Surah Al-Haaqqa - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
ٱلۡحَآقَّةُ
१. सिद्ध होणारी
Surah Al-Haaqqa, Verse 1
مَا ٱلۡحَآقَّةُ
२. काय आहे सिद्ध होणारी
Surah Al-Haaqqa, Verse 2
وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا ٱلۡحَآقَّةُ
३. आणि तुम्हाला काय माहीत की ती सिद्ध होणारी काय आहे
Surah Al-Haaqqa, Verse 3
كَذَّبَتۡ ثَمُودُ وَعَادُۢ بِٱلۡقَارِعَةِ
४. त्या खडकाविणारीला समूद आणि आदच्या लोकांनी खोटे ठरविले
Surah Al-Haaqqa, Verse 4
فَأَمَّا ثَمُودُ فَأُهۡلِكُواْ بِٱلطَّاغِيَةِ
५. (परिणामी) समूद तर अतिशय तीव्र (आणि भयंकर जोराच्या) चित्काराद्वारे नष्ट केले गेले
Surah Al-Haaqqa, Verse 5
وَأَمَّا عَادٞ فَأُهۡلِكُواْ بِرِيحٖ صَرۡصَرٍ عَاتِيَةٖ
६. आणि आद, मोठ्या वेगाच्या पालापाचोळा असलेल्या वादळाद्वारे नष्ट केले गेले
Surah Al-Haaqqa, Verse 6
سَخَّرَهَا عَلَيۡهِمۡ سَبۡعَ لَيَالٖ وَثَمَٰنِيَةَ أَيَّامٍ حُسُومٗاۖ فَتَرَى ٱلۡقَوۡمَ فِيهَا صَرۡعَىٰ كَأَنَّهُمۡ أَعۡجَازُ نَخۡلٍ خَاوِيَةٖ
७. ज्यास (अल्लाहने) त्यांच्यावर सतत सात रात्री आणि आठ दिवसपर्यंत लावून ठेवले. तेव्हा तुम्ही पाहिले असते की लोक जमिनीवर अशा प्रकारे चीत केले गेले आहेत जणू खजुरीची पोकळ खोडे
Surah Al-Haaqqa, Verse 7
فَهَلۡ تَرَىٰ لَهُم مِّنۢ بَاقِيَةٖ
८. तर काय त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला बाकी दिसून येत आहे
Surah Al-Haaqqa, Verse 8
وَجَآءَ فِرۡعَوۡنُ وَمَن قَبۡلَهُۥ وَٱلۡمُؤۡتَفِكَٰتُ بِٱلۡخَاطِئَةِ
९. फिरऔन आणि त्याच्या पूर्वीचे लोक आणि ज्यांच्या वस्त्या पालथ्या घातल्या गेल्या, त्यांनीही अपराध केले
Surah Al-Haaqqa, Verse 9
فَعَصَوۡاْ رَسُولَ رَبِّهِمۡ فَأَخَذَهُمۡ أَخۡذَةٗ رَّابِيَةً
१०. आणि आपल्या पालनकर्त्याच्या रसूल (पैगंबरा) ची अवज्ञा केली (शेवटी) अल्लाहने त्यांना (ही) पकडीत घेतले
Surah Al-Haaqqa, Verse 10
إِنَّا لَمَّا طَغَا ٱلۡمَآءُ حَمَلۡنَٰكُمۡ فِي ٱلۡجَارِيَةِ
११. जेव्हा पाण्यात पूर आला तर त्या वेळी आम्ही तुम्हाला नौकेत चढविले
Surah Al-Haaqqa, Verse 11
لِنَجۡعَلَهَا لَكُمۡ تَذۡكِرَةٗ وَتَعِيَهَآ أُذُنٞ وَٰعِيَةٞ
१२. यासाठी की त्यास तुमच्यासाठी बोध उपदेश (आणि स्मारक) बनवावे, आणि (यासाठी की) स्मरण राखणाऱ्या कानांनी त्यास स्मरणात राखावे
Surah Al-Haaqqa, Verse 12
فَإِذَا نُفِخَ فِي ٱلصُّورِ نَفۡخَةٞ وَٰحِدَةٞ
१३. तर जेव्हा सूर (शंखा) मध्ये एक फुंक मारली जाईल
Surah Al-Haaqqa, Verse 13
وَحُمِلَتِ ٱلۡأَرۡضُ وَٱلۡجِبَالُ فَدُكَّتَا دَكَّةٗ وَٰحِدَةٗ
१४. आणि धरती व पर्वत उचलून घेतले जातील आणि एकाच प्रहारात कण-कण (चुरेचूर) बनविले जातील
Surah Al-Haaqqa, Verse 14
فَيَوۡمَئِذٖ وَقَعَتِ ٱلۡوَاقِعَةُ
१५. त्या दिवशी घडून येणारी घटना (कयामत) घडून येईल
Surah Al-Haaqqa, Verse 15
وَٱنشَقَّتِ ٱلسَّمَآءُ فَهِيَ يَوۡمَئِذٖ وَاهِيَةٞ
१६. आणि आकाश विदीर्ण होईल तर त्या दिवशी फार कमजोर होईल
Surah Al-Haaqqa, Verse 16
وَٱلۡمَلَكُ عَلَىٰٓ أَرۡجَآئِهَاۚ وَيَحۡمِلُ عَرۡشَ رَبِّكَ فَوۡقَهُمۡ يَوۡمَئِذٖ ثَمَٰنِيَةٞ
१७. आणि त्याच्या किनाऱ्यांवर फरिश्ते असतील आणि तुमच्या पालनकर्त्याचे आसन (अर्श) त्या दिवशी आठ फरिश्ते आपल्यावर उचलून घेतलेले असतील
Surah Al-Haaqqa, Verse 17
يَوۡمَئِذٖ تُعۡرَضُونَ لَا تَخۡفَىٰ مِنكُمۡ خَافِيَةٞ
१८. त्या दिवशी तुम्ही सर्व हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही
Surah Al-Haaqqa, Verse 18
فَأَمَّا مَنۡ أُوتِيَ كِتَٰبَهُۥ بِيَمِينِهِۦ فَيَقُولُ هَآؤُمُ ٱقۡرَءُواْ كِتَٰبِيَهۡ
१९. तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा
Surah Al-Haaqqa, Verse 19
إِنِّي ظَنَنتُ أَنِّي مُلَٰقٍ حِسَابِيَهۡ
२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे
Surah Al-Haaqqa, Verse 20
فَهُوَ فِي عِيشَةٖ رَّاضِيَةٖ
२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल
Surah Al-Haaqqa, Verse 21
فِي جَنَّةٍ عَالِيَةٖ
२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये
Surah Al-Haaqqa, Verse 22
قُطُوفُهَا دَانِيَةٞ
२३. जिची फळे खाली झुकलेली असतील
Surah Al-Haaqqa, Verse 23
كُلُواْ وَٱشۡرَبُواْ هَنِيٓـَٔۢا بِمَآ أَسۡلَفۡتُمۡ فِي ٱلۡأَيَّامِ ٱلۡخَالِيَةِ
२४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत
Surah Al-Haaqqa, Verse 24
وَأَمَّا مَنۡ أُوتِيَ كِتَٰبَهُۥ بِشِمَالِهِۦ فَيَقُولُ يَٰلَيۡتَنِي لَمۡ أُوتَ كِتَٰبِيَهۡ
२५. परंतु ज्याला त्याचे कर्मपत्र डाव्या हातात दिले जाईल, तर तो म्हणेल की अरेरे! मला माझे कर्मपत्र दिले गेले नसते
Surah Al-Haaqqa, Verse 25
وَلَمۡ أَدۡرِ مَا حِسَابِيَهۡ
२६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे
Surah Al-Haaqqa, Verse 26
يَٰلَيۡتَهَا كَانَتِ ٱلۡقَاضِيَةَ
२७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते)
Surah Al-Haaqqa, Verse 27
مَآ أَغۡنَىٰ عَنِّي مَالِيَهۡۜ
२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही
Surah Al-Haaqqa, Verse 28
هَلَكَ عَنِّي سُلۡطَٰنِيَهۡ
२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले
Surah Al-Haaqqa, Verse 29
خُذُوهُ فَغُلُّوهُ
३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका
Surah Al-Haaqqa, Verse 30
ثُمَّ ٱلۡجَحِيمَ صَلُّوهُ
३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका
Surah Al-Haaqqa, Verse 31
ثُمَّ فِي سِلۡسِلَةٖ ذَرۡعُهَا سَبۡعُونَ ذِرَاعٗا فَٱسۡلُكُوهُ
३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका
Surah Al-Haaqqa, Verse 32
إِنَّهُۥ كَانَ لَا يُؤۡمِنُ بِٱللَّهِ ٱلۡعَظِيمِ
३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता
Surah Al-Haaqqa, Verse 33
وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ ٱلۡمِسۡكِينِ
३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता
Surah Al-Haaqqa, Verse 34
فَلَيۡسَ لَهُ ٱلۡيَوۡمَ هَٰهُنَا حَمِيمٞ
३५. तर आज इथे त्याचा ना कोणी मित्र आहे
Surah Al-Haaqqa, Verse 35
وَلَا طَعَامٌ إِلَّا مِنۡ غِسۡلِينٖ
३६. आणि ना पू खेरीज त्याचे एखादे भोजन आहे
Surah Al-Haaqqa, Verse 36
لَّا يَأۡكُلُهُۥٓ إِلَّا ٱلۡخَٰطِـُٔونَ
३७. ज्यास अपराधी लोकांशिवाय कोणीही खाणार नाही
Surah Al-Haaqqa, Verse 37
فَلَآ أُقۡسِمُ بِمَا تُبۡصِرُونَ
३८. तेव्हा मला शपथ आहे त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहता
Surah Al-Haaqqa, Verse 38
وَمَا لَا تُبۡصِرُونَ
३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही
Surah Al-Haaqqa, Verse 39
إِنَّهُۥ لَقَوۡلُ رَسُولٖ كَرِيمٖ
४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१
Surah Al-Haaqqa, Verse 40
وَمَا هُوَ بِقَوۡلِ شَاعِرٖۚ قَلِيلٗا مَّا تُؤۡمِنُونَ
४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता
Surah Al-Haaqqa, Verse 41
وَلَا بِقَوۡلِ كَاهِنٖۚ قَلِيلٗا مَّا تَذَكَّرُونَ
४२. आणि ना एखाद्या ज्योतिषीचे कथन आहे. (खेद आहे) तुम्ही फार कमी बोध ग्रहण करता
Surah Al-Haaqqa, Verse 42
تَنزِيلٞ مِّن رَّبِّ ٱلۡعَٰلَمِينَ
४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे
Surah Al-Haaqqa, Verse 43
وَلَوۡ تَقَوَّلَ عَلَيۡنَا بَعۡضَ ٱلۡأَقَاوِيلِ
४४. आणि जर याने एखादी गोष्ट (मनाने) रचून, तिचा संबंध आमच्याशी जोडला असता
Surah Al-Haaqqa, Verse 44
لَأَخَذۡنَا مِنۡهُ بِٱلۡيَمِينِ
४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता
Surah Al-Haaqqa, Verse 45
ثُمَّ لَقَطَعۡنَا مِنۡهُ ٱلۡوَتِينَ
४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती
Surah Al-Haaqqa, Verse 46
فَمَا مِنكُم مِّنۡ أَحَدٍ عَنۡهُ حَٰجِزِينَ
४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता
Surah Al-Haaqqa, Verse 47
وَإِنَّهُۥ لَتَذۡكِرَةٞ لِّلۡمُتَّقِينَ
४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
Surah Al-Haaqqa, Verse 48
وَإِنَّا لَنَعۡلَمُ أَنَّ مِنكُم مُّكَذِّبِينَ
४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत
Surah Al-Haaqqa, Verse 49
وَإِنَّهُۥ لَحَسۡرَةٌ عَلَى ٱلۡكَٰفِرِينَ
५०. निःसंशय, (हे खोटे ठरविणे) काफिरांकरिता पश्चात्तापकारक आहे
Surah Al-Haaqqa, Verse 50
وَإِنَّهُۥ لَحَقُّ ٱلۡيَقِينِ
५१. आणि निःसंशय, हे अगदी खात्रीचे सत्य आहे
Surah Al-Haaqqa, Verse 51
فَسَبِّحۡ بِٱسۡمِ رَبِّكَ ٱلۡعَظِيمِ
५२. तेव्हा तुम्ही आपल्या महिमावान (महामहीम) पालनकर्त्याच्या पावित्र्याचे गुणगान करा
Surah Al-Haaqqa, Verse 52