Surah Al-Burooj - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
وَٱلسَّمَآءِ ذَاتِ ٱلۡبُرُوجِ
१. बुरुजांवाल्या आकाशाची शपथ
Surah Al-Burooj, Verse 1
وَٱلۡيَوۡمِ ٱلۡمَوۡعُودِ
२. वायदा केलेल्या दिवसाची शपथ
Surah Al-Burooj, Verse 2
وَشَاهِدٖ وَمَشۡهُودٖ
३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ
Surah Al-Burooj, Verse 3
قُتِلَ أَصۡحَٰبُ ٱلۡأُخۡدُودِ
४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला
Surah Al-Burooj, Verse 4
ٱلنَّارِ ذَاتِ ٱلۡوَقُودِ
५. ती एक आग होती इंधनाची
Surah Al-Burooj, Verse 5
إِذۡ هُمۡ عَلَيۡهَا قُعُودٞ
६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते
Surah Al-Burooj, Verse 6
وَهُمۡ عَلَىٰ مَا يَفۡعَلُونَ بِٱلۡمُؤۡمِنِينَ شُهُودٞ
७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते
Surah Al-Burooj, Verse 7
وَمَا نَقَمُواْ مِنۡهُمۡ إِلَّآ أَن يُؤۡمِنُواْ بِٱللَّهِ ٱلۡعَزِيزِ ٱلۡحَمِيدِ
८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते
Surah Al-Burooj, Verse 8
ٱلَّذِي لَهُۥ مُلۡكُ ٱلسَّمَٰوَٰتِ وَٱلۡأَرۡضِۚ وَٱللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيۡءٖ شَهِيدٌ
९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे
Surah Al-Burooj, Verse 9
إِنَّ ٱلَّذِينَ فَتَنُواْ ٱلۡمُؤۡمِنِينَ وَٱلۡمُؤۡمِنَٰتِ ثُمَّ لَمۡ يَتُوبُواْ فَلَهُمۡ عَذَابُ جَهَنَّمَ وَلَهُمۡ عَذَابُ ٱلۡحَرِيقِ
१०. निःसंशय, ज्या लोकांनी ईमानधारक पुरुषांना व स्त्रियांना सताविले, मग माफीही मागितली नाही तर त्यांच्यासाठी जहन्नमची शिक्षा-यातना आहे आणि जळण्याची शिक्षा
Surah Al-Burooj, Verse 10
إِنَّ ٱلَّذِينَ ءَامَنُواْ وَعَمِلُواْ ٱلصَّـٰلِحَٰتِ لَهُمۡ جَنَّـٰتٞ تَجۡرِي مِن تَحۡتِهَا ٱلۡأَنۡهَٰرُۚ ذَٰلِكَ ٱلۡفَوۡزُ ٱلۡكَبِيرُ
११. निःसंशय, ईमान कबूल करणाऱ्यांकरिता आणि सत्कर्म करणाऱ्यांकरिता त्या बागा आहे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हीच मोठी सफलता आहे
Surah Al-Burooj, Verse 11
إِنَّ بَطۡشَ رَبِّكَ لَشَدِيدٌ
१२. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याची पकड मोठी सक्त आहे
Surah Al-Burooj, Verse 12
إِنَّهُۥ هُوَ يُبۡدِئُ وَيُعِيدُ
१३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील
Surah Al-Burooj, Verse 13
وَهُوَ ٱلۡغَفُورُ ٱلۡوَدُودُ
१४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे
Surah Al-Burooj, Verse 14
ذُو ٱلۡعَرۡشِ ٱلۡمَجِيدُ
१५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा
Surah Al-Burooj, Verse 15
فَعَّالٞ لِّمَا يُرِيدُ
१६. जे इच्छिल ते करून टाकणारा आहे
Surah Al-Burooj, Verse 16
هَلۡ أَتَىٰكَ حَدِيثُ ٱلۡجُنُودِ
१७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे
Surah Al-Burooj, Verse 17
فِرۡعَوۡنَ وَثَمُودَ
१८. (अर्थात) फिरऔन आणि समूदची
Surah Al-Burooj, Verse 18
بَلِ ٱلَّذِينَ كَفَرُواْ فِي تَكۡذِيبٖ
१९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत
Surah Al-Burooj, Verse 19
وَٱللَّهُ مِن وَرَآئِهِم مُّحِيطُۢ
२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे
Surah Al-Burooj, Verse 20
بَلۡ هُوَ قُرۡءَانٞ مَّجِيدٞ
२१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे
Surah Al-Burooj, Verse 21
فِي لَوۡحٖ مَّحۡفُوظِۭ
२२. ‘लोहे महफूज’मध्ये (लिहिलेला)
Surah Al-Burooj, Verse 22