UAE Prayer Times

  • Dubai
  • Abu Dhabi
  • Sharjah
  • Ajman
  • Fujairah
  • Umm Al Quwain
  • Ras Al Khaimah
  • Quran Translations

Surah Nooh - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari


إِنَّآ أَرۡسَلۡنَا نُوحًا إِلَىٰ قَوۡمِهِۦٓ أَنۡ أَنذِرۡ قَوۡمَكَ مِن قَبۡلِ أَن يَأۡتِيَهُمۡ عَذَابٌ أَلِيمٞ

१. निःसंशय, आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले की आपल्या जनसमूहाला खबरदार करा (आणि सावध करा) यापूर्वी की त्यांच्याजवळ दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) येऊन पोहचावा
Surah Nooh, Verse 1


قَالَ يَٰقَوۡمِ إِنِّي لَكُمۡ نَذِيرٞ مُّبِينٌ

२. (नूह अलै.) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुम्हाला स्पष्टपणे खबरदार करणारा आहे
Surah Nooh, Verse 2


أَنِ ٱعۡبُدُواْ ٱللَّهَ وَٱتَّقُوهُ وَأَطِيعُونِ

३. की तुम्ही अल्लाहची उपासना करा आणि त्याचेच भय बाळगा आणि माझे म्हणणे मान्य करा
Surah Nooh, Verse 3


يَغۡفِرۡ لَكُم مِّن ذُنُوبِكُمۡ وَيُؤَخِّرۡكُمۡ إِلَىٰٓ أَجَلٖ مُّسَمًّىۚ إِنَّ أَجَلَ ٱللَّهِ إِذَا جَآءَ لَا يُؤَخَّرُۚ لَوۡ كُنتُمۡ تَعۡلَمُونَ

४. तर तो तुमचे अपराध माफ करील, आणि तुम्हाला एका निर्धारित वेळे पर्यर्ंत सवड देईल.१ निःसंशय, अल्लाहचा वायदा (निर्धारित समय) जेव्हा येतो, तेव्हा तो टळत नाही. तुम्हाला हे माहीत असते तर (बरे झाले असते)
Surah Nooh, Verse 4


قَالَ رَبِّ إِنِّي دَعَوۡتُ قَوۡمِي لَيۡلٗا وَنَهَارٗا

५. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या जनसमूहाच्या लोकांना रात्रंदिवस तुझ्याकडे बोलाविले आहे
Surah Nooh, Verse 5


فَلَمۡ يَزِدۡهُمۡ دُعَآءِيٓ إِلَّا فِرَارٗا

६. तथापि माझ्या बोलाविण्याने हे लोक पळ काढण्यात आणखी वाढतच गेले
Surah Nooh, Verse 6


وَإِنِّي كُلَّمَا دَعَوۡتُهُمۡ لِتَغۡفِرَ لَهُمۡ جَعَلُوٓاْ أَصَٰبِعَهُمۡ فِيٓ ءَاذَانِهِمۡ وَٱسۡتَغۡشَوۡاْ ثِيَابَهُمۡ وَأَصَرُّواْ وَٱسۡتَكۡبَرُواْ ٱسۡتِكۡبَارٗا

७. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलाविले, यासाठी की तू त्यांना माफ करावे, तेव्हा त्यांनी आपली बोटे आपल्या कानात खुपसलीत आणि आपली वस्त्रे (अंगावर) टाकून घेतली, आणि अडून राहिले व मोठा अहंकार केला
Surah Nooh, Verse 7


ثُمَّ إِنِّي دَعَوۡتُهُمۡ جِهَارٗا

८. मग मी त्यांना उंच स्वरात बोलाविले
Surah Nooh, Verse 8


ثُمَّ إِنِّيٓ أَعۡلَنتُ لَهُمۡ وَأَسۡرَرۡتُ لَهُمۡ إِسۡرَارٗا

९. आणि निःसंशय, मी त्यांना उघडपणेही सांगितले व गुपचुपरित्याही
Surah Nooh, Verse 9


فَقُلۡتُ ٱسۡتَغۡفِرُواْ رَبَّكُمۡ إِنَّهُۥ كَانَ غَفَّارٗا

१०. आणि मी म्हणालो की आपल्या पालनकर्त्याकडून आपले अपराध माफ करवून घ्या (आणि क्षमा-याचना करा). निःसंशय, तो मोठा माफ करणारा आहे
Surah Nooh, Verse 10


يُرۡسِلِ ٱلسَّمَآءَ عَلَيۡكُم مِّدۡرَارٗا

११. तो तुमच्यावर आकाशाला खूप पर्जन्यवृष्टी करताना सोडील
Surah Nooh, Verse 11


وَيُمۡدِدۡكُم بِأَمۡوَٰلٖ وَبَنِينَ وَيَجۡعَل لَّكُمۡ جَنَّـٰتٖ وَيَجۡعَل لَّكُمۡ أَنۡهَٰرٗا

१२. आणि तुम्हाला धन-संपत्ती आणि संततीच्या विपुलतेत वाढविल, आणि तुम्हाला बाग प्रदान करील व तुमच्यासाठी प्रवाह जारी करील
Surah Nooh, Verse 12


مَّا لَكُمۡ لَا تَرۡجُونَ لِلَّهِ وَقَارٗا

१३. तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या महानतेवर विश्वास करीत नाही
Surah Nooh, Verse 13


وَقَدۡ خَلَقَكُمۡ أَطۡوَارًا

१४. वास्तविक त्याने तुम्हाला अनेकरित्या निर्माण केले आहे
Surah Nooh, Verse 14


أَلَمۡ تَرَوۡاْ كَيۡفَ خَلَقَ ٱللَّهُ سَبۡعَ سَمَٰوَٰتٖ طِبَاقٗا

१५. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाहने कशा प्रकारे वर खाली सात आकाश निर्माण केले आहेत
Surah Nooh, Verse 15


وَجَعَلَ ٱلۡقَمَرَ فِيهِنَّ نُورٗا وَجَعَلَ ٱلشَّمۡسَ سِرَاجٗا

१६. आणि त्या चंद्राला खूप झगमगणारा बनविले आणि सूर्याला तेजस्वी दीप बनविले
Surah Nooh, Verse 16


وَٱللَّهُ أَنۢبَتَكُم مِّنَ ٱلۡأَرۡضِ نَبَاتٗا

१७. आणि तुम्हाला जमिनीतून (एका विशेष पद्धतीने) उगविले (निर्माण केले आहे)
Surah Nooh, Verse 17


ثُمَّ يُعِيدُكُمۡ فِيهَا وَيُخۡرِجُكُمۡ إِخۡرَاجٗا

१८. मग तुम्हाला तिच्यातच परतविल आणि (एका विशेषरितीने) पुन्हा तुम्हाला बाहेर काढील
Surah Nooh, Verse 18


وَٱللَّهُ جَعَلَ لَكُمُ ٱلۡأَرۡضَ بِسَاطٗا

१९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले
Surah Nooh, Verse 19


لِّتَسۡلُكُواْ مِنۡهَا سُبُلٗا فِجَاجٗا

२०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे
Surah Nooh, Verse 20


قَالَ نُوحٞ رَّبِّ إِنَّهُمۡ عَصَوۡنِي وَٱتَّبَعُواْ مَن لَّمۡ يَزِدۡهُ مَالُهُۥ وَوَلَدُهُۥٓ إِلَّا خَسَارٗا

२१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली
Surah Nooh, Verse 21


وَمَكَرُواْ مَكۡرٗا كُبَّارٗا

२२. आणि त्या लोकांनी फार मोठा धोका (कपट) केला
Surah Nooh, Verse 22


وَقَالُواْ لَا تَذَرُنَّ ءَالِهَتَكُمۡ وَلَا تَذَرُنَّ وَدّٗا وَلَا سُوَاعٗا وَلَا يَغُوثَ وَيَعُوقَ وَنَسۡرٗا

२३. आणि ते म्हणाले की कधीही आपल्या दैवतांना सोडू नका, आणि ना वद्द, सुवाअ, यगूस, यअुक आणि नस्रला (सोडा).१
Surah Nooh, Verse 23


وَقَدۡ أَضَلُّواْ كَثِيرٗاۖ وَلَا تَزِدِ ٱلظَّـٰلِمِينَ إِلَّا ضَلَٰلٗا

२४. आणि त्यांनी अनेक लोकांना मार्गभ्रष्ट केले. (हे पालनकर्त्या!) तू या अत्याचारी लोकांच्या मार्गभ्रष्टतेत आणखी वाढ कर
Surah Nooh, Verse 24


مِّمَّا خَطِيٓـَٰٔتِهِمۡ أُغۡرِقُواْ فَأُدۡخِلُواْ نَارٗا فَلَمۡ يَجِدُواْ لَهُم مِّن دُونِ ٱللَّهِ أَنصَارٗا

२५. हे लोक आपल्या अपराधांपायी (पाण्यात) बुडविले गेले आणि जहन्नममध्ये पोहचविले गेले आणि अल्लाहखेरीज त्यांना आपला कोणी मदत करणारा आढळला नाही
Surah Nooh, Verse 25


وَقَالَ نُوحٞ رَّبِّ لَا تَذَرۡ عَلَى ٱلۡأَرۡضِ مِنَ ٱلۡكَٰفِرِينَ دَيَّارًا

२६. आणि (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! तू या धरतीवर कोणत्याही काफिराला (इन्कार करणाऱ्याला) वास्तव्य करणारा सोडू नकोस
Surah Nooh, Verse 26


إِنَّكَ إِن تَذَرۡهُمۡ يُضِلُّواْ عِبَادَكَ وَلَا يَلِدُوٓاْ إِلَّا فَاجِرٗا كَفَّارٗا

२७. जर त्यांना तू सोडशील तर निःसंशय हे तुझ्या दुसऱ्या दासांनाही मार्गभ्रष्ट करतील आणि हे दुष्कर्म करणाऱ्या काफिरांनाच जन्म देतील
Surah Nooh, Verse 27


رَّبِّ ٱغۡفِرۡ لِي وَلِوَٰلِدَيَّ وَلِمَن دَخَلَ بَيۡتِيَ مُؤۡمِنٗا وَلِلۡمُؤۡمِنِينَ وَٱلۡمُؤۡمِنَٰتِۖ وَلَا تَزِدِ ٱلظَّـٰلِمِينَ إِلَّا تَبَارَۢا

२८. हे माझ्या पालनकर्त्या! तू मला आणि माझ्या माता-पित्याला आणि जे देखील ईमान राखून माझ्या घरात येतील आणि समस्त ईमानधारक पुरुषांना आणि समस्त ईमानधारक स्त्रियांना माफ कर आणि काफिरांना विनाशाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीत वृद्धिंगत करू नकोस
Surah Nooh, Verse 28


Author: Muhammad Shafi I Ansari


<< Surah 70
>> Surah 72

Marathi Translations by other Authors


Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Marathi Translation By Muhammad Shafi I Ansari
Popular Areas
Apartments for rent in Dubai Apartments for rent Abu Dhabi Villas for rent in Dubai House for rent Abu Dhabi Apartments for sale in Dubai Apartments for sale in Abu Dhabi Flat for rent Sharjah
Popular Searches
Studios for rent in UAE Apartments for rent in UAE Villas for rent in UAE Apartments for sale in UAE Villas for sale in UAE Land for sale in UAE Dubai Real Estate
Trending Areas
Apartments for rent in Dubai Marina Apartments for sale in Dubai Marina Villa for rent in Sharjah Villa for sale in Dubai Flat for rent in Ajman Studio for rent in Abu Dhabi Villa for rent in Ajman
Trending Searches
Villa for rent in Abu Dhabi Shop for rent in Dubai Villas for sale in Ajman Studio for rent in Sharjah 1 Bedroom Apartment for rent in Dubai Property for rent in Abu Dhabi Commercial properties for sale
© Copyright Dubai Prayer Time. All Rights Reserved
Designed by Prayer Time In Dubai