Surah Sad - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
صٓۚ وَٱلۡقُرۡءَانِ ذِي ٱلذِّكۡرِ
१. साद, या बोध उपदेशपूर्ण कुरआनाची शपथ
Surah Sad, Verse 1
بَلِ ٱلَّذِينَ كَفَرُواْ فِي عِزَّةٖ وَشِقَاقٖ
२. परंतु काफिर (इन्कारी लोक) घमेंड आणि विरोधात पडले आहेत.१
Surah Sad, Verse 2
كَمۡ أَهۡلَكۡنَا مِن قَبۡلِهِم مِّن قَرۡنٖ فَنَادَواْ وَّلَاتَ حِينَ مَنَاصٖ
३. आम्ही याच्यापूर्वीही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले, त्यांनी प्रत्येक प्रकारे आरडाओरड केली, परंतु ती वेळ सुटकेची नव्हती
Surah Sad, Verse 3
وَعَجِبُوٓاْ أَن جَآءَهُم مُّنذِرٞ مِّنۡهُمۡۖ وَقَالَ ٱلۡكَٰفِرُونَ هَٰذَا سَٰحِرٞ كَذَّابٌ
४. आणि काफिर लोकांना या गोष्टीबद्दल आश्चर्य वाटले की त्यांच्यापैकीच एक खबरदार करणारा आला आणि म्हणू लागले की हा जादूगार आणि खोटारडा आहे
Surah Sad, Verse 4
أَجَعَلَ ٱلۡأٓلِهَةَ إِلَٰهٗا وَٰحِدًاۖ إِنَّ هَٰذَا لَشَيۡءٌ عُجَابٞ
५. काय याने एवढ्या साऱ्या आराध्य दैवतांना एकच दैवत (माबूद) बनवून टाकले, खरोखर ही मोठा विचित्र गोष्ट आहे
Surah Sad, Verse 5
وَٱنطَلَقَ ٱلۡمَلَأُ مِنۡهُمۡ أَنِ ٱمۡشُواْ وَٱصۡبِرُواْ عَلَىٰٓ ءَالِهَتِكُمۡۖ إِنَّ هَٰذَا لَشَيۡءٞ يُرَادُ
६. त्यांचे सरदार (प्रमुख) असे बोलत निघून जाऊ लागले, जा, आपल्या दैवतांवर मजबूत (अटळ) राहा. निःसंशय, या गोष्टीत काहीतरी उद्दिष्ट (स्वार्थ) आहे
Surah Sad, Verse 6
مَا سَمِعۡنَا بِهَٰذَا فِي ٱلۡمِلَّةِ ٱلۡأٓخِرَةِ إِنۡ هَٰذَآ إِلَّا ٱخۡتِلَٰقٌ
७. आम्ही तर ही गोष्ट प्राचीन धर्मांमध्येही ऐकली नाही काही नाही, ही केवळ मनाने रचलेली गोष्टी आहे
Surah Sad, Verse 7
أَءُنزِلَ عَلَيۡهِ ٱلذِّكۡرُ مِنۢ بَيۡنِنَاۚ بَلۡ هُمۡ فِي شَكّٖ مِّن ذِكۡرِيۚ بَل لَّمَّا يَذُوقُواْ عَذَابِ
८. काय आम्ही सर्वांपैकी त्याच्यावरच (अल्लाहची) वहयी अवतरित केली गेली? वस्तुतः हे लोक माझ्या वहयी (प्रकाशना) बाबत संशयग्रस्त आहेत,१ किंबहुना (खरेतर) त्यांनी माझ्या शिक्षा यातनेची गोडी अद्याप चाखलीच नाही
Surah Sad, Verse 8
أَمۡ عِندَهُمۡ خَزَآئِنُ رَحۡمَةِ رَبِّكَ ٱلۡعَزِيزِ ٱلۡوَهَّابِ
९. काय त्यांच्याजवळ, तुमच्या वर्चस्वशाली, भरपूर प्रदान करणाऱ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजीने आहेत
Surah Sad, Verse 9
أَمۡ لَهُم مُّلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَيۡنَهُمَاۖ فَلۡيَرۡتَقُواْ فِي ٱلۡأَسۡبَٰبِ
१०. किंवा आकाश आणि धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या प्रत्येक गोष्टीचे राज्य त्यांचेच आहे, असे आहे तर दोऱ्या ताणून (आकाशात) चढून जावे
Surah Sad, Verse 10
جُندٞ مَّا هُنَالِكَ مَهۡزُومٞ مِّنَ ٱلۡأَحۡزَابِ
११. हेदेखील (विशाल) सैन्यांपैकी पराभूत (लहानसे) सैन्य आहे
Surah Sad, Verse 11
كَذَّبَتۡ قَبۡلَهُمۡ قَوۡمُ نُوحٖ وَعَادٞ وَفِرۡعَوۡنُ ذُو ٱلۡأَوۡتَادِ
१२. त्यांच्या पूर्वीही नूहचा जनसमूह आणि आदचा जनसमूह आणि खिळे (मेखां) वाल्या फिरऔनने खोटे ठरविले होते
Surah Sad, Verse 12
وَثَمُودُ وَقَوۡمُ لُوطٖ وَأَصۡحَٰبُ لۡـَٔيۡكَةِۚ أُوْلَـٰٓئِكَ ٱلۡأَحۡزَابُ
१३. आणि समूद व लूत जनसमूहाने आणि वनात राहणाऱ्यांनीही, हीच विशाल सैन्ये होती
Surah Sad, Verse 13
إِن كُلٌّ إِلَّا كَذَّبَ ٱلرُّسُلَ فَحَقَّ عِقَابِ
१४. यांच्यापैकी एक देखील असा नव्हता, ज्याने पैगंबरांना खोटे ठरविले नसेल, तेव्हा माझा अज़ाब त्यांच्यावर लागू झाला
Surah Sad, Verse 14
وَمَا يَنظُرُ هَـٰٓؤُلَآءِ إِلَّا صَيۡحَةٗ وَٰحِدَةٗ مَّا لَهَا مِن فَوَاقٖ
१५. आणि त्यांना केवळ एका तीव्र (भयंकर) चित्काराची प्रतीक्षा आहे, ज्यात कसलाही अडथळा (आणि विलंब) नाही
Surah Sad, Verse 15
وَقَالُواْ رَبَّنَا عَجِّل لَّنَا قِطَّنَا قَبۡلَ يَوۡمِ ٱلۡحِسَابِ
१६. आणि (ते) म्हणाले की हे आमच्या पालनकर्त्या! आमचा वाटा तू आम्हाला हिशोबाच्या दिवसापूर्वीच प्रदान कर
Surah Sad, Verse 16
ٱصۡبِرۡ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَٱذۡكُرۡ عَبۡدَنَا دَاوُۥدَ ذَا ٱلۡأَيۡدِۖ إِنَّهُۥٓ أَوَّابٌ
१७. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर सहनशीलता राखा आणि आमचे दास दाऊदचे स्मरण करा जो मोठा शक्तिशाली होता, निःसंशय, तो (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा होता
Surah Sad, Verse 17
إِنَّا سَخَّرۡنَا ٱلۡجِبَالَ مَعَهُۥ يُسَبِّحۡنَ بِٱلۡعَشِيِّ وَٱلۡإِشۡرَاقِ
१८. आम्ही पर्वतांना त्यांच्या अधीन केले (ताब्यात दिले) होते की त्याच्यासोबत सकाळ संध्याकाळ अल्लाहच्या पवित्रतेचा जाप (तस्बीह) करावा
Surah Sad, Verse 18
وَٱلطَّيۡرَ مَحۡشُورَةٗۖ كُلّٞ لَّهُۥٓ أَوَّابٞ
१९. आणि (उडणाऱ्या) पक्षांनाही एकत्र होऊन सर्वच्या सर्व त्याच्या अधीन होते
Surah Sad, Verse 19
وَشَدَدۡنَا مُلۡكَهُۥ وَءَاتَيۡنَٰهُ ٱلۡحِكۡمَةَ وَفَصۡلَ ٱلۡخِطَابِ
२०. आम्ही त्याचे राज्य मजबूत केले होते आणि त्याला हिकमत (बुद्धिकौशल्य) प्रदान केले होते आणि गोष्टीचा फैसला (सुचविला होता)
Surah Sad, Verse 20
۞وَهَلۡ أَتَىٰكَ نَبَؤُاْ ٱلۡخَصۡمِ إِذۡ تَسَوَّرُواْ ٱلۡمِحۡرَابَ
२१. आणि काय तुम्हाला भांडण करणाऱ्यांची खबर पोहोचली, जेव्हा ते भिंत ओलांडून मेहराबमध्ये (उपासनेच्या ठिकाणी) आले
Surah Sad, Verse 21
إِذۡ دَخَلُواْ عَلَىٰ دَاوُۥدَ فَفَزِعَ مِنۡهُمۡۖ قَالُواْ لَا تَخَفۡۖ خَصۡمَانِ بَغَىٰ بَعۡضُنَا عَلَىٰ بَعۡضٖ فَٱحۡكُم بَيۡنَنَا بِٱلۡحَقِّ وَلَا تُشۡطِطۡ وَٱهۡدِنَآ إِلَىٰ سَوَآءِ ٱلصِّرَٰطِ
२२. जेव्हा ते दाऊदजवळ पोहोचले, तेव्हा ते यांना पाहून घाबरले. ते म्हणाले, भिऊ नका, आमचा आपसातील तंटा आहे. आमच्यापैकी एकाने दुसऱ्यावर अत्याचार केला आहे, तेव्हा तुम्ही आमच्या दरम्यान न्यायपूर्वक फैसला करावा आणि अन्याय करू नका आणि आम्हाला सरळ मार्ग दाखवा
Surah Sad, Verse 22
إِنَّ هَٰذَآ أَخِي لَهُۥ تِسۡعٞ وَتِسۡعُونَ نَعۡجَةٗ وَلِيَ نَعۡجَةٞ وَٰحِدَةٞ فَقَالَ أَكۡفِلۡنِيهَا وَعَزَّنِي فِي ٱلۡخِطَابِ
२३. (ऐका!) हा माझा भाऊ आहे. याच्याजवळ नव्याण्णव मेंढ्या आहेत. आणि माझ्याजवळ एकच आहे. परंतु हा मला म्हणतो की तुझी ती एक देखील मला देऊन टाक आणि माझ्यावर बोलण्यात मोठा सक्त मामला (व्यवहार) करतो
Surah Sad, Verse 23
قَالَ لَقَدۡ ظَلَمَكَ بِسُؤَالِ نَعۡجَتِكَ إِلَىٰ نِعَاجِهِۦۖ وَإِنَّ كَثِيرٗا مِّنَ ٱلۡخُلَطَآءِ لَيَبۡغِي بَعۡضُهُمۡ عَلَىٰ بَعۡضٍ إِلَّا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ وَقَلِيلٞ مَّا هُمۡۗ وَظَنَّ دَاوُۥدُ أَنَّمَا فَتَنَّـٰهُ فَٱسۡتَغۡفَرَ رَبَّهُۥ وَخَرَّۤ رَاكِعٗاۤ وَأَنَابَ۩
२४. (दाऊद) म्हणाले, त्याचे आपल्या मेंढ्यांसोबत तुझी एक मेंढी सामील करून घेण्याचा प्रश्न निश्चितच तुझ्यावर अत्याचार आहे. आणि अधिकांश भागीदार आणि सहभागी (असेच असतात की) एकमेकांवर जुलूम अत्याचार आणि अन्याय करतात, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि जे सत्कर्म करीत राहिले, तथापि असे लोक फारच कमी आहेत आणि दाऊद (अलै.) यांनी जाणुन घेतले की आम्ही त्यांची परीक्षा घेतली आहे, मग तर आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) जवळ तौबा (क्षमा याचना) करू लागले आणि मोठ्या विनम्रतेने खाली पडले (सजद्यात गेले) आणि (पूर्णपणे) रुजू झाले
Surah Sad, Verse 24
فَغَفَرۡنَا لَهُۥ ذَٰلِكَۖ وَإِنَّ لَهُۥ عِندَنَا لَزُلۡفَىٰ وَحُسۡنَ مَـَٔابٖ
२५. तेव्हा आम्ही देखील त्यांची ही (चूक) माफ केली. निःसंशय, ते आमच्याजवळ मोठे उच्च स्थान राखणारे आणि सर्वांत चांगले ठिकाण बाळगणारे आहेत
Surah Sad, Verse 25
يَٰدَاوُۥدُ إِنَّا جَعَلۡنَٰكَ خَلِيفَةٗ فِي ٱلۡأَرۡضِ فَٱحۡكُم بَيۡنَ ٱلنَّاسِ بِٱلۡحَقِّ وَلَا تَتَّبِعِ ٱلۡهَوَىٰ فَيُضِلَّكَ عَن سَبِيلِ ٱللَّهِۚ إِنَّ ٱلَّذِينَ يَضِلُّونَ عَن سَبِيلِ ٱللَّهِ لَهُمۡ عَذَابٞ شَدِيدُۢ بِمَا نَسُواْ يَوۡمَ ٱلۡحِسَابِ
२६. हे दाऊद! आम्ही तुम्हाला धरतीवर खलीफा बनविले, तेव्हा तुम्ही लोकांच्या दरम्यान न्यायासह फैसला करा आणि आपल्या मनाच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका, अन्यथा ती तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून हटविल. निःसंशय, जे लोक अल्लाहच्या मार्गापासून भटकतात, त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. अशासाठी की त्यांनी हिशोबाच्या दिवसाचा विसर पाडला आहे
Surah Sad, Verse 26
وَمَا خَلَقۡنَا ٱلسَّمَآءَ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَيۡنَهُمَا بَٰطِلٗاۚ ذَٰلِكَ ظَنُّ ٱلَّذِينَ كَفَرُواْۚ فَوَيۡلٞ لِّلَّذِينَ كَفَرُواْ مِنَ ٱلنَّارِ
२७. आणि आम्ही आकाश व धरती आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना (अस्तित्वांना) व्यर्थ (आणि अकारण) निर्माण नाही केले. ही शंका तर काफिर (इन्कारी) लोकांची आहे, तेव्हा काफिरांकरिता आगीचा विनाश आहे
Surah Sad, Verse 27
أَمۡ نَجۡعَلُ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ كَٱلۡمُفۡسِدِينَ فِي ٱلۡأَرۡضِ أَمۡ نَجۡعَلُ ٱلۡمُتَّقِينَ كَٱلۡفُجَّارِ
२८. काय आम्ही त्या लोकांना, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्मे केली त्या लोकांसमान ठरवू जे (रोज) धरतीवर उत्पात (फसाद) माजवित राहिले, किंवा नेक सदाचारी लोकांना दुराचाऱ्यांसारखं बनवू
Surah Sad, Verse 28
كِتَٰبٌ أَنزَلۡنَٰهُ إِلَيۡكَ مُبَٰرَكٞ لِّيَدَّبَّرُوٓاْ ءَايَٰتِهِۦ وَلِيَتَذَكَّرَ أُوْلُواْ ٱلۡأَلۡبَٰبِ
२९. हा मोठा शुभग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्याकडे अशासाठी अवतरित केला आहे की लोकांनी याच्या आयतींवर विचार चिंतन करावे आणि बुद्धी राखणाऱ्यांनी यापासून बोध ग्रहण करावा
Surah Sad, Verse 29
وَوَهَبۡنَا لِدَاوُۥدَ سُلَيۡمَٰنَۚ نِعۡمَ ٱلۡعَبۡدُ إِنَّهُۥٓ أَوَّابٌ
३०. आणि आम्ही दाऊदला सुलैमान (नावाचा पुत्र) प्रदान केला. जो मोठा उत्तम दास होता आणि (अल्लाहकडे) खूप रुजू करणारा होता
Surah Sad, Verse 30
إِذۡ عُرِضَ عَلَيۡهِ بِٱلۡعَشِيِّ ٱلصَّـٰفِنَٰتُ ٱلۡجِيَادُ
३१. जेव्हा त्यांच्यासमोर संध्याकाळी वेगात चालणारे खास घोडे सादर केले गेले
Surah Sad, Verse 31
فَقَالَ إِنِّيٓ أَحۡبَبۡتُ حُبَّ ٱلۡخَيۡرِ عَن ذِكۡرِ رَبِّي حَتَّىٰ تَوَارَتۡ بِٱلۡحِجَابِ
३२. तेव्हा म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या स्मरणावर या घोड्याच्या प्रेमाला प्राधान्य दिले, येथेपर्यंत की सूर्य बुडाला
Surah Sad, Verse 32
رُدُّوهَا عَلَيَّۖ فَطَفِقَ مَسۡحَۢا بِٱلسُّوقِ وَٱلۡأَعۡنَاقِ
३३. या घोड्यांना पुन्हा माझ्यासमोर आणा, मग पोटऱ्यांवर आणि मानांवर हात फिरवू लागले
Surah Sad, Verse 33
وَلَقَدۡ فَتَنَّا سُلَيۡمَٰنَ وَأَلۡقَيۡنَا عَلَىٰ كُرۡسِيِّهِۦ جَسَدٗا ثُمَّ أَنَابَ
३४. आणि आम्ही सुलेमानची कसोटी घेतली आणि त्यांच्या सिंहासनावर एक धड (मृत शरीर) टाकून दिले, मग ते ध्यानमग्न झाले
Surah Sad, Verse 34
قَالَ رَبِّ ٱغۡفِرۡ لِي وَهَبۡ لِي مُلۡكٗا لَّا يَنۢبَغِي لِأَحَدٖ مِّنۢ بَعۡدِيٓۖ إِنَّكَ أَنتَ ٱلۡوَهَّابُ
३५. म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या मला क्षमा कर आणि मला असे राज्य प्रदान कर, जे माझ्याखेरीज कोणत्याही (माणसास) पात्र नसावे. तू फार मोठा दाता आहेस
Surah Sad, Verse 35
فَسَخَّرۡنَا لَهُ ٱلرِّيحَ تَجۡرِي بِأَمۡرِهِۦ رُخَآءً حَيۡثُ أَصَابَ
३६. तेव्हा आम्ही हवेला त्यांच्या अधीन केले. ती त्यांच्या आदेशानं, जिकडे ते इच्छित, नरमीने पोहचवू देत असे
Surah Sad, Verse 36
وَٱلشَّيَٰطِينَ كُلَّ بَنَّآءٖ وَغَوَّاصٖ
३७. आणि (शक्तिशाली) जिन्नांना देखील, त्यांच्या अधीन (ताबे) केले होते आणि प्रत्येक घर बनविणाऱ्याला आणि पाणबुड्याला
Surah Sad, Verse 37
وَءَاخَرِينَ مُقَرَّنِينَ فِي ٱلۡأَصۡفَادِ
३८. आणि इतर (जिन्नांना) देखील, जे शृंखलांनी जखडलेले राहत
Surah Sad, Verse 38
هَٰذَا عَطَآؤُنَا فَٱمۡنُنۡ أَوۡ أَمۡسِكۡ بِغَيۡرِ حِسَابٖ
३९. हा आहे आमचा अनुग्रह, आता तुम्ही उपकार करा किंवा रोखून ठेवा, काही हिशोब नाही
Surah Sad, Verse 39
وَإِنَّ لَهُۥ عِندَنَا لَزُلۡفَىٰ وَحُسۡنَ مَـَٔابٖ
४०. आणि त्यांच्यासाठी आमच्याजवळ मोठी निकटता आहे, आणि फार चांगले ठिकाण आहैे
Surah Sad, Verse 40
وَٱذۡكُرۡ عَبۡدَنَآ أَيُّوبَ إِذۡ نَادَىٰ رَبَّهُۥٓ أَنِّي مَسَّنِيَ ٱلشَّيۡطَٰنُ بِنُصۡبٖ وَعَذَابٍ
४१. आणि आमचे दास अय्यूबचीही चर्चा करा, जेव्हा त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारले की मला सैतानाने दुःख - यातना पोहचविली आहे
Surah Sad, Verse 41
ٱرۡكُضۡ بِرِجۡلِكَۖ هَٰذَا مُغۡتَسَلُۢ بَارِدٞ وَشَرَابٞ
४२. आपला पाय जमिनीवर मारा. हे आंघोळीचे थंड आणि पिण्याचे पाणी आहे
Surah Sad, Verse 42
وَوَهَبۡنَا لَهُۥٓ أَهۡلَهُۥ وَمِثۡلَهُم مَّعَهُمۡ رَحۡمَةٗ مِّنَّا وَذِكۡرَىٰ لِأُوْلِي ٱلۡأَلۡبَٰبِ
४३. आणि आम्ही त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब प्रदान केले, किंबहुना तेवढेच आणखीही त्यासोबत आपल्या खास कृपेने, आणि बुद्धिमानांकरिता बोधप्राप्तीसाठी
Surah Sad, Verse 43
وَخُذۡ بِيَدِكَ ضِغۡثٗا فَٱضۡرِب بِّهِۦ وَلَا تَحۡنَثۡۗ إِنَّا وَجَدۡنَٰهُ صَابِرٗاۚ نِّعۡمَ ٱلۡعَبۡدُ إِنَّهُۥٓ أَوَّابٞ
४४. आणि आपल्या हातात काड्यांचा गुच्छा घेऊन त्याने मार आणि शपथ तोडू नको.१ खरे तर असे की आम्हाला तो मोठा सहनशील दास आढळला. तो मोठा नेक सदाचारी दास होता आणि (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा
Surah Sad, Verse 44
وَٱذۡكُرۡ عِبَٰدَنَآ إِبۡرَٰهِيمَ وَإِسۡحَٰقَ وَيَعۡقُوبَ أُوْلِي ٱلۡأَيۡدِي وَٱلۡأَبۡصَٰرِ
४५. आणि आमचे दास इब्राहीम, इसहाक आणि याकूब यांचीही (लोकांमध्ये) चर्चा करा जे हात आणि डोळे राखणारे होते
Surah Sad, Verse 45
إِنَّآ أَخۡلَصۡنَٰهُم بِخَالِصَةٖ ذِكۡرَى ٱلدَّارِ
४६. आम्ही त्यांना एक विशेष गोष्ट अर्थात आखिरतच्या स्मरणासोबत खासरित्या संबंधित करून घेतले होते
Surah Sad, Verse 46
وَإِنَّهُمۡ عِندَنَا لَمِنَ ٱلۡمُصۡطَفَيۡنَ ٱلۡأَخۡيَارِ
४७. आणि हे सर्व आमच्याजवळ निवडक आणि सर्वाधिक चांगल्या लोकांपैकी होते
Surah Sad, Verse 47
وَٱذۡكُرۡ إِسۡمَٰعِيلَ وَٱلۡيَسَعَ وَذَا ٱلۡكِفۡلِۖ وَكُلّٞ مِّنَ ٱلۡأَخۡيَارِ
४८. आणि इस्माईल, यसअ आणि जुलकिफ्ल यांचेही वर्णन करा. हे सर्व नेक लोक होते
Surah Sad, Verse 48
هَٰذَا ذِكۡرٞۚ وَإِنَّ لِلۡمُتَّقِينَ لَحُسۡنَ مَـَٔابٖ
४९. हा उपदेश आहे आणि विश्वास करा की नेक सदाचारी लोकांसाठी सर्वांत उत्तम स्थान आहे
Surah Sad, Verse 49
جَنَّـٰتِ عَدۡنٖ مُّفَتَّحَةٗ لَّهُمُ ٱلۡأَبۡوَٰبُ
५०. अर्थात सदैव काळ राहणारी जन्नत, ज्यांची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत
Surah Sad, Verse 50
مُتَّكِـِٔينَ فِيهَا يَدۡعُونَ فِيهَا بِفَٰكِهَةٖ كَثِيرَةٖ وَشَرَابٖ
५१. ज्यांच्यात ते (मोठ्या चैनीने) तक्के लावून बसले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे मेवे (फळे) आणि अनेक प्रकारची पेये मागत असतील
Surah Sad, Verse 51
۞وَعِندَهُمۡ قَٰصِرَٰتُ ٱلطَّرۡفِ أَتۡرَابٌ
५२. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या समवयस्क हूर (पऱ्या) असतील
Surah Sad, Verse 52
هَٰذَا مَا تُوعَدُونَ لِيَوۡمِ ٱلۡحِسَابِ
५३. हीच ती गोष्ट जिचा वायदा तुम्हाला हिशोबाच्या दिवसाकरिता दिला जात होता
Surah Sad, Verse 53
إِنَّ هَٰذَا لَرِزۡقُنَا مَا لَهُۥ مِن نَّفَادٍ
५४. निःसंशय, ही आजिविका, आमचा (विशेष) उपहार आहे, जी कधीही संपणार नाही
Surah Sad, Verse 54
هَٰذَاۚ وَإِنَّ لِلطَّـٰغِينَ لَشَرَّ مَـَٔابٖ
५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे
Surah Sad, Verse 55
جَهَنَّمَ يَصۡلَوۡنَهَا فَبِئۡسَ ٱلۡمِهَادُ
५६. जहन्नम आहे, ज्यात ते दाखल होतील (अरेरे!) किती वाईट बिछोना आहे
Surah Sad, Verse 56
هَٰذَا فَلۡيَذُوقُوهُ حَمِيمٞ وَغَسَّاقٞ
५७. हे आहे, त्यांनी ते चाखावे, गरम (उकळते) पाणी आणि पू
Surah Sad, Verse 57
وَءَاخَرُ مِن شَكۡلِهِۦٓ أَزۡوَٰجٌ
५८. आणि काही इतर प्रकारच्या शिक्षा
Surah Sad, Verse 58
هَٰذَا فَوۡجٞ مُّقۡتَحِمٞ مَّعَكُمۡ لَا مَرۡحَبَۢا بِهِمۡۚ إِنَّهُمۡ صَالُواْ ٱلنَّارِ
५९. हा एक समुदाय आहे, जो तुमच्यासोबत (आगीत) जाणार आहे. त्यांच्यासाठी कसलीही स्वागत नाही. हेच जहन्नममध्ये जाणार आहेत
Surah Sad, Verse 59
قَالُواْ بَلۡ أَنتُمۡ لَا مَرۡحَبَۢا بِكُمۡۖ أَنتُمۡ قَدَّمۡتُمُوهُ لَنَاۖ فَبِئۡسَ ٱلۡقَرَارُ
६०. (ते) म्हणतील की, किंबहुना तुम्हीच ते आहात ज्यांच्यासाठी कसलेही स्वागत नाही. तुम्हीच तर यास आधीपासूनच आमच्यासमोर आणून ठेवले होते. तेव्हा राहण्याचे मोठे वाईट स्थान आहे
Surah Sad, Verse 60
قَالُواْ رَبَّنَا مَن قَدَّمَ لَنَا هَٰذَا فَزِدۡهُ عَذَابٗا ضِعۡفٗا فِي ٱلنَّارِ
६१. (ते) म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! ज्याने ती (कुप्रची प्रथा) आमच्यासाठी सर्वांत प्रथम सुरू केली असेल, त्याच्यासाठी जहन्नमची शिक्षा दुप्पट कर
Surah Sad, Verse 61
وَقَالُواْ مَا لَنَا لَا نَرَىٰ رِجَالٗا كُنَّا نَعُدُّهُم مِّنَ ٱلۡأَشۡرَارِ
६२. आणि (जहन्नमवासी) म्हणतील की, हे काय! आम्हाला ते लोक दिसून येत नाहीत, ज्यांची गणना आम्ही वाईट लोकांमध्ये करीत होतो
Surah Sad, Verse 62
أَتَّخَذۡنَٰهُمۡ سِخۡرِيًّا أَمۡ زَاغَتۡ عَنۡهُمُ ٱلۡأَبۡصَٰرُ
६३. काय आम्हीच त्यांना थट्टा-मस्करी बनवून ठेवले होते की आमचे डोळे त्यांच्यापासून बहकून गेले आहेत
Surah Sad, Verse 63
إِنَّ ذَٰلِكَ لَحَقّٞ تَخَاصُمُ أَهۡلِ ٱلنَّارِ
६४. निःसंशय, जहन्नमवाल्यांचे हे भांडण अवश्य होईल
Surah Sad, Verse 64
قُلۡ إِنَّمَآ أَنَا۠ مُنذِرٞۖ وَمَا مِنۡ إِلَٰهٍ إِلَّا ٱللَّهُ ٱلۡوَٰحِدُ ٱلۡقَهَّارُ
६५. सांगा की मी तर केवळ एक खबरदार करणारा आहे आणि एकमेव जबरदस्त अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही
Surah Sad, Verse 65
رَبُّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَيۡنَهُمَا ٱلۡعَزِيزُ ٱلۡغَفَّـٰرُ
६६. जो स्वामी व पालनकर्ता आहे आकाशांचा आणि धरतीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, तो मोठा जबरदस्त (महान) आणि मोठा माफ करणारा आहे
Surah Sad, Verse 66
قُلۡ هُوَ نَبَؤٌاْ عَظِيمٌ
६७. सांगा की ही फार मोठी खबर आहे
Surah Sad, Verse 67
أَنتُمۡ عَنۡهُ مُعۡرِضُونَ
६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात
Surah Sad, Verse 68
مَا كَانَ لِيَ مِنۡ عِلۡمِۭ بِٱلۡمَلَإِ ٱلۡأَعۡلَىٰٓ إِذۡ يَخۡتَصِمُونَ
६९. मला त्या उच्च पदस्थ फरिश्त्यां (च्या संभाषणा) चे किंचितही ज्ञान नाही, जेव्हा ते भांडण करीत होते
Surah Sad, Verse 69
إِن يُوحَىٰٓ إِلَيَّ إِلَّآ أَنَّمَآ أَنَا۠ نَذِيرٞ مُّبِينٌ
७०. माझ्याकडे केवळ हीच वहयी केली जाते की मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे
Surah Sad, Verse 70
إِذۡ قَالَ رَبُّكَ لِلۡمَلَـٰٓئِكَةِ إِنِّي خَٰلِقُۢ بَشَرٗا مِّن طِينٖ
७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे
Surah Sad, Verse 71
فَإِذَا سَوَّيۡتُهُۥ وَنَفَخۡتُ فِيهِ مِن رُّوحِي فَقَعُواْ لَهُۥ سَٰجِدِينَ
७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा१ (माथा टेका)
Surah Sad, Verse 72
فَسَجَدَ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ كُلُّهُمۡ أَجۡمَعُونَ
७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला
Surah Sad, Verse 73
إِلَّآ إِبۡلِيسَ ٱسۡتَكۡبَرَ وَكَانَ مِنَ ٱلۡكَٰفِرِينَ
७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता
Surah Sad, Verse 74
قَالَ يَـٰٓإِبۡلِيسُ مَا مَنَعَكَ أَن تَسۡجُدَ لِمَا خَلَقۡتُ بِيَدَيَّۖ أَسۡتَكۡبَرۡتَ أَمۡ كُنتَ مِنَ ٱلۡعَالِينَ
७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस
Surah Sad, Verse 75
قَالَ أَنَا۠ خَيۡرٞ مِّنۡهُ خَلَقۡتَنِي مِن نَّارٖ وَخَلَقۡتَهُۥ مِن طِينٖ
७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले
Surah Sad, Verse 76
قَالَ فَٱخۡرُجۡ مِنۡهَا فَإِنَّكَ رَجِيمٞ
७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला
Surah Sad, Verse 77
وَإِنَّ عَلَيۡكَ لَعۡنَتِيٓ إِلَىٰ يَوۡمِ ٱلدِّينِ
७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे
Surah Sad, Verse 78
قَالَ رَبِّ فَأَنظِرۡنِيٓ إِلَىٰ يَوۡمِ يُبۡعَثُونَ
७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील
Surah Sad, Verse 79
قَالَ فَإِنَّكَ مِنَ ٱلۡمُنظَرِينَ
८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस
Surah Sad, Verse 80
إِلَىٰ يَوۡمِ ٱلۡوَقۡتِ ٱلۡمَعۡلُومِ
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत
Surah Sad, Verse 81
قَالَ فَبِعِزَّتِكَ لَأُغۡوِيَنَّهُمۡ أَجۡمَعِينَ
८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन
Surah Sad, Verse 82
إِلَّا عِبَادَكَ مِنۡهُمُ ٱلۡمُخۡلَصِينَ
८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील
Surah Sad, Verse 83
قَالَ فَٱلۡحَقُّ وَٱلۡحَقَّ أَقُولُ
८४. फर्माविले, सत्य हेच आहे आणि मी सत्यच सांगत असतो
Surah Sad, Verse 84
لَأَمۡلَأَنَّ جَهَنَّمَ مِنكَ وَمِمَّن تَبِعَكَ مِنۡهُمۡ أَجۡمَعِينَ
८५. की मी तुझ्याद्वारे आणि तुझ्या सर्व अनुयायींद्वारे जहन्नमला भरून टाकेन
Surah Sad, Verse 85
قُلۡ مَآ أَسۡـَٔلُكُمۡ عَلَيۡهِ مِنۡ أَجۡرٖ وَمَآ أَنَا۠ مِنَ ٱلۡمُتَكَلِّفِينَ
८६. सांगा की मी याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही आणि आणि मी बनावट करणाऱ्यांपैकी नाही
Surah Sad, Verse 86
إِنۡ هُوَ إِلَّا ذِكۡرٞ لِّلۡعَٰلَمِينَ
८७. हा तर सर्व जगवाल्यांकरिता परिपूर्ण उपदेश आणि स्मरण आहे
Surah Sad, Verse 87
وَلَتَعۡلَمُنَّ نَبَأَهُۥ بَعۡدَ حِينِۭ
८८. निःसंशय, तुम्ही याची वास्तविकता थोड्याच काळानंतर (उचितरित्या) जाणून घ्याल
Surah Sad, Verse 88