UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah As-Saff - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


سَبَّحَ لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۖ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ

१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेचे गुणगान करते आणि तोच वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे
Surah As-Saff, Verse 1


يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ لِمَ تَقُولُونَ مَا لَا تَفۡعَلُونَ

२. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही ती गोष्ट का सांगता, जी (स्वतः) करीत नाही
Surah As-Saff, Verse 2


كَبُرَ مَقۡتًا عِندَ ٱللَّهِ أَن تَقُولُواْ مَا لَا تَفۡعَلُونَ

३. तुम्ही जे करीत नाही ते बोलणे अल्लाहला नापसंत आहे
Surah As-Saff, Verse 3


إِنَّ ٱللَّهَ يُحِبُّ ٱلَّذِينَ يُقَٰتِلُونَ فِي سَبِيلِهِۦ صَفّٗا كَأَنَّهُم بُنۡيَٰنٞ مَّرۡصُوصٞ

४. निःसंशय, अल्लाह त्या लोकांना प्रिय राखतो, जे त्याच्या मार्गात पंक्तिबद्ध (रांगारांगांनी) होऊन जिहाद करतात, जणू ते शिसा पाजलेली इमारत होय
Surah As-Saff, Verse 4


وَإِذۡ قَالَ مُوسَىٰ لِقَوۡمِهِۦ يَٰقَوۡمِ لِمَ تُؤۡذُونَنِي وَقَد تَّعۡلَمُونَ أَنِّي رَسُولُ ٱللَّهِ إِلَيۡكُمۡۖ فَلَمَّا زَاغُوٓاْ أَزَاغَ ٱللَّهُ قُلُوبَهُمۡۚ وَٱللَّهُ لَا يَهۡدِي ٱلۡقَوۡمَ ٱلۡفَٰسِقِينَ

५. आणि (स्मरण करा) जेव्हा मूसाने आपल्या समुदायाच्या लोकांना म्हटले की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही मला क्लेश यातना का देत आहात, वास्तविक तुम्हाला चांगले माहीत आहे की मी तुमच्याकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे. तर जेव्हा ते लोक वाकडेच राहिले तेव्हा अल्लाहने त्यांच्या हृदयांना आणखी वाकडे करून टाकले, आणि अल्लाह अवज्ञाकारी जनसमूहाला मार्ग दाखवित नाही
Surah As-Saff, Verse 5


وَإِذۡ قَالَ عِيسَى ٱبۡنُ مَرۡيَمَ يَٰبَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ إِنِّي رَسُولُ ٱللَّهِ إِلَيۡكُم مُّصَدِّقٗا لِّمَا بَيۡنَ يَدَيَّ مِنَ ٱلتَّوۡرَىٰةِ وَمُبَشِّرَۢا بِرَسُولٖ يَأۡتِي مِنۢ بَعۡدِي ٱسۡمُهُۥٓ أَحۡمَدُۖ فَلَمَّا جَآءَهُم بِٱلۡبَيِّنَٰتِ قَالُواْ هَٰذَا سِحۡرٞ مُّبِينٞ

६. आणि जेव्हा मरियमचे पुत्र ईसा म्हणाले, हे (माझ्या लोकांनो!) इस्राईलची संतती! मी तुम्हा सर्वांकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे, माझ्या पूर्वीचा ग्रंथ तौरातचे समर्थन करणारा आहे आणि आपल्यानंतर येणाऱ्या एका पैगंबराची खूशखबर ऐकविणारा आहे, ज्यांचे नाव अहमद आहे. मग जेव्हा ते त्यांच्यासमोर स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तेव्हा ते म्हणू लागले की ही तर उघड जादू आहे
Surah As-Saff, Verse 6


وَمَنۡ أَظۡلَمُ مِمَّنِ ٱفۡتَرَىٰ عَلَى ٱللَّهِ ٱلۡكَذِبَ وَهُوَ يُدۡعَىٰٓ إِلَى ٱلۡإِسۡلَٰمِۚ وَٱللَّهُ لَا يَهۡدِي ٱلۡقَوۡمَ ٱلظَّـٰلِمِينَ

७. आणि त्या माणसाहून अधिक अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहबद्दल असत्य रचेल? वास्तविक त्याला इस्लामकडे बोलाविले जाते. आणि अल्लाह अशा अत्याचारी लोकांना मार्गदर्शन करीत नाही
Surah As-Saff, Verse 7


يُرِيدُونَ لِيُطۡفِـُٔواْ نُورَ ٱللَّهِ بِأَفۡوَٰهِهِمۡ وَٱللَّهُ مُتِمُّ نُورِهِۦ وَلَوۡ كَرِهَ ٱلۡكَٰفِرُونَ

८. अल्लाहच्या दिव्य तेजाला (नूरला) ते आपल्या फुंकीन विझवू इच्छितात. आणि अल्लाह आपले दिव्य तेच उच्च पदांपर्यंत घेऊन जाणारा आहे, मग इन्कार करणाऱ्या (काफिरांना) कितीही वाईट वाटो
Surah As-Saff, Verse 8


هُوَ ٱلَّذِيٓ أَرۡسَلَ رَسُولَهُۥ بِٱلۡهُدَىٰ وَدِينِ ٱلۡحَقِّ لِيُظۡهِرَهُۥ عَلَى ٱلدِّينِ كُلِّهِۦ وَلَوۡ كَرِهَ ٱلۡمُشۡرِكُونَ

९. तोच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्म देऊन पाठविले, यासाठी की त्यास अन्य सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मग अनेक ईश्वरांची भक्ती-उपासना करणाऱ्यांना कितीही अप्रिय वाटो
Surah As-Saff, Verse 9


يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ هَلۡ أَدُلُّكُمۡ عَلَىٰ تِجَٰرَةٖ تُنجِيكُم مِّنۡ عَذَابٍ أَلِيمٖ

१०. हे ईमान राखणाऱ्यांनो! काय मी तुम्हाला तो व्यापार दाखवू जो तुम्हाला कष्ट यातनादायक शिक्षा-यातनेपासून वाचविल.१
Surah As-Saff, Verse 10


تُؤۡمِنُونَ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَتُجَٰهِدُونَ فِي سَبِيلِ ٱللَّهِ بِأَمۡوَٰلِكُمۡ وَأَنفُسِكُمۡۚ ذَٰلِكُمۡ خَيۡرٞ لَّكُمۡ إِن كُنتُمۡ تَعۡلَمُونَ

११. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या तन, मन आणि धनाने जिहाद करा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे जर तुम्ही ज्ञान बाळगत असाल
Surah As-Saff, Verse 11


يَغۡفِرۡ لَكُمۡ ذُنُوبَكُمۡ وَيُدۡخِلۡكُمۡ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ وَمَسَٰكِنَ طَيِّبَةٗ فِي جَنَّـٰتِ عَدۡنٖۚ ذَٰلِكَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡعَظِيمُ

१२. अल्लाह तुमचे अपराध माफ करील आणि तुम्हाला त्या जन्नतींमध्ये दाखल करील ज्यांच्या खाली प्रवाह वाहत असतील आणि स्वच्छ शुद्ध घरांमध्ये, जे ‘अदन’च्या जन्नतमध्ये असतील. ही फार मोठी सफलता आहे
Surah As-Saff, Verse 12


وَأُخۡرَىٰ تُحِبُّونَهَاۖ نَصۡرٞ مِّنَ ٱللَّهِ وَفَتۡحٞ قَرِيبٞۗ وَبَشِّرِ ٱلۡمُؤۡمِنِينَ

१३. आणि तुम्हाला एक दुसरी देणगीही प्रदान करील, जी तुम्ही इच्छिता, ती आहे अल्लाहची मदत आणि लवकरच प्राप्त होणारा विजय आणि ईमान राखणाऱ्यांना खूशखबर द्या
Surah As-Saff, Verse 13


يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ كُونُوٓاْ أَنصَارَ ٱللَّهِ كَمَا قَالَ عِيسَى ٱبۡنُ مَرۡيَمَ لِلۡحَوَارِيِّـۧنَ مَنۡ أَنصَارِيٓ إِلَى ٱللَّهِۖ قَالَ ٱلۡحَوَارِيُّونَ نَحۡنُ أَنصَارُ ٱللَّهِۖ فَـَٔامَنَت طَّآئِفَةٞ مِّنۢ بَنِيٓ إِسۡرَـٰٓءِيلَ وَكَفَرَت طَّآئِفَةٞۖ فَأَيَّدۡنَا ٱلَّذِينَ ءَامَنُواْ عَلَىٰ عَدُوِّهِمۡ فَأَصۡبَحُواْ ظَٰهِرِينَ

१४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही अल्लाहचे सहाय्यक बना,१ ज्याप्रमाणे (हजरत) मरियमचे पुत्र (हजरत) ईसा यांनी हवारींना (मित्रांना) सांगितले, कोण आहे जो अल्लाहच्या मार्गात माझा मदतनीस बनेल? (त्यांचे) मित्र म्हणाले की, आम्ही अल्लाहच्या मार्गात मदतनीस आहोत. तेव्हा इस्राईलच्या संततीपैकी एका गटाने तर ईमान राखले आणि एका गटाने कुप्र (इन्कार) केला,२ तर आम्ही ईमान राखणाऱ्यांना त्यांच्या शत्रूंच्या
Surah As-Saff, Verse 14


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 60
>> Surah 62

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai