UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Ghafir - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


حمٓ

१. हा. मीम
Surah Ghafir, Verse 1


تَنزِيلُ ٱلۡكِتَٰبِ مِنَ ٱللَّهِ ٱلۡعَزِيزِ ٱلۡعَلِيمِ

२. या ग्रंथाचे अवतरित करणे, त्या अल्लाहतर्फे आहे जो वर्चस्वशाली आणि ज्ञान बाळगणारा आहे
Surah Ghafir, Verse 2


غَافِرِ ٱلذَّنۢبِ وَقَابِلِ ٱلتَّوۡبِ شَدِيدِ ٱلۡعِقَابِ ذِي ٱلطَّوۡلِۖ لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَۖ إِلَيۡهِ ٱلۡمَصِيرُ

३. अपराधांना माफ करणारा आणि तौबा (क्षमा -यातना) कबूल करणारा, कठोर शिक्षा - यातना देणारा, उपकार (कृपा) आणि सामर्थ्य बाळगणारा, ज्याच्याखेरीज कोणी उपास्य नाही, त्याच्याचकडे परतावयाचे आहे
Surah Ghafir, Verse 3


مَا يُجَٰدِلُ فِيٓ ءَايَٰتِ ٱللَّهِ إِلَّا ٱلَّذِينَ كَفَرُواْ فَلَا يَغۡرُرۡكَ تَقَلُّبُهُمۡ فِي ٱلۡبِلَٰدِ

४. अल्लाहच्या आयतींमध्ये तेच लोक वाद घालतात, जे काफिर आहेत तेव्हा त्या लोकांचे शहरांमध्ये हिंडणे फिरणे तुम्हाला धोक्यात न टाकावे
Surah Ghafir, Verse 4


كَذَّبَتۡ قَبۡلَهُمۡ قَوۡمُ نُوحٖ وَٱلۡأَحۡزَابُ مِنۢ بَعۡدِهِمۡۖ وَهَمَّتۡ كُلُّ أُمَّةِۭ بِرَسُولِهِمۡ لِيَأۡخُذُوهُۖ وَجَٰدَلُواْ بِٱلۡبَٰطِلِ لِيُدۡحِضُواْ بِهِ ٱلۡحَقَّ فَأَخَذۡتُهُمۡۖ فَكَيۡفَ كَانَ عِقَابِ

५. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि त्यांच्या नंतरच्या इतर जनसमूहांनी देखील खोटे ठरविले होते आणि प्रत्येक जनसमुदायाने आपल्या पैगंबराला बंदिस्त बनविण्याचा इरादा केला आणि असत्याद्वआरे हटवादीपणा केला, यासाठी की त्याद्वारे सत्याला नष्ट करून टाकावे, तेव्हा मी त्यांना पकडीत घेतले, तर बघा कशी होती माझी शिक्षा
Surah Ghafir, Verse 5


وَكَذَٰلِكَ حَقَّتۡ كَلِمَتُ رَبِّكَ عَلَى ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ أَنَّهُمۡ أَصۡحَٰبُ ٱلنَّارِ

६. आणि या प्रकारे तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान लोकांवरही लागू झाले. ज्यांनी कुप्र (इन्कार) केला की ते जहन्नमी आहेत
Surah Ghafir, Verse 6


ٱلَّذِينَ يَحۡمِلُونَ ٱلۡعَرۡشَ وَمَنۡ حَوۡلَهُۥ يُسَبِّحُونَ بِحَمۡدِ رَبِّهِمۡ وَيُؤۡمِنُونَ بِهِۦ وَيَسۡتَغۡفِرُونَ لِلَّذِينَ ءَامَنُواْۖ رَبَّنَا وَسِعۡتَ كُلَّ شَيۡءٖ رَّحۡمَةٗ وَعِلۡمٗا فَٱغۡفِرۡ لِلَّذِينَ تَابُواْ وَٱتَّبَعُواْ سَبِيلَكَ وَقِهِمۡ عَذَابَ ٱلۡجَحِيمِ

७. अर्श (अल्लाहच्या सिंहासना) ला उचलून धरणारे आणि त्याच्याभोवती असणारे फरिश्ते आपल्या पालनकर्त्याच्या पवित्रतेचे गुणगान, प्रशंसेसह करतात आणि त्याच्यावर ईमान राखतात आणि ईमान राखणाऱ्यांसाठी क्षमा - याचनेची प्रार्थना करतात, (म्हणतात) की हे आमच्या स्वामी व पालनकर्त्या! तू प्रत्येक गोष्टीला आपल्या दया आणि ज्ञानाने घेरून ठेवले आहे, तेव्हा तू त्यांना माफ कर, जे माफी मागतील आणि तुझ्या मार्गाचे अनुसरण करतील, आणि तू त्यांना जहन्नमच्या शिक्षा - यातनेपासूनही सुरक्षित ठेव
Surah Ghafir, Verse 7


رَبَّنَا وَأَدۡخِلۡهُمۡ جَنَّـٰتِ عَدۡنٍ ٱلَّتِي وَعَدتَّهُمۡ وَمَن صَلَحَ مِنۡ ءَابَآئِهِمۡ وَأَزۡوَٰجِهِمۡ وَذُرِّيَّـٰتِهِمۡۚ إِنَّكَ أَنتَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ

८. हे आमच्या पालनकर्त्या! तू त्यांना सदैवकाळ राहणाऱ्या जन्नतींमध्ये मध्ये दाखल कर, ज्यांचा तू त्यांना वायदा दिला आहेस, आणि त्यांच्या वाडवडील आणि पत्न्या आणि संततीपैकी (ही) त्या सर्वांना जे नेक सदाचारी आहेत. निःसंशय, तू जबरदस्त व हिकमतशाली आहे
Surah Ghafir, Verse 8


وَقِهِمُ ٱلسَّيِّـَٔاتِۚ وَمَن تَقِ ٱلسَّيِّـَٔاتِ يَوۡمَئِذٖ فَقَدۡ رَحِمۡتَهُۥۚ وَذَٰلِكَ هُوَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡعَظِيمُ

९. आणि त्यांना कुकर्मांपासूनही सुरक्षित ठेव (खरी गोष्ट अशी की) त्या दिवशी ज्याला तू दुष्कर्मापासून वाचवून घेतले, त्याच्यावर तू निश्चितच दया - कृपा केलीस आणि सर्वांत मोठी सफलता हीच आहे
Surah Ghafir, Verse 9


إِنَّ ٱلَّذِينَ كَفَرُواْ يُنَادَوۡنَ لَمَقۡتُ ٱللَّهِ أَكۡبَرُ مِن مَّقۡتِكُمۡ أَنفُسَكُمۡ إِذۡ تُدۡعَوۡنَ إِلَى ٱلۡإِيمَٰنِ فَتَكۡفُرُونَ

१०. निःसंशय, ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, त्यांना मोठ्या आवाजाने सांगितले जाईल की निश्चितच अल्लाहचे तुमच्यावर नाराज होणे त्याहून फार जास्त आहे, जे तुम्ही नाराज होत होते आपल्या मनाने, जेव्हा तुम्हाला ईमानाकडे बोलविले जात होते, मग तुम्ही कुप्र (इन्कार) करू लागत असत
Surah Ghafir, Verse 10


قَالُواْ رَبَّنَآ أَمَتَّنَا ٱثۡنَتَيۡنِ وَأَحۡيَيۡتَنَا ٱثۡنَتَيۡنِ فَٱعۡتَرَفۡنَا بِذُنُوبِنَا فَهَلۡ إِلَىٰ خُرُوجٖ مِّن سَبِيلٖ

११. (ते) म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! तू आम्हाला दुसऱ्यांदा मृत्यु दिला आणि दुसऱ्यांदाच जिवंत केले, आता आम्ही आपले अपराध कबूल करतो. तर काय आता एखादा मार्ग बाहेर पडण्याचाही आहे
Surah Ghafir, Verse 11


ذَٰلِكُم بِأَنَّهُۥٓ إِذَا دُعِيَ ٱللَّهُ وَحۡدَهُۥ كَفَرۡتُمۡ وَإِن يُشۡرَكۡ بِهِۦ تُؤۡمِنُواْۚ فَٱلۡحُكۡمُ لِلَّهِ ٱلۡعَلِيِّ ٱلۡكَبِيرِ

१२. ही शिक्षा तुम्हाला एवढ्यासाठी आहे की जेव्हा केवळ एकमेव अल्लाहकडे बोलाविले जात असे, तेव्हा तुम्ही इन्कार करीत आणि जर त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी करून घेतले जात असे, तेव्हा तुम्ही मान्य करून घेत,१ तेव्हा आता फैसला, सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचाच आहे
Surah Ghafir, Verse 12


هُوَ ٱلَّذِي يُرِيكُمۡ ءَايَٰتِهِۦ وَيُنَزِّلُ لَكُم مِّنَ ٱلسَّمَآءِ رِزۡقٗاۚ وَمَا يَتَذَكَّرُ إِلَّا مَن يُنِيبُ

१३. तोच होय जो तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवितो, आणि तुमच्यासाठी आकाशातून रोजी (आजिविका) अवतरित करतो. बोध केवळ तेच ग्रहण करतात, जे (अल्लाहकडे) झुकतात
Surah Ghafir, Verse 13


فَٱدۡعُواْ ٱللَّهَ مُخۡلِصِينَ لَهُ ٱلدِّينَ وَلَوۡ كَرِهَ ٱلۡكَٰفِرُونَ

१४. तुम्ही अल्लाहला पुकारत राहा, त्याच्यासाठी दीन (धर्मा) ला निखालस करून, मग ते काफिरांना कितीही अप्रिय वाटो
Surah Ghafir, Verse 14


رَفِيعُ ٱلدَّرَجَٰتِ ذُو ٱلۡعَرۡشِ يُلۡقِي ٱلرُّوحَ مِنۡ أَمۡرِهِۦ عَلَىٰ مَن يَشَآءُ مِنۡ عِبَادِهِۦ لِيُنذِرَ يَوۡمَ ٱلتَّلَاقِ

१५. अति उच्च दर्जा बाळगणारा अर्श (ईशसिंहासना) चा स्वामी. तो आपल्या दासांपैकी ज्याच्यावर इच्छितो, वहयी (प्रकाशना) अवतरित करतो, यासाठी की त्याने भेटीच्या दिवशापासून खबरदार करावे
Surah Ghafir, Verse 15


يَوۡمَ هُم بَٰرِزُونَۖ لَا يَخۡفَىٰ عَلَى ٱللَّهِ مِنۡهُمۡ شَيۡءٞۚ لِّمَنِ ٱلۡمُلۡكُ ٱلۡيَوۡمَۖ لِلَّهِ ٱلۡوَٰحِدِ ٱلۡقَهَّارِ

१६. ज्या दिवशी सर्व लोक जाहीर होतील, त्यांची कोणतीही गोष्ट अल्लाहपासून लपून राहणार नाही. आज कोणाचे राज्य आहे? केवळ एकमेवआणि जबरदस्त अशा अल्लाहचे
Surah Ghafir, Verse 16


ٱلۡيَوۡمَ تُجۡزَىٰ كُلُّ نَفۡسِۭ بِمَا كَسَبَتۡۚ لَا ظُلۡمَ ٱلۡيَوۡمَۚ إِنَّ ٱللَّهَ سَرِيعُ ٱلۡحِسَابِ

१७. आज प्रत्येक जीवाला त्याच्या कृत-कर्माचा मोबदला दिला जाईल, आज (कशाही प्रकारचा) अत्याचार नाही. निःसंशय, अल्लाह लवकरच हिशोब घेणार आहे
Surah Ghafir, Verse 17


وَأَنذِرۡهُمۡ يَوۡمَ ٱلۡأٓزِفَةِ إِذِ ٱلۡقُلُوبُ لَدَى ٱلۡحَنَاجِرِ كَٰظِمِينَۚ مَا لِلظَّـٰلِمِينَ مِنۡ حَمِيمٖ وَلَا شَفِيعٖ يُطَاعُ

१८. आणि त्यांना फार जवळ येणाऱ्या (कयामत) विषयी सावध करा, जेव्हा हृदये गळ्यापर्यर्ंत पोहचतील आणि सर्व शांत राहतील, अत्याचारींचा ना कोणी मित्र असेल आणि ना शिफारस करणारा की ज्याचे म्हणणे मान्य केले जावे
Surah Ghafir, Verse 18


يَعۡلَمُ خَآئِنَةَ ٱلۡأَعۡيُنِ وَمَا تُخۡفِي ٱلصُّدُورُ

१९. तो डोळ्यांच्या बेईमानीला आणि छाती (हृदया) च्या लपलेल्या गोष्टींना (चांगल्या प्रकारे) जाणतो.१
Surah Ghafir, Verse 19


وَٱللَّهُ يَقۡضِي بِٱلۡحَقِّۖ وَٱلَّذِينَ يَدۡعُونَ مِن دُونِهِۦ لَا يَقۡضُونَ بِشَيۡءٍۗ إِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ

२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अगदी उचित फैसला करेल, आणि त्याच्याखेरीज ज्यांना ज्यांना हे लोक पुकारतात ते कोणत्याही गोष्टीचा फैसला करू शकत नाही. निःसंशय, अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे
Surah Ghafir, Verse 20


۞أَوَلَمۡ يَسِيرُواْ فِي ٱلۡأَرۡضِ فَيَنظُرُواْ كَيۡفَ كَانَ عَٰقِبَةُ ٱلَّذِينَ كَانُواْ مِن قَبۡلِهِمۡۚ كَانُواْ هُمۡ أَشَدَّ مِنۡهُمۡ قُوَّةٗ وَءَاثَارٗا فِي ٱلۡأَرۡضِ فَأَخَذَهُمُ ٱللَّهُ بِذُنُوبِهِمۡ وَمَا كَانَ لَهُم مِّنَ ٱللَّهِ مِن وَاقٖ

२१. काय हे लोक जमिनीवर हिंडले फिरले नाहीत की त्यांनी पाहिले असते की जे लोक यांच्यापूर्वी होऊन गेले त्यांचा परिणाम (अंत) कसा झाला. ते शक्ती आणि सामर्थ्य आणि धरतीवर आपली स्मरके सोडून जाण्याच्या आधारावर यांच्या तुलनेत खूप जास्त होते, तरीही अल्लाहने त्यांना त्यांच्या अपराधांपायी धरले आणि असा कोणी होऊन गेला नाही ज्याने त्यांना अल्लाहच्या शिक्षा - यातनांपासून वाचवून घेतले असते
Surah Ghafir, Verse 21


ذَٰلِكَ بِأَنَّهُمۡ كَانَت تَّأۡتِيهِمۡ رُسُلُهُم بِٱلۡبَيِّنَٰتِ فَكَفَرُواْ فَأَخَذَهُمُ ٱللَّهُۚ إِنَّهُۥ قَوِيّٞ شَدِيدُ ٱلۡعِقَابِ

२२. हे या कारणास्तव की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर चमत्कार (मोजिजे) घेऊन येत होते, तेव्हा ते इन्कार करीत असत, मग अल्लाह त्यांना पकडीत घेत असे. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि सक्त शिक्षा - यातना देणारा आहे
Surah Ghafir, Verse 22


وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا مُوسَىٰ بِـَٔايَٰتِنَا وَسُلۡطَٰنٖ مُّبِينٍ

२३. आणि आम्ही मूसा (अलै.) ला आपल्या आयती (निशाण्या) आणि स्पष्ट प्रमाणांसह पाठविले
Surah Ghafir, Verse 23


إِلَىٰ فِرۡعَوۡنَ وَهَٰمَٰنَ وَقَٰرُونَ فَقَالُواْ سَٰحِرٞ كَذَّابٞ

२४. फिरऔन आणि हामान आणि कारूनकडे, तेव्हा ते म्हणाले की (हा तर) जादूगार आणि खोटारडा आहे
Surah Ghafir, Verse 24


فَلَمَّا جَآءَهُم بِٱلۡحَقِّ مِنۡ عِندِنَا قَالُواْ ٱقۡتُلُوٓاْ أَبۡنَآءَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ مَعَهُۥ وَٱسۡتَحۡيُواْ نِسَآءَهُمۡۚ وَمَا كَيۡدُ ٱلۡكَٰفِرِينَ إِلَّا فِي ضَلَٰلٖ

२५. तर जेव्हा त्यांच्याजवळ मूसा (अलै.) आमच्यातर्फे सत्य (धर्म) घेऊन आले, तेव्हा ते म्हणाले की याच्यासोबत जे ईमान राखणारे आहेत, त्यांच्या पुत्रांना ठार मारून टाका आणि कन्यांना जिवंत ठेवा, आणि काफिरांचे जे निमित्त आहे ते मार्गभ्रष्टतेवरच आहे
Surah Ghafir, Verse 25


وَقَالَ فِرۡعَوۡنُ ذَرُونِيٓ أَقۡتُلۡ مُوسَىٰ وَلۡيَدۡعُ رَبَّهُۥٓۖ إِنِّيٓ أَخَافُ أَن يُبَدِّلَ دِينَكُمۡ أَوۡ أَن يُظۡهِرَ فِي ٱلۡأَرۡضِ ٱلۡفَسَادَ

२६. आणि फिरऔन म्हणाला की मला सोडा की मी मूसाला मारून टाकावे आणि त्याने आपल्या पालनकर्त्याला पुकारावे. मला तर ही भीती वाटते की याने कदाचित तुमचा दीन (धर्म) बदलून न टाकावा किंवा देशात एखादा फार मोठा उत्पात (फसाद) निर्माण न करावा
Surah Ghafir, Verse 26


وَقَالَ مُوسَىٰٓ إِنِّي عُذۡتُ بِرَبِّي وَرَبِّكُم مِّن كُلِّ مُتَكَبِّرٖ لَّا يُؤۡمِنُ بِيَوۡمِ ٱلۡحِسَابِ

२७. आणि मूसा (अलै.) म्हणाले की मी आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो, त्या प्रत्येक घर्मेडी माणसाच्या (उपद्रवा) पासून जो (कर्मांच्या) हिशोबाच्या दिवसावर ईमान राखत नाही
Surah Ghafir, Verse 27


وَقَالَ رَجُلٞ مُّؤۡمِنٞ مِّنۡ ءَالِ فِرۡعَوۡنَ يَكۡتُمُ إِيمَٰنَهُۥٓ أَتَقۡتُلُونَ رَجُلًا أَن يَقُولَ رَبِّيَ ٱللَّهُ وَقَدۡ جَآءَكُم بِٱلۡبَيِّنَٰتِ مِن رَّبِّكُمۡۖ وَإِن يَكُ كَٰذِبٗا فَعَلَيۡهِ كَذِبُهُۥۖ وَإِن يَكُ صَادِقٗا يُصِبۡكُم بَعۡضُ ٱلَّذِي يَعِدُكُمۡۖ إِنَّ ٱللَّهَ لَا يَهۡدِي مَنۡ هُوَ مُسۡرِفٞ كَذَّابٞ

२८. आणि एका ईमान राखणाऱ्या माणसाने जो फिरऔनच्या कुटुंबियांपैकी होता, आणि आपले ईमान लपवून होता, म्हणाला की काय तुम्ही एका माणसाला केवळ या गोष्टीबद्दल ठार करू इच्छिता की तो म्हणतो की माझा स्वामी व पालनकर्ता अल्लाह आहे आणि तुमच्या पालनकर्त्यातर्फे स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, जर तो खोटा आहे, तर त्याच्या खोटेपणाचे संकट त्याच्यावरच आहे आणि जर तो सच्चा आहे तर तो ज्या (शिक्षा - यातनां) चा वायदा तुम्हाला देत आहे, त्यापैकी एक ना एक तुमच्यावर (नक्कीच) येऊन कोसळेल. अल्लाह, अशा लोकांना मार्ग दाखवित नाही जे मर्यादा ओलांडणारे आणि खोटारडे असावेत
Surah Ghafir, Verse 28


يَٰقَوۡمِ لَكُمُ ٱلۡمُلۡكُ ٱلۡيَوۡمَ ظَٰهِرِينَ فِي ٱلۡأَرۡضِ فَمَن يَنصُرُنَا مِنۢ بَأۡسِ ٱللَّهِ إِن جَآءَنَاۚ قَالَ فِرۡعَوۡنُ مَآ أُرِيكُمۡ إِلَّا مَآ أَرَىٰ وَمَآ أَهۡدِيكُمۡ إِلَّا سَبِيلَ ٱلرَّشَادِ

२९. हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! आज तर राज्य तुमचे आहे की तुम्ही या धरतीवर वर्चस्वशाली आहात, परंतु जर अल्लाहचा अज़ाब (प्रकोप) आमच्यावर झाला तर कोण आमची मदत करेल? फिरऔन म्हणाला की मी तर तुम्हाला तोच सल्ला देत आहे, जे स्वतः पाहत आहे आणि मी तर तुम्हाला भलाईचाच मार्ग दाखवित आहे
Surah Ghafir, Verse 29


وَقَالَ ٱلَّذِيٓ ءَامَنَ يَٰقَوۡمِ إِنِّيٓ أَخَافُ عَلَيۡكُم مِّثۡلَ يَوۡمِ ٱلۡأَحۡزَابِ

३०. आणि तो ईमान राखणारा म्हणाला की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मला तर हे भय जाणवते की कदाचित तुमच्यावरही तसाच दिवस (अज़ाब) न यावा, जसा दुसऱ्या जनसमूहांवर आला
Surah Ghafir, Verse 30


مِثۡلَ دَأۡبِ قَوۡمِ نُوحٖ وَعَادٖ وَثَمُودَ وَٱلَّذِينَ مِنۢ بَعۡدِهِمۡۚ وَمَا ٱللَّهُ يُرِيدُ ظُلۡمٗا لِّلۡعِبَادِ

३१. जशी नूहच्या जनसमूहाची आणि आद व समूद आणि त्यांच्यानंतरच्या समुदायांची (अवस्था झाली) आणि अल्लाह आपल्या दासांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करू इच्छित नाही
Surah Ghafir, Verse 31


وَيَٰقَوۡمِ إِنِّيٓ أَخَافُ عَلَيۡكُمۡ يَوۡمَ ٱلتَّنَادِ

३२. आणि हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मला तर तुमच्याविषयी पुकारल्या जाण्याच्या दिवसाचेही भय आहे
Surah Ghafir, Verse 32


يَوۡمَ تُوَلُّونَ مُدۡبِرِينَ مَا لَكُم مِّنَ ٱللَّهِ مِنۡ عَاصِمٖۗ وَمَن يُضۡلِلِ ٱللَّهُ فَمَا لَهُۥ مِنۡ هَادٖ

३३. ज्या दिवशी पाठ फिरवून परताल. तुम्हाला अल्लाहपासून वाचविणारा कोणीही नसेल आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही
Surah Ghafir, Verse 33


وَلَقَدۡ جَآءَكُمۡ يُوسُفُ مِن قَبۡلُ بِٱلۡبَيِّنَٰتِ فَمَا زِلۡتُمۡ فِي شَكّٖ مِّمَّا جَآءَكُم بِهِۦۖ حَتَّىٰٓ إِذَا هَلَكَ قُلۡتُمۡ لَن يَبۡعَثَ ٱللَّهُ مِنۢ بَعۡدِهِۦ رَسُولٗاۚ كَذَٰلِكَ يُضِلُّ ٱللَّهُ مَنۡ هُوَ مُسۡرِفٞ مُّرۡتَابٌ

३४. आणि त्यापूर्वी तुमच्याजवळ यूसुफ निशाण्या घेऊन आले. तरीही तुम्ही त्यांनी आणलेल्या निशाण्यांबाबत शंका संशय करीतच राहिले, येथपर्यंत की जेव्हा त्यांचा मृत्यु झाला, तेव्हा तुम्ही म्हणू लागले की त्यांच्यानंतर तर अल्लाह एखादा पैगंबर पाठविणारच नाही. अशा प्रकारे अल्लाह त्या प्रत्येक माणसाला पथभ्रष्ट करतो, जो मर्यादेचे उल्लंघन करणारा आणि शंका - संशय करणारा असावा
Surah Ghafir, Verse 34


ٱلَّذِينَ يُجَٰدِلُونَ فِيٓ ءَايَٰتِ ٱللَّهِ بِغَيۡرِ سُلۡطَٰنٍ أَتَىٰهُمۡۖ كَبُرَ مَقۡتًا عِندَ ٱللَّهِ وَعِندَ ٱلَّذِينَ ءَامَنُواْۚ كَذَٰلِكَ يَطۡبَعُ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ قَلۡبِ مُتَكَبِّرٖ جَبَّارٖ

३५. जे कसल्याही पुराव्याविना, जो त्यांच्याजवळ आला असेल, अल्लाहच्या आयतींबाबत वाद घालतात, ही गोष्टी अल्लाह आणि ईमान राखणाऱ्यांच्या नजीक फार नाराजीची गोष्टी आहे, अशा प्रकारे अल्लाह, प्रत्येक घमेंडी, अवज्ञाकारी माणसाच्या हृदयावर मोहर लावतो
Surah Ghafir, Verse 35


وَقَالَ فِرۡعَوۡنُ يَٰهَٰمَٰنُ ٱبۡنِ لِي صَرۡحٗا لَّعَلِّيٓ أَبۡلُغُ ٱلۡأَسۡبَٰبَ

३६. आणि फिरऔन म्हणाले, हे हामान! माझ्यासाठी एक उंच महाल बनव, कदाचित मी त्या दरवाज्यांपर्यर्ंत पोहोचावे
Surah Ghafir, Verse 36


أَسۡبَٰبَ ٱلسَّمَٰوَٰتِ فَأَطَّلِعَ إِلَىٰٓ إِلَٰهِ مُوسَىٰ وَإِنِّي لَأَظُنُّهُۥ كَٰذِبٗاۚ وَكَذَٰلِكَ زُيِّنَ لِفِرۡعَوۡنَ سُوٓءُ عَمَلِهِۦ وَصُدَّ عَنِ ٱلسَّبِيلِۚ وَمَا كَيۡدُ فِرۡعَوۡنَ إِلَّا فِي تَبَابٖ

३७. जे आकाशाचे दरवाजे आहेत आणि मूसाच्या उपास्या (ईश्वरा) ला डोकावून पाहावे आणि माझी तर पूर्ण खात्री आहे की तो खोटारडा आहे आणि अशा प्रकारे फिरऔनची वाईट कृत्ये त्याच्या नजरेत भली चांगली दाखविली गेलीत आणि त्याला सन्मार्गापासून रोखले गेले आणि फिरौनचे (प्रत्येक) कट-कारस्थान विनाशातच राहिले
Surah Ghafir, Verse 37


وَقَالَ ٱلَّذِيٓ ءَامَنَ يَٰقَوۡمِ ٱتَّبِعُونِ أَهۡدِكُمۡ سَبِيلَ ٱلرَّشَادِ

३८. आणि तो ईमान राखणारा मनुष्य म्हणाला की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही (सर्व) माझे अनुसरण करा मी नेकीच्या मार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करेन
Surah Ghafir, Verse 38


يَٰقَوۡمِ إِنَّمَا هَٰذِهِ ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَا مَتَٰعٞ وَإِنَّ ٱلۡأٓخِرَةَ هِيَ دَارُ ٱلۡقَرَارِ

३९. हे माझ्या समुदायाच्या लोकांनो! या जगाचे हे जीवन नाश पावणारी सामुग्री आहे. (विश्वास करा की शांती) आणि कायमस्वरूपी घर तर आखिरतच आहे
Surah Ghafir, Verse 39


مَنۡ عَمِلَ سَيِّئَةٗ فَلَا يُجۡزَىٰٓ إِلَّا مِثۡلَهَاۖ وَمَنۡ عَمِلَ صَٰلِحٗا مِّن ذَكَرٍ أَوۡ أُنثَىٰ وَهُوَ مُؤۡمِنٞ فَأُوْلَـٰٓئِكَ يَدۡخُلُونَ ٱلۡجَنَّةَ يُرۡزَقُونَ فِيهَا بِغَيۡرِ حِسَابٖ

४०. ज्याने अपराध (दुष्कर्म केला आहे, त्याला तर तेवढाच मोबदला मिळेल आणि ज्याने नेकी (सत्कर्म) केले आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री आणि तो ईमान राखणाराही असेल तर असे लोक१ जन्नतमध्ये दाखल होतील आणि तिथे अगणित रोजी (आजिविका) प्राप्त करतील
Surah Ghafir, Verse 40


۞وَيَٰقَوۡمِ مَا لِيٓ أَدۡعُوكُمۡ إِلَى ٱلنَّجَوٰةِ وَتَدۡعُونَنِيٓ إِلَى ٱلنَّارِ

४१. आणि हे माझ्या जमातीच्या लोकांनो! हे काय की मी तुम्हाला मुक्तीकडे बोलावित आहे आणि तुम्ही, मला जहन्नमकडे बोलावित आहात
Surah Ghafir, Verse 41


تَدۡعُونَنِي لِأَكۡفُرَ بِٱللَّهِ وَأُشۡرِكَ بِهِۦ مَا لَيۡسَ لِي بِهِۦ عِلۡمٞ وَأَنَا۠ أَدۡعُوكُمۡ إِلَى ٱلۡعَزِيزِ ٱلۡغَفَّـٰرِ

४२. तुम्ही मला या गोष्टीचे आमंत्रण देत आहात की मी अल्लाहचा इन्कार करावा आणि (दुसऱ्याला) त्याचा सहभागी करावे, ज्याचे मला कसलेही ज्ञान नाही, आणि मी तुम्हाला वर्चस्वशाली, माफ करणाऱ्या (अल्लाह) कडे बोलावित आहे
Surah Ghafir, Verse 42


لَا جَرَمَ أَنَّمَا تَدۡعُونَنِيٓ إِلَيۡهِ لَيۡسَ لَهُۥ دَعۡوَةٞ فِي ٱلدُّنۡيَا وَلَا فِي ٱلۡأٓخِرَةِ وَأَنَّ مَرَدَّنَآ إِلَى ٱللَّهِ وَأَنَّ ٱلۡمُسۡرِفِينَ هُمۡ أَصۡحَٰبُ ٱلنَّارِ

४३. हे अगदी निश्चित की तुम्ही मला ज्याच्याकडे बोलावित आहात, तो ना तर या जगात पुकारण्यायोग्य आहे आणि ना आखिरतमध्ये आणि हे देखील अगदी निश्चित की आम्हा सर्वांचे परतणे अल्लाहच्याकडे आहे आणि मर्यादेचे उल्लंघन करणारे निश्चितच जहन्नमी आहेत
Surah Ghafir, Verse 43


فَسَتَذۡكُرُونَ مَآ أَقُولُ لَكُمۡۚ وَأُفَوِّضُ أَمۡرِيٓ إِلَى ٱللَّهِۚ إِنَّ ٱللَّهَ بَصِيرُۢ بِٱلۡعِبَادِ

४४. तेव्हा भविष्यात तुम्ही माझ्या गोष्टींची (बोलण्याची) आठवण कराल, मी आपला मामला अल्लाहच्या हवाली करतो, निःसंशय, अल्लाह आपल्या दासांना पाहणारा आहे
Surah Ghafir, Verse 44


فَوَقَىٰهُ ٱللَّهُ سَيِّـَٔاتِ مَا مَكَرُواْۖ وَحَاقَ بِـَٔالِ فِرۡعَوۡنَ سُوٓءُ ٱلۡعَذَابِ

४५. तेव्हा अल्लाहने त्याला त्या सर्व वाईट गोष्टीपासून सुरक्षित ठेवले ज्या, त्या लोकांनी योजिल्या होत्या आणि फिरऔनच्या अनुयायींवर मोठ्या वाईट प्रकारचा अज़ाब कोसळला
Surah Ghafir, Verse 45


ٱلنَّارُ يُعۡرَضُونَ عَلَيۡهَا غُدُوّٗا وَعَشِيّٗاۚ وَيَوۡمَ تَقُومُ ٱلسَّاعَةُ أَدۡخِلُوٓاْ ءَالَ فِرۡعَوۡنَ أَشَدَّ ٱلۡعَذَابِ

४६. आग आहे जिच्यासमोर हे प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ आणले जातात, आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल (आदेश दिला जाईल की) फिरऔनच्या अनुयायींना अतिशय कठोर शिक्षा - यातनेत टाका
Surah Ghafir, Verse 46


وَإِذۡ يَتَحَآجُّونَ فِي ٱلنَّارِ فَيَقُولُ ٱلضُّعَفَـٰٓؤُاْ لِلَّذِينَ ٱسۡتَكۡبَرُوٓاْ إِنَّا كُنَّا لَكُمۡ تَبَعٗا فَهَلۡ أَنتُم مُّغۡنُونَ عَنَّا نَصِيبٗا مِّنَ ٱلنَّارِ

४७. आणि जेव्हा ते जहन्नममध्ये एकमेकांशी भांडतील, तेव्हा कमजोर लोक, मोठ्या लोकांना (ज्यांच्या ताब्यात हे होते) म्हणतील की, आम्ही तर तुमचे अनुयायी होतो, तर काय आता तुम्ही आमच्यापासून या आगीचा एखादा हिस्सा हटवू शकता
Surah Ghafir, Verse 47


قَالَ ٱلَّذِينَ ٱسۡتَكۡبَرُوٓاْ إِنَّا كُلّٞ فِيهَآ إِنَّ ٱللَّهَ قَدۡ حَكَمَ بَيۡنَ ٱلۡعِبَادِ

४८. ते मोठे लोक उत्तर देतील की आम्ही तर सर्व याच आगीत आहोत. अल्लाहने आपल्या दासांच्या दरम्यान फैसला केलेला आहे
Surah Ghafir, Verse 48


وَقَالَ ٱلَّذِينَ فِي ٱلنَّارِ لِخَزَنَةِ جَهَنَّمَ ٱدۡعُواْ رَبَّكُمۡ يُخَفِّفۡ عَنَّا يَوۡمٗا مِّنَ ٱلۡعَذَابِ

४९. आणि सर्व जहन्नमी लोक (एकत्र होऊन) जहन्नमच्या रक्षकांना सांगतील की तुम्हीच आपल्या पालनकर्त्यास दुआ (प्रार्थना) करा की त्याने कोणा एका दिवशी आमच्या शिक्षेत कमी करावी
Surah Ghafir, Verse 49


قَالُوٓاْ أَوَلَمۡ تَكُ تَأۡتِيكُمۡ رُسُلُكُم بِٱلۡبَيِّنَٰتِۖ قَالُواْ بَلَىٰۚ قَالُواْ فَٱدۡعُواْۗ وَمَا دُعَـٰٓؤُاْ ٱلۡكَٰفِرِينَ إِلَّا فِي ضَلَٰلٍ

५०. ते उत्तर देतील की काय तुमच्याजवळ तुमचे पैगंबर चमत्कार (मोजिजे) घेऊन आले नव्हते. ते म्हणतील, का नाही? त्यावर ते म्हणतील, मग तुम्हीच दुआ - प्रार्थना करा आणि काफिर लोकांची दुआ (प्रार्थना) अगदी (निष्प्रभ आणि) व्यर्थ आहे
Surah Ghafir, Verse 50


إِنَّا لَنَنصُرُ رُسُلَنَا وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ فِي ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَا وَيَوۡمَ يَقُومُ ٱلۡأَشۡهَٰدُ

५१. निःसंशय, आम्ही आपल्या पैगंबरांची आणि ईमान राखणाऱ्यांची या जगाच्या जीवनातही मदत करू आणि त्या दिवशीही, जेव्हा साक्ष देणारे उभे राहतील
Surah Ghafir, Verse 51


يَوۡمَ لَا يَنفَعُ ٱلظَّـٰلِمِينَ مَعۡذِرَتُهُمۡۖ وَلَهُمُ ٱللَّعۡنَةُ وَلَهُمۡ سُوٓءُ ٱلدَّارِ

५२. ज्या दिवशी अत्याचारी लोकांची लाचारी काहीच फायदा देणार नाही आणि त्यांच्यासाठी धिःक्कार असेल आणि त्यांच्यासाठी वाईट घर असेल
Surah Ghafir, Verse 52


وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا مُوسَى ٱلۡهُدَىٰ وَأَوۡرَثۡنَا بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ ٱلۡكِتَٰبَ

५३. आणि आम्ही मूसाला मार्गदर्शन प्रदान केले आणि इस्राईलच्या संततीला या ग्रंथाचा उत्तराधिकारी बनविले
Surah Ghafir, Verse 53


هُدٗى وَذِكۡرَىٰ لِأُوْلِي ٱلۡأَلۡبَٰبِ

५४. की बुद्धिमानांकरिता तो, मार्गदर्शन आणि बोध होता
Surah Ghafir, Verse 54


فَٱصۡبِرۡ إِنَّ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٞ وَٱسۡتَغۡفِرۡ لِذَنۢبِكَ وَسَبِّحۡ بِحَمۡدِ رَبِّكَ بِٱلۡعَشِيِّ وَٱلۡإِبۡكَٰرِ

५५. तेव्हा (हे पैगंबर!) तुम्ही धीर - संयम राखा, अल्लाहचा वायदा अगदी सच्चा आहे, तुम्ही आपल्या अपराधांची क्षमा मागत राहा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान व स्तुती - प्रशंसा करीत राहा
Surah Ghafir, Verse 55


إِنَّ ٱلَّذِينَ يُجَٰدِلُونَ فِيٓ ءَايَٰتِ ٱللَّهِ بِغَيۡرِ سُلۡطَٰنٍ أَتَىٰهُمۡ إِن فِي صُدُورِهِمۡ إِلَّا كِبۡرٞ مَّا هُم بِبَٰلِغِيهِۚ فَٱسۡتَعِذۡ بِٱللَّهِۖ إِنَّهُۥ هُوَ ٱلسَّمِيعُ ٱلۡبَصِيرُ

५६. निःसंशय, जे लोक आपल्याजवळ कोणतेही प्रमाण नसतानाही अल्लाहच्या आयतींबाबत वाद घालतात, त्यांच्या मनात अहंकाराशिवाय दुसरे काही नाही, जे या मोठेपणापर्यंत पोहचवणार नाहीत तेव्हा तुम्ही अल्लाहचे शरण मागत राहा. निःसंशय, तो पूर्णपणे ऐकणारा आणि सर्वाधिक पाहणारा आहे
Surah Ghafir, Verse 56


لَخَلۡقُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ أَكۡبَرُ مِنۡ خَلۡقِ ٱلنَّاسِ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعۡلَمُونَ

५७. आकाशांची आणि धरतीची निर्मिती निश्चितच मानवांच्या निर्मितीपेक्षा फार मोठे काम आहे, परंतु (ही गोष्ट वेगळी की) बहुतेक लोक हे जाणत नाहीत
Surah Ghafir, Verse 57


وَمَا يَسۡتَوِي ٱلۡأَعۡمَىٰ وَٱلۡبَصِيرُ وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ وَلَا ٱلۡمُسِيٓءُۚ قَلِيلٗا مَّا تَتَذَكَّرُونَ

५८. आणि आंधळा व डोळस दोघे समान नाही, ना ते लोक, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, दुष्कर्म करणाऱ्यांच्या (समान आहेत) तुम्ही (फारच) कमी बोध ग्रहण करीत आहात
Surah Ghafir, Verse 58


إِنَّ ٱلسَّاعَةَ لَأٓتِيَةٞ لَّا رَيۡبَ فِيهَا وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يُؤۡمِنُونَ

५९. कयामत खात्रीने आणि निःसंशय येणार आहे, तथापि (ही गोष्ट वेगळी की) अधिकांश लोक ईमान राखत नाहीत
Surah Ghafir, Verse 59


وَقَالَ رَبُّكُمُ ٱدۡعُونِيٓ أَسۡتَجِبۡ لَكُمۡۚ إِنَّ ٱلَّذِينَ يَسۡتَكۡبِرُونَ عَنۡ عِبَادَتِي سَيَدۡخُلُونَ جَهَنَّمَ دَاخِرِينَ

६०. आणि तुमच्या पालनकर्त्याचा आदेश (लागू झालेला आहे) की मला दुआ (प्रार्थना) करा, मी तुमच्या दुआ (प्रार्थना) ना कबूल करेन, निःसंशय जे लोक माझ्या उपासनेशी घमेंड करतात, ते लवकरच अपमानित होऊन जहन्नममध्ये दाखल होतील
Surah Ghafir, Verse 60


ٱللَّهُ ٱلَّذِي جَعَلَ لَكُمُ ٱلَّيۡلَ لِتَسۡكُنُواْ فِيهِ وَٱلنَّهَارَ مُبۡصِرًاۚ إِنَّ ٱللَّهَ لَذُو فَضۡلٍ عَلَى ٱلنَّاسِ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يَشۡكُرُونَ

६१. अल्लाहने तुमच्यासाठी रात्र बनविली आहे की तुम्ही तिच्यात आराम करू शकावे आणि दिवसाला, दाखविणारा बनविले. निःसंशय अल्लाह लोकांवर उपकार (कृपा) आणि दया करणारा आहे, परंतु अधिकांश लोक कृतज्ञता व्यक्त करीत नाही
Surah Ghafir, Verse 61


ذَٰلِكُمُ ٱللَّهُ رَبُّكُمۡ خَٰلِقُ كُلِّ شَيۡءٖ لَّآ إِلَٰهَ إِلَّا هُوَۖ فَأَنَّىٰ تُؤۡفَكُونَ

६२. हाच अल्लाह आहे तुम्हा सर्वांचा पालनपोषण करणारा. प्रत्येक वस्तूंचा रचयिता, त्याच्याखेरीज कोणीही सच्चा उपास्य (माबूद) नाही, मग तुम्ही कोणत्या बाजूला भटकविले जात आहात
Surah Ghafir, Verse 62


كَذَٰلِكَ يُؤۡفَكُ ٱلَّذِينَ كَانُواْ بِـَٔايَٰتِ ٱللَّهِ يَجۡحَدُونَ

६३. त्याच प्रकारे ते लोक देखील बहकाविले जात राहिले, जे अल्लाहच्या आयतींचा इन्कार करीत होते
Surah Ghafir, Verse 63


ٱللَّهُ ٱلَّذِي جَعَلَ لَكُمُ ٱلۡأَرۡضَ قَرَارٗا وَٱلسَّمَآءَ بِنَآءٗ وَصَوَّرَكُمۡ فَأَحۡسَنَ صُوَرَكُمۡ وَرَزَقَكُم مِّنَ ٱلطَّيِّبَٰتِۚ ذَٰلِكُمُ ٱللَّهُ رَبُّكُمۡۖ فَتَبَارَكَ ٱللَّهُ رَبُّ ٱلۡعَٰلَمِينَ

६४. तो अल्लाह होय, ज्याने तुमच्यासाठी जमिनीला राहण्याचे ठिकाण आणि आकाशाला छत बनविले आणि तुम्हाला रूप दिले आणि खूप चांगले बनविले आणि तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या वस्तू खाण्यासाठी दिल्यात. तोच अल्लाह तुमचा पालनकर्ता आहे. तेव्हा मोठा शुभ आहे अल्लाह, जो समस्त विश्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे
Surah Ghafir, Verse 64


هُوَ ٱلۡحَيُّ لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَ فَٱدۡعُوهُ مُخۡلِصِينَ لَهُ ٱلدِّينَۗ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِ رَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ

६५. तो जिवंत आहे, त्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही, तेव्हा तुम्ही विशुद्ध मनाने त्याचीच उपासना करीत त्याला पुकारा, सर्व प्रशंसा अल्लाह करीताच आहे, जो समस्त विश्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे
Surah Ghafir, Verse 65


۞قُلۡ إِنِّي نُهِيتُ أَنۡ أَعۡبُدَ ٱلَّذِينَ تَدۡعُونَ مِن دُونِ ٱللَّهِ لَمَّا جَآءَنِيَ ٱلۡبَيِّنَٰتُ مِن رَّبِّي وَأُمِرۡتُ أَنۡ أُسۡلِمَ لِرَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ

६६. (तुम्ही) सांगा की मला त्यांची उपासना करण्यापासून रोखले गेले आहे, ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारत आहात१ या कारणास्तव की माझ्याजवळ माझ्या पालनकर्त्याचे स्पष्ट पुरावे येऊन पोहोचले आहेत. मला हा आदेश दिला गेला आहे की मी समस्त विश्वांच्या पालनकर्त्याच्या हुकुमाअधीन व्हावे
Surah Ghafir, Verse 66


هُوَ ٱلَّذِي خَلَقَكُم مِّن تُرَابٖ ثُمَّ مِن نُّطۡفَةٖ ثُمَّ مِنۡ عَلَقَةٖ ثُمَّ يُخۡرِجُكُمۡ طِفۡلٗا ثُمَّ لِتَبۡلُغُوٓاْ أَشُدَّكُمۡ ثُمَّ لِتَكُونُواْ شُيُوخٗاۚ وَمِنكُم مَّن يُتَوَفَّىٰ مِن قَبۡلُۖ وَلِتَبۡلُغُوٓاْ أَجَلٗا مُّسَمّٗى وَلَعَلَّكُمۡ تَعۡقِلُونَ

६७. तोच होय, ज्याने तुम्हाला मातीपासून, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या (जमलेल्या) गोळ्यापासून निर्माण केले, मग तुम्हाला अर्भकाच्या स्वरूपात बाहेर काढले, मग तो तुम्हाला वाढीस लावतो की तुम्ही आपल्या पूर्ण शक्ती - सामर्थ्यास पोहोचावे, मग म्हातारे व्हावे आणि तुमच्यापैकी काहींचा याच्या आधीच मृत्यु होतो (आणि तो तुम्हाला सोडून देतो यासाठी की तुम्ही निर्धारित आयुपर्यर्ंत पोहोचावे आणि यासाठी की तुम्ही विचार - चिंतन करावे)
Surah Ghafir, Verse 67


هُوَ ٱلَّذِي يُحۡيِۦ وَيُمِيتُۖ فَإِذَا قَضَىٰٓ أَمۡرٗا فَإِنَّمَا يَقُولُ لَهُۥ كُن فَيَكُونُ

६८. तोच होय, जो जीवन आणि मृत्यु देतो, मग जेव्हा तो एखादे कार्य करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्यास फक्त एवढेच म्हणतो ‘घडून ये’ आणि ते घडून येते
Surah Ghafir, Verse 68


أَلَمۡ تَرَ إِلَى ٱلَّذِينَ يُجَٰدِلُونَ فِيٓ ءَايَٰتِ ٱللَّهِ أَنَّىٰ يُصۡرَفُونَ

६९. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे अल्लाहच्या आयतींसदर्भात वाद घालतात. त्यांना कोठे परतविले जात आहे
Surah Ghafir, Verse 69


ٱلَّذِينَ كَذَّبُواْ بِٱلۡكِتَٰبِ وَبِمَآ أَرۡسَلۡنَا بِهِۦ رُسُلَنَاۖ فَسَوۡفَ يَعۡلَمُونَ

७०. ज्या लोकांनी ग्रंथाला खोटे ठरविले आणि त्यालाही जो आम्ही आपल्या पैगंबरांसोबत पाठविला, त्यांना फार लवकर वस्तुस्थितीचे ज्ञान होईल
Surah Ghafir, Verse 70


إِذِ ٱلۡأَغۡلَٰلُ فِيٓ أَعۡنَٰقِهِمۡ وَٱلسَّلَٰسِلُ يُسۡحَبُونَ

७१. जेव्हा त्यांच्या गळ्यांमध्ये जोखड (तौक) असतील आणि शंखला असतील, फरफटत ओढून नेले जातील
Surah Ghafir, Verse 71


فِي ٱلۡحَمِيمِ ثُمَّ فِي ٱلنَّارِ يُسۡجَرُونَ

७२. उकळत्या पाण्यात आणि मग जहन्नमच्या आगीत जाळले जातील
Surah Ghafir, Verse 72


ثُمَّ قِيلَ لَهُمۡ أَيۡنَ مَا كُنتُمۡ تُشۡرِكُونَ

७३. मग त्यांना विचारले जाईल की ज्यांना तुम्ही (अल्लाहचे) सहभागी ठरवित होते, ते आहेत कोठे
Surah Ghafir, Verse 73


مِن دُونِ ٱللَّهِۖ قَالُواْ ضَلُّواْ عَنَّا بَل لَّمۡ نَكُن نَّدۡعُواْ مِن قَبۡلُ شَيۡـٔٗاۚ كَذَٰلِكَ يُضِلُّ ٱللَّهُ ٱلۡكَٰفِرِينَ

७४. जे अल्लाहखेरीज होते, ते म्हणतील की ते आमच्याकडून हरवलेत किंबहुना आम्ही तर यापूर्वी कोणालाही पुकारत नव्हतो. अल्लाह काफिर (इन्कारी) लोकांना अशाच प्रकारे मार्गभ्रष्ट करतो
Surah Ghafir, Verse 74


ذَٰلِكُم بِمَا كُنتُمۡ تَفۡرَحُونَ فِي ٱلۡأَرۡضِ بِغَيۡرِ ٱلۡحَقِّ وَبِمَا كُنتُمۡ تَمۡرَحُونَ

७५. हे अशासाठी की तुम्ही जमिनीवर नाहक तोरा मिरवित होते, आणि (व्यर्थ) डौल दाखवित फिरत होते
Surah Ghafir, Verse 75


ٱدۡخُلُوٓاْ أَبۡوَٰبَ جَهَنَّمَ خَٰلِدِينَ فِيهَاۖ فَبِئۡسَ مَثۡوَى ٱلۡمُتَكَبِّرِينَ

७६. (आता या) जहन्नमध्ये नेहमी नेहमी राहण्याकरिता (त्याच्या) दरवाज्यांमध्ये दाखल व्हा, केवढे वाईट ठिकाण आहे अहंकार करणाऱ्यांकरिता
Surah Ghafir, Verse 76


فَٱصۡبِرۡ إِنَّ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٞۚ فَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعۡضَ ٱلَّذِي نَعِدُهُمۡ أَوۡ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِلَيۡنَا يُرۡجَعُونَ

७७. तेव्हा तुम्ही धीर - संयम राखा, अल्लाहचा वायदा पूर्णतः सच्चा आहे. आम्ही त्यांना जो वायदा देऊन ठेवला आहे, त्यापैकी काही आम्ही तुम्हाला दाखवून द्यावे किंवा त्या आधी तुम्हाला मृत्यु द्यावा, त्यांचे परतविले जाणे तर आमच्याचकडे आहे
Surah Ghafir, Verse 77


وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا رُسُلٗا مِّن قَبۡلِكَ مِنۡهُم مَّن قَصَصۡنَا عَلَيۡكَ وَمِنۡهُم مَّن لَّمۡ نَقۡصُصۡ عَلَيۡكَۗ وَمَا كَانَ لِرَسُولٍ أَن يَأۡتِيَ بِـَٔايَةٍ إِلَّا بِإِذۡنِ ٱللَّهِۚ فَإِذَا جَآءَ أَمۡرُ ٱللَّهِ قُضِيَ بِٱلۡحَقِّ وَخَسِرَ هُنَالِكَ ٱلۡمُبۡطِلُونَ

७८. निःसंशय, आम्ही तुमच्या पूर्वीही अनेक रसूल (पैगंबर) पाठविले आहेत, ज्यांच्यापैकी काहींचे वृत्तांत आम्ही तुम्हाला ऐकविले आहेत. आणि त्यांच्यापैकी काहींचे वृत्तांत आम्ही तुम्हाला ऐकविले नाहीत आणि कोणा पैगंबराच्या (अवाक्यात हे) नव्हते की एखादा चमत्कार (मोजिजा) अल्लाहच्या अनुमतीविना आणू शकला असता, मग ज्या वेळी अल्लाहचा आदेश येईल, सत्यासह फैसला केला जाईल आणि त्या वेळी असत्याचे पुजारी नुकसानातच राहतील
Surah Ghafir, Verse 78


ٱللَّهُ ٱلَّذِي جَعَلَ لَكُمُ ٱلۡأَنۡعَٰمَ لِتَرۡكَبُواْ مِنۡهَا وَمِنۡهَا تَأۡكُلُونَ

७९. अल्लाह तो आहे ज्याने तुमच्यासाठी चतुष्पाद जनावरे (गुरे) निर्माण केलीत, ज्यांच्यापैकी काहींवर तुम्ही स्वार होता आणि काहींना तुम्ही खातात
Surah Ghafir, Verse 79


وَلَكُمۡ فِيهَا مَنَٰفِعُ وَلِتَبۡلُغُواْ عَلَيۡهَا حَاجَةٗ فِي صُدُورِكُمۡ وَعَلَيۡهَا وَعَلَى ٱلۡفُلۡكِ تُحۡمَلُونَ

८०. आणि इतरही तुमच्यासाठी त्यांच्यात अनेक फायदे आहेत, यासाठी की आपल्या मनात लपलेल्या गरजांना, त्यांच्यावर स्वार होऊन तुम्ही पूर्ण करून घ्यावे आणि ज्या जनावरांवर आणि नौकांवर तुम्ही स्वार केले जाता
Surah Ghafir, Verse 80


وَيُرِيكُمۡ ءَايَٰتِهِۦ فَأَيَّ ءَايَٰتِ ٱللَّهِ تُنكِرُونَ

८१. आणि अल्लाह तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवित आहे, तेव्हा तुम्ही अल्लाहच्या कोणकोणत्या निशाण्यांचा इन्कार करीत राहाल
Surah Ghafir, Verse 81


أَفَلَمۡ يَسِيرُواْ فِي ٱلۡأَرۡضِ فَيَنظُرُواْ كَيۡفَ كَانَ عَٰقِبَةُ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡۚ كَانُوٓاْ أَكۡثَرَ مِنۡهُمۡ وَأَشَدَّ قُوَّةٗ وَءَاثَارٗا فِي ٱلۡأَرۡضِ فَمَآ أَغۡنَىٰ عَنۡهُم مَّا كَانُواْ يَكۡسِبُونَ

८२. किंवा त्यांनी धरतीवर हिंडून फिरून आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची परिणति नाही पाहिली, जे संख्येत यांच्यापेक्षा जास्त होते, शक्ती - सामर्थ्यात सक्त आणि धरतीत त्यांनी अनेक अवशेष मागे सोडले होते. (परंतु) त्यांच्या केलेल्या कार्यांनी त्यांना किंचितही लाभ पोहचविला नाही
Surah Ghafir, Verse 82


فَلَمَّا جَآءَتۡهُمۡ رُسُلُهُم بِٱلۡبَيِّنَٰتِ فَرِحُواْ بِمَا عِندَهُم مِّنَ ٱلۡعِلۡمِ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ

८३. तर जेव्हा जेव्हा त्यांच्याजवळ त्यांचे रसूल (पैगंबर) स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तेव्हा हे आपल्याजवळ असलेल्या ज्ञानावर घमेंड दाखवू लागले. शेवटी ज्या गोष्टीची थट्टा उडवित होते, तीच त्यांच्यावर उलटली
Surah Ghafir, Verse 83


فَلَمَّا رَأَوۡاْ بَأۡسَنَا قَالُوٓاْ ءَامَنَّا بِٱللَّهِ وَحۡدَهُۥ وَكَفَرۡنَا بِمَا كُنَّا بِهِۦ مُشۡرِكِينَ

८४. मग आमची शिक्षा-यातना पाहताच म्हणू लागले की एकमेव अल्लाहवर आम्ही ईमान राखले आणि ज्यांना ज्यांना आम्ही त्याचा सहभागी ठरवित होतो, आम्ही त्या सर्वांचा इन्कार केला
Surah Ghafir, Verse 84


فَلَمۡ يَكُ يَنفَعُهُمۡ إِيمَٰنُهُمۡ لَمَّا رَأَوۡاْ بَأۡسَنَاۖ سُنَّتَ ٱللَّهِ ٱلَّتِي قَدۡ خَلَتۡ فِي عِبَادِهِۦۖ وَخَسِرَ هُنَالِكَ ٱلۡكَٰفِرُونَ

८५. परंतु आमच्या शिक्षा - यातनेला पाहून घेतल्यानंतर त्यांच्या ईमान राखण्याने त्यांना लाभ दिला नाही, अल्लाहने आपला हाच नियम निर्धारित केलेला आहे, जो त्याच्या दासांमध्ये सतत चालत आला आहे आणि त्या ठिकाणी काफिर दुर्दशाग्रस्त (आणि दुर्बल) झाले
Surah Ghafir, Verse 85


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 39
>> Surah 41

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai