Surah Al-Muzzammil - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
يَـٰٓأَيُّهَا ٱلۡمُزَّمِّلُ
१. हे चादरीत लपेटून घेणाऱ्या
Surah Al-Muzzammil, Verse 1
قُمِ ٱلَّيۡلَ إِلَّا قَلِيلٗا
२. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ
Surah Al-Muzzammil, Verse 2
نِّصۡفَهُۥٓ أَوِ ٱنقُصۡ مِنۡهُ قَلِيلًا
३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी
Surah Al-Muzzammil, Verse 3
أَوۡ زِدۡ عَلَيۡهِ وَرَتِّلِ ٱلۡقُرۡءَانَ تَرۡتِيلًا
४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा
Surah Al-Muzzammil, Verse 4
إِنَّا سَنُلۡقِي عَلَيۡكَ قَوۡلٗا ثَقِيلًا
५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू
Surah Al-Muzzammil, Verse 5
إِنَّ نَاشِئَةَ ٱلَّيۡلِ هِيَ أَشَدُّ وَطۡـٔٗا وَأَقۡوَمُ قِيلًا
६. निःसंशय, रात्रीचे उठणे मनाच्या एकाग्रतेकरिता फार योग्य आहे आणि कथनास मोठे दुरुस्त (उचित) करणारे आहे
Surah Al-Muzzammil, Verse 6
إِنَّ لَكَ فِي ٱلنَّهَارِ سَبۡحٗا طَوِيلٗا
७. निश्चितच, दिवसा तुम्हाला अनेक कामे असतात
Surah Al-Muzzammil, Verse 7
وَٱذۡكُرِ ٱسۡمَ رَبِّكَ وَتَبَتَّلۡ إِلَيۡهِ تَبۡتِيلٗا
८. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करीत जा आणि संपूर्ण सृष्टी (निर्मिती) पासून अलग होऊन त्याच्याकडे ध्यानमग्न व्हा
Surah Al-Muzzammil, Verse 8
رَّبُّ ٱلۡمَشۡرِقِ وَٱلۡمَغۡرِبِ لَآ إِلَٰهَ إِلَّا هُوَ فَٱتَّخِذۡهُ وَكِيلٗا
९. पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी, ज्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तुम्ही त्यालाच आपला कार्यसाधक (व संरक्षक) बनवा
Surah Al-Muzzammil, Verse 9
وَٱصۡبِرۡ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَٱهۡجُرۡهُمۡ هَجۡرٗا جَمِيلٗا
१०. आणि जे काही ते सांगतात, तुम्ही ते सहन करीत राहा आणि त्यांना चांगल्या प्रकारे सोडून द्या
Surah Al-Muzzammil, Verse 10
وَذَرۡنِي وَٱلۡمُكَذِّبِينَ أُوْلِي ٱلنَّعۡمَةِ وَمَهِّلۡهُمۡ قَلِيلًا
११. आणि मला व त्या खोटे ठरविणाऱ्या सुसंपन्न लोकांना सोडून द्या, आणि त्यांना थोडी सवड द्या
Surah Al-Muzzammil, Verse 11
إِنَّ لَدَيۡنَآ أَنكَالٗا وَجَحِيمٗا
१२. निःसंशय, आमच्याजवळ कठोर बेड्या आहेत, आणि धगधग पेटत असलेली जहन्नम आहे
Surah Al-Muzzammil, Verse 12
وَطَعَامٗا ذَا غُصَّةٖ وَعَذَابًا أَلِيمٗا
१३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे
Surah Al-Muzzammil, Verse 13
يَوۡمَ تَرۡجُفُ ٱلۡأَرۡضُ وَٱلۡجِبَالُ وَكَانَتِ ٱلۡجِبَالُ كَثِيبٗا مَّهِيلًا
१४. ज्या दिवशी धरती आणि पर्वत कंपित होतील आणि पर्वत भुरभुरित वाळूच्या टेकड्यांसारखे होतील
Surah Al-Muzzammil, Verse 14
إِنَّآ أَرۡسَلۡنَآ إِلَيۡكُمۡ رَسُولٗا شَٰهِدًا عَلَيۡكُمۡ كَمَآ أَرۡسَلۡنَآ إِلَىٰ فِرۡعَوۡنَ رَسُولٗا
१५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडेही तुमच्यावर साक्ष देणारा पैगंबर पाठविला आहे, जसा आम्ही फिरऔनकडे रसूल (पैगंबर) पाठविला होता
Surah Al-Muzzammil, Verse 15
فَعَصَىٰ فِرۡعَوۡنُ ٱلرَّسُولَ فَأَخَذۡنَٰهُ أَخۡذٗا وَبِيلٗا
१६. तेव्हा फिरऔनने त्या पैगंबराची अवज्ञा केली तर आम्ही त्याला घोर संकटात धरले
Surah Al-Muzzammil, Verse 16
فَكَيۡفَ تَتَّقُونَ إِن كَفَرۡتُمۡ يَوۡمٗا يَجۡعَلُ ٱلۡوِلۡدَٰنَ شِيبًا
१७. तुम्ही जर इन्कारी राहाल तर त्या दिवशी कसे सुरक्षित राहाल, जो दिवस लहान बालकांना वृद्ध करून टाकील.१
Surah Al-Muzzammil, Verse 17
ٱلسَّمَآءُ مُنفَطِرُۢ بِهِۦۚ كَانَ وَعۡدُهُۥ مَفۡعُولًا
१८. ज्या दिवशी आकाश विदीर्ण होईल, अल्लाहचा हा वायदा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही
Surah Al-Muzzammil, Verse 18
إِنَّ هَٰذِهِۦ تَذۡكِرَةٞۖ فَمَن شَآءَ ٱتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِۦ سَبِيلًا
१९. निःसंशय, हा बोध (उपदेश) आहे, तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे (जाण्या) चा मार्ग पत्करावा
Surah Al-Muzzammil, Verse 19
۞إِنَّ رَبَّكَ يَعۡلَمُ أَنَّكَ تَقُومُ أَدۡنَىٰ مِن ثُلُثَيِ ٱلَّيۡلِ وَنِصۡفَهُۥ وَثُلُثَهُۥ وَطَآئِفَةٞ مِّنَ ٱلَّذِينَ مَعَكَۚ وَٱللَّهُ يُقَدِّرُ ٱلَّيۡلَ وَٱلنَّهَارَۚ عَلِمَ أَن لَّن تُحۡصُوهُ فَتَابَ عَلَيۡكُمۡۖ فَٱقۡرَءُواْ مَا تَيَسَّرَ مِنَ ٱلۡقُرۡءَانِۚ عَلِمَ أَن سَيَكُونُ مِنكُم مَّرۡضَىٰ وَءَاخَرُونَ يَضۡرِبُونَ فِي ٱلۡأَرۡضِ يَبۡتَغُونَ مِن فَضۡلِ ٱللَّهِ وَءَاخَرُونَ يُقَٰتِلُونَ فِي سَبِيلِ ٱللَّهِۖ فَٱقۡرَءُواْ مَا تَيَسَّرَ مِنۡهُۚ وَأَقِيمُواْ ٱلصَّلَوٰةَ وَءَاتُواْ ٱلزَّكَوٰةَ وَأَقۡرِضُواْ ٱللَّهَ قَرۡضًا حَسَنٗاۚ وَمَا تُقَدِّمُواْ لِأَنفُسِكُم مِّنۡ خَيۡرٖ تَجِدُوهُ عِندَ ٱللَّهِ هُوَ خَيۡرٗا وَأَعۡظَمَ أَجۡرٗاۚ وَٱسۡتَغۡفِرُواْ ٱللَّهَۖ إِنَّ ٱللَّهَ غَفُورٞ رَّحِيمُۢ
२०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुम्ही आणि तुमच्यासोबत असलेल्या लोकांचा एक समूह सुमारे दोन तृतियांश रात्रीला आणि अर्ध्या रात्रीला आणि एक तृतियांश रात्रीला (तहज्जुदच्या नमाजसाठी) उभे राहतात, आणि रात्र-दिवसाचे पूर्ण अनुमान अल्लाहलाच आहे. तो (चांगल्या प्रकारे) जाणतो की तुम्ही ते मुळीच निभावू शकणार नाहीत, तेव्हा त्याने तुमच्यावर कृपा केली, यास्तव जेवढे कुरआन पठण करणे तुम्हाला सहज असेल, तेवढेच पठण करा. तो जाणतो की तुमच्यापैकी काही रोगीही असतील, दुसरे काही जमिनीवर हिंडून फिरून अल्लाहची कृपा (अर्थात रोजीरोटी) शोधतील आणि काही अल्लाहच्या मार्गात जिहादही करतील, तेव्हा तुम्ही जेवढे (कुरआन) पठण सहजपणे करू शकता, तेवढे करा, आणि नमाज नियमितपणे पढत राहा आणि जकात (देखील) देत राहा, आणि अल्लाहला चांगले कर्ज द्या, आणि जी नेकी (सत्कर्मे) तुम्ही आपल्या स्वतःसाठी पुढे पाठवाल ती अल्लाहच्या ठिकाणी सर्वोत्तमरित्या मोबदल्यात अधिक प्राप्त कराल. आणि अल्लाहजवळ माफी मागत राहा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे
Surah Al-Muzzammil, Verse 20