UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Ar-Rahman - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


ٱلرَّحۡمَٰنُ

१. दयावान (रहमान) ने
Surah Ar-Rahman, Verse 1


عَلَّمَ ٱلۡقُرۡءَانَ

२. कुरआन शिकविले
Surah Ar-Rahman, Verse 2


خَلَقَ ٱلۡإِنسَٰنَ

३. त्यानेच मानवाला निर्माण केले
Surah Ar-Rahman, Verse 3


عَلَّمَهُ ٱلۡبَيَانَ

४. त्याला बोलणे शिकविले
Surah Ar-Rahman, Verse 4


ٱلشَّمۡسُ وَٱلۡقَمَرُ بِحُسۡبَانٖ

५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात
Surah Ar-Rahman, Verse 5


وَٱلنَّجۡمُ وَٱلشَّجَرُ يَسۡجُدَانِ

६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात
Surah Ar-Rahman, Verse 6


وَٱلسَّمَآءَ رَفَعَهَا وَوَضَعَ ٱلۡمِيزَانَ

७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली
Surah Ar-Rahman, Verse 7


أَلَّا تَطۡغَوۡاْ فِي ٱلۡمِيزَانِ

८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे
Surah Ar-Rahman, Verse 8


وَأَقِيمُواْ ٱلۡوَزۡنَ بِٱلۡقِسۡطِ وَلَا تُخۡسِرُواْ ٱلۡمِيزَانَ

९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका
Surah Ar-Rahman, Verse 9


وَٱلۡأَرۡضَ وَضَعَهَا لِلۡأَنَامِ

१०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले
Surah Ar-Rahman, Verse 10


فِيهَا فَٰكِهَةٞ وَٱلنَّخۡلُ ذَاتُ ٱلۡأَكۡمَامِ

११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत
Surah Ar-Rahman, Verse 11


وَٱلۡحَبُّ ذُو ٱلۡعَصۡفِ وَٱلرَّيۡحَانُ

१२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत
Surah Ar-Rahman, Verse 12


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

१३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 13


خَلَقَ ٱلۡإِنسَٰنَ مِن صَلۡصَٰلٖ كَٱلۡفَخَّارِ

१४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती
Surah Ar-Rahman, Verse 14


وَخَلَقَ ٱلۡجَآنَّ مِن مَّارِجٖ مِّن نَّارٖ

१५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले
Surah Ar-Rahman, Verse 15


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

१६. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 16


رَبُّ ٱلۡمَشۡرِقَيۡنِ وَرَبُّ ٱلۡمَغۡرِبَيۡنِ

१७. तो दोन्ही पूर्वांचा आणि दोन्ही पश्चिमांचा स्वामी आहे
Surah Ar-Rahman, Verse 17


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

१८. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 18


مَرَجَ ٱلۡبَحۡرَيۡنِ يَلۡتَقِيَانِ

१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात
Surah Ar-Rahman, Verse 19


بَيۡنَهُمَا بَرۡزَخٞ لَّا يَبۡغِيَانِ

२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत
Surah Ar-Rahman, Verse 20


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 21


يَخۡرُجُ مِنۡهُمَا ٱللُّؤۡلُؤُ وَٱلۡمَرۡجَانُ

२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात
Surah Ar-Rahman, Verse 22


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

२३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 23


وَلَهُ ٱلۡجَوَارِ ٱلۡمُنشَـَٔاتُ فِي ٱلۡبَحۡرِ كَٱلۡأَعۡلَٰمِ

२४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत
Surah Ar-Rahman, Verse 24


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

२५. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 25


كُلُّ مَنۡ عَلَيۡهَا فَانٖ

२६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे
Surah Ar-Rahman, Verse 26


وَيَبۡقَىٰ وَجۡهُ رَبِّكَ ذُو ٱلۡجَلَٰلِ وَٱلۡإِكۡرَامِ

२७. केवळ तुमच्या पालनकर्त्याचे मुख (अस्तित्व), जो मोठा महान आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, बाकी राहील
Surah Ar-Rahman, Verse 27


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

२८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 28


يَسۡـَٔلُهُۥ مَن فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ كُلَّ يَوۡمٍ هُوَ فِي شَأۡنٖ

२९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१
Surah Ar-Rahman, Verse 29


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

३०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 30


سَنَفۡرُغُ لَكُمۡ أَيُّهَ ٱلثَّقَلَانِ

३१. (हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो!) लवकरच आम्ही तुमच्याकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करू
Surah Ar-Rahman, Verse 31


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

३२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 32


يَٰمَعۡشَرَ ٱلۡجِنِّ وَٱلۡإِنسِ إِنِ ٱسۡتَطَعۡتُمۡ أَن تَنفُذُواْ مِنۡ أَقۡطَارِ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ فَٱنفُذُواْۚ لَا تَنفُذُونَ إِلَّا بِسُلۡطَٰنٖ

३३. (हे जिन्न आणि मनावांच्या समूहांनो!) जर तुमच्यात आकाशांच्या आणि धरतीच्या किनाऱ्या (सीमा) बाहेर निघण्याचे सामर्थ्य आहे, तर निघून जा (तथापि) वर्चस्व आणि सामर्थ्याविना तुम्ही निघू शकत नाही
Surah Ar-Rahman, Verse 33


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

३४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 34


يُرۡسَلُ عَلَيۡكُمَا شُوَاظٞ مِّن نَّارٖ وَنُحَاسٞ فَلَا تَنتَصِرَانِ

३५. तुमच्यावर आगीचे निखारे आणि धूर सोडला जाईल, मग तुम्ही सामना करू शकणार नाहीत
Surah Ar-Rahman, Verse 35


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

३६. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 36


فَإِذَا ٱنشَقَّتِ ٱلسَّمَآءُ فَكَانَتۡ وَرۡدَةٗ كَٱلدِّهَانِ

३७. मग जेव्हा आकाश विदीर्ण होऊन लाल होईल, जणू लाल चामडे असावे
Surah Ar-Rahman, Verse 37


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

३८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 38


فَيَوۡمَئِذٖ لَّا يُسۡـَٔلُ عَن ذَنۢبِهِۦٓ إِنسٞ وَلَا جَآنّٞ

३९. त्या दिवशी कोणत्याही मानवाला आणि कोणत्याही जिन्नाला त्याच्या अपराधांविषयी विचारणा केली जाणार नाही
Surah Ar-Rahman, Verse 39


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 40


يُعۡرَفُ ٱلۡمُجۡرِمُونَ بِسِيمَٰهُمۡ فَيُؤۡخَذُ بِٱلنَّوَٰصِي وَٱلۡأَقۡدَامِ

४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील
Surah Ar-Rahman, Verse 41


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

४२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 42


هَٰذِهِۦ جَهَنَّمُ ٱلَّتِي يُكَذِّبُ بِهَا ٱلۡمُجۡرِمُونَ

४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते
Surah Ar-Rahman, Verse 43


يَطُوفُونَ بَيۡنَهَا وَبَيۡنَ حَمِيمٍ ءَانٖ

४४. तिच्या गरम उकळत्या पाण्याच्या दरम्यान फेर खातील
Surah Ar-Rahman, Verse 44


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

४५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 45


وَلِمَنۡ خَافَ مَقَامَ رَبِّهِۦ جَنَّتَانِ

४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत
Surah Ar-Rahman, Verse 46


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 47


ذَوَاتَآ أَفۡنَانٖ

४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत
Surah Ar-Rahman, Verse 48


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 49


فِيهِمَا عَيۡنَانِ تَجۡرِيَانِ

५०. त्या दोन्ही जन्नतींमध्ये दोन वाहते झरे आहेत
Surah Ar-Rahman, Verse 50


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

५१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 51


فِيهِمَا مِن كُلِّ فَٰكِهَةٖ زَوۡجَانِ

५२. त्या दोन्हीं (जन्नतीं) मध्ये प्रत्येक मेव्याचे दोन प्रकार असतील
Surah Ar-Rahman, Verse 52


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

५३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 53


مُتَّكِـِٔينَ عَلَىٰ فُرُشِۭ بَطَآئِنُهَا مِنۡ إِسۡتَبۡرَقٖۚ وَجَنَى ٱلۡجَنَّتَيۡنِ دَانٖ

५४. जन्नतमध्ये राहणारे अशा बिछायतींवर तक्के लावून बसतील, ज्यांचे अस्तर जाड रेशमाचे असेल आणि त्या दोन्ही जन्नतींची फळे (मेवे) खूप जवळ असतील
Surah Ar-Rahman, Verse 54


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

५५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 55


فِيهِنَّ قَٰصِرَٰتُ ٱلطَّرۡفِ لَمۡ يَطۡمِثۡهُنَّ إِنسٞ قَبۡلَهُمۡ وَلَا جَآنّٞ

५६. तिथे (लाजाळू) खाली नजर ठेवणाऱ्या हूर (पऱ्या) आहेत, ज्यांना त्यांच्यापूर्वी कोणत्याही जिन्न आणि मानवाने हात लावला नसेल
Surah Ar-Rahman, Verse 56


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

५७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 57


كَأَنَّهُنَّ ٱلۡيَاقُوتُ وَٱلۡمَرۡجَانُ

५८. त्या (हूर-पऱ्या) माणिक (याकूत) आणि प्रवाळासारख्या असतील
Surah Ar-Rahman, Verse 58


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

५९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 59


هَلۡ جَزَآءُ ٱلۡإِحۡسَٰنِ إِلَّا ٱلۡإِحۡسَٰنُ

६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे
Surah Ar-Rahman, Verse 60


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 61


وَمِن دُونِهِمَا جَنَّتَانِ

६२. आणि त्याच्याखेरीज दोन जन्नती आणखी आहेत
Surah Ar-Rahman, Verse 62


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

६३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 63


مُدۡهَآمَّتَانِ

६४. दोन्ही गाढहिरव्या रंगाच्या
Surah Ar-Rahman, Verse 64


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

६५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 65


فِيهِمَا عَيۡنَانِ نَضَّاخَتَانِ

६६. त्यांच्यात दोन (वेगाने) उचंबळणारे झरे आहेत
Surah Ar-Rahman, Verse 66


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 67


فِيهِمَا فَٰكِهَةٞ وَنَخۡلٞ وَرُمَّانٞ

६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील
Surah Ar-Rahman, Verse 68


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

६९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 69


فِيهِنَّ خَيۡرَٰتٌ حِسَانٞ

७०. त्यांच्यात सत्शील चारित्र्यवान सुंदर स्त्रिया आहेत
Surah Ar-Rahman, Verse 70


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

७१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 71


حُورٞ مَّقۡصُورَٰتٞ فِي ٱلۡخِيَامِ

७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत
Surah Ar-Rahman, Verse 72


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

७३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 73


لَمۡ يَطۡمِثۡهُنَّ إِنسٞ قَبۡلَهُمۡ وَلَا جَآنّٞ

७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही)
Surah Ar-Rahman, Verse 74


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

७५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 75


مُتَّكِـِٔينَ عَلَىٰ رَفۡرَفٍ خُضۡرٖ وَعَبۡقَرِيٍّ حِسَانٖ

७६. हिरव्या गाद्या आणि सुंदर बिछान्यांवर तक्के लावून बसले असतील
Surah Ar-Rahman, Verse 76


فَبِأَيِّ ءَالَآءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ

७७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
Surah Ar-Rahman, Verse 77


تَبَٰرَكَ ٱسۡمُ رَبِّكَ ذِي ٱلۡجَلَٰلِ وَٱلۡإِكۡرَامِ

७८. मोठे शुभ (आणि समृद्धशाली) आहे तुमच्या पालनकर्त्याचे नाव, जो मोठा प्रतापशाली आणि मोठा
Surah Ar-Rahman, Verse 78


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 54
>> Surah 56

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai