Surah Al-Mursalat - Marathi Translation by Muhammad Shafi I Ansari
وَٱلۡمُرۡسَلَٰتِ عُرۡفٗا
१. मनमोहक, सतत चालणाऱ्या मंद हवेची शपथ
Surah Al-Mursalat, Verse 1
فَٱلۡعَٰصِفَٰتِ عَصۡفٗا
२. मग जोरात (वेगाने) वाहू लागणारींची शपथ
Surah Al-Mursalat, Verse 2
وَٱلنَّـٰشِرَٰتِ نَشۡرٗا
३. आणि (ढगांना) पसरविणारींची शपथ
Surah Al-Mursalat, Verse 3
فَٱلۡفَٰرِقَٰتِ فَرۡقٗا
४. मग सत्य - असत्याला वेगवेगळे करणारे
Surah Al-Mursalat, Verse 4
فَٱلۡمُلۡقِيَٰتِ ذِكۡرًا
५. आणि वहयी (प्रकाशना) आणणाऱ्या फरिश्त्यांची शपथ
Surah Al-Mursalat, Verse 5
عُذۡرًا أَوۡ نُذۡرًا
६. जी (वहयी) आरोपाचे खंडन करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी असते
Surah Al-Mursalat, Verse 6
إِنَّمَا تُوعَدُونَ لَوَٰقِعٞ
७. निःसंशय, ज्या गोष्टीचा तुमच्याशी वायदा केला जात आहे ती अगदी निश्चितपणे घडून येणार आहे
Surah Al-Mursalat, Verse 7
فَإِذَا ٱلنُّجُومُ طُمِسَتۡ
८. तर जेव्हा तारे निस्तेज केले जातील
Surah Al-Mursalat, Verse 8
وَإِذَا ٱلسَّمَآءُ فُرِجَتۡ
९. आणि आकाशाचा विध्वंस केला जाईल
Surah Al-Mursalat, Verse 9
وَإِذَا ٱلۡجِبَالُ نُسِفَتۡ
१०. आणि जेव्हा पर्वत तुकडे तुकडे करून उडविले जातील
Surah Al-Mursalat, Verse 10
وَإِذَا ٱلرُّسُلُ أُقِّتَتۡ
११. आणि जेव्हा पैगंबरांना निर्धारित वेळेवर आणले जाईल
Surah Al-Mursalat, Verse 11
لِأَيِّ يَوۡمٍ أُجِّلَتۡ
१२. कोणत्या दिवसाकारीता (त्यांना) थांबविले गेले आहे
Surah Al-Mursalat, Verse 12
لِيَوۡمِ ٱلۡفَصۡلِ
१३. निर्णयाच्या दिवसाकरिता
Surah Al-Mursalat, Verse 13
وَمَآ أَدۡرَىٰكَ مَا يَوۡمُ ٱلۡفَصۡلِ
१४. आणि तुम्हाला काय माहीत की निर्णयाचा दिवस काय आहे
Surah Al-Mursalat, Verse 14
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
१५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुःस्थिती (विनाश) आहे
Surah Al-Mursalat, Verse 15
أَلَمۡ نُهۡلِكِ ٱلۡأَوَّلِينَ
१६. काय आम्ही पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना नष्ट नाही केले
Surah Al-Mursalat, Verse 16
ثُمَّ نُتۡبِعُهُمُ ٱلۡأٓخِرِينَ
१७. मग आम्ही त्यांच्या पाठोपाठ नंतरच्या लोकांना आणले
Surah Al-Mursalat, Verse 17
كَذَٰلِكَ نَفۡعَلُ بِٱلۡمُجۡرِمِينَ
१८. आम्ही अपराधी लोकांशी असाच व्यवहार करतो
Surah Al-Mursalat, Verse 18
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
१९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता विनाश आहे
Surah Al-Mursalat, Verse 19
أَلَمۡ نَخۡلُقكُّم مِّن مَّآءٖ مَّهِينٖ
२०. काय आम्ही तुम्हाला तुच्छ पाण्या (वीर्या) पासून निर्माण केले नाही
Surah Al-Mursalat, Verse 20
فَجَعَلۡنَٰهُ فِي قَرَارٖ مَّكِينٍ
२१. मग आम्ही त्यास मजबूत (आणि सुरक्षित) स्थानी ठेवले
Surah Al-Mursalat, Verse 21
إِلَىٰ قَدَرٖ مَّعۡلُومٖ
२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत
Surah Al-Mursalat, Verse 22
فَقَدَرۡنَا فَنِعۡمَ ٱلۡقَٰدِرُونَ
२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत
Surah Al-Mursalat, Verse 23
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
Surah Al-Mursalat, Verse 24
أَلَمۡ نَجۡعَلِ ٱلۡأَرۡضَ كِفَاتًا
२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले
Surah Al-Mursalat, Verse 25
أَحۡيَآءٗ وَأَمۡوَٰتٗا
२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
Surah Al-Mursalat, Verse 26
وَجَعَلۡنَا فِيهَا رَوَٰسِيَ شَٰمِخَٰتٖ وَأَسۡقَيۡنَٰكُم مَّآءٗ فُرَاتٗا
२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले
Surah Al-Mursalat, Verse 27
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
२८. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
Surah Al-Mursalat, Verse 28
ٱنطَلِقُوٓاْ إِلَىٰ مَا كُنتُم بِهِۦ تُكَذِّبُونَ
२९. त्या (जहन्नम) कडे जा, जिला तुम्ही खोटे ठरवित होते
Surah Al-Mursalat, Verse 29
ٱنطَلِقُوٓاْ إِلَىٰ ظِلّٖ ذِي ثَلَٰثِ شُعَبٖ
३०. चला त्या सावलीकडे, जिला तीन शाखा आहेत
Surah Al-Mursalat, Verse 30
لَّا ظَلِيلٖ وَلَا يُغۡنِي مِنَ ٱللَّهَبِ
३१. जी वास्तविक ना छाया देणारी आहे आणि ना ज्वालापासून वाचवू शकते
Surah Al-Mursalat, Verse 31
إِنَّهَا تَرۡمِي بِشَرَرٖ كَٱلۡقَصۡرِ
३२. निःसंशय, (जहन्नम) महालासारख्या चिंगाऱ्या फेकते
Surah Al-Mursalat, Verse 32
كَأَنَّهُۥ جِمَٰلَتٞ صُفۡرٞ
३३. जणू काही ते पिवळे उंट आहेत
Surah Al-Mursalat, Verse 33
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
३४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी दुर्दशा (विनाश) आहे
Surah Al-Mursalat, Verse 34
هَٰذَا يَوۡمُ لَا يَنطِقُونَ
३५. आज (चा दिवस) असा दिवस आहे की ते बोलूही शकणार नाहीत
Surah Al-Mursalat, Verse 35
وَلَا يُؤۡذَنُ لَهُمۡ فَيَعۡتَذِرُونَ
३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल
Surah Al-Mursalat, Verse 36
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे
Surah Al-Mursalat, Verse 37
هَٰذَا يَوۡمُ ٱلۡفَصۡلِۖ جَمَعۡنَٰكُمۡ وَٱلۡأَوَّلِينَ
३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे
Surah Al-Mursalat, Verse 38
فَإِن كَانَ لَكُمۡ كَيۡدٞ فَكِيدُونِ
३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा
Surah Al-Mursalat, Verse 39
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता
Surah Al-Mursalat, Verse 40
إِنَّ ٱلۡمُتَّقِينَ فِي ظِلَٰلٖ وَعُيُونٖ
४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये
Surah Al-Mursalat, Verse 41
وَفَوَٰكِهَ مِمَّا يَشۡتَهُونَ
४२. आणि त्या फळांमध्ये, ज्यांची ते इच्छा करतील
Surah Al-Mursalat, Verse 42
كُلُواْ وَٱشۡرَبُواْ هَنِيٓـَٔۢا بِمَا كُنتُمۡ تَعۡمَلُونَ
४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात
Surah Al-Mursalat, Verse 43
إِنَّا كَذَٰلِكَ نَجۡزِي ٱلۡمُحۡسِنِينَ
४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
Surah Al-Mursalat, Verse 44
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे
Surah Al-Mursalat, Verse 45
كُلُواْ وَتَمَتَّعُواْ قَلِيلًا إِنَّكُم مُّجۡرِمُونَ
४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात
Surah Al-Mursalat, Verse 46
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
Surah Al-Mursalat, Verse 47
وَإِذَا قِيلَ لَهُمُ ٱرۡكَعُواْ لَا يَرۡكَعُونَ
४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही
Surah Al-Mursalat, Verse 48
وَيۡلٞ يَوۡمَئِذٖ لِّلۡمُكَذِّبِينَ
४९. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा विनाश आहे
Surah Al-Mursalat, Verse 49
فَبِأَيِّ حَدِيثِۭ بَعۡدَهُۥ يُؤۡمِنُونَ
५०. आता या (कुरआना) नंतर कोणत्या गोष्टीवर ईमान राखतील
Surah Al-Mursalat, Verse 50