Surah Qaf - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
قٓۚ وَٱلۡقُرۡءَانِ ٱلۡمَجِيدِ
१. क़ाफ. फार मोठी गरिमा राखणाऱ्या या कुरआनाची शपथ आहे
Surah Qaf, Verse 1
بَلۡ عَجِبُوٓاْ أَن جَآءَهُم مُّنذِرٞ مِّنۡهُمۡ فَقَالَ ٱلۡكَٰفِرُونَ هَٰذَا شَيۡءٌ عَجِيبٌ
२. तथापि त्यांना आश्चर्य वाटले की त्यांच्याजवळ त्यांच्यामधूनच एक खबरदार करणारा आला, तेव्हा काफिर म्हणाले, ही एक विचित्र गोष्ट आहे
Surah Qaf, Verse 2
أَءِذَا مِتۡنَا وَكُنَّا تُرَابٗاۖ ذَٰلِكَ رَجۡعُۢ بَعِيدٞ
३. काय जेव्हा आम्ही मेल्यावर माती होऊन जाऊ, मग हे परतणे दूरची गोष्ट आहे
Surah Qaf, Verse 3
قَدۡ عَلِمۡنَا مَا تَنقُصُ ٱلۡأَرۡضُ مِنۡهُمۡۖ وَعِندَنَا كِتَٰبٌ حَفِيظُۢ
४. जमीन जे काही त्यांच्यातून घटविते, ते आम्ही जाणतो आणि आमच्याजवळ सर्व स्मरणात राखणारा ग्रंथ आहे
Surah Qaf, Verse 4
بَلۡ كَذَّبُواْ بِٱلۡحَقِّ لَمَّا جَآءَهُمۡ فَهُمۡ فِيٓ أَمۡرٖ مَّرِيجٍ
५. तथापि त्यांनी सत्य गोष्टीला खोटे म्हटले, जेव्हा ती त्यांच्याजवळ पोहचली, तेव्हा ते गोंधळात पडले आहेत
Surah Qaf, Verse 5
أَفَلَمۡ يَنظُرُوٓاْ إِلَى ٱلسَّمَآءِ فَوۡقَهُمۡ كَيۡفَ بَنَيۡنَٰهَا وَزَيَّنَّـٰهَا وَمَا لَهَا مِن فُرُوجٖ
६. काय त्यांनी आकाशाला आपल्यावर (असलेले) पाहिले नाही की आम्ही ते कशा प्रकारे बनविले आहे आणि त्याला सुशोभित केले आहे? त्यात कोठेही फट (किंवा छिद्र) नाही
Surah Qaf, Verse 6
وَٱلۡأَرۡضَ مَدَدۡنَٰهَا وَأَلۡقَيۡنَا فِيهَا رَوَٰسِيَ وَأَنۢبَتۡنَا فِيهَا مِن كُلِّ زَوۡجِۭ بَهِيجٖ
७. आणि जमिनीला आम्ही बिछविले आहे आणि तिच्यावर आम्ही पर्वत रोवले आणि तिच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर वस्तू उगविल्या
Surah Qaf, Verse 7
تَبۡصِرَةٗ وَذِكۡرَىٰ لِكُلِّ عَبۡدٖ مُّنِيبٖ
८. यासाठी की प्रत्येक (अल्लाहकडे) परतणाऱ्या दासाकरिता पाहण्याचे व समजण्याचे साधन व्हावे
Surah Qaf, Verse 8
وَنَزَّلۡنَا مِنَ ٱلسَّمَآءِ مَآءٗ مُّبَٰرَكٗا فَأَنۢبَتۡنَا بِهِۦ جَنَّـٰتٖ وَحَبَّ ٱلۡحَصِيدِ
९. आणि आम्ही आकाशातून शुभ पाण्याचा वर्षाव केला आणि त्याद्वारे बागा आणि कापणी केल्या जाणाऱ्या शेताचे अन्न-धान्य निर्माण केले
Surah Qaf, Verse 9
وَٱلنَّخۡلَ بَاسِقَٰتٖ لَّهَا طَلۡعٞ نَّضِيدٞ
१०. आणि खजुरींचे उंच उंच वृक्ष, ज्यांचे गुच्छे एकावर एक आहेत
Surah Qaf, Verse 10
رِّزۡقٗا لِّلۡعِبَادِۖ وَأَحۡيَيۡنَا بِهِۦ بَلۡدَةٗ مَّيۡتٗاۚ كَذَٰلِكَ ٱلۡخُرُوجُ
११. दासांच्या आजिविकेकरिता आणि आम्ही पाण्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. अशाच प्रकारे (कबरींमधून) निघायचे आहे
Surah Qaf, Verse 11
كَذَّبَتۡ قَبۡلَهُمۡ قَوۡمُ نُوحٖ وَأَصۡحَٰبُ ٱلرَّسِّ وَثَمُودُ
१२. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि रस्सच्या निवासींनी आणि समूदच्या लोकांनी खोटे ठरविले होते
Surah Qaf, Verse 12
وَعَادٞ وَفِرۡعَوۡنُ وَإِخۡوَٰنُ لُوطٖ
१३. आणि आदने आणि फिरऔनने आणि लूतच्या बांधवांनी
Surah Qaf, Verse 13
وَأَصۡحَٰبُ ٱلۡأَيۡكَةِ وَقَوۡمُ تُبَّعٖۚ كُلّٞ كَذَّبَ ٱلرُّسُلَ فَحَقَّ وَعِيدِ
१४. आणि आयकावाल्यांनी आणि तुब्बअच्या जनसमूहाने (देखील खोटे ठरविले होते) सर्वांनी पैगंबरांना खोटे ठरविले, तेव्हा माझा शिक्षेचा वायदा त्यांच्याकरिता खरा ठरला
Surah Qaf, Verse 14
أَفَعَيِينَا بِٱلۡخَلۡقِ ٱلۡأَوَّلِۚ بَلۡ هُمۡ فِي لَبۡسٖ مِّنۡ خَلۡقٖ جَدِيدٖ
१५. काय आम्ही पहिल्यांदा निर्माण केल्याने थकलो? किंबहुना हे लोक नव्या जीवनाच्या संदर्भात संशयग्रस्त आहेत
Surah Qaf, Verse 15
وَلَقَدۡ خَلَقۡنَا ٱلۡإِنسَٰنَ وَنَعۡلَمُ مَا تُوَسۡوِسُ بِهِۦ نَفۡسُهُۥۖ وَنَحۡنُ أَقۡرَبُ إِلَيۡهِ مِنۡ حَبۡلِ ٱلۡوَرِيدِ
१६. आम्ही माणसाला निर्माण केले आहे आणि त्याच्या मनात जे विचार निर्माण होतात आम्ही त्यांना जाणतो,१ आणि आम्ही त्याच्या मुख्य शिरे (प्राण नाडी) पेक्षाही अधिक त्याच्या समीप आहोत
Surah Qaf, Verse 16
إِذۡ يَتَلَقَّى ٱلۡمُتَلَقِّيَانِ عَنِ ٱلۡيَمِينِ وَعَنِ ٱلشِّمَالِ قَعِيدٞ
१७. जेव्हा दोन (नोंद) घेणारे जे घेतात, एक उजव्या बाजूला, आणि दुसरा डाव्या बाजूला बसला आहे
Surah Qaf, Verse 17
مَّا يَلۡفِظُ مِن قَوۡلٍ إِلَّا لَدَيۡهِ رَقِيبٌ عَتِيدٞ
१८. (मनुष्य) तोंडाने एखादा शब्द काढत नाही तोच त्याच्याजवळ रक्षक (पहारेकरी) तयार आहे
Surah Qaf, Verse 18
وَجَآءَتۡ سَكۡرَةُ ٱلۡمَوۡتِ بِٱلۡحَقِّۖ ذَٰلِكَ مَا كُنتَ مِنۡهُ تَحِيدُ
१९. आणि मृत्युची मुर्छा सत्यासह येऊन पोहचली, हीच ती गोष्ट होय, जिच्यापासून तू पळ काढत होतास
Surah Qaf, Verse 19
وَنُفِخَ فِي ٱلصُّورِۚ ذَٰلِكَ يَوۡمُ ٱلۡوَعِيدِ
२०. आणि सूर फुंकला जाईल अज़ाब (शिक्षा-यातने) च्या वायद्याचा दिवस हाच आहे
Surah Qaf, Verse 20
وَجَآءَتۡ كُلُّ نَفۡسٖ مَّعَهَا سَآئِقٞ وَشَهِيدٞ
२१. आणि प्रत्येक मनुष्य अशा प्रकारे येईल की त्याच्यासोबत एक हाकणारा असेल आणि एक साक्ष देणारा
Surah Qaf, Verse 21
لَّقَدۡ كُنتَ فِي غَفۡلَةٖ مِّنۡ هَٰذَا فَكَشَفۡنَا عَنكَ غِطَآءَكَ فَبَصَرُكَ ٱلۡيَوۡمَ حَدِيدٞ
२२. निःसंशय, तू यापासून बेसावध (गफलतीत) होता, परंतु आम्ही तुझ्या समोरून पडदा हटविला, तेव्हा आज तुझी नजर फार तीक्ष्ण आहे
Surah Qaf, Verse 22
وَقَالَ قَرِينُهُۥ هَٰذَا مَا لَدَيَّ عَتِيدٌ
२३. त्याच्यासोबत राहणारे फरिश्ते म्हणतील, हा हजर आहे, जो की माझ्याजवळ होता
Surah Qaf, Verse 23
أَلۡقِيَا فِي جَهَنَّمَ كُلَّ كَفَّارٍ عَنِيدٖ
२४. दोघे टाकून द्या जहन्नममध्ये प्रत्येक काफिर, उदंड(उध्दट) माणसाला
Surah Qaf, Verse 24
مَّنَّاعٖ لِّلۡخَيۡرِ مُعۡتَدٖ مُّرِيبٍ
२५. जो सत्कर्मांपासून रोखणारा, मर्यादा भंग करणारा आणि संशयी होता
Surah Qaf, Verse 25
ٱلَّذِي جَعَلَ مَعَ ٱللَّهِ إِلَٰهًا ءَاخَرَ فَأَلۡقِيَاهُ فِي ٱلۡعَذَابِ ٱلشَّدِيدِ
२६. ज्याने अल्लाहसोबत दुसरा माबूद (उपास्य) ठरवून घेतला होता, तेव्हा त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकून द्या
Surah Qaf, Verse 26
۞قَالَ قَرِينُهُۥ رَبَّنَا مَآ أَطۡغَيۡتُهُۥ وَلَٰكِن كَانَ فِي ضَلَٰلِۭ بَعِيدٖ
२७. त्याचा साथीदार (सैतान) म्हणेल की हे आमच्या पालनकर्त्या! मी याला मार्गभ्रष्ट केले नव्हते, उलट हा स्वतःच दूरच्या मार्गभ्रष्टतेत होता
Surah Qaf, Verse 27
قَالَ لَا تَخۡتَصِمُواْ لَدَيَّ وَقَدۡ قَدَّمۡتُ إِلَيۡكُم بِٱلۡوَعِيدِ
२८. (अल्लाह) फर्माविल की, माझ्यासमोर वादविवाद करू नका. मी तर आधीच तुमच्याकडे शिक्षा - यातनेचा वायदा पाठविला होता
Surah Qaf, Verse 28
مَا يُبَدَّلُ ٱلۡقَوۡلُ لَدَيَّ وَمَآ أَنَا۠ بِظَلَّـٰمٖ لِّلۡعَبِيدِ
२९. माझ्याजवळ गोष्ट बदलली जात नाही आणि ना मी आपल्या दासांवर (उपासकांवर) किंचितही अत्याचार करणारा आहे
Surah Qaf, Verse 29
يَوۡمَ نَقُولُ لِجَهَنَّمَ هَلِ ٱمۡتَلَأۡتِ وَتَقُولُ هَلۡ مِن مَّزِيدٖ
३०. ज्या दिवशी आम्ही जहन्नमला विचारू की काय तू (पूर्णतः) भरली? ती उत्तर देईल की, आणखी काही जास्त आहे का
Surah Qaf, Verse 30
وَأُزۡلِفَتِ ٱلۡجَنَّةُ لِلۡمُتَّقِينَ غَيۡرَ بَعِيدٍ
३१. आणि जन्नत, नेक सदाचारी लोकांसाठी अगदी जवळ केली जाईल किंचितही दूर नसेल
Surah Qaf, Verse 31
هَٰذَا مَا تُوعَدُونَ لِكُلِّ أَوَّابٍ حَفِيظٖ
३२. हे आहे, ज्याचा वायदा तुमच्याशी केला जात होता, अशा त्या प्रत्येक माणसासाठी, जो ध्यानमग्न आणि नियमित (आज्ञापालन) करणारा असेल
Surah Qaf, Verse 32
مَّنۡ خَشِيَ ٱلرَّحۡمَٰنَ بِٱلۡغَيۡبِ وَجَآءَ بِقَلۡبٖ مُّنِيبٍ
३३. जो रहमान (दयावान अल्लाह) चे गुप्तपणे भय राखत असेल आणि रुजू होणारे हृदय घेऊन आला असेल
Surah Qaf, Verse 33
ٱدۡخُلُوهَا بِسَلَٰمٖۖ ذَٰلِكَ يَوۡمُ ٱلۡخُلُودِ
३४. तुम्ही या जन्नतमध्ये शांतीपूर्वक दाखल व्हा. हा नेहमी राहण्याचा दिवस आहे
Surah Qaf, Verse 34
لَهُم مَّا يَشَآءُونَ فِيهَا وَلَدَيۡنَا مَزِيدٞ
३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना) आमच्याजवळ आणखीही जास्त आहे
Surah Qaf, Verse 35
وَكَمۡ أَهۡلَكۡنَا قَبۡلَهُم مِّن قَرۡنٍ هُمۡ أَشَدُّ مِنۡهُم بَطۡشٗا فَنَقَّبُواْ فِي ٱلۡبِلَٰدِ هَلۡ مِن مَّحِيصٍ
३६. आणि त्यांच्यापूर्वीही आम्ही अनेक जनसमूहांना नष्ट करून टाकले आहे, जे त्याच्यापेक्षा शक्ती सामर्थ्यात खूप जास्त होते. ते शहरामध्ये फिरतच राहिले की एखादे पळ काढण्याचे स्थान आहे
Surah Qaf, Verse 36
إِنَّ فِي ذَٰلِكَ لَذِكۡرَىٰ لِمَن كَانَ لَهُۥ قَلۡبٌ أَوۡ أَلۡقَى ٱلسَّمۡعَ وَهُوَ شَهِيدٞ
३७. यात, त्या प्रत्येक माणसाकरिता बोध उपदेश आहे, जो हृदय बाळगत असेल किंवा लक्षपूर्वक ऐकत असेल आणि तो हजर असेल
Surah Qaf, Verse 37
وَلَقَدۡ خَلَقۡنَا ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ وَمَا بَيۡنَهُمَا فِي سِتَّةِ أَيَّامٖ وَمَا مَسَّنَا مِن لُّغُوبٖ
३८. निःसंशय, आम्ही आकाशांच्या आणि धरतीच्या आणि त्या दोघांच्या दरम्यान जे काही आहे, ते सर्व (फक्त) सहा दिवसांत निर्माण केले, आणि आम्हाला थकव्याने स्पर्शही केला नाही
Surah Qaf, Verse 38
فَٱصۡبِرۡ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَسَبِّحۡ بِحَمۡدِ رَبِّكَ قَبۡلَ طُلُوعِ ٱلشَّمۡسِ وَقَبۡلَ ٱلۡغُرُوبِ
३९. यास्तव तुम्ही त्या गोष्टींवर धीर-संयम राखा आणि आपल्या पालनकर्त्याचे पावित्र्यगान, प्रशंसेसह सूर्योदयापूर्वीही आणि सूर्यास्तापूर्वीही करीत राहा
Surah Qaf, Verse 39
وَمِنَ ٱلَّيۡلِ فَسَبِّحۡهُ وَأَدۡبَٰرَ ٱلسُّجُودِ
४०. आणि रात्रीच्या काही काळातही महिमागान करा आणि नमाजनंतरही
Surah Qaf, Verse 40
وَٱسۡتَمِعۡ يَوۡمَ يُنَادِ ٱلۡمُنَادِ مِن مَّكَانٖ قَرِيبٖ
४१. आणि ऐका की ज्या दिवसी एक पुकारणारा जवळच्या ठिकाणाहूनच पुकारेल
Surah Qaf, Verse 41
يَوۡمَ يَسۡمَعُونَ ٱلصَّيۡحَةَ بِٱلۡحَقِّۚ ذَٰلِكَ يَوۡمُ ٱلۡخُرُوجِ
४२. ज्या दिवशी तो भयंकर आवाज खात्रीपूर्वक ऐकतील, हा बाहेर पडण्याचा दिवस असेल
Surah Qaf, Verse 42
إِنَّا نَحۡنُ نُحۡيِۦ وَنُمِيتُ وَإِلَيۡنَا ٱلۡمَصِيرُ
४३. आम्हीच जिवंत करतो आणि आम्हीच मृत्यु देतो आणि आमच्याचकडे परतून यायचे आहे
Surah Qaf, Verse 43
يَوۡمَ تَشَقَّقُ ٱلۡأَرۡضُ عَنۡهُمۡ سِرَاعٗاۚ ذَٰلِكَ حَشۡرٌ عَلَيۡنَا يَسِيرٞ
४४. ज्या दिवशी जमीन विदीर्ण होईल आणि हे धावत पळत (बाहेर पडतील) हे एकत्रित करणे आमच्यासाठी फार सोपे आहे
Surah Qaf, Verse 44
نَّحۡنُ أَعۡلَمُ بِمَا يَقُولُونَۖ وَمَآ أَنتَ عَلَيۡهِم بِجَبَّارٖۖ فَذَكِّرۡ بِٱلۡقُرۡءَانِ مَن يَخَافُ وَعِيدِ
४५. आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही हे सांगत आहेत आणि तुम्ही त्यांना जबरदस्तीपूर्वक राजी करून घेणारे नाही, तेव्हा तुम्ही त्यांना कुरआनाच्या माध्यमाने समजावित राहा, जे माझ्या ताकीदीचे भय
Surah Qaf, Verse 45