Surah Al-Insan - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
هَلۡ أَتَىٰ عَلَى ٱلۡإِنسَٰنِ حِينٞ مِّنَ ٱلدَّهۡرِ لَمۡ يَكُن شَيۡـٔٗا مَّذۡكُورًا
१. निश्चितच माणसावर काळाचा एक समय असाही आला आहे, जेव्हा तो काहीच उल्लेख करण्यायोग्य नव्हता
Surah Al-Insan, Verse 1
إِنَّا خَلَقۡنَا ٱلۡإِنسَٰنَ مِن نُّطۡفَةٍ أَمۡشَاجٖ نَّبۡتَلِيهِ فَجَعَلۡنَٰهُ سَمِيعَۢا بَصِيرًا
२. निःसंशय, आम्ही मानवाला मिश्र वीर्याद्वारे कसोटीकरिता निर्माण केले, आणि त्याला ऐकणारा पाहणारा बनविले
Surah Al-Insan, Verse 2
إِنَّا هَدَيۡنَٰهُ ٱلسَّبِيلَ إِمَّا شَاكِرٗا وَإِمَّا كَفُورًا
३. आम्ही त्याला मार्ग दाखविला मग तो कृतज्ञ बनो किंवा कृतघ्न
Surah Al-Insan, Verse 3
إِنَّآ أَعۡتَدۡنَا لِلۡكَٰفِرِينَ سَلَٰسِلَاْ وَأَغۡلَٰلٗا وَسَعِيرًا
४. निःसंशय, आम्ही काफिर (इन्कारी) लोकांकरिता शृंखला आणि जोखंड व धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे
Surah Al-Insan, Verse 4
إِنَّ ٱلۡأَبۡرَارَ يَشۡرَبُونَ مِن كَأۡسٖ كَانَ مِزَاجُهَا كَافُورًا
५. निःसंशय, नेक (सदाचारी) लोक त्या प्याल्याने पितील, ज्यात कापूराचे मिश्रण आहे
Surah Al-Insan, Verse 5
عَيۡنٗا يَشۡرَبُ بِهَا عِبَادُ ٱللَّهِ يُفَجِّرُونَهَا تَفۡجِيرٗا
६. जो एक झरा आहे, ज्यातून अल्लाहचे दास पितील, त्याचे प्रवाह (पाट) काढतील (जिकडे इच्छितील)
Surah Al-Insan, Verse 6
يُوفُونَ بِٱلنَّذۡرِ وَيَخَافُونَ يَوۡمٗا كَانَ شَرُّهُۥ مُسۡتَطِيرٗا
७. जे नवस पूर्ण करतात१ आणि त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्याचे संकट चारी बाजूंना पसरणार आहे
Surah Al-Insan, Verse 7
وَيُطۡعِمُونَ ٱلطَّعَامَ عَلَىٰ حُبِّهِۦ مِسۡكِينٗا وَيَتِيمٗا وَأَسِيرًا
८. आणि अल्लाहच्या प्रेमाखातर गरीब, अनाथ आणि कैद्यांना जेवू घालतात
Surah Al-Insan, Verse 8
إِنَّمَا نُطۡعِمُكُمۡ لِوَجۡهِ ٱللَّهِ لَا نُرِيدُ مِنكُمۡ جَزَآءٗ وَلَا شُكُورًا
९. आम्ही तर तुम्हाला केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी जेवू घालतो, तुमच्याकडून ना मोबदला इच्छितो, ना आभार
Surah Al-Insan, Verse 9
إِنَّا نَخَافُ مِن رَّبِّنَا يَوۡمًا عَبُوسٗا قَمۡطَرِيرٗا
१०. निःसंशय, आम्ही आपल्या पालनकर्त्यातर्फे त्या दिवसाचे भय राखतो जो मोठा दुःस्थितीचा आणि कठोरतापूर्ण असेल
Surah Al-Insan, Verse 10
فَوَقَىٰهُمُ ٱللَّهُ شَرَّ ذَٰلِكَ ٱلۡيَوۡمِ وَلَقَّىٰهُمۡ نَضۡرَةٗ وَسُرُورٗا
११. तेव्हा अल्लाहने त्यांना त्या दिवसाच्या संकटापासून वाचविले. आणि त्यांना तजेलता व आनंद प्रदान केला
Surah Al-Insan, Verse 11
وَجَزَىٰهُم بِمَا صَبَرُواْ جَنَّةٗ وَحَرِيرٗا
१२. आणि त्यांना त्यांच्या धीर - संयमाच्या मोबदल्यात जन्नत आणि रेशमी वस्त्र प्रदान केले
Surah Al-Insan, Verse 12
مُّتَّكِـِٔينَ فِيهَا عَلَى ٱلۡأَرَآئِكِۖ لَا يَرَوۡنَ فِيهَا شَمۡسٗا وَلَا زَمۡهَرِيرٗا
१३. ते तिथे आसनांवर तक्के लावून बसतील, त्यांना तिथे ना सूर्याची प्रखर उष्णता जाणवेल, ना सक्त थंडीची तीव्रता
Surah Al-Insan, Verse 13
وَدَانِيَةً عَلَيۡهِمۡ ظِلَٰلُهَا وَذُلِّلَتۡ قُطُوفُهَا تَذۡلِيلٗا
१४. आणि त्यांच्या (जन्नतच्या) सावल्या त्यांच्यावर झुकलेल्या असतील आणि त्यांचे (मेवे) आणि गुच्छे खाली लोंबकळत असतील
Surah Al-Insan, Verse 14
وَيُطَافُ عَلَيۡهِم بِـَٔانِيَةٖ مِّن فِضَّةٖ وَأَكۡوَابٖ كَانَتۡ قَوَارِيرَا۠
१५. आणि त्यांच्या दरम्यान चांदीची भांडी आणि काचेचे प्याले ये - जा करतील
Surah Al-Insan, Verse 15
قَوَارِيرَاْ مِن فِضَّةٖ قَدَّرُوهَا تَقۡدِيرٗا
१६. काचही चांदीची असेल, ज्यांना (पिणाऱ्यांनी) अनुमानाने मापून ठेवले असेल
Surah Al-Insan, Verse 16
وَيُسۡقَوۡنَ فِيهَا كَأۡسٗا كَانَ مِزَاجُهَا زَنجَبِيلًا
१७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे मिश्रण असेल
Surah Al-Insan, Verse 17
عَيۡنٗا فِيهَا تُسَمَّىٰ سَلۡسَبِيلٗا
१८. जन्नतच्या एका प्रवाहातून ज्याचे नाव सलसबील आहे
Surah Al-Insan, Verse 18
۞وَيَطُوفُ عَلَيۡهِمۡ وِلۡدَٰنٞ مُّخَلَّدُونَ إِذَا رَأَيۡتَهُمۡ حَسِبۡتَهُمۡ لُؤۡلُؤٗا مَّنثُورٗا
१९. आणि त्यांच्या चोहीकडे ती अल्पवयीन बालके हिंडत-फिरत असतील. जे नेहमी (बालक) राहणारे आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तर कल्पना कराल की ते (जणू) विखुरलेले (अस्सल) मोती आहेत
Surah Al-Insan, Verse 19
وَإِذَا رَأَيۡتَ ثَمَّ رَأَيۡتَ نَعِيمٗا وَمُلۡكٗا كَبِيرًا
२०. आणि तुम्ही तिथे, जिकडे पाहाल तिकडे पूर्ण ईशदेणग्या आणि महान राज्यसत्ता दिसून येईल
Surah Al-Insan, Verse 20
عَٰلِيَهُمۡ ثِيَابُ سُندُسٍ خُضۡرٞ وَإِسۡتَبۡرَقٞۖ وَحُلُّوٓاْ أَسَاوِرَ مِن فِضَّةٖ وَسَقَىٰهُمۡ رَبُّهُمۡ شَرَابٗا طَهُورًا
२१. त्यांच्या (शरीरा) वर हिरवे मौल्यवान आणि जाड रेशमी वस्त्रे असतील. आणि त्यांना चांदीच्या कांकणाचा दागिना घातला जाईल आणि त्यांना त्यांचा पालनकर्ता स्वच्छ शुद्ध (पाक) मद्य पाजेल
Surah Al-Insan, Verse 21
إِنَّ هَٰذَا كَانَ لَكُمۡ جَزَآءٗ وَكَانَ سَعۡيُكُم مَّشۡكُورًا
२२. (फर्माविले जाईल) हा आहे तुमच्या कर्मांचा मोबदला आणि तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली गेली
Surah Al-Insan, Verse 22
إِنَّا نَحۡنُ نَزَّلۡنَا عَلَيۡكَ ٱلۡقُرۡءَانَ تَنزِيلٗا
२३. निःसंशय, आम्ही तुमच्यावर कुरआन हळू हळू (क्रमाक्रमाने) अवतरित केले
Surah Al-Insan, Verse 23
فَٱصۡبِرۡ لِحُكۡمِ رَبِّكَ وَلَا تُطِعۡ مِنۡهُمۡ ءَاثِمًا أَوۡ كَفُورٗا
२४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही अपराध्याचे किंवा कृतघ्नाचे म्हणणे मान्य करू नका
Surah Al-Insan, Verse 24
وَٱذۡكُرِ ٱسۡمَ رَبِّكَ بُكۡرَةٗ وَأَصِيلٗا
२५. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करा
Surah Al-Insan, Verse 25
وَمِنَ ٱلَّيۡلِ فَٱسۡجُدۡ لَهُۥ وَسَبِّحۡهُ لَيۡلٗا طَوِيلًا
२६. आणि रात्रीच्या वेळी त्याच्या समोर सजदे करा आणि रात्रीच्या दीर्घ भागापर्यर्ंत त्याचे पावित्र्यासह गुणगान करा
Surah Al-Insan, Verse 26
إِنَّ هَـٰٓؤُلَآءِ يُحِبُّونَ ٱلۡعَاجِلَةَ وَيَذَرُونَ وَرَآءَهُمۡ يَوۡمٗا ثَقِيلٗا
२७. निःसंशय, हे लोक लवकर प्राप्त होणाऱ्या जगाची इच्छा धरतात, आणि आपल्या मागे एक मोठ्या भारदस्त दिवसाला सोडून देतात
Surah Al-Insan, Verse 27
نَّحۡنُ خَلَقۡنَٰهُمۡ وَشَدَدۡنَآ أَسۡرَهُمۡۖ وَإِذَا شِئۡنَا بَدَّلۡنَآ أَمۡثَٰلَهُمۡ تَبۡدِيلًا
२८. आम्ही त्यांना निर्माण केले आणि आम्हीच त्यांचे जोड (सांधे) मजबूत केले आणि आम्ही वाटेल तेव्हा त्यांच्या बदल्यात त्यांच्यासारखे दुसऱ्यांना बदलून आणू
Surah Al-Insan, Verse 28
إِنَّ هَٰذِهِۦ تَذۡكِرَةٞۖ فَمَن شَآءَ ٱتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِۦ سَبِيلٗا
२९. निःसंशय, हा तर एक उपदेश आहे. तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याचा मार्ग प्राप्त करावा
Surah Al-Insan, Verse 29
وَمَا تَشَآءُونَ إِلَّآ أَن يَشَآءَ ٱللَّهُۚ إِنَّ ٱللَّهَ كَانَ عَلِيمًا حَكِيمٗا
३०. आणि तुम्ही इच्छा न कराल परंतु हे की अल्लाहच इच्छिल. निःसंशय, अल्लाह जाणणारा आणि हिकमत बाळगणारा आहे
Surah Al-Insan, Verse 30
يُدۡخِلُ مَن يَشَآءُ فِي رَحۡمَتِهِۦۚ وَٱلظَّـٰلِمِينَ أَعَدَّ لَهُمۡ عَذَابًا أَلِيمَۢا
३१. ज्याला इच्छिल, आपल्या कृपेत सामील करून घेईल आणि अपराधी (अत्याचारीं) करिता त्याने दुःखदायक अज़ाब तयार करून ठेवला आहे
Surah Al-Insan, Verse 31