UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah At-Taghabun - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


يُسَبِّحُ لِلَّهِ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَمَا فِي ٱلۡأَرۡضِۖ لَهُ ٱلۡمُلۡكُ وَلَهُ ٱلۡحَمۡدُۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٌ

१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहची पवित्रता वर्णन करते, त्याचीच राज्य-सत्ता आहे आणि त्याचीच स्तुती-प्रशंसा आहे. आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो
Surah At-Taghabun, Verse 1


هُوَ ٱلَّذِي خَلَقَكُمۡ فَمِنكُمۡ كَافِرٞ وَمِنكُم مُّؤۡمِنٞۚ وَٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ بَصِيرٌ

२. त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे, मग तुमच्यापैकी काही काफिर (इन्कारी) आहेत आणि काही ईमान राखणारे आहेत आणि तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे पाहत आहे
Surah At-Taghabun, Verse 2


خَلَقَ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضَ بِٱلۡحَقِّ وَصَوَّرَكُمۡ فَأَحۡسَنَ صُوَرَكُمۡۖ وَإِلَيۡهِ ٱلۡمَصِيرُ

३. त्यानेच आकाशांना आणि धरतीला सत्यासह (बुद्धिकौशल्याने) निर्माण केले, त्यानेच तुमचे चेहरे मोहरे बनविले आणि खूप सुंदर बनविले आणि त्याच्याचकडे परतायचे आहे
Surah At-Taghabun, Verse 3


يَعۡلَمُ مَا فِي ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِ وَيَعۡلَمُ مَا تُسِرُّونَ وَمَا تُعۡلِنُونَۚ وَٱللَّهُ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ

४. तो आकाशांच्या आणि जमिनीच्या सर्व वस्तूंचे ज्ञान राखतो, आणि जे काही तुम्ही लपविता आणि जाहीर करता ते सर्व तो जाणतो. अल्लाह तर छातीतल्या (मनातल्या) गोष्टी देखील जाणतो
Surah At-Taghabun, Verse 4


أَلَمۡ يَأۡتِكُمۡ نَبَؤُاْ ٱلَّذِينَ كَفَرُواْ مِن قَبۡلُ فَذَاقُواْ وَبَالَ أَمۡرِهِمۡ وَلَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٞ

५. काय तुम्हाला या पूर्वीच्या काफिरांची खबर नाही पोहचली, ज्यांनी आपल्या कर्मांच्या परिणामांचा स्वाद चाखला, आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा यातना आहे
Surah At-Taghabun, Verse 5


ذَٰلِكَ بِأَنَّهُۥ كَانَت تَّأۡتِيهِمۡ رُسُلُهُم بِٱلۡبَيِّنَٰتِ فَقَالُوٓاْ أَبَشَرٞ يَهۡدُونَنَا فَكَفَرُواْ وَتَوَلَّواْۖ وَّٱسۡتَغۡنَى ٱللَّهُۚ وَٱللَّهُ غَنِيٌّ حَمِيدٞ

६. हे या कारणास्तव की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर स्पष्ट प्रमाण (पुरावे) घेऊन आले तेव्हा ते म्हणाले की काय एक मनुष्य आम्हाला मार्गदर्शन करील?१ आणि इन्कार केला व तोंड फिरविले आणि अल्लाहने त्यांची पर्वा केली नाही, आणि अल्लाह तर आहेच मोठा निःस्पृह, सर्वगुण संपन्न
Surah At-Taghabun, Verse 6


زَعَمَ ٱلَّذِينَ كَفَرُوٓاْ أَن لَّن يُبۡعَثُواْۚ قُلۡ بَلَىٰ وَرَبِّي لَتُبۡعَثُنَّ ثُمَّ لَتُنَبَّؤُنَّ بِمَا عَمِلۡتُمۡۚ وَذَٰلِكَ عَلَى ٱللَّهِ يَسِيرٞ

७. त्या काफिर (इन्कारी) लोकांनी असे गृहीत धरले आहे की त्यांना दुसऱ्यांदा जिवंत केले जाणार नाही. तुम्ही सांगा की का नाही? अल्लाहची शपथ! तुम्हाला अवश्य पुन्हा जिवंत केले जाईल, मग जे काही (कर्म) तुम्ही केले आहे त्याची खबर तुम्हाला दिली जाईल आणि अल्लाहकरिता हे फारच सोपे आहे
Surah At-Taghabun, Verse 7


فَـَٔامِنُواْ بِٱللَّهِ وَرَسُولِهِۦ وَٱلنُّورِ ٱلَّذِيٓ أَنزَلۡنَاۚ وَٱللَّهُ بِمَا تَعۡمَلُونَ خَبِيرٞ

८. तेव्हा तुम्ही अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या दिव्य तेजावर जो आम्ही अवतरित केला आहे, ईमान राखा, आणि अल्लाह तुमच्या प्रत्येक कर्माला (चांगल्या प्रकारे) जाणून आहे
Surah At-Taghabun, Verse 8


يَوۡمَ يَجۡمَعُكُمۡ لِيَوۡمِ ٱلۡجَمۡعِۖ ذَٰلِكَ يَوۡمُ ٱلتَّغَابُنِۗ وَمَن يُؤۡمِنۢ بِٱللَّهِ وَيَعۡمَلۡ صَٰلِحٗا يُكَفِّرۡ عَنۡهُ سَيِّـَٔاتِهِۦ وَيُدۡخِلۡهُ جَنَّـٰتٖ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُ خَٰلِدِينَ فِيهَآ أَبَدٗاۚ ذَٰلِكَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡعَظِيمُ

९. ज्या दिवशी अल्लाह तुम्हा सर्वांना, त्या एकत्रित केले जाण्याच्या दिवशी एकत्र करील, तोच पराजय आणि विजयाचा दिवस आहे, आणि जो (मनुष्य) अल्लाहवर ईमान राखून सत्कर्म करील, अल्लाह त्याच्यापासून त्याची दुष्कर्मे दूर करील आणि त्याला जन्नतीमध्ये दाखल करील, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, ज्यांच्यात ते सदैवकाळ राहतील. हीच फार मोठी सफलता आहे
Surah At-Taghabun, Verse 9


وَٱلَّذِينَ كَفَرُواْ وَكَذَّبُواْ بِـَٔايَٰتِنَآ أُوْلَـٰٓئِكَ أَصۡحَٰبُ ٱلنَّارِ خَٰلِدِينَ فِيهَاۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِيرُ

१०. आणि ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि आमच्या आयतींना खोटे ठरविले, ते सर्वच जहन्नममध्ये जाणारे आहेत, ज्यात ते नेहमी राहतील. ते मोठे वाईट ठिकाण आहे
Surah At-Taghabun, Verse 10


مَآ أَصَابَ مِن مُّصِيبَةٍ إِلَّا بِإِذۡنِ ٱللَّهِۗ وَمَن يُؤۡمِنۢ بِٱللَّهِ يَهۡدِ قَلۡبَهُۥۚ وَٱللَّهُ بِكُلِّ شَيۡءٍ عَلِيمٞ

११. कोणतेही संकट अल्लाहच्या आज्ञेविना पोहचू शकत नाही आणि जो कोणी अल्लाहवर ईमान राखतो, अल्लाह त्याच्या हृदयाला मार्गदर्शन करतो, आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे
Surah At-Taghabun, Verse 11


وَأَطِيعُواْ ٱللَّهَ وَأَطِيعُواْ ٱلرَّسُولَۚ فَإِن تَوَلَّيۡتُمۡ فَإِنَّمَا عَلَىٰ رَسُولِنَا ٱلۡبَلَٰغُ ٱلۡمُبِينُ

१२. (लोकांनो!) अल्लाहच्या आदेशाचे पालन करा आणि पैगंबराचे आज्ञापालन करा, मग जर तुम्ही तोंड फिरविणारे व्हाल तर आमच्या पैगंबराचे कर्तव्य केवळ स्पष्टपणे (संदेश) पोहचविणे आहे
Surah At-Taghabun, Verse 12


ٱللَّهُ لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَۚ وَعَلَى ٱللَّهِ فَلۡيَتَوَكَّلِ ٱلۡمُؤۡمِنُونَ

१३. अल्लाहखेरीज कोणीही सच्चा माबूद (खरा उपास्य) नाही, आणि ईमान राखणाऱ्यांनी केवळ अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे
Surah At-Taghabun, Verse 13


يَـٰٓأَيُّهَا ٱلَّذِينَ ءَامَنُوٓاْ إِنَّ مِنۡ أَزۡوَٰجِكُمۡ وَأَوۡلَٰدِكُمۡ عَدُوّٗا لَّكُمۡ فَٱحۡذَرُوهُمۡۚ وَإِن تَعۡفُواْ وَتَصۡفَحُواْ وَتَغۡفِرُواْ فَإِنَّ ٱللَّهَ غَفُورٞ رَّحِيمٌ

१४. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुमच्या काही पत्न्या आणि संततीपैकी काही तुमचे शत्रू आहेत, तेव्हा त्यांच्यापासून सतर्क राहा आणि जर तुम्ही माफ कराल, व सोडून द्याल आणि माफ कराल तर अल्लाह माफ करणारा, दयाळू आहे
Surah At-Taghabun, Verse 14


إِنَّمَآ أَمۡوَٰلُكُمۡ وَأَوۡلَٰدُكُمۡ فِتۡنَةٞۚ وَٱللَّهُ عِندَهُۥٓ أَجۡرٌ عَظِيمٞ

१५. तुमची धन-संपत्ती आणि तुमची संतती (तर खात्रीने) तुमची कसोटी आहे१ आणि फार मोठा मोबदला, अल्लाहजवळ आहे
Surah At-Taghabun, Verse 15


فَٱتَّقُواْ ٱللَّهَ مَا ٱسۡتَطَعۡتُمۡ وَٱسۡمَعُواْ وَأَطِيعُواْ وَأَنفِقُواْ خَيۡرٗا لِّأَنفُسِكُمۡۗ وَمَن يُوقَ شُحَّ نَفۡسِهِۦ فَأُوْلَـٰٓئِكَ هُمُ ٱلۡمُفۡلِحُونَ

१६. तेव्हा यथासंभव अल्लाहचे भय बाळगत राहा आणि ऐकत व आज्ञापालन करीत राहा, आणि (अल्लाहच्या मार्गात) दान करीत राहा, जे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जे लोक आपल्या मनाच्या लालसेपासून सुरक्षित ठेवले गेले, तेच सफल आहेत
Surah At-Taghabun, Verse 16


إِن تُقۡرِضُواْ ٱللَّهَ قَرۡضًا حَسَنٗا يُضَٰعِفۡهُ لَكُمۡ وَيَغۡفِرۡ لَكُمۡۚ وَٱللَّهُ شَكُورٌ حَلِيمٌ

१७. जर तुम्ही अल्लाहला चांगले कर्ज द्याल (अर्थात त्याच्या मार्गात खर्च कराल) तर तो ते तुमच्यासाठी वाढवित जाईल आणि तुमचे अपराधही माफ करील. आणि अल्लाह मोठा कदर करणारा आणि सहन करणारा आहे
Surah At-Taghabun, Verse 17


عَٰلِمُ ٱلۡغَيۡبِ وَٱلشَّهَٰدَةِ ٱلۡعَزِيزُ ٱلۡحَكِيمُ

१८. तो लपलेल्या आणि उघड गोष्टी जाणणारा, जबरदस्त व हिकमतशाली आहे
Surah At-Taghabun, Verse 18


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 63
>> Surah 65

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai