UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Al-Mulk - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


تَبَٰرَكَ ٱلَّذِي بِيَدِهِ ٱلۡمُلۡكُ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ قَدِيرٌ

१. मोठा समृद्धशाली आहे तो, ज्याच्या हाती राज्य (सत्ता) आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगणारा आहे
Surah Al-Mulk, Verse 1


ٱلَّذِي خَلَقَ ٱلۡمَوۡتَ وَٱلۡحَيَوٰةَ لِيَبۡلُوَكُمۡ أَيُّكُمۡ أَحۡسَنُ عَمَلٗاۚ وَهُوَ ٱلۡعَزِيزُ ٱلۡغَفُورُ

२. ज्याने जीवन आणि मृत्युला अशासाठी निर्माण केले की तुमची परीक्षा घ्यावी की तुमच्यापैकी चांगले कर्म कोण करतो आणि तो वर्चस्वशाली आणि माफ करणारा आहे
Surah Al-Mulk, Verse 2


ٱلَّذِي خَلَقَ سَبۡعَ سَمَٰوَٰتٖ طِبَاقٗاۖ مَّا تَرَىٰ فِي خَلۡقِ ٱلرَّحۡمَٰنِ مِن تَفَٰوُتٖۖ فَٱرۡجِعِ ٱلۡبَصَرَ هَلۡ تَرَىٰ مِن فُطُورٖ

३. ज्याने सात आकाश वर-खाली निर्माण केले (तेव्हा हे पाहणाऱ्यांनो!) रहमान (अल्लाह) च्या निर्मितीत कसलीही विसंगती आढळणार नाही. दुसऱ्यांदा परतून पाहा की काय एखादा (व्यंग - दोष) दिसून येतो
Surah Al-Mulk, Verse 3


ثُمَّ ٱرۡجِعِ ٱلۡبَصَرَ كَرَّتَيۡنِ يَنقَلِبۡ إِلَيۡكَ ٱلۡبَصَرُ خَاسِئٗا وَهُوَ حَسِيرٞ

४. मग परत पुन्हा दोन दोन वेळा पाहा, तुझी दृष्टी तुझ्याकडे अपमानित (आणि लाचार) होऊन थकलेली परत येईल
Surah Al-Mulk, Verse 4


وَلَقَدۡ زَيَّنَّا ٱلسَّمَآءَ ٱلدُّنۡيَا بِمَصَٰبِيحَ وَجَعَلۡنَٰهَا رُجُومٗا لِّلشَّيَٰطِينِۖ وَأَعۡتَدۡنَا لَهُمۡ عَذَابَ ٱلسَّعِيرِ

५. आणि निःसंशय, आम्ही या जगाच्या आकाशाला दिव्यांनी (ताऱ्यांनी) सुशोभित केले आणि त्यांना सैतानांना मारण्याचे साधन बनविले. आणि सैतानांकरिता आम्ही (जहन्नमचा जाळणारा) अज़ाब तयार करून ठेवला आहे
Surah Al-Mulk, Verse 5


وَلِلَّذِينَ كَفَرُواْ بِرَبِّهِمۡ عَذَابُ جَهَنَّمَۖ وَبِئۡسَ ٱلۡمَصِيرُ

६. आणि आपल्या पालनकर्त्याशी इन्कार करणाऱ्यांकरिता जहन्नमचा अज़ाब (शिक्षा - यातना) आहे आणि ते किती वाईट स्थान आहे
Surah Al-Mulk, Verse 6


إِذَآ أُلۡقُواْ فِيهَا سَمِعُواْ لَهَا شَهِيقٗا وَهِيَ تَفُورُ

७. जेव्हा हे त्यात टाकले जातील, तेव्हा तिचा (जहन्नमचा) भयंकर आवाज ऐकतील आणि ती उकळत असेल
Surah Al-Mulk, Verse 7


تَكَادُ تَمَيَّزُ مِنَ ٱلۡغَيۡظِۖ كُلَّمَآ أُلۡقِيَ فِيهَا فَوۡجٞ سَأَلَهُمۡ خَزَنَتُهَآ أَلَمۡ يَأۡتِكُمۡ نَذِيرٞ

८. (असे दिसेल की आताच) क्रोधातिरेकाने फाटून जाईल. जेव्हा जेव्हा त्यात एखादा समूह टाकला जाईल, तेव्हा त्याला जहन्नमचा रक्षक विचारेल की, काय तुमच्याजवळ कोणी खबरदार करणारा आला नव्हता
Surah Al-Mulk, Verse 8


قَالُواْ بَلَىٰ قَدۡ جَآءَنَا نَذِيرٞ فَكَذَّبۡنَا وَقُلۡنَا مَا نَزَّلَ ٱللَّهُ مِن شَيۡءٍ إِنۡ أَنتُمۡ إِلَّا فِي ضَلَٰلٖ كَبِيرٖ

९. ते उत्तर देतील, निःसंशय, आला तर होता, परंतु आम्ही त्याला खोटे ठरविले आणि म्हटले की अल्लाहने काहीच अवतरित केले नाही, तुम्ही फार मोठ्या मार्गभ्रष्टतेत आहात
Surah Al-Mulk, Verse 9


وَقَالُواْ لَوۡ كُنَّا نَسۡمَعُ أَوۡ نَعۡقِلُ مَا كُنَّا فِيٓ أَصۡحَٰبِ ٱلسَّعِيرِ

१०. आणि म्हणतील की जर आम्ही ऐकले असते किंवा समजून घेतले असते तर जहन्नमवाल्यांमध्ये (सामील) झालो नसतो
Surah Al-Mulk, Verse 10


فَٱعۡتَرَفُواْ بِذَنۢبِهِمۡ فَسُحۡقٗا لِّأَصۡحَٰبِ ٱلسَّعِيرِ

११. जेव्हा त्यांनी आपले अपराध कबूल केले. आता हे जहन्नमी लोक दूर होवोत
Surah Al-Mulk, Verse 11


إِنَّ ٱلَّذِينَ يَخۡشَوۡنَ رَبَّهُم بِٱلۡغَيۡبِ لَهُم مَّغۡفِرَةٞ وَأَجۡرٞ كَبِيرٞ

१२. निःसंशय, जे लोक आपल्या पालनकर्त्याचे न पाहताच भय बाळगतात, त्यांच्यासाठी माफी आहे आणि मोठा मोबदला आहे
Surah Al-Mulk, Verse 12


وَأَسِرُّواْ قَوۡلَكُمۡ أَوِ ٱجۡهَرُواْ بِهِۦٓۖ إِنَّهُۥ عَلِيمُۢ بِذَاتِ ٱلصُّدُورِ

१३. आणि तुम्ही आपल्या गोष्टी अगदी हळू स्वरात बोला किंवा उंच आवाजात, तो तर छातीमध्ये (मनात लपलेल्या) गोष्टींनाही चांगल्या प्रकारे जाणतो
Surah Al-Mulk, Verse 13


أَلَا يَعۡلَمُ مَنۡ خَلَقَ وَهُوَ ٱللَّطِيفُ ٱلۡخَبِيرُ

१४. काय तोच नाही जाणणार, ज्याने निर्माण केले? मग तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणाराही असावा
Surah Al-Mulk, Verse 14


هُوَ ٱلَّذِي جَعَلَ لَكُمُ ٱلۡأَرۡضَ ذَلُولٗا فَٱمۡشُواْ فِي مَنَاكِبِهَا وَكُلُواْ مِن رِّزۡقِهِۦۖ وَإِلَيۡهِ ٱلنُّشُورُ

१५. तो, तोच आहे, ज्याने तुमच्यासाठी जमिनीला सखल (आणि कोमल) बनविले, यासाठी की तुम्ही तिच्या रस्त्यांवर येणे-जाणे करीत राहावे आणि तिने दिलेल्या जीविके (अन्न-सामुग्री) ला खावे-प्यावे. त्याच्याचकडे (तुम्हाला) जिवंत होऊन उठून उभे राहायचे आहे
Surah Al-Mulk, Verse 15


ءَأَمِنتُم مَّن فِي ٱلسَّمَآءِ أَن يَخۡسِفَ بِكُمُ ٱلۡأَرۡضَ فَإِذَا هِيَ تَمُورُ

१६. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झालात की आकाशांच्या स्वामीने तुम्हाला जमिनीत धसवून टाकावे आणि जमीन अकस्मात थरथरावी
Surah Al-Mulk, Verse 16


أَمۡ أَمِنتُم مَّن فِي ٱلسَّمَآءِ أَن يُرۡسِلَ عَلَيۡكُمۡ حَاصِبٗاۖ فَسَتَعۡلَمُونَ كَيۡفَ نَذِيرِ

१७. किंवा काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की आकाशांच्या स्वामीने तुमच्यावर दगडांचा वर्षाव करावा? मग तर तुम्हाला कळूनच येईल की माझे भय दाखवणे कसे होते
Surah Al-Mulk, Verse 17


وَلَقَدۡ كَذَّبَ ٱلَّذِينَ مِن قَبۡلِهِمۡ فَكَيۡفَ كَانَ نَكِيرِ

१८. आणि त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, (तर पाहा) त्यांच्यावर माझा प्रकोप (अज़ाब) कसा झाला
Surah Al-Mulk, Verse 18


أَوَلَمۡ يَرَوۡاْ إِلَى ٱلطَّيۡرِ فَوۡقَهُمۡ صَـٰٓفَّـٰتٖ وَيَقۡبِضۡنَۚ مَا يُمۡسِكُهُنَّ إِلَّا ٱلرَّحۡمَٰنُۚ إِنَّهُۥ بِكُلِّ شَيۡءِۭ بَصِيرٌ

१९. काय हे कधी आपल्या वर पक्ष्यांना पंख पसरविताना आणि (कधी) मिटविताना पाहत नाहीत? त्यांना रहमान (अल्लाह) नेच (वातावरणात व आकाशात) आधार दिलेला आहे. निःसंशय, प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेत आहे
Surah Al-Mulk, Verse 19


أَمَّنۡ هَٰذَا ٱلَّذِي هُوَ جُندٞ لَّكُمۡ يَنصُرُكُم مِّن دُونِ ٱلرَّحۡمَٰنِۚ إِنِ ٱلۡكَٰفِرُونَ إِلَّا فِي غُرُورٍ

२०. अल्लाहखेरीज तुमची कोणती सेना आहे, जी तुम्हाला मदत करू शकेल, काफिर (इन्कार करणारे) तर पूर्णतः धोक्यातच आहेत
Surah Al-Mulk, Verse 20


أَمَّنۡ هَٰذَا ٱلَّذِي يَرۡزُقُكُمۡ إِنۡ أَمۡسَكَ رِزۡقَهُۥۚ بَل لَّجُّواْ فِي عُتُوّٖ وَنُفُورٍ

२१. जर अल्लाह आपली रोजी रोखून घेईल तर (सांगा) कोण आहे जो तुम्हाला रोजी (जीविका) देईल? किंबहुना (काफिर) तर विद्रोह आणि सत्यापासून उद्विग्न होण्यावर अडून बसले आहेत
Surah Al-Mulk, Verse 21


أَفَمَن يَمۡشِي مُكِبًّا عَلَىٰ وَجۡهِهِۦٓ أَهۡدَىٰٓ أَمَّن يَمۡشِي سَوِيًّا عَلَىٰ صِرَٰطٖ مُّسۡتَقِيمٖ

२२. काय तो मनुष्य अधिक मार्गदर्शनावर चालणारा आहे, जो तोंडघशी पडून चालत असावा की तो, जो सरळ (पायांवर) मार्गावर चालत असेल
Surah Al-Mulk, Verse 22


قُلۡ هُوَ ٱلَّذِيٓ أَنشَأَكُمۡ وَجَعَلَ لَكُمُ ٱلسَّمۡعَ وَٱلۡأَبۡصَٰرَ وَٱلۡأَفۡـِٔدَةَۚ قَلِيلٗا مَّا تَشۡكُرُونَ

२३. सांगा की तोच (अल्लाह) आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले, (परंतु) तुम्ही फार कमीच कृतज्ञता व्यक्त करता
Surah Al-Mulk, Verse 23


قُلۡ هُوَ ٱلَّذِي ذَرَأَكُمۡ فِي ٱلۡأَرۡضِ وَإِلَيۡهِ تُحۡشَرُونَ

२४. सांगा की तोच आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर (इतस्ततः) पसरविले, आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्रित केले जाल
Surah Al-Mulk, Verse 24


وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا ٱلۡوَعۡدُ إِن كُنتُمۡ صَٰدِقِينَ

२५. आणि (काफिर) विचारतात की तो वायदा केव्हा प्रकट (पूर्ण) होईल, जर तुम्ही सच्चे असाल (तर सांगा)
Surah Al-Mulk, Verse 25


قُلۡ إِنَّمَا ٱلۡعِلۡمُ عِندَ ٱللَّهِ وَإِنَّمَآ أَنَا۠ نَذِيرٞ مُّبِينٞ

२६. (तुम्ही) सांगा की याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे. मी तर स्पष्टपणे खबरदार करणारा आहे
Surah Al-Mulk, Verse 26


فَلَمَّا رَأَوۡهُ زُلۡفَةٗ سِيٓـَٔتۡ وُجُوهُ ٱلَّذِينَ كَفَرُواْ وَقِيلَ هَٰذَا ٱلَّذِي كُنتُم بِهِۦ تَدَّعُونَ

२७. जेव्हा या लोकांना तो वायदा निकट आलेला आढळेल, त्या वेळी या काफिरांचे चेहरे बिघडतील, मग त्यांना सांगितले जाईल की, हेच आहे ते, ज्याची तुम्ही मागणी करीत होते
Surah Al-Mulk, Verse 27


قُلۡ أَرَءَيۡتُمۡ إِنۡ أَهۡلَكَنِيَ ٱللَّهُ وَمَن مَّعِيَ أَوۡ رَحِمَنَا فَمَن يُجِيرُ ٱلۡكَٰفِرِينَ مِنۡ عَذَابٍ أَلِيمٖ

२८. (तुम्ही) सांगा की, ठीक आहे. जर मला आणि माझ्या साथीदारांना अल्लाह नष्ट करील किंवा आमच्यावर दया कृपा करील (जे काही होवो, परंतु हे सांगा) की काफिरांना (इन्कार करणाऱ्यांना) कष्टदायक शिक्षा - यातनेपासून कोण वाचविल
Surah Al-Mulk, Verse 28


قُلۡ هُوَ ٱلرَّحۡمَٰنُ ءَامَنَّا بِهِۦ وَعَلَيۡهِ تَوَكَّلۡنَاۖ فَسَتَعۡلَمُونَ مَنۡ هُوَ فِي ضَلَٰلٖ مُّبِينٖ

२९. (तुम्ही) सांगा की तोच रहमान (दयावान) आहे, आम्ही त्याच्यावर ईमान राखले आणि त्याच्यावरच आम्ही भरवसा केला. तुम्हाला लवकरच माहीत पडेल की उघड (स्वरूपाच्या) मार्गभ्रष्टतेत कोण आहे
Surah Al-Mulk, Verse 29


قُلۡ أَرَءَيۡتُمۡ إِنۡ أَصۡبَحَ مَآؤُكُمۡ غَوۡرٗا فَمَن يَأۡتِيكُم بِمَآءٖ مَّعِينِۭ

३०. (तुम्ही) सांगा, ठीक आहे, बरे हे तर सांगा की जर तुमचे (पिण्याचे) पाणी जमीन शोषून घेईल तर मग कोण आहे जो तुमच्यासाठी निथारलेले साफ पाणी घेऊन येईल
Surah Al-Mulk, Verse 30


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 66
>> Surah 68

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai