आहे
Surah Luqman, Verse 19


أَلَمۡ تَرَوۡاْ أَنَّ ٱللَّهَ سَخَّرَ لَكُم مَّا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِ وَأَسۡبَغَ عَلَيۡكُمۡ نِعَمَهُۥ ظَٰهِرَةٗ وَبَاطِنَةٗۗ وَمِنَ ٱلنَّاسِ مَن يُجَٰدِلُ فِي ٱللَّهِ بِغَيۡرِ عِلۡمٖ وَلَا هُدٗى وَلَا كِتَٰبٖ مُّنِيرٖ

२०. काय तुम्ही नाही पाहत की अल्लाहने जमीन आणि आकाशाच्या प्रत्येक वस्तूला आमच्या सेवेस लावून ठेवले आहे आणि आपल्या उघड आणि लपलेल्या देण्या तुमच्यावर पूर्ण केल्या आहेत, आणि काही लोक अल्लाहविषयी कसल्याही ज्ञानाविना, मार्गदर्शनाविना आणि दिव्य ग्रंथाविना वाद घालतात
Surah Luqman, Verse 20


وَإِذَا قِيلَ لَهُمُ ٱتَّبِعُواْ مَآ أَنزَلَ ٱللَّهُ قَالُواْ بَلۡ نَتَّبِعُ مَا وَجَدۡنَا عَلَيۡهِ ءَابَآءَنَآۚ أَوَلَوۡ كَانَ ٱلشَّيۡطَٰنُ يَدۡعُوهُمۡ إِلَىٰ عَذَابِ ٱلسَّعِيرِ

२१. आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने अवतरित केलेल्या वहयी (प्रकाशना) चे अनुसरण करा, तेव्हा म्हणतात की आम्ही तर ज्या मार्गावर आपल्या वाडवडिलांना पाहिले आहे, त्याच मार्गाचे अनुसरण करू. मग सैतान त्यांच्या वाडवडिलांना जहन्नमच्या शिक्षा-यातनेकडे बोलवित असला तरी
Surah Luqman, Verse 21


۞وَمَن يُسۡلِمۡ وَجۡهَهُۥٓ إِلَى ٱللَّهِ وَهُوَ مُحۡسِنٞ فَقَدِ ٱسۡتَمۡسَكَ بِٱلۡعُرۡوَةِ ٱلۡوُثۡقَىٰۗ وَإِلَى ٱللَّهِ عَٰقِبَةُ ٱلۡأُمُورِ

२२. आणि जो मनुष्य आपल्या चेहऱ्याला (स्वतःला) अल्लाहच्या हवाली करील आणि ती नेक सदाचारीही असेल तर निश्चितच त्याने मजबूत आधार धरला. समस्त कर्मांची परिणीती अल्लाहकडे आहे
Surah Luqman, Verse 22


وَمَن كَفَرَ فَلَا يَحۡزُنكَ كُفۡرُهُۥٓۚ إِلَيۡنَا مَرۡجِعُهُمۡ فَنُنَبِّئُهُم بِمَا عَمِلُوٓاْۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ

२३. आणि काफिरांच्या कुप्र (इन्कारा) ने तुम्ही दुःखी होऊ नका. शेवटी त्या सर्वांना आमच्याचकडे परतून यायचे आहे. त्या वेळी आम्ही त्यांना दाखवू जे काही ते करीत राहिले. निःसंशय, अल्लाह हृदयातील रहस्यभेदांनाही जाणतो
Surah Luqman, Verse 23


نُمَتِّعُهُمۡ قَلِيلٗا ثُمَّ نَضۡطَرُّهُمۡ إِلَىٰ عَذَابٍ غَلِيظٖ

२४. आम्ही त्यांना काहीसा फायदा असाच पोहचवित राहू, परंतु शेवटी आम्ही त्यांना अतिशय लाचारीच्या अवस्थेत सक्त शिक्षा-यातनेकडे हाकत नेऊ
Surah Luqman, Verse 24


وَلَئِن سَأَلۡتَهُم مَّنۡ خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ لَيَقُولُنَّ ٱللَّهُۚ قُلِ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِۚ بَلۡ أَكۡثَرُهُمۡ لَا يَعۡلَمُونَ

२५. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाश आणि जमिनीचा निर्माण करणारा कोण आहे? तर हे अवश्य उत्तर देतील, अल्लाह! तेव्हा त्यांना सांगा की सर्व प्रशंसेस योग्य अल्लाहच आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत
Surah Luqman, Verse 25


لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ إِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡغَنِيُّ ٱلۡحَمِيدُ

२६. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे निःसंशय, अल्लाह मोठा निःस्पृह आणि स्तुती-प्रशंसेस पात्र आहे
Surah Luqman, Verse 26


وَلَوۡ أَنَّمَا فِي ٱلۡأَرۡضِ مِن شَجَرَةٍ أَقۡلَٰمٞ وَٱلۡبَحۡرُ يَمُدُّهُۥ مِنۢ بَعۡدِهِۦ سَبۡعَةُ أَبۡحُرٖ مَّا نَفِدَتۡ كَلِمَٰتُ ٱللَّهِۚ إِنَّ ٱللَّهَ عَزِيزٌ حَكِيمٞ

२७. आणि साऱ्या धरतीवरील वृक्षांच्या जर लेखण्या होतील आणि सारे समुद्र शाई बनतील आणि त्यांच्यानंतर सात समुद्र दुसरे असतील तरीही अल्लाहची प्रशंसा संपू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत (बुद्धिकुशलता) बाळगणारा आहे
Surah Luqman, Verse 27


مَّا خَلۡقُكُمۡ وَلَا بَعۡثُكُمۡ إِلَّا كَنَفۡسٖ وَٰحِدَةٍۚ إِنَّ ٱللَّهَ سَمِيعُۢ بَصِيرٌ

२८. तुम्ही सर्वांना निर्माण करणे आणि मेल्यानंतर पुन्हा जिवंत करणे असेच आहे जसे एका जीवाला. निःसंशय, अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे
Surah Luqman, Verse 28


أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱللَّهَ يُولِجُ ٱلَّيۡلَ فِي ٱلنَّهَارِ وَيُولِجُ ٱلنَّهَارَ فِي ٱلَّيۡلِ وَسَخَّرَ ٱلشَّمۡسَ وَٱلۡقَمَرَۖ كُلّٞ يَجۡرِيٓ إِلَىٰٓ أَجَلٖ مُّسَمّٗى وَأَنَّ ٱللَّهَ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرٞ

२९. किंवा तुम्ही नाही पाहत की अल्लाह रात्रीला, दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो. सूर्य आणि चंद्राला त्यानेच आज्ञाधारक बनवून ठेवले आहे की प्रत्येक निर्धारित वेळेपर्यंत चालत राहावा तुम्ही जे काही कर्म करता, अल्लाह ते प्रत्येक कर्म जाणतो
Surah Luqman, Verse 29


ذَٰلِكَ بِأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡحَقُّ وَأَنَّ مَا يَدۡعُونَ مِن دُونِهِ ٱلۡبَٰطِلُ وَأَنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡعَلِيُّ ٱلۡكَبِيرُ

३०. हे सर्व (व्यवस्था) या कारणास्तव आहे की अल्लाह सत्य आहे, आणि त्याच्याखेरीज ज्यांना लोक (उपास्य समजून) पुकारतात, सर्व खोटे (मिथ्या) आहेत, आणि निःसंशय अल्लाह अतिउच्च आणि मोठा महान आहे
Surah Luqman, Verse 30


أَلَمۡ تَرَ أَنَّ ٱلۡفُلۡكَ تَجۡرِي فِي ٱلۡبَحۡرِ بِنِعۡمَتِ ٱللَّهِ لِيُرِيَكُم مِّنۡ ءَايَٰتِهِۦٓۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّكُلِّ صَبَّارٖ شَكُورٖ

३१. काय तुम्ही या गोष्टीवर विचार नाही करीत की पाण्यात नौका अल्लाहच्या कृपा-देणगीने चालत आहेत, यासाठी की त्याने तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवाव्यात. निश्चितच यात प्रत्येक सबुरी राखणाऱ्या आणि कृतज्ञशील असणाऱ्याकरिता अनेक निशाण्या आहेत
Surah Luqman, Verse 31


وَإِذَا غَشِيَهُم مَّوۡجٞ كَٱلظُّلَلِ دَعَوُاْ ٱللَّهَ مُخۡلِصِينَ لَهُ ٱلدِّينَ فَلَمَّا نَجَّىٰهُمۡ إِلَى ٱلۡبَرِّ فَمِنۡهُم مُّقۡتَصِدٞۚ وَمَا يَجۡحَدُ بِـَٔايَٰتِنَآ إِلَّا كُلُّ خَتَّارٖ كَفُورٖ

३२. आणि जेव्हा त्यांच्यावर लाटा, त्या सावल्यांप्रमाणे आच्छादित होतात तेव्हा ते (मोठा) विश्वास बाळगून अल्लाहलाच पुकारतात, आणि जेव्हा अल्लाह त्यांना त्यातून सोडवून खुष्कीकडे पोहचवितो, तेव्हा त्यांच्यापैकी काही संतुलित राहतात, आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ तेच लोक करतात, जे वचन भंग करणारे आणि कृतघ्न असतील
Surah Luqman, Verse 32


يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ٱتَّقُواْ رَبَّكُمۡ وَٱخۡشَوۡاْ يَوۡمٗا لَّا يَجۡزِي وَالِدٌ عَن وَلَدِهِۦ وَلَا مَوۡلُودٌ هُوَ جَازٍ عَن وَالِدِهِۦ شَيۡـًٔاۚ إِنَّ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٞۖ فَلَا تَغُرَّنَّكُمُ ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَا وَلَا يَغُرَّنَّكُم بِٱللَّهِ ٱلۡغَرُورُ

३३. लोकांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा आणि त्या दिवसाचे भय ठेवा, ज्या दिवशी पिता आपल्या पुत्राला कसलाही लाभ पोहचवू शकणार नाही आणि ना पुत्र आपल्या पित्यास किंचितही लाभ पोहचविणारा असेल. लक्षात ठेवा! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. पाहा! तुम्हाला ऐहिक जीवनाने धोक्यात टाकू नये आणि ना धोकेबाज (सैताना) ने तुम्हाला धोक्यात टाकावे
Surah Luqman, Verse 33


إِنَّ ٱللَّهَ عِندَهُۥ عِلۡمُ ٱلسَّاعَةِ وَيُنَزِّلُ ٱلۡغَيۡثَ وَيَعۡلَمُ مَا فِي ٱلۡأَرۡحَامِۖ وَمَا تَدۡرِي نَفۡسٞ مَّاذَا تَكۡسِبُ غَدٗاۖ وَمَا تَدۡرِي نَفۡسُۢ بِأَيِّ أَرۡضٖ تَمُوتُۚ إِنَّ ٱللَّهَ عَلِيمٌ خَبِيرُۢ

३४. निःसंशय, अल्लाहच्याच जवळ कयामतचे ज्ञान आहे. तोच पर्जन्यवृष्टी करतो, आणि मातेच्या गर्भात जे काही आहे ते जाणतो. कोणीही जाणत नाही की उद्या काय कमवील? ना कोणाला हे माहीत आहे की तो कोणत्या भूमीवर मरण पावेल.१ लक्षात ठेवा, अल्लाहच संपूर्ण ज्ञान बाळगणारा आणि सत्य जाणणारा आहे
Surah Luqman, Verse 34


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 30
>> Surah 32

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai