Surah Al-Jathiya - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
حمٓ
१. हा. मीम
Surah Al-Jathiya, Verse 1
تَنزِيلُ ٱلۡكِتَٰبِ مِنَ ٱللَّهِ ٱلۡعَزِيزِ ٱلۡحَكِيمِ
२. हा ग्रंथ, जबरदस्त हिकमत (बुद्धिकौशल्य) बाळगणाऱ्या अल्लाहतर्फे अवतरित झाला आहे
Surah Al-Jathiya, Verse 2
إِنَّ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ لَأٓيَٰتٖ لِّلۡمُؤۡمِنِينَ
३. आकाशांमध्ये आणि धरतीत ईमान राखणाऱ्यांकरिता अनेक निशाण्या आहेत
Surah Al-Jathiya, Verse 3
وَفِي خَلۡقِكُمۡ وَمَا يَبُثُّ مِن دَآبَّةٍ ءَايَٰتٞ لِّقَوۡمٖ يُوقِنُونَ
४. आणि स्वतः तुमच्या जन्मात आणि जनावरांच्या पसरविण्यात, विश्वास ठेवणाऱ्या जनसमूहाकरिता अनेक निशाण्या (बोधचिन्हे) आहेत
Surah Al-Jathiya, Verse 4
وَٱخۡتِلَٰفِ ٱلَّيۡلِ وَٱلنَّهَارِ وَمَآ أَنزَلَ ٱللَّهُ مِنَ ٱلسَّمَآءِ مِن رِّزۡقٖ فَأَحۡيَا بِهِ ٱلۡأَرۡضَ بَعۡدَ مَوۡتِهَا وَتَصۡرِيفِ ٱلرِّيَٰحِ ءَايَٰتٞ لِّقَوۡمٖ يَعۡقِلُونَ
५. आणि रात्र व दिवसाच्या फेरबदलात आणि जी काही आजिविका (रोजी) अल्लाह, आकाशातून अवतरित करून जमिनीला, तिच्या मृत्युनंतर (पुन्हा) जिवंत करतो, त्यात आणि वाऱ्यांच्या फेरबदलातही, त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे बुद्धी बाळगतात
Surah Al-Jathiya, Verse 5
تِلۡكَ ءَايَٰتُ ٱللَّهِ نَتۡلُوهَا عَلَيۡكَ بِٱلۡحَقِّۖ فَبِأَيِّ حَدِيثِۭ بَعۡدَ ٱللَّهِ وَءَايَٰتِهِۦ يُؤۡمِنُونَ
६. या आहेत अल्लाहच्या आयती, ज्या आम्ही तुम्हाला सत्यासह ऐकवित आहोत, तेव्हा अल्लाह आणि त्याच्या आयतीनंतर हे (अखेर) कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील
Surah Al-Jathiya, Verse 6
وَيۡلٞ لِّكُلِّ أَفَّاكٍ أَثِيمٖ
७. धिःक्कार (आणि खेद आहे) प्रत्येक खोट्या अपराधीबाबत
Surah Al-Jathiya, Verse 7
يَسۡمَعُ ءَايَٰتِ ٱللَّهِ تُتۡلَىٰ عَلَيۡهِ ثُمَّ يُصِرُّ مُسۡتَكۡبِرٗا كَأَن لَّمۡ يَسۡمَعۡهَاۖ فَبَشِّرۡهُ بِعَذَابٍ أَلِيمٖ
८. अल्लाहच्या आयती आपल्यासमोर वाचल्या जात असताना जो ऐकेल, तरीही गर्व करील अशा प्रकारे अडून राहावा, जणू त्याने ऐकलेच नाही, तर अशा लोकांना दुःखदायक शिक्षेची खबर द्या
Surah Al-Jathiya, Verse 8
وَإِذَا عَلِمَ مِنۡ ءَايَٰتِنَا شَيۡـًٔا ٱتَّخَذَهَا هُزُوًاۚ أُوْلَـٰٓئِكَ لَهُمۡ عَذَابٞ مُّهِينٞ
९. आणि जेव्हा तो आमच्या आयतींपैकी एखाद्या आयतीची खबर मिळवितो तेव्हा तिची थट्टा उडवितो. हेच ते लोक होत, ज्यांच्याकरिता अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे
Surah Al-Jathiya, Verse 9
مِّن وَرَآئِهِمۡ جَهَنَّمُۖ وَلَا يُغۡنِي عَنۡهُم مَّا كَسَبُواْ شَيۡـٔٗا وَلَا مَا ٱتَّخَذُواْ مِن دُونِ ٱللَّهِ أَوۡلِيَآءَۖ وَلَهُمۡ عَذَابٌ عَظِيمٌ
१०. त्यांच्या मागे जहन्नम आहे, जे काही त्यांनी साध्य केले होते, ते त्यांना काहीच उपयोगी पडणार नाही आणि ना ते (काही उपयोगी पडतील) ज्यांना त्यांनी अल्लाहखेरीज वली (संरक्षक, मित्र) बनवून ठेवले होते. त्यांच्यासाठी तर मोठा भयंंकर अज़ाब आहे
Surah Al-Jathiya, Verse 10
هَٰذَا هُدٗىۖ وَٱلَّذِينَ كَفَرُواْ بِـَٔايَٰتِ رَبِّهِمۡ لَهُمۡ عَذَابٞ مِّن رِّجۡزٍ أَلِيمٌ
११. हे (परिपूर्ण) मार्गदर्शन आहे,१ आणि ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला, त्यांच्यासाठी मोठी कठीण शिक्षा - यातना आहे
Surah Al-Jathiya, Verse 11
۞ٱللَّهُ ٱلَّذِي سَخَّرَ لَكُمُ ٱلۡبَحۡرَ لِتَجۡرِيَ ٱلۡفُلۡكُ فِيهِ بِأَمۡرِهِۦ وَلِتَبۡتَغُواْ مِن فَضۡلِهِۦ وَلَعَلَّكُمۡ تَشۡكُرُونَ
१२. अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी समुद्राला ताबेदार बनविले, यासाठी की त्याच्या आदेशाने त्यात नौका चालाव्यात आणि तुम्ही त्याच्या कृपेचा शोध घ्यावा आणि यासाठी की तुम्ही त्याच्याशी कृतज्ञ व्हावे
Surah Al-Jathiya, Verse 12
وَسَخَّرَ لَكُم مَّا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِ جَمِيعٗا مِّنۡهُۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَأٓيَٰتٖ لِّقَوۡمٖ يَتَفَكَّرُونَ
१३. आणि आकाशांच्या व धरतीच्या प्रत्येक वस्तूलाही त्याने आपल्यातर्फे तुमच्या सेवेत लावून ठेवले आहे, निःसंशय, विचार-चिंतन करणाऱ्या लोकांना यात अनेक निशाण्या आढळून येतील
Surah Al-Jathiya, Verse 13
قُل لِّلَّذِينَ ءَامَنُواْ يَغۡفِرُواْ لِلَّذِينَ لَا يَرۡجُونَ أَيَّامَ ٱللَّهِ لِيَجۡزِيَ قَوۡمَۢا بِمَا كَانُواْ يَكۡسِبُونَ
१४. तुम्ही ईमान राखणाऱ्यांना सांगा की त्यांनी अशा लोकांना माफ करत राहावे, जे अल्लाहच्या दिवसांची आशा बाळगत नाही, यासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाहने एका जनमसूहाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांचा मोबदला द्यावा
Surah Al-Jathiya, Verse 14
مَنۡ عَمِلَ صَٰلِحٗا فَلِنَفۡسِهِۦۖ وَمَنۡ أَسَآءَ فَعَلَيۡهَاۖ ثُمَّ إِلَىٰ رَبِّكُمۡ تُرۡجَعُونَ
१५. जो कोणी सत्कर्म करील तो आपल्या स्वतःच्या भल्याकरिता आणि जो दुष्कर्म करील, त्याची दुष्परिणती त्याच्यावरच आहे. मग तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे परतविले जाल
Surah Al-Jathiya, Verse 15
وَلَقَدۡ ءَاتَيۡنَا بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ ٱلۡكِتَٰبَ وَٱلۡحُكۡمَ وَٱلنُّبُوَّةَ وَرَزَقۡنَٰهُم مِّنَ ٱلطَّيِّبَٰتِ وَفَضَّلۡنَٰهُمۡ عَلَى ٱلۡعَٰلَمِينَ
१६. आणि निःसंशय, आम्ही इस्राईलच्या संततीला ग्रंथ, राज्यसत्ता आणि पैगंबरपद प्रदान केले होते, आणि आम्ही त्यांना पाक (स्वच्छ - शुद्ध) व चांगली रोजी (आजिविका) प्रदान केली होती, आणि त्यांना जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली होती
Surah Al-Jathiya, Verse 16
وَءَاتَيۡنَٰهُم بَيِّنَٰتٖ مِّنَ ٱلۡأَمۡرِۖ فَمَا ٱخۡتَلَفُوٓاْ إِلَّا مِنۢ بَعۡدِ مَا جَآءَهُمُ ٱلۡعِلۡمُ بَغۡيَۢا بَيۡنَهُمۡۚ إِنَّ رَبَّكَ يَقۡضِي بَيۡنَهُمۡ يَوۡمَ ٱلۡقِيَٰمَةِ فِيمَا كَانُواْ فِيهِ يَخۡتَلِفُونَ
१७. आणि आम्ही त्यांना धर्माच्या स्पष्ट निशाण्या प्रदान केल्या, मग त्यांनी आपल्याजवळ ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्वेष-विवादापायी मतभेद केला. हे ज्या ज्या गोष्टीत मतभेद करीत आहेत त्यांचा फैसला कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान तुमचा पालनकर्ता स्वतः करील
Surah Al-Jathiya, Verse 17
ثُمَّ جَعَلۡنَٰكَ عَلَىٰ شَرِيعَةٖ مِّنَ ٱلۡأَمۡرِ فَٱتَّبِعۡهَا وَلَا تَتَّبِعۡ أَهۡوَآءَ ٱلَّذِينَ لَا يَعۡلَمُونَ
१८. मग आम्ही तुम्हाला धर्माच्या (स्पष्ट) मार्गावर कायम केले. तेव्हा तुम्ही त्याच मार्गाचे अनुसरण करीत राहा आणि नादान अडाणी लोकांच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका
Surah Al-Jathiya, Verse 18
إِنَّهُمۡ لَن يُغۡنُواْ عَنكَ مِنَ ٱللَّهِ شَيۡـٔٗاۚ وَإِنَّ ٱلظَّـٰلِمِينَ بَعۡضُهُمۡ أَوۡلِيَآءُ بَعۡضٖۖ وَٱللَّهُ وَلِيُّ ٱلۡمُتَّقِينَ
१९. (लक्षात ठेवा) की हे लोक कधीही अल्लाहसमोर तुमच्या काहीच कामी येऊ शकत नाही (जाणून घ्या की) अत्याचारी लोक आपसात एकमेकांचे मित्र असतात आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांचा सखा - सोबती, महान अल्लाह आहे
Surah Al-Jathiya, Verse 19
هَٰذَا بَصَـٰٓئِرُ لِلنَّاسِ وَهُدٗى وَرَحۡمَةٞ لِّقَوۡمٖ يُوقِنُونَ
२०. हा कुरआन लोकांकरिता अंतर्दृष्टीच्या गोष्टी आणि मार्गदर्शन व दया आहे, त्या लोकांकरिता जे विश्वास राखतात
Surah Al-Jathiya, Verse 20
أَمۡ حَسِبَ ٱلَّذِينَ ٱجۡتَرَحُواْ ٱلسَّيِّـَٔاتِ أَن نَّجۡعَلَهُمۡ كَٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ سَوَآءٗ مَّحۡيَاهُمۡ وَمَمَاتُهُمۡۚ سَآءَ مَا يَحۡكُمُونَ
२१. काय त्या लोकांनी, जे वाईट कर्म करतात, असे समजून घेतले आहे की आम्ही त्यांना त्या लोकांसारखे ठरवू, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले की त्यांचे जगणे-मरणे एकसमान व्हावे. मोठा वाईट फैसला आहे, जो ते करीत आहेत
Surah Al-Jathiya, Verse 21
وَخَلَقَ ٱللَّهُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ بِٱلۡحَقِّ وَلِتُجۡزَىٰ كُلُّ نَفۡسِۭ بِمَا كَسَبَتۡ وَهُمۡ لَا يُظۡلَمُونَ
२२. आणि आकाशांना व धरतीला अल्लाहने अतिशय न्यायासह निर्माण केले आहे आणि यासाठी की प्रत्येक माणसाला त्याच्या कृत-कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जावा आणि त्यांच्यावर जुलूम केला जाणार नाही
Surah Al-Jathiya, Verse 22
أَفَرَءَيۡتَ مَنِ ٱتَّخَذَ إِلَٰهَهُۥ هَوَىٰهُ وَأَضَلَّهُ ٱللَّهُ عَلَىٰ عِلۡمٖ وَخَتَمَ عَلَىٰ سَمۡعِهِۦ وَقَلۡبِهِۦ وَجَعَلَ عَلَىٰ بَصَرِهِۦ غِشَٰوَةٗ فَمَن يَهۡدِيهِ مِنۢ بَعۡدِ ٱللَّهِۚ أَفَلَا تَذَكَّرُونَ
२३. काय तुम्ही त्यालाही पाहिले, ज्याने आपल्या मनाच्या इच्छेला आपला उपास्य (माबूद) बनवून ठेवले आहे आणि अल्लाहने जाणीवपूर्वक त्याला पथभ्रष्ट केले आहे आणि त्याच्या कानावर आणि हृदयांवर मोहर लावली आहे आणि त्याच्या डोळ्यांवर पडदा टाकला आहे, आता अशा माणसाला अल्लाहनंतर कोण मार्गदर्शन करू शकतो? काय अजूनही तुम्ही बोध ग्रहण करीत नाहीत
Surah Al-Jathiya, Verse 23
وَقَالُواْ مَا هِيَ إِلَّا حَيَاتُنَا ٱلدُّنۡيَا نَمُوتُ وَنَحۡيَا وَمَا يُهۡلِكُنَآ إِلَّا ٱلدَّهۡرُۚ وَمَا لَهُم بِذَٰلِكَ مِنۡ عِلۡمٍۖ إِنۡ هُمۡ إِلَّا يَظُنُّونَ
२४. आणि ते म्हणाले, आमचे जीवन केवळ याच जगाचे जीवन आहे, आम्ही मरण पावतो आणि जगतो आणि आम्हाला केवळ काळच मरण देतो. (वस्तुतः) त्यांना त्याचे काही ज्ञानच नाही, हे तर केवळ अनुमान आणि अटकळीचाच वापर करतात
Surah Al-Jathiya, Verse 24
وَإِذَا تُتۡلَىٰ عَلَيۡهِمۡ ءَايَٰتُنَا بَيِّنَٰتٖ مَّا كَانَ حُجَّتَهُمۡ إِلَّآ أَن قَالُواْ ٱئۡتُواْ بِـَٔابَآئِنَآ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ
२५. आणि जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या स्पष्ट आयतींचे पठण केले जाते तेव्हा त्यांच्याजवळ या कथनाखेरीज कोणतेही प्रमाण नसते की जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या वाडवडिलांना घेऊन या
Surah Al-Jathiya, Verse 25
قُلِ ٱللَّهُ يُحۡيِيكُمۡ ثُمَّ يُمِيتُكُمۡ ثُمَّ يَجۡمَعُكُمۡ إِلَىٰ يَوۡمِ ٱلۡقِيَٰمَةِ لَا رَيۡبَ فِيهِ وَلَٰكِنَّ أَكۡثَرَ ٱلنَّاسِ لَا يَعۡلَمُونَ
२६. (तुम्ही) सांगा की अल्लाहच तुम्हाला जिवंत करतो, मग तुम्हाला मृत्यु देतो, मग तुम्हाला कयामतच्या दिवशी एकत्रित करील, ज्याबाबत कसलीही शंका नाही, परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत
Surah Al-Jathiya, Verse 26
وَلِلَّهِ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَيَوۡمَ تَقُومُ ٱلسَّاعَةُ يَوۡمَئِذٖ يَخۡسَرُ ٱلۡمُبۡطِلُونَ
२७. आणि आकाशांची व धरतीची राज्यसत्ता अल्लाहचीच आहे आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल त्या दिवशी असत्याचे पुजारी मोठ्या तोट्यात राहतील
Surah Al-Jathiya, Verse 27
وَتَرَىٰ كُلَّ أُمَّةٖ جَاثِيَةٗۚ كُلُّ أُمَّةٖ تُدۡعَىٰٓ إِلَىٰ كِتَٰبِهَا ٱلۡيَوۡمَ تُجۡزَوۡنَ مَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ
२८. आणि तुम्ही पाहाल की प्रत्येक जनसमूह गुडघे टेकून पडला असेल. प्रत्येक समूह आपल्या कर्म-लेखाकडे बोलाविला जाईल. आज तुम्हाला आपल्या कृत-कर्माचा मोबदला दिला जाईल
Surah Al-Jathiya, Verse 28
هَٰذَا كِتَٰبُنَا يَنطِقُ عَلَيۡكُم بِٱلۡحَقِّۚ إِنَّا كُنَّا نَسۡتَنسِخُ مَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ
२९. हा आहे आमचा ग्रंथ, जो तुमच्याविषयी खरे खरे बोलत आहे. आम्ही तुमची कर्मे लिहवून घेत होतो
Surah Al-Jathiya, Verse 29
فَأَمَّا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ فَيُدۡخِلُهُمۡ رَبُّهُمۡ فِي رَحۡمَتِهِۦۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡمُبِينُ
३०. तेव्हा, ज्यांनी ईमान राखले व जे सत्कर्म करीत राहिले१ तर त्यांना त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) आपल्या दया - कृपेच्या सावलीत घेईल, हीच स्पष्ट सफलता आहे
Surah Al-Jathiya, Verse 30
وَأَمَّا ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ أَفَلَمۡ تَكُنۡ ءَايَٰتِي تُتۡلَىٰ عَلَيۡكُمۡ فَٱسۡتَكۡبَرۡتُمۡ وَكُنتُمۡ قَوۡمٗا مُّجۡرِمِينَ
३१. परतु ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, तर (मी त्यांना फर्माविन) की काय माझ्या आयती तुम्हाला ऐकविल्या जात नव्हत्या? तरीही तुम्ही गर्व करीत राहिले आणि तुम्ही होतेच अपराधी लोक
Surah Al-Jathiya, Verse 31
وَإِذَا قِيلَ إِنَّ وَعۡدَ ٱللَّهِ حَقّٞ وَٱلسَّاعَةُ لَا رَيۡبَ فِيهَا قُلۡتُم مَّا نَدۡرِي مَا ٱلسَّاعَةُ إِن نَّظُنُّ إِلَّا ظَنّٗا وَمَا نَحۡنُ بِمُسۡتَيۡقِنِينَ
३२. आणि जेव्हा कधी सांगितले जात असे की अल्लाहचा वायदा निश्चितच खरा आहे आणि कयामतच्या येण्याबाबत कसलीही शंका नाही, तेव्हा तुम्ही उत्तर देत की आम्ही नाही जाणत कयामत काय आहे. आमच्या मनात असाच काही विचार येतो, परंतु आम्हाला खात्री नाही
Surah Al-Jathiya, Verse 32
وَبَدَا لَهُمۡ سَيِّـَٔاتُ مَا عَمِلُواْ وَحَاقَ بِهِم مَّا كَانُواْ بِهِۦ يَسۡتَهۡزِءُونَ
३३. आणि त्यांच्यावर त्यांच्या कर्मांचा वाईटपणा उघड झाला आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित राहिले, तिनेच त्यांना घेरले
Surah Al-Jathiya, Verse 33
وَقِيلَ ٱلۡيَوۡمَ نَنسَىٰكُمۡ كَمَا نَسِيتُمۡ لِقَآءَ يَوۡمِكُمۡ هَٰذَا وَمَأۡوَىٰكُمُ ٱلنَّارُ وَمَا لَكُم مِّن نَّـٰصِرِينَ
३४. आणि सांगितले गेले की आज आम्ही तुमचा विसर पाडू जसा तुम्ही आपल्या या दिवसाच्या भेटीचा विसर पाडला होता, तुमचे ठिकाण जहन्नम आहे आणि तुमची मदत करणारा कोणीही नाही
Surah Al-Jathiya, Verse 34
ذَٰلِكُم بِأَنَّكُمُ ٱتَّخَذۡتُمۡ ءَايَٰتِ ٱللَّهِ هُزُوٗا وَغَرَّتۡكُمُ ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَاۚ فَٱلۡيَوۡمَ لَا يُخۡرَجُونَ مِنۡهَا وَلَا هُمۡ يُسۡتَعۡتَبُونَ
३५. हे अशासाठी की तुम्ही अल्लाहच्या आयतींची थट्टा उडविली होती, आणि ऐहिक जीवनाने तुम्हाला धोक्यात टाकले होते तेव्हा आजच्या दिवशी ना तर ते (जहन्नममधून) बाहेर काढले जातील आणि ना त्यांच्याकडून लाचारी व बहाणा कबूल केला जाईल
Surah Al-Jathiya, Verse 35
فَلِلَّهِ ٱلۡحَمۡدُ رَبِّ ٱلسَّمَٰوَٰتِ وَرَبِّ ٱلۡأَرۡضِ رَبِّ ٱلۡعَٰلَمِينَ
३६. तेव्हा सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो आकाशांचा व जमिनीचा, आणि सर्व विश्वांचा पालनकर्ता आहे
Surah Al-Jathiya, Verse 36
وَلَهُ ٱلۡكِبۡرِيَآءُ فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۖ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ
३७. आणि समस्त (प्रशंसा व) महानता, आकाशांमध्ये व धरतीत त्याचीच आहे, आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे
Surah Al-Jathiya, Verse 37