UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Az-Zukhruf - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


حمٓ

१. हा - मीम
Surah Az-Zukhruf, Verse 1


وَٱلۡكِتَٰبِ ٱلۡمُبِينِ

२. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची
Surah Az-Zukhruf, Verse 2


إِنَّا جَعَلۡنَٰهُ قُرۡءَٰنًا عَرَبِيّٗا لَّعَلَّكُمۡ تَعۡقِلُونَ

३. आम्ही यास अरबी भाषेचा कुरआन बनविला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे
Surah Az-Zukhruf, Verse 3


وَإِنَّهُۥ فِيٓ أُمِّ ٱلۡكِتَٰبِ لَدَيۡنَا لَعَلِيٌّ حَكِيمٌ

४. आणि निःसंशय, हा सुरक्षित ग्रंथात आहे आणि आमच्या निकट उच्च दर्जाचा आहे. बुद्धी-कौशल्यपूर्ण आहे
Surah Az-Zukhruf, Verse 4


أَفَنَضۡرِبُ عَنكُمُ ٱلذِّكۡرَ صَفۡحًا أَن كُنتُمۡ قَوۡمٗا مُّسۡرِفِينَ

५. काय आम्ही या सदुपदेशाला तुमच्यापासून या कारणास्तव हटवावे की तुम्ही मर्यादा ओलांडणारे लोक आहात
Surah Az-Zukhruf, Verse 5


وَكَمۡ أَرۡسَلۡنَا مِن نَّبِيّٖ فِي ٱلۡأَوَّلِينَ

६. आणि आम्ही पूर्वीच्या जनसमूहांमध्येही अनेक पैगंबर पाठविले
Surah Az-Zukhruf, Verse 6


وَمَا يَأۡتِيهِم مِّن نَّبِيٍّ إِلَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ

७. आणि जो देखील पैगंबर त्यांच्याजवळ आला, त्यांनी त्याची थट्टाच उडविली
Surah Az-Zukhruf, Verse 7


فَأَهۡلَكۡنَآ أَشَدَّ مِنۡهُم بَطۡشٗا وَمَضَىٰ مَثَلُ ٱلۡأَوَّلِينَ

८. तेव्हा आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोकांना नष्ट करून टाकले आणि पूर्वीच्या लोकांची उदाहरणे दिली गेली आहेत
Surah Az-Zukhruf, Verse 8


وَلَئِن سَأَلۡتَهُم مَّنۡ خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ لَيَقُولُنَّ خَلَقَهُنَّ ٱلۡعَزِيزُ ٱلۡعَلِيمُ

९. आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले, तर निःसंशय त्यांचे उत्तर हेच असेल की, त्यांना सर्वांत जबरदस्त आणि सर्वाधिक ज्ञान बाळगणाऱ्या (अल्लाह) नेच निर्माण केले आहे
Surah Az-Zukhruf, Verse 9


ٱلَّذِي جَعَلَ لَكُمُ ٱلۡأَرۡضَ مَهۡدٗا وَجَعَلَ لَكُمۡ فِيهَا سُبُلٗا لَّعَلَّكُمۡ تَهۡتَدُونَ

१०. (तोच आहे) ज्याने तुमच्यासाठी जमिनीला बिछाईत (आणि अंथरुण) बनविले आणि तिच्यात तुमच्यासाठी रस्ते बनविले, यासाठी की तुम्ही मार्ग प्राप्त करून घ्यावा
Surah Az-Zukhruf, Verse 10


وَٱلَّذِي نَزَّلَ مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءَۢ بِقَدَرٖ فَأَنشَرۡنَا بِهِۦ بَلۡدَةٗ مَّيۡتٗاۚ كَذَٰلِكَ تُخۡرَجُونَ

११. आणि त्यानेच आकाशातून एका अनुमानानुसार पर्जन्यवृष्टी केली तेव्हा आम्ही त्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. याच प्रकारे तुम्ही बाहेर काढले जाल
Surah Az-Zukhruf, Verse 11


وَٱلَّذِي خَلَقَ ٱلۡأَزۡوَٰجَ كُلَّهَا وَجَعَلَ لَكُم مِّنَ ٱلۡفُلۡكِ وَٱلۡأَنۡعَٰمِ مَا تَرۡكَبُونَ

१२. आणि ज्याने सर्व वस्तूंच्या जोड्या१ बनविल्या आणि तुमच्या (वाहना) करिता नौका बनविल्या आणि चतुष्पाद पशु निर्माण केले, ज्यांच्यावर तुम्ही स्वार होता
Surah Az-Zukhruf, Verse 12


لِتَسۡتَوُۥاْ عَلَىٰ ظُهُورِهِۦ ثُمَّ تَذۡكُرُواْ نِعۡمَةَ رَبِّكُمۡ إِذَا ٱسۡتَوَيۡتُمۡ عَلَيۡهِ وَتَقُولُواْ سُبۡحَٰنَ ٱلَّذِي سَخَّرَ لَنَا هَٰذَا وَمَا كُنَّا لَهُۥ مُقۡرِنِينَ

१३. यासाठी की तुम्ही त्यांच्या पाठीवर स्वार व्हावे आणि जेव्हा तुम्ही यांच्यावर व्यवस्थित बसाल, तेव्हा आपल्या पालनकर्त्याने (प्रदान केलेल्या) देणग्यांचे स्मरण करा आणि म्हणा, मोठा पवित्र आहे तो, ज्याने यास आमच्या अधीन केले, अन्यथा यास काबूत आणण्याची आमची ताकद नव्हती
Surah Az-Zukhruf, Verse 13


وَإِنَّآ إِلَىٰ رَبِّنَا لَمُنقَلِبُونَ

१४. आणि निश्चितपणे आम्ही आपल्या पालनकर्त्याकडे परतणार आहोत
Surah Az-Zukhruf, Verse 14


وَجَعَلُواْ لَهُۥ مِنۡ عِبَادِهِۦ جُزۡءًاۚ إِنَّ ٱلۡإِنسَٰنَ لَكَفُورٞ مُّبِينٌ

१५. आणि त्यांनी अल्लाहच्या काही दासांना त्याचा अंश बनवून घेतले. निःसंशय, मनुष्य, स्पष्टपणे कृतघ्न आहे
Surah Az-Zukhruf, Verse 15


أَمِ ٱتَّخَذَ مِمَّا يَخۡلُقُ بَنَاتٖ وَأَصۡفَىٰكُم بِٱلۡبَنِينَ

१६. काय अल्लाहने आपल्या निर्मितीमधून कन्या, स्वतःसाठी राखल्यात आणि तुम्हाला पुत्रांनी सुशोभित केले
Surah Az-Zukhruf, Verse 16


وَإِذَا بُشِّرَ أَحَدُهُم بِمَا ضَرَبَ لِلرَّحۡمَٰنِ مَثَلٗا ظَلَّ وَجۡهُهُۥ مُسۡوَدّٗا وَهُوَ كَظِيمٌ

१७. जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला त्या गोष्टींची खबर दिली जाते जिचे उदाहरण त्याने दयावान अल्लाहकरिता सांगितले आहे, तेव्हा त्याचा चेहरा काळवंडतो आणि तो दुःखी होतो
Surah Az-Zukhruf, Verse 17


أَوَمَن يُنَشَّؤُاْ فِي ٱلۡحِلۡيَةِ وَهُوَ فِي ٱلۡخِصَامِ غَيۡرُ مُبِينٖ

१८. किंवा, काय (अल्लाहची संतती मुली आहेत) ज्या दाग-दागिन्यांत वाढतात आणि भांडण-तंट्यात (आपले म्हणणे) स्पष्ट बोलू शकत नाहीत
Surah Az-Zukhruf, Verse 18


وَجَعَلُواْ ٱلۡمَلَـٰٓئِكَةَ ٱلَّذِينَ هُمۡ عِبَٰدُ ٱلرَّحۡمَٰنِ إِنَٰثًاۚ أَشَهِدُواْ خَلۡقَهُمۡۚ سَتُكۡتَبُ شَهَٰدَتُهُمۡ وَيُسۡـَٔلُونَ

१९. आणि त्यांनी दयावान (अल्लाह) ची उपासना करणाऱ्या फरिश्त्यांना स्त्री बनवून टाकले. काय त्यांच्या निर्मितीच्या वेळी ते हजर होते? थ्यांची ही साक्ष लिहून घेतली जाईल आणि त्यांना त्यासंबंधी विचारणा केली जाईल
Surah Az-Zukhruf, Verse 19


وَقَالُواْ لَوۡ شَآءَ ٱلرَّحۡمَٰنُ مَا عَبَدۡنَٰهُمۗ مَّا لَهُم بِذَٰلِكَ مِنۡ عِلۡمٍۖ إِنۡ هُمۡ إِلَّا يَخۡرُصُونَ

२०. आणि म्हणतात की अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही त्यांची उपासना केली नसती. त्यांना त्याचे काहीच ज्ञान नाही. हे तर केवळ अटकळीच्या (खोट्या गोष्टी) बोलतात
Surah Az-Zukhruf, Verse 20


أَمۡ ءَاتَيۡنَٰهُمۡ كِتَٰبٗا مِّن قَبۡلِهِۦ فَهُم بِهِۦ مُسۡتَمۡسِكُونَ

२१. काय आम्ही यापूर्वी त्यांना (दुसरा) एखादा ग्रंथ प्रदान केला आहे ज्याला यांनी मजबूतपणे धरून ठेवले आहे
Surah Az-Zukhruf, Verse 21


بَلۡ قَالُوٓاْ إِنَّا وَجَدۡنَآ ءَابَآءَنَا عَلَىٰٓ أُمَّةٖ وَإِنَّا عَلَىٰٓ ءَاثَٰرِهِم مُّهۡتَدُونَ

२२. (नव्हे) किंबहुना हे तर म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका धर्मावर आढळले, आणि आम्ही त्यांच्याच पदचिन्हांवर चालून सन्मार्ग प्राप्त केला आहे
Surah Az-Zukhruf, Verse 22


وَكَذَٰلِكَ مَآ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ فِي قَرۡيَةٖ مِّن نَّذِيرٍ إِلَّا قَالَ مُتۡرَفُوهَآ إِنَّا وَجَدۡنَآ ءَابَآءَنَا عَلَىٰٓ أُمَّةٖ وَإِنَّا عَلَىٰٓ ءَاثَٰرِهِم مُّقۡتَدُونَ

२३. आणि अशाच प्रकारे तुमच्या पूर्वीही आम्ही, ज्या ज्या वस्तीत एखादा खबरदार करणारा पाठविला, तिथल्या सुखवस्तू लोकांनी हेच उत्तर दिले की आम्हाला आपले पूर्वज (वाडवडील) (एकाच पाऊलवाटेवर आणि) एका धर्मावर आढळले आणि आम्ही तर त्यांच्याच पदचिन्हांचे अनुसरण करणारे आहोत
Surah Az-Zukhruf, Verse 23


۞قَٰلَ أَوَلَوۡ جِئۡتُكُم بِأَهۡدَىٰ مِمَّا وَجَدتُّمۡ عَلَيۡهِ ءَابَآءَكُمۡۖ قَالُوٓاْ إِنَّا بِمَآ أُرۡسِلۡتُم بِهِۦ كَٰفِرُونَ

२४. (पैगंबराने) सांगितलेही की जरी मी त्याहून अधिक चांगल्या (ध्येयापर्यंत पोहचविणारा) मार्ग घेऊन आलो आहे, ज्यावर तुम्हाला आपले वाडवडील आढळले (तरीही तुम्ही त्यांचेच अनुसरण कराल?) तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ते मान्य करणार नाहीत, जे देऊन तुम्हाला पाठविले गेले आहे
Surah Az-Zukhruf, Verse 24


فَٱنتَقَمۡنَا مِنۡهُمۡۖ فَٱنظُرۡ كَيۡفَ كَانَ عَٰقِبَةُ ٱلۡمُكَذِّبِينَ

२५. तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि पाहा, खोटे ठरविणाऱ्यांचा काय परिणाम (अंत) झाला
Surah Az-Zukhruf, Verse 25


وَإِذۡ قَالَ إِبۡرَٰهِيمُ لِأَبِيهِ وَقَوۡمِهِۦٓ إِنَّنِي بَرَآءٞ مِّمَّا تَعۡبُدُونَ

२६. आणि जेव्हा इब्राहीम (अलै.) आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, मी त्या गोष्टींपासून अलग आहे, ज्यांची तुम्ही उपासना करता
Surah Az-Zukhruf, Verse 26


إِلَّا ٱلَّذِي فَطَرَنِي فَإِنَّهُۥ سَيَهۡدِينِ

२७. त्या शक्ती-सामर्थ्याखेरीज, ज्याने मला निर्माण केले आहे आणि तोच मला मार्गदर्शनही करेल
Surah Az-Zukhruf, Verse 27


وَجَعَلَهَا كَلِمَةَۢ بَاقِيَةٗ فِي عَقِبِهِۦ لَعَلَّهُمۡ يَرۡجِعُونَ

२८. आणि इब्राहीम (अलै.) तिलाच आपल्या संततीलाही बाकी राहणारी गोष्ट कायम करून गेले, यासाठी की लोकांनी (अनेकेश्वरउपासनेपासून) आपला बचाव करीत राहावे
Surah Az-Zukhruf, Verse 28


بَلۡ مَتَّعۡتُ هَـٰٓؤُلَآءِ وَءَابَآءَهُمۡ حَتَّىٰ جَآءَهُمُ ٱلۡحَقُّ وَرَسُولٞ مُّبِينٞ

२९. किंबहुना मी त्या लोकांना आणि त्यांच्या पूर्वजांना सामुग्री (आणि साधन) प्रदान केली, येथपावेतो की त्यांच्याजवळ सत्य आणि स्पष्टरित्या ऐकविणारा रसूल (पैगंबर) आला
Surah Az-Zukhruf, Verse 29


وَلَمَّا جَآءَهُمُ ٱلۡحَقُّ قَالُواْ هَٰذَا سِحۡرٞ وَإِنَّا بِهِۦ كَٰفِرُونَ

३०. आणि सत्य येऊन पोहोचताच हे उद्‌गारले की ही तर जादू आहे, आणि आम्ही याचा इन्कार करणारे आहोत
Surah Az-Zukhruf, Verse 30


وَقَالُواْ لَوۡلَا نُزِّلَ هَٰذَا ٱلۡقُرۡءَانُ عَلَىٰ رَجُلٖ مِّنَ ٱلۡقَرۡيَتَيۡنِ عَظِيمٍ

३१. आणि म्हणू लागले की हा कुरआन या दोन्ही वस्त्यांपैकी एखाद्या सुखसंपन्न माणसावर का अवतरित केला गेला नाही
Surah Az-Zukhruf, Verse 31


أَهُمۡ يَقۡسِمُونَ رَحۡمَتَ رَبِّكَۚ نَحۡنُ قَسَمۡنَا بَيۡنَهُم مَّعِيشَتَهُمۡ فِي ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَاۚ وَرَفَعۡنَا بَعۡضَهُمۡ فَوۡقَ بَعۡضٖ دَرَجَٰتٖ لِّيَتَّخِذَ بَعۡضُهُم بَعۡضٗا سُخۡرِيّٗاۗ وَرَحۡمَتُ رَبِّكَ خَيۡرٞ مِّمَّا يَجۡمَعُونَ

३२. काय तुमच्या पालनकर्त्याच्या दया-कृपेची हे विभागणी करतात? आम्हीच त्यांच्या ऐहिक जीवनाची (आजिविका) त्यांच्यात वाटून दिली आहे आणि एकाला दुसऱ्याहून अधिक चांगले केले आहे यासाठी की एकमेकांना अधीन करून घ्यावे आणि ज्याला हे लोक जमा करीत फिरत आहेत, त्याहून तुमच्या पालनकर्त्याची दया - कृपा अतिशय उत्तम आहे
Surah Az-Zukhruf, Verse 32


وَلَوۡلَآ أَن يَكُونَ ٱلنَّاسُ أُمَّةٗ وَٰحِدَةٗ لَّجَعَلۡنَا لِمَن يَكۡفُرُ بِٱلرَّحۡمَٰنِ لِبُيُوتِهِمۡ سُقُفٗا مِّن فِضَّةٖ وَمَعَارِجَ عَلَيۡهَا يَظۡهَرُونَ

३३. आणि जर अशी गोष्ट नसती की सर्व लोक एकाच पद्धतीचे अनुसरण करतील तर दयावान (रहमान) शी कुप्र (इन्कार) करणाऱ्यांच्या घरांची छते आम्ही चांदीची बनविली असती आणि जिने (पायऱ्या) देखील, ज्यावर ते चढतात
Surah Az-Zukhruf, Verse 33


وَلِبُيُوتِهِمۡ أَبۡوَٰبٗا وَسُرُرًا عَلَيۡهَا يَتَّكِـُٔونَ

३४. आणि त्यांच्या घरांचे दरवाजे व आसने देखील, ज्यावर ते तक्के (लोड) लावून बसतात
Surah Az-Zukhruf, Verse 34


وَزُخۡرُفٗاۚ وَإِن كُلُّ ذَٰلِكَ لَمَّا مَتَٰعُ ٱلۡحَيَوٰةِ ٱلدُّنۡيَاۚ وَٱلۡأٓخِرَةُ عِندَ رَبِّكَ لِلۡمُتَّقِينَ

३५. आणि सोन्याचेही, आणि हा सर्व काही या जगाचाच लाभ आहे, आणि आखिरत तर तुमच्या पालनकर्त्याच्या निकट केवळ नेक सदाचारी लोकांकरिताच आहे
Surah Az-Zukhruf, Verse 35


وَمَن يَعۡشُ عَن ذِكۡرِ ٱلرَّحۡمَٰنِ نُقَيِّضۡ لَهُۥ شَيۡطَٰنٗا فَهُوَ لَهُۥ قَرِينٞ

३६. आणि जो मनुष्य अल्लाहच्या स्मरणापासून सुस्ती करील, आम्ही त्याच्यावर एक सैतान निर्धारित करतो. तोच त्याचा साथीदार बनतो
Surah Az-Zukhruf, Verse 36


وَإِنَّهُمۡ لَيَصُدُّونَهُمۡ عَنِ ٱلسَّبِيلِ وَيَحۡسَبُونَ أَنَّهُم مُّهۡتَدُونَ

३७. आणि ते त्यांना (अल्लाहच्या) मार्गापासून रोखतात आणि हे याच विचारात राहतात की आम्ही मार्गदर्शन प्राप्त केलेले आहोत
Surah Az-Zukhruf, Verse 37


حَتَّىٰٓ إِذَا جَآءَنَا قَالَ يَٰلَيۡتَ بَيۡنِي وَبَيۡنَكَ بُعۡدَ ٱلۡمَشۡرِقَيۡنِ فَبِئۡسَ ٱلۡقَرِينُ

३८. येथेपर्यंत की जेव्हा तो आमच्याजवळ येईल, तेव्हा म्हणेल की माझ्या आणि तुझ्या दरम्यान पूर्व आणि पश्चिमेचे अंतर असते तर फार बरे झाले असते. तू मोठा वाईट सोबती आहेस
Surah Az-Zukhruf, Verse 38


وَلَن يَنفَعَكُمُ ٱلۡيَوۡمَ إِذ ظَّلَمۡتُمۡ أَنَّكُمۡ فِي ٱلۡعَذَابِ مُشۡتَرِكُونَ

३९. आणि जेव्हा तुम्ही अत्याचार करूनच बसाल तर तुम्हाला आज कधीही तुम्हा सर्वांच्या शिक्षा - यातनेत सहभागी होणे काहीच लाभदायक ठरणार नाही
Surah Az-Zukhruf, Verse 39


أَفَأَنتَ تُسۡمِعُ ٱلصُّمَّ أَوۡ تَهۡدِي ٱلۡعُمۡيَ وَمَن كَانَ فِي ضَلَٰلٖ مُّبِينٖ

४०. तेव्हा काय तुम्ही बहिऱ्याला ऐकवू शकता किंवा आंधळ्याला मार्ग दाखवू शकता आणि त्याला जो उघड मार्गभ्रष्टतेत असावा
Surah Az-Zukhruf, Verse 40


فَإِمَّا نَذۡهَبَنَّ بِكَ فَإِنَّا مِنۡهُم مُّنتَقِمُونَ

४१. मग जर आम्ही तुम्हाला येथून जरी नेले तरीही आम्ही त्यांच्याशी सूड घेणारच आहोत
Surah Az-Zukhruf, Verse 41


أَوۡ نُرِيَنَّكَ ٱلَّذِي وَعَدۡنَٰهُمۡ فَإِنَّا عَلَيۡهِم مُّقۡتَدِرُونَ

४२. किंवा जो काही वायदा त्यांच्याशी केला आहे, तो तुम्हाला दाखवू आम्ही त्यांच्यावरही सामर्थ्य बाळगतो
Surah Az-Zukhruf, Verse 42


فَٱسۡتَمۡسِكۡ بِٱلَّذِيٓ أُوحِيَ إِلَيۡكَۖ إِنَّكَ عَلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ

४३. तेव्हा जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे केली गेली आहे तिला दृढपणे बाळगून राहा. निःसंशय, तुम्ही सरळ मार्गावर आहात
Surah Az-Zukhruf, Verse 43


وَإِنَّهُۥ لَذِكۡرٞ لَّكَ وَلِقَوۡمِكَۖ وَسَوۡفَ تُسۡـَٔلُونَ

४४. आणि निःसंशय, हा (स्वतः) तुमच्याकरिता आणि तुमच्या जनसमूहाकरिता उपदेश आहे आणि निकट भविष्यात तुमची विचारणा होईल
Surah Az-Zukhruf, Verse 44


وَسۡـَٔلۡ مَنۡ أَرۡسَلۡنَا مِن قَبۡلِكَ مِن رُّسُلِنَآ أَجَعَلۡنَا مِن دُونِ ٱلرَّحۡمَٰنِ ءَالِهَةٗ يُعۡبَدُونَ

४५. आणि आमच्या त्या पैगंबरांकडून माहीत करून घ्या, ज्यांना आम्ही तुमच्या पूर्वी पाठविले होते की काय आम्ही रहमान (दयावान अल्लाह) च्या खेरीज दुसरी उपास्ये (आराध्य दैवते) निर्धारित केली होती, ज्यांची उपासना केली जावी
Surah Az-Zukhruf, Verse 45


وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا مُوسَىٰ بِـَٔايَٰتِنَآ إِلَىٰ فِرۡعَوۡنَ وَمَلَإِيْهِۦ فَقَالَ إِنِّي رَسُولُ رَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ

४६. आणि आम्ही मूसा (अलै.) ला आपल्या निशाण्यास देऊन, फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांजवळ पाठविले, तेव्हा (मूसा, त्यांना) म्हणाले की मी समस्त विश्वांच्या पालनकर्त्याचा रसूल (संदेशवाहक) आहे
Surah Az-Zukhruf, Verse 46


فَلَمَّا جَآءَهُم بِـَٔايَٰتِنَآ إِذَا هُم مِّنۡهَا يَضۡحَكُونَ

४७. तर जेव्हा ते आमच्या निशाण्या घेऊन त्या लोकांजवळ आले, तेव्हा ते अचानक त्यांची थट्टा उडवू लागले
Surah Az-Zukhruf, Verse 47


وَمَا نُرِيهِم مِّنۡ ءَايَةٍ إِلَّا هِيَ أَكۡبَرُ مِنۡ أُخۡتِهَاۖ وَأَخَذۡنَٰهُم بِٱلۡعَذَابِ لَعَلَّهُمۡ يَرۡجِعُونَ

४८. आणि आम्ही जी निशाणी त्यांना दाखवित होतो, ती दुसऱ्या निशाणीपेक्षा सरस असे, आणि आम्ही त्यांना शिक्षा - यातनेत धरले, यासाठी की त्यांनी रुजू करावे
Surah Az-Zukhruf, Verse 48


وَقَالُواْ يَـٰٓأَيُّهَ ٱلسَّاحِرُ ٱدۡعُ لَنَا رَبَّكَ بِمَا عَهِدَ عِندَكَ إِنَّنَا لَمُهۡتَدُونَ

४९. आणि ते म्हणाले, हे जादूगार! आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याला त्या गोष्टीची दुआ-प्रार्थना कर जिचा त्याने तुला वायदा दिलेला आहे विश्वास कर की आम्ही सर्न्माला लागू
Surah Az-Zukhruf, Verse 49


فَلَمَّا كَشَفۡنَا عَنۡهُمُ ٱلۡعَذَابَ إِذَا هُمۡ يَنكُثُونَ

५०. मग जेव्हा आम्ही त्यांच्यावरून तो अज़ाब हटविला तेव्हा त्यांनी त्याच वेळी आपला वायदा व आपल्या वचनाचा भंग केला
Surah Az-Zukhruf, Verse 50


وَنَادَىٰ فِرۡعَوۡنُ فِي قَوۡمِهِۦ قَالَ يَٰقَوۡمِ أَلَيۡسَ لِي مُلۡكُ مِصۡرَ وَهَٰذِهِ ٱلۡأَنۡهَٰرُ تَجۡرِي مِن تَحۡتِيٓۚ أَفَلَا تُبۡصِرُونَ

५१. आणि फिरऔनने आपल्या जनसमूहात ऐलान करविले व म्हणाला, हे माझ्या जमातीच्या लोकानो! काय मिस्रचा देश माझा नाही, आणि माझ्या राजमहालांच्या खाली जे हे जलप्रवाह वाहत आहेत, काय तुम्ही पाहात नाही
Surah Az-Zukhruf, Verse 51


أَمۡ أَنَا۠ خَيۡرٞ مِّنۡ هَٰذَا ٱلَّذِي هُوَ مَهِينٞ وَلَا يَكَادُ يُبِينُ

५२. किंबहुना मी श्रेष्ठतम आहे याच्या तुलनेत जो तुच्छ आहे आणि साफ (स्पष्टपणे) बोलूही शकत नाही
Surah Az-Zukhruf, Verse 52


فَلَوۡلَآ أُلۡقِيَ عَلَيۡهِ أَسۡوِرَةٞ مِّن ذَهَبٍ أَوۡ جَآءَ مَعَهُ ٱلۡمَلَـٰٓئِكَةُ مُقۡتَرِنِينَ

५३. बरे, याच्यावर सोन्याची कांकणे का नाही अवतरित झालीत, किंवा याच्यासोबत फरिश्तेच झुंडीने (गोळा होऊन) आले असते
Surah Az-Zukhruf, Verse 53


فَٱسۡتَخَفَّ قَوۡمَهُۥ فَأَطَاعُوهُۚ إِنَّهُمۡ كَانُواْ قَوۡمٗا فَٰسِقِينَ

५४. तेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना मूर्ख बनविले आणि त्यांनी त्याचे म्हणणे मानले. निःसंशय, ते सर्व दुराचारी लोक होते
Surah Az-Zukhruf, Verse 54


فَلَمَّآ ءَاسَفُونَا ٱنتَقَمۡنَا مِنۡهُمۡ فَأَغۡرَقۡنَٰهُمۡ أَجۡمَعِينَ

५५. मग जेव्हा त्यांनी आम्हाला क्रोधित केले, तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि सर्वांना (समुद्रात) बुडवून टाकले
Surah Az-Zukhruf, Verse 55


فَجَعَلۡنَٰهُمۡ سَلَفٗا وَمَثَلٗا لِّلۡأٓخِرِينَ

५६. तेव्हा आम्ही त्यांना भूतकालीन करून टाकले आणि नंतरच्या लोकांकरिता नमूना बनविले
Surah Az-Zukhruf, Verse 56


۞وَلَمَّا ضُرِبَ ٱبۡنُ مَرۡيَمَ مَثَلًا إِذَا قَوۡمُكَ مِنۡهُ يَصِدُّونَ

५७. आणि जेव्हा मरियमच्या पुत्राचे उदाहरण सांगितले गेले, तेव्हा त्या वृत्तांताने तुमचा जनसमूह (आनंदाने) ओरडला
Surah Az-Zukhruf, Verse 57


وَقَالُوٓاْ ءَأَٰلِهَتُنَا خَيۡرٌ أَمۡ هُوَۚ مَا ضَرَبُوهُ لَكَ إِلَّا جَدَلَۢاۚ بَلۡ هُمۡ قَوۡمٌ خَصِمُونَ

५८. आणि ते म्हणाले की आमची उपास्ये चांगली आहेत की तो? तुम्हाला त्यांचे हे सांगणे केवळ वाद घालण्याच्या हेतूने आहे, किंबहुना हे लोक आहेतच भांडखोर
Surah Az-Zukhruf, Verse 58


إِنۡ هُوَ إِلَّا عَبۡدٌ أَنۡعَمۡنَا عَلَيۡهِ وَجَعَلۡنَٰهُ مَثَلٗا لِّبَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ

५९. तो (ईसा अलै.) देखील केवळ एक दास मात्र आहे, ज्याच्यावर आम्ही उपकार केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले
Surah Az-Zukhruf, Verse 59


وَلَوۡ نَشَآءُ لَجَعَلۡنَا مِنكُم مَّلَـٰٓئِكَةٗ فِي ٱلۡأَرۡضِ يَخۡلُفُونَ

६०. जर आम्ही इच्छिले असते तर तुमच्याऐवजी फरिश्ते बनविले असते ज्यांनी धरतीवर एकमेकांचे वारस म्हणून काम केले असते
Surah Az-Zukhruf, Verse 60


وَإِنَّهُۥ لَعِلۡمٞ لِّلسَّاعَةِ فَلَا تَمۡتَرُنَّ بِهَا وَٱتَّبِعُونِۚ هَٰذَا صِرَٰطٞ مُّسۡتَقِيمٞ

६१. आणि निःसंशय, तो (ईसा अलै.) कयामतची निशाणी आहे, तेव्हा तुम्ही कयामतविषयी शंका करू नका आणि माझे म्हणणे मान्य करा. हाच सरळ मार्ग आहे
Surah Az-Zukhruf, Verse 61


وَلَا يَصُدَّنَّكُمُ ٱلشَّيۡطَٰنُۖ إِنَّهُۥ لَكُمۡ عَدُوّٞ مُّبِينٞ

६२. आणि सैतानाने तुम्हाला प्रतिबंध घालू नये. निःसंशय, तो तुमचा उघड शत्रू आहे
Surah Az-Zukhruf, Verse 62


وَلَمَّا جَآءَ عِيسَىٰ بِٱلۡبَيِّنَٰتِ قَالَ قَدۡ جِئۡتُكُم بِٱلۡحِكۡمَةِ وَلِأُبَيِّنَ لَكُم بَعۡضَ ٱلَّذِي تَخۡتَلِفُونَ فِيهِۖ فَٱتَّقُواْ ٱللَّهَ وَأَطِيعُونِ

६३. आणि जेव्हा ईसा (अलै.) ईशचमत्कार (मोजिजे) घेऊन आले, तेव्हा म्हणाले, मी तुमच्याजवळ ज्ञान घेऊन आलो आहे आणि अशासाठी आलो आहे की ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही मतभेद करता, त्या स्पष्ट कराव्यात. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञापालन करा
Surah Az-Zukhruf, Verse 63


إِنَّ ٱللَّهَ هُوَ رَبِّي وَرَبُّكُمۡ فَٱعۡبُدُوهُۚ هَٰذَا صِرَٰطٞ مُّسۡتَقِيمٞ

६४. माझा आणि तुमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा. हाच सरळ मार्ग आहे
Surah Az-Zukhruf, Verse 64


فَٱخۡتَلَفَ ٱلۡأَحۡزَابُ مِنۢ بَيۡنِهِمۡۖ فَوَيۡلٞ لِّلَّذِينَ ظَلَمُواْ مِنۡ عَذَابِ يَوۡمٍ أَلِيمٍ

६५. मग (इस्राईलच्या संततीच्या) समूहांनी आपसात मतभेद केला तेव्हा अत्याचारी लोकांकरिता सर्वनाश आहे. दुःखदायक दिवसाच्या अज़ाब (शिक्षा - यातने) ने
Surah Az-Zukhruf, Verse 65


هَلۡ يَنظُرُونَ إِلَّا ٱلسَّاعَةَ أَن تَأۡتِيَهُم بَغۡتَةٗ وَهُمۡ لَا يَشۡعُرُونَ

६६. हे लोक फक्त कयामतच्या प्रतीक्षेत आहेत की ती अचानक त्यांच्यावर येऊन कोसळावी आणि त्यांना खबरही न व्हावी
Surah Az-Zukhruf, Verse 66


ٱلۡأَخِلَّآءُ يَوۡمَئِذِۭ بَعۡضُهُمۡ لِبَعۡضٍ عَدُوٌّ إِلَّا ٱلۡمُتَّقِينَ

६७. त्या दिवशी (जीवलग) मित्र देखील एकमेकांचे शत्रू बनतील, मात्र अल्लाहचे भय राखणाऱ्यांखेरीज
Surah Az-Zukhruf, Verse 67


يَٰعِبَادِ لَا خَوۡفٌ عَلَيۡكُمُ ٱلۡيَوۡمَ وَلَآ أَنتُمۡ تَحۡزَنُونَ

६८. हे माझ्या दासांनो! आज ना तुमच्यावर एखादे भय आहे आणि ना तुम्ही दुःखी व्हाल
Surah Az-Zukhruf, Verse 68


ٱلَّذِينَ ءَامَنُواْ بِـَٔايَٰتِنَا وَكَانُواْ مُسۡلِمِينَ

६९. ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आणि जे मुस्लिम (आज्ञाधारक) बनून राहिले
Surah Az-Zukhruf, Verse 69


ٱدۡخُلُواْ ٱلۡجَنَّةَ أَنتُمۡ وَأَزۡوَٰجُكُمۡ تُحۡبَرُونَ

७०. तुम्ही आणि तुमच्या पत्न्या आनंदित व खूश होऊन जन्नतमध्ये दाखल व्हा
Surah Az-Zukhruf, Verse 70


يُطَافُ عَلَيۡهِم بِصِحَافٖ مِّن ذَهَبٖ وَأَكۡوَابٖۖ وَفِيهَا مَا تَشۡتَهِيهِ ٱلۡأَنفُسُ وَتَلَذُّ ٱلۡأَعۡيُنُۖ وَأَنتُمۡ فِيهَا خَٰلِدُونَ

७१. त्यांच्या चोहीबाजूंना सोन्याची ताटे आणि सोन्याचे प्याले फिरविले जातील. यात ते सर्व काही असेल, जे मनाला आवडणारे आणि नेत्यांना सुखदायक ठरणारे असेल, आणि तुम्ही त्यात नेहमी-नेहमीकरिता राहाल
Surah Az-Zukhruf, Verse 71


وَتِلۡكَ ٱلۡجَنَّةُ ٱلَّتِيٓ أُورِثۡتُمُوهَا بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ

७२. आणि हीच ती जन्नत होय की तुम्ही आपल्या आचरणाच्या मोबदल्यात तिचे उत्तराधिकारी (वारस) बनविले गेले आहात
Surah Az-Zukhruf, Verse 72


لَكُمۡ فِيهَا فَٰكِهَةٞ كَثِيرَةٞ مِّنۡهَا تَأۡكُلُونَ

७३. इथे तुमच्यासाठी विपुल प्रमाणात मेवे आहेत, ज्यांना तुम्ही खात राहाल
Surah Az-Zukhruf, Verse 73


إِنَّ ٱلۡمُجۡرِمِينَ فِي عَذَابِ جَهَنَّمَ خَٰلِدُونَ

७४. निःसंशय, अपराधी लोक जहन्नमच्या शिक्षा-यातनेत सदैव राहतील
Surah Az-Zukhruf, Verse 74


لَا يُفَتَّرُ عَنۡهُمۡ وَهُمۡ فِيهِ مُبۡلِسُونَ

७५. ही (शिक्षा-यातना) कधीही त्यांच्यावरून सौम्य केली जाणार नाही आणि ते तिच्यातच नैराश्यग्रस्त पडून राहतील
Surah Az-Zukhruf, Verse 75


وَمَا ظَلَمۡنَٰهُمۡ وَلَٰكِن كَانُواْ هُمُ ٱلظَّـٰلِمِينَ

७६. आणि आम्ही त्यांच्यावर अत्याचार नाही केला, उलट ते स्वतःच अत्याचारी होते
Surah Az-Zukhruf, Verse 76


وَنَادَوۡاْ يَٰمَٰلِكُ لِيَقۡضِ عَلَيۡنَا رَبُّكَۖ قَالَ إِنَّكُم مَّـٰكِثُونَ

७७. ते हाक मारून म्हणतील की हे मालक! तुमचा पालनकर्ता तर आमचा पुरता नायनाट करून टाकील! तो म्हणेल, तुम्हाला तर (याच अवस्थेत नेहमी) राहावयाचे आहे
Surah Az-Zukhruf, Verse 77


لَقَدۡ جِئۡنَٰكُم بِٱلۡحَقِّ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَكُمۡ لِلۡحَقِّ كَٰرِهُونَ

७८. आम्ही तर तुमच्याजवळ सत्य घेऊन आलो, परंतु तुमच्यापैकी बहुतेक लोक सत्याशी तिरस्कार करणारे होते
Surah Az-Zukhruf, Verse 78


أَمۡ أَبۡرَمُوٓاْ أَمۡرٗا فَإِنَّا مُبۡرِمُونَ

७९. काय त्यांनी एखाद्या कामाचा मजबूत इरादा करून घेतला आहे? तर मग खात्री बाळगा की आम्हीही मजबूत काम करणारे आहोत
Surah Az-Zukhruf, Verse 79


أَمۡ يَحۡسَبُونَ أَنَّا لَا نَسۡمَعُ سِرَّهُمۡ وَنَجۡوَىٰهُمۚ بَلَىٰ وَرُسُلُنَا لَدَيۡهِمۡ يَكۡتُبُونَ

८०. काय त्यांनी असे गृहित धरले आहे की आम्ही त्यांच्या गुप्त गोष्टींना आणि त्यांच्या कानगोष्टींना ऐकत नाहीत? (निःसंशय आम्ही सर्व काही ऐकतो) किंबहुना आम्ही पाठविलेले (फरिश्ते) त्यांच्याजवळच लिहित आहेत
Surah Az-Zukhruf, Verse 80


قُلۡ إِن كَانَ لِلرَّحۡمَٰنِ وَلَدٞ فَأَنَا۠ أَوَّلُ ٱلۡعَٰبِدِينَ

८१. (तुम्ही) सांगा की, जर समजा रहमान (दयावान अल्लाह) ची एखादी संतती असती तर मी सर्वांत प्रथम उपासना करणारा राहिले असतो
Surah Az-Zukhruf, Verse 81


سُبۡحَٰنَ رَبِّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ رَبِّ ٱلۡعَرۡشِ عَمَّا يَصِفُونَ

८२. आकाशांचा आणि धरती व अर्श (ईश-सिंहासना) चा स्वामी, त्या गोष्टींपासून पवित्र (व्यंग-दोष विरहित) आहे. ज्या (हे) सांगतात
Surah Az-Zukhruf, Verse 82


فَذَرۡهُمۡ يَخُوضُواْ وَيَلۡعَبُواْ حَتَّىٰ يُلَٰقُواْ يَوۡمَهُمُ ٱلَّذِي يُوعَدُونَ

८३. आता तुम्ही त्यांना याच वाद-विवादात आणि खेळण्या-बागडण्यात सोडून द्या. येथेपर्यंत की त्यांची त्या दिवसाशी गाठ पडावी, ज्याचा यांना वायदा दिला जात आहे
Surah Az-Zukhruf, Verse 83


وَهُوَ ٱلَّذِي فِي ٱلسَّمَآءِ إِلَٰهٞ وَفِي ٱلۡأَرۡضِ إِلَٰهٞۚ وَهُوَ ٱلۡحَكِيمُ ٱلۡعَلِيمُ

८४. आणि तोच आकाशांमध्येही पूज्य (उपासनीय) आहे आणि धरतीवरही तोच उपासना करण्यायोग्य आहे आणि तो मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आणि संपूर्ण ज्ञान राखणारा आहे
Surah Az-Zukhruf, Verse 84


وَتَبَارَكَ ٱلَّذِي لَهُۥ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَمَا بَيۡنَهُمَا وَعِندَهُۥ عِلۡمُ ٱلسَّاعَةِ وَإِلَيۡهِ تُرۡجَعُونَ

८५. आणि तो मोठा शुभ-कल्याणकारी आहे, ज्याच्या हाती आकाशांचे आणि धरतीचे आणि या दोघांच्या दरम्यानचे राज्य आहे आणि कयामतचे ज्ञान देखील त्याच्याचजवळ आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल
Surah Az-Zukhruf, Verse 85


وَلَا يَمۡلِكُ ٱلَّذِينَ يَدۡعُونَ مِن دُونِهِ ٱلشَّفَٰعَةَ إِلَّا مَن شَهِدَ بِٱلۡحَقِّ وَهُمۡ يَعۡلَمُونَ

८६. आणि ज्यांना हे लोक अल्लाहखेरीज पुकारतात, ते शिफारस करण्याचा अधिकार बाळगत नाही, तथापि (शिफारसीचा हक्क ते बाळगतात) जे सत्य गोष्टींचा स्वीकार करतील आणि त्यांना ज्ञानही असावे
Surah Az-Zukhruf, Verse 86


وَلَئِن سَأَلۡتَهُم مَّنۡ خَلَقَهُمۡ لَيَقُولُنَّ ٱللَّهُۖ فَأَنَّىٰ يُؤۡفَكُونَ

८७. जर तुम्ही त्यांना विचाराल की त्यांना कोणी निर्माण केले तर हे अवश्य उत्तर देतील की अल्लाहने, मग हे कोठे उलट जात आहेत
Surah Az-Zukhruf, Verse 87


وَقِيلِهِۦ يَٰرَبِّ إِنَّ هَـٰٓؤُلَآءِ قَوۡمٞ لَّا يُؤۡمِنُونَ

८८. आणि त्यांचे (पैगंबरांचे अधिकांश) हे म्हणणे की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, हे असे लोक आहेत, जे ईमान राखत नाहीत
Surah Az-Zukhruf, Verse 88


فَٱصۡفَحۡ عَنۡهُمۡ وَقُلۡ سَلَٰمٞۚ فَسَوۡفَ يَعۡلَمُونَ

८९. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या आणि (निरोपाचा) सलाम सांगा. त्यांना (स्वतःलाच) माहीत पडेल
Surah Az-Zukhruf, Verse 89


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 42
>> Surah 44

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai