UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Al-Hadid - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


سَبَّحَ لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۖ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ

१. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे (ते सर्व) अल्लाहचे महिमागान करीत आहेत आणि तो मोठा वर्चस्वशाली, हिकमतशाली आहे
Surah Al-Hadid, Verse 1


لَهُۥ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۖ يُحۡيِۦ وَيُمِيتُۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٌ

२. आकाशांचे आणि धरतीचे (समस्त) राज्य त्याचेच आहे, तोच जीवन देतो आणि मृत्युही आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो
Surah Al-Hadid, Verse 2


هُوَ ٱلۡأَوَّلُ وَٱلۡأٓخِرُ وَٱلظَّـٰهِرُ وَٱلۡبَاطِنُۖ وَهُوَ بِكُلِّ شَيۡءٍ عَلِيمٌ

३. तोच आद्य आणि तोच अंतिम आहे, तोच उघड आणि तोच लपलेला आहे आणि तो प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.१
Surah Al-Hadid, Verse 3


هُوَ ٱلَّذِي خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ فِي سِتَّةِ أَيَّامٖ ثُمَّ ٱسۡتَوَىٰ عَلَى ٱلۡعَرۡشِۖ يَعۡلَمُ مَا يَلِجُ فِي ٱلۡأَرۡضِ وَمَا يَخۡرُجُ مِنۡهَا وَمَا يَنزِلُ مِنَ ٱلسَّمَآءِ وَمَا يَعۡرُجُ فِيهَاۖ وَهُوَ مَعَكُمۡ أَيۡنَ مَا كُنتُمۡۚ وَٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِيرٞ

४. तोच आहे ज्याने आकाशांना व जमिनीला सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (सिंहासना) वर उंचावला तो चांगल्या प्रकारे जाणतो त्या गोष्टीला, जी जमिनीत जाते आणि जी तिच्यातून निघते, आणि जी आकाशातून खाली येते आणि जी चढून आकाशात जाते आणि तुम्ही कोठेही ्‌सा, तो तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते पाहात आहे
Surah Al-Hadid, Verse 4


لَّهُۥ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَإِلَى ٱللَّهِ تُرۡجَعُ ٱلۡأُمُورُ

५. आकाशांची व धरतीची राज्यसत्ता त्याचीच आहे आणि समस्त कार्य त्याच्याचकडे परतविली जातात
Surah Al-Hadid, Verse 5


يُولِجُ ٱلَّيۡلَ فِي ٱلنَّهَارِ وَيُولِجُ ٱلنَّهَارَ فِي ٱلَّيۡلِۚ وَهُوَ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ

६. तोच रात्रीला दिवसात दाखल करतो आणि तोच दिवसाला रात्रीत दाखल करतो आणि छाती (मना) मध्ये लपलेल्या गोष्टींचे तो पूर्ण ज्ञान राखणारा आहे
Surah Al-Hadid, Verse 6


ءَامِنُواْ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَأَنفِقُواْ مِمَّا جَعَلَكُم مُّسۡتَخۡلَفِينَ فِيهِۖ فَٱلَّذِينَ ءَامَنُواْ مِنكُمۡ وَأَنفَقُواْ لَهُمۡ أَجۡرٞ كَبِيرٞ

७. अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि धनातून खर्च करा ज्यात अल्लाहने तुम्हाला (इतरांचा) वारस बनविले आहे तेव्हा तुमच्यापैकी जो कोणी ईमान राखेल आणि खर्च करेल तर अशांना फार मोठे पुण्य लाभेल
Surah Al-Hadid, Verse 7


وَمَا لَكُمۡ لَا تُؤۡمِنُونَ بِٱللَّهِ وَٱلرَّسُولُ يَدۡعُوكُمۡ لِتُؤۡمِنُواْ بِرَبِّكُمۡ وَقَدۡ أَخَذَ مِيثَٰقَكُمۡ إِن كُنتُم مُّؤۡمِنِينَ

८. तुम्ही अल्लाहवर ईमान का नाही राखत? वास्तविक पैगंबर स्वतः तुम्हाला आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखण्याचे आवाहन करीत आहे आणि जर तुम्ही ईमान राखणारे असाल तर त्याने तुमच्याकडून दृढवचन घेतले आहे
Surah Al-Hadid, Verse 8


هُوَ ٱلَّذِي يُنَزِّلُ عَلَىٰ عَبۡدِهِۦٓ ءَايَٰتِۭ بَيِّنَٰتٖ لِّيُخۡرِجَكُم مِّنَ ٱلظُّلُمَٰتِ إِلَى ٱلنُّورِۚ وَإِنَّ ٱللَّهَ بِكُمۡ لَرَءُوفٞ رَّحِيمٞ

९. तो (अल्लाह) च आहे, जो आपल्या दासावर स्पष्ट आयती अवतरित करतो, यासाठी की त्याने तुम्हाला अंधाराकडून उजेडाकडे न्यावे. निःसंशय अल्लाह तुमच्यावर स्नेह, दया करणारा आहे
Surah Al-Hadid, Verse 9


وَمَا لَكُمۡ أَلَّا تُنفِقُواْ فِي سَبِيلِ ٱللَّهِ وَلِلَّهِ مِيرَٰثُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ لَا يَسۡتَوِي مِنكُم مَّنۡ أَنفَقَ مِن قَبۡلِ ٱلۡفَتۡحِ وَقَٰتَلَۚ أُوْلَـٰٓئِكَ أَعۡظَمُ دَرَجَةٗ مِّنَ ٱلَّذِينَ أَنفَقُواْ مِنۢ بَعۡدُ وَقَٰتَلُواْۚ وَكُلّٗا وَعَدَ ٱللَّهُ ٱلۡحُسۡنَىٰۚ وَٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرٞ

१०. आणि तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या मार्गात खर्च नाही करीत? वास्तविक आकाशांच्या आणि धरतीच्या समस्त वस्तूंचा स्वामी (एकटा) अल्लाहच आहे. तुमच्यापैकी ज्या लोकांनी विजयापूर्वी अल्लाहच्या मार्गात दिले आहे आणि धर्मयुद्ध (जिहाद) केले आहे ते दुसऱ्यांच्या समान नाहीत किंबहुना त्यांच्यापेक्षा उच्च पदाचे आहेत, ज्यांनी विजय प्राप्तीनंतर दान दिले आणि जिहाद केले. होय भलाईचा वायदा तर अल्लाहचा त्या सर्वांशी आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, अल्लाह ते जाणतो
Surah Al-Hadid, Verse 10


مَّن ذَا ٱلَّذِي يُقۡرِضُ ٱللَّهَ قَرۡضًا حَسَنٗا فَيُضَٰعِفَهُۥ لَهُۥ وَلَهُۥٓ أَجۡرٞ كَرِيمٞ

११. असा कोण आहे, जो अल्लाहला चांगल्या प्रकारे कर्ज देईल, मग अल्लाह त्याच्यासाठी ते वाढवित जाईल आणि त्याचा चांगला मोबदला ठरावा
Surah Al-Hadid, Verse 11


يَوۡمَ تَرَى ٱلۡمُؤۡمِنِينَ وَٱلۡمُؤۡمِنَٰتِ يَسۡعَىٰ نُورُهُم بَيۡنَ أَيۡدِيهِمۡ وَبِأَيۡمَٰنِهِمۖ بُشۡرَىٰكُمُ ٱلۡيَوۡمَ جَنَّـٰتٞ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ خَٰلِدِينَ فِيهَاۚ ذَٰلِكَ هُوَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡعَظِيمُ

१२. (कयामतच्या) दिवशी तुम्ही पाहाल की ईमान राखणाऱ्या पुरुषांचे आणि स्त्रियांचे तेज (नूर) त्यांच्या पुढे पुढे आणि त्यांच्या उजवीकडे धावत असेल. आज तुम्हाला त्या जन्नतींचा शुभ समाचार आहे, ज्यांच्या खाली (थंड पाण्याचे) प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते नेहमी राहतील, हीच मोठी सफलता आहे
Surah Al-Hadid, Verse 12


يَوۡمَ يَقُولُ ٱلۡمُنَٰفِقُونَ وَٱلۡمُنَٰفِقَٰتُ لِلَّذِينَ ءَامَنُواْ ٱنظُرُونَا نَقۡتَبِسۡ مِن نُّورِكُمۡ قِيلَ ٱرۡجِعُواْ وَرَآءَكُمۡ فَٱلۡتَمِسُواْ نُورٗاۖ فَضُرِبَ بَيۡنَهُم بِسُورٖ لَّهُۥ بَابُۢ بَاطِنُهُۥ فِيهِ ٱلرَّحۡمَةُ وَظَٰهِرُهُۥ مِن قِبَلِهِ ٱلۡعَذَابُ

१३. त्या दिवशी दांभिक (मूनाफिक) पुरुष आणि दांभिक स्त्रिया ईमानधारकांना म्हणतील की आमची प्रतीक्षा तर करा की आम्हीही तुमच्या प्रकाशामधून थोडा प्रकाशा घ्यावा, उत्तर दिले जाईल की तुम्ही मागे फिरा आणि प्रकाश शोधा, मग त्यांच्या आणि यांच्या दरम्यान एक भिंत उभी केली जाईल, जिच्यात दरवाजाही असेल, त्याच्या आतल्या भागात रहमत (अल्लाहची कृपा) असेल आणि बाहेरच्या भागात अज़ाब (शिक्षा - यातना) असेल
Surah Al-Hadid, Verse 13


يُنَادُونَهُمۡ أَلَمۡ نَكُن مَّعَكُمۡۖ قَالُواْ بَلَىٰ وَلَٰكِنَّكُمۡ فَتَنتُمۡ أَنفُسَكُمۡ وَتَرَبَّصۡتُمۡ وَٱرۡتَبۡتُمۡ وَغَرَّتۡكُمُ ٱلۡأَمَانِيُّ حَتَّىٰ جَآءَ أَمۡرُ ٱللَّهِ وَغَرَّكُم بِٱللَّهِ ٱلۡغَرُورُ

१४. हे ओरडून ओरडून त्यांना सांगतील की काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो? ते म्हणतील, हो, होते जरूर, परंतु तुम्ही स्वतःला मार्गभ्रष्टतेत ठेवले होते. आणि प्रतीक्षा करीत राहिले आणि शंका - संशय करीत राहिले आणि तुम्हाला तुमच्या (निरर्थक) इच्छा आकांक्षांनी धोक्यातच ठेवले येथेपर्यंत की अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला आणि तुम्हाला अल्लाहच्या बाबतीत धोका देणाऱ्याने धोक्यातच ठेवले
Surah Al-Hadid, Verse 14


فَٱلۡيَوۡمَ لَا يُؤۡخَذُ مِنكُمۡ فِدۡيَةٞ وَلَا مِنَ ٱلَّذِينَ كَفَرُواْۚ مَأۡوَىٰكُمُ ٱلنَّارُۖ هِيَ مَوۡلَىٰكُمۡۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِيرُ

१५. तेव्हा आज ना तुमच्याकडून फिदिया (आणि न बदला) स्वीकारला जाईल आणि ना काफिरांकडून. तुम्हा सर्वांचे ठिकाण जहन्नम आहे. तीच तुमची सोबती आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे
Surah Al-Hadid, Verse 15


۞أَلَمۡ يَأۡنِ لِلَّذِينَ ءَامَنُوٓاْ أَن تَخۡشَعَ قُلُوبُهُمۡ لِذِكۡرِ ٱللَّهِ وَمَا نَزَلَ مِنَ ٱلۡحَقِّ وَلَا يَكُونُواْ كَٱلَّذِينَ أُوتُواْ ٱلۡكِتَٰبَ مِن قَبۡلُ فَطَالَ عَلَيۡهِمُ ٱلۡأَمَدُ فَقَسَتۡ قُلُوبُهُمۡۖ وَكَثِيرٞ مِّنۡهُمۡ فَٰسِقُونَ

१६. काय अजूनपर्यंत ईमान राखणाऱ्यांकरिता ती वेळ नाही आली की त्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने आणि जे सत्य अवतरित झाले आहे त्याने कोमल व्हावीत, आणि त्या लोकांसारखी न व्हावीत, ज्यांना यांच्या पूर्वी ग्रंथ प्रदान केला गेला, मग जेव्हा त्यांच्यावर एक दीर्घ मुदत लोटली, तेव्हा त्यांची हृदये कठोर झालीत आणि त्यांच्यापैकी अधिकांश दुराचारी आहेत
Surah Al-Hadid, Verse 16


ٱعۡلَمُوٓاْ أَنَّ ٱللَّهَ يُحۡيِ ٱلۡأَرۡضَ بَعۡدَ مَوۡتِهَاۚ قَدۡ بَيَّنَّا لَكُمُ ٱلۡأٓيَٰتِ لَعَلَّكُمۡ تَعۡقِلُونَ

१७. विश्वास राखा की अल्लाहच धरतीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करतो. आम्ही तर तुमच्यासाठी आपल्या निशाण्या स्पष्ट सांगितल्या, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे
Surah Al-Hadid, Verse 17


إِنَّ ٱلۡمُصَّدِّقِينَ وَٱلۡمُصَّدِّقَٰتِ وَأَقۡرَضُواْ ٱللَّهَ قَرۡضًا حَسَنٗا يُضَٰعَفُ لَهُمۡ وَلَهُمۡ أَجۡرٞ كَرِيمٞ

१८. निःसंशय, दान देणारे पुरुष आणि स्त्रिया आणि जे अल्लाहला प्रेमाने चांगले कर्ज देत आहेत त्यांच्यासाठी अनेक पटींनी वाढविले जाईल, आणि त्यांच्यासाठी उत्तम असा मोबदला आहे
Surah Al-Hadid, Verse 18


وَٱلَّذِينَ ءَامَنُواْ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦٓ أُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلصِّدِّيقُونَۖ وَٱلشُّهَدَآءُ عِندَ رَبِّهِمۡ لَهُمۡ أَجۡرُهُمۡ وَنُورُهُمۡۖ وَٱلَّذِينَ كَفَرُواْ وَكَذَّبُواْ بِـَٔايَٰتِنَآ أُوْلَـٰٓئِكَ أَصۡحَٰبُ ٱلۡجَحِيمِ

१९. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर जे लोक ईमान राखतात तेच आपल्या पालनकर्त्याजवळ सच्चे आणि शहीद आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला आणि त्यांचे दिव्य तेज आहे, आणि जे कुप्र (इन्कार) करतात आणि आमच्या निशाण्यांना खोटे ठरवितात ते जहन्नमी आहेत
Surah Al-Hadid, Verse 19


ٱعۡلَمُوٓاْ أَنَّمَا ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَا لَعِبٞ وَلَهۡوٞ وَزِينَةٞ وَتَفَاخُرُۢ بَيۡنَكُمۡ وَتَكَاثُرٞ فِي ٱلۡأَمۡوَٰلِ وَٱلۡأَوۡلَٰدِۖ كَمَثَلِ غَيۡثٍ أَعۡجَبَ ٱلۡكُفَّارَ نَبَاتُهُۥ ثُمَّ يَهِيجُ فَتَرَىٰهُ مُصۡفَرّٗا ثُمَّ يَكُونُ حُطَٰمٗاۖ وَفِي ٱلۡأٓخِرَةِ عَذَابٞ شَدِيدٞ وَمَغۡفِرَةٞ مِّنَ ٱللَّهِ وَرِضۡوَٰنٞۚ وَمَا ٱلۡحَيَوٰةُ ٱلدُّنۡيَآ إِلَّا مَتَٰعُ ٱلۡغُرُورِ

२०. लक्षात ठेवा की या जगाचे जीवन तर केवळ खेळ तमाशा आणि शोभा सजावट आणि आपसात अभिमान (आणि अहंकार) आणि धन व संततीत एकमेकाहून स्वतःला जास्त दाखविणे आहे. ज्याप्रमाणे पाऊस आणि त्यापासून झालेली पैदावार शेतकऱ्यांना सुखद वाटते, मग जेव्हा ती सुकते तेव्हा तिला तुम्ही पिवळ्या रंगात पाहतात, मग ती अगदी चुरेचूर होऊन जाते, आणि आखिरतमध्ये सक्त शिक्षा-यातना आणि अल्लाहची माफी आणि प्रसन्नता आहे आणि या जगाचे जीवन केवळ धोक्याच्या सामुग्रीशिवाय आणखी काहीच नाही
Surah Al-Hadid, Verse 20


سَابِقُوٓاْ إِلَىٰ مَغۡفِرَةٖ مِّن رَّبِّكُمۡ وَجَنَّةٍ عَرۡضُهَا كَعَرۡضِ ٱلسَّمَآءِ وَٱلۡأَرۡضِ أُعِدَّتۡ لِلَّذِينَ ءَامَنُواْ بِٱللَّهِ وَرُسُلِهِۦۚ ذَٰلِكَ فَضۡلُ ٱللَّهِ يُؤۡتِيهِ مَن يَشَآءُۚ وَٱللَّهُ ذُو ٱلۡفَضۡلِ ٱلۡعَظِيمِ

२१. (या) धावा आपल्या पालनकर्त्याच्या माफीकडे आणि त्या जन्नतकडे जिचा विस्तार आकाश आणि जमिनीच्या विस्ताराइतका आहे. ती अशा लोकांसाठी बनविली गेली आहे, जे अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखतात, ही अल्लाहची दया कृपा आहे, ज्याला इच्छितो प्रदान करतो आणि अल्लाह मोठा कृपावान आहे
Surah Al-Hadid, Verse 21


مَآ أَصَابَ مِن مُّصِيبَةٖ فِي ٱلۡأَرۡضِ وَلَا فِيٓ أَنفُسِكُمۡ إِلَّا فِي كِتَٰبٖ مِّن قَبۡلِ أَن نَّبۡرَأَهَآۚ إِنَّ ذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٞ

२२. कोणतेही संकट या जगावर येत नाही ना खास तुमच्या प्राणांवर परंतु यापूर्वी की आम्ही त्यास निर्माण करावे, ते एका विशेष ग्रंथात लिहिलेले आहे. निःसंशय हे काम अल्लाहकरिता (मोठे) सोपे आहे
Surah Al-Hadid, Verse 22


لِّكَيۡلَا تَأۡسَوۡاْ عَلَىٰ مَا فَاتَكُمۡ وَلَا تَفۡرَحُواْ بِمَآ ءَاتَىٰكُمۡۗ وَٱللَّهُ لَا يُحِبُّ كُلَّ مُخۡتَالٖ فَخُورٍ

२३. यासाठी की तुम्ही आपल्याकडून हिरावून घेतल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल दुःखी न व्हावे आणि ना प्रदान केलेल्या गोष्टीबद्दल गर्विष्ठ व्हावे आणि शेखी मिरविणाऱ्या, घमेंड करणाऱ्यांशी अल्लाह प्रेम राखत नाही
Surah Al-Hadid, Verse 23


ٱلَّذِينَ يَبۡخَلُونَ وَيَأۡمُرُونَ ٱلنَّاسَ بِٱلۡبُخۡلِۗ وَمَن يَتَوَلَّ فَإِنَّ ٱللَّهَ هُوَ ٱلۡغَنِيُّ ٱلۡحَمِيدُ

२४. जे (स्वतःही) कंजूसपणा करतात आणि इतरांनाही कंजूसपणा करण्याची शिकवण देतात, (ऐका!) जो कोणी तोंड फिरविल, अल्लाह निःस्पृह आणि प्रशंसेस पात्र आहे
Surah Al-Hadid, Verse 24


لَقَدۡ أَرۡسَلۡنَا رُسُلَنَا بِٱلۡبَيِّنَٰتِ وَأَنزَلۡنَا مَعَهُمُ ٱلۡكِتَٰبَ وَٱلۡمِيزَانَ لِيَقُومَ ٱلنَّاسُ بِٱلۡقِسۡطِۖ وَأَنزَلۡنَا ٱلۡحَدِيدَ فِيهِ بَأۡسٞ شَدِيدٞ وَمَنَٰفِعُ لِلنَّاسِ وَلِيَعۡلَمَ ٱللَّهُ مَن يَنصُرُهُۥ وَرُسُلَهُۥ بِٱلۡغَيۡبِۚ إِنَّ ٱللَّهَ قَوِيٌّ عَزِيزٞ

२५. निःसंशय, आम्ही आपल्या पैगंबरांना (संदेशवाहकांना) स्पष्ट निशाण्या देऊन पाठविले आणि त्यांच्यासोबत ग्रंथ आणि न्याय (तराजू) अवतरित केला, यासाठी की लोकांनी न्यायावरकायम राहावे आणि आम्ही लोखंडही अवतरित केले, ज्यात मोठी (हैबत आणि) ताकद आहे आणि लोकांसाठी इतरही अनेक फायदे आहेत आणि यासाठीही की अल्लाहने हे जाणून घ्यावे की त्याची व त्याच्या पैगंबरांची मदत न पाहता कोण करतो. निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे
Surah Al-Hadid, Verse 25


وَلَقَدۡ أَرۡسَلۡنَا نُوحٗا وَإِبۡرَٰهِيمَ وَجَعَلۡنَا فِي ذُرِّيَّتِهِمَا ٱلنُّبُوَّةَ وَٱلۡكِتَٰبَۖ فَمِنۡهُم مُّهۡتَدٖۖ وَكَثِيرٞ مِّنۡهُمۡ فَٰسِقُونَ

२६. निःसंशय, आम्ही नूह आणि इब्राहीम (अलै.) यांना (पैगंबर बनवून) पाठविले आणि आम्ही त्या दोघांच्या संततीत प्रेषित्व आणि ग्रंथ कायम ठेवला , तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी मार्गदर्शन अंगीकारले आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण दुराचारी राहिले
Surah Al-Hadid, Verse 26


ثُمَّ قَفَّيۡنَا عَلَىٰٓ ءَاثَٰرِهِم بِرُسُلِنَا وَقَفَّيۡنَا بِعِيسَى ٱبۡنِ مَرۡيَمَ وَءَاتَيۡنَٰهُ ٱلۡإِنجِيلَۖ وَجَعَلۡنَا فِي قُلُوبِ ٱلَّذِينَ ٱتَّبَعُوهُ رَأۡفَةٗ وَرَحۡمَةٗۚ وَرَهۡبَانِيَّةً ٱبۡتَدَعُوهَا مَا كَتَبۡنَٰهَا عَلَيۡهِمۡ إِلَّا ٱبۡتِغَآءَ رِضۡوَٰنِ ٱللَّهِ فَمَا رَعَوۡهَا حَقَّ رِعَايَتِهَاۖ فَـَٔاتَيۡنَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ مِنۡهُمۡ أَجۡرَهُمۡۖ وَكَثِيرٞ مِّنۡهُمۡ فَٰسِقُونَ

२७. त्यांच्यानंतर, तरीही आम्ही सतत आपले पैगंबर पाठवित राहिलो आणि त्यांच्यानंतर मरियमचा पुत्र ईसाला पाठविले व त्यांना इंजील (ग्रंथ) प्रदान केला आणि त्यांच्या अनुयायींच्या मनात प्रेम आणि दयेची भावना ठेवली, परंतु वैराग्याचा मार्ग त्यांनी स्वतः शोधून कढला, आम्ही तो त्यांच्यासाठी अनिवार्य केला नव्हता, अल्लाहच्या प्रसन्नतेचा शोध घेण्याखेरीज, तेव्हा त्यांनी त्याचे पूर्णतः पालन केले नाही, तरी देखील आम्ही त्यांच्यापैकी ज्यांनी ईमान राखले होते, त्यांना त्यांचा मोबदला प्रदान केला आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक दुराचारी आहेत
Surah Al-Hadid, Verse 27


يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ ٱتَّقُواْ ٱللَّهَ وَءَامِنُواْ بِرَسُولِهِۦ يُؤۡتِكُمۡ كِفۡلَيۡنِ مِن رَّحۡمَتِهِۦ وَيَجۡعَل لَّكُمۡ نُورٗا تَمۡشُونَ بِهِۦ وَيَغۡفِرۡ لَكُمۡۚ وَٱللَّهُ غَفُورٞ رَّحِيمٞ

२८. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा, अल्लाह तुम्हाला आपल्या दयेने दुप्पट हिस्सा देईल आणि तुम्हाला दिव्य तेज (नूर) प्रदान करील, ज्याच्या प्रकाशात तुम्ही चालाल आणि तो (तुमचे अपराधीही) माफ करील, अल्लाह मोठा माफ करणारा अतिशय दयावान आहे
Surah Al-Hadid, Verse 28


لِّئَلَّا يَعۡلَمَ أَهۡلُ ٱلۡكِتَٰبِ أَلَّا يَقۡدِرُونَ عَلَىٰ شَيۡءٖ مِّن فَضۡلِ ٱللَّهِ وَأَنَّ ٱلۡفَضۡلَ بِيَدِ ٱللَّهِ يُؤۡتِيهِ مَن يَشَآءُۚ وَٱللَّهُ ذُو ٱلۡفَضۡلِ ٱلۡعَظِيمِ

२९. हे अशासाठी की (अल्लाहचा) ग्रंथ बाळगणाऱ्यांनी जाणून घ्यावे की अल्लाहच्या कृपेच्या कोणत्याही हिश्यावर त्यांचा अधिकार नाही आणि हे की, समस्त कृपा अल्लाहच्याच हाती आहे, तो ज्याला इच्छिल, देईल आणि अल्लाहच मोठा कृपावंत आहे
Surah Al-Hadid, Verse 29


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 56
>> Surah 58

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai