Surah An-Nisa - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ ٱتَّقُواْ رَبَّكُمُ ٱلَّذِي خَلَقَكُم مِّن نَّفۡسٖ وَٰحِدَةٖ وَخَلَقَ مِنۡهَا زَوۡجَهَا وَبَثَّ مِنۡهُمَا رِجَالٗا كَثِيرٗا وَنِسَآءٗۚ وَٱتَّقُواْ ٱللَّهَ ٱلَّذِي تَسَآءَلُونَ بِهِۦ وَٱلۡأَرۡحَامَۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلَيۡكُمۡ رَقِيبٗا
१. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले, आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 1
وَءَاتُواْ ٱلۡيَتَٰمَىٰٓ أَمۡوَٰلَهُمۡۖ وَلَا تَتَبَدَّلُواْ ٱلۡخَبِيثَ بِٱلطَّيِّبِۖ وَلَا تَأۡكُلُوٓاْ أَمۡوَٰلَهُمۡ إِلَىٰٓ أَمۡوَٰلِكُمۡۚ إِنَّهُۥ كَانَ حُوبٗا كَبِيرٗا
२. आणि अनाथांना त्यांची धन-संपत्ती देऊन टाका आणि अनाथांचा चांगला माल हडप करून त्याऐवजी खरबा माल देऊ नका. आणि आपल्या मालात (धनात) त्यांचा माल मिसळवून गिळंकृत करू नका. निःसंशय हा फार मोठा अपराध आहे
Surah An-Nisa, Verse 2
وَإِنۡ خِفۡتُمۡ أَلَّا تُقۡسِطُواْ فِي ٱلۡيَتَٰمَىٰ فَٱنكِحُواْ مَا طَابَ لَكُم مِّنَ ٱلنِّسَآءِ مَثۡنَىٰ وَثُلَٰثَ وَرُبَٰعَۖ فَإِنۡ خِفۡتُمۡ أَلَّا تَعۡدِلُواْ فَوَٰحِدَةً أَوۡ مَا مَلَكَتۡ أَيۡمَٰنُكُمۡۚ ذَٰلِكَ أَدۡنَىٰٓ أَلَّا تَعُولُواْ
३. आणि जर तुम्हाला हे भय वाटत असेल की अनाथ मुलींशी विवाह करून तुम्ही न्याय (वर्तन) करू शकणार नाहीत तर मग इतर स्त्रियांपैकी ज्या तुम्हाला चांगल्या वाटतील त्यांच्याशी तुम्ही विवाह करून घ्या. दोन-दोन, तीन-तीन, चार-चार, परंतु (अशा स्थितीत) न्याय न राखला जाण्याचे भय असेल तर एक (पत्नी) पुरेशी आहे अथवा तुमच्या मालकीच्या दासींना. हे अधिक निकट आहे की (असे केल्याने अन्यायाकडे आणि) एकतर्फी झुकण्यापासून वाचाल
Surah An-Nisa, Verse 3
وَءَاتُواْ ٱلنِّسَآءَ صَدُقَٰتِهِنَّ نِحۡلَةٗۚ فَإِن طِبۡنَ لَكُمۡ عَن شَيۡءٖ مِّنۡهُ نَفۡسٗا فَكُلُوهُ هَنِيٓـٔٗا مَّرِيٓـٔٗا
४. आणि स्त्रियांना त्यांचे महर (विवाहप्रसंगी वरातर्फे वधूसाठी निर्धारीत केलेली रक्कम) राजीखुशीने देऊन टाका आणि जर स्त्री आपल्या मर्जीने काही महर सोडून देईल तर तो उचित समजून खाऊ पिऊ शकता
Surah An-Nisa, Verse 4
وَلَا تُؤۡتُواْ ٱلسُّفَهَآءَ أَمۡوَٰلَكُمُ ٱلَّتِي جَعَلَ ٱللَّهُ لَكُمۡ قِيَٰمٗا وَٱرۡزُقُوهُمۡ فِيهَا وَٱكۡسُوهُمۡ وَقُولُواْ لَهُمۡ قَوۡلٗا مَّعۡرُوفٗا
५. आपली ती धन-संपत्ती, जिला अल्लाहने तुमच्या जीवनाचा आधार बनविले आहे ती नादान व अक्कल नसलेल्यांना देऊ नका आणि त्यातून त्यांना खाऊ घाला, त्यांना कपडे-लत्ते द्या आणि त्यांच्याशी नरमीने बोला
Surah An-Nisa, Verse 5
وَٱبۡتَلُواْ ٱلۡيَتَٰمَىٰ حَتَّىٰٓ إِذَا بَلَغُواْ ٱلنِّكَاحَ فَإِنۡ ءَانَسۡتُم مِّنۡهُمۡ رُشۡدٗا فَٱدۡفَعُوٓاْ إِلَيۡهِمۡ أَمۡوَٰلَهُمۡۖ وَلَا تَأۡكُلُوهَآ إِسۡرَافٗا وَبِدَارًا أَن يَكۡبَرُواْۚ وَمَن كَانَ غَنِيّٗا فَلۡيَسۡتَعۡفِفۡۖ وَمَن كَانَ فَقِيرٗا فَلۡيَأۡكُلۡ بِٱلۡمَعۡرُوفِۚ فَإِذَا دَفَعۡتُمۡ إِلَيۡهِمۡ أَمۡوَٰلَهُمۡ فَأَشۡهِدُواْ عَلَيۡهِمۡۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ حَسِيبٗا
६. आणि अनाथांना ते वयात येइपर्यंत त्यांची देखरेख ठेवा आणि त्यांची परीक्षा घेत राहा. मग जेव्हा तुम्हाला त्यांच्यात सुधारणा व लायकी दिसून येईल, तेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या हवाली करा आणि ते मोठे होतील या भीतीने त्यांचे धन घाईघाईने उधळपट्टी करीत खाऊन टाकू नका. श्रीमंतांनी त्यांच्या संपत्तीबाबत असे करण्यापासून अलिप्त राहावे, तथापि गरीब असेल तर त्याने वाजवी रितीनेे खावे, मग जेव्हा तुम्ही त्यांना त्यांची संपत्ती सोपवाल तेव्हा साक्षी करून घ्या, आणि हिशोब घेण्यासाठी तर अल्लाह पुरेसा आहे
Surah An-Nisa, Verse 6
لِّلرِّجَالِ نَصِيبٞ مِّمَّا تَرَكَ ٱلۡوَٰلِدَانِ وَٱلۡأَقۡرَبُونَ وَلِلنِّسَآءِ نَصِيبٞ مِّمَّا تَرَكَ ٱلۡوَٰلِدَانِ وَٱلۡأَقۡرَبُونَ مِمَّا قَلَّ مِنۡهُ أَوۡ كَثُرَۚ نَصِيبٗا مَّفۡرُوضٗا
७. आई-बाप आणि जवळच्या नातेवाईकांच्या संपत्तीत पुरुषांचा हिस्सा आहे, आणि स्त्रियांचाही (अर्थात जी धन-संपत्ती आई-वडील आणि जवळचे नातेवाईक मागे सोडून जातील), मग ती संपत्ती कमी असो किंवा जास्त (त्यात) हिस्सा ठरलेला आहे.१
Surah An-Nisa, Verse 7
وَإِذَا حَضَرَ ٱلۡقِسۡمَةَ أُوْلُواْ ٱلۡقُرۡبَىٰ وَٱلۡيَتَٰمَىٰ وَٱلۡمَسَٰكِينُ فَٱرۡزُقُوهُم مِّنۡهُ وَقُولُواْ لَهُمۡ قَوۡلٗا مَّعۡرُوفٗا
८. आणि वाटणीच्या वेळी जेव्हा नातेवाईक, अनाथ आणि गरीब दुबळे येतील तर तुम्ही त्या संपत्तीतून त्यांनाही थोडे-फार द्या आणि त्यांच्याशी नरमीने बोला
Surah An-Nisa, Verse 8
وَلۡيَخۡشَ ٱلَّذِينَ لَوۡ تَرَكُواْ مِنۡ خَلۡفِهِمۡ ذُرِّيَّةٗ ضِعَٰفًا خَافُواْ عَلَيۡهِمۡ فَلۡيَتَّقُواْ ٱللَّهَ وَلۡيَقُولُواْ قَوۡلٗا سَدِيدًا
९. लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या मागे जर ते लहान लहान कमजोर मुलेबाळे सोडून मेले असते तर त्यांना आपल्या मुलांबद्दल कशी भीती वाटली असती, स्वतः आपल्यावर कयास(अंदाज) करून भय राखले पाहिजे आणि त्यांनी अल्लाहचे भय बाळगले पाहिजे आणि बोलताना यथायोग्य बोलले पाहिजे
Surah An-Nisa, Verse 9
إِنَّ ٱلَّذِينَ يَأۡكُلُونَ أَمۡوَٰلَ ٱلۡيَتَٰمَىٰ ظُلۡمًا إِنَّمَا يَأۡكُلُونَ فِي بُطُونِهِمۡ نَارٗاۖ وَسَيَصۡلَوۡنَ سَعِيرٗا
१०. जे लोक नाहक अत्याचारपूर्वक अनाथांची संपत्ती गिळंकृत करतात, ते आपल्या पोटात आग भरत आहेत आणि ते जहन्नममध्ये जातील
Surah An-Nisa, Verse 10
يُوصِيكُمُ ٱللَّهُ فِيٓ أَوۡلَٰدِكُمۡۖ لِلذَّكَرِ مِثۡلُ حَظِّ ٱلۡأُنثَيَيۡنِۚ فَإِن كُنَّ نِسَآءٗ فَوۡقَ ٱثۡنَتَيۡنِ فَلَهُنَّ ثُلُثَا مَا تَرَكَۖ وَإِن كَانَتۡ وَٰحِدَةٗ فَلَهَا ٱلنِّصۡفُۚ وَلِأَبَوَيۡهِ لِكُلِّ وَٰحِدٖ مِّنۡهُمَا ٱلسُّدُسُ مِمَّا تَرَكَ إِن كَانَ لَهُۥ وَلَدٞۚ فَإِن لَّمۡ يَكُن لَّهُۥ وَلَدٞ وَوَرِثَهُۥٓ أَبَوَاهُ فَلِأُمِّهِ ٱلثُّلُثُۚ فَإِن كَانَ لَهُۥٓ إِخۡوَةٞ فَلِأُمِّهِ ٱلسُّدُسُۚ مِنۢ بَعۡدِ وَصِيَّةٖ يُوصِي بِهَآ أَوۡ دَيۡنٍۗ ءَابَآؤُكُمۡ وَأَبۡنَآؤُكُمۡ لَا تَدۡرُونَ أَيُّهُمۡ أَقۡرَبُ لَكُمۡ نَفۡعٗاۚ فَرِيضَةٗ مِّنَ ٱللَّهِۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِيمًا حَكِيمٗا
११. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला तुमच्या संततीविषयी आदेश देतो की एका मुलाचा हिस्सा दोन मुलींच्या हिश्याइतका आहे. जर फक्त मुलीच असतील आणि त्या दोनपेक्षा जास्त असतील तर त्यांना, मयताने मागे सोडलेल्या संपत्तीमधून दोन तृतियांश हिस्सा मिळेल आणि जर एकच मुलगी असेल तर तिच्यासाठी अर्धा हिस्सा आहे आणि मयताच्या आई-बापापैकी प्रत्येकाला, त्याने मागे सोडलेल्या संपत्तीचा सहावा हिस्सा आहे. मयताला संतान असेल अथवा संतान नसेल, आणि आई-बाप वारसदार असतील तर मग त्याच्या आईचा तिसरा हिस्सा आहे. तथापि मयताचे जर अनेक भाऊ असतील तर मग त्याच्या आईचा सहावा हिस्सा आहे. हा हिस्सा मयताने केलेल्या मृत्युपत्रा (वसीयत) ची पूर्तता केल्यानंतर आहे किंवा त्याचे कर्ज फेडल्यानंतर. तुमचा पिता असेल किंवा तुमची मुले, पण तुम्ही नाही जाणत की त्यांच्यापैकी कोण तुम्हाला लाभ पोहचविण्यात जास्त जवळचा आहे. हे सर्व हिस्से अल्लाहतर्फे निर्धारीत केलेले आहेत. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 11
۞وَلَكُمۡ نِصۡفُ مَا تَرَكَ أَزۡوَٰجُكُمۡ إِن لَّمۡ يَكُن لَّهُنَّ وَلَدٞۚ فَإِن كَانَ لَهُنَّ وَلَدٞ فَلَكُمُ ٱلرُّبُعُ مِمَّا تَرَكۡنَۚ مِنۢ بَعۡدِ وَصِيَّةٖ يُوصِينَ بِهَآ أَوۡ دَيۡنٖۚ وَلَهُنَّ ٱلرُّبُعُ مِمَّا تَرَكۡتُمۡ إِن لَّمۡ يَكُن لَّكُمۡ وَلَدٞۚ فَإِن كَانَ لَكُمۡ وَلَدٞ فَلَهُنَّ ٱلثُّمُنُ مِمَّا تَرَكۡتُمۚ مِّنۢ بَعۡدِ وَصِيَّةٖ تُوصُونَ بِهَآ أَوۡ دَيۡنٖۗ وَإِن كَانَ رَجُلٞ يُورَثُ كَلَٰلَةً أَوِ ٱمۡرَأَةٞ وَلَهُۥٓ أَخٌ أَوۡ أُخۡتٞ فَلِكُلِّ وَٰحِدٖ مِّنۡهُمَا ٱلسُّدُسُۚ فَإِن كَانُوٓاْ أَكۡثَرَ مِن ذَٰلِكَ فَهُمۡ شُرَكَآءُ فِي ٱلثُّلُثِۚ مِنۢ بَعۡدِ وَصِيَّةٖ يُوصَىٰ بِهَآ أَوۡ دَيۡنٍ غَيۡرَ مُضَآرّٖۚ وَصِيَّةٗ مِّنَ ٱللَّهِۗ وَٱللَّهُ عَلِيمٌ حَلِيمٞ
१२. आणि तुमच्या पत्न्या, जी काही संपत्ती मागे सोडून जातील आणि त्यांना मुलेबाळे नसतील तर त्यात तुमचा अर्धा हिस्सा आहे आणि जर त्यांना मुलेबाळे असतील तर त्यांनी मागे सोडलेल्या संपत्तीत तुमचा चौथा हिस्सा आहे, मात्र त्यांनी केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर किंवा त्यांचे कर्ज फेडल्यानंतर आणि जी संपत्ती तुम्ही आपल्या मागे सोडून जाल, त्यात त्यांचा एक चतुर्थांश हिस्सा आहे जर तुम्हाला संतती नसेल, आणि जर तुम्हाला संतती असेल तर मग त्यांना तुम्ही मागे सोडलेल्या संपत्तीत आठवा हिस्सा मिळेल, मात्र तुम्ही केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर आणि तुमचे कर्ज फेडून झाल्यानंतर, आणि जर अशा पुरुष किंवा स्त्रीने मागे सोडलेल्या संपत्तीचा मामला आला, ज्याला आई-बाप किंवा मुलेबाळे नसतील, परंतु भाऊ-बहीण असतील तर त्यांच्यापैकी प्रत्येकाला सहावा हिस्सा मिळेल आणि जर याहून जास्त असतील तर एक तृतियांश संपत्तीत सर्वांचा हिस्सा राहील. मात्र त्याने केलेल्या मृत्युपत्राची पूर्तता झाल्यानंतर व कर्जाची अदायगी झाल्यानंतरच अशा प्रकारे की इतरांना नुकसान पोहचविले गेले नसावे. हे अल्लाहतर्फे निर्धारीत केलेले आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आणि धर्य राखणारा आहे
Surah An-Nisa, Verse 12
تِلۡكَ حُدُودُ ٱللَّهِۚ وَمَن يُطِعِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ يُدۡخِلۡهُ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ خَٰلِدِينَ فِيهَاۚ وَذَٰلِكَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡعَظِيمُ
१३. या सर्वश्रेष्ठ अल्लाहने निर्धारीत केलेल्या सीमा आहेत आणि जो कोणी अल्लाह आणि त्याचे रसूल (पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशाचे पालन करील, त्याला अल्लाह जन्नतमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत असतील, ज्यात ते नेहमी नेहमी राहतील, आणि ही फार मोठी सफलता आहे
Surah An-Nisa, Verse 13
وَمَن يَعۡصِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ وَيَتَعَدَّ حُدُودَهُۥ يُدۡخِلۡهُ نَارًا خَٰلِدٗا فِيهَا وَلَهُۥ عَذَابٞ مُّهِينٞ
१४. आणि जो मनुष्य अल्लाहची आणि रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांची अवज्ञा करील आणि अल्लाहने निर्धारीत केलेल्या सीमांचे उल्लंघन करील त्याला तो जहन्नममध्ये टाकील, ज्यात तो नेहमी नेहमी राहील. अशा लोकांकरिता अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
Surah An-Nisa, Verse 14
وَٱلَّـٰتِي يَأۡتِينَ ٱلۡفَٰحِشَةَ مِن نِّسَآئِكُمۡ فَٱسۡتَشۡهِدُواْ عَلَيۡهِنَّ أَرۡبَعَةٗ مِّنكُمۡۖ فَإِن شَهِدُواْ فَأَمۡسِكُوهُنَّ فِي ٱلۡبُيُوتِ حَتَّىٰ يَتَوَفَّىٰهُنَّ ٱلۡمَوۡتُ أَوۡ يَجۡعَلَ ٱللَّهُ لَهُنَّ سَبِيلٗا
१५. तुमच्या स्त्रियांपैकी ज्या व्यभिचार करतील तर त्यांच्याबद्दल आपल्यापैकी चार साक्षीदार बोलवून घ्या जर त्यांनी साक्ष दिली तर त्या स्त्रियांना घरात बंदिस्त करून ठेवा, येथपर्यंत की मृत्युने त्यांचे आयुष्य संपवावे, किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यासाठी एखादा दुसरा मार्ग काढावा
Surah An-Nisa, Verse 15
وَٱلَّذَانِ يَأۡتِيَٰنِهَا مِنكُمۡ فَـَٔاذُوهُمَاۖ فَإِن تَابَا وَأَصۡلَحَا فَأَعۡرِضُواْ عَنۡهُمَآۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ تَوَّابٗا رَّحِيمًا
१६. आणि तुमच्यापैकी जे दोनजण असे कृत्य करतील तर त्यांना दुःख-यातना द्या. जर ते तौबा (क्षमा-याचना) करतील आणि आपले आचरण सुधारतील तर त्यांना सोडून द्या. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आणि दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 16
إِنَّمَا ٱلتَّوۡبَةُ عَلَى ٱللَّهِ لِلَّذِينَ يَعۡمَلُونَ ٱلسُّوٓءَ بِجَهَٰلَةٖ ثُمَّ يَتُوبُونَ مِن قَرِيبٖ فَأُوْلَـٰٓئِكَ يَتُوبُ ٱللَّهُ عَلَيۡهِمۡۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمٗا
१७. अल्लाह केवळ अशाच लोकांची तौबा कबूल करतो, जे अजाणतेपणी वाईट कृत्य करून बसतात, पण लवकरच तसे कृत्य करणे सोडतात आणि अल्लाहजवळ माफी मागतात, जेव्हा अल्लाहदेखील त्यांची क्षमा-याचना स्वीकारतो अल्लाह सर्व काही जाणणारा बुद्धिमान आहे
Surah An-Nisa, Verse 17
وَلَيۡسَتِ ٱلتَّوۡبَةُ لِلَّذِينَ يَعۡمَلُونَ ٱلسَّيِّـَٔاتِ حَتَّىٰٓ إِذَا حَضَرَ أَحَدَهُمُ ٱلۡمَوۡتُ قَالَ إِنِّي تُبۡتُ ٱلۡـَٰٔنَ وَلَا ٱلَّذِينَ يَمُوتُونَ وَهُمۡ كُفَّارٌۚ أُوْلَـٰٓئِكَ أَعۡتَدۡنَا لَهُمۡ عَذَابًا أَلِيمٗا
१८. आणि त्यांची तौबा कदापि कबूल नाही, जे दुष्कर्मांवर दुष्कर्म करीत जातात इतके की त्यांच्यापैकी एखाद्याचे मरण जवळ येऊन ठेपते, तेव्हा म्हणू लागतो की आता मी तौबा करतो! आणि अशा लोकांचीही तौबा कबूल केली जात नाही जे इन्कार करण्याच्या अवस्थेतच मरण पावतात. अशाच लोकांसाठी आम्ही सक्त अज़ाब (कठोर शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे
Surah An-Nisa, Verse 18
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ لَا يَحِلُّ لَكُمۡ أَن تَرِثُواْ ٱلنِّسَآءَ كَرۡهٗاۖ وَلَا تَعۡضُلُوهُنَّ لِتَذۡهَبُواْ بِبَعۡضِ مَآ ءَاتَيۡتُمُوهُنَّ إِلَّآ أَن يَأۡتِينَ بِفَٰحِشَةٖ مُّبَيِّنَةٖۚ وَعَاشِرُوهُنَّ بِٱلۡمَعۡرُوفِۚ فَإِن كَرِهۡتُمُوهُنَّ فَعَسَىٰٓ أَن تَكۡرَهُواْ شَيۡـٔٗا وَيَجۡعَلَ ٱللَّهُ فِيهِ خَيۡرٗا كَثِيرٗا
१९. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्यासाठी हे हलाल (वैध) नव्हे की जबरदस्तीने स्त्रियांचे, त्यांच्या मर्जीविरूद्ध वारसदार बनावे१ आणि आपण दिलेले त्यांच्याकडून काही परत घ्यावे या हेतुने त्यांना रोखून ठेवू नका मात्र जर त्या उघडपणे एखादे दुष्कर्म आणि व्यभिचाराचे काम करतील तर गोष्ट वेगळी. त्यांच्याशी चांगले वर्तन राखा, मग त्या तुम्हाला नापसंत का असेनात, कारण फार शक्य आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला वाईट जाणावे आणि अल्लाहने तिच्यात मोठी भलाई आणि खूबी ठेवली असावी
Surah An-Nisa, Verse 19
وَإِنۡ أَرَدتُّمُ ٱسۡتِبۡدَالَ زَوۡجٖ مَّكَانَ زَوۡجٖ وَءَاتَيۡتُمۡ إِحۡدَىٰهُنَّ قِنطَارٗا فَلَا تَأۡخُذُواْ مِنۡهُ شَيۡـًٔاۚ أَتَأۡخُذُونَهُۥ بُهۡتَٰنٗا وَإِثۡمٗا مُّبِينٗا
२०. आणि जर एका पत्नीच्या ठिकाणी तुम्ही दुसरी पत्नी करू इच्छित असाल तर त्यांच्यापैकी एखादीला तुम्ही धन-संपत्तीचा खजिना देऊन ठेवला असेल, तरीही त्यातून काही (परत) घेऊ नका. काय तुम्ही तिला बदनाम करून उघड अशा अपराधाने परत घ्याल
Surah An-Nisa, Verse 20
وَكَيۡفَ تَأۡخُذُونَهُۥ وَقَدۡ أَفۡضَىٰ بَعۡضُكُمۡ إِلَىٰ بَعۡضٖ وَأَخَذۡنَ مِنكُم مِّيثَٰقًا غَلِيظٗا
२१. आणि तुम्ही ते कसे परत घ्याल? यानंतरही की तुम्ही एकमेकांशी सहवास केलेला आहे आणि त्या स्त्रियांनी तुमच्याकडून पक्का वायदा-करार घेतला आहे
Surah An-Nisa, Verse 21
وَلَا تَنكِحُواْ مَا نَكَحَ ءَابَآؤُكُم مِّنَ ٱلنِّسَآءِ إِلَّا مَا قَدۡ سَلَفَۚ إِنَّهُۥ كَانَ فَٰحِشَةٗ وَمَقۡتٗا وَسَآءَ سَبِيلًا
२२. आणि त्या स्त्रियांशी विवाह करू नका, ज्यांच्याशी तुमच्या पित्यांनी विवाह केला असेल, परंतु यापूर्वी जे झाले ते झाले हे निर्लज्जतेचे काम आणि कपटीपणामुळे आहे आणि मोठा वाईट (आचरणाचा) मार्ग आहे
Surah An-Nisa, Verse 22
حُرِّمَتۡ عَلَيۡكُمۡ أُمَّهَٰتُكُمۡ وَبَنَاتُكُمۡ وَأَخَوَٰتُكُمۡ وَعَمَّـٰتُكُمۡ وَخَٰلَٰتُكُمۡ وَبَنَاتُ ٱلۡأَخِ وَبَنَاتُ ٱلۡأُخۡتِ وَأُمَّهَٰتُكُمُ ٱلَّـٰتِيٓ أَرۡضَعۡنَكُمۡ وَأَخَوَٰتُكُم مِّنَ ٱلرَّضَٰعَةِ وَأُمَّهَٰتُ نِسَآئِكُمۡ وَرَبَـٰٓئِبُكُمُ ٱلَّـٰتِي فِي حُجُورِكُم مِّن نِّسَآئِكُمُ ٱلَّـٰتِي دَخَلۡتُم بِهِنَّ فَإِن لَّمۡ تَكُونُواْ دَخَلۡتُم بِهِنَّ فَلَا جُنَاحَ عَلَيۡكُمۡ وَحَلَـٰٓئِلُ أَبۡنَآئِكُمُ ٱلَّذِينَ مِنۡ أَصۡلَٰبِكُمۡ وَأَن تَجۡمَعُواْ بَيۡنَ ٱلۡأُخۡتَيۡنِ إِلَّا مَا قَدۡ سَلَفَۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ غَفُورٗا رَّحِيمٗا
२३. तुमच्यावर हराम (निषिद्ध) केल्या गेल्या तुमच्या माता आणि कन्या, आणि तुमच्या बहिणी तुमच्या आत्या तुमच्या मावश्या , भावाच्या मुली, बहिणीच्या मुली आणि तुमच्या त्या माता, ज्यांनी तुम्हाला आपले दूध पाजले असेल आणि तुमच्या (आईच्या) दुधात सहभागी असलेल्या बहिणी, तुमची सासू आणि तुम्ही ज्यांचे पालनपोषण केले त्या मुली ज्या तुमच्या कुशीत (कडेवर) आहेत तुमच्या त्या स्त्रियांपासून ज्यांच्याशी तुम्ही सहवास केलेला आहे, परंतु जर तुम्ही त्यांच्याशी सहवास केला नसेल तर तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, आणि तुमच्या सख्या पुत्रांच्या पत्न्यासुद्धा हराम आहेत आणि दोन बहिणींना एकाच वेळा (एकत्रपणे) निकाहमध्ये जमा करणे हेदेखील हराम आहे. मात्र यापूर्वी जे झाले ते झाले. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा, मेहरबान, दयावान आहे
Surah An-Nisa, Verse 23
۞وَٱلۡمُحۡصَنَٰتُ مِنَ ٱلنِّسَآءِ إِلَّا مَا مَلَكَتۡ أَيۡمَٰنُكُمۡۖ كِتَٰبَ ٱللَّهِ عَلَيۡكُمۡۚ وَأُحِلَّ لَكُم مَّا وَرَآءَ ذَٰلِكُمۡ أَن تَبۡتَغُواْ بِأَمۡوَٰلِكُم مُّحۡصِنِينَ غَيۡرَ مُسَٰفِحِينَۚ فَمَا ٱسۡتَمۡتَعۡتُم بِهِۦ مِنۡهُنَّ فَـَٔاتُوهُنَّ أُجُورَهُنَّ فَرِيضَةٗۚ وَلَا جُنَاحَ عَلَيۡكُمۡ فِيمَا تَرَٰضَيۡتُم بِهِۦ مِنۢ بَعۡدِ ٱلۡفَرِيضَةِۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِيمًا حَكِيمٗا
२४. आणि (तुमच्यासाठी) विवाहित स्त्रिया (अवैध) केल्या गेल्या आहेत तथापि जी (दासी) तुमच्या स्वतःच्या मालकीची असेल. हे आदेश अल्लाहने तुमच्यावर अनिवार्य केले आहेत आणि याखेरीज ज्या दुसऱ्या स्त्रिया तुमच्यासाठी हलाल (वैध) केल्या गेल्या आहेत की आपले धन (महर) अदा करून त्यांच्याशी विवाह करा, व्यभिचारासाठी नाही तर पावित्र्य कायम राखण्याकरिता, यास्तव ज्यांच्यापासून तुम्ही लाभ घ्याल त्यांना त्यांचा महर अदा करा आणि तुम्ही ठरलेल्या महर नंतर एकमेकांच्या मर्जीने जे वाटेल ते ठरवाल तर यात तुमच्यावर काही गुन्हा नाही. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 24
وَمَن لَّمۡ يَسۡتَطِعۡ مِنكُمۡ طَوۡلًا أَن يَنكِحَ ٱلۡمُحۡصَنَٰتِ ٱلۡمُؤۡمِنَٰتِ فَمِن مَّا مَلَكَتۡ أَيۡمَٰنُكُم مِّن فَتَيَٰتِكُمُ ٱلۡمُؤۡمِنَٰتِۚ وَٱللَّهُ أَعۡلَمُ بِإِيمَٰنِكُمۚ بَعۡضُكُم مِّنۢ بَعۡضٖۚ فَٱنكِحُوهُنَّ بِإِذۡنِ أَهۡلِهِنَّ وَءَاتُوهُنَّ أُجُورَهُنَّ بِٱلۡمَعۡرُوفِ مُحۡصَنَٰتٍ غَيۡرَ مُسَٰفِحَٰتٖ وَلَا مُتَّخِذَٰتِ أَخۡدَانٖۚ فَإِذَآ أُحۡصِنَّ فَإِنۡ أَتَيۡنَ بِفَٰحِشَةٖ فَعَلَيۡهِنَّ نِصۡفُ مَا عَلَى ٱلۡمُحۡصَنَٰتِ مِنَ ٱلۡعَذَابِۚ ذَٰلِكَ لِمَنۡ خَشِيَ ٱلۡعَنَتَ مِنكُمۡۚ وَأَن تَصۡبِرُواْ خَيۡرٞ لَّكُمۡۗ وَٱللَّهُ غَفُورٞ رَّحِيمٞ
२५. आणि तुमच्यापैकी जो स्वतंत्र अशा मुलसमान स्त्रीशी विवाह करण्याचे सामर्थ्य बाळगत नसेल तर त्याने त्या मुसलमान दासीशी (विवाह करावा) जी स्वतःच्या मालकीची असावी. अल्लाह तुमच्या कर्माशी पूर्णतः जाणता आहे. तुम्ही आपसात एकमेकांचे जोडीदार आहात, यास्तव तुम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने त्यांच्याशी विवाह करा आणि नियमानुसार त्यांचा महर देऊन टाका. त्या सत्शील, सदाचारी असाव्यात, उघडपणे दुराचार करणाऱ्या नसाव्यात, न लपून छपून प्रेम-संबंध राखणाऱ्या असाव्यात, मग जेव्हा त्या विवाहित झाल्यानंतर पुन्हा व्यभिचार करतील तर त्यांच्यासाठी, स्वतंत्र स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या निम्मी शिक्षा आहे. हा विवाहाचा आदेश त्याच्यासाठी आहे ज्याला आपल्या हातून कुकर्म होईल अशी भीती आहे धीर धराल तर तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 25
يُرِيدُ ٱللَّهُ لِيُبَيِّنَ لَكُمۡ وَيَهۡدِيَكُمۡ سُنَنَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِكُمۡ وَيَتُوبَ عَلَيۡكُمۡۗ وَٱللَّهُ عَلِيمٌ حَكِيمٞ
२६. अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी स्पष्ट आदेशांचे निवेदन करावे आणि तुम्हाला त्या लोकांच्या उचित मार्गावर चालवावे, जे तुमच्या पूर्वी होऊन गेलेत आणि तुमची क्षमा-याचना (तौबा) कबूल करावी आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 26
وَٱللَّهُ يُرِيدُ أَن يَتُوبَ عَلَيۡكُمۡ وَيُرِيدُ ٱلَّذِينَ يَتَّبِعُونَ ٱلشَّهَوَٰتِ أَن تَمِيلُواْ مَيۡلًا عَظِيمٗا
२७. आणि अल्लाह इच्छितो की तुमची तौबा कबूल करावी आणि जे लोक कामवासनेच्या मागे लागले आहेत, ते इच्छितात की तुम्ही सन्मार्गापासून खूप दूर हटावे
Surah An-Nisa, Verse 27
يُرِيدُ ٱللَّهُ أَن يُخَفِّفَ عَنكُمۡۚ وَخُلِقَ ٱلۡإِنسَٰنُ ضَعِيفٗا
२८. अल्लाह तुमचा सर्व भार हलका करू इच्छितो आणि माणूस मोठा कमकुवत निर्माण केला गेला आहे
Surah An-Nisa, Verse 28
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ لَا تَأۡكُلُوٓاْ أَمۡوَٰلَكُم بَيۡنَكُم بِٱلۡبَٰطِلِ إِلَّآ أَن تَكُونَ تِجَٰرَةً عَن تَرَاضٖ مِّنكُمۡۚ وَلَا تَقۡتُلُوٓاْ أَنفُسَكُمۡۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ بِكُمۡ رَحِيمٗا
२९. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपसात एकमेकांची धन-संपत्ती नाहक हडप करू नका, परंतु आशा पध्दतीने की तुम्ही आपसात राजीखुशीने व्यापार-उद्योग करा. आणि स्वतःला जीवे ठार करू नका. निःसंशय अल्लाह तुमच्यावर दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 29
وَمَن يَفۡعَلۡ ذَٰلِكَ عُدۡوَٰنٗا وَظُلۡمٗا فَسَوۡفَ نُصۡلِيهِ نَارٗاۚ وَكَانَ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرًا
३०. आणि जे मनुष्य ही सीमा ओलांडून आणखी अत्याचार करील तर फार लवकर आम्ही त्याला आगीत टाकू आणि हे अल्लाहकरिता फार सोपे आहे
Surah An-Nisa, Verse 30
إِن تَجۡتَنِبُواْ كَبَآئِرَ مَا تُنۡهَوۡنَ عَنۡهُ نُكَفِّرۡ عَنكُمۡ سَيِّـَٔاتِكُمۡ وَنُدۡخِلۡكُم مُّدۡخَلٗا كَرِيمٗا
३१. जर तुम्ही या मोठ्या अपराधांपासून स्वतःला वाचवाल, ज्यांच्याविषयी तुम्हाला मनाई केली जात आहे तर आम्ही तुमच्या लहान सहान अपराधांना माफ करू आणि मान सन्मानाच्या दरवाज्यात दाखल करू
Surah An-Nisa, Verse 31
وَلَا تَتَمَنَّوۡاْ مَا فَضَّلَ ٱللَّهُ بِهِۦ بَعۡضَكُمۡ عَلَىٰ بَعۡضٖۚ لِّلرِّجَالِ نَصِيبٞ مِّمَّا ٱكۡتَسَبُواْۖ وَلِلنِّسَآءِ نَصِيبٞ مِّمَّا ٱكۡتَسَبۡنَۚ وَسۡـَٔلُواْ ٱللَّهَ مِن فَضۡلِهِۦٓۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ بِكُلِّ شَيۡءٍ عَلِيمٗا
३२. आणि त्या गोष्टीची इच्छा धरू नका, जिच्यामुळे अल्लाहने तुमच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे. पुरुषांचा हिस्सा तो आहे, जो त्यांनी कमविला आणि स्त्रियांसाठी तो हिस्सा आहे जो त्यांनी कमवीला अल्लाहजवळ त्याच्या दया-कृपेची याचना करा. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान राखतो
Surah An-Nisa, Verse 32
وَلِكُلّٖ جَعَلۡنَا مَوَٰلِيَ مِمَّا تَرَكَ ٱلۡوَٰلِدَانِ وَٱلۡأَقۡرَبُونَۚ وَٱلَّذِينَ عَقَدَتۡ أَيۡمَٰنُكُمۡ فَـَٔاتُوهُمۡ نَصِيبَهُمۡۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ شَهِيدًا
३३. आणि आई-बाप किंवा जवळचे नातेवाईक आपल्या मागे जे काही सोडून मरतील, त्याचे वारसदार आम्ही प्रत्येकाचे निश्चित केले आहेत आणि ज्यांच्याशी तुम्ही स्वतः वचन-करार केला आहे. त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाका. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्ट पाहात आहे
Surah An-Nisa, Verse 33
ٱلرِّجَالُ قَوَّـٰمُونَ عَلَى ٱلنِّسَآءِ بِمَا فَضَّلَ ٱللَّهُ بَعۡضَهُمۡ عَلَىٰ بَعۡضٖ وَبِمَآ أَنفَقُواْ مِنۡ أَمۡوَٰلِهِمۡۚ فَٱلصَّـٰلِحَٰتُ قَٰنِتَٰتٌ حَٰفِظَٰتٞ لِّلۡغَيۡبِ بِمَا حَفِظَ ٱللَّهُۚ وَٱلَّـٰتِي تَخَافُونَ نُشُوزَهُنَّ فَعِظُوهُنَّ وَٱهۡجُرُوهُنَّ فِي ٱلۡمَضَاجِعِ وَٱضۡرِبُوهُنَّۖ فَإِنۡ أَطَعۡنَكُمۡ فَلَا تَبۡغُواْ عَلَيۡهِنَّ سَبِيلًاۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِيّٗا كَبِيرٗا
३४. पुरुष, स्त्रीवर शासक (आणि संरक्षक) आहे. या कारणास्तव की अल्लाहने एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे आणि या कारणास्तव की पुरुषांनी आपले धन खर्च केले आहे. यास्तव नेक, आज्ञाधारक स्त्रिया पतीच्या अनुपस्थितीत अल्लाहच्या संरक्षणाद्वारे धन-संपत्ती व शील-अब्रूचे रक्षण करतात आणि ज्या स्त्रियांपासून तुम्हाला अवज्ञेचे भय असेल त्यांना चांगली ताकीद करा, त्यांचे अंथरुण वेगळे करा (तरीही न मानतील) तर मारा आणि जर तुमचे म्हणणे मानून घेतील तर त्यांच्यावर दोषारोप ठेवण्याचे निमित्त शोधू नका. निःसंशय अल्लाह मोठा महान आहे
Surah An-Nisa, Verse 34
وَإِنۡ خِفۡتُمۡ شِقَاقَ بَيۡنِهِمَا فَٱبۡعَثُواْ حَكَمٗا مِّنۡ أَهۡلِهِۦ وَحَكَمٗا مِّنۡ أَهۡلِهَآ إِن يُرِيدَآ إِصۡلَٰحٗا يُوَفِّقِ ٱللَّهُ بَيۡنَهُمَآۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِيمًا خَبِيرٗا
३५. जर तुम्हाला (पती-पत्नीमध्ये) मनमुटाव होण्याची भीती असेल तर एक न्याय करणारा पंच, पतीच्या कुटुंबातर्फे आणि एक पत्नीच्या कुटुंबातर्फे ठरवून घ्या. जर हे दोघे समझोता घडवून आणू इच्छितील तर अल्लाह त्या दोघांचा मिलाप करील. निःसंशय, अल्लाह जाणणारा, खबर राखणारा आहे
Surah An-Nisa, Verse 35
۞وَٱعۡبُدُواْ ٱللَّهَ وَلَا تُشۡرِكُواْ بِهِۦ شَيۡـٔٗاۖ وَبِٱلۡوَٰلِدَيۡنِ إِحۡسَٰنٗا وَبِذِي ٱلۡقُرۡبَىٰ وَٱلۡيَتَٰمَىٰ وَٱلۡمَسَٰكِينِ وَٱلۡجَارِ ذِي ٱلۡقُرۡبَىٰ وَٱلۡجَارِ ٱلۡجُنُبِ وَٱلصَّاحِبِ بِٱلۡجَنۢبِ وَٱبۡنِ ٱلسَّبِيلِ وَمَا مَلَكَتۡ أَيۡمَٰنُكُمۡۗ إِنَّ ٱللَّهَ لَا يُحِبُّ مَن كَانَ مُخۡتَالٗا فَخُورًا
३६. आणि अल्लाहची उपासना करा. त्याच्यासह दुसऱ्या कोणाला सहभागी करू नका आणि आई-बाप, नातेवाईक, अनाथ, गरीब दुबळे, जवळचे शेजारी, दूरचे शेजारी आणि सोबत असलेल्या प्रवाशांसीी भलेपणाचे, उपकाराचे वर्तन करा, तसेच प्रवाशी आणि तुमच्या ताब्यात असेलल्यांशीही. निःसंशय अल्लाह ऐट दाखविणाऱ्या घमेंडीशी प्रेम राखत नाही
Surah An-Nisa, Verse 36
ٱلَّذِينَ يَبۡخَلُونَ وَيَأۡمُرُونَ ٱلنَّاسَ بِٱلۡبُخۡلِ وَيَكۡتُمُونَ مَآ ءَاتَىٰهُمُ ٱللَّهُ مِن فَضۡلِهِۦۗ وَأَعۡتَدۡنَا لِلۡكَٰفِرِينَ عَذَابٗا مُّهِينٗا
३७. जे लोक स्वतः कंजूषपणा करतात आणि इतरांनाही कंजूषपणा करण्यास सांगतात आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने, जे आपल्या कृपेने त्यांना प्रदान केले आहे, ते लपवितात, तर आम्ही अशा कृतघ्न लोकांसाठी अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे
Surah An-Nisa, Verse 37
وَٱلَّذِينَ يُنفِقُونَ أَمۡوَٰلَهُمۡ رِئَآءَ ٱلنَّاسِ وَلَا يُؤۡمِنُونَ بِٱللَّهِ وَلَا بِٱلۡيَوۡمِ ٱلۡأٓخِرِۗ وَمَن يَكُنِ ٱلشَّيۡطَٰنُ لَهُۥ قَرِينٗا فَسَآءَ قَرِينٗا
३८. आणि जे लोक आपले धन लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतात, आणि अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत नाही आणि ज्याचा सखा-सोबती सैतान असेल तर तो मोठा वाईट सोबती आहे
Surah An-Nisa, Verse 38
وَمَاذَا عَلَيۡهِمۡ لَوۡ ءَامَنُواْ بِٱللَّهِ وَٱلۡيَوۡمِ ٱلۡأٓخِرِ وَأَنفَقُواْ مِمَّا رَزَقَهُمُ ٱللَّهُۚ وَكَانَ ٱللَّهُ بِهِمۡ عَلِيمًا
३९. आणि त्यांचे काय बिघडले असते तर त्यांनी अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखले असते आणि अल्लाहने जे त्यांना देऊन ठेवले आहे, त्यातून खर्च करीत राहिले असते. अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे
Surah An-Nisa, Verse 39
إِنَّ ٱللَّهَ لَا يَظۡلِمُ مِثۡقَالَ ذَرَّةٖۖ وَإِن تَكُ حَسَنَةٗ يُضَٰعِفۡهَا وَيُؤۡتِ مِن لَّدُنۡهُ أَجۡرًا عَظِيمٗا
४०. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह एका कणाइतकाही अत्याचार करीत नाही. आणि सत्कर्म (नेकी) असेल तर त्याला दुप्पट करतो आणि विशेषतः आपल्या जवळून फार मोठा मोबदला प्रदान करतो
Surah An-Nisa, Verse 40
فَكَيۡفَ إِذَا جِئۡنَا مِن كُلِّ أُمَّةِۭ بِشَهِيدٖ وَجِئۡنَا بِكَ عَلَىٰ هَـٰٓؤُلَآءِ شَهِيدٗا
४१. तेव्हा काय अवस्था होईल, जेव्हा प्रत्येक जनसमूहा (उम्मत) मधून एक साक्ष देणारा आम्ही आणू आणि तुम्हाला त्या लोकांवर साक्षीदार बनवून आणू.१
Surah An-Nisa, Verse 41
يَوۡمَئِذٖ يَوَدُّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَعَصَوُاْ ٱلرَّسُولَ لَوۡ تُسَوَّىٰ بِهِمُ ٱلۡأَرۡضُ وَلَا يَكۡتُمُونَ ٱللَّهَ حَدِيثٗا
४२. ज्या दिवशी इन्कार करणारे आणि पैगंबराची अवज्ञा करणारे ही इच्छा करतील की त्यांना जमिनीशी सपाट (समतल) केले गेले असते तर फार बरे झाले असते आणि अल्लाहपासून ते काहीही लपवू शकणार नाहीत
Surah An-Nisa, Verse 42
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ لَا تَقۡرَبُواْ ٱلصَّلَوٰةَ وَأَنتُمۡ سُكَٰرَىٰ حَتَّىٰ تَعۡلَمُواْ مَا تَقُولُونَ وَلَا جُنُبًا إِلَّا عَابِرِي سَبِيلٍ حَتَّىٰ تَغۡتَسِلُواْۚ وَإِن كُنتُم مَّرۡضَىٰٓ أَوۡ عَلَىٰ سَفَرٍ أَوۡ جَآءَ أَحَدٞ مِّنكُم مِّنَ ٱلۡغَآئِطِ أَوۡ لَٰمَسۡتُمُ ٱلنِّسَآءَ فَلَمۡ تَجِدُواْ مَآءٗ فَتَيَمَّمُواْ صَعِيدٗا طَيِّبٗا فَٱمۡسَحُواْ بِوُجُوهِكُمۡ وَأَيۡدِيكُمۡۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَفُوًّا غَفُورًا
४३. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही नशेत चूर असाल तेव्हा नमाजच्या जवळ जाऊ नका, जोपर्यंत आपले म्हणणे समजू न लागाल आणि (संभोगानंतरच्या) अपवित्र अवस्थेत, जोपर्यंत स्नान न करून घ्याल, परंतु रस्त्याने जाताना (नमाजच्या स्थानावरून) जाणे होत असेल तर गोष्ट वेगळी आणि जर तुम्ही आजारी असाल, किंवा प्रवासात असाल किंवा तुमच्यापैकी कोणी शौचास जाऊन आला असेल किंवा तुम्ही स्त्रियांशी समागम केला असेल आणि तुम्हाला पाणी मिळत नसेल तर साफ स्वच्छ मातीने तयम्मुम करा आणि आपले तोंड आणि आपले हात (मातीने) मळून घ्या. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा आणि क्षमाशील आहे
Surah An-Nisa, Verse 43
أَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِينَ أُوتُواْ نَصِيبٗا مِّنَ ٱلۡكِتَٰبِ يَشۡتَرُونَ ٱلضَّلَٰلَةَ وَيُرِيدُونَ أَن تَضِلُّواْ ٱلسَّبِيلَ
४४. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना ग्रंथाचा काही भाग दिला गेला? ते मार्गभ्रष्टता खरेदी करतात आणि इच्छितात की तुम्हीही मार्गभ्रष्ट व्हावे
Surah An-Nisa, Verse 44
وَٱللَّهُ أَعۡلَمُ بِأَعۡدَآئِكُمۡۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَلِيّٗا وَكَفَىٰ بِٱللَّهِ نَصِيرٗا
४५. आणि अल्लाह तुमच्या शत्रूंना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे आणि अल्लाह पुरेसा आहे दोस्त होण्यासाठी आणि अल्लाह पर्याप्त आहे मदतकर्ता होण्यासाठी
Surah An-Nisa, Verse 45
مِّنَ ٱلَّذِينَ هَادُواْ يُحَرِّفُونَ ٱلۡكَلِمَ عَن مَّوَاضِعِهِۦ وَيَقُولُونَ سَمِعۡنَا وَعَصَيۡنَا وَٱسۡمَعۡ غَيۡرَ مُسۡمَعٖ وَرَٰعِنَا لَيَّۢا بِأَلۡسِنَتِهِمۡ وَطَعۡنٗا فِي ٱلدِّينِۚ وَلَوۡ أَنَّهُمۡ قَالُواْ سَمِعۡنَا وَأَطَعۡنَا وَٱسۡمَعۡ وَٱنظُرۡنَا لَكَانَ خَيۡرٗا لَّهُمۡ وَأَقۡوَمَ وَلَٰكِن لَّعَنَهُمُ ٱللَّهُ بِكُفۡرِهِمۡ فَلَا يُؤۡمِنُونَ إِلَّا قَلِيلٗا
४६. काही यहूदी, वाणी (कलाम) ला तिच्या योग्य स्थानापासून बदलून टाकतात. आणि म्हणतात की आम्ही ऐकले आणि अवज्ञा केली आणि ऐक त्याच्याविना की तुला ऐकले न जावे आणि आमची ताबेदारी कबूल करा (परंतु हे बोलताना) आपल्या जीभेला मोड देतात आणि दीन (धर्म) कलंकित करतात आणि जर हे लोक असे म्हणाले असते की आम्ही ऐकले आणि आम्ही मान्य केले आणि तुम्ही ऐका आणि आम्हाला पाहा तर हे त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते आणि अधिक उत्तम ठरले असते. परंतु अल्लाहने त्यांच्या इन्कारामुळे त्यांचा धिःक्कार केला, तेव्हा हे फार कमी ईमान राखतात
Surah An-Nisa, Verse 46
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡكِتَٰبَ ءَامِنُواْ بِمَا نَزَّلۡنَا مُصَدِّقٗا لِّمَا مَعَكُم مِّن قَبۡلِ أَن نَّطۡمِسَ وُجُوهٗا فَنَرُدَّهَا عَلَىٰٓ أَدۡبَارِهَآ أَوۡ نَلۡعَنَهُمۡ كَمَا لَعَنَّآ أَصۡحَٰبَ ٱلسَّبۡتِۚ وَكَانَ أَمۡرُ ٱللَّهِ مَفۡعُولًا
४७. हे ग्रंथधारकांनो! जे काही आम्ही अवतरित केले आहे, जे तुमच्याजवळ असलेल्या (ग्रंथा) ला सत्य असल्याचे सांगतो, त्यावर यापूर्वी ईमान राखा की आम्ही चेहरे बिघडवून टाकावेत आणि त्यांना फिरवून पाठीकडे करावे किंवा त्यांच्यावर धिःक्काराचा मारा करावा, जसा आम्ही शनिवारवाल्या लोकांवर केला आहे, आणि अल्लाहचा निर्णय पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही
Surah An-Nisa, Verse 47
إِنَّ ٱللَّهَ لَا يَغۡفِرُ أَن يُشۡرَكَ بِهِۦ وَيَغۡفِرُ مَا دُونَ ذَٰلِكَ لِمَن يَشَآءُۚ وَمَن يُشۡرِكۡ بِٱللَّهِ فَقَدِ ٱفۡتَرَىٰٓ إِثۡمًا عَظِيمًا
४८. निःसंशय, अल्लाह आपल्यासह कोणाला सहभागी केले जाणे माफ करत नाही आणि याच्याखेरीज ज्याला इच्छिल माफ करील १ आणि जो अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी करील तर त्याने अल्लाहवर फार मोठे असत्य रचले. २
Surah An-Nisa, Verse 48
أَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِينَ يُزَكُّونَ أَنفُسَهُمۚ بَلِ ٱللَّهُ يُزَكِّي مَن يَشَآءُ وَلَا يُظۡلَمُونَ فَتِيلًا
४९. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले जे स्वतला फार शुद्ध पवित्र असल्याचे सांगतात? किंबहुना अल्लाह ज्याला इच्छितो स्वच्छ, शुद्ध, पवित्र करतो, आणि कोणावर धाग्याइतकाही अत्याचार केला जाणार नाही
Surah An-Nisa, Verse 49
ٱنظُرۡ كَيۡفَ يَفۡتَرُونَ عَلَى ٱللَّهِ ٱلۡكَذِبَۖ وَكَفَىٰ بِهِۦٓ إِثۡمٗا مُّبِينًا
५०. पाहा, हे लोक अल्लाहवर कशा प्रकारे खोटा आरोप ठेवतात आणि हे फार मोठा गुन्हा साबीत होण्यास पुरेसे आहे
Surah An-Nisa, Verse 50
أَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِينَ أُوتُواْ نَصِيبٗا مِّنَ ٱلۡكِتَٰبِ يُؤۡمِنُونَ بِٱلۡجِبۡتِ وَٱلطَّـٰغُوتِ وَيَقُولُونَ لِلَّذِينَ كَفَرُواْ هَـٰٓؤُلَآءِ أَهۡدَىٰ مِنَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ سَبِيلًا
५१. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना ग्रंथाचा काही हिस्सा लाभला आहे जे मूर्त्यांवर आणि मिथ्या देवांवर ईमान (श्रद्धा) राखतात आणि इन्कारी लोकांच्या हक्कात म्हणतात की हे लोक ईमान राखणाऱ्यांपेक्षा अधिक सरळ आणि सत्य-मार्गावर आहेत
Surah An-Nisa, Verse 51
أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ لَعَنَهُمُ ٱللَّهُۖ وَمَن يَلۡعَنِ ٱللَّهُ فَلَن تَجِدَ لَهُۥ نَصِيرًا
५२. हेच लोक आहेत, ज्यांचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि अल्लाह ज्याचा धिःक्कार करील तर तुम्हाला त्याची मदत करणारा कोणीही आढळणार नाही
Surah An-Nisa, Verse 52
أَمۡ لَهُمۡ نَصِيبٞ مِّنَ ٱلۡمُلۡكِ فَإِذٗا لَّا يُؤۡتُونَ ٱلنَّاسَ نَقِيرًا
५३. काय त्यांच्याजवळ एखाद्या साम्राज्याचा हिस्सा आहे, असे असेल तर हे कोणाला तीळभरसुद्धा देणार नाहीत
Surah An-Nisa, Verse 53
أَمۡ يَحۡسُدُونَ ٱلنَّاسَ عَلَىٰ مَآ ءَاتَىٰهُمُ ٱللَّهُ مِن فَضۡلِهِۦۖ فَقَدۡ ءَاتَيۡنَآ ءَالَ إِبۡرَٰهِيمَ ٱلۡكِتَٰبَ وَٱلۡحِكۡمَةَ وَءَاتَيۡنَٰهُم مُّلۡكًا عَظِيمٗا
५४. हे लोकांशी द्वेष-मत्सर राखतात, त्याबद्दल, जे अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना प्रदान केले आहे, तेव्हा आम्ही इब्राहीमच्या संततीला ग्रंथ आणि हिकमतही प्रदान केली आणि मोठे साम्राज्यही प्रदान केले
Surah An-Nisa, Verse 54
فَمِنۡهُم مَّنۡ ءَامَنَ بِهِۦ وَمِنۡهُم مَّن صَدَّ عَنۡهُۚ وَكَفَىٰ بِجَهَنَّمَ سَعِيرًا
५५. मग त्यांच्यापैकी काहींनी तर ग्रंथावर ईमान राखले आणि काही त्यापासून थांबले तेव्हा (अशा लोकांसाठी) जहन्नमची आग पुरेशी आहे
Surah An-Nisa, Verse 55
إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ بِـَٔايَٰتِنَا سَوۡفَ نُصۡلِيهِمۡ نَارٗا كُلَّمَا نَضِجَتۡ جُلُودُهُم بَدَّلۡنَٰهُمۡ جُلُودًا غَيۡرَهَا لِيَذُوقُواْ ٱلۡعَذَابَۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَزِيزًا حَكِيمٗا
५६. ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला, त्यांना आम्ही अवश्य आगीत टाकू, जेव्हा त्यांची कातडी शिजून गळून पडेल, आम्ही लगेच तिच्या जागी दुसरी कातडी बदलून टाकू यासाठी की त्यांनी अज़ाब (शिक्षा-यातना) चाखतच राहावे. निःसंशय अल्लाह जबरदस्त हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 56
وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ سَنُدۡخِلُهُمۡ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ خَٰلِدِينَ فِيهَآ أَبَدٗاۖ لَّهُمۡ فِيهَآ أَزۡوَٰجٞ مُّطَهَّرَةٞۖ وَنُدۡخِلُهُمۡ ظِلّٗا ظَلِيلًا
५७. आणि ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, आम्ही लवकरच त्यांना जन्नतच्या बागांमध्ये दाखल करू, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. तिथे त्यांच्यासाठी पावित्र्यपूर्ण, शीलवान पत्न्या असतील आणि आम्ही त्यांना दाट सावलीत (आरामशीर जागी) ठेवू
Surah An-Nisa, Verse 57
۞إِنَّ ٱللَّهَ يَأۡمُرُكُمۡ أَن تُؤَدُّواْ ٱلۡأَمَٰنَٰتِ إِلَىٰٓ أَهۡلِهَا وَإِذَا حَكَمۡتُم بَيۡنَ ٱلنَّاسِ أَن تَحۡكُمُواْ بِٱلۡعَدۡلِۚ إِنَّ ٱللَّهَ نِعِمَّا يَعِظُكُم بِهِۦٓۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ سَمِيعَۢا بَصِيرٗا
५८. सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनामत (ठेव, धरोहर) त्यांच्या मालकांना परत करा, आणि जेव्हा लोकांच्या दरम्यान फैसला कराल तर न्यायपूर्वक फैसला करा. निःसंशय, ती फार चांगली गोष्ट आहे, ज्याची शिकवण अल्लाह तुम्हाला देत आहे आणि निःसंशय अल्लाह सर्व काही ऐकणारा, पाहणारा आहे
Surah An-Nisa, Verse 58
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ أَطِيعُواْ ٱللَّهَ وَأَطِيعُواْ ٱلرَّسُولَ وَأُوْلِي ٱلۡأَمۡرِ مِنكُمۡۖ فَإِن تَنَٰزَعۡتُمۡ فِي شَيۡءٖ فَرُدُّوهُ إِلَى ٱللَّهِ وَٱلرَّسُولِ إِن كُنتُمۡ تُؤۡمِنُونَ بِٱللَّهِ وَٱلۡيَوۡمِ ٱلۡأٓخِرِۚ ذَٰلِكَ خَيۡرٞ وَأَحۡسَنُ تَأۡوِيلًا
५९. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि रसूल (पैगंबर) सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आदेशाचे पालन करा आणि आपल्यापैकी शासक असलेल्यांचा आदेश माना, मग जर एखाद्या गोष्टीत मतभेद कराल तर तो अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे रुजू करा, जर तुम्ही अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असाल. हे सर्वांत चांगले आहे आणि परिणामाच्या दृष्टीनेही फार उत्तम आहे.१
Surah An-Nisa, Verse 59
أَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِينَ يَزۡعُمُونَ أَنَّهُمۡ ءَامَنُواْ بِمَآ أُنزِلَ إِلَيۡكَ وَمَآ أُنزِلَ مِن قَبۡلِكَ يُرِيدُونَ أَن يَتَحَاكَمُوٓاْ إِلَى ٱلطَّـٰغُوتِ وَقَدۡ أُمِرُوٓاْ أَن يَكۡفُرُواْ بِهِۦۖ وَيُرِيدُ ٱلشَّيۡطَٰنُ أَن يُضِلَّهُمۡ ضَلَٰلَۢا بَعِيدٗا
६०. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे दावा करतात की, जे काही तुमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे काही तुमच्या पूर्वी उतरविले गेले त्यावर ते ईमान राखतात, परंतु आपसातले तंटे सोडविण्यासाठी, अल्लाहऐवजी ते दुसऱ्यांजवळ जाऊ इच्छितात, वास्तविक त्यांना आदेश दिला गेला आहे की त्यांनी, त्याचा (सैतानाचा) इन्कार करावा. सैतान तर हे इच्छितोच की त्यांना बहकवून दूर फेकून द्यावे
Surah An-Nisa, Verse 60
وَإِذَا قِيلَ لَهُمۡ تَعَالَوۡاْ إِلَىٰ مَآ أَنزَلَ ٱللَّهُ وَإِلَى ٱلرَّسُولِ رَأَيۡتَ ٱلۡمُنَٰفِقِينَ يَصُدُّونَ عَنكَ صُدُودٗا
६१. आणि जेव्हा जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जो (पवित्र ग्रंथ) अवतरित केला आहे, त्याच्याकडे आणि पैगंबराकडे या, तेव्हा तुम्ही पाहाल की हे मुनाफिक (संधीसाधू) तुमच्याकडून तोंड फिरवून थांबतात
Surah An-Nisa, Verse 61
فَكَيۡفَ إِذَآ أَصَٰبَتۡهُم مُّصِيبَةُۢ بِمَا قَدَّمَتۡ أَيۡدِيهِمۡ ثُمَّ جَآءُوكَ يَحۡلِفُونَ بِٱللَّهِ إِنۡ أَرَدۡنَآ إِلَّآ إِحۡسَٰنٗا وَتَوۡفِيقًا
६२. मग काय कारण आहे की जेव्हा त्यांच्यावर त्यांच्या वाईट कर्मांमुळे एखादे संकट येऊन कोसळते तर मग हे तुमच्याजवळ येऊन अल्लाहची शपथ घेतात, आणि सांगतात, आमचा इरादा तर केवळ भलाईचा आणि चांगले संबंध घडवून आणण्याचाच होता
Surah An-Nisa, Verse 62
أُوْلَـٰٓئِكَ ٱلَّذِينَ يَعۡلَمُ ٱللَّهُ مَا فِي قُلُوبِهِمۡ فَأَعۡرِضۡ عَنۡهُمۡ وَعِظۡهُمۡ وَقُل لَّهُمۡ فِيٓ أَنفُسِهِمۡ قَوۡلَۢا بَلِيغٗا
६३. हे असे लोक आहेत, ज्यांच्या मनातील रहस्यभेद, अल्लाहला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, मात्र त्यांना शिकवण देत राहा, आणि त्यांना अशी गोष्ट बोला जी त्यांच्या मनावर प्रभाव टाकणारी असेल
Surah An-Nisa, Verse 63
وَمَآ أَرۡسَلۡنَا مِن رَّسُولٍ إِلَّا لِيُطَاعَ بِإِذۡنِ ٱللَّهِۚ وَلَوۡ أَنَّهُمۡ إِذ ظَّلَمُوٓاْ أَنفُسَهُمۡ جَآءُوكَ فَٱسۡتَغۡفَرُواْ ٱللَّهَ وَٱسۡتَغۡفَرَ لَهُمُ ٱلرَّسُولُ لَوَجَدُواْ ٱللَّهَ تَوَّابٗا رَّحِيمٗا
६४. आणि आम्ही प्रत्येक पैगंबर केवळ यासाठी पाठविला की अल्लाहच्या आदेशान्वये, त्याच्या आदेशाचे पालन केले जावे, आणि जर हे लोक, ज्यांनी स्वतःच्या प्राणांवर अत्याचार केला, तुमच्याजवळ आले असते आणि त्यांनी अल्लाहजवळ तौबा (क्षमा-याचना) केली असती आणि पैगंबरांनीही त्यांच्यासाठी माफी मागितली असती तर निःसंशय, अल्लाह या लोकांना मोठा माफ करणारा, दया करणारा आढळला असता
Surah An-Nisa, Verse 64
فَلَا وَرَبِّكَ لَا يُؤۡمِنُونَ حَتَّىٰ يُحَكِّمُوكَ فِيمَا شَجَرَ بَيۡنَهُمۡ ثُمَّ لَا يَجِدُواْ فِيٓ أَنفُسِهِمۡ حَرَجٗا مِّمَّا قَضَيۡتَ وَيُسَلِّمُواْ تَسۡلِيمٗا
६५. तेव्हा शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची, हे लोक (तोपर्यंत) ईमानधारक होऊ शकत नाही, जोपर्यंत सर्व आपसातील मतभेदात तुम्हाला न्याय-निवाडा करणारा स्वीकारीत नाही, मग जो फैसला तुम्ही कराल, त्यावर मनातून नाराजही नसावेत आणि आज्ञाधारकाप्रमाणे त्यांनी तो मान्य करून घ्यावा
Surah An-Nisa, Verse 65
وَلَوۡ أَنَّا كَتَبۡنَا عَلَيۡهِمۡ أَنِ ٱقۡتُلُوٓاْ أَنفُسَكُمۡ أَوِ ٱخۡرُجُواْ مِن دِيَٰرِكُم مَّا فَعَلُوهُ إِلَّا قَلِيلٞ مِّنۡهُمۡۖ وَلَوۡ أَنَّهُمۡ فَعَلُواْ مَا يُوعَظُونَ بِهِۦ لَكَانَ خَيۡرٗا لَّهُمۡ وَأَشَدَّ تَثۡبِيتٗا
६६. आणि जर आम्ही त्यांच्यावर हे फर्ज (अनिवार्य) केले असते की स्वतःची हत्या करून घ्या, किंवा आपल्या घरातून निघून जा, तर त्यांच्यापैकी फार थोड्याच लोकांनी त्याचे पालन केले असते. आणि जर हे तेच करतील ज्याची त्यांना शिकवण दिली जाते तर निश्चितच त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते आणि खूप मजबूतीचे ठरले असते
Surah An-Nisa, Verse 66
وَإِذٗا لَّأٓتَيۡنَٰهُم مِّن لَّدُنَّآ أَجۡرًا عَظِيمٗا
६७. आणि मग तर आम्ही त्यांना आपल्या जवळून फार मोठा मोबदला प्रदान केला असता
Surah An-Nisa, Verse 67
وَلَهَدَيۡنَٰهُمۡ صِرَٰطٗا مُّسۡتَقِيمٗا
६८. आणि निःसंशय त्यांना सत्य व सरळ मार्ग प्रदान केला असता
Surah An-Nisa, Verse 68
وَمَن يُطِعِ ٱللَّهَ وَٱلرَّسُولَ فَأُوْلَـٰٓئِكَ مَعَ ٱلَّذِينَ أَنۡعَمَ ٱللَّهُ عَلَيۡهِم مِّنَ ٱلنَّبِيِّـۧنَ وَٱلصِّدِّيقِينَ وَٱلشُّهَدَآءِ وَٱلصَّـٰلِحِينَۚ وَحَسُنَ أُوْلَـٰٓئِكَ رَفِيقٗا
६९. आणि जो कोणी अल्लाह आणि रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशाचे पालन करील तर तो त्या लोकांसोबत राहील, ज्यांच्यावर अल्लाहने आपला इनाम फर्माविला आहे, जसे नबी (पैगंबर), सिद्दीक (सत्यवचनी) आणि शहीद व नेक सदाचारी लोक. हे फार चांगले सोबती आहेत
Surah An-Nisa, Verse 69
ذَٰلِكَ ٱلۡفَضۡلُ مِنَ ٱللَّهِۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ عَلِيمٗا
७०. ही सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे फार मोठी कृपा आहे आणि अल्लाह पर्याप्त आहे ज्ञान राखणारा
Surah An-Nisa, Verse 70
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ خُذُواْ حِذۡرَكُمۡ فَٱنفِرُواْ ثُبَاتٍ أَوِ ٱنفِرُواْ جَمِيعٗا
७१. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपल्या बचावाची सामग्री सोबत घ्या, मग समूहा-समूहाने किंवा सर्व एकत्र मिळून कूच करा
Surah An-Nisa, Verse 71
وَإِنَّ مِنكُمۡ لَمَن لَّيُبَطِّئَنَّ فَإِنۡ أَصَٰبَتۡكُم مُّصِيبَةٞ قَالَ قَدۡ أَنۡعَمَ ٱللَّهُ عَلَيَّ إِذۡ لَمۡ أَكُن مَّعَهُمۡ شَهِيدٗا
७२. आणि निःसंशय तुमच्यापैकी काही असेही आहेत जे संकोच करतात, मग जर तुम्हाला एखादे नुकसान पोहोचते, तेव्हा म्हणतात की अल्लाहने माझ्यावर मोठी कृपा केली मी त्यांच्यासह हजर नव्हतो
Surah An-Nisa, Verse 72
وَلَئِنۡ أَصَٰبَكُمۡ فَضۡلٞ مِّنَ ٱللَّهِ لَيَقُولَنَّ كَأَن لَّمۡ تَكُنۢ بَيۡنَكُمۡ وَبَيۡنَهُۥ مَوَدَّةٞ يَٰلَيۡتَنِي كُنتُ مَعَهُمۡ فَأَفُوزَ فَوۡزًا عَظِيمٗا
७३. आणि जर तुम्हाला अल्लाहची एखादी कृपा लाभली तर असे बोलू लागतील की जणू तुमच्या व त्यांच्या दरम्यान काही नातेच नव्हते, म्हणतील की, अरेरे! मी त्यांच्यासोबत असतो तर मोठी सफलता प्राप्त केली असती
Surah An-Nisa, Verse 73
۞فَلۡيُقَٰتِلۡ فِي سَبِيلِ ٱللَّهِ ٱلَّذِينَ يَشۡرُونَ ٱلۡحَيَوٰةَ ٱلدُّنۡيَا بِٱلۡأٓخِرَةِۚ وَمَن يُقَٰتِلۡ فِي سَبِيلِ ٱللَّهِ فَيُقۡتَلۡ أَوۡ يَغۡلِبۡ فَسَوۡفَ نُؤۡتِيهِ أَجۡرًا عَظِيمٗا
७४. तथापि ज्या लोकांनी या जगाचे जीवन, मरणोत्तर जीवना (आखिरत) च्या मोबदल्यात विकून टाकले आहे, त्यांनी अल्लाहच्या मार्गात लढले पाहिजे आणि जो अल्लाहच्या मार्गात लढता लढता शहीद होईल किंवा विजयी होईल तर खात्रीने आम्ही त्याला फार चांगला मोबदला प्रदान करू
Surah An-Nisa, Verse 74
وَمَا لَكُمۡ لَا تُقَٰتِلُونَ فِي سَبِيلِ ٱللَّهِ وَٱلۡمُسۡتَضۡعَفِينَ مِنَ ٱلرِّجَالِ وَٱلنِّسَآءِ وَٱلۡوِلۡدَٰنِ ٱلَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَآ أَخۡرِجۡنَا مِنۡ هَٰذِهِ ٱلۡقَرۡيَةِ ٱلظَّالِمِ أَهۡلُهَا وَٱجۡعَل لَّنَا مِن لَّدُنكَ وَلِيّٗا وَٱجۡعَل لَّنَا مِن لَّدُنكَ نَصِيرًا
७५. बरे काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात आणि त्या दुर्बल पुरुष स्त्रिया आणि लहान लहान बालकांच्या सुटकेकरिता न लढावे? जे अशा प्रकारे दुआ (प्रार्थना) करीत आहेत की हे आमच्या पालनहार! या अत्याचारी लोकांच्या वस्तीतून आम्हाला बाहेर काढआणि आमच्यासाठी स्वतः आपल्यातर्फे एखादा हिमायती (समर्थक निश्चित कर, आणि आमच्यासाठी विशेषरित्या आपल्यातर्फे मदत करणारा पाठव)
Surah An-Nisa, Verse 75
ٱلَّذِينَ ءَامَنُواْ يُقَٰتِلُونَ فِي سَبِيلِ ٱللَّهِۖ وَٱلَّذِينَ كَفَرُواْ يُقَٰتِلُونَ فِي سَبِيلِ ٱلطَّـٰغُوتِ فَقَٰتِلُوٓاْ أَوۡلِيَآءَ ٱلشَّيۡطَٰنِۖ إِنَّ كَيۡدَ ٱلشَّيۡطَٰنِ كَانَ ضَعِيفًا
७६. ज्या लोकांनी ईमान राखले आहे, ते तर अल्लाहच्या मार्गात जिहाद करतात आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आहे ते तर तागूत (सैतान) च्या मार्गात लढतात. तेव्हा तुम्ही सैतानाच्या मित्रांशी युद्ध करा. निःसंशय सैतानाचे (डावपेच) अतिशय कमकुवत आहेत
Surah An-Nisa, Verse 76
أَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِينَ قِيلَ لَهُمۡ كُفُّوٓاْ أَيۡدِيَكُمۡ وَأَقِيمُواْ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُواْ ٱلزَّكَوٰةَ فَلَمَّا كُتِبَ عَلَيۡهِمُ ٱلۡقِتَالُ إِذَا فَرِيقٞ مِّنۡهُمۡ يَخۡشَوۡنَ ٱلنَّاسَ كَخَشۡيَةِ ٱللَّهِ أَوۡ أَشَدَّ خَشۡيَةٗۚ وَقَالُواْ رَبَّنَا لِمَ كَتَبۡتَ عَلَيۡنَا ٱلۡقِتَالَ لَوۡلَآ أَخَّرۡتَنَآ إِلَىٰٓ أَجَلٖ قَرِيبٖۗ قُلۡ مَتَٰعُ ٱلدُّنۡيَا قَلِيلٞ وَٱلۡأٓخِرَةُ خَيۡرٞ لِّمَنِ ٱتَّقَىٰ وَلَا تُظۡلَمُونَ فَتِيلًا
७७. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना आदेश दिला गेला की आपल्या हातांना रोखून ठेवा आणि नमाज नियमित पढत राहा आणि जकात अदा करीत राहा, मग जेव्हा त्यांना जिहाद (धर्मयुद्धा) चा आदेश दिला गेला तेव्हा त्याच वेळी त्यांच्यातला एक समूह, लोकांपासून असा भयभीत होता, जणू अल्लाहचे भय असावे, किंबहुना यापेक्षा अधिक आणि म्हणू लागले, हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्यावर जिहाद अनिवार्य का केले? आणखी थोडे जीवन आम्हाला का व्यतीत करू दिले नाही? तुम्ही त्यांना सांगा की या जगाचा लाभ तर फार थोडासा आहे आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता आखिरत कितीतरी उत्तम आहे, आणि तुमच्यावर एका धाग्याइतकाही अत्याचार केला जाणार नाही
Surah An-Nisa, Verse 77
أَيۡنَمَا تَكُونُواْ يُدۡرِككُّمُ ٱلۡمَوۡتُ وَلَوۡ كُنتُمۡ فِي بُرُوجٖ مُّشَيَّدَةٖۗ وَإِن تُصِبۡهُمۡ حَسَنَةٞ يَقُولُواْ هَٰذِهِۦ مِنۡ عِندِ ٱللَّهِۖ وَإِن تُصِبۡهُمۡ سَيِّئَةٞ يَقُولُواْ هَٰذِهِۦ مِنۡ عِندِكَۚ قُلۡ كُلّٞ مِّنۡ عِندِ ٱللَّهِۖ فَمَالِ هَـٰٓؤُلَآءِ ٱلۡقَوۡمِ لَا يَكَادُونَ يَفۡقَهُونَ حَدِيثٗا
७८. तुम्ही कोठेही असा, मृत्यु कोणत्याही स्थितीत तुम्हाला येऊन धरील, मग तुम्ही मजबूत अशा किल्ल्यामध्ये असाल तरीही. आणि जर यांना एखादी भलाई प्राप्त होते, तेव्हा म्हणतात, की ही सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे आहे, आणि जर एखादी असफलता पदरी पडते तेव्हा म्हणू लागतात, हे तुमच्यामुळे झाले. त्यांना सांगा, हे सर्व काही अल्लाहतर्फे आहे. यांना झाले तरी काय की एखादी गोष्ट नीट समजूनही घेत नाही
Surah An-Nisa, Verse 78
مَّآ أَصَابَكَ مِنۡ حَسَنَةٖ فَمِنَ ٱللَّهِۖ وَمَآ أَصَابَكَ مِن سَيِّئَةٖ فَمِن نَّفۡسِكَۚ وَأَرۡسَلۡنَٰكَ لِلنَّاسِ رَسُولٗاۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدٗا
७९. तुम्हाला जी काही भलाई लाभते, ती अल्लाहतर्फे आहे आणि जी काही हानि पोहचते ती स्वतः तुमच्याकडून आहे. आम्ही (हे पैगंबर!) तुम्हाला समस्त मानवजातीकरिता रसूल बनवून पाठविले आहे आणि अल्लाह या गोष्टीची साक्ष देण्यास पुरेसा आहे
Surah An-Nisa, Verse 79
مَّن يُطِعِ ٱلرَّسُولَ فَقَدۡ أَطَاعَ ٱللَّهَۖ وَمَن تَوَلَّىٰ فَمَآ أَرۡسَلۡنَٰكَ عَلَيۡهِمۡ حَفِيظٗا
८०. जो कोणी या पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) चे आज्ञापालन करील, त्याने अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो तोंड फिरवील तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही
Surah An-Nisa, Verse 80
وَيَقُولُونَ طَاعَةٞ فَإِذَا بَرَزُواْ مِنۡ عِندِكَ بَيَّتَ طَآئِفَةٞ مِّنۡهُمۡ غَيۡرَ ٱلَّذِي تَقُولُۖ وَٱللَّهُ يَكۡتُبُ مَا يُبَيِّتُونَۖ فَأَعۡرِضۡ عَنۡهُمۡ وَتَوَكَّلۡ عَلَى ٱللَّهِۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِيلًا
८१. आणि हे म्हणतात की आम्ही आज्ञापालन करतो परंतु जेव्हा तुमच्या जवळून उठून बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यातला एक गट, जी गोष्ट तुम्ही किंवा त्याने सांगितली आहे त्याविरूद्ध रात्री सल्लामसलत करतात. त्यांचा रात्रींचा वार्तालाप अल्लाह लिहून घेत आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहवर भरोसा ठेवा. काम बनविण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे
Surah An-Nisa, Verse 81
أَفَلَا يَتَدَبَّرُونَ ٱلۡقُرۡءَانَۚ وَلَوۡ كَانَ مِنۡ عِندِ غَيۡرِ ٱللَّهِ لَوَجَدُواْ فِيهِ ٱخۡتِلَٰفٗا كَثِيرٗا
८२. काय हे लोक कुरआनवर विचार-चिंतन करीत नाही? जर हा ग्रंथ अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणातर्फे असता तर खात्रीने यात अनेक मतभेद आढळले असते
Surah An-Nisa, Verse 82
وَإِذَا جَآءَهُمۡ أَمۡرٞ مِّنَ ٱلۡأَمۡنِ أَوِ ٱلۡخَوۡفِ أَذَاعُواْ بِهِۦۖ وَلَوۡ رَدُّوهُ إِلَى ٱلرَّسُولِ وَإِلَىٰٓ أُوْلِي ٱلۡأَمۡرِ مِنۡهُمۡ لَعَلِمَهُ ٱلَّذِينَ يَسۡتَنۢبِطُونَهُۥ مِنۡهُمۡۗ وَلَوۡلَا فَضۡلُ ٱللَّهِ عَلَيۡكُمۡ وَرَحۡمَتُهُۥ لَٱتَّبَعۡتُمُ ٱلشَّيۡطَٰنَ إِلَّا قَلِيلٗا
८३. आणि जेव्हा त्यांना एखादी खबर शांती या भीतीची पोहोचते, ते लगेच तिचा प्रचार करायला सुरुवात करतात. जर यांनी ती खबर पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्यापर्यंत पोहचविली असती किंवा आपल्यातल्या जबाबदार लोकांच्या कानावर टाकली असती तर तिची जाच-पडताळ करणाऱ्यांनी तिची खरी हकीकत माहिती करून घेतली असती. आणि जर अल्लाहची कृपा आणि त्याची दयादृष्टी तुमच्यावर राहिली नसती तर काही लोकांना सोडून तुम्ही सर्व सैतानाच्या मागे चालणारे बनले असते
Surah An-Nisa, Verse 83
فَقَٰتِلۡ فِي سَبِيلِ ٱللَّهِ لَا تُكَلَّفُ إِلَّا نَفۡسَكَۚ وَحَرِّضِ ٱلۡمُؤۡمِنِينَۖ عَسَى ٱللَّهُ أَن يَكُفَّ بَأۡسَ ٱلَّذِينَ كَفَرُواْۚ وَٱللَّهُ أَشَدُّ بَأۡسٗا وَأَشَدُّ تَنكِيلٗا
८४. तेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात जिहाद करीत राहा. तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच आदेश दिला जात आहे. ईमानधारकांना आकर्षित करीत राहा. फार शक्य आहे की, अल्लाह इन्कारी लोकांचा हल्ला रोखेल आणि अल्लाह मोठा शक्तिशाली आहे आणि शिक्षा देण्यातही फार कठोर आहे
Surah An-Nisa, Verse 84
مَّن يَشۡفَعۡ شَفَٰعَةً حَسَنَةٗ يَكُن لَّهُۥ نَصِيبٞ مِّنۡهَاۖ وَمَن يَشۡفَعۡ شَفَٰعَةٗ سَيِّئَةٗ يَكُن لَّهُۥ كِفۡلٞ مِّنۡهَاۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ مُّقِيتٗا
८५. जो मनुष्य एखादे पुण्य-कार्य आणि सत्कर्म करण्याची शिफारस करेल तर त्यालाही त्याचा काही हिस्सा मिळेल आणि जो दुराचार व दुष्कर्म करण्याची शिफारस करेल, त्याच्यासाठीही त्यात एक हिस्सा आहे, आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो
Surah An-Nisa, Verse 85
وَإِذَا حُيِّيتُم بِتَحِيَّةٖ فَحَيُّواْ بِأَحۡسَنَ مِنۡهَآ أَوۡ رُدُّوهَآۗ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٍ حَسِيبًا
८६. आणि जेव्हा तुम्हाला सलाम केला जाईल तर तुम्ही त्यापेक्षा चांगले प्रत्युत्तर द्या किंवा तेच शब्द परतून बोला. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे
Surah An-Nisa, Verse 86
ٱللَّهُ لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَۚ لَيَجۡمَعَنَّكُمۡ إِلَىٰ يَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ لَا رَيۡبَ فِيهِۗ وَمَنۡ أَصۡدَقُ مِنَ ٱللَّهِ حَدِيثٗا
८७. अल्लाह तो आहे, ज्याच्याशिवाय दुसरा कोणी (सच्चा) उपास्य नाही. तो तुम्हा सर्वांना निश्चितच कयामतच्या दिवशी एकत्र करील, ज्याच्या येण्याबाबत काहीच शंका नाही. अल्लाहपेक्षा जास्त सत्य वचन आणखी कोणाचे असू शकेल
Surah An-Nisa, Verse 87
۞فَمَا لَكُمۡ فِي ٱلۡمُنَٰفِقِينَ فِئَتَيۡنِ وَٱللَّهُ أَرۡكَسَهُم بِمَا كَسَبُوٓاْۚ أَتُرِيدُونَ أَن تَهۡدُواْ مَنۡ أَضَلَّ ٱللَّهُۖ وَمَن يُضۡلِلِ ٱللَّهُ فَلَن تَجِدَ لَهُۥ سَبِيلٗا
८८. तुम्हाला झाले तरी काय की मुनाफिकां (वरकरणी मुसलमानां) बाबत दोन गटांत विभागले जात आहात. त्यांना तर त्यांच्या करतूतींमुळे अल्लाहने तोंडघशी पाडले आहे. आता काय तुम्ही हे इच्छिता की त्याला मार्ग दाखवावा ज्याला अल्लाहने मार्गभ्रष्ट केले आहे? तेव्हा ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याच्यासाठी तुम्हाला कधीही, कोणताही मार्ग दिसून येणार नाही
Surah An-Nisa, Verse 88
وَدُّواْ لَوۡ تَكۡفُرُونَ كَمَا كَفَرُواْ فَتَكُونُونَ سَوَآءٗۖ فَلَا تَتَّخِذُواْ مِنۡهُمۡ أَوۡلِيَآءَ حَتَّىٰ يُهَاجِرُواْ فِي سَبِيلِ ٱللَّهِۚ فَإِن تَوَلَّوۡاْ فَخُذُوهُمۡ وَٱقۡتُلُوهُمۡ حَيۡثُ وَجَدتُّمُوهُمۡۖ وَلَا تَتَّخِذُواْ مِنۡهُمۡ وَلِيّٗا وَلَا نَصِيرًا
८९. यांना तर मनापासून वाटते की, जसे ते काफिर आहेत तसे तुम्हीही त्यांच्यासारखे ईमानाचा इन्कार करू लागावे आणि तुम्ही सर्व एकसमान व्हावे, यास्तव त्यांच्यापैकी कोणाला आपला खराखुरा मित्र बनवू नका, जोपर्यंत ते अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश-त्याग) करीत नाहीत. मग जर (यापासून) तोंड फिरवतील तर त्यांना धरा आणि ठार करा, जिथेदेखील आढळतील. खबरदार! त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र आणि सहाय्यक समजून घेऊ नका
Surah An-Nisa, Verse 89
إِلَّا ٱلَّذِينَ يَصِلُونَ إِلَىٰ قَوۡمِۭ بَيۡنَكُمۡ وَبَيۡنَهُم مِّيثَٰقٌ أَوۡ جَآءُوكُمۡ حَصِرَتۡ صُدُورُهُمۡ أَن يُقَٰتِلُوكُمۡ أَوۡ يُقَٰتِلُواْ قَوۡمَهُمۡۚ وَلَوۡ شَآءَ ٱللَّهُ لَسَلَّطَهُمۡ عَلَيۡكُمۡ فَلَقَٰتَلُوكُمۡۚ فَإِنِ ٱعۡتَزَلُوكُمۡ فَلَمۡ يُقَٰتِلُوكُمۡ وَأَلۡقَوۡاْ إِلَيۡكُمُ ٱلسَّلَمَ فَمَا جَعَلَ ٱللَّهُ لَكُمۡ عَلَيۡهِمۡ سَبِيلٗا
९०. परंतु जे त्या लोकांशी नाते राखतात, ज्यांच्या आणि तुमच्या दरम्यान समझोता झालेला असेल किंवा ते लोक जे तुमच्या जवळ येतात, ज्यांची मने संकुचित झाली आहेत की तुमच्याशी लढावे की आपल्या लोकांशी लढावे. अल्लाहने इच्छिले असते तर यांना तुमच्यावर वर्चस्व प्रदान केले असते आणि ते अवश्य तुमच्याशी लढले असते. तेव्हा जर असे लोक तुमच्यापासून दूर राहतील आणि लढाई न करतील आणि तुमच्याकडे संधी-समझोत्याचा प्रस्ताव मांडतील तर (अशा स्थितीत) अल्लाहने तुमच्यासाठी, त्यांच्याविरूद्ध लढाईचा कोणताही मार्ग ठेवला नाही
Surah An-Nisa, Verse 90
سَتَجِدُونَ ءَاخَرِينَ يُرِيدُونَ أَن يَأۡمَنُوكُمۡ وَيَأۡمَنُواْ قَوۡمَهُمۡ كُلَّ مَا رُدُّوٓاْ إِلَى ٱلۡفِتۡنَةِ أُرۡكِسُواْ فِيهَاۚ فَإِن لَّمۡ يَعۡتَزِلُوكُمۡ وَيُلۡقُوٓاْ إِلَيۡكُمُ ٱلسَّلَمَ وَيَكُفُّوٓاْ أَيۡدِيَهُمۡ فَخُذُوهُمۡ وَٱقۡتُلُوهُمۡ حَيۡثُ ثَقِفۡتُمُوهُمۡۚ وَأُوْلَـٰٓئِكُمۡ جَعَلۡنَا لَكُمۡ عَلَيۡهِمۡ سُلۡطَٰنٗا مُّبِينٗا
९१. तुम्हाला दुसरे काही असेही लोक आढळतील, जे तुमच्यापासून आणि आपल्या जमातीच्या लोकांपासून सुरक्षित राहू इच्छितात, परंतु जेव्हा उपद्रवाकडे त्यांना वळविले जाते तर त्यात तोंडघशी पडतात. जर ते तुमच्यापासून हटले नाहीत आणि तुमच्याशी समझोता न करतील आणि आपले हात न रोखतील तर ते जिथे सापडतील तिथे त्यांना धरा आणि ठार करा. हेच ते लोक आहेत, ज्यांच्याबाबत आम्ही तुम्हाला खुले प्रमाण दिले आहे
Surah An-Nisa, Verse 91
وَمَا كَانَ لِمُؤۡمِنٍ أَن يَقۡتُلَ مُؤۡمِنًا إِلَّا خَطَـٔٗاۚ وَمَن قَتَلَ مُؤۡمِنًا خَطَـٔٗا فَتَحۡرِيرُ رَقَبَةٖ مُّؤۡمِنَةٖ وَدِيَةٞ مُّسَلَّمَةٌ إِلَىٰٓ أَهۡلِهِۦٓ إِلَّآ أَن يَصَّدَّقُواْۚ فَإِن كَانَ مِن قَوۡمٍ عَدُوّٖ لَّكُمۡ وَهُوَ مُؤۡمِنٞ فَتَحۡرِيرُ رَقَبَةٖ مُّؤۡمِنَةٖۖ وَإِن كَانَ مِن قَوۡمِۭ بَيۡنَكُمۡ وَبَيۡنَهُم مِّيثَٰقٞ فَدِيَةٞ مُّسَلَّمَةٌ إِلَىٰٓ أَهۡلِهِۦ وَتَحۡرِيرُ رَقَبَةٖ مُّؤۡمِنَةٖۖ فَمَن لَّمۡ يَجِدۡ فَصِيَامُ شَهۡرَيۡنِ مُتَتَابِعَيۡنِ تَوۡبَةٗ مِّنَ ٱللَّهِۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمٗا
९२. कोणत्याही ईमानधारकाकरिता हे उचित नाही की त्याने एखाद्या ईमानधारकाची हत्या करावी. परंतु अजाणतेपणी तसे झाल्यास गोष्ट वेगळी. आणि जो मनुष्य एखाद्या ईमानधारकाची चुकीने हत्या करील तर त्याबद्दल त्याला एक ईमानधारक गुलाम (किंवा दासी) मुक्त करणे आणि मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना रक्ताची किंमत देणे आवश्यक आहे. परंतु त्याने माफ केले तर गोष्ट वेगळी. आणि ज्याची हत्या केली गेली तो मनुष्य जर तुमच्या शत्रू जमातीचा, पण मुस्लिम असेल तर एक मुस्लिम गुलाम मुक्त करणे आवश्यक आहे आणि जर ठार केली गेलेली व्यक्ती त्या जमातीची आहे ज्याच्या आणि तुमच्या (ईमानधारकांच्या) दरम्यान समझोता आहे तर रक्ताची किंमत त्याच्या नातेवाईकांना द्यावी लागेल, तसेच एक ईमानधारक (मुस्लिम) गुलामही मुक्त करावा लागेल आणि ज्याला तसा न आढळेल, त्याला दोन महिने सतत रोजे ठावावे लागतील अल्लाहकडून माफ करून घेण्यासाठी आणि अल्लाह जाणणारा व हिकमत बाळगणारा आहे
Surah An-Nisa, Verse 92
وَمَن يَقۡتُلۡ مُؤۡمِنٗا مُّتَعَمِّدٗا فَجَزَآؤُهُۥ جَهَنَّمُ خَٰلِدٗا فِيهَا وَغَضِبَ ٱللَّهُ عَلَيۡهِ وَلَعَنَهُۥ وَأَعَدَّ لَهُۥ عَذَابًا عَظِيمٗا
९३. आणि जो कोणी एखाद्या ईमानधारकाला जाणूनबुजून ठार करील, तर त्याची शिक्षा जहन्नम आहे, ज्यात तो नेहमीकरिता राहील, त्याच्यावर अल्लाहचा प्रकोप आहे. अल्लाहने त्याचा धिःक्कार केला आहे आणि त्याच्यासाठी फार मोठी सजा-यातना तयार करून ठेवली आहे
Surah An-Nisa, Verse 93
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ إِذَا ضَرَبۡتُمۡ فِي سَبِيلِ ٱللَّهِ فَتَبَيَّنُواْ وَلَا تَقُولُواْ لِمَنۡ أَلۡقَىٰٓ إِلَيۡكُمُ ٱلسَّلَٰمَ لَسۡتَ مُؤۡمِنٗا تَبۡتَغُونَ عَرَضَ ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَا فَعِندَ ٱللَّهِ مَغَانِمُ كَثِيرَةٞۚ كَذَٰلِكَ كُنتُم مِّن قَبۡلُ فَمَنَّ ٱللَّهُ عَلَيۡكُمۡ فَتَبَيَّنُوٓاْۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرٗا
९४. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही अल्लाहच्या मार्गात निघाल, तेव्हा नीट जाच-पडताळ करून घेत जा आणि जो तुम्हाला सलाम करून बोलेल त्याला तुम्ही असेही म्हणू नका की तू ईमानधारक नाहीस. तुम्ही ऐहिक जीवनाच्या सुख-साधनांच्या शोधात आहात, तेव्हा अल्लाहजवळ विपुल सुख-साधने आहेत. पूर्वी तुम्हीसुद्धा असेच होते, मग अल्लाहने तुमच्यावर अनुग्रह (उपकार) केला. यास्तव तुम्ही नीट छान-बिन (चौकशी) करून घेत जा. निःसंशय अल्लाह तुमच्या कर्मांना चांगल्या प्रकारे जाणतो
Surah An-Nisa, Verse 94
لَّا يَسۡتَوِي ٱلۡقَٰعِدُونَ مِنَ ٱلۡمُؤۡمِنِينَ غَيۡرُ أُوْلِي ٱلضَّرَرِ وَٱلۡمُجَٰهِدُونَ فِي سَبِيلِ ٱللَّهِ بِأَمۡوَٰلِهِمۡ وَأَنفُسِهِمۡۚ فَضَّلَ ٱللَّهُ ٱلۡمُجَٰهِدِينَ بِأَمۡوَٰلِهِمۡ وَأَنفُسِهِمۡ عَلَى ٱلۡقَٰعِدِينَ دَرَجَةٗۚ وَكُلّٗا وَعَدَ ٱللَّهُ ٱلۡحُسۡنَىٰۚ وَفَضَّلَ ٱللَّهُ ٱلۡمُجَٰهِدِينَ عَلَى ٱلۡقَٰعِدِينَ أَجۡرًا عَظِيمٗا
९५. जे ईमानधारक अकारण स्वस्थ बसून राहतील आणि जे अल्लाहच्या मार्गात आपल्या प्राणाने व धनाने जिहाद करत असतील तर दोघे समान ठरणार नाहीत. अल्लाहने त्यांना, जे आपले प्राण आणि धन लावून जिहाद करतात, स्वस्थ बसून राहणाऱ्यांवर दर्जाच्या दृष्टीने श्रेष्ठता प्रदान केली आहे. आणि तसे पाहता नेक मोबदल्याचा वायदा तर प्रत्येकाला दिला आहे. तथापि अल्लाहने जिहाद करणाऱ्यांना, स्वस्थ बसून राहणाऱ्यांवर महान मोबदल्याची श्रेष्ठता प्रदान केली आहे
Surah An-Nisa, Verse 95
دَرَجَٰتٖ مِّنۡهُ وَمَغۡفِرَةٗ وَرَحۡمَةٗۚ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورٗا رَّحِيمًا
९६. आपल्यातर्फे दर्जाचीही, माफीचीही आणि दया-कृपेचीही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 96
إِنَّ ٱلَّذِينَ تَوَفَّىٰهُمُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ ظَالِمِيٓ أَنفُسِهِمۡ قَالُواْ فِيمَ كُنتُمۡۖ قَالُواْ كُنَّا مُسۡتَضۡعَفِينَ فِي ٱلۡأَرۡضِۚ قَالُوٓاْ أَلَمۡ تَكُنۡ أَرۡضُ ٱللَّهِ وَٰسِعَةٗ فَتُهَاجِرُواْ فِيهَاۚ فَأُوْلَـٰٓئِكَ مَأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُۖ وَسَآءَتۡ مَصِيرًا
९७. जे लोक स्वतःवर अत्याचार करतात, जेव्हा फरिश्ते त्यांचे प्राण ताब्यात घेतात तेव्हा म्हणतात की तुम्ही कोणत्या अवस्थेत होते? ते म्हणतात, आम्ही धरतीवर कमजोर होतो. तेव्हा फरिश्ते विचारतात, काय अल्लाहची जमीन विशाल, व्यापक नव्हती की तुम्ही तिच्यात स्थलांतर केले असते. अशाच लोकांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे
Surah An-Nisa, Verse 97
إِلَّا ٱلۡمُسۡتَضۡعَفِينَ مِنَ ٱلرِّجَالِ وَٱلنِّسَآءِ وَٱلۡوِلۡدَٰنِ لَا يَسۡتَطِيعُونَ حِيلَةٗ وَلَا يَهۡتَدُونَ سَبِيلٗا
९८. परंतु जे पुरुष, ज्या स्त्रिया आणि लहान मुले लाचार-विवश आहेत, जे कसलीही उपाययोजना करू शकत नाहीत आणि ना मार्ग जाणतात
Surah An-Nisa, Verse 98
فَأُوْلَـٰٓئِكَ عَسَى ٱللَّهُ أَن يَعۡفُوَ عَنۡهُمۡۚ وَكَانَ ٱللَّهُ عَفُوًّا غَفُورٗا
९९. तेव्हा फार शक्य आहे की अल्लाह त्यांना माफ करील आणि अल्लाह मोठा माफ करणारा, क्षमाशील आहे
Surah An-Nisa, Verse 99
۞وَمَن يُهَاجِرۡ فِي سَبِيلِ ٱللَّهِ يَجِدۡ فِي ٱلۡأَرۡضِ مُرَٰغَمٗا كَثِيرٗا وَسَعَةٗۚ وَمَن يَخۡرُجۡ مِنۢ بَيۡتِهِۦ مُهَاجِرًا إِلَى ٱللَّهِ وَرَسُولِهِۦ ثُمَّ يُدۡرِكۡهُ ٱلۡمَوۡتُ فَقَدۡ وَقَعَ أَجۡرُهُۥ عَلَى ٱللَّهِۗ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورٗا رَّحِيمٗا
१००. आणि जो कोणी अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश-त्याग) करील, तर त्याला धरतीवर निवासाकरिता खूप विस्तृत जागा मिळेल आणि खूप समृद्धीही. आणि जो आपल्या घरापासून अल्लाह आणि त्याच्या पैगंबराकडे हिजरत करील, मग त्याला मृत्युने येऊन गाठावे, तरीदेखील त्याचा मोबदला अल्लाहजवळ निश्चित आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दयावान आहे
Surah An-Nisa, Verse 100
وَإِذَا ضَرَبۡتُمۡ فِي ٱلۡأَرۡضِ فَلَيۡسَ عَلَيۡكُمۡ جُنَاحٌ أَن تَقۡصُرُواْ مِنَ ٱلصَّلَوٰةِ إِنۡ خِفۡتُمۡ أَن يَفۡتِنَكُمُ ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْۚ إِنَّ ٱلۡكَٰفِرِينَ كَانُواْ لَكُمۡ عَدُوّٗا مُّبِينٗا
१०१. आणि जेव्हा जमिनीवर प्रवास करीत असाल तेव्हा नमाज कस्र करण्यात (चार रकअतची नमाज दोन रकअत पढण्यात) तुमच्यावर काही गुन्हा नाही, जर तुम्हाला हे भय असेल की काफिर (श्रद्धाहीन) तुम्हाला त्रास देतील. निःसंशय काफिर लोक तुमचे खुले वैरी आहेत
Surah An-Nisa, Verse 101
وَإِذَا كُنتَ فِيهِمۡ فَأَقَمۡتَ لَهُمُ ٱلصَّلَوٰةَ فَلۡتَقُمۡ طَآئِفَةٞ مِّنۡهُم مَّعَكَ وَلۡيَأۡخُذُوٓاْ أَسۡلِحَتَهُمۡۖ فَإِذَا سَجَدُواْ فَلۡيَكُونُواْ مِن وَرَآئِكُمۡ وَلۡتَأۡتِ طَآئِفَةٌ أُخۡرَىٰ لَمۡ يُصَلُّواْ فَلۡيُصَلُّواْ مَعَكَ وَلۡيَأۡخُذُواْ حِذۡرَهُمۡ وَأَسۡلِحَتَهُمۡۗ وَدَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَوۡ تَغۡفُلُونَ عَنۡ أَسۡلِحَتِكُمۡ وَأَمۡتِعَتِكُمۡ فَيَمِيلُونَ عَلَيۡكُم مَّيۡلَةٗ وَٰحِدَةٗۚ وَلَا جُنَاحَ عَلَيۡكُمۡ إِن كَانَ بِكُمۡ أَذٗى مِّن مَّطَرٍ أَوۡ كُنتُم مَّرۡضَىٰٓ أَن تَضَعُوٓاْ أَسۡلِحَتَكُمۡۖ وَخُذُواْ حِذۡرَكُمۡۗ إِنَّ ٱللَّهَ أَعَدَّ لِلۡكَٰفِرِينَ عَذَابٗا مُّهِينٗا
१०२. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या दरम्यान असाल आणि त्यांच्यासाठी नमाज कायम कराल, तेव्हा त्यांच्यातला एक गट तुमच्यासोबत शस्त्रानिशी सज्ज उभा राहिला पाहिजे, मग जेव्हा हे सजदा करून घेतील, तेव्हा यांनी तेथून हटावे, व तुमच्या पाठीमागे यावे आणि मग दुसरा गट, ज्याने अद्याप नमाज अदा केली नाही त्याने (पुढे) यावे आणि तुमच्यासोबत नमाज अदा करावी आणि आपला बचाव आणि आपली हत्यारे सोबत बाळगावित. काफिर तर इच्छितात की तुम्ही कसेही करून आपल्या हत्यारांपासून व आपल्या सामुग्रीपासून गाफील व्हावे तर मग त्यांनी अचाानक तुमच्यावर हल्ला करावा, मात्र जेव्हा तुम्हाला काही त्रास-यातना असेल किंवा जोरदार पाऊस अथवा आजारपणामुळे आपली हत्यारे उतरवून ठेवाल तर अशा वेळी तुमच्यावर काही गुन्हा नाही. आणि आपल्या बचावाची सामुग्री सोबत राखत जा. निःसंशय अल्लाहने इन्कार करणाऱ्यांसाठी अपमानदायक शिक्षा तयार करून ठेवली आहे
Surah An-Nisa, Verse 102
فَإِذَا قَضَيۡتُمُ ٱلصَّلَوٰةَ فَٱذۡكُرُواْ ٱللَّهَ قِيَٰمٗا وَقُعُودٗا وَعَلَىٰ جُنُوبِكُمۡۚ فَإِذَا ٱطۡمَأۡنَنتُمۡ فَأَقِيمُواْ ٱلصَّلَوٰةَۚ إِنَّ ٱلصَّلَوٰةَ كَانَتۡ عَلَى ٱلۡمُؤۡمِنِينَ كِتَٰبٗا مَّوۡقُوتٗا
१०३. मग जेव्हा तुम्ही नमाज पढून घ्याल जेव्हा उठता बसता आणि पहुडलेल्या स्थितीत अल्लाहचे स्मरण करीत राहा आणि शांतीपूर्ण स्थिती असेल तर नमाज कायम करा. निःसंशय, नमाज ईमानधारकांवर निश्चित आणि निर्धारीत वेळेवर अदा करणे फर्ज (अनिवार्य) केले गेले आहे
Surah An-Nisa, Verse 103
وَلَا تَهِنُواْ فِي ٱبۡتِغَآءِ ٱلۡقَوۡمِۖ إِن تَكُونُواْ تَأۡلَمُونَ فَإِنَّهُمۡ يَأۡلَمُونَ كَمَا تَأۡلَمُونَۖ وَتَرۡجُونَ مِنَ ٱللَّهِ مَا لَا يَرۡجُونَۗ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمًا
१०४. आणि त्या लोकांचा पाठलाग करण्यात आळस करू नका. जर तुम्हाला त्रास-यातना होत आहे तर त्यांनाही त्रास-यातना होते, जशी तुम्हाला होते, आणि तुम्ही अल्लाहकडून त्या आशा-अपेक्षा बाळगता, ज्या ते बाळगत नाहीत, आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 104
إِنَّآ أَنزَلۡنَآ إِلَيۡكَ ٱلۡكِتَٰبَ بِٱلۡحَقِّ لِتَحۡكُمَ بَيۡنَ ٱلنَّاسِ بِمَآ أَرَىٰكَ ٱللَّهُۚ وَلَا تَكُن لِّلۡخَآئِنِينَ خَصِيمٗا
१०५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे सत्यासह ग्रंथ अवतरीत केला आहे, यासाठी की तुम्ही लोकांच्या दरम्यान त्याला अनुसरून न्याय-निवाडा करावा, ज्याबाबत अल्लाहने तुम्हाला अवगत केले आणि अपहार करणाऱ्यांचे समर्थक बनू नका
Surah An-Nisa, Verse 105
وَٱسۡتَغۡفِرِ ٱللَّهَۖ إِنَّ ٱللَّهَ كَانَ غَفُورٗا رَّحِيمٗا
१०६. आणि अल्लाहजवळ क्षमा-याचना करीत राहा. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 106
وَلَا تُجَٰدِلۡ عَنِ ٱلَّذِينَ يَخۡتَانُونَ أَنفُسَهُمۡۚ إِنَّ ٱللَّهَ لَا يُحِبُّ مَن كَانَ خَوَّانًا أَثِيمٗا
१०७. आणि अशा लोकांशी बाजू घेऊन भांडू नका जे स्वतः आपलाच विश्वासघात करतात. निःसंशय, धोकेबाज विश्वासघातकीशी अल्लाह प्रेम राखत नाही
Surah An-Nisa, Verse 107
يَسۡتَخۡفُونَ مِنَ ٱلنَّاسِ وَلَا يَسۡتَخۡفُونَ مِنَ ٱللَّهِ وَهُوَ مَعَهُمۡ إِذۡ يُبَيِّتُونَ مَا لَا يَرۡضَىٰ مِنَ ٱلۡقَوۡلِۚ وَكَانَ ٱللَّهُ بِمَا يَعۡمَلُونَ مُحِيطًا
१०८. ते लोकांपासून तर लपतात, परंतु अल्लाहपासून लपू शकत नाही. तो त्यांच्यासोबत आहे जेव्हा ते रात्री अप्रिय गोष्टींच्या योजना आखतात आणि अल्लाहने त्यांच्या कारवायांना घेरा टाकलेला आहे
Surah An-Nisa, Verse 108
هَـٰٓأَنتُمۡ هَـٰٓؤُلَآءِ جَٰدَلۡتُمۡ عَنۡهُمۡ فِي ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَا فَمَن يُجَٰدِلُ ٱللَّهَ عَنۡهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ أَم مَّن يَكُونُ عَلَيۡهِمۡ وَكِيلٗا
१०९. हे तुम्ही आहात की त्यांच्या हक्कात या जगात वाद घालता, परंतु कयामतच्या दिवशी त्यांच्यातर्फे कोण हुज्जत घालील आणि कोण त्यांचा समर्थक बनून उभा राहील
Surah An-Nisa, Verse 109
وَمَن يَعۡمَلۡ سُوٓءًا أَوۡ يَظۡلِمۡ نَفۡسَهُۥ ثُمَّ يَسۡتَغۡفِرِ ٱللَّهَ يَجِدِ ٱللَّهَ غَفُورٗا رَّحِيمٗا
११०. आणि जो कोणी वाईट कर्म करील किंवा स्वतः आपल्यावर अत्याचार करील, नंतर अल्लाहजवळ माफी मागील तर त्याला अल्लाह माफ करणारा, दया करणारा आढळून येईल
Surah An-Nisa, Verse 110
وَمَن يَكۡسِبۡ إِثۡمٗا فَإِنَّمَا يَكۡسِبُهُۥ عَلَىٰ نَفۡسِهِۦۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمٗا
१११. आणि जो गुन्हा करतो, तर त्या गुन्ह्याचे ओझे त्याच्याच (शिरा) वर आहे आणि अल्लाह सर्व काही जाणणारा, हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 111
وَمَن يَكۡسِبۡ خَطِيٓـَٔةً أَوۡ إِثۡمٗا ثُمَّ يَرۡمِ بِهِۦ بَرِيٓـٔٗا فَقَدِ ٱحۡتَمَلَ بُهۡتَٰنٗا وَإِثۡمٗا مُّبِينٗا
११२. आणि जो कोणी दुष्कर्म करतो, मग एखाद्या निरपराधीवर त्याचा आरोप ठेवतो, तर त्याने मोठे कुभांड(मोेठा आळ घेतला) रचले आणि फार मोठा गुन्हा केला
Surah An-Nisa, Verse 112
وَلَوۡلَا فَضۡلُ ٱللَّهِ عَلَيۡكَ وَرَحۡمَتُهُۥ لَهَمَّت طَّآئِفَةٞ مِّنۡهُمۡ أَن يُضِلُّوكَ وَمَا يُضِلُّونَ إِلَّآ أَنفُسَهُمۡۖ وَمَا يَضُرُّونَكَ مِن شَيۡءٖۚ وَأَنزَلَ ٱللَّهُ عَلَيۡكَ ٱلۡكِتَٰبَ وَٱلۡحِكۡمَةَ وَعَلَّمَكَ مَا لَمۡ تَكُن تَعۡلَمُۚ وَكَانَ فَضۡلُ ٱللَّهِ عَلَيۡكَ عَظِيمٗا
११३. आणि जर तुमच्यावर अल्लाहची दया-कृपा राहिली नसती, तर त्यांच्या एका गटाने तुम्हाला मार्गभ्रष्ट करण्याचे कारस्थान रचले होते, परंतु ते स्वतःलाच मार्गभ्रष्ट करतात आणि ते तुम्हाला काहीच नुकसान पोहचवू शकत नाही आणि अल्लाहने तुमच्यावर ग्रंथ आणि ज्ञान उतरविले आहे आणि तुम्ही जे जाणत नव्हते ते ज्ञान प्रदान केले आहे आणि तुमच्यावर अल्लाहची फार मोठी कृपा आहे
Surah An-Nisa, Verse 113
۞لَّا خَيۡرَ فِي كَثِيرٖ مِّن نَّجۡوَىٰهُمۡ إِلَّا مَنۡ أَمَرَ بِصَدَقَةٍ أَوۡ مَعۡرُوفٍ أَوۡ إِصۡلَٰحِۭ بَيۡنَ ٱلنَّاسِۚ وَمَن يَفۡعَلۡ ذَٰلِكَ ٱبۡتِغَآءَ مَرۡضَاتِ ٱللَّهِ فَسَوۡفَ نُؤۡتِيهِ أَجۡرًا عَظِيمٗا
११४. त्यांच्या बहुतेक गुप्त काानगोष्टींमध्ये कसलीही भलाई नाही. परंतु ज्याने उपकार, नेकी किंवा लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी आदेश दिला आणि जो हे कार्य अल्लाहची मर्जी (प्रसन्नता) प्राप्त करण्यासाठी करेल, आम्ही खरोखर त्याला फार मोठा मोबदला प्रदान करू
Surah An-Nisa, Verse 114
وَمَن يُشَاقِقِ ٱلرَّسُولَ مِنۢ بَعۡدِ مَا تَبَيَّنَ لَهُ ٱلۡهُدَىٰ وَيَتَّبِعۡ غَيۡرَ سَبِيلِ ٱلۡمُؤۡمِنِينَ نُوَلِّهِۦ مَا تَوَلَّىٰ وَنُصۡلِهِۦ جَهَنَّمَۖ وَسَآءَتۡ مَصِيرًا
११५. आणि जो कोणी, सरळ व सत्य मार्ग स्पष्ट झाल्यानंतर पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा विरोध करील आणि ईमानधारकांच्या मार्गाशिवाय अन्य मार्गावर चालेल तर आम्ही त्याला त्याच दिशेने, जिकडे तो फिरत असेल, वळवून टाकू, मग त्याला आम्ही जहन्नममध्ये फेकून देऊ आणि ते मोठे वाईट स्थान आहे
Surah An-Nisa, Verse 115
إِنَّ ٱللَّهَ لَا يَغۡفِرُ أَن يُشۡرَكَ بِهِۦ وَيَغۡفِرُ مَا دُونَ ذَٰلِكَ لِمَن يَشَآءُۚ وَمَن يُشۡرِكۡ بِٱللَّهِ فَقَدۡ ضَلَّ ضَلَٰلَۢا بَعِيدًا
११६. अल्लाह, आपल्यासह दुसऱ्या कोणाला सहभागी केले जाणे कदापि माफ करणार नाही आणि याखेरीज इतर अपराधांना, तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याने अल्लाहसह अन्य कोणाला सहभागी ठरविले तो (सन्मार्गापासून) फार दूर बहकत गेला
Surah An-Nisa, Verse 116
إِن يَدۡعُونَ مِن دُونِهِۦٓ إِلَّآ إِنَٰثٗا وَإِن يَدۡعُونَ إِلَّا شَيۡطَٰنٗا مَّرِيدٗا
११७. हे तर अल्लाहला सोडून केवळ देवींना पुकारतात आणि वस्तुतः हे धिःक्कारलेल्या दुष्ट सैतानाला पुकारतात
Surah An-Nisa, Verse 117
لَّعَنَهُ ٱللَّهُۘ وَقَالَ لَأَتَّخِذَنَّ مِنۡ عِبَادِكَ نَصِيبٗا مَّفۡرُوضٗا
११८. ज्याचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि त्याने (सैतानाने) म्हटले आहे की मी तुझ्या दासांमधून आपला ठराविक हिस्सा निश्चित घेईन
Surah An-Nisa, Verse 118
وَلَأُضِلَّنَّهُمۡ وَلَأُمَنِّيَنَّهُمۡ وَلَأٓمُرَنَّهُمۡ فَلَيُبَتِّكُنَّ ءَاذَانَ ٱلۡأَنۡعَٰمِ وَلَأٓمُرَنَّهُمۡ فَلَيُغَيِّرُنَّ خَلۡقَ ٱللَّهِۚ وَمَن يَتَّخِذِ ٱلشَّيۡطَٰنَ وَلِيّٗا مِّن دُونِ ٱللَّهِ فَقَدۡ خَسِرَ خُسۡرَانٗا مُّبِينٗا
११९. आणि त्यांना सरळ मार्गापासून भटकवित राहीन आणि त्यांना खोट्या आशा देत राहील आणि त्यांना शिकवण देईन की जनावरांचे कान चिरा आणि त्यांना सांगेन की अल्लाहने बनविलेले स्वरूप विकृत करा. ऐका! जो, अल्लाहला सोडून सैतानाला आपला मित्र बनवील तर तो उघड अशा तोट्यात राहील
Surah An-Nisa, Verse 119
يَعِدُهُمۡ وَيُمَنِّيهِمۡۖ وَمَا يَعِدُهُمُ ٱلشَّيۡطَٰنُ إِلَّا غُرُورًا
१२०. तो त्यांच्याशी तोंडी वायदे करत राहील आणि त्यांना भ्रमाच्या हिरव्या बागा दाखवित राहील (परंतु लक्षात ठेवा) सैतानाने त्यांच्याशी केलेले वायदे पूर्णपणे धोका आहे (मृगजळ) आहे
Surah An-Nisa, Verse 120
أُوْلَـٰٓئِكَ مَأۡوَىٰهُمۡ جَهَنَّمُ وَلَا يَجِدُونَ عَنۡهَا مَحِيصٗا
१२१. हेच ते लोक आहेत, ज्यांचे ठिकाण जहन्नम आहे. जिथून त्यांना कदापि सुटका मिळणार नाही
Surah An-Nisa, Verse 121
وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ سَنُدۡخِلُهُمۡ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ خَٰلِدِينَ فِيهَآ أَبَدٗاۖ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٗاۚ وَمَنۡ أَصۡدَقُ مِنَ ٱللَّهِ قِيلٗا
१२२. आणि ज्या लोकांनी ईमान राखले, आणि सत्कर्म केले आम्ही त्यांना त्या जन्नतीमध्ये दाखल करू, ज्यांच्या खाली नहरी (प्रवाह) वाहत आहेत. जिथे ते नेहमी नेहमी राहतील. हा अल्लाहचा वायदा आहे जो निःसंशय खरा आहे. आणि अल्लाहपेक्षा, आपल्या कथनात सच्चा आणखी कोण असू शकतो
Surah An-Nisa, Verse 122
لَّيۡسَ بِأَمَانِيِّكُمۡ وَلَآ أَمَانِيِّ أَهۡلِ ٱلۡكِتَٰبِۗ مَن يَعۡمَلۡ سُوٓءٗا يُجۡزَ بِهِۦ وَلَا يَجِدۡ لَهُۥ مِن دُونِ ٱللَّهِ وَلِيّٗا وَلَا نَصِيرٗا
१२३. तुमच्या इच्छा-आकांक्षांनी आणि ग्रंथधारकांच्या इच्छा-आकांक्षांनी काहीही होणार नाही. जो वाईट कर्म करील, त्याची शिक्षा तो प्राप्त करील आणि त्याला अल्लाहखेरीज आपला कोणी मित्र आणि मदत करणारा आढळणार नाही
Surah An-Nisa, Verse 123
وَمَن يَعۡمَلۡ مِنَ ٱلصَّـٰلِحَٰتِ مِن ذَكَرٍ أَوۡ أُنثَىٰ وَهُوَ مُؤۡمِنٞ فَأُوْلَـٰٓئِكَ يَدۡخُلُونَ ٱلۡجَنَّةَ وَلَا يُظۡلَمُونَ نَقِيرٗا
१२४. आणि जो ईमानधारक असेल, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो नेक आचरण करील, निःसंशय असे लोक जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिळाइतकाही त्याचा हक्क मारला जाणार नाही
Surah An-Nisa, Verse 124
وَمَنۡ أَحۡسَنُ دِينٗا مِّمَّنۡ أَسۡلَمَ وَجۡهَهُۥ لِلَّهِ وَهُوَ مُحۡسِنٞ وَٱتَّبَعَ مِلَّةَ إِبۡرَٰهِيمَ حَنِيفٗاۗ وَٱتَّخَذَ ٱللَّهُ إِبۡرَٰهِيمَ خَلِيلٗا
१२५. आणि दीन-धर्म संदर्भात त्याहून चांगला कोण असू शकतो, जो अल्लाहकरिता पूर्णतः आत्मसमर्पण करील आणि तो नेक-सदाचारीही असेल आणि इब्राहीमच्या दीन-धर्माचे अनुसरण केलेला असेल जे एकाग्र होते आणि इब्राहीमला अल्लाहने आपला मित्र बनविले आहे
Surah An-Nisa, Verse 125
وَلِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۚ وَكَانَ ٱللَّهُ بِكُلِّ شَيۡءٖ مُّحِيطٗا
१२६. आणि जे काही आकाशांमध्ये, आणि जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाहने प्रत्येक चीज-वस्तूला आपल्या घेऱ्यात घेतले आहे
Surah An-Nisa, Verse 126
وَيَسۡتَفۡتُونَكَ فِي ٱلنِّسَآءِۖ قُلِ ٱللَّهُ يُفۡتِيكُمۡ فِيهِنَّ وَمَا يُتۡلَىٰ عَلَيۡكُمۡ فِي ٱلۡكِتَٰبِ فِي يَتَٰمَى ٱلنِّسَآءِ ٱلَّـٰتِي لَا تُؤۡتُونَهُنَّ مَا كُتِبَ لَهُنَّ وَتَرۡغَبُونَ أَن تَنكِحُوهُنَّ وَٱلۡمُسۡتَضۡعَفِينَ مِنَ ٱلۡوِلۡدَٰنِ وَأَن تَقُومُواْ لِلۡيَتَٰمَىٰ بِٱلۡقِسۡطِۚ وَمَا تَفۡعَلُواْ مِنۡ خَيۡرٖ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ بِهِۦ عَلِيمٗا
१२७. ते लोक स्त्रियांबाबत तुम्हाला विचारतात. तुम्ही त्यांना सांगा की स्वतः अल्लाह तुम्हाला त्यांच्याविषयी आदेश देतो आणि जे काही ग्रंथात (कुरआनात) तुमच्यासमोर वाचले जाते, त्या अनाथ स्त्रियां (मुलीं) विषयी, ज्यांना तुम्ही त्यांचा अनिवार्य हक्क देत नाही आणि त्यांच्याशी विवाह करू इच्छिता आणि कमजोर मुलांविषयी आणि हे की तुम्ही अनाथांबाबत न्याय करा आणि तुम्ही जेदेखील सत्कर्म कराल अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणणारा आहे
Surah An-Nisa, Verse 127
وَإِنِ ٱمۡرَأَةٌ خَافَتۡ مِنۢ بَعۡلِهَا نُشُوزًا أَوۡ إِعۡرَاضٗا فَلَا جُنَاحَ عَلَيۡهِمَآ أَن يُصۡلِحَا بَيۡنَهُمَا صُلۡحٗاۚ وَٱلصُّلۡحُ خَيۡرٞۗ وَأُحۡضِرَتِ ٱلۡأَنفُسُ ٱلشُّحَّۚ وَإِن تُحۡسِنُواْ وَتَتَّقُواْ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرٗا
१२८. आणि जर एखाद्या पत्नीला आपल्या पतीकडून उपेक्षा आणि दुर्लक्ष होण्याचे भय असेल तर त्या दोघांनी आपसात समझोता करून घेण्यात काही वाईट नाही आणि समझोता अधिक चांगला आहे आणि लोभ तर प्रत्येक मनात समाविष्ट केला गेला आहे आणि जर तुम्ही उपकार कराल आणि अल्लाहचे भय राखून आचरण अंगिकाराल तर अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला जाणून आहे
Surah An-Nisa, Verse 128
وَلَن تَسۡتَطِيعُوٓاْ أَن تَعۡدِلُواْ بَيۡنَ ٱلنِّسَآءِ وَلَوۡ حَرَصۡتُمۡۖ فَلَا تَمِيلُواْ كُلَّ ٱلۡمَيۡلِ فَتَذَرُوهَا كَٱلۡمُعَلَّقَةِۚ وَإِن تُصۡلِحُواْ وَتَتَّقُواْ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ غَفُورٗا رَّحِيمٗا
१२९. आणि तुम्ही मनापासून इच्छा केली तरीही पत्नींच्या दरम्यान कधीही न्याय करू शकणार नाहीत. यास्तव तुम्ही (एकीच्याचकडे) पूर्णपणे न झुकावे की दुसरीला अधर लोंबकळत सोडून द्यावे आणि जर तुम्ही सुधारणा करून घ्याल, आणि (अन्याय करण्यापासून) स्वतःला वाचवाल तर खात्रीने अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 129
وَإِن يَتَفَرَّقَا يُغۡنِ ٱللَّهُ كُلّٗا مِّن سَعَتِهِۦۚ وَكَانَ ٱللَّهُ وَٰسِعًا حَكِيمٗا
१३०. आणि जर दोन्ही विभक्त झाले तर अल्लाह आपल्या दया-कृपेने दोघांना निःस्पृह (बेपर्वा) करील आणि अल्लाह मोठा व्यापकता राखणारा हिकमत बाळगणारा आहे
Surah An-Nisa, Verse 130
وَلِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۗ وَلَقَدۡ وَصَّيۡنَا ٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡكِتَٰبَ مِن قَبۡلِكُمۡ وَإِيَّاكُمۡ أَنِ ٱتَّقُواْ ٱللَّهَۚ وَإِن تَكۡفُرُواْ فَإِنَّ لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۚ وَكَانَ ٱللَّهُ غَنِيًّا حَمِيدٗا
१३१. आणि आकाशांचे व जमिनीचे सर्व काही अल्लाहचेच आहे आणि आम्ही तुमच्या पूर्वीचे लोक, ज्यांना ग्रंथ दिला गेला होता, त्यांना आणि तुम्हाला हाच आदेश दिला की अल्लाहचे भय राखा आणि जर तुम्ही मानले नाही तर निःसंशय जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाह कोणाची गरज नसलेला, प्रशंसनीय आहे
Surah An-Nisa, Verse 131
وَلِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِيلًا
१३२. आणि जे काही आकाशांमध्ये व जमिनीवर आहे, सर्व अल्लाहचेच आहे आणि कार्य तडीस नेण्यास अल्लाह पुरेसा आहे
Surah An-Nisa, Verse 132
إِن يَشَأۡ يُذۡهِبۡكُمۡ أَيُّهَا ٱلنَّاسُ وَيَأۡتِ بِـَٔاخَرِينَۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ ذَٰلِكَ قَدِيرٗا
१३३. लोकांनो! जर अल्लाहने इच्छिले तर तुम्हाला सर्वांना हटवून देईल, आणि दुसऱ्यांना आणील आणि अल्लाह असे करण्यास पूर्णतः समर्थ आहे
Surah An-Nisa, Verse 133
مَّن كَانَ يُرِيدُ ثَوَابَ ٱلدُّنۡيَا فَعِندَ ٱللَّهِ ثَوَابُ ٱلدُّنۡيَا وَٱلۡأٓخِرَةِۚ وَكَانَ ٱللَّهُ سَمِيعَۢا بَصِيرٗا
१३४. जो मनुष्य या जगाचा मोबदला इच्छित असेल तर (लक्षात ठेवा की) अल्लाहजवळ या जगाचा व आखिरतचा (दोघांचाही) मोबदला हजर आहे आणि अल्लाह ऐकणारा व पाहणारा आहे
Surah An-Nisa, Verse 134
۞يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ كُونُواْ قَوَّـٰمِينَ بِٱلۡقِسۡطِ شُهَدَآءَ لِلَّهِ وَلَوۡ عَلَىٰٓ أَنفُسِكُمۡ أَوِ ٱلۡوَٰلِدَيۡنِ وَٱلۡأَقۡرَبِينَۚ إِن يَكُنۡ غَنِيًّا أَوۡ فَقِيرٗا فَٱللَّهُ أَوۡلَىٰ بِهِمَاۖ فَلَا تَتَّبِعُواْ ٱلۡهَوَىٰٓ أَن تَعۡدِلُواْۚ وَإِن تَلۡوُۥٓاْ أَوۡ تُعۡرِضُواْ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرٗا
१३५. हे ईमान राखणाऱ्यांनो! न्यायावर मजबूतीने कायम राहणारे आणि अल्लाहकरिता खरी साक्ष देणारे बना, मग तो साक्ष स्वतः तुमच्याविरूद्ध आणि तुमचे माता-पिता व नातेवाईकांच्या विरूद्ध का असेना, मग तो मनुष्य धनवान असो किंवा गरीब असो तर त्या दोघांपेक्षा अल्लाहचे नाते खूप (जवळचे) आहे. यास्तव न्याय करण्यात मनाला वाटेल ते करू नका, आणि जर चुकीचे निवेदन द्याल किंवा न मानाल तर (जाणून असा की) अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला जाणून आहे
Surah An-Nisa, Verse 135
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ ءَامِنُواْ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَٱلۡكِتَٰبِ ٱلَّذِي نَزَّلَ عَلَىٰ رَسُولِهِۦ وَٱلۡكِتَٰبِ ٱلَّذِيٓ أَنزَلَ مِن قَبۡلُۚ وَمَن يَكۡفُرۡ بِٱللَّهِ وَمَلَـٰٓئِكَتِهِۦ وَكُتُبِهِۦ وَرُسُلِهِۦ وَٱلۡيَوۡمِ ٱلۡأٓخِرِ فَقَدۡ ضَلَّ ضَلَٰلَۢا بَعِيدًا
१३६. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाह आणि त्याचे पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आणि त्या ग्रंथा (पवित्र कुरआन) वर जो त्याने आपले पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्यावर अवतरीत केला आहे आणि त्या ग्रंथांवर जे यापूर्वी अवतरीत केले गेले, ईमान राखा आणि जो अल्लाह आणि त्याच्या फरिश्त्यांना आणि त्याच्या ग्रंथांना, त्याच्या पैगंबरांना आणि कयामतच्या दिवसाला न मानेल तो वाट चुकून दूर गेला
Surah An-Nisa, Verse 136
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ ثُمَّ كَفَرُواْ ثُمَّ ءَامَنُواْ ثُمَّ كَفَرُواْ ثُمَّ ٱزۡدَادُواْ كُفۡرٗا لَّمۡ يَكُنِ ٱللَّهُ لِيَغۡفِرَ لَهُمۡ وَلَا لِيَهۡدِيَهُمۡ سَبِيلَۢا
१३७. निःसंशय, ज्यांनी ईमान राखले मग इन्कार केला, पुन्हा ईमान राखले मग इन्कार केला, इन्कार करण्यात पुढेच जात राहिले, अल्लाह त्यांना कदापि माफ करणार नाही आणि ना सरळ मार्ग दाखविल
Surah An-Nisa, Verse 137
بَشِّرِ ٱلۡمُنَٰفِقِينَ بِأَنَّ لَهُمۡ عَذَابًا أَلِيمًا
१३८. मुनाफिक लोकांना (वरकरणी मुसलमानांना) दुःखदायक शिक्षा-यातनेचा शुभ-समाचार द्या
Surah An-Nisa, Verse 138
ٱلَّذِينَ يَتَّخِذُونَ ٱلۡكَٰفِرِينَ أَوۡلِيَآءَ مِن دُونِ ٱلۡمُؤۡمِنِينَۚ أَيَبۡتَغُونَ عِندَهُمُ ٱلۡعِزَّةَ فَإِنَّ ٱلۡعِزَّةَ لِلَّهِ جَمِيعٗا
१३९. जे ईमानधारकांना सोडून इन्कारी लोकांना आपला मित्र बनवितात काय ते त्यांच्याशी दोस्ती करून मान-प्रतिष्ठा मिळवू इच्छितात? (लक्षात ठेवा) सर्व मान-प्रतिष्ठा अल्लाहकरिता आहे
Surah An-Nisa, Verse 139
وَقَدۡ نَزَّلَ عَلَيۡكُمۡ فِي ٱلۡكِتَٰبِ أَنۡ إِذَا سَمِعۡتُمۡ ءَايَٰتِ ٱللَّهِ يُكۡفَرُ بِهَا وَيُسۡتَهۡزَأُ بِهَا فَلَا تَقۡعُدُواْ مَعَهُمۡ حَتَّىٰ يَخُوضُواْ فِي حَدِيثٍ غَيۡرِهِۦٓ إِنَّكُمۡ إِذٗا مِّثۡلُهُمۡۗ إِنَّ ٱللَّهَ جَامِعُ ٱلۡمُنَٰفِقِينَ وَٱلۡكَٰفِرِينَ فِي جَهَنَّمَ جَمِيعًا
१४०. आणि अल्लाहने तुमच्यासाठी आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनात) हा आदेश उतरविला आहे की जेव्हा तुम्ही अल्लाहच्या आयतींशी इन्कार आणि थट्टा-मस्करी होत असल्याचे ऐकाल तेव्हा त्यांच्यासोबत त्या बैठकीत बसू नका जोपर्यंत ते दुसऱ्या गोष्टीवर बोलत नाहीत कारण त्या वेळी तुम्ही त्यांच्यासमान ठराल. निःसंशय अल्लाह, मुनाफिकांना आणि इन्कारी लोकांना जहन्नममध्ये एकत्र करणार आहे
Surah An-Nisa, Verse 140
ٱلَّذِينَ يَتَرَبَّصُونَ بِكُمۡ فَإِن كَانَ لَكُمۡ فَتۡحٞ مِّنَ ٱللَّهِ قَالُوٓاْ أَلَمۡ نَكُن مَّعَكُمۡ وَإِن كَانَ لِلۡكَٰفِرِينَ نَصِيبٞ قَالُوٓاْ أَلَمۡ نَسۡتَحۡوِذۡ عَلَيۡكُمۡ وَنَمۡنَعۡكُم مِّنَ ٱلۡمُؤۡمِنِينَۚ فَٱللَّهُ يَحۡكُمُ بَيۡنَكُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِۚ وَلَن يَجۡعَلَ ٱللَّهُ لِلۡكَٰفِرِينَ عَلَى ٱلۡمُؤۡمِنِينَ سَبِيلًا
१४१. जे तुमच्या बाबतीत प्रतिक्षा करतात, मग जर अल्लाहतर्फे तुमचा विजय असेल तर हे म्हणतात की, काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो? आणि जर काफिर लोकांना थोडीशीही सफलता मिळाली तर म्हणतात की, काय आम्ही तुम्हाला (रक्षणआसाठी) घेरा टाकला नव्हता, आणि ईमानधारकांपासून तुमचा बचाव केला नव्हता? तेव्हा, कयामतच्या दिवशी अल्लाहच तुमच्या दरम्यान फैसला करील आणि अल्लाह कधीही काफिरांना (इन्कारी लोकांना) ईमानधारकांवर वर्चस्वशाली होऊ देणार नाही
Surah An-Nisa, Verse 141
إِنَّ ٱلۡمُنَٰفِقِينَ يُخَٰدِعُونَ ٱللَّهَ وَهُوَ خَٰدِعُهُمۡ وَإِذَا قَامُوٓاْ إِلَى ٱلصَّلَوٰةِ قَامُواْ كُسَالَىٰ يُرَآءُونَ ٱلنَّاسَ وَلَا يَذۡكُرُونَ ٱللَّهَ إِلَّا قَلِيلٗا
१४२. निःसंशय, मुनाफिक (दुतोंडी) लोक अल्लाहशी कपट करीत आहेत, आणि अल्लाह त्यांना त्या कपटनीतीचा मोबदला देणार आहे आणि जेव्हा नमाजसाठी उभे राहतात तर केवळ लोकांना दाखविण्यासाठी आणि अल्लाहचे स्मरण फार कमी करतात
Surah An-Nisa, Verse 142
مُّذَبۡذَبِينَ بَيۡنَ ذَٰلِكَ لَآ إِلَىٰ هَـٰٓؤُلَآءِ وَلَآ إِلَىٰ هَـٰٓؤُلَآءِۚ وَمَن يُضۡلِلِ ٱللَّهُ فَلَن تَجِدَ لَهُۥ سَبِيلٗا
१४३. ते मधल्यामधेच (शंका-संशयाच्या) दुविधापूर्ण अवस्थेत आहेत ना पूर्णपणे त्यांच्या बाजूला आणि ना उचितरित्या यांच्या बाजूला, आणि ज्याला अल्लाह सरळ मार्गापासून दूर करील, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही मार्ग आढळणार नाही
Surah An-Nisa, Verse 143
يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ لَا تَتَّخِذُواْ ٱلۡكَٰفِرِينَ أَوۡلِيَآءَ مِن دُونِ ٱلۡمُؤۡمِنِينَۚ أَتُرِيدُونَ أَن تَجۡعَلُواْ لِلَّهِ عَلَيۡكُمۡ سُلۡطَٰنٗا مُّبِينًا
१४४. हे ईमान राखणाऱ्यांनो! ईमानधारकांना सोडून इन्कारी लोकांना आपला मित्र बनवू नका. काय तुम्ही असे इच्छिता की आपल्यावर अल्लाहतर्फे (शिक्षेचे) खुले प्रमाण कायम करून घ्यावे
Surah An-Nisa, Verse 144
إِنَّ ٱلۡمُنَٰفِقِينَ فِي ٱلدَّرۡكِ ٱلۡأَسۡفَلِ مِنَ ٱلنَّارِ وَلَن تَجِدَ لَهُمۡ نَصِيرًا
१४५. निःसंशय, मुनाफिक लोक तर जहन्नमच्या सर्वांत खालच्या दर्जात जातील. निश्चितच तुम्हाला त्यांचा कोणताही मदत करणारा आढळणार नाही
Surah An-Nisa, Verse 145
إِلَّا ٱلَّذِينَ تَابُواْ وَأَصۡلَحُواْ وَٱعۡتَصَمُواْ بِٱللَّهِ وَأَخۡلَصُواْ دِينَهُمۡ لِلَّهِ فَأُوْلَـٰٓئِكَ مَعَ ٱلۡمُؤۡمِنِينَۖ وَسَوۡفَ يُؤۡتِ ٱللَّهُ ٱلۡمُؤۡمِنِينَ أَجۡرًا عَظِيمٗا
१४६. परंतु जर माफी मागतील आणि आपले आचरण सुधारतील आणि अल्लाहवर पूर्ण ईमान राखतील आणि प्रामाणिकपणे अल्लाहकरिताच दीन-धर्माचे कार्य करतील तर हे लोक ईमानधारकांच्या सोबत आहेत. अल्लाह ईमान राखणाऱ्यांना फार मोठा मोबदला प्रदान करील
Surah An-Nisa, Verse 146
مَّا يَفۡعَلُ ٱللَّهُ بِعَذَابِكُمۡ إِن شَكَرۡتُمۡ وَءَامَنتُمۡۚ وَكَانَ ٱللَّهُ شَاكِرًا عَلِيمٗا
१४७. अल्लाह तुम्हाला शिक्षा-यातना देऊन काय करील जर तुम्ही कृतज्ञशील राहाल आणि ईमानासह राहाल आणि अल्लाह फार कदर करणारा आणि सर्व काही जाणणारा आहे
Surah An-Nisa, Verse 147
۞لَّا يُحِبُّ ٱللَّهُ ٱلۡجَهۡرَ بِٱلسُّوٓءِ مِنَ ٱلۡقَوۡلِ إِلَّا مَن ظُلِمَۚ وَكَانَ ٱللَّهُ سَمِيعًا عَلِيمًا
१४८. उंच स्वरात वाईट गोष्ट जाहीर करणे अल्लाहला पसंत नाही, तथापि अत्याचारपीडिताला याची मुभा आहे, आणि अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे
Surah An-Nisa, Verse 148
إِن تُبۡدُواْ خَيۡرًا أَوۡ تُخۡفُوهُ أَوۡ تَعۡفُواْ عَن سُوٓءٖ فَإِنَّ ٱللَّهَ كَانَ عَفُوّٗا قَدِيرًا
१४९. जर तुम्ही एखादे सत्कर्म उघडपणे करा किंवा लपवून करा अथवा एखाद्या वाईट गोष्टीला माफ कराल तर निःसंशय अल्लाह माफ करणारा, सामर्थ्यशाली आहे
Surah An-Nisa, Verse 149
إِنَّ ٱلَّذِينَ يَكۡفُرُونَ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦ وَيُرِيدُونَ أَن يُفَرِّقُواْ بَيۡنَ ٱللَّهِ وَرُسُلِهِۦ وَيَقُولُونَ نُؤۡمِنُ بِبَعۡضٖ وَنَكۡفُرُ بِبَعۡضٖ وَيُرِيدُونَ أَن يَتَّخِذُواْ بَيۡنَ ذَٰلِكَ سَبِيلًا
१५०. जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखत नाहीत आणि असे इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या दरम्यान दुरावा निर्माण करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मानतो आणि काहींना मानत नाही. आणि याच्या दरम्यान एक वेगळा मार्ग काढू इच्छितात
Surah An-Nisa, Verse 150
أُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلۡكَٰفِرُونَ حَقّٗاۚ وَأَعۡتَدۡنَا لِلۡكَٰفِرِينَ عَذَابٗا مُّهِينٗا
१५१. निःसंशय, हे सर्व लोक पक्के काफिर आहेत१ आणि अशा इन्कारी लोकांसाठी आम्ही अतिशय कठोर शिक्षा-यातना तयार करून ठेवली आहे
Surah An-Nisa, Verse 151
وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦ وَلَمۡ يُفَرِّقُواْ بَيۡنَ أَحَدٖ مِّنۡهُمۡ أُوْلَـٰٓئِكَ سَوۡفَ يُؤۡتِيهِمۡ أُجُورَهُمۡۚ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورٗا رَّحِيمٗا
१५२. आणि ज्या लोकांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखले, आणि त्यांच्यापैकी कोणाच्या दरम्यान फरक केला नाही, तर अशाच लोकांना अल्लाह त्यांचा पुरेपूर मोबदला देईल आणि अल्लाह मोठा माफ करणारा दया करणारा आहे
Surah An-Nisa, Verse 152
يَسۡـَٔلُكَ أَهۡلُ ٱلۡكِتَٰبِ أَن تُنَزِّلَ عَلَيۡهِمۡ كِتَٰبٗا مِّنَ ٱلسَّمَآءِۚ فَقَدۡ سَأَلُواْ مُوسَىٰٓ أَكۡبَرَ مِن ذَٰلِكَ فَقَالُوٓاْ أَرِنَا ٱللَّهَ جَهۡرَةٗ فَأَخَذَتۡهُمُ ٱلصَّـٰعِقَةُ بِظُلۡمِهِمۡۚ ثُمَّ ٱتَّخَذُواْ ٱلۡعِجۡلَ مِنۢ بَعۡدِ مَا جَآءَتۡهُمُ ٱلۡبَيِّنَٰتُ فَعَفَوۡنَا عَن ذَٰلِكَۚ وَءَاتَيۡنَا مُوسَىٰ سُلۡطَٰنٗا مُّبِينٗا
१५३. (हे पैगंबर!) ग्रंथधारक तुमच्याजवळ अशी मागणी करतात की तुम्ही त्यांच्यावर आकाशातून एखादा ग्रंथ उतरवून दाखवा १ तेव्हा त्यांनी मूसाकडे यापेक्षा मोठी मागणी केली होती आणि म्हटले की आम्हाला स्पष्टपणे अल्लाहला दाखवा. मग त्यांना त्यांच्या या अत्याचारामुळे विजेने येऊन घेरले, मग त्यांनी स्पष्ट निशाण्या येऊन पोहचल्यावरही वासराला उपास्य बनविले. तरीही आम्ही त्यांना माफ केले आणि मूसा यांना स्पष्ट प्रमाण प्रदान केले
Surah An-Nisa, Verse 153
وَرَفَعۡنَا فَوۡقَهُمُ ٱلطُّورَ بِمِيثَٰقِهِمۡ وَقُلۡنَا لَهُمُ ٱدۡخُلُواْ ٱلۡبَابَ سُجَّدٗا وَقُلۡنَا لَهُمۡ لَا تَعۡدُواْ فِي ٱلسَّبۡتِ وَأَخَذۡنَا مِنۡهُم مِّيثَٰقًا غَلِيظٗا
१५४. आणि त्यांच्याकडून वचन घेण्याकरिता, आम्ही तूर पर्वताला त्यांच्यावर अधांतरीत ठेवले आणि त्यांना आदेश दिला की सजदा करीत दरवाज्यात प्रवेश करा आणि हाही आदेश दिला की शनिवारच्या दिवशी उल्लंघन करून नका आणि आम्ही त्यांच्याकडून अगदी पक्का वायदा घेतला
Surah An-Nisa, Verse 154
فَبِمَا نَقۡضِهِم مِّيثَٰقَهُمۡ وَكُفۡرِهِم بِـَٔايَٰتِ ٱللَّهِ وَقَتۡلِهِمُ ٱلۡأَنۢبِيَآءَ بِغَيۡرِ حَقّٖ وَقَوۡلِهِمۡ قُلُوبُنَا غُلۡفُۢۚ بَلۡ طَبَعَ ٱللَّهُ عَلَيۡهَا بِكُفۡرِهِمۡ فَلَا يُؤۡمِنُونَ إِلَّا قَلِيلٗا
१५५. मग त्यांनी आमच्याशी जो वायदा केला होता, त्यापासून मुकरले आणि अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले, येथपर्यंत की अल्लाहच्या पैगंबरांना नाहक ठार मारले आणि असेही म्हणू लागले होते की आमची मने आवरणाखाली आहेत, (असे नाही) किंबहुना अल्लाहने त्यांच्या इन्कार करण्यापायी त्यांच्या हृदयांना मोहरबंद केले आहे. तेव्हा त्यांच्यापैकी फार थोडेच लोक ईमान राखतात
Surah An-Nisa, Verse 155
وَبِكُفۡرِهِمۡ وَقَوۡلِهِمۡ عَلَىٰ مَرۡيَمَ بُهۡتَٰنًا عَظِيمٗا
१५६. आणि त्यांच्या इन्कार करण्यामुळे आणि मरियमवर मिथ्या आरोप ठेवण्यामुळे
Surah An-Nisa, Verse 156
وَقَوۡلِهِمۡ إِنَّا قَتَلۡنَا ٱلۡمَسِيحَ عِيسَى ٱبۡنَ مَرۡيَمَ رَسُولَ ٱللَّهِ وَمَا قَتَلُوهُ وَمَا صَلَبُوهُ وَلَٰكِن شُبِّهَ لَهُمۡۚ وَإِنَّ ٱلَّذِينَ ٱخۡتَلَفُواْ فِيهِ لَفِي شَكّٖ مِّنۡهُۚ مَا لَهُم بِهِۦ مِنۡ عِلۡمٍ إِلَّا ٱتِّبَاعَ ٱلظَّنِّۚ وَمَا قَتَلُوهُ يَقِينَۢا
१५७. आणि त्यांच्या या कथनामुळे की आम्ही मरियमचे पुत्र ईसा मसीहची हत्या करून टाकली, जे अल्लाहचे पैगंबर होते, वास्तविक ना तर त्यांनी हत्या केली, ना त्यांना सूळावर चढविले, परंतु त्यांच्यासाठी ईसाची छबी बनविली गेली१ निश्चितच ईसा यांच्याविषयी मतभेद करणारे संशयात पडले आहेत. केवळ अटकळीच्या गोष्टीवर चालण्याखेरीज त्यांना कसलेही ज्ञान नाही. एवढे निश्चित की त्यांचा वध केला गेला नाही
Surah An-Nisa, Verse 157
بَل رَّفَعَهُ ٱللَّهُ إِلَيۡهِۚ وَكَانَ ٱللَّهُ عَزِيزًا حَكِيمٗا
१५८. किंबहुना अल्लाहने त्यांना आपल्याकडे उचलून घेतले आणि अल्लाह जबरदस्त हिकमत बाळगणारा आहे
Surah An-Nisa, Verse 158
وَإِن مِّنۡ أَهۡلِ ٱلۡكِتَٰبِ إِلَّا لَيُؤۡمِنَنَّ بِهِۦ قَبۡلَ مَوۡتِهِۦۖ وَيَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ يَكُونُ عَلَيۡهِمۡ شَهِيدٗا
१५९. ग्रंथधारकांपैकी कोणी असा नसेल जो (हजरत) ईसा यांच्या मृत्युपूर्वी त्यांच्यावर ईमान न राखेल, आणि कयामतच्या दिवशी ते त्यांच्यावर साक्षी राहतील
Surah An-Nisa, Verse 159
فَبِظُلۡمٖ مِّنَ ٱلَّذِينَ هَادُواْ حَرَّمۡنَا عَلَيۡهِمۡ طَيِّبَٰتٍ أُحِلَّتۡ لَهُمۡ وَبِصَدِّهِمۡ عَن سَبِيلِ ٱللَّهِ كَثِيرٗا
१६०. यहूदी लोकांच्या जुलूम-अत्याचारामुळे आम्ही त्यांच्यावर हलाल (वैध) चीज वस्तूंना, हराम (अवैध) करून टाकले आणि त्यांचे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना अडवण्यामुळे
Surah An-Nisa, Verse 160
وَأَخۡذِهِمُ ٱلرِّبَوٰاْ وَقَدۡ نُهُواْ عَنۡهُ وَأَكۡلِهِمۡ أَمۡوَٰلَ ٱلنَّاسِ بِٱلۡبَٰطِلِۚ وَأَعۡتَدۡنَا لِلۡكَٰفِرِينَ مِنۡهُمۡ عَذَابًا أَلِيمٗا
१६१. आणि त्यांच्या व्याज घेण्यामुळे, ज्यापासून त्यांना रोखले गेले होते, आणि लोकांचा माल (धन-दौलत) नाहक हडप केल्यामुळे, आणि आम्ही यांच्यातल्या काफिरांकरिता दुःखदायक शिक्षा-यातना तयार करून ठेवली आहे
Surah An-Nisa, Verse 161
لَّـٰكِنِ ٱلرَّـٰسِخُونَ فِي ٱلۡعِلۡمِ مِنۡهُمۡ وَٱلۡمُؤۡمِنُونَ يُؤۡمِنُونَ بِمَآ أُنزِلَ إِلَيۡكَ وَمَآ أُنزِلَ مِن قَبۡلِكَۚ وَٱلۡمُقِيمِينَ ٱلصَّلَوٰةَۚ وَٱلۡمُؤۡتُونَ ٱلزَّكَوٰةَ وَٱلۡمُؤۡمِنُونَ بِٱللَّهِ وَٱلۡيَوۡمِ ٱلۡأٓخِرِ أُوْلَـٰٓئِكَ سَنُؤۡتِيهِمۡ أَجۡرًا عَظِيمًا
१६२. परंतु त्यांच्यात जे परिपक्व आणि मजबूत ज्ञान राखणारे आहेत, आणि ईमानधारक आहेत, जे त्यावर ईमान राखतात, जे तुमच्याकडे उतरविले गेले, आणि जे तुमच्यापूर्वी उतरविले गेले आणि नमाज कायम करणारे आहेत, जकात अदा करणारे आहेत, अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखणारे आहेत. हे असे लोक आहेत, ज्यांना आम्ही फार मोठा मोबदला प्रदान करू
Surah An-Nisa, Verse 162
۞إِنَّآ أَوۡحَيۡنَآ إِلَيۡكَ كَمَآ أَوۡحَيۡنَآ إِلَىٰ نُوحٖ وَٱلنَّبِيِّـۧنَ مِنۢ بَعۡدِهِۦۚ وَأَوۡحَيۡنَآ إِلَىٰٓ إِبۡرَٰهِيمَ وَإِسۡمَٰعِيلَ وَإِسۡحَٰقَ وَيَعۡقُوبَ وَٱلۡأَسۡبَاطِ وَعِيسَىٰ وَأَيُّوبَ وَيُونُسَ وَهَٰرُونَ وَسُلَيۡمَٰنَۚ وَءَاتَيۡنَا دَاوُۥدَ زَبُورٗا
१६३. निःसंशय, आम्ही तुमच्याकडे त्याचप्रमाणे संदेश अवतरीत केला आहे, ज्याप्रमाणे नूह (अलैहिस्सलाम) आणि त्यांच्या नंतरच्या पैगंबरांकडे आम्ही संदेश अवतरीत केला, आणि इब्राहीम आणि इस्माईल आणि इसहाक आणि याकूब आणि त्यांच्या संततीवर आणि ईसा व अय्यूब आणि यूनुस आणि हारुन आणि सुलेमान यांच्याकडे आणि आम्ही दाऊद (अलैहिस्सलाम) यांना जबूर (ग्रंथ) प्रदान केला
Surah An-Nisa, Verse 163
وَرُسُلٗا قَدۡ قَصَصۡنَٰهُمۡ عَلَيۡكَ مِن قَبۡلُ وَرُسُلٗا لَّمۡ نَقۡصُصۡهُمۡ عَلَيۡكَۚ وَكَلَّمَ ٱللَّهُ مُوسَىٰ تَكۡلِيمٗا
१६४. आणि तुमच्या पूर्वीच्या अनेक पैगंबरांचे वृत्तांत आम्ही तुम्हाला सांगितले आहेत, आणि बहुतेक पैगंबरांचे सांगितले नाहीत आणि (हजरत) मूसा यांच्याशी अल्लाहने सरळ संभाषण केले
Surah An-Nisa, Verse 164
رُّسُلٗا مُّبَشِّرِينَ وَمُنذِرِينَ لِئَلَّا يَكُونَ لِلنَّاسِ عَلَى ٱللَّهِ حُجَّةُۢ بَعۡدَ ٱلرُّسُلِۚ وَكَانَ ٱللَّهُ عَزِيزًا حَكِيمٗا
१६५. (आम्ही या सर्वांना) शुभ वार्ता देणारा आणि सचेत करणारा रसूल (पैगंबर) बनविले, यासाठी की पैगंबरांना पाठविल्यानंतर लोकांना एखादे निमित्त वा सबब अल्लाहपुढे मांडण्याची संधी राहू नये आणि अल्लाह मोठा जबरदस्त आणि हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 165
لَّـٰكِنِ ٱللَّهُ يَشۡهَدُ بِمَآ أَنزَلَ إِلَيۡكَۖ أَنزَلَهُۥ بِعِلۡمِهِۦۖ وَٱلۡمَلَـٰٓئِكَةُ يَشۡهَدُونَۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدًا
१६६. जे काही तुमच्याकडे उतरविले गेले आहे, त्याविषयी अल्लाह स्वतः साक्ष देतो की ते त्याने आपल्या ज्ञानाने अवतरीत केले आहे आणि फरिश्तेदेखील साक्ष देतात आणि साक्ष देण्यास केवळ अल्लाह पुरेसा आहे
Surah An-Nisa, Verse 166
إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَصَدُّواْ عَن سَبِيلِ ٱللَّهِ قَدۡ ضَلُّواْ ضَلَٰلَۢا بَعِيدًا
१६७. निःसंशय, ज्यांनी इन्कार केला आणि अल्लाहच्या मार्गा (दीन-धर्मा) पासून रोखले, तर ते खूप दूर भटकले
Surah An-Nisa, Verse 167
إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَظَلَمُواْ لَمۡ يَكُنِ ٱللَّهُ لِيَغۡفِرَ لَهُمۡ وَلَا لِيَهۡدِيَهُمۡ طَرِيقًا
१६८. निःसंशय, ज्यांनी इन्कार केला आणि जुलूम-अत्याचार केला तर अल्लाह त्यांना माफ करणारा नाही आणि ना त्यांना एखादा सन्मार्ग दाखवील
Surah An-Nisa, Verse 168
إِلَّا طَرِيقَ جَهَنَّمَ خَٰلِدِينَ فِيهَآ أَبَدٗاۚ وَكَانَ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٗا
१६९. परंतु जहन्नमचा मार्ग, ज्यात ते सदासर्वदा राहतील आणि हे अल्लाहकरिता फार सोपे आहे
Surah An-Nisa, Verse 169
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ قَدۡ جَآءَكُمُ ٱلرَّسُولُ بِٱلۡحَقِّ مِن رَّبِّكُمۡ فَـَٔامِنُواْ خَيۡرٗا لَّكُمۡۚ وَإِن تَكۡفُرُواْ فَإِنَّ لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمٗا
१७०. लोक हो! तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य घेऊन पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) आले. त्यांच्यावर ईमान राखा. तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जर तुम्ही इन्कार केला तर आकाशांमध्ये व धरतीवर जे काही आहे सर्व अल्लाहचेच आहे आणि अल्लाह सर्वज्ञ आणि हिकमतशाली आहे
Surah An-Nisa, Verse 170
يَـٰٓأَهۡلَ ٱلۡكِتَٰبِ لَا تَغۡلُواْ فِي دِينِكُمۡ وَلَا تَقُولُواْ عَلَى ٱللَّهِ إِلَّا ٱلۡحَقَّۚ إِنَّمَا ٱلۡمَسِيحُ عِيسَى ٱبۡنُ مَرۡيَمَ رَسُولُ ٱللَّهِ وَكَلِمَتُهُۥٓ أَلۡقَىٰهَآ إِلَىٰ مَرۡيَمَ وَرُوحٞ مِّنۡهُۖ فَـَٔامِنُواْ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦۖ وَلَا تَقُولُواْ ثَلَٰثَةٌۚ ٱنتَهُواْ خَيۡرٗا لَّكُمۡۚ إِنَّمَا ٱللَّهُ إِلَٰهٞ وَٰحِدٞۖ سُبۡحَٰنَهُۥٓ أَن يَكُونَ لَهُۥ وَلَدٞۘ لَّهُۥ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۗ وَكَفَىٰ بِٱللَّهِ وَكِيلٗا
१७१. हे ग्रंथधारकांनो! आपल्या दीन-धर्माबाबत अतिशयोक्ती करू नका, आणि अल्लाहच्या संबंधाने सत्य तेच बोला. निःसंशय मरियमपुत्र ईसा मसीह केवळ अल्लाहचे रसूल आणि कलिमा आहे जो मरियमकडे पाठविला गेला आणि त्याच्यातर्फे आत्मा आहे, यास्तव अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखा आणि अल्लाह तीन आहे असे म्हणू नका.१ हे म्हणणे थांबवा यातच तुमचे हित आहे. निःसंशय तुमचा उपास्य केवळ एक अल्लाह आहे. तो पाक-पवित्र आहे, यापासून की त्याची एखादी संतान असावी. त्याच्याचकरिता आहे जे काही आकाशांमध्ये व धरतीवर आहे आणि अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे
Surah An-Nisa, Verse 171
لَّن يَسۡتَنكِفَ ٱلۡمَسِيحُ أَن يَكُونَ عَبۡدٗا لِّلَّهِ وَلَا ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ ٱلۡمُقَرَّبُونَۚ وَمَن يَسۡتَنكِفۡ عَنۡ عِبَادَتِهِۦ وَيَسۡتَكۡبِرۡ فَسَيَحۡشُرُهُمۡ إِلَيۡهِ جَمِيعٗا
१७२. मसीह, अल्लाहचे दास होण्यात कधीही तिरस्कार करीत नाहीत आणि ना निकटचे फरिश्ते, आणि जो अल्लाहची उपासना करण्यापासून तिरस्कार व घमेंड करील तर तो त्या सर्वांना आपल्याकडे एकत्र करील
Surah An-Nisa, Verse 172
فَأَمَّا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ فَيُوَفِّيهِمۡ أُجُورَهُمۡ وَيَزِيدُهُم مِّن فَضۡلِهِۦۖ وَأَمَّا ٱلَّذِينَ ٱسۡتَنكَفُواْ وَٱسۡتَكۡبَرُواْ فَيُعَذِّبُهُمۡ عَذَابًا أَلِيمٗا وَلَا يَجِدُونَ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ وَلِيّٗا وَلَا نَصِيرٗا
१७३. तेव्हा, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, त्यांना त्यांचा पुरेपूर मोबदला देईल, आणि आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करील, परंतु ज्यांनी तिरस्कार केला आणि घमेंड केली त्यांना दुःखदायक शिक्षा-यातना देईल, मग त्यांना अल्लाहशिवाय आपला कोणी मित्र व मदत करणारा आढळणार नाही
Surah An-Nisa, Verse 173
يَـٰٓأَيُّهَا ٱلنَّاسُ قَدۡ جَآءَكُم بُرۡهَٰنٞ مِّن رَّبِّكُمۡ وَأَنزَلۡنَآ إِلَيۡكُمۡ نُورٗا مُّبِينٗا
१७४. लोकांनो! तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे प्रमाण येऊन पोहचले आहे १ आणि आम्ही तुमच्याकडे दिव्य तेज (पवित्र कुरआन) अवतरीत केले आहे
Surah An-Nisa, Verse 174
فَأَمَّا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ بِٱللَّهِ وَٱعۡتَصَمُواْ بِهِۦ فَسَيُدۡخِلُهُمۡ فِي رَحۡمَةٖ مِّنۡهُ وَفَضۡلٖ وَيَهۡدِيهِمۡ إِلَيۡهِ صِرَٰطٗا مُّسۡتَقِيمٗا
१७५. मग ज्या लोकांनी अल्लाहवर ईमान राखले आणि त्याला मजबूतपणे धरले तर अल्लाह त्यांना आपल्या कृपाछत्रात घेईल आणि त्यांना आपल्याकडे येण्याचा सरळ मार्ग दाखवील
Surah An-Nisa, Verse 175
يَسۡتَفۡتُونَكَ قُلِ ٱللَّهُ يُفۡتِيكُمۡ فِي ٱلۡكَلَٰلَةِۚ إِنِ ٱمۡرُؤٌاْ هَلَكَ لَيۡسَ لَهُۥ وَلَدٞ وَلَهُۥٓ أُخۡتٞ فَلَهَا نِصۡفُ مَا تَرَكَۚ وَهُوَ يَرِثُهَآ إِن لَّمۡ يَكُن لَّهَا وَلَدٞۚ فَإِن كَانَتَا ٱثۡنَتَيۡنِ فَلَهُمَا ٱلثُّلُثَانِ مِمَّا تَرَكَۚ وَإِن كَانُوٓاْ إِخۡوَةٗ رِّجَالٗا وَنِسَآءٗ فَلِلذَّكَرِ مِثۡلُ حَظِّ ٱلۡأُنثَيَيۡنِۗ يُبَيِّنُ ٱللَّهُ لَكُمۡ أَن تَضِلُّواْۗ وَٱللَّهُ بِكُلِّ شَيۡءٍ عَلِيمُۢ
१७६. ते तुम्हाला कलालाविषयी (अर्थात आई-बाप आणि संतती नसलेल्या मयताविषयी) विचारतात. तुम्ही सांगा, अल्लाह कलालाविषयी आदेश देतो की जर एखादा पुरुष मरण पावेल आणि त्याच्या वारसांमध्ये कोणी संतान नसेल आणि त्याला एक बहीण असेल तर तिच्यासाठी मयताने मागे सोडलेल्या धन-संपत्तीचा अर्धा हिस्सा आहे आणि तो त्या (बहिणी) चा वारस आहे. जर त्याला एखादी संतती नसेल, जर दोन बहिणी असतील तर त्या दोघींसाठी दोन तृतियांश हिस्सा आहे. त्यातून जे तो सोडून गेला. आणि जर भाऊ बहिणी दोन्ही असतील पुरुषही आणि स्त्रियाही तर पुरुषाकरिता, दोन स्त्रियांच्या हिश्याइतका हिस्सा आहे. अल्लाह तुमच्यासाठी स्पष्ट सांगत आहे, यासाठी की तुम्ही (इतस्ततः) भटकत फिरू नये आणि अल्लाह सर्व काही जाणणारा आहे
Surah An-Nisa, Verse 176