UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Al-Fath - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


إِنَّا فَتَحۡنَا لَكَ فَتۡحٗا مُّبِينٗا

१. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान केला आहे
Surah Al-Fath, Verse 1


لِّيَغۡفِرَ لَكَ ٱللَّهُ مَا تَقَدَّمَ مِن ذَنۢبِكَ وَمَا تَأَخَّرَ وَيُتِمَّ نِعۡمَتَهُۥ عَلَيۡكَ وَيَهۡدِيَكَ صِرَٰطٗا مُّسۡتَقِيمٗا

२. यासाठी की अल्लाहने तुमच्या पुढच्या मागच्या चुका माफ कराव्यात, आणि तुमच्यावर आपली कृपा-देणगी पूर्ण करावी आणि तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे
Surah Al-Fath, Verse 2


وَيَنصُرَكَ ٱللَّهُ نَصۡرًا عَزِيزًا

३. आणि तुम्हाला एक भरपूर मदत प्रदान करावी
Surah Al-Fath, Verse 3


هُوَ ٱلَّذِيٓ أَنزَلَ ٱلسَّكِينَةَ فِي قُلُوبِ ٱلۡمُؤۡمِنِينَ لِيَزۡدَادُوٓاْ إِيمَٰنٗا مَّعَ إِيمَٰنِهِمۡۗ وَلِلَّهِ جُنُودُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلِيمًا حَكِيمٗا

४. तोच आहे ज्याने मुसलमानांच्या मनात शांती (आणि आत्मिवश्वास) अवतरित केला, यासाठी की त्यांनी आपल्या ईमानासोबतच आणखी जास्त ईमानात वृद्धिंगत व्हावे. आणि आकाशांची व धरतीची समस्त सैन्ये अल्लाहचीच आहेत, आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे
Surah Al-Fath, Verse 4


لِّيُدۡخِلَ ٱلۡمُؤۡمِنِينَ وَٱلۡمُؤۡمِنَٰتِ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ خَٰلِدِينَ فِيهَا وَيُكَفِّرَ عَنۡهُمۡ سَيِّـَٔاتِهِمۡۚ وَكَانَ ذَٰلِكَ عِندَ ٱللَّهِ فَوۡزًا عَظِيمٗا

५. यासाठी की मुस्लिम पुरुषांना आणि स्त्रियांना त्या जन्नतींमध्ये दाखल करावे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते सदैव काळ राहतील आणि त्यांच्यापासून त्यांची दुष्कर्मे दूर करावीत आणि अल्लाहच्या जवळही फार मोठी सफलता आहे
Surah Al-Fath, Verse 5


وَيُعَذِّبَ ٱلۡمُنَٰفِقِينَ وَٱلۡمُنَٰفِقَٰتِ وَٱلۡمُشۡرِكِينَ وَٱلۡمُشۡرِكَٰتِ ٱلظَّآنِّينَ بِٱللَّهِ ظَنَّ ٱلسَّوۡءِۚ عَلَيۡهِمۡ دَآئِرَةُ ٱلسَّوۡءِۖ وَغَضِبَ ٱللَّهُ عَلَيۡهِمۡ وَلَعَنَهُمۡ وَأَعَدَّ لَهُمۡ جَهَنَّمَۖ وَسَآءَتۡ مَصِيرٗا

६. आणि यासाठी की त्या मुनाफिक (दांभिक) पुरुषांना आणि मुनाफिक स्त्रियांना, आणि मूर्तिपूजक पुरुषांना व मूर्तिपूजक स्त्रियांना अज़ाब (शिक्षा) द्यावी, जे अल्लाहविषयी गैरसमज बाळगतात (वस्तुतः) त्याच्यावरच वाईटपणाचे चक्र आहे. अल्लाह त्यांच्यावर नाराज झाला आणि त्याने त्यांना धिःक्कारले आणि त्यांच्यासाठी जहन्नम तयार केली आणि ते परतीचे मोठे वाईट ठिकाण आहे
Surah Al-Fath, Verse 6


وَلِلَّهِ جُنُودُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَكَانَ ٱللَّهُ عَزِيزًا حَكِيمًا

७. आणि अल्लाहच्याचकरिता आकाशांची आणि धरतीची सैन्ये आहेत, आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे
Surah Al-Fath, Verse 7


إِنَّآ أَرۡسَلۡنَٰكَ شَٰهِدٗا وَمُبَشِّرٗا وَنَذِيرٗا

८. निःसंशय, आम्ही तुम्हाला साक्ष देणारा आणि शुभ समाचार ऐकविणारा व खबरदार करणारा बनवून पाठविले आहे
Surah Al-Fath, Verse 8


لِّتُؤۡمِنُواْ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَتُعَزِّرُوهُ وَتُوَقِّرُوهُۚ وَتُسَبِّحُوهُ بُكۡرَةٗ وَأَصِيلًا

९. यासाठी की (हे ईमानधारकांनो!) तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि त्याला सहाय्य करा व त्याचा आदर राखा, आणि अल्लाहचे पावित्र्य सकाळ-संध्याकाळ वर्णन करा
Surah Al-Fath, Verse 9


إِنَّ ٱلَّذِينَ يُبَايِعُونَكَ إِنَّمَا يُبَايِعُونَ ٱللَّهَ يَدُ ٱللَّهِ فَوۡقَ أَيۡدِيهِمۡۚ فَمَن نَّكَثَ فَإِنَّمَا يَنكُثُ عَلَىٰ نَفۡسِهِۦۖ وَمَنۡ أَوۡفَىٰ بِمَا عَٰهَدَ عَلَيۡهُ ٱللَّهَ فَسَيُؤۡتِيهِ أَجۡرًا عَظِيمٗا

१०. निःसंशय, जे लोक तुमच्याशी बैअत (अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे आज्ञापालन व अनुसरण करण्याचा वायदा ताकीदपूर्वक जाहीर करणे) करतात, ते निःसंशय, अल्लाहशीच बैअत करतात. त्यांच्या हातावर अल्लाहचा हात आहे, तेव्हा जो मनुष्य वचन भंग करील तर तो स्वतःवरच वचन भंग करतो, आणि जो मनुष्य तो वायदा पूर्ण करील, जो त्याने अल्लाहशी केला आहे, तर त्याला लवकरच अल्लाह फार महान मोबदला प्रदान करील
Surah Al-Fath, Verse 10


سَيَقُولُ لَكَ ٱلۡمُخَلَّفُونَ مِنَ ٱلۡأَعۡرَابِ شَغَلَتۡنَآ أَمۡوَٰلُنَا وَأَهۡلُونَا فَٱسۡتَغۡفِرۡ لَنَاۚ يَقُولُونَ بِأَلۡسِنَتِهِم مَّا لَيۡسَ فِي قُلُوبِهِمۡۚ قُلۡ فَمَن يَمۡلِكُ لَكُم مِّنَ ٱللَّهِ شَيۡـًٔا إِنۡ أَرَادَ بِكُمۡ ضَرًّا أَوۡ أَرَادَ بِكُمۡ نَفۡعَۢاۚ بَلۡ كَانَ ٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرَۢا

११. ग्रामीणांपैकी जे मागे सोडून दिले गेले होते, ते आता तुम्हाला निश्चित म्हणतील की आम्ही आपल्या धन-संपत्ती व संततीतच व्यस्त राहिलो, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी माफीची दुआ-प्रार्थना करा. हे लोक आपल्या तोंडांनी ते बोलतात, जे त्यांच्या मनात नाही. तुम्ही उत्तर द्या की तुमच्यासाठी अल्लाहतर्फे एखाद्या गोष्टीचाही अधिकार कोण बाळगतो, जर तो तुम्हाला नुकसान पोहचवू इच्छिल किंवा तुम्हाला काही लाभ पोहचवू इच्छिल? किंबहुना तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो
Surah Al-Fath, Verse 11


بَلۡ ظَنَنتُمۡ أَن لَّن يَنقَلِبَ ٱلرَّسُولُ وَٱلۡمُؤۡمِنُونَ إِلَىٰٓ أَهۡلِيهِمۡ أَبَدٗا وَزُيِّنَ ذَٰلِكَ فِي قُلُوبِكُمۡ وَظَنَنتُمۡ ظَنَّ ٱلسَّوۡءِ وَكُنتُمۡ قَوۡمَۢا بُورٗا

१२. (नव्हे) किंबहुना तुम्ही तर असे गृहीत धरले होते की पैगंबर आणि मुसलमानांचे आपल्या घरांकडे परतणे अगदी अशक्य आहे आणि हाच विचार तुमच्या मनांमध्ये रुजला, तुम्ही दुराग्रह बाळगला होता (वास्तविक) तुम्ही लोक आहातच नष्ट होणारे
Surah Al-Fath, Verse 12


وَمَن لَّمۡ يُؤۡمِنۢ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ فَإِنَّآ أَعۡتَدۡنَا لِلۡكَٰفِرِينَ سَعِيرٗا

१३. आणि जो मनुष्य अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखणारे नाही तर आम्ही देखील अशा काफिरांकरिता धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे
Surah Al-Fath, Verse 13


وَلِلَّهِ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ يَغۡفِرُ لِمَن يَشَآءُ وَيُعَذِّبُ مَن يَشَآءُۚ وَكَانَ ٱللَّهُ غَفُورٗا رَّحِيمٗا

१४. आणि आकाशांची व धरतीची राज्य-सत्ता अल्लाहकरिताच आहे तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल अज़ाब (शिक्षा) देईल आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
Surah Al-Fath, Verse 14


سَيَقُولُ ٱلۡمُخَلَّفُونَ إِذَا ٱنطَلَقۡتُمۡ إِلَىٰ مَغَانِمَ لِتَأۡخُذُوهَا ذَرُونَا نَتَّبِعۡكُمۡۖ يُرِيدُونَ أَن يُبَدِّلُواْ كَلَٰمَ ٱللَّهِۚ قُل لَّن تَتَّبِعُونَا كَذَٰلِكُمۡ قَالَ ٱللَّهُ مِن قَبۡلُۖ فَسَيَقُولُونَ بَلۡ تَحۡسُدُونَنَاۚ بَلۡ كَانُواْ لَا يَفۡقَهُونَ إِلَّا قَلِيلٗا

१५. जेव्हा तुम्ही (युद्धात हाती लागलेला) परिहार घेण्यास जाऊ लागला, तेव्हा त्वरित हे मागे सोडलेले लोक म्हणतील की आम्हालाही आपल्या सोबत येण्याची आज्ञा द्या. ते असे इच्छितात की अल्लाहचे कथन बदलून टाकावे (तुम्ही त्यांना) सांगा की, अल्लाहने या आधीच सांगून टाकले आहे की तुम्ही कधीही आमचे अनुसरण न कराल तेव्हा ते यावर उत्तर देतील की (नाही, नाही) किंबहुना तुम्हीच आमचा मत्सर करता. (खरी गोष्ट अशी की) हे लोक फार कमी समजतात
Surah Al-Fath, Verse 15


قُل لِّلۡمُخَلَّفِينَ مِنَ ٱلۡأَعۡرَابِ سَتُدۡعَوۡنَ إِلَىٰ قَوۡمٍ أُوْلِي بَأۡسٖ شَدِيدٖ تُقَٰتِلُونَهُمۡ أَوۡ يُسۡلِمُونَۖ فَإِن تُطِيعُواْ يُؤۡتِكُمُ ٱللَّهُ أَجۡرًا حَسَنٗاۖ وَإِن تَتَوَلَّوۡاْ كَمَا تَوَلَّيۡتُم مِّن قَبۡلُ يُعَذِّبۡكُمۡ عَذَابًا أَلِيمٗا

१६. (तुम्ही) मागे सोडलेल्या ग्रामीण लोकांना सांगा की लवकरच तुम्ही एका मोठ्या शूरवीर जनसमूहाकडे बोलाविले जाल, की तुम्ही त्याच्याशी युद्ध कराल किंवा ते ईमानधारक होतील. तेव्हा जर तुम्ही आज्ञापालन कराल, तर अल्लाह तुम्हाला फार चांगला मोबदला प्रदान करील आणि जर तुम्ही तोंड फिरविले, जसे की तुम्ही यापूर्वी तोंड फिरवून घेतले आहे, तर तो तुम्हाला दुःखदायक शिक्षा यातना देईल
Surah Al-Fath, Verse 16


لَّيۡسَ عَلَى ٱلۡأَعۡمَىٰ حَرَجٞ وَلَا عَلَى ٱلۡأَعۡرَجِ حَرَجٞ وَلَا عَلَى ٱلۡمَرِيضِ حَرَجٞۗ وَمَن يُطِعِ ٱللَّهَ وَرَسُولَهُۥ يُدۡخِلۡهُ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُۖ وَمَن يَتَوَلَّ يُعَذِّبۡهُ عَذَابًا أَلِيمٗا

१७. आंधळ्यावर कसलाही अपराध नाही, ना पांगळ्यावर काही अपराध आहे आणि ना आजारी माणसावर काही अपराध आहे आणि जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आदेशाचे पालन करील, त्याला अल्लाह अशा जन्नतमध्ये दाखल करील, जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत आणि जो तोंड फिरविल, त्याला तो दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) देईल
Surah Al-Fath, Verse 17


۞لَّقَدۡ رَضِيَ ٱللَّهُ عَنِ ٱلۡمُؤۡمِنِينَ إِذۡ يُبَايِعُونَكَ تَحۡتَ ٱلشَّجَرَةِ فَعَلِمَ مَا فِي قُلُوبِهِمۡ فَأَنزَلَ ٱلسَّكِينَةَ عَلَيۡهِمۡ وَأَثَٰبَهُمۡ فَتۡحٗا قَرِيبٗا

१८. निःसंशय, अल्लाह ईमान राखणाऱ्यांशी प्रसन्न झाला, जेव्हा ते झाडाखाली तुमच्याशी बैअत (प्रतिज्ञा) करीत होते. त्याच्या मनात जे काही होते, ते त्याने माहीत करून घेतले आणि त्याच्यावर शांती अवतरित केली आणि त्यांना निकटचा विजय प्रदान केला
Surah Al-Fath, Verse 18


وَمَغَانِمَ كَثِيرَةٗ يَأۡخُذُونَهَاۗ وَكَانَ ٱللَّهُ عَزِيزًا حَكِيمٗا

१९. आणि युद्धात जिंकलेला अनेक प्रकारचा माल, जो ते प्राप्त करतील आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे
Surah Al-Fath, Verse 19


وَعَدَكُمُ ٱللَّهُ مَغَانِمَ كَثِيرَةٗ تَأۡخُذُونَهَا فَعَجَّلَ لَكُمۡ هَٰذِهِۦ وَكَفَّ أَيۡدِيَ ٱلنَّاسِ عَنكُمۡ وَلِتَكُونَ ءَايَةٗ لِّلۡمُؤۡمِنِينَ وَيَهۡدِيَكُمۡ صِرَٰطٗا مُّسۡتَقِيمٗا

२०. अल्लाहने तुमच्याशी खूप जास्त युद्धात जिंकलेल्या मालाचा वायदा केला आहे, जो तुम्ही प्राप्त कराल आणि हे तर तुम्हाला त्वरित प्रदान केले, आणि लोकांचे हात तुमच्यापासून रोखले, यासाठी की ईमान राखणाऱ्यांकरिता ही एक निशाणी ठरावी, आणि यासाठी की त्याने तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे
Surah Al-Fath, Verse 20


وَأُخۡرَىٰ لَمۡ تَقۡدِرُواْ عَلَيۡهَا قَدۡ أَحَاطَ ٱللَّهُ بِهَاۚ وَكَانَ ٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٗا

२१. आणि (तो) तुम्हाला इतर गनीमती (युद्धात हाती लागलेला माल) देखील देईल, ज्यांच्यावर तुम्ही अजून काबू मिळविला नाही अल्लाहने त्यांना काबूत ठेवले आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे
Surah Al-Fath, Verse 21


وَلَوۡ قَٰتَلَكُمُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ لَوَلَّوُاْ ٱلۡأَدۡبَٰرَ ثُمَّ لَا يَجِدُونَ وَلِيّٗا وَلَا نَصِيرٗا

२२. आणि जर तुमच्याशी काफिरांनी लढाई केली असती तर निःसंशय ते पाठ दाखवून पळाले असते. मग ना त्यांना कोणी कार्यसाधक आढळला असता, ना कोणी मदत करणारा
Surah Al-Fath, Verse 22


سُنَّةَ ٱللَّهِ ٱلَّتِي قَدۡ خَلَتۡ مِن قَبۡلُۖ وَلَن تَجِدَ لِسُنَّةِ ٱللَّهِ تَبۡدِيلٗا

२३. अल्लाहच्या त्या नियमानुसार जो पहिल्यापासून चालत आला आहे आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधीही बदल झालेला आढळत नाही
Surah Al-Fath, Verse 23


وَهُوَ ٱلَّذِي كَفَّ أَيۡدِيَهُمۡ عَنكُمۡ وَأَيۡدِيَكُمۡ عَنۡهُم بِبَطۡنِ مَكَّةَ مِنۢ بَعۡدِ أَنۡ أَظۡفَرَكُمۡ عَلَيۡهِمۡۚ وَكَانَ ٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِيرًا

२४. तोच आहे, ज्याने खास मक्का येथे काफिरांच्या हातांना तुमच्यापासून आणि तुमच्या हातांना त्यांच्यापासून रोखले. यानंतर की त्याने तुम्हाला त्यांच्यावर विजयी केले, आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते सर्व पाहत आहे
Surah Al-Fath, Verse 24


هُمُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَصَدُّوكُمۡ عَنِ ٱلۡمَسۡجِدِ ٱلۡحَرَامِ وَٱلۡهَدۡيَ مَعۡكُوفًا أَن يَبۡلُغَ مَحِلَّهُۥۚ وَلَوۡلَا رِجَالٞ مُّؤۡمِنُونَ وَنِسَآءٞ مُّؤۡمِنَٰتٞ لَّمۡ تَعۡلَمُوهُمۡ أَن تَطَـُٔوهُمۡ فَتُصِيبَكُم مِّنۡهُم مَّعَرَّةُۢ بِغَيۡرِ عِلۡمٖۖ لِّيُدۡخِلَ ٱللَّهُ فِي رَحۡمَتِهِۦ مَن يَشَآءُۚ لَوۡ تَزَيَّلُواْ لَعَذَّبۡنَا ٱلَّذِينَ كَفَرُواْ مِنۡهُمۡ عَذَابًا أَلِيمًا

२५. हेच ते लोक होत, ज्यांनी कुप्र (इन्कार) केला आणि तुम्हाला मस्जिदेे हराम (काबागृहा) पासून रोखले आणि कुर्बानीसाठी थांबलेल्या जनावरांना त्याच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यापासून (रोखले) आणि जर असे (अनेक) मुस्लिम पुरुष आणि (अनेक) मुस्लिम स्त्रिया नसत्या, ज्यांची तुम्हाला खबर नव्हती की तुम्ही त्यांना (अजाणतेपणी) चिरडून टाकाल, ज्याबद्दल त्यांच्यामुळे तुम्हालाही नकळत हानि पोहचली असती (तर तुम्हाला लढण्याची अनुमती दिली गेली असती, परंतु असे केले गेले नाही) यासाठी की अल्लाहने आपल्या दया कृपेत, ज्याला इच्छिल त्याला दाखल करावे, आणि जर ते वेगवेगळे राहिले असते, तर त्यांच्यात जे काफिर होते, आम्ही त्यांना दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) दिला असता
Surah Al-Fath, Verse 25


إِذۡ جَعَلَ ٱلَّذِينَ كَفَرُواْ فِي قُلُوبِهِمُ ٱلۡحَمِيَّةَ حَمِيَّةَ ٱلۡجَٰهِلِيَّةِ فَأَنزَلَ ٱللَّهُ سَكِينَتَهُۥ عَلَىٰ رَسُولِهِۦ وَعَلَى ٱلۡمُؤۡمِنِينَ وَأَلۡزَمَهُمۡ كَلِمَةَ ٱلتَّقۡوَىٰ وَكَانُوٓاْ أَحَقَّ بِهَا وَأَهۡلَهَاۚ وَكَانَ ٱللَّهُ بِكُلِّ شَيۡءٍ عَلِيمٗا

२६. जेव्हा त्या काफिरांनी आपल्या मनात पक्षपात भावनेला स्थान दिले, आणि पक्षपातही अडाणीपणाचा, तेव्हा अल्लाहने आपल्या पैगंबरावर आणि ईमान राखणाऱ्यांवर आपल्यातर्फे शांती अवतरित केली, आणि ईमान राखणाऱ्यांना ईशभया (तकवा) च्या गोष्टीवर दृढराखले१ आणि ते या गोष्टीस पात्र आणि जास्त हक्कदार होते आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीस चांगल्या प्रकारे जाणतो
Surah Al-Fath, Verse 26


لَّقَدۡ صَدَقَ ٱللَّهُ رَسُولَهُ ٱلرُّءۡيَا بِٱلۡحَقِّۖ لَتَدۡخُلُنَّ ٱلۡمَسۡجِدَ ٱلۡحَرَامَ إِن شَآءَ ٱللَّهُ ءَامِنِينَ مُحَلِّقِينَ رُءُوسَكُمۡ وَمُقَصِّرِينَ لَا تَخَافُونَۖ فَعَلِمَ مَا لَمۡ تَعۡلَمُواْ فَجَعَلَ مِن دُونِ ذَٰلِكَ فَتۡحٗا قَرِيبًا

२७. वस्तुतः अल्लाहने आपल्या पैगंबराला, खरे स्वप्न दाखविले की जर अल्लाहने इच्छिले तर तुम्ही अवश्य शांती-सुरक्षापूर्वक मस्जिदेे हराममध्ये दाखल व्हाल, डोके मुंडवित आणि डोक्याचे केस कापवून घेत अगदी निर्भय होऊन. तो त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत, तेव्हा त्याने तुम्हाला यापूर्वी एक निकटचा विजय प्रदान केला
Surah Al-Fath, Verse 27


هُوَ ٱلَّذِيٓ أَرۡسَلَ رَسُولَهُۥ بِٱلۡهُدَىٰ وَدِينِ ٱلۡحَقِّ لِيُظۡهِرَهُۥ عَلَى ٱلدِّينِ كُلِّهِۦۚ وَكَفَىٰ بِٱللَّهِ شَهِيدٗا

२८. तोच होय, ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मासह पाठविले, यासाठी की त्याला प्रत्येक धर्मावर वर्चस्वशाली करावे, आणि साक्ष देण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे
Surah Al-Fath, Verse 28


مُّحَمَّدٞ رَّسُولُ ٱللَّهِۚ وَٱلَّذِينَ مَعَهُۥٓ أَشِدَّآءُ عَلَى ٱلۡكُفَّارِ رُحَمَآءُ بَيۡنَهُمۡۖ تَرَىٰهُمۡ رُكَّعٗا سُجَّدٗا يَبۡتَغُونَ فَضۡلٗا مِّنَ ٱللَّهِ وَرِضۡوَٰنٗاۖ سِيمَاهُمۡ فِي وُجُوهِهِم مِّنۡ أَثَرِ ٱلسُّجُودِۚ ذَٰلِكَ مَثَلُهُمۡ فِي ٱلتَّوۡرَىٰةِۚ وَمَثَلُهُمۡ فِي ٱلۡإِنجِيلِ كَزَرۡعٍ أَخۡرَجَ شَطۡـَٔهُۥ فَـَٔازَرَهُۥ فَٱسۡتَغۡلَظَ فَٱسۡتَوَىٰ عَلَىٰ سُوقِهِۦ يُعۡجِبُ ٱلزُّرَّاعَ لِيَغِيظَ بِهِمُ ٱلۡكُفَّارَۗ وَعَدَ ٱللَّهُ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ مِنۡهُم مَّغۡفِرَةٗ وَأَجۡرًا عَظِيمَۢا

२९. मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, ते काफिरांवर कठोर आहेत. आपसात दयाशील आहेत. तुम्ही त्यांना पाहाल की रुकूअ व सजदे करीत आहेत. अल्लाहची कृपा व त्याच्या प्रसन्नतेची कामना करण्यात (मग्न) आहेत. त्यांचे निशाण त्याच्या चेहऱ्यांवर सजद्यांच्या प्रभावाने आहे. त्यांचा हाच गुणविशेष (उदाहरण) तौरातमध्ये आहे आणि त्यांचे उदाहरण इंजीलमध्ये आहे, त्या शेतीसारखे, जिने आपले अंकूर बाहेर काढले, मग त्याला मजबूती दिली आणि ते जाड झाले, मग आपल्या खोडावर सरळ उभे राहिले आणि शेतकऱ्यांना आनंदित करू लागले, यासाठी की त्यांच्यामुळे काफिरांना चिडवावे, आणि ईमान राखणाऱ्यांशी व नेक सदाचारी लोकांशी अल्लाहने माफीचा आणि फार मोठ्या मोबदल्याचा वायदा केला आहे
Surah Al-Fath, Verse 29


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 47
>> Surah 49

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai